कार्टी काळजात घुसली

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
17 Jan 2016 - 3:52 pm

कार्टी काळजात घुसली (मराठी नाटक)

प्रशांत दामले fan फाउंडेशन या नावाने निर्मात्या सौ गौरी प्रशांत दामले या नवीन नाटक घेऊन आल्या असून एक उत्तम प्रयत्न असे या नाटकाचे वर्णन करता येईल.वसंत सबनीस हे या नाटकाचे लेखक असून मंगेश कदम यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी उचललेली आहे.होणार सून मधली जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान या नाटकात मुख्य स्त्री भूमिकेत असून नाटक म्हणजे एखाद्या मालिकेसारख (वेळकाढू) प्रकरण नसून एक लाइव्ह अभिनय प्रकरण आहे हे समजून-उमजून तिने प्रशांतजींना समर्थपणे साथ दिलेली आहे.

कहाणी:
कार्टी काळजात घुसली म्हणजे बापापासून दुरावलेल्या एका मुलीची कथा जी आपल्या आई वडिलांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करते. वास्तविक बघता तेजश्री प्रधान हि नाटकात नायिका आहे असे म्हटल्यावर तिची आणि प्रशांतजींची जोडी कशी जमवली असेल याबाबत प्रेक्षकांना उत्कंठा वाटणे साहजिक आहे. पण लेखक वसंत सबनीस यांनी हि उत्कंठा पुरेपूर शमवली असून पहिल्या पंधरा मिनिटातच उत्तर मिळते प्रेक्षकांना.

अभिनय:
नाटकाभीनयाचे जागतिक विक्रमकर्ता प्रशांत दामले हे संगीतकार के के आणि तेजश्री प्रधान हि त्यांची मुलगी कांचन यांच्या भूमिकेत असून त्या दोघांनी आपापल्या भूमिकेसोबत पूर्ण न्याय केलेला आहे.

प्रशांत दामले यांच्या केके चा उल्लेख विशेष करून त्यांच्या विनोदाच्या टायमिंग साठी. मान्य कि नाटक लिखित संहितेत असते पण तरीही त्यातील विनोदाला लाइव्ह प्रेक्षकांसमोर उभा करणे कथेतील विनोदाच्या टायमिंग न चुकू देता आणि नाटकाचा मूळ विषय बघता मुळातील गंभीरतेच्या गाभ्याला धक्का न लागू देता हे मुख्य अभिनेत्यासाठी निश्चितच कौतुकास्पद. प्रशांतजींचे कांचनसोबतचे काही प्रसंग हे कथेला पुढे सरकवण्यासाठी भावनात्मकदृष्ट्या आव्हानात्मक होते. ते हि त्यांनी अप्रतिम रित्या निभावून नेलेत. म्हणजे एकच व्यक्ती तीन तासांच्या तुटपुंज्या वेळात रंगमंचावर लाइव्ह प्रेक्षकांसमोर भावनात्मक (इमोशनल) प्रसंग निभावतो आणि संहितेतील विनोदाच्या फोडणीलाही पुरून उरतो हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि याच सोबत काही प्रसंगात प्रेक्षकांना त्यांच्या गायनकलेचेही दर्शन घडते.

तेजश्री प्रधान हिने रंगवलेली भूमिका म्हणजे कांचन. १८ वर्षांपासून वडलांपासून दुरावलेली एक मुलगी जेंव्हा परत आपल्या वडिलांना भेटते तेंव्हाची एका मुलीची दोलायमान मन:स्थिती तेजश्रीने अप्रतिम रित्या उभी केलेली आहे. काही प्रसंगात तिची भूमिका कथेला पुढे नेण्यासाठी एक सपोर्ट इतकीच मर्यादित आहे तर काही प्रसंग पूर्ण तिच्या भूमिकेच्या गांभीर्यावर उभे आहेत पण सांगण्यास कौतुक कि तिने समर्थपणे सगळे प्रसंग तोलले आणि निभावून नेलेले आहेत. होणार सून मधल्या जान्हवीमुळे तिला घरोघरी प्रसिद्धी मिळाली पण या नाटकामुळे तिला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळेल.

कोणत्याही नाटकात पटकथा एक महत्वाची भूमिका बजावते. या नाटकात भावनात्मक प्रसंग उभे करण्यात पटकथा आणि संवाद लेखक कमी पडले अशी शंका प्रेक्षकांना बाहेर निघताना येते. अर्थात व्यक्ती-दरव्यक्ती आकलन करण्याचा फरक असल्यामुळे असेल कदाचित पण मला असे वाटले म्हणून मी या नाटकाला प्रशांतजी आणि तेजश्री दोघांच्या अभिनयासाठी साडे तीन [३ १/२]* दिन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रेखाटनसमीक्षा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Jan 2016 - 6:20 pm | मुक्त विहारि

एकदा पाहण्यासारखे.

दिपक.कुवेत's picture

17 Jan 2016 - 6:22 pm | दिपक.कुवेत

भारतवारीत नक्कि पाहणार.

नाटकाची छान ओळख करून दिलीत.

पैसा's picture

17 Jan 2016 - 8:38 pm | पैसा

छान ओळख. या कथेवर आधारित सचिनचा एखादा सिनेमा आहे काय?

