तुम्ही आमची गळाभेट घ्या,आम्ही तुमचे गळे कापतो!

DEADPOOL's picture
DEADPOOL in काथ्याकूट
3 Jan 2016 - 6:42 pm
गाभा: 

माननीय पंतप्रधान नमो यांना दंडवत!
आपण जेव्हा सत्तेत आलात तेव्हा आमच्या मुखावर एकच नारा होता.
बघा आता कशी पाकिस्तानांची जिरवतिल!
आपण अफगणिस्तानला भेट दिली तरी आम्ही आवडून घेतलं.कारण आम्हाला पठाणामध्ये काबुलीवाला अजूनही दिसतो.
आपण तसेच पाकिस्तानात गेलात मात्र हे खटकले,कारण शेजारी जरी असला, तरी:

आतां मज लोक सुखें निंदा अक्रु । म्हणती विचारु सांडियेला ॥१॥
होय तो कारण करावा विचार । काय भडीभार करुं देवा ॥२॥
तुका म्हणे काय करुं लापणिक । जनाचार सुख नाशवंत ॥३॥

याप्रमाणेच आम्ही विचार केला. आणि आपल्या भक्तांपैकी काहींचे मौलिक विचार ऐकून आम्हीही मनाची समजूत घालून घेतली.
आता काही अतिरेक्यांनी आमच्यावर हल्ला केला. आपले काही भक्त याचेही उत्तर देतील.
नमो एकच उत्तर द्या, अजून किती शहीद हवे आहेत?
बाकी आपली डिप्लोमसी चालू द्या!

आपलाच:
deadp

प्रतिक्रिया

DEADPOOL's picture

3 Jan 2016 - 8:14 pm | DEADPOOL

प्रस्तुत ओवी ही तुकाराम महाराज यांची आहे!

मोगा's picture

3 Jan 2016 - 9:15 pm | मोगा

आमच्या काँग्रेसच्या काळात असं व्हायचं तेंव्हा जनता किती टीका करायची.

आता सगळे लबाड संघिष्ट तोंड मिटून बसलेत.

बोका-ए-आझम's picture

4 Jan 2016 - 3:15 pm | बोका-ए-आझम

कधीपासून?

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Jan 2016 - 8:50 am | कैलासवासी सोन्याबापु

डेडपूल,

प्रथमतः डिप्लोमेसी ही काँग्रेस काळात वेगळी अन आता वेगळी आहे हा समज काढून टाका ती एकच लाइन वर आहे अगदी लुक ईस्ट पॉलिसी किंवा आत्ता ची एक्ट ईस्ट पॉलिसी ही विदेशनिती जी ९१ मधे तयार झाली त्याचा एक सबसेट आहे तसेच उदारीकरण अन सब्सिडी कमी करत जाणे हे सुद्धा १९९१ च्या "रावसिंह परिमाणावर(च)" आधारित आहे त्याला माननीय अटलजी ह्यांनी किंवा आत्ता श्रीयुत मोदी ह्यांनी सुद्धा ढलका लावलेला नाही , फ़क्त काँग्रेस काळात ही परिमाणे पाऊल पाऊल realize केली जात होती अन काळाची गरज म्हणुन आत्ताचे सरकार त्या दिशेने धावत आहे इतकेच,

उरतो पठानकोट हल्ल्याचा प्रश्न तर गृहमंत्री राजनाथ सिंह ह्यांचे निषेधाचे स्टेटमेंट ऐकल्यास त्यांनी पुर्ण दोष हा "पाकिस्तानी सैन्य" अन आयएसआयला दिलाय, थोडक्यात पाकिस्तानी राज्यकर्त्यांस आर्मी खिजगणतीतही मोजत नाही हे फॅक्ट परत एकदा पुढे आले आहे अन हा हल्ला किंवा मज़ार ए शरीफ मधील वकिलाती वर केलेला गोळीबार हा फ़क्त आपले भारत विरोधवार पोसलेले अस्तित्व दाखवून द्यायचा पाकिस्तान आर्मी अन आयएसआय चा एक डेस्परेट प्रयत्न वाटतो

साती's picture

4 Jan 2016 - 11:18 am | साती

दुसरा परिच्छेद पूर्ण पटला.
पहिला परिच्छेदही पटला मात्र काळाची गरज म्हणूनच केवळ सरकार धावतेय हे पटले नाही.
असो. मूळ धाग्याचा विषय दुसर्‍या परिच्छेदात आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Jan 2016 - 11:59 am | कैलासवासी सोन्याबापु

काय नाही पटले ते सांगा प्लीज, पटेल असे उत्तर देण्याचा प्रयत्न करु आम्ही नक्कीच.

संदीप डांगे's picture

4 Jan 2016 - 12:53 pm | संदीप डांगे

+१००

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Jan 2016 - 1:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

+१०० कोनाले देऊ राहले गाववाले? आमाले का साती जी ले!! मह लेक कंफ्यूजन होऊ रायलते ना!!

संदीप डांगे's picture

4 Jan 2016 - 2:14 pm | संदीप डांगे

तुम्हालेच ना बापा... तुमचा परतीसाद मंजे बंदुकीच्या गोयाच हायेत निरा... सुसाट आन् निशान्यावरच!

गृहमंत्री राजनाथ सिंह ह्यांचे निषेधाचे स्टेटमेंट ऐकल्यास त्यांनी पुर्ण दोष हा "पाकिस्तानी सैन्य" अन आयएसआयला दिलाय,>>>>>>>>
बापू मग हाही दुट्प्पीपणाच झाला!

बोका-ए-आझम's picture

4 Jan 2016 - 5:00 pm | बोका-ए-आझम

हे आणखी एक वाचा -

जागता पहारा

Friday, January 1, 2016

पठाणकोट हल्ल्याची पार्श्वभूमी

आज पहाटे पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर जिहादी अतिरेक्यांनी हल्ला केला. पाचपैकी चार हल्लेखोर ठार झाले व त्या कारवाईत दोन भारतीय सैनिकही शहीद झाले. एक घातपाती जखमी अवस्थेत सापडला. असा हल्ला झाला, मग तात्काळ सुरक्षा वा गुप्तचरांच्या कामात ढिलाई झाल्याचा सरसकट आरोप सुरू होतो. आजही तसेच झाले तर नवल नाही. कारण जीभ उचलून टाळ्याला वा ओढांना लावली, मग विविध शब्द उच्चारले जात असतात. पण त्याचे नेमके अर्थ बोलणार्‍याला कळतातच असे नसते. मग अशा दिवट्यांना सुरक्षा वा गोपनीयता कशासाठी असते वा तिला कुठून कसा धोका असतो, त्याची अक्कल असायचे काही कारण नसते. पठाणकोट हल्ल्याच्या ज्या बातम्या ब्रेकिंग न्युज म्हणून झळकत होत्या, त्यात सातत्याने टेक्निकल क्षेत्राला धक्का लागलेला नाही, असे सांगितले जात होते. परंतु हे टेक्निकल क्षेत्र म्हणजे काय? तर जिथे लढावू विमाने उभी वा सज्ज करून ठेवलेली असतात, असे अतिशय सुरक्षित क्षेत्र असते. हल्लेखोर त्यालाच लक्ष्य करायला आले असणार, हे वेगळे सांगायला नको. पण प्रचंड विस्तार असलेल्या या तळावर हे सुरक्षित क्षेत्र नेमके कुठे आहे, त्याची माहिती हल्लेखोरांना होती, ही खरी बातमी आहे. अन्यथा आजवर अनेक पोलिस ठाणी वा लष्करी तळावर असे हल्ले झालेले आहेत. पठाणकोटचा हल्ला नेमके लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून झालेला होता. म्हणजेच त्या हल्ल्याची योजना आखणार्‍यांपाशी हवाई तळाचा बारीकसारीक तपशील उपलब्ध होता. म्हणूनच इतका लक्ष्यवेधी हल्ला होऊ शकला. सुदैवाने ठरल्या लक्ष्यापर्यंत जिहादी पोहोचू शकले नाहीत. पण ते सुदैव होते की तशी प्रतिकारक सज्जता होती, म्हणून तो हल्ला हाणून पाडण्यात यश आले? उहापोह त्याचा व्हायला हवा किंवा करायला हवा. नुसतेच हवेत बुडबुडे उडवण्याने मनोरंजन होईल. पण साध्य काहीच होणार नाही.

पठाणकोटच का? हल्लेखोरांनी हेच लक्ष्य कशाला निवडले, इथून उहापोह सुरू होतो. हल्ला करणार्‍यांना नेमकी माहिती असल्याशिवाय अशा जागी हल्ला करता येत नाही. म्हणजेच पंजाबमध्ये असलेल्या अनेक लष्करी वा हवाई तळांपैकी पठाणकोट निवडण्याचे कारण तिथली संगतवार माहिती हल्लेखोरांकडे होती. मग ती माहिती त्यांना कधी, कोणी व कशी पुरवली, ही खरी बित्तंबातमी असू शकते. पण नेमकी माहिती असूनही हल्ला फ़सला, म्हणजेच हल्ल्याची शक्यताही तितकीच गृहीत धरून सज्जता राखलेली असणार ना? तर त्याची सुरूवात दोन वर्षापुर्वी झालेली होती. सुशीलकुमार हे नाव आजच्या बातम्यांमध्ये कुठे कानी आले नाही. कोण हा सुशीलकुमार? पठाणकोटच्या याच हवाई तळावरचा एक कर्मचारी सुशीलकुमार याला तब्बल दोन वर्षापुर्वी एका महिलेने सोशल माध्यमातून गाठले. त्या माध्यमातून मैत्री करताना ही महिला त्याच्याशी खुप सलगीने बोलू लागली आणि नंतर त्याच्याकडून माहिती मिळवू लागली. याच तळावरील सायबर सेलची दक्षता सज्ज होती म्हणून सुशीलकुमार व त्या महिलेच्या सोशल माध्यमातील देवाणघेवाणीवर पाळत ठेवली गेली. तो परस्पर या मैत्रिणीला तळावरची गोपनीय माहिती देत असल्याचे उघडकीस आल्यावर स्थानिक पोलिसांना कल्पना देवून सुशीलकुमारला अटक करण्यात आली. कालपरवा असाच एक हवाई दल कर्मचारी रणजित याला अटक झाली होती. त्याला संरक्षण विषयक एका मासिकाची संपादिका म्हणून ब्रिटीश महिलेने आपल्या जाळ्यात ओढले होते. सुशीलकुमारला असेच जाळ्यात ओढून माहिती काढली जात होती. या सुशीलकुमारने तिला पठाणकोट तळाची महत्वपुर्ण माहिती दिली होती. त्यानंतरच त्याला आत्काळ अटक करण्यात आलेली होती. जुलै २०१४ मध्ये त्याला पकडले आणि आज इतक्या महिन्यांनी तिथेच हल्ला झाला.

कुठल्याही लष्करी वा हवाई तळावर महत्वाच्या जागा गोपनीय असतात. आधुनिक काळात असे तळ हे एकप्रकारचे किल्लेच असतात. त्या किल्ल्यातल्या अतिशय मोक्याच्या जागा म्हणजे बालेकिल्ला असतो. तशा जागांवर हल्ला केला, मग त्या तळाची भेदकता व सुरक्षा संपुष्टात येत असते. म्हणूनच अशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न शत्रू करतो. सुशीलकुमार वा रणजित या हवाई दल कर्मचार्‍यांकडून नेमकी तशीच माहिती मिळवण्याचे प्रयत्न झाले होते. त्यापैकी कुठली माहिती दिली गेली त्याचीही कल्पना भारतीय यंत्रणांना होती. म्हणून अशा जागी हल्ला होण्याची शक्यता गृहित धरलेली असते. किंबहूना दिली गेलेली माहिती वापरली जाऊ नये, म्हणून असलेल्या रचना व सज्जता यात निर्णायक फ़ेरबदल केले जात असतात. बाकी हल्ला टाळणे आपल्या हाती नसते. कारण हल्ल्याची वेळ व जागा शत्रू ठरवित असतो. पण त्यात कुठलेही मोठे नुकसान होऊ नये, याची काळजी घेणे आपल्या हाती असते. इथेही नेमकी तीच सज्जता असल्याचे दिसून आलेले आहे. आकस्मिक हल्ला करूनही पाचपैकी एकही हल्लेखोर महत्वाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकला नाही, किंवा कुठलेही मोठे नुकसान यात होऊ शकले नाही. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. याला गुप्तचर खात्याचे अपयश म्हणता येणार नाही. तर पुरेपुर सज्जता म्हणता येणार नाही. दोन दिवस आधी गुरदासपूर येथील पोलिस अधिकार्‍याचे अपहरण करण्याचे नाट्य रंगलेले होते. अशा काही किरकोळ घटना गेले काही दिवस सातत्याने घडत आहेत आणि त्याची तुलना मोदींच्या लाहोर भेटीशी करता येणार नाही. मुत्सद्देगिरी आणि गुप्तचरांनी परस्परांना शह देण्याच्या कारवाया यात सांगड घालणे अशक्य कोटीतली गोष्ट असते. मात्र ज्या गतीने पठाणकोटचा हल्ला झालेला आहे, त्यातून पाक गुप्तचरांच्या हवालदिल होण्याचे संकेत नक्की मिळतात.

