कल्पक टेलर हवा आहे

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
15 Feb 2016 - 12:09 pm
गाभा: 

काही दिवसांपूर्वी वीणा वर्ल्ड बरोबर ईशान्य भारताची एक्स्प्लोरर सहल केली. तिथे एक परदेशी पर्यटकाच्या पँटने लक्ष वेधुन घेतले. कार्गो पँट होती. लई खिशे होते. कंबरेला विलॅश्टिक व शिवाय एक सॉफ्ट बेल्ट होता. मला अगदी हवी तशी पँट होती. आपल्या मनाप्रमाणे रिलॅक्स अनुभव देणारे फिटिंग करणारा टेलर मिळणे किंवा तसे रेडीमेड कपडे मिळ्णे हे आमचे जुने स्वप्न आहे.या पूर्वी आम्ही यावर लिहिल होत पण ते तत्कालीन संदर्भाने होते त्याची वाच्यता आत्ता नको.
घरी आल्यावर फ्लिपकार्ट अ‍ॅमेझॉन इंडिया यावर तसे काही कपडे मिळतात का हे पाहिले पण तसे काही आढळल नाही. माझी गरज म्हणजे Hidden Expandable Waistband for Comfort
The Modern Comfort waistband is designed to expand by up to 2 inches at the waist, so you can sit comfortably as you go about your day
गुगलल्यावर मला अशा कपड्यांचा व्हिडिओ मिळाला तसे अ‍ॅमेझॉनवर डॉलर मधे किमती असलेले पँटी मिळाल्या. पण आपल्या भारतीय मार्केट मधे अस मिळाल पाहिजे का नाही? ऑन लाईन शॉपिंग मधे एक तोटा असतो स्पर्श गंध चव वगैरे गोष्टींचा फील येत नाही.
कपडे विशेषतः प्यांट म्हणजे कशी रिलॅक्स पाहिजे. आपल्यासाठी कपडे आहेत की कपड्यासाठी आपण? जेवण झाल्यावर टाईट वाटता कामा नये व भूक लागली तरी लूज होता कामा नये. तसे ऋतूमानाप्रमाणे आपल्या आहारात बदल होतात त्यामुळे पोट कमी जास्त होत असते. त्यामुळे दोन इंचा पर्यंत फ्लेक्सिबिलिटी हवीच. एवढ फॅशन डिझाईनिंग तंत्रज्ञानामुळे पुढे गेले आहे तर मला हवे तशी पँट का मिळू नये? किमान तसे शिवून देणार टेलर तरी पुण्यात मिळायला पाहिजे कि नको? चला या क्षेत्रातील तज्ञांनी आपापले विचार मांडा.

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

15 Feb 2016 - 12:15 pm | कविता१९७८

जेवण झाल्यावर टाईट वाटता कामा नये व भूक लागली तरी लूज होता कामा नये. तसे ऋतूमानाप्रमाणे आपल्या आहारात बदल होतात त्यामुळे पोट कमी जास्त होत असते. त्यामुळे दोन इंचा पर्यंत फ्लेक्सिबिलिटी हवीच. 

यासाठी कापड स्र्टेचेबल आणि चान्गल्या प्रतीचे असावे लागते. तसेच टेलरकडुन शिवुन घेतले की तो दान्ही बाजुने दिड-दिड म्हणजे एकुण ३" मार्जिन ठेवतोच म्हणजे कुठलाही ड्रेस घट्ट झाला की एक्सट्रा शिलाई उसवुन कपडे घालता येतात.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Feb 2016 - 12:18 pm | प्रकाश घाटपांडे

उसवून लूज केले की रंगाच्या शेड मधे फरक पडतो शिवाय तो लूज/ टाईट चा उद्योग होतोच ना!

डेकॅथलॉन वाघोली इथे जाऊन क्वेचुआच्या पॅण्ट्स पहा. ऑनलाईन कशा दिसतात ते प्लेमोर.इन किंवा डेकॅथलॉन.इन या संस्थळांवर जाऊन पाहता येतील.