समीर_happy go lucky's picture

17 Jan 2016 - 10:14 pm | समीर_happy go lucky

असेल तर माहित नाही

प्रवास's picture

17 Jan 2016 - 10:38 pm | प्रवास

याच कथेवर आधारित सचिनचा "एकुलती एक" नावाचा सिनेमा आहे.

खेडूत's picture

17 Jan 2016 - 9:55 pm | खेडूत

सुंदर नाटक आहे.

जुन्या संचात स्वाती चिट्णीस यांचं पाहिलंय. तरी हे पहाणार.

भाते's picture

18 Jan 2016 - 1:55 pm | भाते

या नाटकाच्या पहिल्या संचात विक्रम गोखले आणि सविता प्रभुणे हे कलाकार होते. त्यानंतर मोहन जोशी आणि स्वाती चिटणीस या कलाकारांचे नाटक रंगभुमीवर आले. आणि आता प्रशांत दामले आणि तेजश्री प्रधान यांचे. मोहन जोशी आणि स्वाती चिटणीस यांचे नाटक मागे तुनळी वर पाहिले होते. नाटक छान आहे. एकदा नाटकाचा विषय समजल्यावर पुन्हा नवीन कलाकारांसाठी हे नाटक पाहिले गेले नाही.

अभिजित - १'s picture

18 Jan 2016 - 2:29 pm | अभिजित - १

दामले हे खरोखर फक्त " दाम ले " आहेत. कोणाला काही देणे त्यांच्या स्वभावात नाही. ठीक आहे . असतो एकेकच स्वभाव . पण मग फुकटचा मोठेपणा घ्याची चोर गिरी करू नये. या माणसाच्या सगळ्या नाटकावर बहिष्कार टाकायला पाहिजे खरे तर.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/konkan-yuva-pr...
‘ती’ मदत ‘कोकण युवा प्रतिष्ठान’चीच!

दामले - 'महाराष्ट्र टाइम्स'च्या गुरुवार, २० ऑगस्टच्या अंकात 'सामाजिक देण्यातून कमाईचे घेणे' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीतील माहिती निखालस खोटी असल्याचा खुलासा निर्माते प्रशांत दामले यांनी केला आहे.
सत्य - मेसेज आहे साक्षीला...
बुधवारी प्रशांत दामले यांनी व्हाटसअॅपवरून पाठवलेल्या उपरोक्त मेसेजमध्ये 'कार्टी..'ने समाजाचे देणे लक्षात घेऊन २५ हजारांची मदत केली, हे अधोरेखित करताना ही मदत 'कोकण युवा प्रतिष्ठानने' केल्याचा अजिबात उल्लेख न करता आपण ही मदत केल्याचे चलाखीने भासवले आहे. दुसऱ्याने दिलेल्या 'सामाजिक देण्या'तून स्वतःच्या 'कमाईचे घेणे' आहे ते हेच. वृत्तातील १ लाख ७० हजार हा आकडा खोटा असल्याचे दामले म्हणत असले तरी नाट्यव्यवसायातील कोणताही व्यवहार लेखी होत नाही, हे सर्वज्ञात आहे.

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2016 - 2:33 pm | श्रीगुरुजी

काही महिन्यांपूर्वीच हे नाटक पाहिले. नाटक बरे आहे. तेजश्री प्रधान २१ वर्षांची न वाटता बर्‍यापैकी मोठी वाटते. ही भूमिका तिच्याऐवजी मृण्मयी देशपांडेने जास्त चांगली केली असती असे माझे वैयक्तिक मत.

अभिजित - १'s picture

18 Jan 2016 - 2:35 pm | अभिजित - १

'मटा'कडे पाठवलेल्या पत्रात प्रशांत दामले म्हणतात, 'ठाकुर्लीच्या मातृकृपा इमारतीच्या दुर्घटनेत जखमी व मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी कोकण युवा प्रतिष्ठानतर्फेच 'कार्टी काळजात घुसली'चा प्रयोग १८ ऑगस्ट रोजी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. ज्या संस्थेने हा प्रयोग घेतला त्यांना ४०० रुपयाच्या तिकीटदराबाबत विनंतीपत्र निर्माता संघास देण्याबाबत सांगितल्यावर त्यांनी तसे पत्र दिले होते. उरला प्रश्न मी मदत करण्याचा, तर माझ्या सहकाऱ्यांचे मानधन न देता त्यांचे पैसे 'मदत' म्हणून मी कसा काय देऊ शकतो? आमचे मुळातच १० ते १५ प्रयोग होतात. रोज हातावर पोट असणाऱ्यांना मानधन न देणे हे अन्यायकारक आहे. कलावंतांच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. कोणतीही नाट्यसंस्था 'खर्च वजा जाता' याच पद्धतीने मदत करत असते.'

दामले आणि "जान्हवी" प्रधान यांचे हातावर पोट !! कमाल आहे.

आणि पैसे देऊ शकत नाही तर मग फुकट चा मोठेपणा मात्र बारा घेता येतो.

समीर_happy go lucky's picture

21 Jan 2016 - 10:26 pm | समीर_happy go lucky

सगळ्यांचे धन्यवाद