सुशीलकुमार वा रणजितला पकडल्यामुळे त्यांना माहिती देणारे नेटवर्क उध्वस्त होत असते. पण त्याच कालखंडात पाकिस्त्तानात अकस्मात भारताच्या पंतप्रधानांनी भेट देण्याची घटना निर्णायक काटशह आहे. पाकचे सेनाप्रमुखच नव्हेत तर गुप्तचर खातेही मोदींच्या लाहोर भेटीविषयी गाफ़ील राहिले. किंबहूना आपल्याला संपुर्ण गाफ़ील ठेवून नवाज शरीफ़ यांनी मोदींना पाकिस्तानात येऊ देतात, याचा पाक गुप्तचर व सेनादलाला धक्का बसलेला आहे. ते नुसते पंतप्रधान मोदींचे धाडस नाही किंवा भारत-पाक संबंधातील महत्वाचे पाऊल नव्हे. भारतीय मुत्सद्देगिरीने आणि गुप्तचर खात्याने पाक सुरक्षा व्यवस्थेला व घातपाती डावपेचांना दिलेला मोठा शह आहे. त्यानंतर पाक गुप्तचर वा भारतद्वेषी सेनाधिकारी मंडळींनी निमूट पराभव मान्य करण्याची अपेक्षा कोणी बाळगू शकत नाही. आजही आपण भारताला शत्रूच मानतो आणि शरीफ़शी दोस्ती केल्याने घातपात थांबणार नाहीत, असे कोणी शब्दात सांगणार नाही. किंबहूना पंतप्रधान शरीफ़ म्हणजे पाकिस्तान नव्हे. त्यांच्याशी संगनमत केल्याने पाकिस्तान निमूट बसेल अशा समजूतीत राहू नका, असे सांगण्याचा हा मार्ग आहे. पाकिस्तान शरीफ़ चालवत नाहीत तर तिथली सेना व गुप्तचर विभाग यांची हुकूमत चालते, हा पठाणकोट हल्यातला खरा संदेश आहे. हा सावल्यांचा खेळ समजून घेता आला तर अकस्मात मोदी लाहोरला कशाला गेले आणि त्यातून काय साधले गेले, त्याला अर्थ लागू शकेल. पण तेवढे करायला आजच्या ब्रेकिंगन्युज पत्रकारितेला वेळ वा संयम आहेच कुठे? ज्यांना मोदींचे धाडस वा त्यातून साधलेला डावपेच समजू शकत नाही, त्यांना पठाणकोट हल्ल्याचे रहस्य कधीच उलगडू शकत नाही. दोन देशात कुठला डाव वा जीवघेणा खेळ चालू आहे, त्याचा थांगपत्ता लागू शकत नाही. त्याच्या खोलात गेले तर पठाणकोटचा हल्ला किरकोळ असल्याचे लक्षात येईल. नाहीतर आणखी एक अतिरेकी हल्ला यापेक्षा त्याला विशेष महत्व नाही. (अपुर्ण)

- भाऊ तोरसेकर

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Jan 2016 - 5:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

भाऊ तोरसेकर ह्यांच्याविषयी तितकेसे चांगले मत नाही बोक्या भाऊ माझे तरी, त्यात त्यांना ही शिवसेना शैली सुट करत नाही ओढूनताणुन आवेश जाणवतो लिखाणात , तरीही ह्यावेळी काही मुद्दे अन गाभ्यातला थोडा भाग पटला असे मी म्हणतच होतो तोवर मी


त्याच्या खोलात गेले तर पठाणकोटचा हल्ला किरकोळ असल्याचे लक्षात येईल. नाहीतर आणखी एक अतिरेकी हल्ला यापेक्षा त्याला विशेष महत्व नाही.

अन सपशेलच नावड़ते झाले ! विशेष महत्व नाही म्हणता म्हणता ८ माणसे गेली राव आपली, सरकार ची कातड़ी बचावण्याचा केविलवाणा प्रयत्न होऊन गेले पुर्ण लिखाण (माझ्यालेखी तरी) अजुन किती माणसे शहीद झाली म्हणजे हा हल्ला भाऊ तोरसेकरांना महत्वाचा वाटेल असे वाटते??

याॅर्कर's picture

4 Jan 2016 - 7:41 pm | याॅर्कर

(अवांतर - मी ही तोरसेकरांचे लेख आवडीने वाचायचो,पण सतत एकांगी लेखन आणि कातडीबचाऊ धोरण पाहून मलाही कंटाळा आला.)
.
.
.
.
पंजाब सरह्द्दीतून आतंकवादी आत घुसले हीच मोठी नामुष्की आहे.
पाक सरकारचा या हल्ल्याशी संबंध नाही,
तर मग पाक आर्मीवर आपण हल्ला करायला हवा.
भारत सरकार आणि पाक सरकारचे संबंध चांगले राहतीलच!
बाकि आपली आर्मी आणि त्यांची आर्मी युद्धाचं काय ते बघून घेतलीच?

सतिश गावडे's picture

4 Jan 2016 - 10:52 pm | सतिश गावडे

(अवांतर - मी ही तोरसेकरांचे लेख आवडीने वाचायचो,पण सतत एकांगी लेखन आणि कातडीबचाऊ धोरण पाहून मलाही कंटाळा आला.)

म्हणजे असे वाटणारा मी एकटा नाही तर.

राही's picture

4 Jan 2016 - 11:19 pm | राही

मलाही तोरसेकरांचे लेखन आवडत नाही. या लेखनाचे संदर्भ देण्याइतक्या योग्यतेचे ते वाटत नाही.

सोत्रि's picture

6 Jan 2016 - 3:33 pm | सोत्रि

त्यांचे लेखन आवडत नाही हे ठीक आणि रास्त मुद्दा!

पण एखाद्याची अथवा त्याच्या लेखनाची लायकी ठरवायचा हक्क असा काय मिळतो आपल्याला?
ते एक पत्रकार आहेत, अभ्यासपूर्ण लेखन असते, भले ते कोणाची तळीउचलंत असतील. अप्रत्यक्ष्रीत्या आपणही प्रत्येकजण कोणाची न् कोणाची (आपापल्या अस्मितांची) तळी उचलतच असतो ना?

कोणाच्याही लेखनाची योग्यता कशी ठरवतात?

- (कसलीच योग्यता नसलेला) सोकाजी

टीप: मी भाऊ तोरसेकरांचा भक्त नाही किंवा नातेवाईक नाही.

राही's picture

7 Jan 2016 - 9:26 am | राही

आपला 'योग्यता' या शब्दाला आक्षेप आहे असे वाटले. हा शब्द त्यांच्या लेखनाचे संदर्भ देण्यासंबंधी होता. कोणत्याही मतासाठी/विधानासाठी आधार संदर्भ द्यायचा तर तो भक्कम आणि तटस्थ हवा असा संकेत आहे. ह्या निकषाला त्यांचे लेखन माझ्या मते उतरत नाही. हे सर्व माझ्या मते आहे हे पुन्हा एकदा. योग्य आणि पात्र ह्या शब्दांतला हा वाद/संदेह/अर्थभेद असावा बहुधा.
कोणाचीही लायकी काढण्याचा हेतू कधीच नसतो. पण मतभिन्नता व्यक्त करताना त्याचे कारण सांगतानान काही शब्द वापरावे लागतात. हे स्तुती किंवा निदा/टीका या दोन्हीनाही लागू आहे.

संदीप डांगे's picture

4 Jan 2016 - 11:30 pm | संदीप डांगे

मीही.....

नाव आडनाव's picture

5 Jan 2016 - 11:51 am | नाव आडनाव

नाहीतर आणखी एक अतिरेकी हल्ला यापेक्षा त्याला विशेष महत्व नाही.
आशा आहे तोरसेकरांची योग्य त्या लोकांनी दखल घेतली असेल आणि त्यांना योग्य ते बक्षीस पण मिळालं असेल. कीव येते अश्या लोकांची ... अकलेचे दळभद्री ... बरंच लिहावं वाटतंय पण कोणाबद्दल वाईट चिंतायला नको, म्हणून टाळतो. पैसा माणसाकडून काय काय करवून घेतो ...

आशा आहे तोरसेकरांची योग्य त्या लोकांनी दखल घेतली असेल आणि त्यांना योग्य ते बक्षीस पण मिळालं असेल. कीव येते अश्या लोकांची ... अकलेचे दळभद्री ... बरंच लिहावं वाटतंय पण कोणाबद्दल वाईट चिंतायला नको, म्हणून टाळतो.

'असेल' हा तुमचा अंदाज की तुमच्याकडे तसे पुरावे आहेत?

पैसा माणसाकडून काय काय करवून घेतो

पैशाचीच दुनिया आहे ही! आणि पापी पेट का सवाल असतो म्ह्णून पैसा हवा असतो. कुणाला नको असतो??

- (पापी पेट का) सोकाजी

टीप: मी भाऊ तोरसेकरांचा भक्त नाही किंवा नातेवाईक नाही.

नाव आडनाव's picture

6 Jan 2016 - 3:53 pm | नाव आडनाव

'असेल' हा तुमचा अंदाज की तुमच्याकडे तसे पुरावे आहेत?

आशा आहे असं लिहिलं होतं.

बोका-ए-आझम's picture

5 Jan 2016 - 3:02 pm | बोका-ए-आझम

पण इथे त्यांनी मांडलेला जो मुद्दा आहे - पाकिस्तानी लष्कर हे civilian सरकारपेक्षा बलवान असल्याचा - तो महत्वाचा आहे. भाऊ तोरसेकरांनी मांडलेला असला म्हणून मुद्दा चुकीचा असं तर कुणाचं म्हणणं नाहीये ना? पाकिस्तानी लष्कराची परराष्ट्रनीती ही नेहमीच लोकशाही प्रक्रियेला आव्हान देणारी अशी आहे हा इतिहास आहे, regardless of तोरसेकर. मुळात हा मुद्दा इथे मांडायचं कारण तो मुद्दा स्वतःच आहे,फक्त तोरसेकरांच्या blog वरुन घेतलेला whatsapp forward आलाय म्हणून त्यांचं नाव घेतलं. असो.
नवाझ शरीफ मे २०१४ मध्ये मोदींच्या शपथविधीला येणार की नाही हे गुलदस्त्यात होतं कारण त्यांना सैन्याने परवानगी दिली नव्हती ही बातमी तर सगळ्यांनी वाचली असेल. कुठल्या देशाचा पंतप्रधान हा दुस-या देशाच्या भेटीसाठी लष्कराच्या परवानगीवर अवलंबून असतो?

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jan 2016 - 3:24 pm | कैलासवासी सोन्याबापु

गाववाले थुमी सोता स्वयंभु हाय न भाऊ! त्याहीनं लेख लेला थुमीनं एका पैराग्राफ मधे निपटवले ना! आजकाल त्याहीचे लेख खानं कमी अन सांडलवंड जास्त रायते (अस्सल वर्हाड़ी म्हण थुमी पकडली असन आत्तालोग)

मुद्द्यावर बोलायचे झाल्यास,

लाहोर बस सर्विस एपिसोड च्या वेळी सुद्धा शरीफ पीएम होते, नंतर कारगिल झालेच! त्यांनी शिस्तीत "मला मुशर्रफ काय करत होता माहीती नव्हते" म्हणले नंतर हे एक पाकिस्तानी व्हिसलब्लोअर म्हणाला, असे काय काय झाले त्यामुळे परत एकदा आपणाला तीच चुक करुन पहिले पाढे पंचावन करणे श्रेयस्कर नसेल असे मत पड़ते आहे म्हणुन आतातरी पाकिस्तानी एस्टेब्लिशमेंट अन पाकिस्तानी आर्मी हा फरक करणे परवडणार नाही हे माझे वैयक्तिक मत झाले आहे तुर्तास.

आनंदी गोपाळ's picture

7 Jan 2016 - 8:54 pm | आनंदी गोपाळ

पाकिस्तानी एस्टेब्लिशमेंट अन पाकिस्तानी आर्मी हा फरक करणे परवडणार नाही हे माझे वैयक्तिक मत झाले आहे तुर्तास.

एक्झॅक्टली.

पाकिस्तानी आर्मी व सरकार वेगळे आहे असे भासवत राहणे हे आपल्या भाजअपेयी माऊथपिसेसचा नाईलाज आहे. कारण ते केल्याशिवाय आपली कातडी वाचवता येत नाही.

जर पाकिस्तानात आर्मीच पॉवरफुल आहे, तर तुम्ही त्यांच्या आर्मीशीच वाटाघाटी करा ना डायरेक्ट? सत्तेत यायच्या आधी हेच लोक याच पाकिस्तानी हल्ल्यांवरून सरकारवर अश्लाघ्य शब्दांत टीका करीत असत.

मूळतः आर्मी आणि सरकार एकाच रचनेचे भाग असले तरी 'तिकडे' आर्मी आणि सरकारमधे काय हनिमून होत असतो आपण बघितले आहे. लाहोर बस सुरु झाली. मग कारगील घडलं. त्या नंतर शरीफ साहेबांची देशाबाहेर गच्छंती झाली. मग त्यांचंं पुनरागमन आणि सत्तेत येणं. यामधे जितकं पाणि वाहुन गेलं आणि नवीव घाट बांधले गेले त्यावरुन परत मासेमारी करावीच लागेल भारताला. एकाच आस्थापनामधले आंतरविरोधी घटक परक्या आस्थापनांतील समदु:खी/समपातळीवरील घटकांशी समन्वय साधुन काहि हातपाय हालवत असतील तर ते स्वाभावीक आहे.

राहिला भाग छप्पन इंची छातीचा... तर आपल्याकडे (इतरत्र देखील) शाब्दीक बुडबुडे फोडुन हवाबाजीचं राजकारण नवीन नाहि. त्याचा व्हायचा तो फायदा/नुकसान होईलच.

DEADPOOL's picture

5 Jan 2016 - 4:33 pm | DEADPOOL

ह्ये कोण आ॑णखिण?

तिमा's picture

4 Jan 2016 - 5:46 pm | तिमा

पाकिस्तानला धडा शिकवा, असे म्हणणार्‍यांना एकच प्रश्न विचारावासा वाटतो. धडा शिकवायचा म्हणजे नक्की काय करायचं?
१)त्यांच्यावर हल्ला करुन युद्ध करायचं ? युद्ध करायचे झाले तर ते स्वबळावर करावे लागेल. कुठलीही महासत्ता मधे पडणार नाही. पडलीच, तर ती पाकिस्तानच्या बाजूने असेल. युद्धाचे भीषण परिणाम सोसायचा दृढनिश्चय, सर्व भारतीय करतील का ?
२)त्यांच्या देशांत अतिरेकी कारवाया करायच्या ?

की आणखी काही ? यावर वाचायला आवडेल.

