पॉर्न आणि आपण - सर्वेक्षण

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in काथ्याकूट
21 Jan 2016 - 1:51 am
गाभा: 

काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पॉर्नवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बंदी लागू होण्याआधीच हा निर्णय मागे घेतला. त्या निमित्ताने पॉर्नबद्दल सर्वसामान्यांची आणि अभ्यासकांची, पॉर्नच्या बाजूने आणि विरोधात अशी सगळ्या प्रकारची मतं प्रदर्शित झाली. पॉर्न बघणं चांगलं का वाईट, योग्य का अयोग्य याबद्दल काहीही मत न बनवता लोकांना काय वाटतं याचा थोडा अभ्यास केला जावा; लोक पॉर्न बघतात का, बघतात तर किती प्रमाणात, किती नियमितपणे बघतात; बघत नसतील तर का बघत नाहीत; पॉर्न ही घृणास्पद गोष्ट आहे का अनावश्यक याबद्दल समाजाचं काय मत आहे याचा अभ्यास करणं महत्त्वाचं वाटतं. कारण समाजासाठी बनवलेले कायदे हे समाजाच्या मताकडे दुर्लक्षून बनवले जाऊ नयेत.

आत्तापर्यंत अशा प्रकारची अनेक सर्वेक्षणं झालेली आहेत, पण ती पाश्चात्य समाजात झालेली आहेत. टीव्ही, सिनेमा, इंटरनेट या माध्यमांतून पाश्चात्य संस्कृती आपल्यापर्यंत पोहोचत असली तरीही भारतीय समाजाची, भारतात अनेक वर्षं घालवलेल्या लोकांची मतं काही निराळी असू शकतात. त्याची चाचपणी करावी असा या प्रश्नमालिकेमागचा हेतू आहे.

या सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या कोणाचीही व्यक्तिगत माहिती, ओळख आमच्यापर्यंत पोहोचणार नाही. किंचित व्यक्तिगत माहिती हवी आहे ती वयोगट कोणता आणि स्त्री-पुरुषांच्या मतांमध्ये काही फरक आहे का असा अभ्यास करण्यासाठी. हे प्रश्न पूर्ण करण्यात तुमचा फार वेळ जाणार नाही. या प्रश्नांच्या उत्तरांमधून कोणाबद्दलही मतं बनवायची नाहीत, वा कोणालाही जोखायचं असा हेतू नाही. ही प्रश्नावली भरताना एक मिनीटापेक्षा जास्त वेळ जाऊ नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण समाज म्हणून कसा विचार करतो हे समजून घेण्यासाठी मदत करण्याबद्दल आभार. सर्वेक्षणाचे निकाल (बहुदा) मे महिन्यात इथेच जाहीर केले जातील. ३१ मार्चपर्यंत सर्वेक्षणात भाग घेता येईल.

सर्वेक्षणात भाग घेताना गूगलमध्ये लॉगिन करण्याची गरज नाही. खाजगीपणा जपण्यासाठी प्रायव्हेट ब्राऊजिंगची सोय वापरून उत्तरं देऊ शकता; जेणेकरून मला आणि गूगललाही तुमची ओळख काय हे समजणार नाही. हा सर्वेक्षणाचा दुवा.

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

21 Jan 2016 - 1:56 am | अर्धवटराव

:)
कुठल्याही प्रकारच्या अभ्यासाला आपला फुल्ल सपोर्ट आहे... आमच पिंडच मुळी तसा... 'शिक्शाआआआन'

सायकलस्वार's picture

21 Jan 2016 - 2:55 am | सायकलस्वार

भाग घेउन आलो.

खटपट्या's picture

21 Jan 2016 - 4:56 am | खटपट्या

अत्यंत रोचक धागा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jan 2016 - 5:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पहिल्या चार तासांमध्येच २५+ प्रतिसाद आलेले दिसत आहेत. ए‌वढा उत्साहवर्धक प्रतिसाद, तो ही लगेचच मिळेल अशी अपेक्षा नव्हती.

मराठी संस्थळांवर नसणाऱ्या, पण ओळखीच्या भारतीयांनाही याचा दुवा पाठवायला हरकत नाही. जितक्या वेगवेगळ्या विचारांच्या, पार्श्वभूमीच्या, वयाच्या लोकांकडून उत्तरं मिळतील तेवढं उत्तम.

उपयोजक's picture

21 Jan 2016 - 6:47 am | उपयोजक

विषय खमंग.प्रतिसाद भरपुर!!

चलत मुसाफिर's picture

21 Jan 2016 - 7:46 am | चलत मुसाफिर

फॉर्म भरला. प्रश्नांची निवड अगदी विचारपूर्वक करण्यात आली आहे. धन्यवाद.

सूचना: सर्वेक्षणात खालील प्रश्न सामील केला जावा.

"जर आपल्या मित्रवर्गात, संबंधीयांमध्ये किंवा नात्यात कुणी पॉर्न कलाकार आहे असे कळले तर आपल्या भावना काय असतील?"

सुदिप खेडगिकर's picture

21 Jan 2016 - 11:07 am | सुदिप खेडगिकर

माझी एखादी मैत्रिण जर पोर्न कलाकार असेल तर माझी तिच्याकडे पाहन्याची नजर नक्किच बदलु शकते. अर्थात पोर्न आणि त्या सम्बन्धिचि महती आणि माहिती यामधे खूप तफावत आहे म्हणुन पण हा बदल असु शकतो

चलत मुसाफिर's picture

22 Jan 2016 - 7:11 am | चलत मुसाफिर

मैत्रीणच का? पॉर्न कलाकार पुरुषही असू शकतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jan 2016 - 8:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वेक्षणात भाग घेत आहे. खरं बै ! अदितीचा स्वभाव. कोणत्याही कोनाड्या कानाड्या शिवाय थेट विचार करनं आणि तो विचार मांडनं याचं मला नेहमीच कौतुक वाटलं आहे.

-दिलीप बिरुटे

भंकस बाबा's picture

21 Jan 2016 - 8:35 am | भंकस बाबा

भरला एकदाचा ,

काकासाहेब केंजळे's picture

21 Jan 2016 - 10:02 am | काकासाहेब केंजळे

भरला फॉर्म ,

सुबोध खरे's picture

21 Jan 2016 - 10:42 am | सुबोध खरे

हे सर्वेक्षण एका विशिष्ट गटापुरते( नेतीझन) मर्यादित राहील ज्यांना पोर्नची "सहज" उपलब्धता आहे त्यामुळे हे सर्वेक्षण एकांगी असेल अशी भीती वाटते. याच्या आयोजकांनी हि शक्यता गृहीत धरली असावी अशी आशा करतो.

वामन देशमुख's picture

21 Jan 2016 - 11:14 am | वामन देशमुख

या धाग्यावरून या कौलाच्या प्रयत्नाची आणि प्रभाकर पेठकरांच्या या प्रतिसादाची आठवण झाली.

