गाभा:
हेल्मेट वापरणं योग्य आहे, पण त्यासाठी सक्ती नको,
हेल्मेट सक्तीवरून वाद सुरू असतानाच आता दुचाकीच्या मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांनी हेल्मेट घातले नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आहेत.
हेल्मेट सक्तीमागे नागरिकांची काळजी आहे का हेल्मेट उत्पादकांची ?
प्रतिक्रिया
11 Feb 2016 - 9:56 am | प्रचेतस
उगाच?
22 Jul 2016 - 12:33 pm | पगला गजोधर
उगाच?
22 Jul 2016 - 12:40 pm | टवाळ कार्टा
झैरात =))
22 Jul 2016 - 12:47 pm | पगला गजोधर
;)
11 Feb 2016 - 9:59 am | चेक आणि मेट
क्यो पगल्याट भैया,कैसन बा?
11 Feb 2016 - 10:00 am | चेक आणि मेट
लगता है सचमुच पगल्याट है|
11 Feb 2016 - 10:38 am | सुबोध खरे
मोटार वाहन कायदा १९८८ साली अस्तित्वात आला.
Central Government Act
Section 129 in The Motor Vehicles Act, 1988
129. Wearing of protective headgear.—Every person driving or riding (otherwise than in a side car, on a motor cycle of any class or description) shall, while in a public place, wear 1[protective headgear conforming to the standards of Bureau of Indian Standards]: Provided that the provision of this sections shall not apply to a person who is a Sikh, if he is, while driving or riding on the motor cycle, in a public place, wearing a turban: Provided further that the State Government may, by such rules, provide for such exceptions as it may think fit. Explanation.—”Protective headgear” means a helmet which,—
(a) by virtue of its shape, material and construction, could reasonably be expected to afford to the person driving or riding on a motor cycle a degree of protection from injury in the event of an accident; and
(b) is securely fastened to the head of the wearer by means of straps or other fastenings provided on the headgear.
सरकारे त्याच्या अंमल बजावणी कडे लोकांच्या विरोधामुळे काणा डोळा करीत होती परंतु वेळोवेळी अपघात ग्रस्त माणसांच्या नातेवाईकांनी हि अंमल बजावणी करणे सरकारला भाग पाडा म्हणून न्यायालयांमध्ये केलेल्या अर्जामुळे सरकारला हि अंमल बजावणी करणे भाग पडत आहे.
कृपया भक्त किंवा द्वेष्टे यांनी याला पक्षीय रंग देऊ नये. (कर्नाटकात कॉंग्रेस सरकार असूनही या कायद्याची कडक अंमल बजावणी सुरु झालेली आहे)
यात गेली २८ वर्षे हेल्मेट उत्पादकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात येतो असा आरोप कोणताही सबळ पुरावा न देता केला गेलेला आहे. जो माणूस ३५ हजाराची मोपेड पासून २-५ लाखापर्यंतच्या मोटर सायकली विकत घेतो त्याने ५००-१००० रुपये स्वतःच्या सुरक्षेसाठी खर्च करण्याऐवजी "हेल्मेट उत्पादकांच्या हितासाठी" असे आरोप करणे यासारखे वैचारिक दारिद्र्य दुसरे नसेल.
प्रश्न तत्वाचा असेल तर दुचाकी वापरणे सोडून पायी चाला किंवा सायकल चालवा. नाही तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरा अथवा चारचाकी वाहनातून जा.
मुंबई उच्च न्यायालयाने स्वच्छ सांगितले आहे कि कोणी जर PIL अर्ज केला तर आम्ही सरकारला सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे भाग पाडू आणि त्यात सूट देण्याची सुतराम शक्यता कायद्यातच नाही.
हा कायदा आहे आणि तो तुम्हाला पाळायला लागणारच. तुमच्या मताला कुत्र सुद्धा विचारत नाही.
काथ्या कूट कितीही करा. हे च्युईंग गम चघळण्यासारखे आहे. कितीही वेळ चघळा पोटात काहीही जाणार नाही थोड्या वेळाने तोंडाचा स्वादही राहणार नाही
11 Feb 2016 - 1:01 pm | पगला गजोधर
कृपया आपल्यासारख्या व्यक्तीने
अशी भाषा न वापरावी, अशी विनंती मी करू का …
आम्ही आपणास विनंतीच करू शकतो, बाकी... आपण काय लिहावे, कसे लिहावे, याबाबत मला काहीही हक्क नाही.…
11 Feb 2016 - 1:40 pm | सुबोध खरे
न्यायालयाने nobody is bothered about your opinion असे एका याचिकाकर्त्याला सुनावले होते,त्याचे हे स्वो स्वैर भाषांतर आहे.कुत्र्याचा उल्लेख नको होता हे मान्य.
