गोपाळ गणेश आगरकरांच्या लेखसंग्रहाच्या निमीत्ताने मराठी ओसीआर वापरुन युनिकोडीकरणात बर्यापैकी यश आले, याची बातमी (प्रुफ रिडींग साहाय्याची अद्याप गरज असूनही) त्यांचे महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र उधृत करुन देतो आहे. महाराष्ट्रात सध्या चालू एका सामाजिक विषयावर आगरकर काय म्हणाले असते ? (प्रुफ रिडींग झालेले नसल्यामुळे त्रुटींसाठी क्षमस्व)
महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र
-गोपाळ गणेश आगरकर
(जिवनकाळः जुलै १४, १८५६ - जुन १७, १८९५ दुजोरा हवा)
प्रिय देशबांधवहो,
संमतीच्या बिलाच्या संबंधानें सुधारकांत अलीकडे आलेल्या कांहीं निबंधांतील भाषेची तीव्रता पाहून, तुम्हांपैकीं कितेकांचीं मनें यांवर रुष्ट झाली असतील यांत संशय नाही. (न्यू इंग्लिश स्कूलू, डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फग्र्युसन कॉलेज वगैरे लोकोपयोगी संस्थांची स्थापना व उत्कर्ष, त्याचप्रमाणे मराठा किंवा केसरी पत्रांचा अवतार, प्रसार, आणि करवीरप्रकरण वगैरे गोष्टींशीं या पत्राच्या नम्र लेखकाचा व रा. रा. बाळ गंगाधर टिळक यांचा असलेला संबंध ज्यांना ठाऊक आहे, व हे दोघे इसम बरीच वर्षे एकमेकांशीं कसे वागत होते हें ज्यांनी पाहिले आहे, त्यांना सुधारकासारख्या नवीन पत्राचे जनन, रा.टिळक व पाटणकर यांचा पहिल्या तीन् संस्थांशीं नुकताच घडून आलेला विश्लेष व पस्तुत वादांत सुधारक व केसरी पत्रांच्या चालकांनीं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीनें एकमेकांवर चालविलेला भडिमार पाहून या उभयतांच्या बेबनावास व फुटाफुटीस झालेलीं कारणे त्यांस ठाऊक नसल्यामुळे विषाद वाटणे हें फार स्वाभाविक आहे. पण रा. टिळकांस तीं कारणे अवगत असतां, ज्या पत्राचे आधिपत्य त्यांचेकडे आहे त्याच्या गेल्या अंकांत 'ज्यांना वादांत स्वपक्षाची उणीव झांकण्यासाठीं परपक्षावर, आणि विशेषतः त्यांतील एकदोन व्यक्तींवर, अपशब्दरूपी गोळीबार करणे हिनपणाचे वाटत नाही त्यांची कानउघाडणी करण्याच्या नादास लागणेंही व्यर्थ होय. सार्वजनिक विषयावरे वादविवाद करण्याच्या मिषानें खाजगी द्वेषाचे उट्टे काढण्याची अमूल्य संधि क्वचितच मिळते.' अशी दोन वाक्यें आहेत. हीं वाक्यें जेव्हां आमच्या नजरेस पडलीं तेव्हां मात्र आम्हांस मोठा विस्मय वाटला ! टिळक आणि आगरकर यांचा खाजगी द्वेष ! आणि तो कशासाठीं ? टिळक आगरकरांचे किंवा आगरकर टिळकांचे कांहीं एक लागत नाहीत, आणि म्हणून एकाला दुस-याचा 'खाजगी द्वेष ?' करण्याचे कारण आजपर्यंत झालेलें नाहीं इतकेंच नाहीं तर त्यांपैकीं निदान एकाच्या मतानें तरी तें केव्हांच होण्याचा संभव नाहीं.
