औरंगाबादला पाहण्या, करण्या आणि खाण्यासारख्या गोष्टी

आकाश खोत's picture
आकाश खोत in भटकंती
17 Feb 2016 - 4:12 pm

औरंगाबादला कट्टा करण्याविषयी एक धागा उघडला गेलाय.

मिपावर मी आल्यापासून पहिल्यांदाच औरंगाबादविषयी चर्चा पाहतोय. आनंद झाला.
माझे लक्ष नसताना काही धागे झाले असतील, पण मी पाहिलेला पहिलाच.

ह्या धाग्यावर मी हि खालचीच माहिती पुरवली होती. पण तिची लांबी पाहून ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा असावा असे वाटले. इथे नसलेली औरंगाबाद विषयी उपयुक्त माहिती मिपाकरांनी पुरवावी.

मी औरंगाबादचा आहे पण सध्या तिथे राहत नाही. त्यामुळे यावेळी कट्ट्यात सहभागी नसेन.
पण धागा पाहून उत्साह आला आहे, त्यामुळे औरंगाबादविषयी माहिती पुरवतोय.

औरंगाबाद शहरात आणि जवळपास पाहण्यासारख्या गोष्टी :

पाणचक्की, बिवी का मकबरा, औरंगाबाद लेणी (वेरूळइतक्या प्रसिद्ध किंवा छान नाहीत)
गोगाबाबा टेकडी : हे काही टिपिकल प्रेक्षणीय स्थळांच्या यादीतले ठिकाण नाही. पण शहराचा मकबऱ्यासकट छान व्ह्यू मिळतो. आणि शहराबाहेर छान हवेशीर जागा आहे.

औरंगाबाद हे दरवाजांचे शहर म्हणूनसुद्धा ओळखले जाते. जुने शहर तटबंदी आणि ५२ दरवाजे यांनी बंदिस्त होते. तुम्हाला शहरात फिरताना हे दरवाजे आणि तटबंदीचे काही अवशेष दिसू शकतात.

कलेक्टर ऑफिसजवळ एक संग्रहालय आहे.

अजिंठा वेरूळ सर्वांना माहित आहेच.

वेरूळ येथे लेणी तर आहेतच. पण घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगसुद्धा आहे. गणपतीचे एक जुने मंदिर आहे. वेरूळ येथे शिवाजीराजे यांचे पूर्वज शहाजीराजे आणि मालोजीराजे यांचे वतन होते. त्यांचे स्मारक अशातच बांधण्यात आले आहे.

खुलताबाद येथे निद्रिस्त मारुतीचे मंदिर आहे.
औरंगजेबाची कबर आहे.

म्हैसमाळ हे औरंगाबादचे हिल स्टेशन. तिथे छान बालाजी मंदिर आहे. बालाजीचे इतके शांत मंदिर दुसरे नाही.

म्हैसमाळच्या रस्त्यावर एक लहान फाटा आहे. पटकन लक्षात येत नाही. तिथून गेल्यावर मार्लेश्वर हे गुहेतले शिव मंदिर आहे. खूप मोठे शिवलिंग पाहायला मिळेल.

जटवाडा आणि कचनेर आणि येथे जैन मंदिरे आहेत. जटवाडा येथे भव्य मूर्ती आहेत.

पैठणला जायकवाडी धरण आहे. बागेत संगीत कारंजी आहेत. आणि संत एकनाथ यांची समाधी आहे.

औरंगाबादपासून लोणार सरोवरसुद्धा जवळ आहे.

खरेदी
औरंगाबादमध्ये पैठणी आणि हिमरूशाली छान मिळतात. बऱ्याच दुकानात मिळतात. पण पर्यटक औरंगाबाद वेरूळ रस्त्यावरच्या दुकानात जास्त जातात. सिडकोमध्ये लोकमत भवनच्या बाजूलासुद्धा एक छान दुकान आहे.
पण ह्यावर महिलांनी जास्त माहिती द्यावी.