कुत्र्या ला
11 Feb 2016 - 1:34 pm | संदीप डांगे
जो माणूस ३५ हजाराची मोपेड पासून २-५ लाखापर्यंतच्या मोटर सायकली विकत घेतो त्याने ५००-१००० रुपये स्वतःच्या सुरक्षेसाठी खर्च करण्याऐवजी "हेल्मेट उत्पादकांच्या हितासाठी" असे आरोप करणे यासारखे वैचारिक दारिद्र्य दुसरे नसेल.
>> पुर्ण सहमत. ह्याच बरोबर ह्या सर्व किमतीच्या दुचाकी वापरण्याची अघोषित सक्ती जी उद्योजक-राजकिय नेत्यांच्या संगनमताने झाली त्याबद्दल कुणी चकार शब्द बोलत नाही. 'अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असावी की जिथे दुचाकी-चारचाकी वापरायची गरजच पडू नये' हा विचार कुणीच प्रमोट करत नाही. लंडनच्या ट्यूबचं उदाहरणं त्यासाठी लक्खं समोर आहे. त्याबद्दल खरं तर आंदोलनं, चर्चा, काथ्याकूट, कायदे, खटले व्हायला पाहिजेत. न रहेगा बास न बजेगी बासुरी.
11 Feb 2016 - 1:48 pm | मुक्त विहारि
....दुचाकी-चारचाकी वापरायची गरजच पडू नये' हा विचार कुणीच प्रमोट करत नाही.
हा विचार मी एका पक्षाच्या कार्यक्रमात मांडला होता.
पण आमच्या ह्या अशा विचाराला वाटाण्याच्या अक्षता लागल्या.
सर्वसामान्य माणसाला जे समजते ते अधिकारी मंडळींना (आमच्या भाषेत न्युटन मंडळींना) समजेलच असे नाही.
शिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर सुधरली तर, रिक्षावाले, टॅक्सीवाले हे कुणाशी सौजन्याने वागणार?
भारतातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, ही ब्रिटिशांनी काही तरी केले म्हणून टिकून आहे.
आयला,
१९५० पासून ह्यांना (पक्षी सरकारला, मग ते काँग्रेसचे असो वा युतीचे) धड बडनेरा ते नागपूर, किंवा अकोला ते नागपूर, अगदीच नाही तर निदान वर्धा ते नागपूर आणि वर्धा ते चंद्रपूर, लोकल नाही सुरु करता आली, ते काय करणार?
11 Feb 2016 - 9:51 pm | चैतन्य ईन्या
म्हणूनच मला आपल्या महान आएस वगैरे लोकांबद्दल अतिशय चीड आहे. चांगले लोक नाहीयेत अशातला भाग नाहीये पण आता हे नाव सरंजामदार झालेत. भीषण प्रकार आहे. ह्यात्न्च्यात पण काम करणारे असतीलच पण अवघडच आहे एकंदरीत. मला सगळ्यात आश्चर्य वाटते ते म्हणजे जगात सगळीकडे बीआरटी मध्ये बसेस डाव्या वां रस्त्याच्या कडेने जातात फक्त भारतातच कुठून रस्त्याच्या मधून करायची अतिशय सुंदर कल्पना ज्याला सुचली आणि ती राबवली ते महान आहेत. खरच महान आहे. डोके नावाचा प्रकार वापरायाचाच नाही असा बहुदा नियम आहे. सामान्य माणसाला जितका त्रास होईल तितका दिलाच पाहिजेल असा काहीसा बाणा दिसतो.
हाच प्रकार रस्त्यावरचे फुटपाथ काढून टाकून रस्ता मोठा करण्याच्या निर्णयाचा आहे. आपण काय नक्की करतोय हा प्रश्न कसा काय पडत नाही? तीच गोष्ट जिथे फुटपाथ आहे तिथे तो म्हातार्या माणसाला चालतच येणार नाही असा का करणे?
चार गोष्टी सुधारून सामान्य माणसाचे जीवन सुधारावे हि भावनाच नाहीये.
10 Aug 2016 - 7:49 pm | मुक्त
मुवि सध्या आपल्या पक्षाचे सरकार आहे. घ्या थोडं अॅडजस करुन
10 Aug 2016 - 10:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
ह्याच बरोबर ह्या सर्व किमतीच्या दुचाकी वापरण्याची अघोषित सक्ती जी उद्योजक-राजकिय नेत्यांच्या संगनमताने झाली त्याबद्दल कुणी चकार शब्द बोलत नाही.
