गाभा:
साल 2015!
मे महिन्याच्या अखेरपर्यंत एकच चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये होता.
फ्युरियस 7!
साल 2016!
12 फेब्रुवारीला तीन चित्रपट आले.
फीतूर आणि सनम रे, हे हिंदी चित्रपट!
आणि डेड्पूल हा हॉलीवुडचा चित्रपट!
आणि जिंकले कोण?
डेड्पूल!
दोन आठवड्यात पन्नास कोटी.
त्या दोन्ही चित्रपटांची एकत्रित कमाई इतकी नव्हती.
हॉलीवुड जिंकत आहे?
याचा हिंदी चित्रपटसृष्टीवर काय परिणाम होईल?
आणि मुख्य म्हणजे मराठी चित्रपट या स्पर्धेत टिकेल?
तुम्हाला काय वाटत?
प्रतिक्रिया
21 Feb 2016 - 10:53 am | स्पा
हिंदी पिक्चर ठेतरात जाऊन बघणे कधीच सोडून दिलेले होते, आता तर डाउनलोड करूनही बघण्याच्या लायकीचे उरलेले नाहीत
आपण फक्त मार्वल आणि डीसी प्रेमी ;)
21 Feb 2016 - 11:13 am | उगा काहितरीच
बाडिस !
21 Feb 2016 - 8:40 pm | मुक्त विहारि
+१
24 Feb 2016 - 7:36 pm | नया है वह
+१
21 Feb 2016 - 10:56 am | DEADPOOL
batman V superman येतोय!
त्यामागोमाग captain america civil war!
21 Feb 2016 - 11:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
बॉलिवुडमधुन वर्षाला २-३ चांगले पिक्चर येत असतील फारतर.
कोंकणा सेनचा हटके चित्रपट आला नाही गेल्या काही वर्षात.
21 Feb 2016 - 11:17 am | जेपी
कप्तान,
कोंकणासेनचा "तलवार" चित्रपट आलता काही काळापुर्वी..
21 Feb 2016 - 11:16 am | स्पा
मार्वल
सिविल वॉर - ६.५.२०१६
डॉक्टर स्ट्रेंज - ४.११.२०१६
गार्डियन ऑफ ग्यालाक्सी २- ५.५.२०१७
थोंर - २८.७.२०१७
ब्ल्याक प्यांथर - ३.११.२०१७
अवेंजर इन्फिनिटी वॉर(पार्ट१ ) - ४.५.२०१८
क्याप्टन मार्वल -६.७.२०१८
इन्हयुमन - २.११.२०१८
अवेंजर इन्फिनिटी वॉर(पार्ट २ ) - ३.५.२०१९
डीसी
batman V superman- २५.३.२०१६
सुसाईड स्क्वाड - ५.८.२०१६
वंडर वूमन - २३.६.२०१७
जस्टीस लीग - १७.११.२०१७
फ्ल्याश -२३.३.२०१८
अॅक्वामॅन - २७.७.२०१८
शाझॅम - ५.४.२०१९
जस्टीस लीग २ - १४.६.२०१९
साय्बोर्ग - ३.४.२०२०
ग्रीन ल्यान्तर्ण - १९.६.२०२०
23 Feb 2016 - 9:28 am | DEADPOOL
यात ant man and the wasp पण टाका.
21 Feb 2016 - 11:19 am | पिवळा डांबिस
हॉलिवूड जिंकत आहे कारण हॉलीवूड हे बॉलीवूडपेक्षा श्रेष्ठ सिनेमे देत आहे, गेली ८-९ दशके!
बॉलीवीड फक्त कॉपी करतंय, ती ही अयशस्वी!!!!
21 Feb 2016 - 11:53 am | DEADPOOL
मर्वेल चे फॉक्स स्तुडिओ चे चित्रपट विसरला वाटत ; )
x men apocalypse.
gambit
wolverine 3
fantastic four 2
deadpool 2
21 Feb 2016 - 12:00 pm | स्पा
हेही आहेतच इन पाइपलाइन
21 Feb 2016 - 8:20 pm | प्रचेतस
मार्वल आणि डीसी व्यतिरिक्त डिस्नेचा द जंगल बुक, वार्नर ब्रदर्सचा द लिजेंड ऑफ़ टारझन हे चित्रपटपण लवकरच येत आहेत.
