मुम्बईचे पो. उ. आयुक्त प्रसाद यांचे वक्तव्य- मुम्बई कोणाच्या 'बापाची' नाही.

केवळ_विशेष's picture
केवळ_विशेष in काथ्याकूट
11 Sep 2008 - 5:19 pm
गाभा: 

मुम्बईचे पो. उ. आयुक्त के.एल. प्रसाद यांचे वक्तव्य- मुम्बई कोणाच्या 'बापाची' नाही.

कालच टि. वी वर वरील बातमी पाहिली.

या पदावर असणार्‍या व्यक्तीला एवढी गुर्मी कशी काय चढते? आपल्या बोलण्याचे काय परिणाम होतील याचा काहीच विचार करायचा नाही का? की, एकदा हातात सत्ता आली की आपण कोणाचीही "ठासू" शकतो, हा व्यावहारीक माज?!

आपण कोणत्या पदावर आहोत, त्या मूर्ख (जया) बाईच्या वक्तव्यामुळे आधीच वातावरण ढवळून निघत असतांना अशी बाष्फळ बडबड म्हणजे चिथावल्यासरखे होणार नाही का?

यात भरडले जाणार ते सामान्य मराठी पोलिस. कारण जर मनसे कार्यकर्ते पेटून उठले तर पोलिसच त्यांना आदेशानुसार चेपायला बघणार! पटत नसूनही!

या आय. ए. एस केडर च्या लोकांना त्यांचा प्रांत सोडून इतर कशाशीही विशेष घेणे-देणे नसते. जर तुमची नाळच त्या मुलुखाशी, त्या मातीशी जुळली नसेल तरच बहुधा अशी वक्तव्य करायला जबाब्दार पदावरची व्यक्ति धजावत असेल का? (अपवाद नक्कीच आहेत, असतीलही, पण हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच)
[फार कमी वेळा मराठी माणूस या पदावर असावा. (उदा- डॉ. धनंजय जाधव). त्यांनी अशी वक्तव्य केल्याचे स्मरत नाही.]

प्रतिक्रिया

शुक्राची चान्दनी's picture

11 Sep 2008 - 5:29 pm | शुक्राची चान्दनी

बोलुन चालुन नोन महाराश्त्रियन

अनिता's picture

11 Sep 2008 - 6:03 pm | अनिता

खरे आहे..

>जर तुमची नाळच त्या मुलुखाशी, त्या मातीशी जुळली नसेल

अगदी पटले..
>नोन महाराश्त्रियन
:) रशियन वाटते.

बन्या बापु's picture

11 Sep 2008 - 10:05 pm | बन्या बापु

या प्रसाद सारख्या माणसाला जोडयाने बडवला पाहिजे.

प्रभाकर पेठकर's picture

11 Sep 2008 - 10:10 pm | प्रभाकर पेठकर

मुंबई के.एल्. प्रसादच्याही बापाची नाही.
प्रक्षोभक भाषणे करण्यासाठी राज ठाकरेंवर भाषण बंदी वगैरे कारवाई केली गेली. के.एल् . प्रसादचे 'मुंबई कोणाच्या बापाची नाही' हे वाक्य प्रक्षोभक नाही का? मराठी माणसांच्या भावना भडकविणारे नाही काय? के.एल्. प्रसाद ह्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि गुन्हा शाबित झाला तर बडतर्फ करून कारावास घडविला पाहिजे.

इनोबा म्हणे's picture

11 Sep 2008 - 11:39 pm | इनोबा म्हणे

सहमत आहे

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

देवदत्त's picture

12 Sep 2008 - 12:04 am | देवदत्त

पूर्णतः सहमत.

सर्वसाक्षी's picture

11 Sep 2008 - 11:19 pm | सर्वसाक्षी

राज ठाकरे यांनी आज जाहिरपणे वापरली आहे - "हिंमत असेल तर गणवेष उतरवा आणि रस्त्यावर उतरा!"

जिथे प्रशासन अशी भाषा वापरते तिथे कुणीही काहीही बोलले तर ते वावगे ठरू नये. अखेर ज्याला जी भाषा समजेल तीच भाषा वापरणे रास्त.

