गूढ आणि हटके ग्रह - हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो !!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
15 Jan 2016 - 6:10 pm
गाभा: 

नऊ ग्रह आणि त्यांचे कुंडलीतील स्थान व त्यानुसार फलित याबद्दल सखोल ज्ञान ज्योतिष शास्त्रात उपलब्ध आहे. पण, त्या तुलनेत हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो या तीन गूढ आणि हटके गुणधर्म असलेल्या ग्रहांबद्दल कमी माहिती उपलब्ध आहे असे वाटते. तसेच, त्यांच्या कारकत्वा बद्दल सुद्धा ज्योतिष्यां मध्ये संभ्रम आढळतो. कुणी जाणकार ज्याने या तीन ग्रहांच्या गुणधर्माचा, कारकत्वाचा आणि स्थान निहाय फळाचा बारकाईने अभ्यास केला आहे, त्याने येथे आपले ज्ञान येथे वाटावे. फल ज्योतिष अभ्यासक मंडळीना त्याचा नक्की ज्ञान वाढवण्यास उपयोग होईल. नेपच्यून हा अंतरस्फुर्ती आणि स्वप्नांद्वारे दृष्टांत देणारा ग्रह आहे का? तो प्रथम स्थानात असेल तर काय? वगैरे असे अनेक प्रश्न मनात आहेत.गूढ आणि हटके ग्रह - हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो !!

प्रतिक्रिया

गूढ आणि हटके लेख. फारच आवडला.

ss

या चित्रातील युरेनस म्हणजे तुम्ही उल्लेख केलेला हर्षल आहे का?

हे चित्र जुने आहे त्यामुळे त्यात प्लुटो ग्रह म्हणून दाखवला आहे. मात्र १९३० साली क्लायडे टॉमबाघने शोधलेल्या या ग्रहाला खगोलशास्र आता ग्रह समजत नाही तर त्याला नेपच्युनच्या पलिकडे असलेल्या "कुईपर पट्टयाचा" भाग समजतात. अर्थात हे सारे वादग्रस्त आहे. अधिक माहिती इथे वाचता येईल.

मुद्दा असा आहे की प्लुटोचे ग्रह असणे हेच मुळात वादग्रस्त प्रकरण आहे तर त्याचे कारकत्व कसे ठरवणार?

प्रचेतस's picture

15 Jan 2016 - 9:11 pm | प्रचेतस

युरेनसचा वेध पहिल्यांदा ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्शल ह्याणे १७८१ साली घेतला म्हणून ह्यास हर्शल म्हणतात.
बाकी प्लुटो हा ग्रह सध्या 'खुजा ग्रह' (ड्वार्फ प्लॅनेट) ह्या परिभाषेत गणला जातो. रूढार्थाने तो ग्रह होत नाही.

होबासराव's picture

15 Jan 2016 - 6:37 pm | होबासराव

ढॅण टॅ ढॅण ::))
टि टि री टि टि री टिट.

आवो बच्चो णिसो सर से कहानी सुनोगे :))

**मानवाच्या आयुष्याचा असा कुठलाहि पैलु नाहि ज्याला णिसो क्लब आपल्या ओघवत्या तरीहि प्रचंड खोलि असलेल्या लेखनशैलितुन मांडु नाहि शकत.

**मानव :- सरळ 'माणुस' हा शब्द वापरण्या ऐवजी सोनबा ने मानव असा उल्लेख केला, म्हणजे आता ह्याचे झाले सुरु आता ४ डोसेच काय ह्याच्या समोर अक्खा उडुपी आणुन बसवा हा थांबणार नाहि.

जव्हेरगंज's picture

18 Jan 2016 - 7:52 pm | जव्हेरगंज

खिक्क!

मूकवाचक's picture

15 Jan 2016 - 6:45 pm | मूकवाचक

=))

आनन्दा's picture

15 Jan 2016 - 9:04 pm | आनन्दा

माझ्या माहितीनुसार -
हर्षल हा वैचित्र्याचा कारक आहे, तर नेपच्युन हा गूढत्वाचा कारक आहे.
परंतु नेपच्युन ने बिघडलेला शुक्र फारच गमतीदार फळे देतो हे मात्र खरे.

कंजूस's picture

15 Jan 2016 - 9:50 pm | कंजूस

कसेही ग्रह लावा कुंडलीमैदानावर पण आमचं प्राक्तन बदला--सामान्य माणूस.

अशाच सुसंगत प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत!!

