सातकापे aka सातकप्पे घावन

यशोधरा's picture
यशोधरा in पाककृती
18 Feb 2016 - 11:53 am

लागणारा वेळ:
३० मिनिटे

लागणारे जिन्नस:
घावन बनवण्यासाठी -
२ वाट्या तांदूळ पिठी,
२ वाट्या नारळ पाणी
आणि चवीसाठी मीठ

सारण बनवण्यासाठी -
१ वाटी खवलेले खोबरे,
साधारण अर्धा ते पाऊण वाटी गूळ,
अर्धा चमचा वेलची पूड
१ टेस्पू खसखस

तेल घावनासाठी आणि तूप सारण बनवण्यासाठी.

क्रमवार पाककृती:
१. प्रथम गॅसवरील पातेल्यात १-२ चमचे तूप घालून त्यात खोबरे, गूळ, वेलची पूड, खसखस हे एकत्र करुन सारण बनवून घ्या व थंड करायला ठेवा.
२ .घावनासाठी पीठ तयार करताना तांदळाच्या पिठीमध्ये नारळपाणी घालत हलवत रहा, कुठेही गुठळ्या राहणार नाहीत असे पहावे. चवीपुरते मीठ घालावे.
३. तवा गरम करुन त्यावर आधी तेल सोडावे व त्यावर घावनाचे पीठ घालावे (डोश्याप्रमाणे) बाजूने तेल सोडावे.
४. घावन खालून सुटू लागले की त्यातील अर्ध्या भागात सारण पसरावे व उरलेला अर्धा भाग त्यावर उलटून झाकावा. - १ ला कप्पा
५. रिकाम्या अर्ध्या भागात आता पुन्हा घावनाचे पीठ घालावे व तो भाग शिजत आला की त्यावर सारण पसरुन, आधीचा कप्पा त्यावर उलटावा - २ रा कप्पा.

असे ७ कप्पे होईतोवर करायचे व सातवा कप्पा झाला की खाली उतरवायचे..

aa

थंड झाले की गट्टम् करायचे! कोणी केले तर प्लीज फोटो टाका.

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

18 Feb 2016 - 11:56 am | मृत्युन्जय

कधी येउ खायला?

यशोधरा's picture

18 Feb 2016 - 11:58 am | यशोधरा

तुला वेळ असेल तेव्हा. :)

प्राची अश्विनी's picture

18 Feb 2016 - 11:59 am | प्राची अश्विनी

अरे वा! खूप वर्षांपूर्वी खाल्लेले. मी असाच चीझी वेज डोसा बनवते.

यशोधरा's picture

18 Feb 2016 - 12:08 pm | यशोधरा

मस्त :)

कोणी केले तर प्लीज फोटो टाका.
काय हे मिपा वरच्या निलम गोर्‍हे ताई... हे म्हणजे फक्त "लिहुन दाखवले" असे झाले की ! :प

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

यशोधरा's picture

18 Feb 2016 - 12:05 pm | यशोधरा

तू करुन दाखव :P

मदनबाण's picture

18 Feb 2016 - 12:07 pm | मदनबाण

मी "खाऊन दाखवतो" ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

करुन, फोटो काढून, इथे टाकून, खा! =))

मिपा वरच्या निलम गोर्‍हे ताई यात तुम्ही स्वंपाकिय राजकारण आणु नका ! =))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

मिपा वरच्या निलम गोर्‍हे ताई

एकदम चप्खल ळॉळ =)) =)) =))

किसन शिंदे's picture

18 Feb 2016 - 1:53 pm | किसन शिंदे

धत्त तेरी.!!! मला वाटलं नवीन काहीतरी प्रकार "पाहायला" मिळेल. :(

फोटो नसल्यामुळे निराशा झाली.

-
प्रणेशा

स्वाती दिनेश's picture

18 Feb 2016 - 2:19 pm | स्वाती दिनेश

प्रकार दिसतो आहे , पण किचकट प्रकार दिसतोय. पेशन्स आणि वेळाचे काम दिसतेय. चव मस्तच लागत असेल..
स्वाती

घावन किती जाड होत असेल त्याचा विचार करतोय.

