हौशी चित्रकला - काही रंगचित्रे

विसुनाना's picture
विसुनाना in कलादालन
14 Sep 2008 - 10:30 pm

नमस्कार,

माझी पत्नी सुवर्णा एक हौशी चित्रकार आहे.
बर्‍याच वर्षांपूर्वी तिनं चित्रकलेचा एक लहानसा कोर्स केला होता. तेव्हापासून ती अधूनमधून चित्रे काढत असते.
आमचं घर म्हणजे तिच्या चित्रांचं एक छोटं प्रदर्शनच आहे. ;)
ती अधूनमधून मिपावरची चित्रे पहात असते. (शार्दूल कदमांची चित्रं पाहून ती थक्क झाली.)
संगणक/ आंतरजाल/ मराठी कळदाबी यापासून ती दूर असल्याने तिच्यावतीने मी तिची चित्रे चिकटवत आहे.

तिनं काही प्रख्यात चित्रकारांची चित्रं नकलली आहेत तर काही चित्रं लोककला स्वरूपाची आहेत. बघा, तुम्हाला कशी वाटतात -


(मूळ चित्रकार - राजा रविवर्मा . अ वूमन होल्डिंग अ फ्रूट .ऑईल ऑन कॅन्वास.पोर्ट्रेट १.५ फूट * २फूट)

From Suwarna's Paintings

(मूळ चित्रकार - जॉन पाईक . ऑपेरा हाऊस. वॉटरकलर,इंप्रेशनिस्ट १.५ फूट * २ फूट )
From Suwarna's Paintings

(मूळ चित्रकार - रॉजर डिसोटर . इन द स्ट्रेट ऑफ मॅगेलन .ऑईल ऑन कॅन्वास.२ फूट * ३ फूट)
From Suwarna's Paitings

राधाकृष्ण जलविहार - ओरिसा पटचित्र.. पोस्टरकलर २ फूट * १ फूट
From Suwarna's Paintings

राधाकृष्ण बासरीवादन - भारतीय मिनिएचर .. पोस्टरकलर १फूट * १.५ फूट
From Suwarna's Paintings

चित्रांवर टिचकी मारल्यास मोठी चित्रे पाहता येतील.

कलास्थिरचित्र

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

14 Sep 2008 - 10:39 pm | प्रमोद देव

विसुनाना चित्र मस्त आहेत. वैनींना आमच्यातर्फे अभिनंदन कळवा.

आजानुकर्ण's picture

14 Sep 2008 - 10:52 pm | आजानुकर्ण

नाना,

चित्रे आवडली. सुरेख आहेत.

आपला,
(प्रेक्षक) आजानुकर्ण

स्वाती राजेश's picture

14 Sep 2008 - 10:45 pm | स्वाती राजेश

चित्रे छान काढली आहेत....
तुमच्या घरातील चित्रांचे प्रदर्शन लवकरच मि.पा.वर पाहायला मिळू दे!

यशोधरा's picture

14 Sep 2008 - 11:07 pm | यशोधरा

शेवटचे बासरीवादनाचे चित्र सगळ्यात आवडले.

मनीषा's picture

14 Sep 2008 - 11:24 pm | मनीषा

इन द स्ट्रेट ऑफ मॅगेलन , आणि राधाकृष्ण बासरीवादन - भारतीय मिनिएचर खूपच आवडली
तशी सर्वच चित्रे ' सुरेख ' आहेत .

भडकमकर मास्तर's picture

14 Sep 2008 - 11:29 pm | भडकमकर मास्तर

हेच म्हणतो...
इन द स्ट्रेट ऑफ मॅगेलन , आणि राधाकृष्ण बासरीवादन
खूप आवडले...
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सैरंध्री's picture

15 Sep 2008 - 1:18 am | सैरंध्री

फारच सुरेख चित्रे. आपल्या सौ ना पुढील चित्रकारीसाठी शुभेच्छा !!
राधाकृष्ण जलविहार , राधाकृष्ण बासरीवादन ही चित्रे फारच आवडली.

सैरंध्री

Painting is poetry that is seen rather than felt,
and poetry is painting that is felt rather than seen. -- Leonardo da Vinci

प्रियाली's picture

15 Sep 2008 - 1:24 am | प्रियाली

चित्र काढणे रंगवणे अतिशय कष्टाचे काम असावे, त्यासाठी लागणारा वेळ, कष्ट आणि पेशन्स याचे कौतुक वाटते.