हे किंवा सतत खराब होणारे आणि पहिल्या पावसात विरघळणारे रस्ते बनविणे (याचे तर आपल्या देशाकडे पेटंट आहे), इत्यादी, इत्यादी, इत्यादी, ...
ही सगळी कामे ज्या चलाख टेक्नॉलॉजीअंतर्गत केली जातात तिला आम्ही "वेल मॅनेज्ड मिस्मॅनेजमेंट" असे नाव दिले आहे ! ;) :) :(
11 Feb 2016 - 11:01 am | अन्नू
"हा कायदा आहे आणि तो तुम्हाला पाळायला लागणारच. तुमच्या मताला कुत्र सुद्धा विचारत नाही."
है शाब्बास!
11 Feb 2016 - 11:20 am | विजय पुरोहित
जो माणूस ३५ हजाराची मोपेड पासून २-५ लाखापर्यंतच्या मोटर सायकली विकत घेतो त्याने ५००-१००० रुपये स्वतःच्या सुरक्षेसाठी खर्च करण्याऐवजी "हेल्मेट उत्पादकांच्या हितासाठी" असे आरोप करणे यासारखे वैचारिक दारिद्र्य दुसरे नसेल. हे विशेष पटले.
11 Feb 2016 - 12:31 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
गपचुप हेल्मेट वापरा नाहीतर दंड भरा. विषय संपला.
11 Feb 2016 - 1:05 pm | मोदक
+१११
11 Feb 2016 - 9:12 pm | सुमीत भातखंडे
अपघातामधे मागच्या माणसाला जास्त धोका असतो.
त्यामुळे दोघांनीही हेलमेट घालणं आवश्यकच आहे.
11 Feb 2016 - 9:19 pm | बोका-ए-आझम
जिवावरच्या अपघातातून वाचलेला आहे - २००९ मध्ये आणि तोही केवळ हेल्मेट घातल्यामुळे. त्यामुळे हेल्मेट सक्तीला माझा पाठिंबाच राहिल. जिवापेक्षा जास्त मौल्यवान काही असू शकत नाही आणि त्यासाठी सक्ती करावी लागली तरी हरकत नाही. संदीपभौ, वाहतूक व्यवस्था अशी असावी की दुचाकीची गरज पडू नये हे मान्य पण तो लै लांब पल्ल्याचा पर्याय आहे. आत्ता,in short run हेल्मेट हा उपाय व्यवहार्य वाटतो.
12 Feb 2016 - 10:52 am | पगला गजोधर
फेसबुकवरील श्री. प्रसाद ताम्हणकर, पुणे, (परंपरा प्रकाशन पुणे)
यांचा ब्लॉग.
12 Feb 2016 - 11:34 am | चांदणे संदीप
+1111111111111111111111111111
12 Feb 2016 - 12:09 pm | टवाळ कार्टा
म्हणजे ज्यांच्या २-३ पिढ्या मुंबै-पुण्यात गेल्या ते लोक नियम पाळतात असे म्हणायचे आहे?????
12 Feb 2016 - 12:27 pm | सुबोध खरे
आतला व बाहेरचा कुणी का असेना.
पकडा आणि दंड वसूल करा. चार वेळा दंड भरला कि अक्कल येतेच. चारशे रुपये दिल्यावर लक्षात येते या ऐवजी चारशे रुपयाचे हेल्मेट घातले असते तर डोके आणि पैसे दोन्ही वाचले असते.
आधी जाते भांडवल आणि मग येते अक्कल
22 Jul 2016 - 1:14 pm | चौकटराजा
बाहेरच्यांचे प्रमाण हे गुन्हेगारीतही वाढलेले आहे. कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशी पोलिसांचीच मानसिकता नसते. वहातुक पोलिसाची आज काय गुणवत्ता दिसते ? .चार चार पोलिस चौकात उभे असतात पण वाहातुक नियमन करणारा वॉर्डन असतो.एका चौकात चार पोलीस असले तर पुढच्याच चौकात एकही नसतो.न्यायालयाने प्रचलित कायद्याच्या चौकटीत सरकारला धारेवर धरणे उचितच पण काहीच बाबतीत न्यायालयाचा सन्मान का ? सिग्नलच्या बाबतीत पीआयएल , रस्त्याच्या बाबतीत पीआयएल झाले तर त्यात न्यायालयाचा सन्मान ठेवला जाईल ..... ?
22 Jul 2016 - 1:41 pm | पगला गजोधर
क्रिकेटमध्ये चेंडू डोक्याला लागून मृत्यू येऊ शकतो .....