23 Feb 2016 - 3:15 pm | सुमीत भातखंडे
येस्स....ट्रेलर तर जबरदस्त आहे. नक्की बघणार
21 Feb 2016 - 12:20 pm | नाना स्कॉच
हॉलीवुड मधे ठराविक साचा आहे चित्रपटांचा,
काही चांगले सोडले तर इतर साचेबद्ध असतात उदा हल्ली डाई हार्ड सीरीज फ़क्त ब्रूस विलीस च्या पोटापाण्याची सोय म्हणून निघतात असे वाटते, कॉमिक्स आधारित सिनेमा वेगळे पण बाकी आनंदी आनंद असतो.
असो!
21 Feb 2016 - 8:39 pm | मुक्त विहारि
असेल असेही असेल....
क्रिस्तोफर नोलान, स्पिलबर्ग, बिली वाइल्डर, चार्ली चॅप्लीन, हेरॉल्ड लॉइड, आल्फ्रेड हिचकॉक पण असेच साचेबंद सिनेमे देतात का?
आणि हे जर का अपवाद असतील तर,
टॉम हँक्स..... फॉरेस्ट गम्प ते द टर्मिनल....व्हाया यु हॅव गॉट अ मेल,
निकोलस केज ---- गॉन इन सिक्स्टी सेकंड्स ते नॅशनल ट्रेझर व्हाया फेस ऑफ
लियोनार्डो डिकाप्रियो --- टाय टॅनिक ते इन्सेप्शन व्हाया शटर आयलंड व्हाया कॅच मी इफ यु कॅन
जॉनी डेप ---- निक ऑफ टाइम ते द टुरिस्ट व्हाया पायरेट्स ऑफ द कॅरेबियन
ह्यांच्या बाबतीत काय?
सध्या इथेच थांबतो....
मग पुढे आपल्या ग्रेगरी पेक, सीन कॉनेरी, चक नॉरीस (तोच तो "रिटर्न ओफ द ड्रॅगन" मध्ये "ब्रुस ली" कडून मार खाणारा) ह्यांच्याबद्दल बोलू.
आणि निव्वळ सीरीज बाबतीत बोलायचे तर फक्त कॅरी ऑनचेच ३१ पार्टस निघालेले आहेत. आपल्या जेम्स बाँड पेक्षा पण जास्तच. (सध्या तरी)
आणि जोडी बाबत बोलायचे तर, बड स्पेन्सर आणि टेरेन्स गिल ह्यांनीच १८ सिनेमे दिलेले आहेत.
22 Feb 2016 - 10:48 am | मुक्त विहारि
"टेरेन्स हिल" असे करून हवे आहे.
(आमची स्वसंपादनाची गरज इतपतच.)
22 Feb 2016 - 12:38 pm | DEADPOOL
अहो टॉम हँक्स म्हणजेच चित्रपटसृष्टीचे महाकाव्य!
त्यावर धागा काढला तर पन्नास साठ भाग सहज होतील!
22 Feb 2016 - 12:42 pm | स्पा
ब्रिजेस ऑफ स्पाईज
साला प्रत्येक पिक्चर मध्ये हा इमोशनल करून जातोच
21 Feb 2016 - 12:38 pm | ससन्दीप
७०% ते ८०% बॉलीवूड चित्रपट हे फक्त 'लग्न ' या एकाच विषयाभोवती गुंफलेले असतात .
अनुराग कश्यप, दिबाकर बेनर्जी, आधीचा RGV यांचा नेहमीच काहीतरी वेगळे मांडण्याचा प्रयत्न राहिलाय.
21 Feb 2016 - 12:41 pm | DEADPOOL
बॉम्ब वेल्वेट आठवला!