इनोबा म्हणे's picture

11 Sep 2008 - 11:48 pm | इनोबा म्हणे

"हिंमत असेल तर गणवेष उतरवा आणि रस्त्यावर उतरा!"
प्रसाद यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आता हे करुन दाखवावेच.
राज यांच्या या सडेतोड उत्तराबद्दल त्यांचे अभिनंदन!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर's picture

12 Sep 2008 - 7:22 am | विसोबा खेचर

प्रसादची गुर्मी लौकरच उतरेल!

'मुम्बई कुणाच्या बापाची नाही..' हे त्याचे विधान मराठीच्या अन् महाराष्ट्राच्या द्वेषापायी जन्माला आले आहे.

त्याला जोड्याने बडवला पाहिजे हेच खरे!

तात्या.

छोटा डॉन's picture

12 Sep 2008 - 7:40 am | छोटा डॉन

'मुम्बई कुणाच्या बापाची नाही..' हे त्याचे विधान मराठीच्या अन् महाराष्ट्राच्या द्वेषापायी जन्माला आले आहे.
त्याला जोड्याने बडवला पाहिजे हेच खरे!

अंगावर चढवलेल्या वर्दीच्या ताकदीच्या जोरावर हा माज करतो आहे दिसते ...
राज ठाकरे म्हणतात तेच खरे. त्याच्यात हिंमत असेल तर त्याने खरेच "वर्दी उतरवुन" मग बोलाबे, मग कळेल मुंबई कुणाच्या बापाची आहे ते. आधी रस्त्यावर तर ये म्हणावं स्वतःवरची " सिस्टीमची कवचकुंडले" उतरवुन ...
आम्हाला एक म्हण माहित आहे बॉ " कुत्ता अपनी गली मे शेर होता है " , हिंदीतुन असल्याने "प्रसाद" ला ही समजेल.
अजुन काय बोलायचे, अर्थ समजण्याएवढा सुज्ञपणा तरी असेलच ...

अवांतर : मागे सुद्धा "हात-पाय तोडायची" भाषा करणार्‍या हा प्रसादचा "बोलाविता धनी" कुणीतरी तिसराच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्या जोरावरच माज चालु आहे.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

एकलव्य's picture

12 Sep 2008 - 7:30 am | एकलव्य

आहे मुंबई! आता काय बोलतोस बोल?

- एकलव्य

प्रकाश घाटपांडे's picture

12 Sep 2008 - 8:29 am | प्रकाश घाटपांडे

ज्यांच्या बापाचं आयुष्य मंबैत गेलय आन पोरग बी मंबैतच र्‍हातय. मंबै त्याची बापाची नव्ह का?
प्रकाश घाटपांडे

सुचेल तसं's picture

12 Sep 2008 - 8:50 am | सुचेल तसं

शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांचं सडेतोड प्रत्युत्तरः (सौजन्य: सकाळ)

मुंबई ही आमच्याच बापाची आहे.
तुमच्यासारख्या घटनेच्या आधारे आक्रमण करणाऱ्या परप्रांतीयांची तर मुळीच नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. तसेच वर्दीची गुर्मी घेऊन महाराष्ट्रातून दिल्लीत जावे, अशी सूचनाही शिवसेनेने केली आहे.

प्रसाद यांनी काल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी प्रसाद यांना आज दोन पानी खरमरीत पत्र लिहिले आहे. यात रावते म्हणतात, प्रसाद हे एका मोठ्या पदावर आहेत; मात्र त्यांनी वापरलेली भाषा ही गल्लीबोळातील गावगुंडांनी वापरावी तशी आहे. अशा वक्तव्यांनी त्यांनी मुंबईकरांचा घोर अवमान केला आहे. एखाद्याचा बाप काढणे, हे महाराष्ट्रात असंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. आपली मातृभाषा मराठी नसल्यामुळे त्यांना समजले नसेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मुंबईकरांचा बाप काढणे याला अधिकाराचा अहंकार आणि वर्दीची मस्ती म्हणतात, असे नमूद करून रावते म्हणतात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीत आणि त्यांच्या मुशीतून तयार झालेल्या शिवसैनिकांनी आजपर्यंत पोलिसांच्या वर्दीचे अनेक वळ आपल्या पाठीवर झेलले आहेत.