त्या दोघांचा बेबनाव व फुटाफूट होण्यास ज्या समाईक संस्थांचे ते दोन सेवक होते, त्या संस्था चालविण्याच्या पद्धतीविषयी व त्यांच्या उत्कषांच्या साधनांविषयीं कोणत्याही रीतीनें एकवाक्यता न होणारा त्यांचा मतभेद कारण झाला व याच मतभदामुळे, प्रस्तुत वादांत ते एकमेकांची मुर्वत न ठेवतां, आपापल्या मतांचा आणि पक्षांचा विजय होण्यासाठीं अन्योन्यांवर तुटून पडत आहेत; दुसरें कांहीं नाहीं ! अशा रीतीनें आपापल्या देशविषयक विचारांचे प्राबल्य स्थापण्यासाठीं अंत:करणपूर्वक झुंझणाच्या लढवय्यांचे संग्रामचातुर्य पाहत राहून व कौतुक करावयाचे विसरून जाऊन, अशा युद्धप्रसंगीं केवळ कर्णकटु टणत्कारांच्या श्रवणावरूनच प्रेक्षकांनीं 'एकाला दुसच्याचा मत्सर उत्पन्न झाला आहे, ?' किंवा कोणी कोणाचें 'खाजगी द्वेषाचे उट्टे काढून घेत आहे,’ असा कुतर्क करणे अत्यंत अनुदार होय ! एका जननीच्या उदरांतून अवतरलेल्या सहोदरांत देखील जर भांडण किंवा मतभेद झाल्याशिवाय राहत नाहीं, तर ज्यांचा एकमेकांशीं कोणत्याही प्रकारचा कुलसंबंध नाहीं, व ज्यांनीं राजसेवेचा सामान्य मार्ग सोडून देऊन आपापल्या मनास प्रशस्त वाटेल त्या रीतीनें आपल्या ह्यातींत आपल्या हातून होईल तेवढे देशकार्य करण्याचा निश्चय केला आहे, त्थांचे विचार सर्वांशीं न जुळले व ज्याला त्याला प्रसंगविशषीं आपापल्या विचारांचा पराकाष्ठेचा अभिमान उत्पन्न होऊन, एकदां उभयतांनीं आरंभिलेल्या सामान्य गोर्टीस आमरण चिकटून राहणे स्वत:स किंवा इतरांस सुखास्पद व कल्याणप्रद होणारें नाहीं, अशी खात्री झाल्यामुळे ज्याच्या मनास जी दिशा अत्यंत आक्रमणीय वाटेल त्यानें ती धरणे, यांत नवल वाटण्यासारखें काय आहे, हें आम्हास समजत नाहीं !
बांधवहो, विचारकलहाला तुम्ही इतके कशासाठीं भितां? दुष्ट-अIचाराचे_निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धि, सत्यसंशोधन व भूतदयेचा विचार इत्यादि मनुष्यांच्या सुखाची वृद्धि करणाच्या गोष्टी विचारकलहाखेरीज होत नाहीत. आजपर्यंत या देशांत हा कलह माजावा तितका कधींच न माजल्यामुळे, व बहुधा आमचे लोक 'गतानुगतिक ?' च असल्यामुळे हें भरतखंड इतकीं शतकें अनेक प्रकारच्या विपत्तींत खितपत पडले आहे ! हा विचारकलह दुष्ट विकोपास जाऊं न देण्याविषयीं मात्र खबरदारी ठेविली पाहिजे. नाहीं तर त्यापासून पुढे खर्या लढाया आणि रक्तस्राव होण्याचा संभव असतो. सुधारक आणि दुर्धारक, चपल सुधारक आणि मंद सुधारक, थंडे सुधारक आणि गरम सुधारक अथवा नाना प्रकारच्या मतांचे नवे आणि जुने लोक यांमध्यें सांप्रतकालीं जी दुही माजून राहिली आहे, ती पाहून घाबरून जाण्याचे बिलकूल कारण नाहीं ! पाश्चिमात्थ शिक्षणामुळे ज्या दिवशीं या वादास आरंभ झाला तो दिवस हिंदुस्थानच्या भावी इतिहासांत महोत्सव करण्यासारखा होईल. त्या दिवशीं अनेक शतकें गाढ निद्रेत घोरत पडलेला हिंदुस्थान देश किंचित् जागा होऊन चाळवू लागला, किंवा प्रेतावस्थ झालेल्या त्याच्या विस्तीर्ण देहांत ईशकृपेनें पुन: एकवार चैतन्यावतार झाला असे म्हणण्यास हरकत नाही. त्या दिवशीं त्याचे स्थाणुत्व नाहींसें होऊन त्याला जी यत्-किंचित् गति मिळाली ती प्रतिवर्षी अगदी यूव्_प्रमाणांत का होईना, पण सारखी वाढत आहे, व जों जों हा विचारंकलह निकराचा होऊँ लागेल तों तों झपाट्यानें होऊ लागणार आहे. आतां किती झालें तरी कलह तो कलह ! तो कशाही प्रकारचा आणि कितीहि सौम्य असला तरी त्यांत अप्रिय असें कांहींच नाहीं, असें कोठून होणार ? ज्या दोन मनुष्यांचा परस्परांशी संबंध आहे, त्यांपैकी एक दुस-थाच्या विरुद्ध जाऊँ लागला