21 Feb 2016 - 6:48 pm | बोका-ए-आझम
बाॅलिवूड म्हणजे फक्त हिंदी चित्रपट म्हणत असाल तर जेव्हा ज्युरासिक पार्क चालला (१९९४ साली बहुतेक) तेव्हापासून या विषयावर चर्वितचर्वण चालू आहे. काहीही झालेलं नाही बाॅलिवूडला. हे हाॅलिवूडचे चित्रपट अजिबात न पाहाणारा उत्तर प्रदेश- बिहार - पंजाब - हरयाणा इथला प्रेक्षक हिंदी, पंजाबी आणि आजकाल भोजपुरी चित्रपट पाहातो. बाकी साऊथचा प्रेक्षक रजनी अण्णा, प्रभास गारू आणि महेश बाबू (अजूनही असतील पण हे तिघे आठवले) यांच्यापुढे कोणाचीच पत्रास ठेवत नाही. त्यामुळे कल्जी क्रू नये!
23 Feb 2016 - 11:13 am | विजुभाऊ
बोका भौ
आणि मराठी प्रेक्षक भरत जाधव , मकरंद अनासपुरे आणि गेला बाजार आषोक सर्राफ, सचिन पिळगावकर( किती योग्य आडनाव है नै!) व लक्ष्या बेर्डे यांचेच्च पिच्चर बघ्तो
21 Feb 2016 - 8:52 pm | तर्राट जोकर
हे हे लैच फालतू कम्पॅरिजन करता राव तुम्ही. डेडपूल तुम्हाला आवडतो म्हणुन तुम्ही आमच्या बॉलिबूडला कमी दाखवणार काय? घ्यायचा आनंद तर घ्याना मुकाट. आनंद इतका उतू चालल्लाय का दुसर्याला वाकुल्या दाखवणे सुरु आहे. सनम रे अन फितुरसारख्या चित्रपटाची तुम्ही तुलना करता व्हय डेडप्पूलशी. २०१५ चा सारा रेकॉर्ड काढा, हो जायेगा दूध का दूध अऊर पानी का पानी.
22 Feb 2016 - 6:12 am | DEADPOOL
काही वाकुल्या दाखवत नाहीये!
आनंद घ्या मुकाट-------------इथे आनंद आणि दुःखाचा प्रश्नच येत नाही.
२०१५ चा सारा रेकॉर्ड काढा, हो जायेगा दूध
का दूध अऊर पानी का पानी.------------------काढा ना आणि कंपेरिज़नमध्ये दोन्हींचा ओवरसीस बिज़्नेस बघा.
22 Feb 2016 - 12:40 pm | तर्राट जोकर
ओवरसीज चा काय संबंध? हिंदी चित्रपट भारतातच जास्त बघितले जातील ना?
22 Feb 2016 - 7:25 pm | DEADPOOL
pk 760 कोटी!
ओवरसीस 440 कोटी!
दिल्वाले 400 कोटी!
ओवरसीस 250 कोटी!
23 Feb 2016 - 2:56 pm | नाखु
आणि रोचक माहीती.
पुण्यातल्या मंडईत कोथींबीर जुड्डी काय भाव आहे आणि अमेरिका-ब्रिट्न इथील मार्केटात जुड्डीचा काय भाव आहे.
जाणकारांनी खुलासा करावा.
24 Feb 2016 - 9:25 am | DEADPOOL
तिकडेहि कोथिंबीर जुडी़मध्ये मिळते?
22 Feb 2016 - 6:14 am | DEADPOOL
www.bollywoodhungama.com/movies/features/type/view/id/8314/
24 Feb 2016 - 7:26 pm | सिरुसेरि
जॉर्ज क्लूनी आणी रिचर्ड गेरे हे रुबाबदार अभिनेते अभिनयातही तोडीस तोड आहेत.
25 Feb 2016 - 5:55 pm | चिगो
काय फरक पडतो? ज्याला जे आवडते, ते तो बघतो. मीपण हॉलिवुडच्या चित्रपटांचा चाहता आहे, पण म्हणून मग दर्जेदार हिंदी/मराठी चित्रपट पाहणार नाही असं थोडीच आहे? 'कहानी', 'डर्टी पिक्चर' 'बदलापूर' 'मांझी', 'फँड्री' हे बघणंच पसंत करेन मी 'अॅनकोंडा' 'मेगा स्नेक' आणि इतर अनेक पुचाट हॉलिदूडपट बघण्यापेक्षा..
जनता 'व्हॅल्यु फॉर मनी' मागते, राव.. पब्लिक लै हुशार आहे. चिंता सोडा जगाची..