मुंबई ही महाराष्ट्राला १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळाली आहे. ही मुंबई आगरी, कोळी, भंडारी, चौकळशी, पाचकळशी आदी मूळ रहिवाशांच्या बापाचीच आहे. आम्ही या मुंबईचे सात पिढ्या नाही तर त्यापूर्वीपासूनचे रहिवासी आहोत. पं. जवाहरलाल नेहरूंनाही मराठी माणसांच्या स्वाभिमानाने वाकायला लावले आहे, तेथे तुम्ही कोण, असा सवालही त्यांनी केला आहे

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

सखाराम_गटणे™'s picture

12 Sep 2008 - 9:13 am | सखाराम_गटणे™

दुवा
http://esakal.com/esakal/09122008/Specialnews518895444A.htm

>>सुचेल तसं
माहीती दिल्याबद्दल आभार

टग्या's picture

16 Sep 2008 - 4:58 am | टग्या (not verified)

एखाद्याचा बाप काढणे, हे महाराष्ट्रात असंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. आपली मातृभाषा मराठी नसल्यामुळे त्यांना समजले नसेल...

बरोबर, पण...

"मुंबई आहे आमची, नाही कुणाच्या बापाची" ही बहुधा शिवसेनेचीच एके काळची घोषणा होती, असे अंधुकसे स्मरते. यात काही असंस्कृतपणाचे लक्षण आहे, हे घोषणा करणारांना बहुधा त्यांची मातृभाषा मराठी नसल्यामुळे समजले नसावे.

ही मुंबई आगरी, कोळी, भंडारी, चौकळशी, पाचकळशी आदी मूळ रहिवाशांच्या बापाचीच आहे. आम्ही या मुंबईचे सात पिढ्या नाही तर त्यापूर्वीपासूनचे रहिवासी आहोत.

अधोरेखित वाक्य अगदी बरोबर. या यादीत कदाचित पाठारे प्रभू आणि ईस्ट इंडियन म्हणवणारा ख्रिस्ती समाज, झालेच तर डोंगरीचे मुसलमान यांचाही समावेश करता येईल, जो बहुधा अनवधानाने राहिला असावा. हे सर्व मुंबईचे मूळ रहिवासी. पारशी लोकसुद्धा मूळ रहिवासी नसले तरी किमान तीनचार शतकांपासून आणि निश्चितच सातआठ पिढ्यांपासून मुंबईत राहत असल्याने त्यांना मूळ रहिवाशांत गणायला हरकत नसावी. या सर्व लोकांना मुंबई आपल्या बापाची म्हणण्याचा अधिकार निश्चितच आहे.

पण गेल्या एकदीड शतकांत (आणि बहुधा दोन किंवा फारतर तीन पिढ्यांपूर्वी) किंवा त्याहीपेक्षा कमी काळात महाराष्ट्राच्या इतर भागांतून मुंबईत स्थलांतरित झालेल्या मराठीभाषकांचा मुंबई आपल्या बापाची आहे हे म्हणण्याचा अधिकार याच कालावधीत भारताच्या महाराष्ट्राबाहेरील इतर भागांतून मुंबईत स्थलांतरित झालेल्या अमराठीभाषकांपेक्षा अधिक नेमका कसा? मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सोडा, मुंबईच्या मराठीभाषक लोकसंख्येच्या तुलनेत तरी वरील यादीतल्या "मूळ रहिवाश्यां"चे प्रमाण किती? आणि "मूळ रहिवासी" / "सात पिढ्यांपूर्वीपासूनचे रहिवासी" हाच निकष जर लावायचा म्हटला, तर मग मुंबई आपल्या बापाची म्हणण्याचा अधिकार मुंबईच्या लोकसंख्येपैकी नेमक्या कितीशा जणांना राहतो?

