कळसुबाई शिखर

जगप्रवासी's picture
जगप्रवासी in भटकंती
20 Jan 2016 - 7:04 pm

गेल्या विकटगडाचा चांगला अनुभव आल्यामुळे शिवशौर्य ग्रुप सोबत हरिहर गड आणि कळसुबाई ट्रेक करायचा नक्की केलं. ऑनलाईन पैसे भरून नोंदणी करून ट्रेक च्या दिवसाची वाट पाहत होतो, काय काय घ्यावे ह्याची पूर्ण लिस्ट साईट वर दिलेली असताना पण पहिलाच "स्टे ट्रेक" असल्यामुळे अतिउत्साहात जास्त वस्तू ब्यागेत भरल्या. ठरल्या दिवशी संध्याकाळी बस मध्ये बसून हरिहर गडाला जायला निघालो. बस मध्ये काही ओळखीचे चेहरे दिसले त्यांच्यासोबत गेल्या ट्रेक च्या आठवणी निघाल्या. नाशिकच्या मुंबई नाक्यावर ट्रेक लीडर योगेश शिरसाट बस मध्ये चढला, सोबत अजून एक दोघे होते. रात्री ३ वाजता एका आश्रमात पोचलो, तिथे थोडा वेळ आराम करून सकाळी हरिहर गडासाठी निघणार होतो.

https://lh3.googleusercontent.com/-AaGB7RNKF6c/Vi3FHHi8J-I/AAAAAAAAO3g/mrmrX7CJKjc/s640-Ic42/IMG_4368.jpg
आश्रम

https://lh3.googleusercontent.com/-qDbhUIJz2TM/Vi3E4q3QIRI/AAAAAAAAO2g/jtkhCYlmoKQ/s512-Ic42/IMG_4359.jpg
आश्रमाच्या आवारातील मारुतीराया

https://lh3.googleusercontent.com/-pw29YPa89N0/Vi3FJ5poIDI/AAAAAAAAO3w/RDO54dHDwTA/s640-Ic42/IMG_4369.jpg

सकाळी ६ वाजता ट्रेक लिडरच्या शिटीने जाग आली तर सर्वात शेवटी उठणारा मीच असल्यामुळे थोडस शरमल्यासारख झाल. मग पटापट आन्हिक उरकून ब्याग भरून ठेवली, आणि ग्रुप च्या सदस्यांनी केलेला फक्कड चहा घेतला. ट्रेक लीडरने सर्वाना सूचना दिल्या, नवीन ओळखी झाल्या.

https://lh3.googleusercontent.com/-d69XxZuth38/Vi3FOgyRJxI/AAAAAAAAO4M/WAyT59PQnao/s640-Ic42/IMG_4373.jpg

https://lh3.googleusercontent.com/-HpHAiKvqBpA/Vi3Fp-f1boI/AAAAAAAAO6s/YZSs9Wf94Bg/s640-Ic42/IMG_4392.jpg
हरिहर गड मागच्या बाजूने

हरिहर गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, ते नेढ, वरून दिसणारा अप्रतिम नजारा डोळ्यात साठवत फिरत होतो. ग्रुपचा नाशिक मधील एक सदस्य क्रिकेट मैच सोडून सर्वांसाठी गरम गरम पुलाव घेऊन आला होता. दोघांच्या खांद्यावर ५० लोकांच जेवण होत आणि इतका गड चढून आले होते. त्यांना कोपरापासून हात जोडले, कारण इतक गरम जेवण ब्यागेत भरून चालण म्हणजे तव पाठीवर घेऊन चालण्यासारख होत. सर्व गड फिरून झाल्यावर उतरताना रोप लावून उतरलो. चढताना पायाऱ्याकडे तोंड करून चढल्यामुळे त्या सरळसोट पायऱ्या धोकादायक वाटल्या नव्हत्या, पण आता उतरताना ती उंची बघून ……… कपाळात आल्या होत्या.

