19 च्या भारतीय संघाला शुभेच्छा...

पी महेश००७'s picture
पी महेश००७ in क्रिडा जगत
12 Feb 2016 - 12:46 am

रविवारी १४ जानेवारी रोजी १९ वर्षांखालील वल्र्डर्कप जि्कण्याची भारताला संधी आहे. वेस्ट इंडीजचं भारतासमोर कडवं (?) आव्हान असेल. वेस्ट इंडीज तीनदा फायनलमध्ये येऊनही त्यांना वल्र्डर्कप जिंकता आलेला नाही. भारत जर जि्कला तर ते चौथे जेतेपद असेल. कोण जि्केल कोण हरेल याची तुलना अजिबात करायची नाही. कारण एकोणीसचे हे खेळाडू सीनिअर टीमसारखे कायमस्वरूपी नसतात. दरवर्षी टीम बदलते. आता खेळणारे बरेचसे नवीनच आहेत. कदाचित पुढच्या वल्र्डर्कपला हेच खेळाडू एजबार होतील (म्हणजे १९ मध्ये खेळणार नाहीत). तरीही उगाच तुलना होते. वेस्ट इंडीज आणि भारतादरम्यान वल्र्डकपमध्ये ९ सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने सात जि्कले. म्हणून वेस्ट इंडीजला जि्कणे सोपे नाही असा निष्कर्ष अजिबात काढता येणार नाही. स्पर्धेतली कामगिरी महत्त्वाची आहे. म्हणूनच १९ वर्षांखालील वल्र्डर्कप कोण जि्केल याची उत्सुकता बिग ब्रदर संघापेक्षा जास्त आहे. बघूया.. रविवारी काय होतंय ते. तूर्तास भारतीय संघाला शुभेच्छा...

क्रिकेट

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2016 - 3:07 pm | श्रीगुरुजी

सहमत!

भारतीय संघाला शुभेच्छा!

वेस्ट ईंडीजच्या संघाने या स्पर्धेत अखिलाडू वृत्ती दाखवून एक विजय मिळविला. त्यामुळेच विंडीज हरावे अशी मनोमन इच्छा आहे.

वेस्ट ईंडीजच्या संघाने या स्पर्धेत अखिलाडू वृत्ती दाखवून एक विजय मिळविला.

हे माहित नव्हत... कृपया खुलासा करून सांगाल का...?

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2016 - 11:31 pm | श्रीगुरुजी

वेस्ट इंडीज वि. झिम्बाब्वे या सामन्यातील विजेता उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणार होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघाला झिंबाब्वे संघाने फक्त २२६ धावात रोखले. प्रत्त्युतरादाखल चांगली सुरूवात केली. १० षटकानंतर २ बाद ५०, २० षटकानंतर ३ बाद ९८, ३० षटकानंतर ३ बाद १३२, ४० षटकानंतर ६ बाद १८७ असे ते विजयाच्या मार्गावर होते. ४५ षटकानंतर ७ बाद २११. आता विजयासाठी ३० चेंडूत फक्त १६ धावा हव्या होत्या. वेस्ट इंडिजही एका बाजूने बळी घेत होते. सामना खूपच रंगतदार झाला होता. ४९ वे षटक संपले तेव्हा झिम्बाब्वे ९ बाद २२४ व विजयासाठी फक्त ३ धावा हव्या होत्या. दोन्ही संघांना विजय मिळविण्याची समान संधी होती.

५० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विंडीजच्या कीमो पॉलने चेंडू टाकण्याऐवजी नॉनस्ट्रायकरचा रिचर्ड नगारवा क्रीजच्या किंचित बाहेर असल्याचे पाहून चेंडू न टाकता बेल्स उडविल्या व धावबादचे अपील केले. त्यावेळी नगारवा क्रिजच्या दोन पावले पुढे होता व त्याची बॅट क्रीजच्या रेषेच्या आत नसून रेषेवर टेकविलेली होती. "हे अपील मागे घ्यायचे आहे का" अपील केल्यावर दोन्ही पंचांनी विंडीजच्या कर्णधाराला विचारले. परंतु त्याने अपील कायम ठेवल्याने तिसर्‍या पंचाची मदत घेऊन नगारवाला धावबाद दिल्याने विंडीजचा फक्त २ धावांनी विजय झाला.

अशा प्रकारे बाद करण्याला मंकड पद्धतीने बाद करणे म्हणतात. बहुतेक सर्वात पहिल्यांदा विनू मंकडने अशा पद्धतीने एका फलंदाजाला बाद केले होते.

अशा तर्‍हेने बाद करणे ही अखिलाडू वृत्ती आहे. सामान्यतः जर नॉनस्ट्रायकरचा फलंदाज चेंडू पडण्याआधीच पुढे जात असेल तर त्याला गोलंदाजाने एकदा वॉर्निंग देण्याचा संकेत आहे. नंतर परत दुसर्‍यांदा असे झाले तर तो स्टंप उडवून बाद झाल्याचे अपील करू शकतो. परंतु क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाच्या कप्तानाला हे अपील मागे घेण्याचा देखील हक्क आहे.