सुरक्षेच्या उपायासाठी, आता मैदानातील सर्वच खेळाडूंना (फलंदाज + जवळचे सर्वच क्षेत्ररक्षक यांना), अंपायर, प्रेक्षक, इ .. त्यांची इच्छा वा नसो, त्यांनी 'हेल्मेट ची सक्ती', करावी.
http://www.misalpav.com/node/29603
10 Aug 2016 - 2:19 pm | पगला गजोधर
४ वर्षांवरील मुलांनाही बाईकवर हेल्मेटसक्ती?
10 Aug 2016 - 3:15 pm | जयन्त बा शिम्पि
खरं म्हणजे ज्या रस्त्यांवरून वाहने वेगाने जातात , त्याच रस्त्यांवर , विषेशतः शहर हद्दीच्या बाहेर, दुचाकी वापरणार्या व्यक्तींना , हेल्मेट वापरण्याची सक्ती करावयास हवी. काही ठिकाणी वाहनांचा वेग १५ ते २० किमी/तास एव्हढाच असतो. अर्थात हे मान्य की अपघात घडावयाचा झाला , तर तो कोठेही होवू शकतो. पण चार वर्षावरील मुलांना सुद्धा , हेल्मेट वापरणे बंधनकारक करणे हे जरा अतीच होत आहे. त्यापेक्षा , दुचाकीवर दोघांनीच हेल्मेट घालून जावे, तीसरी व्यक्तीच नको मग ते चार वर्षाचे वरील असो नाहीतर त्याहून लहान असो , असाच नियम करावा.
आणखी एक सुचना:- यापुढे प्रत्येक दुचाकीला किमान चार चार हेल्मेट ( ' हम दो,हमारे दो' या आदेशानुसार ) ठेवण्याची जागा करायलाच हवी अशीही सक्ती करायला हवी. म्हणजे उत्पादकांनीच त्याविरुद्ध आवाज उठविला की आपोआप सरकार हा आदेश मागे घेईल. ( पेट्रोल पंप मालकांचे उदाहरण नुकतेच आपण अनुभविले आहेच !)
10 Aug 2016 - 3:41 pm | कैलासवासी सोन्याबापु
ते ताम्हणकर साहेब अन त्यांचे इथले तिथले सगळीकडले समर्थक ह्यांनी एक जनआंदोलन उभारून पूर्ण पुणे/मुंबई मधली स्थावरजंगम , चल अचल मालमत्ता आजरोजी असलेल्या बाजारभावात विकत घ्यावी, मग "बाहेरचे" हाकलून लावावेत, किंवा त्यांचे जिनोसाईड करावे किंवा मग बिना हेल्मेटच काय बिना मुंडके हायबुसा सारख्या गाड्या उडवाव्यात, अशी संबंधितांस नम्र विनंती, तसे पाहता जे लोकं आज बोंबलून पुणेकर पुणेकर म्हणून नाके उडवतात ते पण कधीतरी "बाहेरचेच" होते इतके बोलून मी हा मूर्खपणा बारा मोटेच्या विहिरीत घालतो (माझ्यापुरता)
10 Aug 2016 - 6:53 pm | पगला गजोधर
शांत गदाधारी भीम ! शांत !
कळावे आपला नम्र.
10 Aug 2016 - 7:30 pm | उडन खटोला
परिकथेतील राजकुमार नावाचा आयडी माहिती आहे का बापु? प्रसाद ताम्हणकरांचं काही तरी कनेक्शन आहे म्हणतेत.
10 Aug 2016 - 9:48 pm | संदीप डांगे
काय हो बाप्पू, पुण्यात बाहेरुन येणारे लोक, पुण्यातल्या मूळच्या लोकांनी केलेल्या कर्तबगारीमुळे. पोटापाण्याला लागू शकतात हा एक भलामोठ्ठा म्हशीच्या पवट्याएवढा गैरसमज का ब्रे बाळगत असावेत हे 'आतले पुणेकर'??
10 Aug 2016 - 7:27 pm | विवेकपटाईत
एखाद वेळी मूर्ख माणसाची वाद-विवाद करता येतो. पण पुणेकर म्हणजे महाविद्वान.
महाविद्वान लोकांची डोक्याची कवटी सुद्धा मजबूत असते. कुल्हाडीने ने घाव घातला तरी फुटणार नाही. रस्त्याची काय बिशाद. शिवाय जो रस्त्यावर अपघातात मरण पावतो त्याला बहुतेक स्वर्गात अप्सरा भेटतात म्हणे (एका माजी पुणेकराचे मत). रस्त्यावर शहीद व्हा, स्वर्गात जा, सोमरसा सोबत अप्सरांचे नृत्य पहा.