कोणता mediclaim घेऊ…

अव्यक्त's picture
अव्यक्त in काथ्याकूट
29 Dec 2015 - 1:09 pm
गाभा: 

माझ्या भावाला health mediclaim घ्यायचा आहे. त्या संधर्भात मी बरेच policies policybazar site वर शोधल्या … पण आता माझा पुरता अर्जुन झाला आहे. कोणती policy नेमकी घ्यायची ह्यात मी confusion झालो आहे. मला माझ्या भावाला policy गिफ्ट देणार आहे तर कोणती policy देवू जी सोयीस्कर असेल premium च्या आणि claim च्या दृष्टीकोनातून… कोणती घेवू व का ? फायदे तोटे काय आहेत ? माझ्या डोक्यात hdfc argo चा plan आहे. कोणी चांगला प्लान सुचवू शकेल काय…. family floater बघतोय… माझा भाऊ वय ३९ चालू , त्याची बायको वय ३६ चालू , मुलगा वय ४ पूर्ण … साधक बाधक चर्चा अपेक्षित आहे. नवीन वर्षात चांगली policy देण्याचा मानस आहे … तरी आपली ह्यावरची मत जाणून घायची आहेत...जाणकारांची बहुमोल माहिती प्रार्थनीय आहे.… धन्यवाद.

प्रतिक्रिया

मोगा's picture

29 Dec 2015 - 3:12 pm | मोगा

सर्कारी कंपन्या बेस्ट.

न्ञु इंडिया. घ्या

लाँबार्ड वगैरे नको.

प्रसाद१९७१'s picture

29 Dec 2015 - 4:29 pm | प्रसाद१९७१

मेडी असीस्ट टीपीए चा अनुभव चांगला आहे. शेवटी आपल्याला टीपीए बरोबर डील करावे लागते. कंपन्यांशी डायरेक्टली नाही. मेडी असिस्ट कुठल्याही कंपनीचा मेडीक्लेम काढुन देतील.

जेनिन्स चा अनुभव पण चांगला आहे.

विद्यार्थी's picture

29 Dec 2015 - 10:25 pm | विद्यार्थी

आपल्या भावाला असे काही गिफ्ट देण्याची कल्पना उत्तम आहे. यातून आपल्याला त्यांची व त्यांच्या कुटुंबाची किती काळजी वाटते हे प्रतीत होते. परंतु मला काही महत्वाचे मुद्दे आपल्या नजरेस आणून द्यावेसे वाटतात.

१. आपण आपल्या बंधूंचे वय ३९ असल्याचे म्हटले आहे. या वयात बहुतेक कंपन्या पॉलिसी देण्याआधी वैद्यकीय चाचणी (मेडिकल टेस्ट) करण्याची सक्ती करू शकतात. कृपया ही गोष्ट जर आपण "surprise" देण्याचा विचार करत असाल तर लक्षात घ्यावी.

२. कुठलीही पॉलिसी घेताना विम्याची रक्कम (१ लाख, २ लाख वैगेरे) महत्वाची आहे. आजच्या काळात मेडिकल खर्च खूप वाढला आहे त्यामुळे पॉलिसी घेताना विम्याची रक्कम पुरेशी असेल हे पहावे.

३. जर आपण कौटुंबिक विमा घेत असाल तर विम्याची रक्कम अजून वाढवणे उत्तम.

४. वैद्यकीय विमा घेताना को-पे (co-pay) अत्यंत महत्वाचा असतो. co-pay म्हणजे claim केला असता विमा धारकाने भरण्याची रक्कम. ही रक्कम भरल्यानंतरच विमा कंपनी तिचा हिस्सा भरते. जर claim ची रक्कम co-pay पेक्षा कमी असेल तर पूर्ण रक्कम विमा धारकाला भरावी लागते.

५. Pre-existing (पॉलिसी घेण्यापुर्वीचे) आजार पॉलिसीच्या सुरवातीच्या ३ ते ४ वर्ष cover होत नाहीत. जरी असे असले तरी पॉलिसी घेताना त्याची माहिती फोर्ममध्ये भरावी हे उत्तम.

६. Claim Settlement Ratio - IRDA च्या वेबसाईट वर जाऊन विमा कंपन्याचे Claim Settlement Ratio बघून घ्यावे. आजकाल IRDA च्या असण्यामुळे सगळ्या कंपन्या बहुतेक Claim देऊ लागल्या आहेत.

७. शक्यतो फक्त हेल्थ इन्शुरन्स विकणाऱ्या कंपनीची पॉलिसी घ्यावी. (Apollo Munich, Star Health, ICICI Lombard, United Health वैगेरे काही उदाहरणे आहेत)

तुमच्या भावाला व त्यांच्या कुटुंबाला तुमचे हे गिफ्ट नक्की आवडेल यात मला शंकाच नाही. तुमच्या विमा खरेदीसाठी माझ्या शुभेच्छा.

विद्यार्थी's picture

29 Dec 2015 - 10:30 pm | विद्यार्थी

अजून काही गोष्टी,

सर्व mediclaim policies एकाच वर्षाच्या असतात, त्यामुळे दर वर्षी त्या renew कराव्या लागतात. वाढत्या वयानुसार policy चा premium वाढत जातो.