धर्मश्रद्धा जोखू पाहणारा कौल किती तोकडा आणि फसवा असू शकतो याची त्या चर्चेतून जाणीव झाली होती.

पोर्न बद्धलचा कौल तसाच तोकडा आणि फसवा असू नये असं वाटतं.

प्रदीप साळुंखे's picture

21 Jan 2016 - 2:22 pm | प्रदीप साळुंखे

शेवटी मी एक अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली ती अशी
:
पाॅर्न पाहिल्याने व्यक्ती उत्तेजित होते आणि भावनांवरचा ताबा जर सुटला तर ती व्यक्ती गुन्हा करू शकते.सर्वच पाॅर्न पाहणारे मनाने परिपक्व नसतात,त्यामुळे मनाचा समतोल ढळलेल्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांकडून पाॅर्न पाहिल्यामुळे अपराध घडू शकतात/किंवा अपराध करण्यास उत्तेजना मिळू शकते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jan 2016 - 2:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान सर्वेक्षण.

हा धागा इथे असल्याने सर्वेक्षणाचे निकाल ऐसीबरोबरच येथेसुद्धा प्रसिद्ध करावेत असे सुचवतो.

नाखु's picture

23 Jan 2016 - 9:19 am | नाखु

ती कौले इथल्या बाजारातही ठेवावीत फक्त तिकडे नको.

मिपा गाववाला नाखु

पगला गजोधर's picture

21 Jan 2016 - 2:32 pm | पगला गजोधर

""पॉर्न वाचण्या/बघण्यासाठी किमान वयोमर्यादा काय असावी?"" here I have assumed, Porn includes Sex Education also...

हा विदा कोण जमा करते आहे? कसा वापर होणार आहे? कोणाचा सहभाग आहे?

ह्या प्रश्नांची उत्तरं आली की लगेच फॉर्म भरण्यात येईल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2016 - 7:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

संपादक मंडळ.
वरच्या दोन्ही प्रतिसादांमधुन अ‍ॅडल्ट वेबसाईट्सची नावं काढुन टाकावीत. त्याजागी समांतर वाक्यरचनेचा प्रयोग करावा.

संदीप डांगे's picture

22 Jan 2016 - 7:47 pm | संदीप डांगे

का बुवा?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2016 - 7:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमच्या प्रतिक्रियेचा उद्देश हि माहिती पद्धतशीरपणे पसरवली जातेय असा होता. त्या वेबसाईटचं नावं इथे लिहुन इथल्या अजुन चारचौघांमधे हि माहिती पसरवण्यात काय पाँईंट आहे?

संदीप डांगे's picture

22 Jan 2016 - 8:03 pm | संदीप डांगे

जॅकभाउ, इथल्या सदस्यांना सर्व माहित आहे असे गृहित धरून प्रतिसाद टाकलाय. तुम्ही म्हणताय तसे खरेच होत असेल तर काढून टाका...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jan 2016 - 7:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वीच इज द बेष्ट फ़ाइव्ह पोर्न साइट्स असं गूगलला सर्च केलं आणि तिथे संदेश आला आहे 'की 'सॉरी याबाबतीत आम्ही आपल्याला काही मदत करू शकत नाही " आपल्याला माहिती असलेल्या सायटीची नावं मला सेंडवा. :)

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jan 2016 - 8:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्राडॉ, यु टू !? ;) :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Jan 2016 - 8:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लोल प्रतिसाद. डांगेण्णा गारठले असतील भर नाशकात तुमच्याकडुन असा प्रतिसाद आलेला पाहुन.

सायकलस्वार's picture

22 Jan 2016 - 7:37 pm | सायकलस्वार

भारतीयांना पद्धतशीरपणे पोर्न-गिर्‍हाईक बनवण्याच्या हालचाली आहेत

हसून हसून फुप्फुसं दुखायला लागली!... प्लीज प्लीज आवराच!!!

संदीप डांगे's picture

22 Jan 2016 - 7:46 pm | संदीप डांगे

हसण्यासाठीच टाकला प्रतिसाद, तुम्हाला काय वाटलं काका? :-))

"तुम्ही विवाहीत आहात का?" हा प्रश्न हवा होता असं वाटतं.

घरी जाऊन करतो, पण विदा कोण जमा करतं आहे? आणि विदा मिळाल्यानंतर 'आपण समाज म्हणून कसा विचार करतो ' एवढंच जाणून घेणं अभिप्रेत आहे की आणखी काही?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Jan 2016 - 6:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या गोळा केलेल्या विद्याचं पुढे काय केलं जाणारे? घरी गेलो की विदा फॉर्म भरेन बघुन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jan 2016 - 11:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे सर्वेक्षण एका विशिष्ट गटापुरते( नेतीझन) मर्यादित राहील ज्यांना पोर्नची "सहज" उपलब्धता आहे त्यामुळे हे सर्वेक्षण एकांगी असेल अशी भीती वाटते.

या मर्यादेची जाणीव आहे. त्यामुळे हे निकाल ठराविक आर्थिक वर्गातल्या लोकांची मतं असतील, ज्यांना इंटरनेटवर 'उनाडायला' वेळ असतो, याची कल्पना आहे.

हा धागा इथे असल्याने सर्वेक्षणाचे निकाल ऐसीबरोबरच येथेसुद्धा प्रसिद्ध करावेत असे सुचवतो.

होय अर्थातच. ज्या संस्थळांवर हा धागा प्रकाशित केला आहे तिथे सगळीकडेच, यातून काय समजलं, असा धागा काढेन. (फक्त ते सगळं समजून घ्यायला वेळ लागेल त्यामुळे एप्रिल-मे असे दोन महिने लागतील असं गृहित धरून लिहिलं आहे.)

ही मूळ कल्पना माझी आहे; आणि त्यात ऋषिकेश आणि मेघना भुस्कुटे कमी-अधिक प्रमाणात मदत करत आहेत. डेटा अनालिसिससाठी ऋषिकेश मदत करणार आहे. पण मुख्य जबाबदारी माझी.

हा गूगल फॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक इथे फिरला तर त्या लोकांपर्यंत पुन्हा पोहोचणं बरंच कठीण होईल. म्हणून फॉर्ममध्ये ऐसीचा उल्लेख आहे.

'आपण समाज म्हणून कसा विचार करतो '

यातले काही कंगोरे -
१. पॉर्न बघणाऱ्यांतल्या किती लोकांना 'व्यसन' लागतं किंवा त्याच्या जवळ जाता येईल असं काही दिसतं हा एक प्रश्न मला पडला आहे. (माझा अंदाज - फार नगण्य प्रमाणात लोकांना व्यसन लागत असावं. अंदाज करणं एका ठराविक मर्यादेपर्यंत ठीकच, पण माहिती गोळा करता आली तर बघावी.)