या सामन्यात फलंदाजाला कोणतीही वॉर्निंग न देता स्टंप उडवून अपील करण्यात आले व विंडीजच्या कप्तानाने ते मागे ने घेण्याचा अखिलाडू निर्णय घेतल्याने पंचांना नियमानुसार फलंदाजाला बाद द्यावे लागले.

१९८७ च्या विश्वचषकातील असाच प्रसंग आठवतो. विंडीज वि. पाकिस्तान सामन्यात विंडीज जिंकले असते तर त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला असता. पाकडे धावांचा पाठलाग करीत असताना त्यांचे ९ फलंदाज बाद झाले होते. कोर्टनी वॉल्श गोलंदाजी करताना नॉनस्ट्रायकरचा फलंदाज सलीम जाफर चेंडू पडण्याच्या आधीच क्रीज सोडून पुढे गेल्याचे वॉल्शने पाहिले. त्याने चेंडू न टाकता थांबून सलीम जाफरला बाद न करता त्याला वॉर्निंग दिली. तो सामना विंडीज हरले व उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला नाही. परंतु खिलाडू वृत्तीचा विजय झाला.

त्याच विंडीजच्या युवा खेळाडूंनी अशी अखिलाडू वृत्ती दाखविल्याचे वाईट वाटते.

खालील वृत्त व धावफलक व काँमेंटरी पहा.

http://www.espncricinfo.com/icc-under-19-world-cup-2016/content/story/96...

http://www.espncricinfo.com/icc-under-19-world-cup-2016/engine/match/949...

49.1 West Indies have lodged an appeal. Matigimu could be Mankaded here in the first ball off the final over. The bat is just on the line as the bowler breaks the stumps at the bowler's end.

Here's what really happened: Kemo Paul, the bowler, did not enter his delivery stride, but was aware of the Mankad rule and broke the stumps down. The non-striker wasn't trying to gain an advantage by taking a head start. The bat was on the line as the bails came off. Both umpires converged, decided to refer it upstairs after they asked Hetmyer, the West Indies captain, if he wanted to uphold the appeal. According to the rules, he was out. What a dramatic end to the contest. How many of us saw this coming?

धावफलक

http://www.espncricinfo.com/icc-under-19-world-cup-2016/engine/match/949...

पी महेश००७'s picture

13 Feb 2016 - 8:10 pm | पी महेश००७

कोणीही जिंकावे...
जर या सामन्यात भारताने रडीने डाव जिंकला तर तो विजय तुम्ही मान्य कराल काय
प्रश्न आहे.. तसं घडेलच असं नाही.
भारतानेच जिंकावं ही आमचीही इच्छा आहे. ते का याचं कारण विचाराल तर विनाकारण...

श्रीगुरुजी's picture

13 Feb 2016 - 8:35 pm | श्रीगुरुजी

भारताने रडीने सामना जिंकलेला आवडणार नाही.

यापूर्वी भारताने खिलाडू वृत्ती अनेकवेळा दाखवून दिली आहे. १९८२ च्या बीसीसीआयच्या सुवर्णमहोत्सवी कसोटी सामन्यात इंग्लंडचा डाव गडगडलेला असताना व पंचांनी बॉब टेलरला बाद दिले असताना कर्णधार विश्वनाथने यष्टीरक्षकाशी सल्लामसलत करून अपील मागे घेऊन टेलरला परत बोलाविले होते. त्यानंतर टेलरने अर्धशतक झळकावून शतकवीर बॉथमला साथ देऊन पहिल्या डावात आधिक्य मिळविले व भारताने सामना गमाविला होता.

२०११ च्या इंग्लंड दौर्‍यात उपाहारापूर्वीचे शेवटचे षटक संपल्यावर खेळ थांबविण्याची पंचांनी सूचना करण्याआधीच इयान बेल क्रीज सोडून पॅव्हेलियनकडे परतू लागला. त्यावेळी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात होता व षटक संपल्याची खूण पंचांनी केली नव्हती. त्यामुळे क्षेत्ररक्षकाने त्याला धावबाद केल्यावर पंचांनी त्याला नियमानुसार बाद दिले. त्यानंतर मोठा गदारोळ झाला. उपाहारानंतर दुसर्‍या फलंदाजाबरोबर इयान बेल मैदानात येताना दिसल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. उपाहाराच्या काळात धोनीने पंचांना भेटून अपील मागे घेतले व त्यामुळे तो नाबाद ठरला. तोही सामना भारत हरला होता.

एक एकटा एकटाच's picture

12 Feb 2016 - 10:11 pm | एक एकटा एकटाच

भारतीय संघाला
मनापासून शुभेच्छा