Lifetime renew करता येईल अशी policy घ्यावी. काही विमा कंपन्या वय वर्ष ७० - ७५ ची मर्यादा घालतात.

अनुप ढेरे's picture

29 Dec 2015 - 10:31 pm | अनुप ढेरे

मेडिक्लेम आणि हेल्थ इंशुरन्समध्ये काय फरक आहे?

सुहास झेले's picture

29 Dec 2015 - 10:38 pm | सुहास झेले

मैक्स बुपाचा क्लेम रेशो सगळ्यात चांगला आहे आणि घरी सगळ्यांची तीच पॉलिसी काढलेली आहे. पॉलिसी बाजार ह्या संस्थळावर तुम्ही सगळ्या कंपन्यांच्या पॉलिसी एकत्र बघू शकता आणि क्लेम रेशो, कस्टमर फीडबॅक, प्रीमियम सगळे एकत्रच दिसते.

ह्या लिंक पहा,

palambar's picture

29 Dec 2015 - 10:45 pm | palambar

मला वाट्त हेल्थ insurance under mediclaim policies येतात.

सौजन्य HDFC Life,

Lot of individuals subscribe to mediclaim policies in the belief that they have adequate health insurance to address all health issues. This is not only inaccurate but might just prove a very costly oversight. Hence it is of utmost importance that we clearly understand the key features that differentiate mediclaim policies from health plans.

To be sure, mediclaim although a form of health insurance is far from adequate to cover the many illnesses and health conditions that have become so common given the stress and mishaps in everyday life.
Mediclaim

First let’s understand what mediclaim brings to the table.
The key feature of mediclaim is cover for hospitalization and treatment towards accident and pre-specified illnesses for a specific sum assured limit. The mediclaim premium is based on the sum assured.
The amount paid towards mediclaim premium for self/spouse/children provides tax exemption under section 80D for a maximum of Rs 15,000 with another Rs 15,000 benefit on mediclaim premium for parents (Rs 20,000 if parents are senior citizens). Although, not advisable, mediclaim must not be taken for the tax benefit, else it degenerates into a tax saving investment, rather than a lifeline for yourself and your family.

Health Insurance
Health insurance, particularly the ones launched by life insurance companies, can be a lot more broad-based than mediclaim.

Some features of health insurance plans include:
Comprehensive health cover against critical Illnesses – as many as 30 illnesses in certain plans
Discount on premium if sum assured exceeds a particular limit like Rs 10 lakhs for instance
Flexibility to reduce premium after a specified period
Flexibility to reduce sum assured after a specified period
Flexibility to reduce policy term after a specified period

Health insurance premium provide tax exemption under section 80D of Income Tax Act 1961, this being one of the few meeting points between health insurance and mediclaim

Evidently health insurance plans are far superior to mediclaim in terms of breadth of diseases and illnesses covered, quantum of sum assured and flexibility. While mediclaim may prove adequate up to a point, it is health insurance that can be expected to bail you out from a serious (read expensive) medical condition.

विअर्ड विक्स's picture

29 Dec 2015 - 11:13 pm | विअर्ड विक्स

विद्यार्थी यांचा प्रतिसाद अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे माझे लिहायचे थोडे कष्ट वाचले.

स्वास्थ्य विमा हा co -payment पर्याय वालाच घ्यावा . याने हफ्ता थोडा कमी होतो . व अनावश्यक चाचण्या व वायफळ खर्चावर लक्ष राहते.
मी स्वतः फार अभ्यास करून L & T आणि Apollo munich short list केलेल्या . यापैकी जुनी जाणती कंपनी निवडावी. ब्रांड मागे धावू नये.

सरकारी कंपन्या २-३ लाखाच्या वर कवर दिलेले पाहण्यात नाही. Family Floater पेक्षा वैयक्तिक पर्याय निवडा . हफ्ता जास्त असू शकतो पण कवर जास्त मिळते.

परदेशी प्रवास करणार्‍या ज्येष्ठांसाठी आयसीआयसीआय लोंबार्डचा अनुभव चांगला आहे. धाग्याचा विषय नसला तरी सांगते.

भंकस बाबा's picture

30 Dec 2015 - 8:44 am | भंकस बाबा

मला स्वताला लोम्बार्डचा अनुभव चांगला आला आहे. कोणतीही खटकट न करता माझे ३ क्लेम पास झाले होते.

अव्यक्त's picture

31 Dec 2015 - 1:16 pm | अव्यक्त

सर्व प्रतिसादाला धन्यवाद… नक्की कोणती policy घेवू हा प्रश्न अनुअरितच आहे. HDFC ARGO की star Health घेवू कि new india insurance घेवू …मार्गदर्शन अपेक्षित

माझा बजाज अलायन्झचा मेडिक्लेम आहे.दोनदा क्लेम झाले आहेत.काहीही कटकट न होता कॅशलेस काम झाले.त्यांचे हाॅस्पिटल नेटवर्क पण चांगले आहे.
आमचा पूर्ण फॅमिलीचा एकत्र प्रकारचा आहे.पुढचा विचार करता किमान दहा लाख+ चा मेडिक्लेम असावा.
दरवर्षी तुम्हीच हप्ता भरणार नसाल तर भावाला परवडणार आहे ना हे बघा! नाहीतर तुमचे सरप्राइज त्याला भर प्राईस व्हायचे!