२. उदाहरणार्थ सध्या मी एक पुस्तक वाचत आहे - The Feminist Porn Book. ही अँथॉलॉजी आहे. यात काही पॉर्नोग्राफर्सनी लिहिलेलं आहे. एकीने लिहिलंय, ती पुरुष म्हणून जन्माला आली, पॉर्नमध्ये काम करून पैसे मिळवून सेक्स रीअसाईनमेंट सर्जरी करून घेतली. तेव्हा तिला वाटत होतं की आपल्याला जे बघावंसं वाटतं ते पॉर्न अस्तित्वातच नाही. म्हणून पॉर्न-अॅक्टर ते पॉर्न-निर्माती/दिग्दर्शक असा तिचा प्रवास झाला.
आणखी एक आहे तो ट्रान्सजेंडर, कृष्णवर्णीय, (आता) स्त्री मानसोपचारतज्ञाचा. तिने नोंद केल्ये की तिच्या दोन 'पेशंट्स' लेस्बियन जोडीदार होत्या. त्या दोघींच्याही वेगवेगळ्या फँटसीज होत्या आणि दोघींनाही दुसरीच्या फँटसीबद्दल आक्षेप होता; हे जमणार नाही, यामुळे आनंद मिळणार नाही, असं. तज्ज्ञाने या दोघींना एकमेकींच्या फँटस्या दर्शवणारं पॉर्न बघायला सांगितलं. ते बघून "यातूनही आपल्याला आनंद मिळेल" हे दोघींनीही मान्य केलं. त्यांचं आपसांत प्रेम होतंच, पण शारीर संबंधांची प्रत सुधारल्यामुळे प्रेम आणि नातेसंबंधांची प्रतही वाढली.
एक लेख आहे तो स्वतःला जेंडरक्विअर म्हणणाऱ्या व्यक्तीचा. या व्यक्तीचा उल्लेख ती/तो असा होऊ नये असं म्हणणं आहे. या व्यक्तीला कधी पुरुष, कधी स्त्री असल्याप्रमाणे लैंगिक संबंध ठेवायचे असतात. याला तरल-लैंगिकता म्हणतात.

(हे पुस्तक वाचताना मराठी भाषेत एवढे शब्दच नाहीत याबद्दल फार गंड येतो. ट्रान्सजेंडर याला शब्द काय, मला माहीत नाही. या संदर्भात बोलताना सिसजेंडर असाही शब्द येतो; मराठीत असे शब्द वापरात नाहीतच.)

३. खोऱ्याने उपलब्ध असलेलं पॉर्न हे स्ट्रेट पुरुषांच्या उपभोगासाठी बनवलेलं असतं हे मला पॉर्न बघितल्यापासून लक्षात आलं. गे पुरुषांसाठीही नसतं असं नाही. फेमिनिस्ट पॉर्न हा प्रकार गेल्या काही वर्षांतच साईट्सवर दिसायला लागला. स्त्रिया मोठ्या प्रमाणावर गे पॉर्न पाहतात अशी नोंद सर्व्हेंमधून होते.

४. हेटरोनॉरमेटीव्ह वगळता इतर लोक, जे हेटरोसेक्शुअलही असू शकतात, त्यांना संस्कारांमुळे, भीडेमुळे, आपल्या फँटस्या म्हणजे विकार वाटू शकतात. उदाहरणार्थ - S/M.

५. माणसांच्या फँटसीज फार विचित्र असू शकतात. मास्टर्स आणि जॉन्सन नोंदवतात की काही स्त्रियांना स्वतःवर बलात्काराची फँटसी असते; प्रत्यक्षात तो व्हावा असं नव्हे, तर अशा कल्पनांनी त्यांना ऑरगॅझमचा आनंद मिळतो. या फँटस्या पॉर्नमधून पुरवल्या जाऊ शकतात.

म्हणून या सर्व्हेत काही प्रश्न असे आहेत - तुम्ही प्रत्यक्षात ज्या लैंगिक क्रिया करता त्याच बघता का? तुम्हाला ज्या प्रकारचं पॉर्न बघायचं असतं ते सहज उपलब्ध होतं का?

ठराविक प्रकारचे प्रश्न हवेत, हा आक्षेपही मान्य आहे. पण माझं आकलन, माझी मर्यादा आणि उत्तरं द्यायला लोकांना फार वेळ लागू नये ही मर्यादा बाळगून अनेक प्रश्न बासनात ठेवले आहेत. या सर्वेक्षणातून काही रोचक, नवीन किंवा प्रेरणादायक (किंवा माझ्या चुका) सापडलं तर कोणी अभ्यासक यात अधिक वेळ घालवून आणखी महत्त्वाचं काही देऊ शकतील असं मला वाटतं. किंवा तसा आशावाद आहे.

---

लैंगिकतेबद्दल मास्टर्स आणि जॉन्सन यांचं एक उद्धृत देण्याचा मोह आवरत नाही -
"There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable."

---

उत्तरं देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि प्रश्न विचारणाऱ्याबद्दलही विशेष आभार. कारण त्यातून मी ज्या गोष्टी गृहित धरून धागा काढला त्यांचंही स्पष्टीकरण लिहिता येतं.

गुलाम's picture

22 Jan 2016 - 1:37 pm | गुलाम

सुंदर प्रतिसाद!!!

"There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable."

या वाक्यातील "sexual" हा शब्द वगळून देखील वाक्य परफेक्ट वाटतंय.

विवेक ठाकूर's picture

23 Jan 2016 - 12:59 pm | विवेक ठाकूर

ओशोंचं एक सुरेख वाक्य आहे `कल्पनाको एक खिलौना करके जानो तो उसके साथ खेलनेका मजा है. लेकीन अपनी इच्छाको कल्पनापे कभी मत सवार होने देना'

जे आहे ते उपभोगता येतं, कल्पना हा नुसता टाइमपास आहे आणि प्रणयात तर, फँटसी आहे त्याची मजा घालवण्याचं सगळ्यात मोठं काम करते. तस्मात, हा सर्वे, विदा, त्याचे निष्कर्श हे सगळं निष्कारण वेळ वाया घालवणं आहे.

आदूबाळ's picture

23 Jan 2016 - 5:29 pm | आदूबाळ

ओके सर. निष्कारण वेळ वाया घालवणं काय आहे हे नीटच समजलं. आता वेळेचा सदुपयोग करण्यासाठी काय स्कीम आहे याचं मार्गदर्शन करावं ही न० वि०

विवेक ठाकूर's picture

24 Jan 2016 - 12:33 am | विवेक ठाकूर

पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका. ते एखादा हिंदी सिनेमा पाहून एकावेळी दहा जणांना लोळवण्याची कल्पना करण्यासारखं आहे. पॉर्न फक्त उत्तेजना देऊ शकतो, प्रत्यक्षात मात्र आहे तेच उपभोगता येतं; दुसरी काहीही शक्यता नाही. खरं तर पॉर्न निव्वळ उत्तेजनेसाठी आहे, इट इज जस्ट द फर्स्ट स्टेप. ज्याला उपभोगता येतं त्याला उत्तेजना स्वाभाविकपणे येते. आणि जिथे प्रणय हा दोघांसाठी एकमेकांना सुख देण्याचा, एकमेकांचा सहवास एंजॉय करण्याचा, एकमेकांप्रती कृतज्ञ होण्याचा सोहळा आहे तिथे तर नुसता स्पर्शच कमालीचा उत्तेजक असतो.