म्हणजे कधीं त्या दोघांस एकमेकांशीं वर्दळीस यावें लागेल; कधीं एकमेकांवर शब्दप्रहार करावे लागतील; कधीं उभयतांनीं आरंभिलल्या कामांतून अंग काढून घेऊन विलग व्हावें लागेल; कधीं पदराला बराच खार लावून ६यावा लागेल किंवा जिवाकडे न पाहतां अहोरात्र मानसिक शारीरिक कष्ट करावे लागतील. पण जॉपर्थत ऑपण आपल्या विचाराच्या विजयासाठीं व प्रसारासाठीं भांडत आहों, असें प्रत्येकाच्या मनांत वागत राहील तोंपर्यंत न्यायसभेत पक्षकाराचे भांडण भांडणा-या बकिलांच्या दिखाऊ वैराच्या फार पलीकडे अशा दोन व्यक्तींचे वैर जाईल असें आम्हांस वाटत नाहीं. आगरकर आणि टिळक यांच्या वैराचे स्वरूप याहून भयंकर नाहीं असें निदान त्यापैकी एकाला तरी वाटत आहे. तसेच या वैरामुळे या दोघांच्या व्यासंगांत जें अंतर पडले आहे तें कमी न होतां कदाचित् अधिक होत जाण्याचा जरी संभव आहे तरी जेव्हां खुद्द आगरकरांच्या किंवा आगरकरांच्या निकट आप्तांच्या डोळ्यांस पाणी येण्यासारखी कांहीं अनिष्ट गोष्ट घडेल तेव्हां इतरांपेक्षां टिळकांस व जेव्हां टिळकांचे घरी तसा अनिष्ट प्रकार घडेल, तेव्हाँ आगरकरांस विशेष वाईट वाटून डोळ्यास पाणी येईल, व मतभदांमुळे उत्पन्न झालेल्या वैराचा एका क्षणात विसर पडून एक दुस-याला मदत करण्यास सहज प्रवृत्त होईल !
धर्म, राज्य व समाज यासंबंधानें अलीकडे जे औपपत्तिक सिद्धांत सर्वमान्य होऊन बसले आहेत त्याविषयी आम्हीं उभयतॆांत म्हणण्यासारखा मतभेद नाहीं. मनुष्याच्या बुद्धीचे व्यापार इंद्रियाधीन असल्यामुळे या बुद्धीचे, ब्रह्मांडाच्या आदिकारणांचे किंवा परमेश्वराचे यथार्थ ज्ञान होण्याचा संभव नाहीं, हें धर्मतत्त्व मनांत बाळगून धर्मकल्पनांत किंवा धर्माचारांत जे फेरफार करावयाचे ते करीत गेलें पाहिजे; राजकीय स्वातंत्र्य असल्याशिवाय कोणत्याही देशांत ऐहिक सुखाची परमावधि व्हावयाची नाहीं; पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार आणे इंग्लिश लोकांचे साहाय्य असल्याशिवाय आमचे डोकें वर निघण्याचा संभव नाहीं, याकरितां राजनिष्ठा यतकिंचित ढळू न देतां राजकीय हक्क संपादण्यासाठीं जें करणे असेल तें आम्हीं केलें पाहिजे; नीतिप्रसार, संपत्युत्पादन, आरोग्यरक्षण वगैरे अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्ञानाधीन असल्यामुळे लोकशिक्षणाचे काम जितक्या झपाट्यानें चालवल तितक्या झपाट्यानें चालविलें पाहिजे; जातिभेद नाहींसा झाला पाहिजे,
स्रीपुरुषांच्या ज्ञानांत ‘ व स्वातंत्र्यात जेवढे अंतर राहूं देणें अपरिहार्य असेल तेवढ्याहून अधिक राहिल्यास पूर्ण संसारसुख प्राप्त होण्याचा संभव नाहीं, म्हणून स्रियांची उन्नति करण्याबद्दल रात्रंदिवस झटले पाहिजे; वगैरे धार्मिक, राजकीय व सामाजिक विषयांसंबंधानें स्थूल औोपपत्तिक सिद्धांत जसे एकाला तसे दुस-यालाही संमत आहेत. दोघांत जो मतभद पडतो तो आज तारखस हे सिद्धान्त अमलांत आणण्यासाठी काय करतां येईल व तें कोणत्या साधनानं करतां येईल, यासंबंधानें पडतो. या घटकेस साध्य असलेल्या सुधारणेची इयत्ता आणि तिचीं साधनें यांविषयीं टिळकांचे बहुतेक विचार सामान्य लोकांस मान्य होण्यासारखे असल्यामुळे, किंवा त्यांस मान्य असलेल्या विचारांबाहेर जाण्या टिळक तयार नसल्यामुळे, त्यांचे वर्तन भवभूतीनें रामचंद्राकडून वदविलेल्या
स्नेहं दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि
आराधनाय लोकानां मुंचतो नास्ति मे व्यथा ॥
( स्नेह, दया, सौख्य, फार तर काय लोकांच्या संतोषासाठीं मला जानकीचा देखील त्याग करावा लागला तरी त्याबद्दल खेद वाटणार नाहीं !)