भंकस बाबा's picture

4 Jan 2016 - 6:32 pm | भंकस बाबा

पाकिस्तानच्या आर्थिक नाड़या जरी आवळल्या तरी हे साध्य होउ शकेल.
आत्ताच लोढ़ा कमिटिने दिलेल्या अहवालात क्रिकेटमधील बेटिंग अधिकृत करण्याची शिफारस केली आहे.
अधिकृत बेटिंग यूरोपियन देशात सर्रोस चालते. या एका निर्णयामुळे सरकारला उत्पन्न तर मिळेलच वर दाउद गैंगचे एक पैसा कमवायचे साधन धोक्यात येईल.
सर्वात महत्वाचे पाक कलाकाराना भारतात पूर्ण बंदी. त्याला पठानकोट हल्ल्याचे कारण देखिल दाखवता येईल. यामुळे पाक कलावन्तच पाकच्या भूमिकेचे जाहिरपणे खण्डन करतील. नो पाक अभिनेत्री , नो पाक सिंगर,

राही's picture

4 Jan 2016 - 7:34 pm | राही

कश्या काय नाड्या आवळायच्या? २०१२ सालच्या आकड्यानुसार भारत-पाकिस्तान दुतर्फा व्यापार फक्त २.५ बिलिअन डॉलर्स होता. दोघांमध्ये मिळून हा आकडा फारसा मोठा नाही. म्हणजे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल एव्हढा मोठा नाही.
पाक कलाकारांना आपल्याकडे अघोषित बंदी तर आहेच. इथे काम करणारे पाकिस्तानी कलाकर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतील. त्यातही मोठी नावे फारशी नाहीतच. क्रिकेट बेटिंग अधिकृत केल्यावर दाऊद गँगचा पैश्याचा स्रोत आटेल, पण पाकिस्तानवर फारसा परिणाम होईल असे वाटत नाही.
पाकिस्तानमधला एक मोठा गट भारतीय चित्रपट बघण्याच्या विरोधात आहे. सामान्य पाक जनता जरी चोरूनमारून ते बघत असली तरी खुले आम भारतीय चित्रपट सररास दाखवले जातील याची शक्यता कट्टरपंथीयांच्या दहशतीमुळे कमी आहे.
पाक दहशतवादामुळे भारताचे पुष्कळ नुकसान होत असले तरी इस्लामी दहशतवादाचा फटका सर्व जगाला बसतो आहे. प्रचंड जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान होते आहे. याची मुळे जागतिक राजकारण/अर्थकारणात असून जागतिक पातळीवरच याचे उपाय शोधायला हवेत.

अनएथिकल, पण हाच उपाय बरा वाट्तो!
जशास तसे!

राष्ट्रीय स्वयंसेवक सोंग ? सनातन ?

काळा पहाड's picture

6 Jan 2016 - 12:35 am | काळा पहाड

तुम्हाला पाठवू फारतर.

तुमची सोंगं तुम्हीच शोधा

इश्शं ! आम्ही तर बाई त्या साइडचे!
एकदा ठरवुन घ्या काय ते :) मोगा खान्..मोगा देशपांडे का मोगा मौसि इश्शं

नाखु's picture

6 Jan 2016 - 3:48 pm | नाखु

त्यावर बैठक-चर्चा चालू आहे (अगदी सुदूर) लाहोरात तो पर्यंत सर्व ऐका..

सुमधुर गीत..

हकीकत

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Jan 2016 - 8:04 am | अनिरुद्ध.वैद्य

तिकडले पेपर आपण जसे आयेसायच्या नावाने बोंबा मारतो तसे ते RA&W च्या नावाने ओरडत असतात.

नितिन थत्ते's picture

8 Jan 2016 - 9:22 pm | नितिन थत्ते

>>युद्धाचे भीषण परिणाम सोसायचा दृढनिश्चय, सर्व भारतीय करतील का ?

ग्यासची सबसिडी सोडा असं मोदीसरकार म्हणाले. ते सुद्धा जन्तेला जमलं/पटलं नाही

भंकस बाबा's picture

4 Jan 2016 - 9:21 pm | भंकस बाबा

पाकिस्तानी कलावंत भारतात भरपूर आहेत. जे पडद्यावर दिसतात ते नव्हे तर इतर देखिल.
पाकिस्तानला दाऊद ला सांभाळणे गरजेचे आहे कारण तो भारताचा दुष्मनच नाही तर तेथील उद्योगधंद्याचा
फायनान्सर देखिल आहे. दाउदचा करोड़ो पैसा पाकी इंडस्ट्रीत गुंतलेला आहे.
उद्या जर दाउदचे आर्थिक व्यवहार आवळले तर जी सुरक्षा आज पाकिस्तान त्याला देते तशी देणार नाही.कारण खुडूक कोम्बडी कोणी जास्त वेळ पाळत नसतो. अगदी ज्याला इस्लामी जगताचा शहनशाह मानला होता तो लादेन देखिल पैसा आटल्यावर कुत्र्याच्या मौतीने मेला.

राही's picture

4 Jan 2016 - 11:32 pm | राही

दाऊद हा पूर्णपणे पाकिस्तानी गुप्तहेरसंघटनेच्या ताब्यात आहे. ही संघटना त्याला वापरून घेते. उद्या दाऊद मेला तरी पाक लष्कराला फारसा फरक पडणार नाही. तसाही तो आता वृद्ध झाला असेल. कधीतरी मरणारच. त्याच्या मरणाने पाकिस्तानवर संकट कोसळेल असे नाही. इतकेच काय, त्याची गरज/उपयोग संपला की त्याचा काटाही काढला जाऊ शकतो. पण तोपर्यंत कदाचित भारतालाही त्याची गरज उरलेली नसेल. जिवंत मिळाला हातात तर फाशीं देऊन जशास तसा सूड घ्यायचा इतकेच. दाऊदचा पैसा केवळ पाकिस्तानातच आहे असे नाही. भारतात, पूर्व आशियात, पश्चिम आशियात सर्वत्र त्याची गुंतवणूक आहे.
पाकिस्तानच्या दृष्टीने दाऊद एक प्यादे आहे. वस्तुत: पाक संरक्षणदले, गुप्तहेर एजन्स्या हे भारताविरुद्ध कारवाया आखीत असतात आणि पूर्वी दाऊदकडून त्या पार पाडून घेतल्या जात.

दाऊदला मारणे नाही तर त्याच्या आर्थिक व्यवहाराच्या नाड़या आवळणे जरूरी आहे.
पठानकोटमधे अतिरेकी घुसण्यामागे अमली पदार्थाची तस्करी सम्बन्ध असण्याची शक्यता आहे.
दाउदचे नेटवर्क इथुन पुढे डिस्ट्रीब्यूशनचे काम करते. हे नेटवर्क स्थानिक पोलिसांना माहीत नसणे शक्य नाही. अगदी सट्टेबाजी देखिल स्थानिक पोलिसांना माहीत असते.
सोने,अमली पदार्थ,हवाला यांची भारतातील मुळे खोदून काढली तरी दाऊदचे साम्राज्य खिळखिळे होउ शकते.
आठवा तो ८०च्या दशकातील काळ! दाउदने आपल्या मार्गातील काटे कसे दूर केले होते?
आज कित्येक पोलिस या कामगिरिसाठी मेडल घेऊन बसले आहेत. म्हणजे डबल फायदा!

मोगा's picture

5 Jan 2016 - 12:18 pm | मोगा

भारत पाक मुख्य आयातनिर्यात गुजरात बंदरांमधुन होते. मोदीकाका व्यापार चालु देताहेत तर आपण काय करणार ?

DEADPOOL's picture

5 Jan 2016 - 4:37 pm | DEADPOOL

नका ओ मोदीकाकाला मध्ये आणू!
गळाभेट घेतायेत ते!

मोगा's picture

5 Jan 2016 - 10:27 pm | मोगा

आता आमचे मोदीकाका २६ जानेवारीपासून राफेल की टोफेल कसलीतरी विमानं आणणार आहेत. .. मग बघाच ! अखंड हिंदुस्तान ! नमो - नगो की जय !

भंकस बाबा's picture

6 Jan 2016 - 8:23 am | भंकस बाबा

मोगाजि, संरक्षणसिद्ध नाही राहिले तर तुम्ही तुमच्या चाइनीज फोन वरुन चाईनीज नुडल घरपोच ऑर्डर करु शकाल, ते पण शांगहाईवरुन नाही तर भेंडीबाजारवरुन.
तुम्हाला काय फरक पडतो म्हणा?
आत्मसन्मान मंजे काय असतं भौ?

मोगा's picture

6 Jan 2016 - 10:52 am | मोगा

बीफ खाल्ले , आमचा आत्मसम्मान दुखावला , अशा आरोळ्या ठोकून एका निष्पाप मुसलमानाला नुसत्या दगडानेच ठेचून मारणार्‍या लोकाना राफेलची काय गरज , असा भाबडा प्रश्न आम्हाला पडला . म्हणुन राफेलचा उल्लेख केला.

ते आत्मसम्मानी पराक्रमी लोक खरोखरचे अतिरेकी आल्यावर कुठे लपले म्हणे ?

भंकस बाबा's picture

6 Jan 2016 - 5:17 pm | भंकस बाबा

दंगलित मरणारे मुसलमान निष्पाप असतात तर मग अशाच दंगलित मरणारे हिन्दुनि कोणते पाप केले होते?
मोगाजि पाकिस्तानात होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यात अतिरेकी नावे मुस्लिम असतात म्हणुन नाहीतर ते हल्ले कोणी त्रिपाठी,चौबे,सिंग वा डिकोस्टा यांनी केले असते तर पाकड्याची प्रतिक्रिया काय असती?
उड़त्या शवपेट्यात बसायची तुम्हाला फारच हौस आहे असे दिसते.
उद्या युद्ध झालेच तर मोगाना पाठवून दया सीमेवर, तिथे ते चिन्याणा व् पाकड्याना सांगतिल,ए टाइम्प्लीस,सध्या आमच्याकडे सुपरफास्ट विमाने नाहि आहेत, तेव्हा कृपया थोड़ा वेळ दया, पाच दिवसात काय ते राफेल, एफ१६, मिग घेऊन येतो मग लढुया.
बाकी तुम्ही नूडल खायच्या तयारीत दिसताय?

काहिहि हं भंकस ;)

मोगा मौसी वहा क्या ताली बजायेगि ....ए देना...

DEADPOOL's picture

7 Jan 2016 - 7:46 pm | DEADPOOL

जरा इतिहास तपासा,
कोणि किती निष्पाप मारले ते!!!!!!!!!!

माहितगार's picture

6 Jan 2016 - 1:55 pm | माहितगार

एकुण वृत्तांवरून पठाणकोट प्रसंग गांभीर्याने अभ्यासावा असा वाटतो, या निमीत्ताने बाकी चर्चा चालूद्यात पण काही चर्चा प्रतिसाद रचनात्मक तोडग्यापेक्षा उथळपणा कडे झुकलेले नाहीत ना अशी शंका वाटते. त्यात डेडपूल यांच्या या प्रतिसादाचा समावेश होतो. तुमच्या आमच्यापेक्षा अधिक विचार करु शकणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरकारने नेमलेले असतात शत्रुराष्ट्रात काही कारवाई करावयाची झाल्यास ते केवळ सरकारच करु शकते. मोगा यांचा हा प्रतिसाद सुद्धा भडक स्वरुपाचा आहे. सरकारच्या जबाबदार्‍या सरकारच्या असतात, सरकारने जिथे अधिकृतपणे मदत मागितली ती राष्ट्रप्रेमीमंडळींनी उत्साहाने जरुर करावी, राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातल्या प्रत्यक्ष कारवाईसंदर्भातल्या जबाबदार्‍या सर्वसामान्यांनी स्वतःच्या डोक्यावर घेणे शक्यही नसते म्हणून त्या संदर्भाने कोणतीही उचकवा उचकवी रास्त ठरत नसावी.

बाकी सर्वसामान्यांनी (सिव्हीलीयन्सनी) सुद्धा अशा समस्यांचे अधिकाधीक कंगोरे कसे लक्षात घेतले जाऊ शकतील आणि रचनात्मक तोडगे काय असू शकतील याची अभ्यासपूर्ण चर्चा करणे उत्तमच.

संदीप डांगे's picture

6 Jan 2016 - 2:11 pm | संदीप डांगे

सहमत.. म्हणूनच इथे काही बोलणे योग्य वाटले नाही.

नितीनचंद्र's picture

6 Jan 2016 - 3:13 pm | नितीनचंद्र

नमो एकच उत्तर द्या, अजून किती शहीद हवे आहेत?
बाकी आपली डिप्लोमसी चालू द्या!

एका रोगावर आपण अनेक पॅथींची औषधे घेतो. अहो ! परीणाम तर पहा. मग बोला. काही काळ जाऊ द्या. नमो म्हणजे काही जादुची कांडी आहे का ?

कालच म्हणे वजीरेआलम नवाज शरीफ यांनी पठाणकोट संदर्भात मोदींशी चर्चा केली. असे कधी घडले होते ?

बोलणी सुरु नव्हती तेव्हा सुध्दा शहीद होतच होते.

संदीप डांगे's picture

6 Jan 2016 - 3:54 pm | संदीप डांगे

. नमो म्हणजे काही जादुची कांडी आहे का ?

बाकी सगळं सोडा, स्वतः अपेक्षा वाढवायच्या मग लोकांनी आश्वासनांची आठवण करून द्यायला सुरुवात केली की 'जादूची कांडी आहे?' का असा प्रतिप्रश्न करायचा हे काही पटत नाही.

"पाकिस्तानको उसीकी भाषामें जवाब देना चाहिये, ये लवलेटर लिखना बंद करो" असे माननीय नमो साहेबांचेच विधान आहे. आता ह्यालाही ते चुनावी जुमला म्हणत असतील तर धन्य असो.

बाकी चालू द्या...

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Jan 2016 - 4:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

+११

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Jan 2016 - 2:57 pm | llपुण्याचे पेशवेll

ओह मग मोदींनी निषेध खलिता पाठवला का?

ट्रेड मार्क's picture

6 Jan 2016 - 7:43 pm | ट्रेड मार्क

सगळे नुसती नावं ठेवताहेत. पण काय करायला पाहिजे होतं आहे यावर कोणीच काही बोलत नाहीये.

मागच्या वर्षात पाकिस्तानबरोबरच्या चर्चा थांबवल्या म्हणून शिव्या घातल्या. मोदी पाकिस्तानात गेले नव्हते तोपर्यंत पण गेले नाही म्हणून लोक्स शिव्या घालत होते. आता गेले तरी शिव्या घालताहेत. एकूण काय फक्त शिव्या घालायच्या हा एकच उद्देश दिसतोय.