माणसाचं सत्तर ते पंच्यहत्तर टक्के ग्रहण डोळ्यांनी आहे, आणि सात ते दहा टक्के श्रवणातून आहे त्यामुळे पॉर्नची चलती आहे. उरलेल्या पंधरा टक्क्यात गंध, स्वाद आणि स्पर्श या ग्रहण क्षमता आहेत. प्रणयात मात्र नव्वद टक्के स्पर्श, आणि उरलेल्या दहा टक्क्यात गंध आणि श्रवण आहेत. तिथे दृष्टी आणि स्वाद यांना जवळ जवळ शून्य महत्त्व आहे. तस्मात, पॉर्न हा फार तर अ‍ॅडल्ट सिनेमा पाहण्या इतपत उपयोगी आहे. ज्या युगुलाला खरा प्रणय भोगायचा आहे त्यांना पारस्पारिक प्रेम, एकमेकांना सुख देण्याची भावना आणि एकमेकांच्या सहवासाची आणि स्पर्शाची मोहिनी ही परिमाणं उपभोगाची किमया घडवतात. अशा युगुलांसाठी पॉर्न फक्त मेंटल मॅस्ट्युबरेशन आहे. एखादे वेळी मजा म्हणून ठीक पण प्रत्यक्षात निरुपयोगी .

अविनाश लोंढे.'s picture

24 Jan 2016 - 12:51 am | अविनाश लोंढे.

प्रत्येक्षात अनुभव घेतल्याशिवाय fantacy अन reality मध्ये तुलना करणे व्यर्थ आहे , असं नाही का वाटत तुम्हाला ?

त्यामुळे अशी तुलना उघड आहे. प्रणयात तुमची शंभर टक्के उपस्थितीच तर उपभोगाची खुमारी वाढवते. तिथे फँटसी आली की प्रत्यक्ष आणि कल्पना यांच्या फारकतीमुळे तुम्ही डिवाइड होता आणि प्रत्यक्षाची वाट लागते.

गामा पैलवान's picture

24 Jan 2016 - 3:22 am | गामा पैलवान

विवेक ठाकूर,

तुमच्या नावाला शोभेल असा विवेकी प्रतिसाद आहे ! :-) उत्तानचित्रे पाहणे म्हणजे क्षुधावर्धक सेवन करण्यासारखे आहे. केव्हातरी एकदोन वेळा मजा म्हणून ठीक आहे. नेहमी घेण्यात अर्थ नाही. जेवण आणि क्षुधावर्धक यांत फरक करायलाच पाहिजे. सडकून भूक लागण्यासाठी व्यायाम वा अंगमेहनत करायला हवी. निव्वळ क्षुधावर्धकावर अवलंबून राहणे बरोबर नाही.

आ.न.,
-गा.पै.

साती's picture

24 Jan 2016 - 8:24 am | साती

प्रतिसाद आवडला.

आदूबाळ's picture

24 Jan 2016 - 5:18 pm | आदूबाळ

जीवन : साहित्य :: लैंगिक क्रिया : पॉर्न

असं मला वाटतं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jan 2016 - 7:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका.

फँटस्या बघण्याची इच्छा नसताना फँटस्या बघायला लागल्यामुळे किंवा फँटस्या बघून गंड निर्माण झाल्यामुळे लोकांना त्रास होतो याबद्दल शंका नाही. पण वयोपरत्त्वे किंवा इतर काही कारणांमुळे लैंगिक क्रिया करतानाही पाट्या टाकणाऱ्या लोकांना पॉर्नमधून फँटसीज सुचून पाट्या टाकणं कमी/बंद होतं असं सेक्सॉलॉजिस्ट्स नोंदवतात. तेव्हा असा सरसकट सल्ला देणं शक्य नाही.

बाकी टक्केवारी कुठून काढली, काय-कसं हे काही विचारत नाही.

एखादे वेळी मजा म्हणून ठीक पण प्रत्यक्षात निरुपयोगी .

मजा आली तरीही निरुपयोगी, हे कसं हे मला समजलं नाही. सांगितलं नाहीत तरीही चालेल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Jan 2016 - 8:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

५ च्या टप्प्यात वयोगट केले असते तर अधिक चांगलं झालं असतं. नारायणदत्त तिवारींच्या वयापरंतचे.

विवेक ठाकूर's picture

24 Jan 2016 - 10:18 pm | विवेक ठाकूर

पाट्या टाकणाऱ्या लोकांना पॉर्नमधून फँटसीज सुचून पाट्या टाकणं कमी/बंद होतं असं सेक्सॉलॉजिस्ट्स नोंदवतात.

प्रणय म्हणजे पाट्या टाकणं आहे?

बहुदा तुम्हाला कल्पना नाही. प्रणय हा फक्त मानवाला, जननाची गरज नसतांना सुद्धा, परमोच्च सुख देईल असा विकल्प आहे. प्रणयामुळे प्रेमी युगुलातला अनुबंध वृद्धींगत होत जातो. ती एकमेकांना सर्वात निकटतम नेणारी प्रक्रिया आहे. प्रणय, प्रेमींना अनिर्बंध होऊन एकमेकांना आपल्या साथीदारासमोर, केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही, सर्वस्वी विवस्त्र करु शकणारी महत्तम घटना आहे. उत्तम प्रणयी नातं असलेल्या युगुलाचं वैवाहिकच नव्हे तर इतर जीवनही तृप्त आणि मजेचं होतं. त्यांच्यातला संघर्ष न्यूनतम होतो. प्रणय ही एकमेव घटना दोघांना समत्त्वात आणून आनंद देते म्हणून तर त्याला सम-भोग म्हटलंय.

पॉर्नमधल्या फँटसीजनी पाट्या टाकणं कमी करण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. एकमेकात प्रेम असेल तर प्रत्येक प्रणय हा दरवेळी, एकमेकांच्या संगतीनं फुलवलेला महोत्सव असतो. तो इतका प्रत्यक्ष आणि उत्कट असतो की त्याला कोणत्याही फँटसीची गरज नसते. तो फँटसीच्या कित्येक पटीनं सुखद असतो.

बाकी टक्केवारी कुठून काढली, काय-कसं हे काही विचारत नाही.

अनुभवाला टक्केवारी लागत नाही, तो सिद्धच असतो. चुकीच्या कल्पनांना प्रॉप्सची गरज असते.