https://lh3.googleusercontent.com/-ynapSQUq0FQ/Vi3GFcV7gEI/AAAAAAAAO9Y/b6lQRD7Fw1w/s512-Ic42/IMG_4413.jpg
कातळ पायऱ्या ज्याकरता हा ट्रेक करावा

गड उतरताना एक ग्रुप फोटो काढण्याच्या नादात रस्ता चुकून दुसऱ्या रस्त्याने गावात उतरला. ट्रेक लीडरने तिथल्या तिथे त्यांची कान उघडणी केली, आणि पुढच्या ट्रेक साठी सूचना दिल्या. बसमध्ये बसून आता कळसुबाई साठी चाललो होतो, एका गावातल्या बोर्ड वर लिहील होत "कळसुबाई माता मंदिर" तर चुकून आम्ही त्या गावात शिरलो. विचारल्यावर कळलं कि आम्हाला पुढच्या बारी गावात जायचं होत. मग परत बस फिरवून एकदाच मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. जेवून लवकर झोपी गेलो कारण सकाळी लवकर उठून ट्रेकला लवकर सुरुवात करायची होती.

थोड्या चालीतच आम्ही बऱ्यापैकी उंचीवर पोचलो होतो. चढत असताना एका ठिकाणी थांबून लिंबू सरबत पियालो. लिंबू सरबताने अशी काही एनर्जी आली की डायरेक्ट शिडीजवळ येउन थांबलो. आता पायऱ्या आणि शिड्यांची वाट होती. बऱ्यापैकी थंडावा आणि धुकं होत. शेवटच्या टप्प्यावर येताना एका टपरीवजा दुकानात ग्रुपचे काही मेंबर कांदा भजीवर ताव मारताना दिसले मग काय आक्रमण, मनसोक्त हादडून झाल्यावर समोरच असलेल्या विहिरीतून थंड बर्फासारख पाणी पियालो. त्या पाण्याची चव खूपच छान होती. वरती जाऊन कळसुबाईच दर्शन घेतलं, तिची खणा-नारळाने ओटी भरली.

https://lh3.googleusercontent.com/--aYsyrclVKA/VjC62yVg0fI/AAAAAAAAQIg/7FKEIB96jaM/s512-Ic42/IMG_20151025_102234.jpg
कळसुबाई माता प्रसन्न

वरून दिसणारा नजारा

ग्रुप मध्ये (नवीन) लग्न झालेले आमचे जोडपे असल्यामुळे आमच्याकडून मातेची ग्रुपकडून ओटी भरली. नंतर माझ्या बायकोला उखाण्यासाठी सगळ्यांनी पिडलं, म्हटलं माझ्यावर पण हे सरकणार म्हणून थोडस मागे मागे जात होतो. बायकोचा उखाणा संपताच ज्याची भीती होती तेच झाल मला उखाणा घ्यायला सांगितलं मग काय रहाणेचा उखाणा घेऊन सर्वांची वाहवा मिळवली. नशीब ग्रुप मधले कोणी होम मिनिस्टर बघणारे नव्हते नाहीतर काय खर नव्हत. प्रत्येक ट्रेकला अशा काही न काही गोष्टी घडतात की तो ट्रेक चांगलाच आठवणीत राहील.

ओटी भरून झाल्यावर देवीची आरती केली, ग्रुप मधील शार्दुलने प्रतिज्ञा म्हटली. ग्रुप मधील एका मुलाचा त्याच दिवशी वाढदिवस होता, हरिहर गडावर पाय लचकल्यामुळे तो खरतर कळसुबाई ट्रेक करणार नव्हता पण फोनवरून वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे सावकाश चालत त्याने ट्रेक पूर्ण केला. प्रतिज्ञा झाल्यावर त्याने महाराजांवर एक छानसा पोवाडा गाऊन दाखवला. सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवस इतक्या चांगल्या ठिकाणी साजरा झाल्यामुळे तो खूप खुश होता.