आणि महाराष्ट्राच्या इतर भागांतून स्थलांतरित झालेल्या मराठीभाषकांनी तरी वरील यादीतल्या "मूळ रहिवाश्यां"च्या मूळ संस्कृतीचा नेमका काय आदर ठेवलाय किंवा जपणू़क केलीय? या "मूळ रहिवाश्यां"च्या मूळ संस्कृतीबद्दल कल्पनासुद्धा या स्थलांतरित मराठीभाषकांपैकी कितीजणांना असते?

(एक कुतूहल: "ठाकरे" हे आडनाव नेमके कोणत्या समाजातले? हा समाज वरील "मूळ रहिवाश्यां"च्या यादीत मोडतो का? ठाकरे कुटुंब सात पिढ्यांपासून किंवा त्याही आधीपासून मुंबईत स्थायिक आहे का? नसल्यास मुंबईत नेमके कधी स्थलांतरित झाले? हा इतिहास मिळाल्यास मनोरंजक ठरावा. बहुधा शोधल्यास जालावर सापडणे कठीणही नसावे.)

तुमच्यासारख्या घटनेच्या आधारे आक्रमण करणाऱ्या परप्रांतीयांची तर मुळीच नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

म्हणजे भारतीय घटनेप्रमाणे तथाकथित परप्रांतीयांना मुंबईत स्थायिक होण्याचा अधिकार (दुर्दैवाने) आहे हे शिवसेनेस मान्य आहे तर! मग ही "आक्रमणा"ची समस्या सोडवण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे भारतीय राज्यघटना धुडकावून लावणे (अर्थात राष्ट्रद्रोह) आणि कायदा हातात घेणे. अर्थात भारत हे आपले राष्ट्र नाही ही जर भूमिका असेल तर मग राष्ट्रद्रोहाचा मुद्दा रद्दबातल ठरावा आणि त्याने फरक पडू नये. पण इतकीही टोकाची भूमिका नसावी असे मानण्यास जागा आहे. मग राहतो दुसरा (घटनात्मक) मार्ग. तो म्हणजे अमराठीभाषकांस मुंबईत स्थायिक होता येऊ नये यासाठी घटनात्मक तरतुदींचा (जसे, मुंबईत स्थावर मालमत्ता विकत घेण्यास अमराठीभाषकांस बंदी वगैरे) भारतीय घटनेत समावेश करण्याचा आग्रह, आणि गरज पडल्यास त्यासाठी आंदोलन. हे करता येणे अगदीच अशक्य नसावे; मात्र हा एक निसरड्या उताराचा (स्लिपरी स्लोप) मार्ग असावा. कारण भारतीय राज्यघटनेच्या ३७०व्या कलमानुसार जम्मू आणि कश्मीर राज्यासाठी नेमक्या अशाच प्रकारच्या काही विशेष तरतुदी आहेत. आणि एकदा का मुंबईसाठी अशा घटनात्मक तरतुदींची मागणी केली, की मग जम्मू आणि कश्मीरसाठी नेमक्या तशाच प्रकारच्या तरतुदी असलेल्या ३७०व्या कलमाचा ते राष्ट्रविघातक असल्याच्या मुद्द्यावरून विरोध करण्याचा नैतिक अधिकार जातो, नाही?

राहता राहिला प्रश्न हा सर्व गदारोळ ज्यामुळे सुरू झाला त्या जया बच्चन यांच्या मूळ विधानाचा. या विधानामागच्या उपहासाबद्दल दुमत नसावे. हे विधान मूर्खपणाचे आहे असेही कदाचित म्हणता येईल. पण उपहास काय किंवा मूर्खपणा काय, दोन्ही कोठल्याही कायद्यान्वये गुन्हे नाहीत. आणि मराठी अस्मिता ही अशी कोणाच्याही फालतू विधानाने दुखावली जाण्याइतकी तकलादू निश्चितच नसावी असे वाटते.