मजा आली तरीही निरुपयोगी, हे कसं हे मला समजलं नाही. सांगितलं नाहीत तरीही चालेल

आता इतकं सांगितलंय तर हे सुद्धा सांगतो. एखादे वेळी प्रत्यक्ष प्रणयाची शक्यता नसेल त्या वेळी टाइमपास म्हणून पॉर्न पाहाणं मजेचं आहे इतकंच. पण पॉर्न पाहून प्रणयाची मजा घेता येत नाही, ते काल्पनिक मैथुन आहे. आणि ज्यांना खरा प्रणय कळला (जे पाट्या टाकत नाहीत) त्यांना तर एकमेकांचा सहवासच ऐनवेळी इतकं काही सुचवून जातो की त्यांच्यासाठी पॉर्न आणि फँटसीज निरर्थक आहेत.

संदीप डांगे's picture

24 Jan 2016 - 10:25 pm | संदीप डांगे

जियो मेरे लाल! शब्दा शब्दाशी सहमत!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jan 2016 - 11:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रणय कितीही फुलवायचा म्हटला तरी वया बियाचं काही गोष्ट आहे की नै ? वय वर्ष ३० चा प्रणय, वय वर्ष ४५ चा प्रणय, वय वर्ष ५५ चा प्रणय, वयवर्ष ७० चा प्रणय, इच्छा लाख असल्या तरी परिस्थिती, मानसिक अवस्था, शारीरिक अवस्था , याचा काही विचार करायला नको ?

-दिलीप बिरुटे

संदीप डांगे's picture

24 Jan 2016 - 11:30 pm | संदीप डांगे

ज्यांना खरा प्रणय कळला

प्राडॉ., क्या आप ये मिस कर गये...?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jan 2016 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रणय ज्यांना कळलाय त्यांच्यासाठी काही प्रश्न नाही आणि प्रश्न नसतो पण प्रणय कळला आहे, म्हणून पॉर्न पाहु नये असं कही असतं का ? फायदा तोटा हा दुसरा भाग आहे, इतकेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

विवेक ठाकूर's picture

24 Jan 2016 - 11:32 pm | विवेक ठाकूर

जर सुरूवातीपासून आपल्या जोडीदाराशी मनमोकळी रिलेशनशीप असेल तर वयानुरूप सगळ्या फँटसीज तुम्ही उपभोगलेल्या असतात. त्यामुळे पॉर्न पाहून तुम्हाला काही जगावेगळं मिळत किंवा सुचत नाही .

वाढत्या वयाबरोबर प्रणयाचे रंग आणखी गहिरे होत जातात. त्यातला ओढण्याचा भाग तर केंव्हाच शून्य झालेला असतो. एकमेकाला सांभाळत, आत्तापर्यंत भोगलेल्या आयुष्यात मिळालेल्या एकमेकांच्या साथीप्रती कृतज्ञ होत रंगवलेला प्रणय हा पॉर्नसारख्या उथळ गोष्टीत चित्रित सुद्धा होऊ शकत नाही . तो तुमचा अत्यंत व्यक्तिगत अनुभव असतो .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jan 2016 - 10:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रबंध लिहू नका. असा विषय आला की तुम्ही लिहायला आवरत नाही. थांबा आता. :)

-दिलीप बिरुटे

विवेक ठाकूर's picture

25 Jan 2016 - 11:50 am | विवेक ठाकूर

तुम्ही पटलं नाही म्हणालात म्हणून स्पष्टीकरण दिलं. पिक्चर पाहून काल्पनिक आनंद मिळतो पण खरा आनंद कृतीत असतो इतका उघड मुद्दा आहे. तस्मात, पिक्चर पाहू नये असं नाही, तो प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न व्यर्थ आहे, ते होणे नाही.

प्रभाकर पेठकर's picture

25 Jan 2016 - 11:50 am | प्रभाकर पेठकर

डॉक्टरसाहेब,

'प्रणय' आणि 'शरीरसंबंध' ह्या दोन वेगळ्याअवस्था आहेत. एक मानसिक आहे तर दुसरी शारीरीक आहे. दोघांच्याही इच्छेने, संमतीने ह्या दोन्हीं अवस्थांचा संगम घडून येतो तेंव्हा एक आनंददायी 'संभोग' घडून येतो. अन्यथा तो 'बलात्कार' असतो.
संमतीच्या 'शारीरीक संबंधां'मध्ये, वयाचे बंधन नक्कीच असते.

'प्रणयामध्ये' वयाचे बंधन नसते. ७०+ वयातही, पतीने पत्नीसाठी वेणी/गजरा आणणे (जमत असल्यास माळणे) आणि पत्नीने पतीसाठी जेवायचे थांबणे, पतीच्या आवडीचे ४ पदार्थ मुद्दाम कष्ट करून स्वहस्ते बनविणे ह्यातुन 'प्रणय' आकार घेत असतो. हे निव्वळ एक उदाहरण आहे. अशा अनेक गोष्टी असतात प्रणय फुलविण्याच्या.

संदीप डांगे's picture

25 Jan 2016 - 12:00 pm | संदीप डांगे

अगदी अगदी. नेमक्या शब्दात पकडलं आहे. इथे बहुधा 'शरिरसंबंध' ह्या एकाच गोष्टीवर चर्चा चालू असण्याने विविध पैलुंची सरमिसळ होत आहे असे वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jan 2016 - 5:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रणयाबद्दल हे सगळे रोमँटिक सिद्धांत मला अमान्य नाहीत. फक्त कधीकधी थिअरी आणि प्रॅक्टीस यांच्यात फरक असतो. तो फरक असण्याचं कारण मनुष्य म्हणजे यंत्र नाही; ठराविक सिद्धांत मांडला आणि तो उच्च आहे म्हणून आयुष्य तसंच चालतं असं नाही.

बाकी ठीकच.

विवेक ठाकूर's picture

25 Jan 2016 - 10:04 am | विवेक ठाकूर

फक्त कधीकधी थिअरी आणि प्रॅक्टीस यांच्यात फरक असतो. तो फरक असण्याचं कारण मनुष्य म्हणजे यंत्र नाही; ठराविक सिद्धांत मांडला आणि तो उच्च आहे म्हणून आयुष्य तसंच चालतं असं नाही.

प्रणयात थिअरी कमी आणि प्रॅक्टीस जास्त म्हत्त्वाची आहे. पॉर्नमुळे यंत्रवत (म्हणजे पाट्या टाकणार्‍या) युगुलाला शून्य फायदा आहे. कारण प्रॅक्टीसच जमत नाही त्यांना काल्पनिक मैथुनाचा काय उपयोग?

सिद्धांत उच्च नाही, तो सोपा, वास्तविक आणि आचरणात आणून प्रणयाची खुमारी वाढवणारा आहे. माणूस यंत्र नाही म्हणूनच तर स्वतःच्या कल्पनेनं तो स्वतःचं प्रणय विश्व निर्माण करु शकतो. त्याला पॉर्न, म्हणजे दुसर्‍यानं दाखवलेलं काल्पनिक विश्व, काही कामाचं नाही.