उतरताना ग्रुप मधील सौरभच आणि माझ लदाख प्रेम सारखच असल्यामुळे त्याच्याशी चांगली गट्टी जमली. येताना लदाखचा प्लान केला, कस जायचं कुठे थांबायचं अस बोलण चालू होत. नंतर निवांत भेटून प्लानिंग करू अस ठरवून ट्रेक ची सांगता केली.

यावेळेला फोटो खूपच कमी काढले त्याबद्दल माफी असावी.

जगप्रवासी

प्रतिक्रिया

शान्तिप्रिय's picture

20 Jan 2016 - 7:22 pm | शान्तिप्रिय

जगप्रवासीजी,
सुन्दर लेखन. लग्नानन्तर लगेचच अशा सुंदर ठिकाणी
जायचे भाग्य मिळाले तुम्हाला. छान!
सर्व फोटो उत्तम. वर्णनही छान केले आहे.
आपल्या लग्नाबद्दल खुप खुप शुभेछा !

हरिहर चा ट्रेक मस्तच आहे, उतरताना एकदम मजा येते.

आटोपशीर आणि छान लेख.

पद्मावति's picture

20 Jan 2016 - 10:56 pm | पद्मावति

खूप छान लेख. आवडला.

प्रचेतस's picture

21 Jan 2016 - 7:19 am | प्रचेतस

लेख सुरु होईपर्यंतच संपला. अजुन वर्णन आणि छायाचित्रे हवी होती.

जगप्रवासी's picture

21 Jan 2016 - 12:55 pm | जगप्रवासी

यावेळेला फोटो खूप कमी काढले. खर सांगायचं झाल तर माझ्या ड्रिम दोन ट्रेक पैकी कळसुबाई हा एक ट्रेक. त्यामुळे खुप हवेत होतो आणि फोटो काढायचे राहून गेले. दुसरा ड्रिम ट्रेक म्हणजे हरिश्चंद्रगड तो पण नळीच्या वाटेने करायचा आहे. बघू एक स्वप्न पूर्ण झालंय दुसर कधी होतंय ते.

ओह्ह ओके, नवीन लग्न झालंय तर!! इथे पण घ्या बघू एक उखाणा!! =))

यशोधरा's picture

21 Jan 2016 - 8:48 pm | यशोधरा

हो, हो. घ्याच आणि तो रहाणेवाला रिपीट नका करु!

मदनबाण's picture

22 Jan 2016 - 7:10 pm | मदनबाण

मस्त....

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peas

किसन शिंदे's picture

22 Jan 2016 - 8:09 pm | किसन शिंदे

भारी! हरिहरला पुन्हा एकदा जायचे आहे.

एक एकटा एकटाच's picture

23 Jan 2016 - 5:20 am | एक एकटा एकटाच

मस्त

पैसा's picture

23 Jan 2016 - 2:38 pm | पैसा

अजून लिहा!

कळसुबाईला साखळी ओढलीत का? ;)

जगप्रवासी's picture

27 Jan 2016 - 12:22 pm | जगप्रवासी

अस म्हणतात कि ती साखळी एका दमात ओढली तर लग्न पटकन जमते पण माझ ऑलरेडी झाल असल्यामुळे बायकोने ओढू नाही दिली.

यशोधरा ताई:
शिवरायांचा भक्त मी,
कळसुबाई देवीला वंदन करतो वाकून,
आदितीच नाव घेतो,
लाडक्या मिपाचा मान राखून……

यशोधरा's picture

27 Jan 2016 - 12:23 pm | यशोधरा

मस्त! :)

नीलमोहर's picture

27 Jan 2016 - 12:29 pm | नीलमोहर

उखाणा एकदम भारी :)

नाखु's picture

28 Jan 2016 - 5:38 pm | नाखु

म्हणतात (अस्सल) ट्रेकरचा उ़खाणा...

बाकी सारा खकाणा !!!!

अवांतर : वर्णन आणि प्रचि नेम्के आणि छान आहे.

जगप्रवासी's picture

28 Jan 2016 - 11:36 am | जगप्रवासी

सर्व वाचकांचे धन्यवाद