विवेक ठाकूर's picture

15 Feb 2016 - 12:47 pm | विवेक ठाकूर

नॉस्ट्रम जिन्स विथ वेस्ट स्ट्रॅप, हा जगातला सर्वोत्तम पर्याय आहे !

उगा काहितरीच's picture

15 Feb 2016 - 12:52 pm | उगा काहितरीच

खरं आहे राव फॕशन म्हणजे कंफर्ट पाहिजे .

तिमा's picture

15 Feb 2016 - 2:15 pm | तिमा

माझे वडील साईडला बक्कल असलेली पँट शिवून घेत. ती स्टाईल ब्रिटिश काळापासून चालू होती. त्या बकलाचे छोटे पट्टे खेचून पँट हवी तशी सैल वा घट्ट करता येते. शिंपल आयडिया.

सुनील's picture

15 Feb 2016 - 2:23 pm | सुनील

पण मी म्हणतो त्यापेक्षा धोतरच का नेसत नाही?

कासोटा हवा तेवढा घट्ट/सैल करत येतो.

आणि हो, तेवढेच भार्तिय सौंस्क्रुती जपल्याचे समाधानही!!

टवाळ कार्टा's picture

15 Feb 2016 - 2:27 pm | टवाळ कार्टा

त्यापेक्षा लुंगी आणखी चांगली...एकदम हवेशीरपण =))

विवेक ठाकूर's picture

15 Feb 2016 - 2:39 pm | विवेक ठाकूर

लंगोटावर आणलं नाही म्हणजे मिळवली .

लायक्रा वापरा. ते लेगीन्स सारखे दिसेल पण वर शेरवानी नसता तीन बटनाचा नेहरु शर्ट घालत जावा. भारी दिसेल. कलरला पण व्हरायटी. फक्त कंबरेलाच टाचण्याचा इश्श्यु असेल तर कॉटन डंगरी किंवा रॉम्परसूट शिऊन घ्या. रॉम्पर भारी दिसतो डेनिस द मिनेस सारखा. कंबरेचा प्रश्नच नाही. कफनी ऑर अरब झगा हाही ऑप्शन इचारात घेण्याजोगा आहे.

नाखु's picture

15 Feb 2016 - 2:49 pm | नाखु

सर ज्यात "नाडी" ठेवावी/बघावी लागत नाही असे काहीही वापरा...(अस्सल मिपाकर सल्ला)

अता वर तिमा भौंनी सांगीतले तशी पँट, मला वाटते स्काऊट/ एन सी सी वाल्यांची असावी "कळकट (किंचीत्च)मळकट पण वापरायला दणकट" नाखु सल्ला

आदूबाळ's picture

15 Feb 2016 - 3:04 pm | आदूबाळ

Hidden Expandable Waistband

पुणे सेंट्रलमध्ये असा इलेस्टिक वेस्टबँड असलेल्या फॉर्मल प्यांट मिळतात की हो. कार्गोचं माहीत नाही.

कार्गो पण मिळते. हाफ इलॅस्टिक वाली. दणकट आहे शालगर सारखी. वर एखादा मुलायम टी अडकवला की झाले.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Feb 2016 - 3:11 pm | प्रकाश घाटपांडे

पुणे सेंट्रल म्हंजी नेमक कुठं?

आदूबाळ's picture

15 Feb 2016 - 3:21 pm | आदूबाळ

१. गणेशखिंड रस्त्यावर ईस्क्वेअरच्या तिरपं-समोर. (बीकेएस अय्यंगार यांचं योग विद्यालय आहे त्या गल्लीच्या तोंडाशी)
२. गरवारे कॉमर्स कॉलेजच्या समोर पुलालगत

प्रकाश घाटपांडे's picture

15 Feb 2016 - 3:35 pm | प्रकाश घाटपांडे

ओके.ट्राय करतो. पन हवा तस शिवुन देणारा टेलर मिळाला तरी चालेल. या पूर्वी आम्ही प्रयत्न केले होते.
संदर्भ- आमच बी क्वाश्चूम डिजाईन

प्रकाश घाटपांडे's picture

15 Feb 2016 - 3:54 pm | प्रकाश घाटपांडे