चूक असेल तेथे टीका करायलाच पाहिजे पण मग नक्की काय चुकलं, ती चूक दुरुस्त करण्यासाठी काय करायला पाहिजे आणि बरोबर काय आहे हे सांगण्याची जबाबदारी पण टीका करणार्यांवर येते. ते ती घेत नाहीत. गळाभेट घेतली तर मग अपेक्षा काय होती की मोदींनी गळाभेट घेताना वाघनखं खुपसून शरीफना मारायचा, मग सुपरम्यान सारख जाउन दाऊदला, हाफिजला मारायचं मग स्पायडरम्यान सारखं सगळ्या दहशतवाद्यांना जाळ्यात पकडून भारतात घेवून यायचं?

सलमान खुर्शीद आणि इतर काँग्रेसचे मान्यवर पाकिस्तानात जाउन काय बरळून आले त्यावर काही भाष्य केलं नाही कोणी. तृणमूलच्या इद्रीस अलीनी तर मोदींचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला. सुशीलकुमार शिंदे म्हणतात भाजपच्या काळात दहशतवादी हल्ले जास्त होतात. यावर इथे कोणाला आक्षेप घेण्यासारखे काहीच वाटत नाही? एकीकडे मोदी मुस्लिमविरोधी आहेत म्हणून बोंबा मारायच्या आणि दुसरीकडे त्यांना दहशतवाद्यांशी संबंध आहेत म्हणायचं!

काही शहाणे पत्रकार तर सगळ्यात चुकीचे प्लानिंग असलेली कारवाई आहे म्हणतात. म्हणे लष्कराच्या वरिष्ठ लोकांनी यांच्याकडे येवून हितगुज केलं म्हणे की आर्मीला बाजूला करून NSG ला कारवाई करायचे अधिकार दिले. त्यामुळे कारवाई एवढी लांबली वगैरे वगैरे. नाव न सांगण्याचा अटीवर सांगितले म्हणालं की झालं पुढचे प्रश्न विचारायचे नाहीत. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी एवढे सहज पत्रकारांकडे बोलतात का? एवढी मोठी कारवाई चालू असताना अधिकारी जेवण झाल्यावर शतपावली करत करत निवांतपणे येवून पत्रकारांना भेटले आणि नाराजी व्यक्त केली! काहीही हं xx…

माहितगार's picture

6 Jan 2016 - 11:03 pm | माहितगार

इरिस्पेक्टीव्ह ऑफ (पंजाब) राज्यात आणि केंद्रात सरकारे कुणाची आहेत, इंग्रजी वृत्तपत्रातील बातम्यांवरुन काही त्रुटी जाणवल्या/ सुधारणेस वाव आहे असे वाटले त्या अशा.

१) ज्या सीमा भागात कुंपण नाही खास करुन आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रातील नद्यांची क्षेत्रे, तेथे थर्मल इमेजींग यंत्रणा आधीच्या (गुरुदासपुर) अतीरेकी हल्ल्याच्या वेळी काम करत नव्हत्या त्या वेळीच अद्ययावत केल्या गेल्या नसाव्यात. यापुढे या बाबत हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेणे.
२) सीमा भागात अतीरेक्यांनी वसाहती क्षेत्रात आसरा मिळवला, सीमा भागातील वसाहती आणि रस्ते क्षेत्रात सीसी टिव्ही कॅमेर्‍यांची संख्या आणि गस्त वाढवली जावयास हवी. जेणे करून अतिरेक्यांना आसरा मिळवता येणे दुरापास्त व्हावे
३) सैनिकी विमानतळांना तारे एवजी व्यवस्थीत भिंतींची उपलब्धता
४) डिफेन्समध्ये कार्यरत व्यक्तींना सोशलनेटवर्कींग साइट्स , अभारतीय इमेल सेवा, अभारतीय संकेतस्थळे आणि अभारतीय व्यक्तींशी आंतरजालावरून संपर्कास बंदी.
५) पंजाब आणि सीमावर्ती राज्यां मधील ड्रग वापराबद्दल समाजशास्त्रीय अभ्यास आणि ड्रग व्यवहारांवर प्रसंगी इतर राज्यातील पोलीस दले वापरून अधीक कठोर नियंत्रण
६) पठाणकोट प्रसंगापुर्वी राज्य पोलीस दलाचा एसपी लेव्हलचा अधिकारी अतीरेक्यांच्या हाती नि:शस्त्र लागणे आणि सुटणे असे विनोद कोणत्याही स्थितीत भविष्यात होणार नाहीत याची दक्षता घेणे.
६) देशांतर्गत अनधिकृत शस्त्रांची उपलब्धता होणार नाही याची काळजी घेणे (या वेळच्या केसशी संबंध नसला तरीही)
७) पाकीस्तान अनधिकृत शस्त्रांच्या उपलब्धता, ड्रग व्यापार आणि अतीरेकास अर्थपुरवठ्यावर नियंत्रण आणत नाही तोवर पाकीस्तानवर कठोर निर्बंध घालण्याबद्दल आंतरराष्ट्रीय जनमत बनवण्यावर भर देणे.

माहितगार's picture

6 Jan 2016 - 11:10 pm | माहितगार

उर्वरीत भारतातही घर आणि वाहन विकताना आणि भाड्याने देताना सर्वसामान्य जनतेने विकत/भाड्याने घेणार्‍यांची नौकरी घेणार्‍यांची माहिती पोलीस दलांकडे अद्ययावत करण्याची द़क्षता घ्यावयास हवी. आस्थापना आणि व्यावसायिकांनी आपल्या परिसरातील रस्तेही कव्हर होतील अशा पद्धतीने सिसी टिव्ही कॅमेरे बसवावेत, सर्वच रेसिडेंशिअल सोसायटीज खासकरून सीमावर्ती राज्यात कंप्युटराईज्ड गेटपास पद्धतींची अंमल बजावणी कंपलसरी करावी.

संदीप डांगे's picture

6 Jan 2016 - 11:16 pm | संदीप डांगे

हे जरा जास्तच नाही होत का? अवघा देश तुरुंग बनवायचाय का?

संपूर्ण पृथ्वीला चामडे घालण्याऐवजी पायास चप्पल घालणे योग्य असते. पायातच चप्पल घातली नाही तर चामडे कितीही अंथरले तरी चटके बसणारच...

माहितगार's picture

6 Jan 2016 - 11:31 pm | माहितगार

सीमा व्यवस्थीत कव्हर करता आल्या नाहीत आणि/किंवा देशांतर्गत अनधिकृत शस्त्रांवर नियंत्रण प्रस्थापीत करता नाही आले तर त्या शिवाय पर्याय नसावा. तुम्ही फक्त पाकीस्तानी अतिरेक्यांचा विचार करता आहात, मी नक्षलवादी ते स्मॉल आर्मसी भारतीय गुन्हेगारात वाढलेली उपलब्धता असे सगळेच लक्षात घेऊन लिहिले आहे. गेटवर मेटल डिटेक्टर ठेवायचा त्या मेटल डिटेक्टरने आवाज केला तरी त्याकडे दुर्लक्ष करावयाचे अथवा कुणातरी रॉबर्ट वड्राला (नमुद करण्याचा उद्देश राजकीय टिका नाही) सवलत द्यायची हे कुठे तरी थांबावयास हवे. खाजगीपणाचे महत्व लक्षात घेऊनही पाकीस्तान आणि चीनने भारताशी ज्या पद्धतीचे छुपे अतिरेकी युद्धतंत्र चालवले आहे त्यास सुरक्षीतता हवी असेल तर खाजगीपणाचे चोचल्यांना कोंबाळण्यात अर्थ नाही.

सामान्यनागरिक's picture

7 Jan 2016 - 12:04 am | सामान्यनागरिक

अहो, आपण एखादा छोटासा प्लॉट घेतला तरी प्रथम त्याभोवताली कुंपण घालतो. 47 साली आपण एवढा मोठा देश ताब्यात घेतला तरी त्याला सांस्कृतिक / सामाजिक/ राजकीय / साधे तारांचे कुंपण घालू शकलो नाही आजपर्यंत ! कोपर्यावरती असलेल्या वाण्याकडे सुद्धा आपण आज cctv असलेला पहातो पण आजही आपण सीमाभागात सगळीएकडे cctv बसवू शकलो नाही. लाज वाटली पाहिजे राज्यकर्त्यांना !

मोगा's picture

7 Jan 2016 - 12:45 am | मोगा

हे मार्ग स्वीकारले तर सैन्याच महत्व काही प्रमाणात कमी होइइल... ते कशाला स्व पा कु मारुन घेतील?

माहितगार's picture

7 Jan 2016 - 9:13 am | माहितगार

हे मार्ग स्वीकारले तर सैन्याच महत्व काही प्रमाणात कमी होइइल...

ट्रॅफीक सिग्नल लावले तर ट्रॅफीक पोलीस लागणार नाहीत म्हणण्यासारख आहे. केवळ सिसिटीव्ही लावून अफगाणीस्तान आणि इराक-येमेन-सिरीया सगळीकडचा अतीरेक कमी करता यावयास हवा.

सुरक्षीतता हा खूप मोठा आणि तर्कसंगत निर्णय घेण्याचा विषय आहे, त्याच्या समतोल विचार विमर्शासाठी असे भावनावश धागे कितपत पुरेसे असू शकतील या बाबत साशंकता वाटते. विषयाच्या स्वंतत्र चर्चेसाठी (अ)सुरक्षीततेचा सांभाळ हा धागा लेख लिहिला पण दुर्दैवाने त्या चर्चा धाग्यास अद्याप प्रतिसाद नाही आणि उपरोक्त प्रकारच्या धाग्यात पुर्णपणे चर्चा होऊ शकणे अवघड वाटते.

काहुन जाहिरात करु राह्यले हो?
उपरोक्त प्रकारच्या धाग्यात पुर्णपणे चर्चा होऊ शकणे अवघड वाटते>>>>>>>म्हणजे तुमचा धागा ब्येश्ट?
पटल नाही ब्वा!!

संदीप डांगे's picture

7 Jan 2016 - 12:43 am | संदीप डांगे

पायात चप्पल घालणे म्हणजे 'योग्य ठिकाणी उपाययोजना करणे जेणेकरून अव्यवहार्य उपाय करायची गरज भासू नये' असे अभिप्रेत होते.

जागोजागी मेटल डिटेक्टर व सीसीटीवी कॅमेरे हे दहशतवादी हल्ले वैगेरेंमधे अतिशय कुचकामी आहेत हे वारंवार सिद्ध झाले आहे. तरीही आपण त्याच गोष्टींचा पुरस्कार करत आहात ह्याबद्दल आश्चर्य वाटते. ताजमहाल होटेलवर ज्या पद्धतीने हल्ला झाला त्यात सीसीटीवी वा मेटल डिटेक्टर असून काय उपयोग झाला? म्हणण्याचे तात्पर्य असे की ज्या गोष्टी प्रत्यक्ष संरक्षणासाठी व्यर्थ आहेत त्यांचा बागुलबुवा उभा करून फक्त आम जनतेस खोट्या सुरक्षिततेची जाणीव होऊ शकते, बाकी काही नाही.

चोरी, मारहाण वा शस्त्रांचा अनधिकृत उपयोग ह्यात सीसीटीवीची भूमिका फक्त साक्षीदाराची असते. आजकाल माध्यमांमधून 'सुरक्षेसाठी सीसीटीवी' ही संकल्पना भारतात फार चर्चीली जात आहे, त्यामागे मोठी उद्योजक लॉबी कार्यरत आहे. भारतात सीसीटीवी म्हणजे बॉडीगार्ड्स वा सुरक्षारक्षकांना पर्यायच आहे, सीसीटीवी जणू फायरवॉल आहे अशी काहीशी प्रतिमा बनवली गेली आहे. अमूक ठिकाणी गुन्हा घडला तिथे सीसीटीवीच कसे नाहीत, असून बंद होते, वैगेरे सीसीटीवी वर मुद्दाम भर देणार्‍या बातम्या येतात. त्यामागे अर्थकारण आहे, उपयोगिता नाही. कारण अशा बातम्या आल्या की लगेच स्थानिक राज्यसंस्थांमधे सीसीटीवीची मोठमोठाली टेंडरं निघतात, पास होतात, नळकांडी-कॅम्रे लावले जातात, जनता खुश, पुढारी खुश, कंपन्या खुश. सहा महिन्याचा फ्री-मेन्टेनन्स संपला की कॅमेरे व विषय बंद. खरे तर सीसीटीवी हा अतिआवश्यक, परम-संवेदनशील आवारात गरजेचा आहे, त्यास अखंड मानवी नियंत्रण-सुविधेची जोड आवश्यक असते. प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षक फिरू शकत नाही म्हणून एकाच ठिकाणी बसून त्यास सर्व परिसर विनासायास न्याहाळता यावा ह्या उद्देशाने सीसीटीवींची निर्मिती झाली. जिथे समस्या असेल तिथे लगेच कुमक पाठवून परिस्थितीवर नियंत्रण पाठवणे सोपे जाते, मनुष्यबळावरील ताण हलका होतो. ह्यासाठी सीसीटीवी आहेत. आपल्याकडे फक्त कॅमेरे लावले की धन्यता मानतात लोक.

तुम्ही जे सर्व आस्थापनांमधे, अगदी रहिवासीसुद्धा, सीसीटीवी लावण्याबद्दल म्हटले आहे. ते जरा अति होतंय असं वाटतं. भारतीयांना मानसिकरित्या अधिकाधिक सुरक्षित वाटावे म्हणून ह्या उठाठेवी आहेत पण कायम वॉर-अलर्टवर असल्यासारखे आयुष्य सर्वच ठिकाणी कायम जगणे मानसिकरित्या घातक नसेल काय?