एक - सुसंगत प्रतिक्रिया आणि त्यातून वाहावत जाणाऱ्या विसंगतीकडे जाणाऱ्या प्रतिक्रिया
दोन - पूर्णपणे विसंगत प्रतिक्रिया
तीन - पूर्णपणे सुसंगत प्रतिक्रिया

ज्या त्या विभागात ज्याने त्याने जी ती प्रतिक्रिया लिहिली तर वाचकांना आणि चर्चा विषय लेखकाला सोपे जाईल.

जर वेळच वेळ आणि विनोद हवा असेल तर "एक" आणि "दोन" वाचायला हरकत नाही.
अन्यथा "तीन"

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2016 - 6:50 am | अत्रुप्त आत्मा

संपादकांनी लेखांचे तीन विभाग करावे. :-)

लेखक होनार- Fri, 15/01/2016 - 22:48

एक - सुसंगत लेख आणि त्यातून वजा होत जाणाऱ्या विसंगत प्रतिक्रिया
दोन - पूर्णपणे विसंगत लेख
तीन - पूर्णपणे सुसंगत लेख

ज्या त्या विभागात ज्याने त्याने जे ते लेख लिहिले तर मिपाकरांना आणि चर्चा विषय लेखकाला सोपे जातील.

जर वेळच वेळ आणि विनोद हवा असेल तर "दोन" वाचायला हरकत नाही.
अन्यथा "एक आणि तीन "

(पैकी आज आपण "दोन" वाचू! )

गामा पैलवान's picture

15 Jan 2016 - 11:03 pm | गामा पैलवान

लोकहो,

प्लुटोच्या ग्रहत्वाचा विषय निघाला आहेच तर माझी रिक्षा फिरवून घेतो. चंद्रास पृथ्वीचा उपग्रह मानावं का? : http://www.maayboli.com/node/41662?page=1#comment-2609387 (मुद्दा क्रमांक २)

आ.न.,
-गा.पै.

संपादन द्या प्रतिसादांस आत्ता काढतो.

उपयोजक's picture

16 Jan 2016 - 2:01 pm | उपयोजक

द्वितीयेतला हर्षल त्या व्यक्तीला खुप फटकळपणा देतो.

उपयोजक's picture

16 Jan 2016 - 4:55 pm | उपयोजक

शिवाय त्याच घरात जोडीला मंगळ ग्रह किंवा द्वितीयेश मंगळ असेल तर आगीत तेल!

तिमा's picture

16 Jan 2016 - 7:57 pm | तिमा

@केअशु,

षष्ठात रवि, बुध, शुक्राबरोबर हर्षल असेल तर काय फळ देतो ?

कवितानागेश's picture

16 Jan 2016 - 10:51 pm | कवितानागेश

काटेरी फणस देतो! :ड

सूड's picture

18 Jan 2016 - 7:46 pm | सूड

कापा की बरका?

उपयोजक's picture

17 Jan 2016 - 7:11 pm | उपयोजक

म.दा. भटांचे हर्षल नेपच्युन प्लुटो वाचा.

तिमा's picture

19 Jan 2016 - 9:53 pm | तिमा

ते वाचलंय हो! पण तुमचा अनुभव कदाचित जास्त प्रकाश टाकेल म्हणून विचारलं. जाऊ द्या.

नितीनचंद्र's picture

20 Jan 2016 - 7:52 am | नितीनचंद्र

नेपच्युन जर लग्नस्थानी असेल आणि लग्नेश जर भाग्यात किंवा पंचमात असेल तर व्यक्तीमत्व गुढ असेल. स्वरुपानम्द स्वामी- पावस यांची पत्रीका पाहिल्यास जाणवेल. स्वातंत्र्य सैनीक असताना त्यांची अध्याम साधनाही चालु होती.

प्रदीप साळुंखे's picture

21 Jan 2016 - 7:25 pm | प्रदीप साळुंखे

जौदे,भारत काय सुधारणार नाही असं वाटतय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jan 2016 - 9:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

सूर्यमालेत प्लूटोपलिकडे अजून दोन ग्रह आहेत असा खगोलशास्त्रज्ञांना संशय आहे...

मिस्टिरिअस प्लॅनेट X आणि Y.

...आता यांचं काय करायचं ?

प्रचेतस's picture

21 Jan 2016 - 9:37 pm | प्रचेतस

अहो तेच ते राहु, केतू.

होबासराव's picture

22 Jan 2016 - 4:42 pm | होबासराव

अमासाक टाईम भेटला त म्हतल पाहुनच घ्याव का ओपन ले काय आल तर्..पुन्हा ५५ चि जुट फेकलि राजा ह्यान.
णिसो सर जरा गनित मांडुन सांगता काय क्लोज ले काय फेकल त..मांगल्ले ३ दिवसात दोनदा मेंढी अन एकदा लंगडा आलता...णिसो सर जरा पाह्यजा बर कुंडलिच गनित मांडुन..