खूप जाङ नाही होत घावन, तांदूळ पिठीचं घावन पातळ होतं.

घावन किती जाड होत असेल त्याचा विचार करतोय.

खेडूत's picture

18 Feb 2016 - 2:37 pm | खेडूत

फोटू हवेतच!
करून (+ खाऊन) बघणार .

सुनील's picture

18 Feb 2016 - 3:34 pm | सुनील

एका घावनाच्या ७ घड्या? म्हणजे मूळ घावनाच्या १/१२८ पट?????

फोटो द्या बॉ. विश्वास नाय बसत ह्या पाकृवर.

राजे घड्या नाही घालायच्या, पहिली घडी घालून जी रिकामी जागा उरेल त्यात पीठ पसरवायचं; मग त्यावर साऱण पसरुन पुन्हा घडी, पुन्हा उरलेल्या अर्ध्या जागेत घावनाचं पीठ, असं सात वेळा.

सुनील's picture

18 Feb 2016 - 3:45 pm | सुनील

ओक्के!

यशोधरा's picture

18 Feb 2016 - 4:01 pm | यशोधरा

बराबर. फोटो टाकूयात ह्या वीकांताला.

सात मजली हसणे वाक्प्रचार इथूनच सुरू झाला का?

कंजूस's picture

18 Feb 2016 - 4:18 pm | कंजूस

कोणीतरी हसून ( सातमजली ) विडियो टाकाल का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Feb 2016 - 4:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचंड निराश झालो. यशोधरा काकूकडून अशी अपेक्षा नव्हती. :(

-दिलीप बिरुटे

पाकृ झकास आहे.कोणी केली तर खायला नक्की आवडेल ;)

असे केले तर आम्हा मिपाकरांनी (फोटोसाठी) कुठे आशेने बघावे.

अदमास पाठवले
मिपा दुर्लक्षीत गट

मिंटी's picture

18 Feb 2016 - 5:14 pm | मिंटी

मैय्या कधी येऊ खायला ??? ;)

यशोधरा's picture

18 Feb 2016 - 7:40 pm | यशोधरा

हुश्श! रेकॉर्ड फोटोग्राफ्स फक्त. कलात्मक मूल्य वगैरे शोधायला जाऊ नये प्लीज!

सूड's picture

18 Feb 2016 - 8:11 pm | सूड

हे किती कप्पे झाले?

प्रत्येक कप्प्याचा फोटो नाही काढाला आहे सूड. शेवटच्या फोटोमध्ये दुमडलेले ७ कप्पे पूर्ण झालेले आहे.
बाकी इतर फोटो घावन कसे बनवायचे त्याची कल्पना यायला दिले आहेत फक्त.

आता कॉम्प्लेक्स आला. बघू आमची मजल किती कप्प्यांपर्यंत जाते. पीठी आहेच, एक नारळ आणावा लागेल.

कॉम्प्लेक्स?? कशाला तो आणि? :=))
सोपं काम आहे. बिडाचा तवा असेल तर अजून छान होतील.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Feb 2016 - 7:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

भुक लागलेली आहे.

साहित्य उकडीच्या मोदकाचे असल्याने चवही तशीच लागेल असा अंदाज आहे. हे प्रकरण जरा सुगरणींचं काम आहे असे वाटतय. फोटू अजून दिसला नाहीये.

रेवती's picture

18 Feb 2016 - 7:56 pm | रेवती

फोटू दिसले. धन्यवाद.

रमेश आठवले's picture

19 Feb 2016 - 7:47 am | रमेश आठवले

म्हणून या पदार्थाला मोदकवीच असे पर्यायी नाव आपण देऊ शकतो का ?

यशोधरा's picture

19 Feb 2016 - 7:49 am | यशोधरा

नाही. नाय, नो, नेव्हर.

पैसा's picture

18 Feb 2016 - 8:07 pm | पैसा

एक नंबर पाकृ. अशा पारंपारिक कोकणी पाकृ खायला असतील तर स्वर्ग नको बघायला.

