जगभरातील परंपरावादी राजकिय पक्ष आणि निवडून आलेले अध्यक्ष/पंतप्रधान

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
26 Feb 2016 - 5:06 pm
गाभा: 

भाजपा आणि नमो सरकारचे सर्वच आलबेल आहे असे म्हणावयाचे नाही, जबाबदार विरोधी पक्षांची लोकशाहीत महत्वाची भूमिका असते, अर्थात यातील 'जबाबदार' हा शब्द महत्वाचा आहे, आणि सध्याचा विरोधीपक्ष जबाबदारीने जबाबदारी पार पाडतोय अशी स्वत:ची शाब्बासकी स्वतःच समर्थकांनी भले द्यावी पण अनुनयवादातून बाहेर पडून त्यांनी त्यांच्या सेक्युलरभूमिका खरेच किती शुद्ध आणि निष्पक्ष वागवल्या आहेत, त्यांच्याकडून अराजकतेचे समर्थन तर होत नाहीएना हा तटस्थ निरीक्षकांसाठी अद्यापतरी साशंकतेचा भाग असावा.

कोणतेही लोकशाही सरकारला लोकांना व्यवस्थीत सेवा देण्यापुरते स्थैर्य मिळावे म्हणून ५ वर्षांसाठी निवडून देण्याचा भारतीय राज्यघटनेचा संकेत आहे. मागची सरकारे पाहता साधारणतः तीन एक वर्षांनी राजकीय असंतोषास वाढ होण्यास सुरवात होते पाचव्या वर्षी निवडणूका होतात म्हणजे किमान तीनएकवर्षेतरी सर्वसाधारणपणे निष्कंटकपणे नव्या सरकारांना काढता येतात नंतर असंतोष झाला तरी सरकारलाही त्यांच्या कृती सुद्धारण्यासाठी आणि असंतोष अगदिच वाढला तर दोन वर्षांनी निवडणूका असतातच म्हणजे असंतोषाचे मतपेटीत रुपांतर होऊन, सरकार बदलते पण लोकशाही स्थिर राहते. लोकांनी जे काही लोकशाही प्रक्रीयेतून सरकार निवडून दिले आहे त्याला तीन एकवर्षेतरी सत्तेवर शांतपणे काम करता आले पाहीजे, पण यावेळी बहुमतातून निवडून आलेल्या सरकारवर लवकर टिका चालू झाली, हे ठिक, पण लगेच दुसर्‍या दिवशी तो हुकुमशहा होणार आहे असे अभासी चित्र रंगवून लोकांना रस्त्यावर आणणे अराजक पसरवून देशाची हकनाक आंतरराष्ट्रीय पत घसरवणे कितपत सयुक्तीक आहे. विरोधी पक्षाने निवडणुका असपास नसताना अराजकाची स्थिती उत्पन्न केली तर कोणत्याही सरकार पुढे काय पर्याय शिल्लक राहतात? म्हणजे सरकार कडक वागले तर त्यांना हुकुमशहा म्हणण्यास तुम्ही पुन्हा मोकळे पण त्यांना हुकुमशाहीच्या वाटेवर लोटण्यास मग खरी जबाबदारी कुणाची असते ?

सध्या राजकीय हितसंघर्षातून भाजपा आणि नमो सरकारवर टिका करताना नवा हुकुमशहा येत असल्याचे हकनाक चित्र निर्माण केले जात आहे. भाजपा हा जगातला एकमेव परंपरावादी पक्ष नाही, आमेरिकेचा रिपब्लिकन पक्ष, इंगलंडचा कंझर्वेटीव्ह पक्ष दशकोंदशके निवडून येत राहीला आहे त्यां सर्व सरकारांनी हुकूमशाही आणलेली नाही.

जगभरातील परंपरावादी राजकीय पक्षांची यादी आणि परंपरावादी पक्षातून अध्यक्ष वा पंतप्रधान म्हणून निवडून आले पण हुकुमशहा झाले नाहीत अशा लोकांची यादी मराठीतून बनवण्यात इच्छुकांनी साहाय्य करावे म्हणजे टोकाचा अराजकतावाद पसरवण्यास आळा बसण्यास अत्यल्प का होईना मदत होईल.

* जगभरातील परंपरावादी राजकीय पक्षांची अल्प माहिती इंग्रजी विकिपीडिया