कुणी बेभान म्हणतं मला, कुणी वेडं समजतं मला
धरतीच्या उमाळ्याला आकाशीचा नभच समजलेला
कसा तुझ्यापासून दूर मी, अन माझ्यापासून दूर तू
दुराव्यातील हा जिव्हाळा फक्त आपल्याला कळलेला
प्रेम तुझ्या माझ्या विश्वासाची एक पवित्र गाथा आहे
कधी कबीर तर कधी मीरेचीही तशीही हीच कथा आहे
सगळेच म्हणतात इथे, माझे डोळे आसवांनी भरलेले
कळलं तुला तर मोती, नाही तर पाण्याचा साठा आहे
आहे वेदनांचा सागर ह्र्दयात, पण मला रडायचं नाही
माझे अश्रु तुझ्या प्रेमाची निशाणी, जी हरवायची नाही
माझी ओढ तुला कळो किंवा नाही, पण थोडं ऐक तू
जी गोष्ट माझी झाली नाही, ती तुझीही व्हायची नाही
भुंगा जर कधी कमळ फुलावर बसला तर पाप घडलं
आम्ही एखादं स्वप्न जिवापाड जपलं तर पाप घडलं
कालपर्यंत तल्लिन होऊन ते ऐकत होते प्रेमाचे किस्से
आणि आम्ही खरंच कुणावर प्रेम केलं तर पाप घडलं
डॉ. कुमार विश्वास यांच्या "कोई दिवाना कहता हैं" या प्रसिद्ध हिंदी कवितेचं स्वैर मराठी भाषांतर.
मुळ हिंदी कविता :
कोई दीवाना कहता है कोई पागल समझता है
मगर धरती की बेचैनी को बस बादल समझता है
मैं तुझसे दूर कैसा हूँ तू मुझसे दूर कैसी है
ये तेरा दिल समझता है या मेरा दिल समझता है
मोहब्बत एक एहसासों की पावन सी कहानी है
कभी कबीरा दीवाना था कभी मीरा दीवानी थी
यहाँ सब लोग कहते है मेरी आँखों में आंसू है
जो तू समझे तो मोती है जो ना समझे तो पानी है
समंदर पीर के अंदर है लेकिन रो नहीं सकता
ये आंसू प्यार का मोती है इसको खो नहीं सकता
मेरी चाहत को दुल्हन तूबना लेना मगर सुनले
जो मेरा हो नहीं पाया वो तेरा हो नहीं सकता
भर्मर कोई कुमुदनी पर मचल बैठा तो हंगामा
हमारे दिल में कोई ख्वाब पल बैठा तो हंगामा
अभी तक डूब कर सुनते थे सब किस्सा मोहब्बत का
हम किस्से को हकीक़त में बदल बैठे तो हंगामा
(दोन महिन्यानंतर मिसळपाववर प्रकट झालेला)
सतिश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो
प्रतिक्रिया
15 Sep 2008 - 7:11 am | मदनबाण
व्वा...
आहे वेदनांचा सागर ह्र्दयात, पण मला रडायचं नाही
माझे अश्रु तुझ्या प्रेमाची निशाणी, जी हरवायची नाही
माझी ओढ तुला कळो किंवा नाही, पण थोडं ऐक तू
जी गोष्ट माझी झाली नाही, ती तुझीही व्हायची नाही
हे फार आवडलं..
(बेभान झालेला...)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
15 Sep 2008 - 12:01 pm | राघव
सगळेच म्हणतात इथे, माझे डोळे आसवांनी भरलेले
कळलं तुला तर मोती, नाही तर पाण्याचा साठा आहे
या ओळी सगळ्यांत खास. आवडले.
मुमुक्षू