बांदा पत्रादेवी ला भालेकरच्या महालक्ष्मी हॉटेलसमोर आधीपासून सावली नावाचे फक्त तऱ्हेतऱ्हेचे घावन देणारे हॉटेल आहे. तिथे रसातले आणि असे पुरणाचे ४ घड्यांचे घावन खाल्लेत. करायचा प्रयत्न केला नाही कधी.

रसपोळी? अहाहा! किती दिवसांत केली नाही. आता करणे आले ह्या वीकांती!!

पैसा's picture

18 Feb 2016 - 8:55 pm | पैसा

आणि झक्क फटू काढून पाकृ लिही.

स्रुजा's picture

19 Feb 2016 - 3:32 am | स्रुजा

ए बायांनो, साधं सरळ आमटी भाजी पोळी भात करायला काय जीवावर येतं गं तुमच्या? इथे बसुन सँडविच घशाखाली उतरत नाही मग !

करुन बघणार आणि काम वाढवल्याबद्दल यशो चा निषेढ करत खाणार.. गुडघे दुखतात आताशा पोरींनो.. तरी म्हणाल म्हातारीला या वयात खायचा किती तो सोस ! ;)

चांगलाच अवघड प्रकार दिसतोय. पण करून पाहीन.

जुइ's picture

19 Feb 2016 - 12:54 am | जुइ

आयती खायला आवडेल ;-)

यशोधरा's picture

19 Feb 2016 - 6:44 am | यशोधरा

सगळ्यांचे आभार!
फोटो नाहीत अशी ज्यांची तक्रार होती, तिचे निराकरण करण्यासाठी खास घावन बनवून फोटो टाकले आहेत.

मदनबाण's picture

19 Feb 2016 - 7:18 am | मदनबाण

वा.वा.वा... आता कसं "करुन दाखवले" झाले की नाही ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जय देव जय देव, जय शिवराया !

यशोधरा's picture

19 Feb 2016 - 7:19 am | यशोधरा

गप रे आळशा! :P

मुक्त विहारि's picture

19 Feb 2016 - 7:00 am | मुक्त विहारि

पण बराच किचकट दिसत आहे.

आम्हाला धड एक ऑम्लेट पण करता येत नाही, ह्या घावनाच्या मागे कोण लागणार?

घावनाच्या मागे कशाला लागताय? मुवि काकुंच्या मागे लागा घावनं हवीत म्हणुन ;) आपोआप मिळतील.

हा तुमचा भ्रम आहे.

तिच्या मागे ह्या गोष्टी साठी लागलो तर ती बर्‍याच अटी घालते.

१. घावने मिळतील पण चटणी तुम्हालाच करावी लागेल.

२. घावन खाल्यानंतर तिला माझ्याच हातच्या वड्या हव्या असतात.

३. ज्या दिवशी घावने असतील, त्या दिवशी २-३ तास मिपा-मिपा खेळायचे नाही.

आणि

४. त्या महिन्यात कुठलाही कट्टा करायचा किंवा कट्टा आखायचा बेत करायचा नाही.

ह्या अशा अटी पाळण्यापेक्षा, आम्ही आपले जसे जमेल तसे ऑम्लेट करून घेतो.

प्रचेतस's picture

19 Feb 2016 - 9:52 am | प्रचेतस

दिसले ब्वा फोतू एकदाचे.

पियुशा's picture

19 Feb 2016 - 11:36 am | पियुशा

वा मस्तच दिसत्य प्रकरण !

जेपी's picture

19 Feb 2016 - 12:01 pm | जेपी

करायला पायजे..
एक प्रश्न-तांदळाची पिठी मंजे तांदुळ भिजवुन,वाळवुन ,,पीठ तयार करतात ते का ? का काही वेगळे?

तुषार काळभोर's picture

19 Feb 2016 - 12:05 pm | तुषार काळभोर

इट्स ओन्ली तांदूळ दळून, अ‍ॅण्ड नॉट भिजवून-वाळवून.