गुलमंडी, औरंगपुरा, गोमटेश मार्केट, सराफा, सिटी चौक हे सर्व एकमेकांना लागून असलेले भाग खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत.
कपडे, पुस्तके, दागिने, अत्तरे, पूजा साहित्य, इलेक्ट्रोनिक्स अशा सर्व गोष्टींची दुकाने ओळीने आहेत.

खादाडगिरी
गायत्री चाट भांडार : गुलमंडी आणि क्रांती चौक.
कचोरी समोसा आणि मुंगभजी गरम आणि मस्त मिळतात. वर्षानुवर्षे पासून उत्कृष्ट चव.

उत्तम, गुलमंडी : गरम गरम जिलेबी आणि इमरती, आणि बरेच काही.

बाजूला एक छोटे दुकान आहे तिथे मसाला दुध छान मिळते.

ओमकार पावभाजी क्रांती चौक

लक्ष्मी सँडविच क्रांती चौक

पूर्णानंद औरंगपुरा : हे माझ्या शाळेतल्या भागातले मुलांचे आवडते दुकान. इथली वडापाव, मसाला पाव, सामोसा, दाबेली यांची चव इतक्या वर्षात बदललेली नाही. औरंगाबादला गेलो आणि तिथे नाही गेलो तर चुकल्यासारखे वाटते.

पाणीपुरी : पुणे आणि मुंबईला बहुत करून रगडावाली पाणीपुरी देतात. पण औरंगाबादला बटाटावाली जास्त मिळते.
चांगले पाणीपुरी वाले : दयावान गारखेडा, पंकज कुमार एन ४, गुरुकृपा सिडको समोर

मथुरावासी : भल्ला आणि गुजीया हि इथली खासियत. बाकी सर्व प्रकारची चाट मस्त मिळते. पाणीपुरी अगदी वेगळ्या प्रकारची. घट्ट आणि तिखट पाणी असते, आणि त्यात डाळिंब आणि अंगूरसुद्धा टाकतात.

तिथून जवळच पैठण गेटला लक्की आणि पॅरिस हि ज्युसेसची मस्त सेन्टर्स आहेत.

गुरुकृपा सूतगिरणी चौक जवळ : चाट आणि मिठाईचे चांगले दुकान.

गोधुली दाबेली : कनॉट प्लेस. दाबेली सोबत भेलसुद्धा छान आहे.

कनॉटच्याच कोपर्यात एक मस्त भेळवाला आहे.

तारा पान सेंटर : पान खाण्याचे शौकीन असणार्यांना हे नाव माहित असतेच. इथल्या पानाची सर पुणे मुंबईला खाल्लेल्या एका हि पानाला नाही. अगदी पुणेकर जिथे गर्दी करतात त्या शौकीन, नाद वगैरेसारख्या ठिकाणीसुद्धा नाही.
मी औरंगाबादला गेलो कि ऑफिसमध्ये लोक इथला पान आणण्याची वाट पाहतात.

उत्साहाच्या भरात जे आठवेल ते लिहिले आहे. खादाडगिरीवर किती लिहिले आहे त्यावरून आणखी माहिती हवी असल्यास विचारावे.
जाणकारांनी आणखी माहिती पुरवावी.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

23 Feb 2016 - 9:12 am | यशोधरा

आठवले का काही? ;)

प्रचेतस's picture

23 Feb 2016 - 9:31 am | प्रचेतस

:)

काही लोकांना उगाच तेच ते विषय चघळून वर आणायची सवयच असते.

दोन अक्षरी नावाचं शहर आहेच तसं. भुलाये ना बने!

प्रचेतस's picture

23 Feb 2016 - 9:33 am | प्रचेतस

अगदी अगदी.

उगा काहितरीच's picture

23 Feb 2016 - 2:42 pm | उगा काहितरीच

सॉरी भौ , हघ्या हे टाकायचे राहिले होते .! :-(

नदीपलीकडच्या लोकांनी सूड काढला तर काय करायचं?