प्रभाकर पेठकर's picture

25 Jan 2016 - 11:54 am | प्रभाकर पेठकर

त्याला पॉर्न, म्हणजे दुसर्‍यानं दाखवलेलं काल्पनिक विश्व, काही कामाचं नाही.

१०० % सहमत.

सुबोध खरे's picture

25 Jan 2016 - 1:31 pm | सुबोध खरे

प्रतिसाद लांब लचक होत आहे. यास्तव एक वेगळा धागा काढत आहे.

विवेक ठाकूर's picture

25 Jan 2016 - 2:21 pm | विवेक ठाकूर

.

Anand More's picture

27 Feb 2016 - 1:00 pm | Anand More

सहमत 100% सहमत...

कवितानागेश's picture

23 Jan 2016 - 2:48 pm | कवितानागेश

प्रतिसाद आवडला.
वेळ मिळाला कि उत्तरे लिहीन तिथे जाऊन.

खटासि खट's picture

22 Jan 2016 - 12:26 am | खटासि खट

सर्व्हेचे निकाल बापट गुर्जींच्या हस्ते प्रकाशित होणार का ?

प्रणित's picture

22 Jan 2016 - 6:46 am | प्रणित

फॉर्म भरला

चिन्मना's picture

22 Jan 2016 - 7:50 am | चिन्मना

फॉर्म भरला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Jan 2016 - 7:08 pm | निनाद मुक्काम प...

फॉर्म भरला

प्रतिक कुलकर्णी's picture

22 Jan 2016 - 11:30 pm | प्रतिक कुलकर्णी

फॉर्म भरला.

खटासि खट's picture

23 Jan 2016 - 1:37 pm | खटासि खट

असा सर्व्हे होणं हे देखील पॉर्न पाहणे हे विशेष काही तरी आहे या समजुतीतून होतंय बहुधा. हे सुद्धा एक प्रकारचं मनोरंजन आहे हे एकदा मान्य झालं, त्याबद्दल खुलेपणा आला की पॉर्न पाहणे म्हणजे चोरी केली किंवा तत्सम काहीतरी ही भावना कमी झाली तर काय बरं काय वाईट याबद्दलची जागृती सुद्धा होईल.

कुणाला काय आवडतं, कुणाची फँटसी काय आहे ही अगदी वैयक्तिक आहे. एखादी स्त्री पॉर्न पाहते म्हणजे ती फालतू असणार किंवा एखादा पुरूष सहकारी पॉर्न पाहतो म्हणजे तो बलात्कारी असू शकतो असली खुळचट मतं अजून आपल्याकडे आहेत. ज्याचा त्याचा वैयक्तिक चॉईस मान्य करण्याइतकी प्रगल्भता आपल्याकडे उजाडेल तो सुदिन. (बीफ खाण्याबद्दल नाही , पॉर्न बद्दल चाललंय ).

यशोधरा's picture

23 Jan 2016 - 2:50 pm | यशोधरा

सहमत.

शैलेन्द्र's picture

23 Jan 2016 - 2:49 pm | शैलेन्द्र

मस्तय सगळंच

कवितानागेश's picture

23 Jan 2016 - 3:12 pm | कवितानागेश

पोर्न एकदा उत्सुकता म्हणून पाहिल्यावर पुन्हा बघण्याची मला स्वतः ला गरज वाटली नाही. पण प्रत्येकाची लैंगिक गरज वेगळी असते , शिवाय ती काळाप्रमाणे बदलूही शकते. पण बर्याच लोकांची ती गरज जर पोर्न मुळे भागणार असेल तर लैंगिक शोषणाचे प्रमाण कमी व्हावे अशी अपेक्षा आहे. या सर्वेक्षणात, पॉर्नचा लैंगिक भूकेवर कसा परिणाम अनुभवता , उददीपित होते कि शमते, हा प्रश्न असावा असेसुचवते.

अनंत छंदी's picture

23 Jan 2016 - 8:56 pm | अनंत छंदी

फॉर्म भरला.

साती's picture

23 Jan 2016 - 10:17 pm | साती

भाग घेतला.
पण ३५-५४ वाल्यांना एकाच वयोगटात टाकणे पटले नाही.
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jan 2016 - 7:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

असं म्हणणारी तू दुसरी. मला स्वतःला पोक्त म्हणवायचं होतं म्हणून ३५-५४ हा एकच गट केला. ;-)

खरंतर पॉर्न बघणं आणि वय यांचा संबंध कसा असेल याबद्दल माझी काहीच थिअरी नाही; साधारणपणे तरुण लोक अधिक बघत असतील, मध्यमवयीन लोक जरा कमी, उतारवयाचे आणखी कमी असा अंदाज आहे. पण त्यात नक्की वयपरत्त्वे कसे तुकडे करावेत याबद्दल काहीच अंदाज नाही.

ऋत्विका's picture

24 Jan 2016 - 12:59 am | ऋत्विका

महत्वाच्या विषयावरील सर्वेक्षण आहे. कितीही मर्यादीत असलं तरीही.
भाग घेतला.

खटपट्या's picture

24 Jan 2016 - 8:56 am | खटपट्या

फोर्म भरला हो.

काकासाहेब केंजळे's picture

24 Jan 2016 - 8:02 pm | काकासाहेब केंजळे

प्रत्यक्षात ज्या प्रकारचे लैंगिक व्यवहार करता तशाच
प्रकारचं पॉर्न वाचता/बघता का? /Do you consume the
same kind of porn that you practice in real life? *

हा प्रश्न उलटा हवा होता, ज्या प्रकारचे पोर्न प्रत्यक्ष बघता तश्या प्रकारच्या कामक्रिडा स्वतंच्या लैगिक जीवनात करता का?
आमचा एक मित्र पॉर्नमधिल प्रकार प्रत्यक्ष सेक्स् लाईफमध्ये करायचा ,त्याची बायको या प्रकाराने घाबरली व त्याला सोडून आता माहेरी राहते.हा अँगलही प्रश्न मालिकेत असायला हवा होता.

विवेक ठाकूर's picture

24 Jan 2016 - 10:23 pm | विवेक ठाकूर

पॉर्न आणि फँटसीज पाहून वैवाहिक जीवनाची वाट लागण्याची शक्यताच जास्त आहे.

नया है वह's picture

25 Jan 2016 - 4:06 pm | नया है वह

.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jan 2016 - 5:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे माझा बायस आड येतो. किंवा कोणतीही सज्ञान व्यक्ती आपापले निर्णय घ्यायला स्वतंत्र असते, हा विचार आड येतो. अमेरिकन स्त्रीवादी लेखनात ज्यांचा उल्लेख प्रो-सेक्स किंवा अँटी-अँटी-पॉर्न असा करतात; मी साधारण त्या विचारांची आहे.

