गाभा:
नमस्कार...!!!
कालच एक बातमी वाचली ...मुम्बईत दुचाकीवर मागे बसणार्यालाही हेल्मेट्सक्ती....
ऐकुन जरा गोन्धळलोच...आता हे काय नवीन..???
गाडी चालवणार्याला हेल्मेट्सक्ती योग्य आहे..त्याबद्दल वाद नाही पण आता मागे बसणार्यालाही हेल्मेट्सक्ती...
आता समजा गाडी चालवताना वाटेत एखादा मित्र वा अन्य कोणी भेटला आणि त्याला लिफ्ट द्यायची झाली तर काय त्यासाठी घरुन निघतानाच दोन दोन हेल्मेट घेउन निघायचे का...
हेल्मेट आवश्यक आहे हे मान्य हो..म्हणुन उद्या रस्त्याने पायी चालणार्यालाही हेल्मेट्सक्ती करणार कि काय....
याबद्दल मिपाकराना काय वाटते जाणुन घ्यायला आवडेल...
( तळ टिप : मिपावर पहिल्यादा लिहीत आहे.. लेखनात चुका असतीलच त्याबद्दल माफी असावी..)
धन्यवाद...
प्रतिक्रिया
10 Feb 2016 - 3:03 pm | मृत्युन्जय
ज्या कारणासाठी चालकाला हेल्मेट सक्ती हवी त्याच कारणासाठी पिलीयन रायडरला देखील हवी. मग तर गाडीवर बसलेल्या चिल्यापिल्यांना देखील हवी. मग तर एका टु व्हीलर वर ३ - ४ जण (लहान मूल धरुन) बसण्याला देखील बंदी हवी.
10 Feb 2016 - 3:42 pm | तुषार काळभोर
१) ज्या कारणासाठी चालकाला हेल्मेट सक्ती हवी त्याच कारणासाठी पिलीयन रायडरला देखील हवी.
२) मग तर गाडीवर बसलेल्या चिल्यापिल्यांना देखील हवी.
३) मग तर एका टु व्हीलर वर ३ - ४ जण (लहान मूल धरुन) बसण्याला देखील बंदी हवी.
टेक्निकली योग्यच आहे. यात चुकीचं काय आहे?
10 Feb 2016 - 3:14 pm | अरुण मनोहर
अपघात झाला तर मागे बसलेला प्रवासी नेहमी सुखरुपच रहातो का?
बाईक घसरून पडली, तर मागचा अगदी अलगद उठून उभा रहातो का?
उगा काहीतरीच !
10 Feb 2016 - 3:17 pm | उगा काहितरीच
माझा काय संबंध ?
10 Feb 2016 - 3:18 pm | महासंग्राम
१लेच लेखन अन ते बे काठ्याकुट, शतकी धागा होण्यासाठी शुभेच्छा, लिवत राहा
10 Feb 2016 - 3:27 pm | sagarpdy
मित्र असेल तर ओळख न दाखवता निघून जा (हेल्मेट मध्ये चेहरा लपल्याने फार अवघड नाही)
अन्य कोणी 'भेटली' तर मात्र एकदम जेन्युइन प्रश्न. उपायासाठी वाट पहात आहे.
10 Feb 2016 - 3:40 pm | तुषार काळभोर
त्यांनी हेल्मेट घेऊन फिरावे.
10 Feb 2016 - 3:51 pm | संदीप डांगे
=))
10 Feb 2016 - 4:19 pm | अभ्या..
हे थोडेसे ज्यांना भीकेची अपेक्षा आहे त्याने कटोरा घेऊन फिरावे असे वाटतेय. ;)
एनीवे हळूहळू आरटीओचे सगळेच नियम काटेकोरपणे राबवावेत. पहिल्यांदा पोलीस लोक्स दिसूदेत नियम पाळताना. मग गव्हरन्मेंट गाड्या, मग सार्वजनिक व्यवस्था अन शेवटी बिचार्या ह्यात नसणार्या नागरिकांचा णंबर यावा.
10 Feb 2016 - 4:33 pm | टवाळ कार्टा
असे झाले तर मग चिरीमीरी कशी मिळणार रे
10 Feb 2016 - 4:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेल्मेट सक्तीसाठी सरकारने आमचं गरीब औरंगाबाद शहर का निवडलं ते अगोदर सांगा ?
-दिलीप बिरुटे
10 Feb 2016 - 4:38 pm | महासंग्राम
प्राडॉ छे छे औरंगाबाद गरीब कसं , एकेकाळी राजधानी होती कि आद्य राजधानीपासूनचा सुरवात केली लि त्यांनी :)
10 Feb 2016 - 4:55 pm | प्रचेतस
नै ओ.
आधी प्रतिष्ठान. बहुधा त्यापूर्वी जीर्णनगर.
10 Feb 2016 - 4:41 pm | संदीप डांगे
दिडशे मर्सीडीज एकाच वेळेला घेणार्यांचं शहर आणि गरिब?
10 Feb 2016 - 4:43 pm | होबासराव
कोणि घेतल्या बावा दिडशे मर्सीडीज एकाच वेळेला
10 Feb 2016 - 5:00 pm | संदीप डांगे
http://www.ndtv.com/photos/news/aurangabad-150-mercs-sold-at-one-go-8405
10 Feb 2016 - 4:24 pm | गवि
मुळात दुचाकी, बाईक्स नकोतच. हल्लीची पिढी,श्रीमंत बापाच्या काळ्यापैशावर, बाईक्सचा भरधाव वेग, वेड्यावाकड्या कसरती ,पाश्चात्त्यांचं अंधानुकरण, डेटिंग, पबसंस्कृती, तोकडे कपडे, दारु, प्रदूषण, राजकारणी, ..
(काही विसरलं नाय ना यात..?)
10 Feb 2016 - 4:39 pm | महासंग्राम
जिलब्या राहिल्यात कि
10 Feb 2016 - 5:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
या सगळ्यापासून होणारी सौंस्क्रूतीची हानी र्हायली ना.... ती तर सर्वात म्हत्वाची ;)
10 Feb 2016 - 4:49 pm | पी महेश००७
हेल्मेटसक्ती हवीच... त्याला विरोध करण्याचा हट्ट पुणेकरांनी धरू नये असं वाटतं.
पुणेरी पगडीचा अभिमान बाळगणाऱ्या पुणेकरांनी हेल्मेट वापरलं तर पगडी पचास म्हणण्यास काही तरी वाव राहील...
10 Feb 2016 - 4:52 pm | गवि
सहमत..
पुणेकरांनी हवंतर हेल्मेटला झिरमिळ्या लावाव्यात, जाज्वल्यतेसाठी.
10 Feb 2016 - 5:09 pm | शैलेश भोसले
मि महेश ००७ यांना सांगु इच्छितो कि मि तन - मन - धनानेच नव्हे तर अगदि जन्माने मुंबैकर आहे ...
दिलेल्या प्रतिक्रियांसाठी मिपाकरांचे आभार..
10 Feb 2016 - 5:06 pm | बॅटमॅन
पुणेकर लोकमान्यांचाच कित्ता गिरवताहेत.
लोकमान्य म्हणाले की मी शेंगा खाल्ल्या नाहीत सबब टरफले उचलणार नाही. पुणेकर म्हणताहेत की आम्ही डोके वापरत नाही सबब हेल्मेट वापरणार नाही.
10 Feb 2016 - 5:20 pm | चेक आणि मेट
हा हा हा.....
.
.
बाकि आम्हाला पण पुणेकरांना टोचण्या मारायला लई मज्जा वाटते.