या श्लोकार्थाप्रमाणे होत आहे, व या क्षणीं ते अत्यंत लोकप्रिय झाले असून, प्रत्येकाच्या तोंडांतून त्यांचे नांव निघत आहे. पण लोकांना आज ज्या गोष्टी प्रिय_आहेत. त्या या हतभाग्य लेखकास पसंत_नसल्यामुळे, लोकछंदानुवर्तन . त्याला अशक्य झाले आहे इतकेंच नाही, तर लोकांस अप्रिय परंतु पथ्यकारक असे विचार त्यांच्या-मर्जीविरुद्ध पुनःपुन्हां त्यांचेपुढे आणणें हेंच आपलें कर्तव्य व जीविताचे सार्थक अशी त्याची दृढ कल्पना झाली असल्यामुळे, धार्मिक व सामाजिक गोष्टींत आपलें ज्ञान विकटोपर्यंत जाऊन पोहोचलें आहे, व तत्संबंधक आचारांत सुधारणा करण्यास म्हणण्यासारखी जागा राहिलेली नाहीं, निदान त्या कामांत सरकाराचे किंवा कायद्याचे साहाय्य घेतलें असतां सर्वथैव नुकसान होणार आहे असें समजणार्या श्रद्धाळू पंडितमन्य, व देशाभिमानी म्हणवून घेणा-या जनसमूहाच्या उपहासाचे आणे रोषाचें स्थान त्यानें आपणांस करून घेतले आहे. तथापि त्याला असा भरवसा आहे कीं, म्हणण्यासारखी द्रव्यानुकूलता नसतां, श्री. शिवाजीराव महाराज होळकरांनीं देऊं केलेली दरमहा पांचशें रुपयांची नोकरी ज्यानें 'मला नको ?' म्हणून सांगितलें; विशेष बुद्धीसामर्थ्य किंवा शरीरसामर्थ्य नसंतां, आज दहा अकरा वर्षे जो उत्साहपूर्वक शिक्षकाचा आणि लेखकृचा धंदा करीत आहे; कवडीची किफायत नसतां, ज्यानें सात आठ वर्षे सर्वैत्र प्रसिद्ध केसरीपत्राचे बर्या वाईट रीतीनें 'रकाने ?' भरून काढले, इतकेंच नाहीं एका दुर्दैवी संस्थानिकास सुदशा यावी, येवढयाच बुद्धीनें लिहिलेले लेख न्यायाधीशास अप्रशस्त वाटल्यामुळे त्यांनीं दिलेली शिक्षा त्यानें आनंदानें साहिली; हाती असलेल्या पत्राचे मालक शुद्ध वाटेल तें लिहूं देत नाहीत असें दिसून आल्याबरोबर त्यांच्या धमकावण्यांकडे बिलकुल लक्ष न देतां समानशीलाच्या व विचारांच्या मित्राचे प्रोत्साहन व साहाय्य मिळतांच, सर्वतोमुखीं निंदा होत असलेल्या सुधारणेचा आणि सुधारकांचा पक्ष लोकांस वाटत असल्याप्रमाणे दुर्बल नाहीं, इतकेंच नाहीं तर त्याचेच अखेरीस सर्वत्र साम्राज्य होणार आहे असें युक्तिवादानें सिद्ध करून देण्यासाठी कोणत्याही गोष्टीची अनुकूलता नसतां, व लोकमत धडधडीत विरुद्ध असतां नवीन पत्राच्या नसल्या उठाठेवींत जो जाणूनबुजून पडला; रूढ धर्माचारांतील आणि लोकाचारांतील व्यंगांचे निर्भयपणें आविष्करण करण्याचे भयंकर पाप हातून घडत असल्यामुळे, देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणावणाच्या पत्रांकडून होत असलेला शिव्यांचा व शापांचा प्रचंड भडिमार ज्याला व ज्याच्या निरपराधी स्त्रीला एकसारखा सोसावा लागत आहे; स्वमताचे मंडन व तदनुसार होईल तेवढे वर्तन करण्यासाठीं, आपल्या फार दिवसांच्या मित्रांचाचसा काय, तर रात्रंदिवस काळजी वाहून आणि कडेवर खांद्यावर खेळवून, ज्यांनी लहानाचे थोर केलें अशा अत्यत ममताळू व पूज्य आप्तांचाही दीर्घ रोष ज्यानें आपणांवर करून घेतला आहे -अशा मनुष्याच्या लेखांत कितीही प्रमाद होत असले व केवढीही कटुता असली तरी ते समंजस मनुष्याच्या स्वल्प आदरास, निदान थोड्याशा अनुकंपेस तरी पात्र झाले पाहिजेत. 