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2008 - 11:54 am | प्रभाकर पेठकर

वरील विवेचनात एक मुद्दा सोडल्यास बाकी सर्व अगदी पटण्यासारखे आहे.
तो मुद्दा असा की पोलीस उपायुक्त के.ल. प्रसाद आणि शिवसेना ह्या दोन 'संस्थां' मध्ये असलेला फरक.
पोलीस उपायुक्त हे लोकनियुक्त सरकारचे अधिकारी आहेत त्यांची 'कर्तव्ये' वेगळी आहेत. त्यांच्या पदाचा उद्देश वेगळा आहे. त्यांच्यावर लोकनियुक्त सरकारने सोपविलेली जबाबदारी वेगळी आहे. अशी वक्तव्ये करण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही.
शिवसेना हा राजकिय पक्ष आहे. सरकारच्या विरोधातला 'समाजाचा' आवाज आहे. त्या समाजाला एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यातील अस्मितेची चेतना जागविण्यासाठी, त्यांचा राग उफाळून त्यांना एका झेंड्याखाली (शिवसेनेच्या, मनसेच्या किंवा कोणत्याही राजकारणी पक्षाच्या) खेचण्यासाठी कदाचीत हिच भाषा 'फलदायी' ठरत असावी.
मुंबईचे अगदी मुळ रहिवासी आता जीवंत तरी आहेत का? जे आहेत ते गेल्या २-३ पिढ्यांतलेच आहेत.
राज ठाकरेंनी म्हंटले आहे सगळ्यांनी मुंबईत राहा. आमची ना नाही. गुजराथी, पारशी, ख्रिश्चन बांधवांशी आमचे वैर नाही. कारण ते इथल्या समाजात मिसळून गेले आहेत. पण, उत्तर प्रदेशी , बिहारी येथे येऊन शक्तीप्रदर्शन करतात, स्थानिकांची गळचेपी करू पाहतात, त्याला आमचा विरोध आहे.

राजकारणातल्या कोलांट्या उड्या, मतं, निकष, मित्र, शत्रू, व्याख्या रोजच्या रोज बदलत असतात. त्यामुळे कोणा एका पक्षाची बाजू घेणे, पाठ थोपटणेही अवघड होऊन बसले आहे.

मराठी_माणूस's picture

12 Sep 2008 - 10:42 am | मराठी_माणूस

मुम्बई कोणाच्या 'बापाची' नाही.

हिम्मत असेल तर वरिल वाक्य त्यानि , सगळ्या महानगरांचि नावे घालुन म्हणून दाखवावे

डोमकावळा's picture

12 Sep 2008 - 11:44 am | डोमकावळा

याला म्हणतात
विनाशकाले विपरीत बुद्धी....

खाईल एखाद्या दिवशी रट्टे...

ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.

अमोल केळकर's picture

17 Sep 2008 - 12:35 pm | अमोल केळकर


--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

देवदत्त's picture

20 Sep 2008 - 11:29 am | देवदत्त

मटा वरील बातमी..

' मुंबई कुणाच्या बापाची नाही ' , हे के एल प्रसाद यांचे उद्गार म्हणजे सामान्य मुंबईकराचीच भावना आहे, मग हा गुन्हा कसा ठरू शकतो ? बरं, त्यांनी जो वाक्-प्रचार वापरालाय तोही अगदी रोजच्या वापरातला आहे. झालं तेवढं पुरे झालं, हे सांगण्याचाच त्यांचा उद्देश होता. पण तरीही राज्य सरकारने त्यांची पाठराखण केली नाही, हे दुर्दैव आहे, असे मत व्यक्त करून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त जुलिओ रिबेरो यांनी प्रसाद यांना क्लिन चिट दिली आहे

नेहमीच्या वाक्यांत लोक शिव्याही वापरतात, म्हणून आता ह्यांनी शिव्याही द्यायला सुरूवात करायची काय?
सर्वसामान्य पातळीवर काय बोलले जाते आणि सरकारी खात्यात उच्च पदावर असताना जाहिररीत्या काय बोलले जाते/जावे ह्याच्यात काही फरक त्यांना नाही दिसत का?

राज ठाकरेंनी एखाद्याबद्दल वैयक्तिक पातळीवर जी वाक्ये म्हटलीत त्याला मी समर्थन करीत नाही आहे.
पण हा मुद्दा वेगळा आहे.