देशाच्या सीमा सर्वोत्तमरित्या सुरक्षित करणे, त्यात अजिबात ढीलाई न करणे ह्या सीमापातळीवरील गैरव्यवहार रोखण्यास योग्य अशा कृती आहेत. देशांतर्गत पोलिस-गस्ती असणे, तक्रारींवर कार्यवाहीची तत्परता असणे, गुप्तहेरांचे विश्वासार्ह व जीवंत जाळे असणे, संदेश-देवाण-घेवाण व निर्णयप्रक्रिया सुटसुटीत, वेगवान असणे, ह्या नेहमीच्याच कृती अधिक कडकपणे राबवणे आवश्यक आहे. शहर कितीही मोठे असो वा छोटे असो, प्रत्येक विभागातली बित्तंबातमी पोलिसांकडे असते. शहरात कोण आले, कोण गेले ह्याबद्दल पोलिस-प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन रेकॉर्ड मेन्टेन करणे, (ह्यासाठी एक सर्वंकष सॉफ्टवेअर तयार करून सर्व ठिकाणच्या मानवी वाहतूकीचा रीअल-टाइम डेटा बघणे. म्हणजे प्रत्येक खाजगी वा सरकारी वाहनाच्या सीटमध्ये बायडीफॉल्ट पर्सन-वेट-सेन्सर लावून वाहनात एकूण किती माणसे आहेत, किती उतरली, किती लोक कुठे गेले, चढले वैगेरे मोठा किचकट प्रोग्राम बनवता येईल, इति कल्पनेच्या भरार्‍या. ह्या प्रणालीबद्दल मागे आराखडा बनवला होता. कधी वेळ मिळाला तर सविस्तर लेख लिहिन.) नागरिकांशी मैत्रीपूर्ण संपर्क ठेवणे ह्याही गोष्टी आवश्यक.

माझी सुरक्षिततेची संकल्पना फार सोपी आहे. चित्रपटांमधे उत्तम पार्श्वसंगीत त्याला म्हणतात जे अजिबात जाणवत नाही पण परिणाम साधून जातं. उत्तम सुरक्षा व्यवस्थाही तशाच पार्श्वसंगीतासारखी हवी. माझ्या संकल्पनेत मेटल डिटेक्टर्स, सीसीटीवी, अनावश्यक चेकिंग ह्यांना थारा नाही. गुन्हा घडण्याआधी रोखणे हेच खरे कौशल्याचे काम. सीसीटीवींचे फुटेजेस गोळा करून वर्षानुवर्षे कोर्टाच्या वार्‍या करणे अर्थहिन आहे.

बाकी तुमचे पहिल्या प्रतिसादातील सर्व क्रमांकाचे मुद्दे पटले. फक्त उर्वरित भारत व सामान्य नागरिक ह्यांना सुरक्षाव्यवस्थेच्या नावाखाली अनावश्यक मॉनिटर केले जाऊ नये असे वाटते. त्याचे मानसशास्त्रीय परिणाम गंभीर असू शकतात. जॉर्ज ऑरवेल चे '१९८४' ह्याबद्दलच आहे.

माहितगार's picture

7 Jan 2016 - 9:17 am | माहितगार

(अ)सुरक्षीततेचा सांभाळ या धाग्यावर या मग बोलू आपण.

माहितगार's picture

7 Jan 2016 - 9:18 am | माहितगार

www.misalpav.com/node/34369 संपादकांनी हा दुवा दुरुस्त करण्यात मदत करावी

राही's picture

7 Jan 2016 - 9:33 am | राही

२४ तास मॉनिटरिंग आणि वरचेवर देखभाल नसेल तर सी.सी.टीवी व्यर्थ आहेत.
नागरिकांतला हलगरजीपणा हा एक मोठा शत्रू आहे. लष्कर, निमलष्कर, गुप्तवार्ता विभाग, सगळे आपापल्या परीने काम करतातच पण जागृत आणि सदैव सावधान समाज ही खूप मोठी मदत असू शकते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Jan 2016 - 7:33 am | कैलासवासी सोन्याबापु

+१

सामान्यनागरिक's picture

6 Jan 2016 - 11:54 pm | सामान्यनागरिक

भाडेकरूंची माहिती का देत नाही लोक ? कधी विचार केला का कुणी ?
भाड्याने दिलेल्या घराची घरपट्टी तिप्पट किंवा चौपट असते. त्यामुळे घर भाड्याने दिल्याची माहिती देण्याचे टाळतात लोक. अनेक ठिकाणी लोक भाडे रोखीने घेतात.घर भाड्याने दिल्याचे लपवण्यात हा फायदा असतो. तसेही भाड्याने दिलेल्या जागांपैकी दहा टक्केच जागांची माहिती पालिकेकडे असते. 90 टक्के जागांचा कर चुकविला जातो. जर हा जाचक नियम काढला तर लोक स्वतःहून माहिती देतील. शेवटी सुरक्षा आणि मिळणारा तुटपुंजा कर यात काय महत्वाचे आहे हे ठरवावे.

करापेक्षा सुरक्षा महत्वाची हे खरे पण शेवटी सुरक्षा ज्यांच्यासाठी आहे त्यांनीही सामाजिक दायित्व म्हणून पदरमोड करण्यास हरकत नसावी नाही का.

ढकांब्याच्या पंचायतीला मिळणारा सव्वा रुपया मोठा की तिथे लपलेल्या भाड्याच्या जागेतील अतिरेकी पकडायचा ? अश्या अनेक भाड्याच्या जागांत अनेक आतंकवादी दबा धरून बसलेले असतील . कोण जाणे ? ढकांब्याच्या पंचायतीला सव्वा रुपया मिळण्यासाठी आपण तोच नियम कवटाळून बसायचा ?

ट्रेड मार्क's picture

7 Jan 2016 - 2:25 am | ट्रेड मार्क

मुद्दे योग्य आहेत पण सगळे प्रत्यक्षात आणणे कठीण आहे. काही गोष्टींना अंतर्गत विरोधच एवढा होईल की मूळ उद्देशच बारगळेल. सध्या फक्त मोदींच्या चुका काढायची स्पर्धा चालू असते. त्यात हा संतुलित प्रतिसाद आहे. केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारे, विरोधी पक्ष, पोलिस दले, इतर संरक्षण दले व सामान्य नागरिक, न्यूज चानेल या सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून वागले तर बर्याच समस्या आणि गोंधळ कमी होतील.

मोदींनी काय करावे हे पण सांगा कोणीतरी. म्हणजे पाकिस्तानशी चर्चा करावी का नाही, केली तरी पंप्रबरोबर करावी का सैन्यप्रमुखाबरोबर का ISI प्रमुखाबरोबर. जर या तिघांपैकी एकाबरोबर चर्चा केली त्याचा दुसर्याला राग येवून त्यांनी काही घातपाती कारवाई केली तर काय करायचं. समजा चर्चा करून किंवा न करून घातपाती कारवाया चालूच राहिल्या तर काय करायचं? तुम्ही भिंतीचं कुंपण घातलं तरी आतल्याच एखाद्यानी पळवाट काढून दिली तर काय करायचं?

डिफेन्समध्ये कार्यरत व्यक्तींना सोशलनेटवर्कींग साइट्स, अभारतीय इमेल सेवा, अभारतीय संकेतस्थळे आणि अभारतीय व्यक्तींशी आंतरजालावरून संपर्कास बंदी घातली आणि अमलात पण आणली तरी एखाद्याने फेक अकौंट तयार करून संपर्क साधला तर काय करायचं? सीसी टिव्ही कॅमेर्‍यांची संख्या आणि गस्त वाढवली तरी गस्त घालणार्यांपैकीच एखादा फितूर झाला तर काय करायचं? काही गोष्टींवर बंदी घातल्यावर किंवा सक्ती केल्यावर व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होते आहे म्हणून गळे काढले गेले तर काय करायचं?

यात "काय करायचं" हे बाकी सर्वांनी काय करायचं ह्यापेक्षा फक्त मोदींनी काय करायचं ते सांगावं ही विनंती.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Jan 2016 - 6:52 am | माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य प्रश्न अहेत रे ट्रेड मार्का. पण ह्याची उत्तरे संऱ़क्षण खात्यातले सचिव्,वरिष्ट अधिकारी,सैन्यातले माजी अधिकारी ह्यांनी द्यायची. मोदी त्यांचे मत विचारात घेत असतीलच.. तशी चर्चाही होत असेल.
एखादी कंपनी तोट्यात जात असेल, कंपनीच्या सी.ई.ओ.वर टिका होणारच. मग सी.ई.ओ-"टिका काय करताय.. तुम्हीच सांगा मी कंपनी कशी चालवू.." हे विचारण्यासारखे आहे. असे ह्यांचे मत. असो.
मोदी व सरकारवर उगाच टिका करण्यात अर्थ नाही. मनमोहन पंतप्रधान असताना असे हल्ले झाले की "नेभळट कमकुवत नेतृत्व' आहे म्हणून लोक म्हणायचे.त्यात सत्ताधारी आघाडीवर होते.

नितिन थत्ते's picture

8 Jan 2016 - 9:39 pm | नितिन थत्ते

>>इंग्रजी वृत्तपत्रातील बातम्यांवरुन काही त्रुटी जाणवल्या/ सुधारणेस वाव आहे असे वाटले त्या अशा.

प्रेस्टिट्यूट मीडियाचं काय सांगू नका राव !!!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Jan 2016 - 8:19 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"पाकिस्तानको उसीकी भाषामें जवाब देना चाहिये, ये लवलेटर लिखना बंद करो" असे माननीय नमो साहेबांचेच विधान आहे. आता ह्यालाही ते चुनावी जुमला म्हणत असतील तर धन्य असो.
योग्य बोललास रे संदीपा.मनमोहन असताना हा हल्ला झाला असता तर 'देशाचे नेत्रूत्व कमकुवत माणसाच्या हाती असल्याने हे सगळे होतेय' असे फेसबुकी अनुमान निघाले असते.
'मनात आणले तर आपण पाकिस्तानला तीन दिवसांत संपवू शकतो.. फकत हवी ती प्रखर देशभक्ती व खंबीर नेत्रूत्व' अशी वाक्ये तुमच्या त्या ट्वीटरवरच वाचली होती.असो.
हा प्रश्न वाटतो तेवढा सरळ नाही हे एव्हाना कळले असेल.

मोगा's picture

6 Jan 2016 - 10:40 pm | मोगा

अम्मीजान , कैसी है आप ? आप आती है तो दिल मोघल गार्डन बन जाता है !

राही's picture

7 Jan 2016 - 9:38 am | राही

नियमित कालावधीदरम्यान प्रसिद्ध होणार्‍या काही बारीकसारीक बातम्यांवरून गेले कित्येक महिने माझ्या मनात अशी एक आशंका निर्माण होते आहे की पंजाबमध्ये काहीतरी शिजतेय. पंजाब अस्वस्थ आणि अशांत करण्याचे प्रयत्न चालू आहेत. केवळ पैसा हेच आमिष नसावे. इन्फिल्ट्रेशन आणि इन्डॉक्र्टिनेशनचाही भाग त्यात असावा.

@"ट्रेड मार्क"

मोदींनी काय करावे हे पण सांगा कोणीतरी. म्हणजे पाकिस्तानशी चर्चा करावी का नाही, केली तरी पंप्रबरोबर करावी का सैन्यप्रमुखाबरोबर का ISI प्रमुखाबरोबर. जर या तिघांपैकी एकाबरोबर चर्चा केली त्याचा दुसर्याला राग येवून त्यांनी काही घातपाती कारवाई केली तर काय करायचं.

पाकिस्तानी पन्तप्रधान / सैन्यप्रमुख / ISI प्रमुख यापैकि फक्त पन्तप्रधान बरोबर मोदि गळाभेट करुन आले ते पण सर्व international / political protocall तोडुन ?? मोदि अन शरिफ फार जुने / जिगरी मित्र आहेत का ? ???????

पाकीस्तानात कोण कोणाच्या तालावर नाचते ही एक रहस्य / गुप्त बातमी आहे काय ??

यानन्तर पठानकोट घट्ना एक नेहमीची घट्ना समजायची काय ??


*********************************************************************
*********************************************************************


ज्यांना मोदींचे धाडस वा त्यातून साधलेला डावपेच समजू शकत नाही, त्यांना पठाणकोट हल्ल्याचे रहस्य कधीच उलगडू शकत नाही.

ज्याना मोदींचे धाडस व डावपेच समजले त्यानी तरी एक क्लु द्यावी धाडस व डावपेच बद्दल.

धाडस व डावपेच नावाखाली काय होइल ??

सध्या वाघा सीमेवर BSF व PAKISTANI RANGERS चा कार्यक्रम होतो उद्या कच्छ आखातात भारतीय / पाकिस्तानी नौदलाचे fleet review होइल आणि हवाई दलाचे सराव होतील गप्प बघत बसायचे काय ?? जसे आत्ता गप्प बसावे असे वाट्ते.

**********************************************************************
**********************************************************************


जाता जाता

पाकीस्तानी पन्तप्रधान शरिफ नी श्रीलंका राजधानी कोलंबो येथुन भारतीय पन्तप्रधान मोदींबरोबर पठाणकोट हल्ल्याबद्दल चर्चा केली ??? काय डावपेच आहेत ते काय समजले नाहि. सत्य हे आहे कि शरिफनी पाकीस्तानातुन काय बोलावे हे शरिफ ठरवु शकत नाहि. यापुढे काय बोलावे गप्प बसलेले चांगले.