पॉर्न या प्रकारामुळे नुकसान होतं, व्यसन लागतं, अनिच्छेने पॉर्न बघायला लावलं जातं अशा प्रकारच्या बातम्या, समज-अपसमज, ओळखीतल्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टी समजत असतात. पॉर्नमध्ये काम करणाऱ्या लोकांचं शोषण होतं, पॉर्न हा वेश्याव्यवसायच आहे, लहान मुलांना त्यात वापरलं जातं अशी शोषणाची निरनिराळी, सत्यासत्य परिमाणंही पॉर्नला आहेत.

तरीही, बहुतांश लोक सभ्य, सज्जन असतात; समाजाचे नीतीनियम पाळणारे असतात; पॉर्न ही ननैतिक गोष्ट आहे तर लपूनछपून बघणारे असतात; असा माझा समज आहे. हा समज ग्राह्य आहे का नाही, हे तपासण्याच्या अनेक पद्धती असतील. मला फक्त पॉर्नचं व्यसन किती लोकांना लागतं, लोकांना जे बघायला हवं असतं ते मिळतं का असा मर्यादित आवाका सध्या तपासायचा आहे. या प्रश्नावलीचा उद्देश कोणालाही जोखणं असा नाही; त्यामुळे व्हीजाच्या फॉर्म्सवर असतात तशा प्रकारचे प्रश्न - तुम्ही दिवाणी/फौजदारी गुन्ह्यात सहभाग घेतला होता का? - या प्रश्नावलीत नाहीत.

हे सर्वेक्षण परिपूर्ण नाही, त्याची कारणं काय आहेत याची मला काही-किंचित जाणीव आहे. करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी यात करता आल्या असत्या, ज्या विचार करताना मला सुचल्याही होत्या. पण सर्व्हेची लांबी, लोकांना त्यात किती वेळ घालवावा लागेल, त्यामुळे लोक उत्तरं देण्याचा कंटाळा करतील का, मला स्वतःला किती झेपेल असा विचार करता माझ्या मनात असलेल्या गोष्टीही मी सोडून दिल्या.

पॉर्नबद्दल सगळी माहिती जमवायची असा उत्तम, उदात्त पण असाध्य हेतू या सर्वेक्षणामागे नाही.

मला फक्त पॉर्नचं व्यसन किती लोकांना लागतं, लोकांना जे बघायला हवं असतं ते मिळतं का असा मर्यादित आवाका सध्या तपासायचा आहे.

पॉर्नचं व्यसन लागलेल्या व्यक्तीची, कल्पनेतच रमल्यामुळे, वास्तविकाशी फारकत होते आणि खर्‍या सेक्सलाइफची वाट लागते. तस्मात, पॉर्नच्या आहारी जाणं अयोग्य आहे. शिवाय `जे बघायला हवं असतं ते मिळतं का?' याचा विदा जमवून काय उपयोग ? कारण असा पुरवठा करणं एकतर बेकायदा आहे आणि दुसरं म्हणजे ते व्यक्तीला पॉर्न पाहायला उद्युक्त करणारं आहे त्यामुळे अयोग्य आहे.

प्रभाकर पेठकर's picture

25 Jan 2016 - 12:11 pm | प्रभाकर पेठकर

पॉर्न पाहण्याची इच्छा आणि व्यसन तारूण्यावस्थेत, लग्ना आधी जास्त असतं. मुख्य कारण शारीरिक गरजेची आक्रमकता हे असावं, असं मला वाटतं. लग्ना नंतर २-३ वर्षे सहचारीणीसमवेत पाहण्याची इच्छा 'एक वेगळा अनुभव' असतो म्हणून असू शकते. बाकी पुढे पॉर्नची गरज भासत नाही. वास्तवातच खरे सुख आहे हा विचार बळावलेला असतो. अपरिपक्व वयातून परिपक्व वयात पदार्पण वगैरे गोष्टींचा प्रभाव असतो. मध्यम वयात पॉर्न पाहण्याची इच्छाही मालवलेली असते तर थोड्याफार प्रमाणात त्या गोष्टीला (पॉर्न पाहणे) विकृत मानण्याकडे ओढा वळतो तर उतार वयात कित्येकांना, शरीर साथ देत नसल्याने, उद्दीपनासाठी पॉर्नचा आधार (एक औषध म्हणून) घ्यावा लागतो किंवा घ्यावासा वाटतो.

गामा पैलवान's picture

26 Jan 2016 - 8:16 pm | गामा पैलवान

विवेक ठाकूर,

खऱ्या सेक्स लाईफचे वाट लागते या विधानाशी दणदणीत सहमती आहे. एक ज्वलंत उदाहरण म्हणजे जपान. तिथे तरुण लोकं एकतर लग्न करताच नाहीत. आणि दुसरं म्हणजे सेक्समधला रस झपाट्याने कमी होत चाललाय. पॉर्नच्या व्यसनामुळे जोडीदारासंगे आनंद अनुभवणे ही कल्पना कालबाह्य झाली आहे. एका लेखात नेमकी समस्या वर्णन करणारं एक वाक्य सापडलं :

>> .... one man in his early 30s, a virgin, who can't get sexually aroused
>> unless he watches female robots ....

पॉर्नच्या अनिर्बंध व्यसनामुळे ही समस्या उत्पन्न झाली आहे. वरील उदाहरण प्रातिनिधिक आहे. परिस्थिती इतकी टोकास गेलीये की पुरूष पॉर्नस्टार लोकांना कामाचा अतिताण पडतोय. आता बोला!

आ.न.,
-गा.पै.

मारवा's picture

25 Jan 2016 - 1:06 pm | मारवा

वैराग्यपुर्ण आयुष्य हीच मोक्षाची गुरुकील्ली
कामवासना हा रिपु आहे षडरिपुंपैकी एक आहे. शत्रु आहे.
याचा नायनाट करण्याचे सामर्थ्य केवळ वैराग्यातच आहे.
आणि काम मोठा बलवान रिपु आहे
दर्शन मात्रे मन कामना "स्फुरती" असे कामाचे स्वरुप आहे.
चर्चे मात्र मन कामना भडकती असे कामाचे स्वरुप आहे.
मी वैराग्याचा मार्ग अंगिकारल्याने इथल्या चर्चेत प्रतिसाद देत नाही.
कारण सतत प्रतिसाद देण सतत त्या "विषया" ची चर्चा करण्ं
हे "विषयाधीन" होण्याच सुस्पष्ट लक्षण आहे.
खरा वैराग्यपुर्ण "जितेंद्र" केवळ माझ्यासारखा
एखादाच प्रतिसाद बुडती हे जन देखवे ना डोळा या आणि केवळ याच
उदात्त भावनेतुन देत असतो.
बाकीचे डुप्लीकेट वैरागी सतत सतत चर्चे कडे वळतात.
आ.न.मा.
कॉ.रा.गा.पै.