खटपट्या's picture

24 Feb 2016 - 3:50 am | खटपट्या

औरंगाबाद पदमपुरा अग्निशमन दलात माझा चुलत भाउ आहे. गेल्या १५ वर्षात आम्ही भेटलो नाही. कधी गेलो तर ही माहीती उपयोगी पडेल.

कंजूस's picture

24 Feb 2016 - 7:53 am | कंजूस

आता एक नकाशाही टाका.

बहुगुणी's picture

25 Feb 2016 - 4:19 am | बहुगुणी

[वरील उजव्या कोपर्‍यातील download हा दुवा वापरा म्हणजे नकाशा पूर्ण स्वरुपात उघडेल.]
या दुव्यावर View --> Search असं जाऊन खालील ठिकाणे शोधू शकाल.

attar galli
तारा पान सेंटर
क्रांती चौक
सावरकर चौक
झी कॉर्नर
पूर्णानंद औरंगपुरा
गुलमंडी
उत्तम, गुलमंडी
कॅनॉट प्लेस
गोधुली दाबेली
काळे बंधू हॉटेल
प्रोझोन मॉल

बाकी ठिकाणे मला वेळ मिळेल तशी अ‍ॅड करीन, ज्यांना मदत करायची इच्छा असेल त्यांनी जिओ मिपा! ....अर्थात्, जियो मिपा! या लेखात लिहिलेल्या सूचनांनुसार Addition-->Add Marker (Simple) या मार्गाने मदत करावी.

[या निमित्ताने २५ वर्षांनंतर औरंगाबादला स्वस्थपणे भेट द्यावीशी वाटायला लागलेलं आहे!]

चांगली कल्पना आहे. वेळ मिळेल तसा प्रयत्न करतो यात ठिकाणे टाकण्याचा.

कंजूस's picture

26 Feb 2016 - 12:20 pm | कंजूस

माझ्याकडे एमटीडीसीचे माहातीपत्रक आहे त्यातून ही माहिती प्रसिद्धीसाठी दिली आहे-

एमटीडीसीच्या पुस्तिकेतून

Chand Minar

Chand Minar, which stands in Daulatabad Fort, was built in 1435 by Ala-ud-Din Bahmani to commemorate his capture of the fort. Constructed in the Turkish style, this minaret is an outstanding example of Islamic art.

The 210-ft. (64 metres) high tower has four storeys with balconies at each level, and three circular galleries. It was originally covered with beautiful glazed blue Persian tiles, and its carved motifs can still be seen. Chand Minar also has 24 chambers and a small mosque at its base. Apart from being a victory tower, it also served two major functions. It was used as a watch tower to look out for approaching enemies, as well as a place from which the faithful were called for 'namaaz' (prayer).

Dnyaneshwar Udyan is the largest garden
in Maharashtra, resembling the Vrindavan Gardens of Mysore, and is situated on the banks of Nathsagar Lake, formed by the Jayakwadi Dam. Out of the 125 hectares it spans, orchids cover 26 hectares, 28 hectares are laid out as parks and 15 hectares have been beautified with floriculture.

शहर नकाशा ( दिशादर्शक)
( एमटीडीसीच्या पुस्तिकेतून )

अजिंठा - वेरु ळ - पितळखोरे -पैठण
मनमाड - जळगाव - औरंगाबाद परिसर नकाशा
( एमटीडीसीच्या पुस्तिकेतून )

आकाश खोत's picture

26 Feb 2016 - 1:52 pm | आकाश खोत

सविस्तर माहितीबद्दल आभार

आता जायलाच पाहिजे औरंगाबाद ला..
आणि हे झाले १००..:)

हेमंत लाटकर's picture

23 May 2016 - 12:15 am | हेमंत लाटकर

हाॅटेल चंपावती, काळे बंधू हाॅटेलच्या पुढे. आमच्या फॅमिलीतील १० जणांना ₹ १५०० लागले. छान चव होती.