सुबोध खरे's picture

7 Jan 2016 - 11:04 am | सुबोध खरे

"उचलली जीभ लावली टाळ्याला" ही या धाग्याला शोभून दिसेल अशी म्हण आहे.
कुणाच्या हि प्रतिसादाला प्रतिसाद न देत मी मला जेवढे सांगणे शक्य आहे तेवढेच सांगेन.
१) भारत आणि पाकिस्तानची सीमा २९००( दोन हजार नऊ शे किमी आहे). किती अंतरावर आणि कसे सी सी टी व्ही लावणार? त्याच्यावर २४ X ७ लक्ष ठेवायचे कुणी आणि कसे त्याला लागणारी वीज आणि देख्भैसाठी लागणारा खर्च कसा आणि कुणी करायचा?
सगळ्या दिल्लीत सी सी टी व्ही लावणार होते त्याचे काय झाले हे आपल्याला सर्वाना माहित आहे.
२) पंजाब शांत असला तरीही त्यात खालीस्तानचे स्वप्न उराशी बाळगून असणारे लोक कमी नाहीत.अशा काही असंतुष्ट लोकांना हाताशी धरून घातपाती कृत्य करणे एखाद्या राष्ट्राला करणे सहज शक्य असते.
३) पाकिस्तान लष्कराला शांतता नकोच आहे कारण शांततेच्या काळात लष्कराचे महत्त्व कमी होत जाते. यासाठी दहशतवाद्यांना हाताशी धरून अशी कृत्ये घडवून आणली जाणारच हे आपल्या सरकारला माहित आहे. शिवाय भारत पाकिस्तान मध्ये व्यापार सुरु झाला तर अनेक गोष्टीची आयात निर्यात होऊन सामन्य जनतेला त्याचा फायदा होईल पण या गोष्टींच्या तस्करीला आळा बसेल. उदा पाकिस्तानात पान कोपर्या कोपर्यावर मिळते पण ते सर्व भारतातून तस्करी करून आणलेले असते. जर व्यापार सुरळीत झाला तर भारत आणि पाकिस्तान सरकारला कर मिळेल पण तस्कर आणि लष्कर यांचा हितसंबंध दुखावतो. असे अनेक उद्योग आहेत.
यात लष्कराचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्यामुळे त्यांना भारत पाकिस्तान व्यापारी संबंध सुरळीत होणे परवडणारे नाही. या न त्या प्रकारे ते त्यात खीळ घालण्याचा प्रयत्न करणारच
४) दहशत वाद्यांच्या या कारवाईची तयारी कमीत कमी ४-६ महिने चालू असल्याशिवाय त्यांना भारतीय वायुसेनेच्या तळावर हल्ला करणे शक्य नव्हते. तेंव्हा हि कारवाई लगेच झाली हे म्हणणे सोपे आहे.
५) वायुसेनेच्या तळावर हल्ला होऊन एकही विमान किंवा महत्त्वाची उपकरणे दहशतवाद्यांना नष्ट करता आली नाहीत हि एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण या गोष्टी कुठे आहेत याची संपूर्ण माहिती त्यांना होती तरीही भारतीय गुप्तहेर खात्याने त्यांचा हा बेत नाकाम ठरवला. या उलट पाकिस्तान च्या नौदलाच्या तळावर हल्ला झाला तेंव्हा तेथे त्यांनी १८ सैनिक मारले आणि P ३ C ओरायन हि (३५० कोटी रुपयांना एक अशी) दोन विमाने नष्ट केली.
६) मोदी साहेबांनी संयुक्त अरब ऐमिरातीशी केलेल्या करारात दावूद इब्राहीम ची मालमत्ता गोठवण्याची सुरुवात झालेली आहे.दावूदची मालमत्ता लष्कराच्या आशीर्वादानेच उभी राहिली आहे आणि त्यात लष्कराच हातही आहे. त्यामुळे असे होणे हे त्यांना महाग पडू लागले आहे. http://www.oneindia.com/india/dawoods-bad-days-begin-as-uae-probes-his-p...
७) मी एकदा असे म्हटले होते कि प्रत्येक माणसाला असे वाटते कि राजकारण आणि क्रिकेट यात आपल्याला सगळे समजते आणि त्यावर खास टिप्पणी करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे सचिन तेंडूलकर ने ब्याट कोणती वापरावी पासून पंतप्रधानांनी चीन पाकिस्तान बरोबर संबंध सुधारणे कसे चूक आहे यावर आपण सल्ला देऊ शकतो.
असो

माहितगार's picture

7 Jan 2016 - 11:45 am | माहितगार

१) भारत आणि पाकिस्तानची सीमा २९००( दोन हजार नऊ शे किमी आहे). किती अंतरावर आणि कसे सी सी टी व्ही लावणार? त्याच्यावर २४ X ७ लक्ष ठेवायचे कुणी आणि कसे त्याला लागणारी वीज आणि देख्भैसाठी लागणारा खर्च कसा आणि कुणी करायचा?

१) माझा हा प्रतिसाद आपण नीटपणे वाचला आहे का ? त्यात संपूर्ण सीमेवर सी सी टी व्ही लावावेत असे कुठे लिहिले आहे ?

"ज्या सीमा भागात कुंपण नाही खास करुन आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रातील नद्यांची क्षेत्रे, तेथे थर्मल इमेजींग यंत्रणा" अशी चर्चा केलेली आहे. कारगीलच्या अनुभवानंतर ज्या ठिकाणी ज्या काळात मनुष्यबळ तैनात करता येत नाही तेवढ्या भारत-पाक सीमा भागा पुरता इलेक्ट्रॉनीक्सचा वापर वाढवला गेला आहे असे माझ्या वाचनात आले होते. (तुर्तास संदर्भ हाताशी नाही) सी सी टी व्हीच्या वाढीव प्रमाणा संदर्भातील चर्चा सीमा भागातील वसाहती आणि रस्ते क्षेत्रात साठी केली आहे. सीसी टिव्ही मानवी सुरक्षा गस्तीस पूर्ण पर्याय होऊ शकत नाहीत पण सहाय्यकारी ठरू शकतात.

२) आपण काही ठिकाणी पाकीस्तानी लष्कर असा उल्लेख केला आहे पण बर्‍याच ठिकाणी नुसते लष्कर लिहिले आहे, चुकीचे अनर्थ करणारी मंडळी सर्वत्र असतात तेव्हा उर्वरीत ठिकाणी जेथे पाकीस्तानी लष्कराबद्दल उल्लेख आहेत ते तसे स्पष्ट केल्यास बरे किंवा कसे ?

३) पाकीतानी सिव्हीलीयन गव्हर्नमेंट आणि लष्कर आणि त्यांचे अतिरेकी एकत्रपणे कारवाया करत आहेत अथवा वेगळेपणाने इन एनी केस भारतीय सुरक्षाव्यवस्थेत पुरेसे गॅप्स शोधण्यात ते वेळोवेळी यशस्वी होताना दिसतात हा एक भाग, दुसरे पठाणकोट हल्ल्ला हा भारतीय सीमेत येऊन एका मोठ्या सैनिकीस्थळावर हल्ल्याचा प्रयत्न आहे, महत्वपूर्ण भारतीय स्ट्रॅटेजीक आस्थापनांपर्यत अतीरेक्यांना पोहोचता येऊ लागणे हि गंभीर बाब आहे यास कितपत कमी लेखावयाचे ? अशा पद्धतीने भारतीय स्ट्रॅटेजीक आस्थापनांपर्यत अतीरेक्यांना भविष्यात पोहोचता येऊ नये म्हणून नेमकी कोणती काळजी घेतली जावयास हवी ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Jan 2016 - 12:37 pm | कैलासवासी सोन्याबापु

डॉक्टर साहेब +११११११११

श्रीगुरुजी's picture

7 Jan 2016 - 12:50 pm | श्रीगुरुजी

"उचलली जीभ लावली टाळ्याला" ही या धाग्याला शोभून दिसेल अशी म्हण आहे.
कुणाच्या हि प्रतिसादाला प्रतिसाद न देत मी मला जेवढे सांगणे शक्य आहे तेवढेच सांगेन.

डॉक्टरसाहेब,

नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट प्रतिसाद! या धाग्यावर सैन्यातील कोणीतरी प्रतिसाद द्यायचीच वाट पहात होतो.

आनंदी गोपाळ's picture

7 Jan 2016 - 9:03 pm | आनंदी गोपाळ

ते सोन्याबापू आजकाल सैन्यात असतात. डाक्टर आर्मी मेडीकल कोरमधून रिटायर झालेत ;)
आपल्या गोटातून प्रतिसाद यायची वाट पहात होतात का?

सुबोध खरे's picture

7 Jan 2016 - 9:08 pm | सुबोध खरे

गोपाळराव
माझा वर्गमित्र प्रत्यक्ष पठाणकोट बेस वर जखमी झालेल्या सैनिकांच्या इलाजासाठी (क्रिटीकल केअर स्पेशालीस्ट) हजर होता. त्यातून उपलब्ध झालेली प्राथमिक माहिती हि अर्थात सर्वसामान्य जनतेच्या वापरासाठी नाही.
निवृत्त मी लष्करातून झालो आहे. लष्करी विचारधारेतून नाही.

श्रीगुरुजी's picture

7 Jan 2016 - 9:17 pm | श्रीगुरुजी

तुमचा प्रतिसाद त्यांना समजू शकणार नाही.

श्रीगुरुजी's picture

7 Jan 2016 - 9:16 pm | श्रीगुरुजी

आपल्या गोटातून प्रतिसाद यायची वाट पहात होतात का?

अभ्यास वाढवा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Jan 2016 - 10:16 pm | कैलासवासी सोन्याबापु

गोपाळराव माफ़ करा पण आपला प्रतिसाद अतिशय विचित्र आहे, अर्थात तुम्हाला आर्मी कळली नाही साहेब, u can retire a soldier from an army but u cannot retire army from a soldier असं म्हणतात, बघा झेपले तर आम्ही सिविलियन नाही, की बुआ आज सुपरवायसर रिटायर झाला की उद्या पासुन त्याला पेंशन केस साठी चपला घासायला लावा, श्रीगुरुजी ह्यांना त्यांचे मत जिकडे आहे तिथे होकार द्यायचा हक्क आहे अन कदाचित ते तसेच रहावे म्हणून झटने ही माझी किंवा निवृत्ति आधी डॉक्टरांची ड्यूटी होती. :)

श्रीगुरुजी's picture

8 Jan 2016 - 2:26 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद सोन्याबापू! गोपाळरावांच्या प्रतिसादांना तसाही काहीच अर्थ नसतो. ते माझे नाव पाहिले की चवताळून उठतात आणि लगेच देहभान हरपून अत्यंत विचित्र प्रतिसाद देतात. त्यांचा वरील प्रतिसादही नेहमीप्रमाणेच विचित्र आहे.

सगळ्या दिल्लीत सी सी टी व्ही लावणार होते त्याचे काय झाले हे आपल्याला सर्वाना माहित आहे.>>>>>>>>
आपला अजेन्डा समजला. दुखरी नसही कळाली.
व्यापार सुरु झाला तर अनेक गोष्टीची आयात निर्यात होऊन सामन्य जनतेला त्याचा फायदा होईल>>>>>>
आधी भारत पाकिस्तान व्यापाराचा भारतिय जागतिक व्यापरामध्ये ट्क्का बघा. आणी व्यापाराच्या निमित्ताने काही आगळीक झालीच तर?

सुबोध खरे's picture

7 Jan 2016 - 8:35 pm | सुबोध खरे

DEADPOOL साहेब
मला केजरीवाल साहेबांचा उपमर्द करायचा कोणताही हेतू नव्हता.मला आआप बद्दल काहीच वाटत नाही. प्रेम हि नाही कि द्वेष हि नाही.
मुळात सगळ्या दिल्लीत CCTV लावणे हि अव्यवहार्य योजना होती हे केजरीवाल साहेबाना माहित होते. पण अशा दिलखेचक घोषणा सामान्य माणसाना मते देण्यास उद्युक्त करतात हे समजण्याइतके ते धूर्त नक्कीच आहेत.
माझा हेतू फक्त तुलना करणे हा होता. जर साधे दिल्ली सारख्या ठिकाणी जेथे २४ तास माणसे, वीज आणी इतर संसाधने आहेत तेथे हे अशक्य आहे तर इतक्या प्रचंड लांब असणार्या सीमेवर CCTV लावणे त्यावर नजर ठेवणे हे किती कठीण आहे हे समजून घावे यासाठी हि तुलना होती.
राहिली गोष्ट व्यापाराची-- यात भारताला फायदा होण्यापेक्षा पाकिस्तानी लष्कर आणी बिनसरकारी प्याद्यांचा पैशाचा स्त्रोत आटवणे हा हेतू आहे. भारताला यात एक सहस्रांश टक्के इतका फायदा होईल हे न कळ्ण्य़ा इतके सरकारी लोक किंवा राजकारणी लोक ढ नाहीत.

राही's picture

7 Jan 2016 - 11:36 am | राही

मुद्दा क्रमांक २, ३, ४ शी विशेष सहमत.

सुबोध खरे's picture

7 Jan 2016 - 1:32 pm | सुबोध खरे

इस्रायल सारखा देश आणि तेथील राजकारण्यांची जाज्वल्य देशभक्ती पाहिली तरीही तेथेही दहशतवादी हल्ल्यात लोक बळी पडतातच ना?
स्वातंत्र्याची किंमत हि आयुष्यभर मोजत राहायला लागतेच.स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे सोपे नाही.
अजून किती शहीद हवेत हा प्रश्नच गैरलागू आहे.

बघा आता कशी पाकिस्तानांची जिरवतिल!हि काय जादूची कांडी आहे का? तुम्ही एका अण्वस्त्र सज्ज अशा बेजबाबदार राष्ट्राची गोष्ट करत आहात कि एका टिनपाट गुन्हेगाराची? तुम्हाला काय सर्वंकष युद्ध हवे आहे का? ज्यात कोट्यावधी भारतीय बळी पडतील. पाकिस्तान समूळ नष्ट होईल पण हि किंमत परवडेल का? नारेबाजी करणे सोपे आहे. मी वर लिहिले आहे तसे दावूदची आर्थिक नाकेबंदी करणे, लष्कराच्या आर्थिक नाड्या आवळणे हे उपाय सुरु केलेले आहेतच. पाकिस्तानी जनतेला जेंव्हा हे कळून चुकेल कि त्यांना बंदुका नाही तर पुस्तकांची आणि नोकर्यांची गरज आहे( शिक्षण) तेंव्हा हे लष्कर आणि दहशतवादी यांना जनतेचा आधार मिळणे कमी होईल.
गरिबी हि क्रांती आणि गुन्हेगारी यांची माता आहे. क्रांतीच्या नावाखाली निरक्षर आणि बेकार तरुणांची माथी भडकावणे जास्त सोपे असते आणि त्यातून धर्माच्या नावाखाली गुन्हेगारी हीच क्रांती आहे असे डोक्यात भरवून दिले कि दहशतवाद पसरवणे सोपे होते. त्यामुळे पाकिस्तानी जनतेची साक्षरता आणि तीवर लष्कराचा कमी होणारा ताबा हि तेथील गुन्हेगारी आणि दहशतवाद कमी होण्यासाठी मदत करेल.
तेथील लष्कराला तस्करीतून मिळणारा पैसा जर तुम्हाला तेथील जनतेकडे वळवता आला तर जनतेला लष्करापेक्षा मुलकी सरकारचे महत्त्व समजून येईल.
Journalist Lifschultz's famous article revealed that General Zia
himself was doing heroin through Hamid Hasnain, chief executive of
Habib Bank in Islamabad, who was found in possession of General Zia's
personal documents like cheque books. The man was nabbed after his
agent was arrested in Oslo in 1983. General Zia's wife Shafiqa tried to
interfere in the court case against Hamid Hasnain but was effectively
prevented by the government of Norway. Western sources named ten
Noriegas in Pakistan. Air force chief Anwar Shamim, very close to
General Zia, was refused as Zia's ambassador by Canada because his
heroin connection. In 1986, two army officers were arrested in Karachi
with 900 kilos of heroin on them worth $4 billion. Major Zahooruddin
was taken from police custody to a military base from where
he 'miraculously' escaped; Flight Lieutenant Rehman feigned illness and
escaped equally 'miraculously' from the hospital. In all, 14 officers
were arrested for heroin in 1989. In 1987, squadron leader Farooq Ahmad
Khan was arrested in New York with two kilos of heroin on him and
within a week squadron leader Qassim was arrested in Karachi.