पैसा's picture

25 Jan 2016 - 1:19 pm | पैसा

=)) =)) मेले मेले! फक्त त्या कॉ रा ची फोड काय आहे तेवढं सांगून जावा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jan 2016 - 2:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

कॉ.रा.गा.पै. = काँग्रेस, राजद... आसाच आसनार, पन ते गा. पै. जल्ला काय हाय तेची फोड करा पैल्याछूट ? ;) =)) =))

मारवा's picture

25 Jan 2016 - 3:16 pm | मारवा

मी या धाग्यावर येणार नव्हतो मला अजिबात या वैषयीक चर्चेत रस नाही
मला ही चर्चा मुळीच चिघळवायची नाही
तरी गैरसमज नको उगाच म्हणुन
कॉ. रा. गा. पै.
म्हणजे कॉपी राइट गामा पैलवान असे वाचावे.
मुळ "कल्पना" गा.पै. यांची आहे मी ती पळवली यावर खवळुन पैलवान मला एखाद "धोबीपछाड" देउन धुवुन
काढु नये या भीतीने मी आदर पुर्वक त्यांच्या कॉपीराइट चा उल्लेख आवर्जुन केलेला आहे.
आपला नम्र मारवा
कॉपी राइट गामा पैलवान
असे वाचावे
जाता जाता द्वितीय प्रतिसादाप्रीत्यर्थ एक प्रायश्चिताची प्रार्थना म्हणुन जातो
सुसंगती सदा घडो
सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो
"विषय" सर्वथा नावडो
जय गुरुदेव

गामा पैलवान's picture

25 Jan 2016 - 9:17 pm | गामा पैलवान

मारवा,

>> मुळ "कल्पना" गा.पै. यांची आहे

काय सांगताय! कुठे सापडले हे अस्मादिकांचे वचनमौक्तिक?

आ.न.,
-गा.पै.

मी तुमची स्वाक्षरी ची मुळ कल्पना जी तुम्ही आ.न.गा.पै. नेहमी वापरता. वरील प्रतिसादात वापरली
आ.न.मा. आपला नम्र मारवा अशी
तर तुमची स्वाक्षरी कल्पना वापरली म्हणुन
कॉपीराइट गामापैलवान चा शॉर्टकट पण जोडला कॉ.रा.गा.पै.
इतकचं....

गामा पैलवान's picture

26 Jan 2016 - 12:35 pm | गामा पैलवान

मारवा, फक्त स्वाक्षरीच वापरली होय. आ.न. हे तर पारंपारिक संबोधन आहे! तरीपण मला श्रेय दिल्याबद्दल धन्यवाद! फुकंटचें श्रेयं कुणांस नकों बरें? ;-)
आ.न.,
-गा.पै.

एस's picture

25 Jan 2016 - 3:28 pm | एस

बादवे, तात्यांचा एक फार जुना धागा आठवला. रामदास यांनी लिहिलेली कथा तात्यांनी इथे टंकली होती (रामदासांच्या पूर्वपरवानगीनेच अर्थात). तिथेही असेच सर्वज्ञ प्रतिसाद आले होते. असो.

कंजूस's picture

25 Jan 2016 - 3:32 pm | कंजूस

वळतं पण कळत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Jan 2016 - 2:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

विठामाऊली, तुम्ही सर्वज्ञ आहात याबद्दल मला काहीही शंका नाही. पण सेक्सॉलॉजी या विषयात मूलगामी संशोधन करणाऱ्या; सामान्य अमेरिकन जनतेला, प्रेम कसं करतात हे ज्यांनी शिकवलं असं म्हटलं जातं त्या, मास्टर्स आणि जॉन्सन यांच्यावर माझा अधिक विश्वास आहे. त्याबद्दल मला माफ करा.

पुन्हा एकदा, मास्टर्स आणि जॉन्सन यांच्याच शब्दांत -

"Sexual topics are often controversial and value-laden, but the controversy is often relative to time, place, and circumstance. What is labeled as "moral" or "right" varies from culture to culture, from century to century. Many of the moral issues pertaining to sex relate to certain religious traditions, but religion has no monopoly or morality. People who have no closely held religious creed are just as likely to be moral as those whose values are tied to a religious position. There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable."

From - Sex and Human Loving
Authors - William H. Masters, Virginia E. Johnson, Robert C. Kolodny.
Publishers - Little, Brown and Company.
Page No 10.

तिरपा ठसा मूळ लेखकांचाच.

टवाळ कार्टा's picture

26 Jan 2016 - 3:51 pm | टवाळ कार्टा

फॉर्म भरलेला आहे*

*या वाक्याचा फक्त पहिलाच अर्थ इथे विचारात घेतला जावा :)

सुबोध खरे's picture

26 Jan 2016 - 8:36 pm | सुबोध खरे

12 percent of all Internet websites are pornographic.
25 percent of all online search engine requests are related to sex. That’s about 68 million requests per day.
35 percent of all Internet downloads are pornographic.
40 million Americans are regular visitors (in their own estimation) to porn sites.
70 percent of men aged 18 to 24 visit a porn site at least once per month.
The average age of first exposure to Internet porn is 11.
The largest consumer group of Internet porn is men aged 35 to 49.
One-third of all Internet porn users are female.
The most popular day of the week for watching porn is Sunday.
हि अमेरिकन सांख्यिकी आहे. परंतु भारतात इंटर नेट उपलब्ध असलेल्या लोकांमध्ये हीच सांख्यिकी थोड्याफार प्रमाणात सत्य असावी.

विवेक ठाकूर's picture

26 Feb 2016 - 11:40 pm | विवेक ठाकूर

तरी काही फरक पडणार नाही !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Feb 2016 - 12:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमचा प्रतिसाद तुमच्यासाठी किती योग्य आहे हे मला शब्दांत सांगता येणार नाही, विठामाऊली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2016 - 2:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धागा वर काढण्यासाठी प्रतिसाद.

आत्तापर्यंत सर्वेक्षणात भाग घेतला नसल्यास जरूर भाग घ्यावा ही विनंती.

जातवेद's picture

26 Feb 2016 - 2:55 pm | जातवेद

आम्हाला वाटलं निकाल आला ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2016 - 11:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यासाठी बहुदा मे महिना उजाडेल. ३१ मार्चपर्यंत फॉर्म भरता येईल. अॅडमिशन त्यानंतर. ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2016 - 12:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उगं हेलपाटा झाला मला. :(

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

27 Feb 2016 - 2:09 pm | मुक्त विहारि

१००

तर्राट जोकर's picture

27 Feb 2016 - 2:20 pm | तर्राट जोकर

धाग्याचे शंभर पण सर्वेचे किती...?

मुक्त विहारि's picture

27 Feb 2016 - 2:25 pm | मुक्त विहारि

मे मध्ये समजेलच.

आम्ही, निकाल वाचायला घाबरत नाही....

तर्राट जोकर's picture

27 Feb 2016 - 2:43 pm | तर्राट जोकर

=))

रंगीला रतन's picture

13 Aug 2023 - 10:25 pm | रंगीला रतन

भारीच!