नुस्त्या उचापती's picture

23 May 2016 - 7:55 pm | नुस्त्या उचापती

औरंगाबाद,परवा भेटीला येतोय.या धाग्याचा नक्की उपयोग होईल.धागाकर्त्याला धन्यवाद!

वैभव पवार's picture

23 May 2016 - 8:05 pm | वैभव पवार

प्रोझोन

वैभव पवार's picture

23 May 2016 - 8:06 pm | वैभव पवार

:D

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 May 2016 - 8:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

-दिलीप बिरुटे

उल्का's picture

7 Jun 2016 - 9:43 pm | उल्का

छान धागा आहे हा.
मस्त माहिती दिली आहे सर्वानी.

गणामास्तर's picture

31 Jan 2017 - 12:19 pm | गणामास्तर

विकांताला औरंगाबाद वारी झाली. निराला बाजार मधल्या 'करीम' आणि शाहगंज मधल्या 'सागर' मध्ये खादाडी केली.
करीम मध्ये रेशमी कबाब, मुर्ग अकबरी,रोगनी नान आणि मलाई फिरनी चापले. कबाब अत्युत्कृष्ट म्हणावे असे होते, तोंडात अक्षरशः विरघळणारे.
मुर्ग अकबरी लेग पीस विथ ग्रेव्ही अशी डिश होती. एकदम निगुतीने शिजवलेले लेग पीस आणि अफलातून मुघलाई ग्रेव्ही. रोगनी नान ठीकठाक पण वेगळा प्रकार म्हणून बरा वाटला, नुसते खाल्ले तरी चांगले लागतील असे. किंचित तिखट आणि गोडसर अशी मिक्स चव होती नान ला.
'सागर' मध्ये बिर्याणी, खिमा आणि शाही रोटी मागवले. खिमा अगदी उच्च होता आणि शाही रोटी केवळ अप्रतिम.
शाही रोटी नक्की कशाची बनवलेली कळाले नाही परंतु जरा ब्रेड च्या जवळपास जाणारा आणि जबरदस्त चवदार प्रकार होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2017 - 5:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

औरंगाबादला येऊन गेलात आणि साधी भेट नाही. स्पष्ट शब्दात निषेध नोंदवतो.

-दिलीप बिरुटे

गणामास्तर's picture

31 Jan 2017 - 5:57 pm | गणामास्तर

सर तुम्हाला भेटायचं अगदी मनात होतं. परंतु अगोदर ठरवून जर का भेटता आले नसते तर टोचणी लागून राहिली असती म्हणून ऐन वेळी फोन करावा असे ठरवले होते. एका कार्यक्रमासाठी आल्यामुळे एकदम धावता दौरा होता, खादाडी करायला सुद्धा नातेवाईकांची नजर चुकवून पळून गेलो होतो.
पुढच्या महिन्यात चक्कर आहेचं तेव्हा भेटुयाचं नक्की. काळे बंधूंची शेवगा हंडी आहे शिल्लक लिस्टवर :)

प्रचेतस's picture

31 Jan 2017 - 5:15 pm | प्रचेतस

औरंगाबादेस जाऊन फक्त (आणि फक्त) खादाडीच केल्याबद्दल निषेध.

गणामास्तर's picture

31 Jan 2017 - 6:02 pm | गणामास्तर

अजून काय करायला हवं होतं सांगा ना हो. .

प्रचेतस's picture

31 Jan 2017 - 6:05 pm | प्रचेतस

बरंच काही हो :)

प्रचेतस's picture

31 Jan 2017 - 5:15 pm | प्रचेतस

औरंगाबादेस जाऊन फक्त (आणि फक्त) खादाडीच केल्याबद्दल निषेध.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2017 - 5:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वांनाच वेरुळ अजिंठा आवडलंच पाहिजे का ?

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

31 Jan 2017 - 5:47 pm | प्रचेतस

तुम्हाला नाही आवडत का?