The officers used army-owned NLC trucks to smuggle heroin (in one case
10 metric tons) across Pakistan to outlets, including National Shipping
Corporation, to be later white-washed by the BCCI which laundered $4
billion for its Pakistani patrons. Gadoon Area near Peshawar was used
for poppy growing, supported by NWFP politicians. The PPP government,
pushed by the US, pretended to move against Ayub Afridi of Landi Kotal
and Mirza Iqbal Baig of Lahore. Baig was arrested in 1989 linking him
to a Japanese courier caught in Amsterdam with 17.5 kilos of heroin in
1988. This was also a General Zia connection, But the Lahore High Court
freed Baig 'for lack of evidence'. Ayub Afridi kept dodging arrest by
moving around, in which he was 'helped' by the authorities.
Ayub 'financed' a number of PPP leaders win election. Benazir however
fired General Hameed Gul 'who was controversial for his alleged
involvement in drug trade under the Zia regime', and arrested General
Fazle Haq, fired Brigadier Imtiaz for alleged drug trade connections,
which offended the GHQ top brass. The army put together the IJI against
the PPP, comprising most of the pro-heroin elements who began bribing
the PPP members. Benazir offered a PPP ticket to Malik Waris Khan
Afridi of the Khyber Agency, making him state minister and member of
her cabinet. Other heroin peddlers whom the PPP took in its fold were
Amanullah Gichki, Muhammad Ali Rind (a former Zia connection) from
Balochistan and Malik Moin Khan Afridi who was elected to the 1988
National Assembly. Later, Zardari was reported to have run a heroin
smuggling network to enrich himself.
बाकी बलुचिस्तान किंवा सिंध प्रांतातील फुटीरतावादाला भारतीय गुप्तहेर संस्था खत पाणी घालत आहेत हा पाकिस्तानचा आरोप आहेच.

माहितगार's picture

7 Jan 2016 - 2:52 pm | माहितगार

डॉक्टर साहेब, आपल्या प्रतिसादांचे कौतुक होते आहे हा कौतुक सोहळा चालू द्यात; माझ्या दृष्टीने पहावयाचे झाल्यास 'अजून किती शहीद हवेत हा प्रश्नच गैरलागू आहे. बघा आता कशी पाकिस्तानांची जिरवतिल!हि काय जादूची कांडी आहे का? ' या आपल्या दोन मुद्यात असहमत होण्यासारखे फारसे काही नसावे परंतु अद्याप इतर काही साशंकता बाकी आहेत.

१) महत्वपूर्ण भारतीय स्ट्रॅटेजीक आस्थापनांपर्यत अतीरेक्यांना पोहोचता येऊ लागणे हि गंभीर बाब आहे यास कितपत कमी लेखावयाचे ? अशा पद्धतीने भारतीय स्ट्रॅटेजीक आस्थापनांपर्यत अतीरेक्यांना भविष्यात पोहोचता येऊ नये म्हणून नेमकी कोणती काळजी घेतली जावयास हवी ? या प्रश्नांचे विश्लेषण अथवा उत्तराचा आपल्या प्रतिसादातील नेमका भाग कोणता ?

२) आपल्या दोन्ही प्रतिसादात मिळून भारत-पाकीस्तानात व्यापार सुरळीत झाला तर सारे काही आलबेल होऊ लागेल असा सूर आहे. भारत सोडल्यास जगातल्या इतर सर्व देशांशी पाकीस्तानचा व्यापार गेली सर्व दशके सुरळीतच होता आणि आहे. पाकीस्तानी लष्करच तस्करीत सहभागी असेल (शक्यता नाकारत नाही) तर त्यांना पाकीस्तानची समुद्री सीमा उघडी आहे आणि तिथून ते तस्करी करतच असणार.

अगदी अलिकडचा आमेरीकेत पाकीस्तानी वंशाच्या लोकांकडून झालेला दहशतवाद तपासला तर ती मंडळी साक्षर सुद्धा होती आणि पाकीस्तान आमेरीकेचा व्यापार बर्‍यापैकी सुरळीत असावा. पाकीस्तान निर्मितीच्या वेळी द्वीराष्ट्रवादाची मांडणी करणार्‍यातील बरीच मंडळी साक्षर वगैरे असावीत.

३) गरिबीचा शांततामय मार्गापासून भटकण्याशी संबंध असू शकतो यावरून असतोच आणि मग गरिबी संपली की सगळे आलबेल ? केवळ गरिबीमुळे लोक दहशत वादाच्या तत्त्वज्ञानास बळी पडतात गरीबी नसेलतर दहशतवादापासून दुर जातील हे विधानही साशंकता असलेले आहे.

पाकीस्तानचे परकॅपिटा इनकम भारतापेक्षा कमी आहे किंवा गरिब आणि श्रीमंतीतील दरी भारतापेक्षा अल्पशी अधीक आहे पण हे फरक आपली थेअरी स्विकार्य ठरावी एवढेही मोठे नसावेत. त्या अर्थाने बांग्लादेशात पाकीस्तानापेक्षा अधिक गरिबी आहे आणि तेथून अधिक अतिरेकी यावयास हवेत पण तसे होताना दिसत नाही त्यामुळे आपले हे तर्क रिव्हिजीट करण्याची गरज आहे किंवा कसे.

संदीप डांगे's picture

7 Jan 2016 - 5:37 pm | संदीप डांगे

प्रतिसाद आवडला.

सुबोध खरे's picture

7 Jan 2016 - 6:19 pm | सुबोध खरे

माहितगार
तो प्रतिसाद आपल्याला नव्हता. वेळ मिळाला कि आपल्याला सविस्तर प्रतिसाद देतो. कृपया वाट पहा
धन्यवाद.

सुबोध खरे's picture

8 Jan 2016 - 8:38 pm | सुबोध खरे

माहितगार साहेब
सर्वच्या सर्व लष्करी विमानतळाभोवती किमान १२ फुटाची संरक्षक भिंत असते आणि त्यावर काटेरी तारेचे कुंपण असते. प्रत्येक विमानतळाच्या आतमध्ये थोड्या थोड्या अंतरावर निरीक्षणासाठी मनोरे असतात आणि त्या मनोर्यावर सर्चलाईट पण असतात. त्या मनोर्यावर २४ x ७ सैनिकांचा खद पहारा असतो. दहशतवादी (मुख्य फाटकातून कि) कसे आत शिरले ते अजून उघड झालेले नाही.
सीमेतील कोणत्या भागातून दहशतवाद्यांना आत घुसवता येईल याची पूर्ण पाहणी आणि तयारी पाकिस्तानी लष्कराच्या मदती शिवाय होणे शक्य नाही.
मी लष्कर म्हणतो ते अधिकृत लष्करच आहे (लष्कर ए तय्यबा सारखे गैर अधिकारी लोक नव्हेत.त्यांना लष्कर मानणे हा लष्कराचा अपमान आहे.) या तयारीला आणि डावपेचाला काही महिने लागतात. त्यातून सुद्धा त्यांचे ९९ % बेत आपले लष्कर आणि सीमा सुरक्षा दल हाणून पडत असतात. पण हे असे पराभूत केलेले डावपेच काही लष्कर / सीमा सुरक्षा दल आपल्या "मार्केटिंग विभागाकडून" जाहिरात करीत नाहीत.
ज्या उरलेल्या १% डावपेचात ते सफल होण्याची शक्यता असते त्याला आळा कसा घालायचा आणि त्याचा निपटा कसा करायचा याचे डावपेच सुद्धा लष्कर( सीमा सुरक्षा दल करत असतेच).
काही लोकांच्या बोलण्यात "शांततेच्या काळात लष्कर स्वस्त मिळणारी दारू पिउन पार्टी करत असते" असे मी ऐकले आहे. अशा विचाराच्या लोकांकडे दुर्लक्ष करणेच सोयीस्कर आहे.
महत्वाच्या लष्करी तळापर्यंत दहशतवादी पोहोचू नयेत हि काळजी सर्वच देश घेत असतात. तरीही ज्या दहशतवाद्यांना दुसर्या राष्ट्राच्या गुप्तहेर खात्याचे सहाय्य मिळते त्याच्या जवळ उपकरणे पैसा आणी गुप्त महिती जास्त असणार आणी त्यामुळेच त्यांचे काम जास्त सोपे होते. याच साठी भारतीय लष्कर, गुप्तहेर खाते आणी सीमा सुरक्षा दलाचे काम जास्त कठीण आहे. वर बर्याच लोकांनी फारसा विचार न करता नुसते आरोप केलेले आहेत.
लिहिण्यासारखे बरेच आहे पण लोकांना पाहिजे तसे प्रतिसाद न आल्यास फाटे फोडण्यात समाधान मानणार्या लोकांशी वितंडवाद घालण्यात काही हशील नाही. श्री गुरुजींनी एक दुवा दिला आहे तो हि वाचून घ्या.

माहितगार's picture

8 Jan 2016 - 9:18 pm | माहितगार

मी लष्कर म्हणतो ते अधिकृत लष्करच आहे (लष्कर ए तय्यबा सारखे गैर अधिकारी लोक नव्हेत.त्यांना लष्कर मानणे हा लष्कराचा अपमान आहे.)

डॉक्टर साहेब 'पाकीस्तानी लष्कराचा' उल्लेख नुसते लष्कर या शब्दाने नव्हे तर 'पाकीस्तानी लष्कर' करावा अशी अपेक्षा ठेऊन आहे.

बाकी कुठे राजकीय दृष्टीने बघावे आणि कुठे नाही याचे तारतम्य नसलेली मंडळी सर्वत्र असतात, तुमचे आणि श्री गुरुजींचे प्रतिसाद त्यांच्या कडे फोकस्ड असतील तर तो तुमच्या राजकीय दृष्टीकोनांचा भाग झाला. माझ्या सारखी मंडळी राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांकडे बिगर राजकीय दृष्टीने बघतात, आमची अपेक्षा राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत राजकीय पवित्रेबाजी पलिकडे जाऊन विश्लेषणे करून पुढे काय आणि कोणत्या सुधारणांच्या पायर्‍या घेतल्या जातात हे पाहण्याची असते. या धाग्यावरील प्रतिसादातून अद्यापतरी तशी चर्चा वाचण्याचे समाधान मिळालेले नाही.

लिओ's picture

7 Jan 2016 - 6:28 pm | लिओ

१) भारत आणि पाकिस्तानची सीमा २९००( दोन हजार नऊ शे किमी आहे). किती अंतरावर आणि कसे सी सी टी व्ही लावणार? त्याच्यावर २४ X ७ लक्ष ठेवायचे कुणी आणि कसे त्याला लागणारी वीज आणि देख्भैसाठी लागणारा खर्च कसा आणि कुणी करायचा?
सगळ्या दिल्लीत सी सी टी व्ही लावणार होते त्याचे काय झाले हे आपल्याला सर्वाना माहित आहे.

आंतरराष्ट्रीय सीमा हा सर्वस्वी केन्द्र सरकारच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. केन्द्र सरकारने छान काम केले तर कौतुक नक्किच होइल. त्याची तुलना " दिल्ली राज्य सरकार " बरोबर कशाला?. २९०० किमी सीमा संभाळणे हा साक्षात्कार ६० वर्षांने सत्तेत आल्यावर झाला का ?

२) पंजाब शांत असला तरीही त्यात खालीस्तानचे स्वप्न उराशी बाळगून असणारे लोक कमी नाहीत.अशा काही असंतुष्ट लोकांना हाताशी धरून घातपाती कृत्य करणे एखाद्या राष्ट्राला करणे सहज शक्य असते.

थोडयाफार फरकाने दहशदवाद पंजाब व काश्मीर येथे सुरु झाला. आज पंजाब मधील दहशदवाद औषधासाठी असेल (पुर्ण सम्पला बोलणे धाड्साचे होइल) . पण काश्मीर येथे थोडाफार आहे. पंजाब मधील दहशदवाद भरपुर कमी होण्यास कोण कारणीभुत कोण? सरकार का सुरक्षा यन्त्रना की पंजाब मधील लोक....... बोलण्याचा उद्देश असा कि एखाद्या राष्ट्राकडे बोट हव्या त्या पध्दतीने करुन आपली जबाबदारी टाळु शकत नाहि ६० वर्षा नन्तर सुध्दा तेच तेच विधान एकत बसायचे काय ?