बाकी, आमच्यासारख्यांनी पुढे काही न बोललेले बरे ;)

प्रियाली बिन अल सुलतान अल आज़म वल खाकन अल मुकर्रम अबुल मुज्झफ्फर मुहिउद्दिन मुहम्मद औरंगझेब.

प्राजु's picture

15 Sep 2008 - 1:46 am | प्राजु

चित्र प्रदर्शनातली बाकीची चित्रेही पाहण्यासाठी उत्सुक आहोत. वहीनींना अभिनंदन कळवा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मृदुला's picture

15 Sep 2008 - 2:41 am | मृदुला

उत्तम चित्रे. केवळ एक 'लहानसा कोर्स' करून एव्हढे उत्तम जमते आहे म्हणजे सुवर्णाताई हाडाच्या कलाकार दिसतात.
खरेखुरे मोठे प्रदर्शन भरवण्यासाठी शुभेच्छा.

धनंजय's picture

15 Sep 2008 - 2:46 am | धनंजय

त्यांच्यातही राधाकृष्ण जलविहार खास आवडले.

चतुरंग's picture

15 Sep 2008 - 3:50 am | चतुरंग

पट्टीचित्र आणि मिनिएचर मधले बारकावे अगदी नाजूक आणि चिकाटीचे काम!
राधाकृष्णाचे सर्वात आवडले.
तुमच्या सौ. 'पट्टी'च्या चित्रकार आहेत! :)

(खुद के साथ बातां : रंग्या, आठवतं का रे तू शेवटचा कधी ब्रश हातात धरलेलास? तेव्हा मास्तर म्हणाले होते "चित्रे न रंगवून तू कलेची सेवा फार छान करशील!" ;) )

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 3:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चित्रं तर मस्तच!

आणि आमच्याकडून झालेली कलेची सेवा चतुरंग म्हणतात तशीच!

मदनबाण's picture

15 Sep 2008 - 4:01 am | मदनबाण

फारच सुरेख चित्रे...

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

सहज's picture

15 Sep 2008 - 5:43 am | सहज

ही जर अशीच "हौस" म्हणुन असेल तर सिरीयसली घेतले तर किती अत्युत्कृष्ट येतील. :-)

चित्रे खूप आवडली. अजुन पहायला आवडतील.

मुक्तसुनीत's picture

15 Sep 2008 - 7:17 am | मुक्तसुनीत

चित्रे आवडली.
ती जलरंगात काढली आहेत असे वाटले. निरनिराळ्या शैली आणि काळातल्या चित्रांच्या प्रतिकृती केल्या आहेत ; यावरून एकंदर चित्रकलेच्या वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास केला आहेसे दिसते. भारतीय चित्रांच्या प्रतिकृती जास्त चांगल्या जमल्या असे मला वाटले. विशेषतः शेवटाची २ चित्रे विशेष परिणाम करणारी वाटली.

भावी प्रवासाबद्दल शुभेच्छा !

- (चित्रकलेमधे ३५ पेक्षा कधीही जास्त मार्क न मिळालेला.)

शितल's picture

15 Sep 2008 - 7:21 am | शितल

सुंदर चित्रे.
:)
अजुन रंगचित्रे पहायला आवडतील :)

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2008 - 7:34 am | प्रभाकर पेठकर

सर्वच चित्रे छान आहेत. 'अ वूमन होल्डींग अ फ्रुट' विशेष आवडले. तसेच 'इन द स्ट्रेट ऑफ मॅगेलन' सुद्धा खूप सुंदर आहे.

अनिल हटेला's picture

15 Sep 2008 - 7:37 am | अनिल हटेला

सुंदर चित्रे ~~~~~~~

अजुनही चित्रे पहायला आवडातील .....