जेपी, तुम्ही कोकणी बोलू शकता, पण तांदुळाची पिठी माहीत नाही यह क्या माजरा हय?

पीठी म्हण्जे दळलेले तांदूळ. तुमचे घाटावरचे लोक नै का पानाच्या टपरीला पानाचा ठेला म्हणतात तसं आम्ही कोकणात तांदळाची पीठी म्हणतो. म्हणजे जरा अलंकारिक वाटतं.

मेरे डोस्केमे क्या शिराच नै. कैसे घाव्न, कहा दुमडनेका, किदर कप्पे बनानेका और कैसे तवेपर रखनेका. :(

जरा ऑरिगामी स्टैल मे बताती क्या आपा?

यशोधरा's picture

19 Feb 2016 - 1:14 pm | यशोधरा

तू घर आके खाने का काम कर. उत्ता किया तो बी भोत है.

अभ्या..'s picture

19 Feb 2016 - 1:22 pm | अभ्या..

अहाहाहाहाहा.

घावन आये या ना आये, मैय्या जब देगी घावन है. ;)

नंदन's picture

19 Feb 2016 - 1:44 pm | नंदन

मी फोटो पाहिले नाहीत, मी लेखही वाचला नाही.
मी निषेधसुद्धा साधा, इथे नोंदवलेला नाही!

विशाखा राऊत's picture

19 Feb 2016 - 2:59 pm | विशाखा राऊत

वाह भारी दिसतेय. कधी येवु? :)

पद्मावति's picture

29 Feb 2016 - 1:21 am | पद्मावति

वॉव, फारच मस्तं आहे.

सविता००१'s picture

29 Feb 2016 - 7:30 am | सविता००१

यशो, मी केलं. झकास झालं. पण तू फोटोत दाखवलं आहेस त्यापेक्षा थोडंसं जाड झालं बहुतेक. पण सगळ्यांनी हाणलंय दाबून. म्हणून खूष आहे मी. :)
आता ती रसपोळी की काय ती सांग कशी करायची ते...

अरे वा! मस्त! फोटो टाकायचास ना :)
सात घड्या एकमेकींवर आल्या की जरा जाड होईलच.
तुम्हां सगळ्यांना आवडलं हे वाचून आनंद झाला :)

सविता००१'s picture

29 Feb 2016 - 3:51 pm | सविता००१

केलं पण जमणार आहे की नाही हे माहीत नव्हतं ना...
आणि नंतर हातातोंडाची गाठ पडली.
कसला फोटो न कसलं काय :)

दिपक.कुवेत's picture

10 Mar 2016 - 1:52 pm | दिपक.कुवेत

पाकृ समजून घ्यायलाच ७ दिवसाच्या वर लागत आहेत.....सात घड्या काय कप्पाळ जमणार. आयते करुन घालशील का?? येत्या जून मधे येतोय...बाकि पाकृ अनवट आणि फोटो फर्मास.

यशोधरा's picture

10 Mar 2016 - 4:09 pm | यशोधरा

घालीन की करून, त्यात काय :)

हे करुन पाह्यले ह्या शन्वारी.. फक्त एक चीटिंग केली, ते नारळाचं पाणी वैगरे घाट न घालता घरात असलेलं डोशाचं पीठ घेतलं.

saatakpe1

saatakpe2

दुसरा फोटो मस्त दिसतोय! भारीच की.

अभ्या..'s picture

12 Jul 2016 - 10:36 pm | अभ्या..

बट व्हेअर आर द कप्पेज?
हा कट डोसा दिसतोय

यशोधरा's picture

12 Jul 2016 - 10:42 pm | यशोधरा

टेल, टेल सूडभौ!

ते जे काही थर दिसतायेत दोज आर कप्पेज, आय ह्याव कट इट सो द्याट कप्पेज आर व्हिजिबल. याउपर शंका असतील तर पुण्यात या, करुन खायला घालू. =))

चला, भोचकपणा सार्थकी लागला. एका नाश्त्याची सोय जाहली. ;)