३) पाकिस्तान लष्कराला शांतता नकोच आहे कारण शांततेच्या काळात लष्कराचे महत्त्व कमी होत जाते. यासाठी दहशतवाद्यांना हाताशी धरून अशी कृत्ये घडवून आणली जाणारच हे आपल्या सरकारला माहित आहे. शिवाय भारत पाकिस्तान मध्ये व्यापार सुरु झाला तर अनेक गोष्टीची आयात निर्यात होऊन सामन्य जनतेला त्याचा फायदा होईल पण या गोष्टींच्या तस्करीला आळा बसेल. उदा पाकिस्तानात पान कोपर्या कोपर्यावर मिळते पण ते सर्व भारतातून तस्करी करून आणलेले असते. जर व्यापार सुरळीत झाला तर भारत आणि पाकिस्तान सरकारला कर मिळेल पण तस्कर आणि लष्कर यांचा हितसंबंध दुखावतो. असे अनेक उद्योग आहेत. यात लष्कराचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्यामुळे त्यांना भारत पाकिस्तान व्यापारी संबंध सुरळीत होणे परवडणारे नाही. या न त्या प्रकारे ते त्यात खीळ घालण्याचा प्रयत्न करणारच.

जर पाकिस्तानात पान भारतातून तस्करी करून जात असेल तर मी असे म्हणेन कि भारतात पान तस्करी माध्यमातुन काळा पैसा तयार होत आहे. सरकारने सध्या तयार होणारा हा "काळा पैसा" रोखावा. ते पान पाकिस्तान लष्करातील लोक / अतिरेकी खातात आणि भारतात येवुन थुन्कतात.

४) दहशत वाद्यांच्या या कारवाईची तयारी कमीत कमी ४-६ महिने चालू असल्याशिवाय त्यांना भारतीय वायुसेनेच्या तळावर हल्ला करणे शक्य नव्हते. तेंव्हा हि कारवाई लगेच झाली हे म्हणणे सोपे आहे.

दहशत वाद्यांनी भारतीय वायुसेनेच्या तळावर हल्लाचा सराव काहि पाकीस्तानी विमानतळावर केला अशी बातमी आली. आता यावर काय बोलायचे .

५) वायुसेनेच्या तळावर हल्ला होऊन एकही विमान किंवा महत्त्वाची उपकरणे दहशतवाद्यांना नष्ट करता आली नाहीत हि एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण या गोष्टी कुठे आहेत याची संपूर्ण माहिती त्यांना होती तरीही भारतीय गुप्तहेर खात्याने त्यांचा हा बेत नाकाम ठरवला. या उलट पाकिस्तान च्या नौदलाच्या तळावर हल्ला झाला तेंव्हा तेथे त्यांनी १८ सैनिक मारले आणि P ३ C ओरायन हि (३५० कोटी रुपयांना एक अशी) दोन विमाने नष्ट केली.

भारतीय गुप्तहेर खाते व सशस्त्र सेनेने हा बेत हाणुन पाडला.

पठाणकोट एअरबेस वर अतिरेकि एका पोलिस आयुक्तच्या गाडितुन धोका देवुन गेले. अन्यथा हि कारवाइ एअरबेस गेटवरच झालि असती. व्ही आय पी लोकाना अडवायचे कसे या मानसिकतेचा फायदा अतिरेक्यानी घेतला हे फार लाजिरवाणे.

६) मोदी साहेबांनी संयुक्त अरब ऐमिरातीशी केलेल्या करारात दावूद इब्राहीम ची मालमत्ता गोठवण्याची सुरुवात झालेली आहे.दावूदची मालमत्ता लष्कराच्या आशीर्वादानेच उभी राहिली आहे आणि त्यात लष्कराच हातही आहे. त्यामुळे असे होणे हे त्यांना महाग पडू लागले आहे. http://www.oneindia.com/india/dawoods-bad-days-begin-as-uae-probes-his-p...

हि काय मोठी बातमी आहे. ??????

काँग्रेसचे लोक दावुदला काहि करु शकत नाहित असा एक समज आहे ..दावुद ला युती / वाजपेयी काळात दणका दिला असता तर बरे झाले असते, आज केंद्रात भा ज प सरकार असुन पुर्वी दावुद ची भारतातील मालमत्ता खरेदी केलेल लोक न्यायालयात चकरा मारत आहेत मालमत्तेचा ताबा मिळावा म्हणुन.

७) मी एकदा असे म्हटले होते कि प्रत्येक माणसाला असे वाटते कि राजकारण आणि क्रिकेट यात आपल्याला सगळे समजते आणि त्यावर खास टिप्पणी करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे सचिन तेंडूलकर ने ब्याट कोणती वापरावी पासून पंतप्रधानांनी चीन पाकिस्तान बरोबर संबंध सुधारणे कसे चूक आहे यावर आपण सल्ला देऊ शकतो.

सल्ला देण्याची बिलकुल इच्छा नहि.

जेव्हा चीनी पन्त्प्रधान थेट अहमदाबाद येथे दौरयावर आले तेव्हाच चीनी सैन्याने लडाख प्रदेशात अतिक्रमण केले होते, तेव्हा अतिक्रमण सोडुन बाकी गोष्टीनचा उदो उदो केला गेला.

कशाला सल्ला देवु ????????

ज्या लाहोरच्या वेशीवर भारतीय सैन्याने ६५ व ७१ च्या युध्दात धडक मारली होती त्या लाहोरला international / political protocall तोडुन स्वतंत्र भारतात जन्मलेले भारतीय पन्त्प्रधान विमानाने गुपचुप जाउन आले. ६० वर्षात असे घडले नव्हते.

सुबोध खरे's picture

8 Jan 2016 - 8:47 pm | सुबोध खरे

बोलण्याचा उद्देश असा कि एखाद्या राष्ट्राकडे बोट हव्या त्या पध्दतीने करुन आपली जबाबदारी टाळु शकत नाहि ६० वर्षा नन्तर सुध्दा तेच तेच विधान एकत बसायचे काय ?
६० वर्षात असे घडले नव्हते.
मग लष्कराने, मोदी साहेबांनी आणी सीमा सुरक्षा दलाने काय काय करायला हवे आहे हे तरी सांगा?

रामपुरी's picture

7 Jan 2016 - 10:27 pm | रामपुरी

यापुढे "डिप्लोमसि" शी संबंधित सगळे निर्णय फक्त तुमचेच असतील असा कायदाच करून टाकू आपण. हाकानाका.

श्रीगुरुजी's picture

8 Jan 2016 - 2:41 pm | श्रीगुरुजी

याच विषयावर हा एक वेगळे मुद्दे मांडणारा लेख -

How swift action saved the day in Pathankot

नितिन थत्ते's picture

8 Jan 2016 - 9:50 pm | नितिन थत्ते

२६/११/२००८ च्या मुंबई हल्ल्याशी या हल्ल्याची तुलना केली तर.........

मुंबई हल्ला तीन चार ठिकाणी एकाच वेळी झाला होता. हा हल्ला एकाच ठिकाणी होता.

मुंबई हल्ला अचानक झाला होता. या हल्ल्यावेळी विमाने हल्ल्याच्या सहा तास आधी हलवली म्हणतात. तेव्हा हल्ल्याची पूर्वकल्पना होती.

मुंबई हल्ला नागरी ठिकाणांवर झाला. त्या ठिकाणी सुरक्षा अत्यंत कडक असणे अपेक्षित नसते. हा हल्ला सीमेजवळच्या लष्करी तळावर झाला जेथे नेहमीच सतर्कता आणि तयारी अपेक्षित असते.

मुंबई हल्ल्यावेळी हल्ल्याच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक उपस्थित होते. प्रतिकारावेळी त्यांना कमीतकमी धोका होईल हे पाहणे महत्त्वाचे होते. या हल्ल्याच्या वेळी अशी परिस्थिती नव्हती.

वरची तुलना* पाहता अतिरेक्यांना काबूत आणण्यास मुंबई हल्ल्याइतकाच किंवा अधिक वेळ लागला. हे लष्कर/कमांडो यांच्यासाठी काळजीचे कारण असावे. त्याचे आत्मपरीक्षण ते करतील अशी आशा आहे.

*आणखी एक फरकाचा मुद्दा मनात आला होता पण आता तो व्हॅलिड राहिलाय का अशी शंका आली म्हणून तो लिहिला नाही.

नितिन थत्ते's picture

8 Jan 2016 - 9:53 pm | नितिन थत्ते

स्विफ्ट अ‍ॅक्शन सेव्ह्ड द डे या विषयासंदर्भात हा प्रतिसाद दिला आहे.

@ नितिन थत्ते

स्विफ्ट अ‍ॅक्शन सेव्ह्ड द डे अनुशंगाने तुम्हि जे लिहिले त्या संदर्भात एक मत लिहावे असे वाट्ते

हल्ल्याची पूर्वकल्पना होती.

हल्ल्याची पूर्वकल्पना होती तर प्रतिहल्ल्याची तयारी पण झालीच असणार. पण अशी टिप मिळाली होती का अतिरेकी सरकारी / पोलिस अधिक्षकाच्या गाडीतुन घात करुन येतील म्हणुन. मुंबई हल्ल्यानन्तर व्ही व्ही व्ही आय पी शाणे झालेत असे वाट्ते काय ??
आज पण व्ही व्ही व्ही आय ना सिक्युरीटि चेक ला कसे अड्वायचे हा सुरक्षा यंत्रणाना प्रशन पड्तोच.

लष्कर/कमांडो यांची काय झाल्यावर काय करायचे याची SOP ठरलेली असते.

कृपा करून भारतीय सशस्त्र सेनेवर शंका करु नका. आज आपण जी लोकशाही "न कळणारया" आनन्दात जगतो कारण भारतीय सशस्त्र सेनेला माहीत आहे की बराकीत कधी जायचे आणि बराकीबाहेर कधी यायचे ते पण एकदा या देशाने आणिबाणी अनुभलेली असताना.

श्रीगुरुजी's picture

9 Jan 2016 - 2:55 pm | श्रीगुरुजी

सलविंदर सिंग नावाच्या एसपीचे अपहरण करून त्याच्याच गाडीतून अतिरेकी लष्करी तळावर पोहोचले. दरम्यान त्याच्याबद्दल संशय न आल्याने त्याला अतिरेक्यांनी न मारता सोडून दिले असे त्याचे सांगणे होते. हाच सलविंदर सिंग आता संशयाच्या भोवर्‍यात आहे. एनआयए ला त्याच्या जबानीत विसंगती आढळली आहे. अतिरेक्यांनी त्याची गाडी वापरणे व त्याला न ओळखता न मारता सोडून देणे हे एनआयए ला संशयास्पद वाटत आहे. त्यामुळे आता त्याची चौकशी सुरू असून कदाचित त्याची सत्यशोधक चाचणी होण्याची देखील शक्यता आहे.

पठाणकोट तळाच्या सुरक्षा भिंतीवरील ३ फ्लड लाईट्स दिशा बदलून ठेवलेले आढळले आहेत. त्यासंबंधात एका तांत्रिक कर्मचार्‍याची चौकशी सुरू आहे.

एकंदरीत तळावरील कोणीतरी फितूर झाल्याने अतिरेक्यांना तळात प्रवेश करता आला या अंदाजावर चौकशी सुरू आहे.

खरे खोटे खुदा जाने!

काळा पहाड's picture

9 Jan 2016 - 7:09 pm | काळा पहाड

गंमत अशी आहे, की नक्की काय झालंय याची माहिती न घेताच लोक लिहीत असतात. हल्ला होणार आहे (आणि तो तळाबाहेरून होणार आहे) असं इंटेलिजन्स इन्पूट होतं. हे इंटेलिजन्स इनपूट दिल्ली ला कळायला वेळ लागला कारण स्थानिक पोलिसांनी वेळ घेतला. पण त्या आधीच अतिरेकी तळात घुसले होते याची कल्पना सुद्धा संबंधीत लोकांना आली नाही. हल्ला बाहेरून होण्याऐवजी आतूनच आत झाला (http://indianexpress.com/article/india/india-news-india/pathankot-attack...). बाहेर केलेली सर्व तयारी त्यामुळे वाया गेली. शिवाय नक्की हल्ला कुठे होणार आहे ते कुणालाच माहिती नव्हतं कारण पठाणकोट ला बाकीची पण इन्स्टॉलेशन्स आहेत (तसंच मिसाईलचा तळ सुद्धा आहे). तरीसुद्धा गरुडांनी आणि एन एस जी नं अतिरेक्यांना २५०मी बाय २५०मी एरियात कोंडलं होतं. मारले गेलेले बहुतांश दुर्दैवाने मारले गेलेले आहेत. अतिरेक्यांच्या हुशारीमुळे नव्हे.

भाग १: http://indianexpress.com/article/india/india-news-india/probing-pathanko...
भाग २: http://indianexpress.com/article/india/india-news-india/probing-pathanko...
भाग ३: http://indianexpress.com/article/india/india-news-india/probing-pathanko...

नमकिन's picture

9 Jan 2016 - 10:39 pm | नमकिन

कितीही मागे गेलो तरी पाकिस्तान सोबत जेव्हा केव्हा भारतीय (सरकारी स्तर) चर्चा करतात तेव्हा लागोलग अतिरेकी हल्ले होत राहिले व सामान्य नागरिकांचे प्राण जात राहिले. याला विपक्ष नेहमीच गाफिलपणा म्हणत आला.
आजच्या समयी मोदी सरकार अतिउत्साही म्हणून पुन्हा गाफिल राहीले व पुनःश्च पाक अतिरेकी मनात आणल्यावर कुठेही नागरी भागात हल्ला लीलया करु शकतात हे दिसले, किंबहुना लष्करी तळावर हल्ला होणे तोदेखील सीमे पलीकडुन हे अधोरेखांकित करते की आपले रक्षणकर्ते आजही झोपा काढतायत व सरकारला कधीच सोयरंसुतक नव्हते.
याखेपेला तर मी परखडपणे असे म्हणेन की " आ बैल मुझे मार".

अनुप ढेरे's picture

10 Jan 2016 - 10:40 am | अनुप ढेरे

यात सगळ्यात संशयास्पद हे बीएसेफ आणि पंजाब पोलिस आहेत. तो पंजाब पोलिस एस्पी हा सपोजेडली बॉर्डरवर ड्रग डील फायनलाइज करायला गेला होता. ड्रग डीलर्स अतिरेकी निघाले अशीही थिअरी आहे.

बीएसेफ्च्या हवालदाराला अटक देखील झाली आहे.
http://indiatoday.intoday.in/story/pathankot-terror-attack-bsf-mans-arre...