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

बेसनलाडू's picture

15 Sep 2008 - 10:27 am | बेसनलाडू

(आस्वादक)बेसनलाडू

राघव's picture

15 Sep 2008 - 10:56 am | राघव

फार सुंदर आहेत सगळी चित्रे नाना! वैनींना मनापासून शुभेच्छा. इन द स्ट्रेट ऑफ मॅगेलन विशेष आवडले. :)

तसे कधी-कधी आम्ही सुद्धा हात फिरवत असतो कागदावरून, पण कागदच कंटाळत असावा! तसेही आमची मजल फक्त रेखाचित्रांपर्यंत. ते रंगवायला घेतले की सारे चित्रच बिघडून जाते!! :D

मुमुक्षू

मनस्वी's picture

15 Sep 2008 - 11:42 am | मनस्वी

सगळीच चित्रे सुरेख. अजूनही पहायला आवडतील.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

प्रगती's picture

15 Sep 2008 - 2:48 pm | प्रगती

सर्व चित्रे अप्रतिम आहेत.
राजा रविवर्मा चे चित्र जास्त आवडले. नक्कल करण्यासाठी सुद्धा स्वत:ची कला असावी लागते. अजुन चित्रे पहायला आवडतील.

जैनाचं कार्ट's picture

15 Sep 2008 - 3:14 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>नक्कल करण्यासाठी सुद्धा स्वत:ची कला असावी लागते. अजुन चित्रे पहायला आवडतील.

हे वाक्य चुकीचे आहे ह्या जागी !

त्यांनी त्याची नक्कल (कॉपी) नाही केलेली आहे ती चित्र पाहून स्वतः चित्रे काढलेली आहेत.
तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा होतो की... ती चित्रे सॅन करुन छापलेली आहेत !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

स्वाती दिनेश's picture

15 Sep 2008 - 2:49 pm | स्वाती दिनेश

सर्वच चित्रं फार सुरेख.. अजून पहायला नक्कीच आवडतील.
स्वाती

डोमकावळा's picture

15 Sep 2008 - 3:01 pm | डोमकावळा

उत्कृष्ट चित्रे.
एकन् एक चित्र नजरेत भरतं...

येऊ द्यात अजून चित्रे.

- (इलेमेंटरी पास पण इंटरेमेजिएट नापास) डोम.

ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

नंदन's picture

15 Sep 2008 - 4:29 pm | नंदन

असेच म्हणतो, सुरेख चित्रे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रकाश घाटपांडे's picture

15 Sep 2008 - 3:12 pm | प्रकाश घाटपांडे

ईसुनानींना म्हनाव लई भारी चित्र काल्ढीत. राम राम सांगा त्येन्ला. भले आमाला चित्रातल न का कळेना दिसायला ग्वॉड लागत्यात. पघायला बर वाटतयं.
प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

15 Sep 2008 - 3:41 pm | विसोबा खेचर

नानासाहेब,

सर्व चित्र केवळ सुरेख...

वहिनींना आमचा सलाम सांगा...

तात्या.

दत्ता काळे's picture

15 Sep 2008 - 6:31 pm | दत्ता काळे

सर्व चित्रं फारच सुंदर आहेत.

ऋषिकेश's picture

15 Sep 2008 - 11:45 pm | ऋषिकेश

वा! मस्त चित्रे.. खूप आवडली!

-(केवळ दाढीचा व दात घासायचा ब्रश सोडल्यास ब्रशसंबंधी 'ब्र'ही न काढणारा ) ऋषिकेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Sep 2008 - 11:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राधाकृष्ण बासरीवादन आणि राधाकृष्ण जलविहाराच्या चित्रे विशेष आवडली.

चित्रा's picture

16 Sep 2008 - 1:38 am | चित्रा

सर्व चित्रे छान, पण वरील दोन अधिक आवडली.

सर्किट's picture

16 Sep 2008 - 12:10 am | सर्किट (not verified)

छान चित्रे !

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विसुनाना's picture

16 Sep 2008 - 10:39 am | विसुनाना

मित्रहो,
आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे आम्हा उभयताना आनंद झाला.
सुवर्णाचा चित्रे काढण्याचा उत्साह त्यामुळे वाढला आहे.

आपल्या प्रेक्षण आणि प्रतिक्रियांबद्दल आपले शतशः आभार.
तसेच मिपा मुखपृष्ठावर चित्राला स्थान देऊन संपादकांनी जो सन्मान केला त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभारी आहोत.

झकासराव's picture

16 Sep 2008 - 10:48 am | झकासराव

छानच आहेत सगळीच चित्रे. :)

-(केवळ दाढीचा व दात घासायचा ब्रश सोडल्यास ब्रशसंबंधी 'ब्र'ही न काढणारा ) ऋषिकेश>>>>>>>>
तु तर माझा भाउच आहेस रे :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

ध्रुव's picture

16 Sep 2008 - 3:09 pm | ध्रुव

केवळ अप्रतिम चित्रे!!

--
ध्रुव