'हा वेडापीर इतके हाल, संकटें, व लोकापवाद सोसून ज्या अर्थी इतकी धडपड करीत आहे त्या अर्थी ती लोकां अंतीं हितावह होईल अशी निदान याच्या मनाची तरी खात्री झाली असावी, ’ असा विचार त्यांच्या मनांत येऊन, त्यांनी त्याच्या दोषांबद्दल त्यास क्षमा केली पाहिजे. त्यांनी तसें केले तर ठीकच आहे; पण नाहीं केलें तरी त्यास विशेषसें वाईट वाटण्याचा संभव नाहीं; कारण, सारें जग त्यावर उलटलें तरी पुढील कविवाक्याचे स्मरण करून त्यालाँ आपलें समाधान करून घेतां येतें.
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां ।
जानन्तु ते किमपि तान्-प्रति नैष यत्नः ।।
उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा
कालेाह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ॥
अर्थः-खरोखरीच जे या गोष्टींत आमची निर्भत्र्सना करतात, त्यांना काहींच समजत नाहीं, व त्यांच्या कारतां हा आमचा प्रयत्नही नाहीं. माझ्या शीलाचा एखादा इसम कोठे तरी असेल किंवा निपजेल; पृथ्वी अफाट आहे व काळ अनंत आहे !
संदर्भः आगरकर : व्यक्ति आणि विचार (वि.स.खांडेकर संपादीत)
::पृष्ठक्रमांक १५७ ते १६३ (मराठी विकिस्रोतावरील पान क्रमांक १७७ ते १८३)
छायाचित्र सौजन्य: विकिमिडीया कॉमन्स
***-***-***-****-***-***-***
कठीण काळाविरुद्ध ज्यांनी संघर्षरत राहून आजचे स्वातंत्र्य आपल्यासाठी उपभोगण्यास उपलब्ध करुन दिले आहे त्यांच्या लेखनाची दखल आपण त्यांच्या लेखनाचे प्रुफ रिडींग करुन आणि/अथवा नंतर दाखले संदर्भ देऊन करु शकता.
गोपाळ गणेश आगरकरांचे साहित्याचे विकीमध्ये प्रुफ रिडींग करण्यात साहाय्य हवे
* आगरकरांचे साहित्याचा दुवा आगरकरांच्या लेखांची लाबी प्रत्येकी साधारणपणे ४ ते ६ पाने आहे आणि वाचन करत केवळ मुळाबरहुकुम असल्याचे निश्चित करत प्रुफ रिडींगचे काम आहे. प्रुफ रिडींगचे काम पुर्ण झाल्यास वरचा लेख जसा येथे घेतला तसे आगरकरांच्या लेखातील संदर्भ/दाखले देणे सोपे पडेल.
भूमिका:
नमस्कार,
मि.पा. वाचकांना माझे वेगवेगळे धागे बर्याच वेगाने आल्याने जरासा जाच होत असणार त्यात अजून एक धागा जोडताना मन द्विधा असलेतरी हाताशी आलेल्या विषयात रस असलेल्यांची संख्यापण बरीच असेल म्हणून धागा लेख लगेच प्रकाशित करण्याचा विचार करत आहे.
लोकमान्य टिळकांच्या (राजकारणेतर) सामाजिक विषयावरील अग्रलेखांचा भाग असलेला खंड आपण मराठी विकिस्रोत प्रकल्पात युनिकोडात टंकून देण्याचे मिपावर आवाहन केले होते त्या आवाहनास प्रतिसाद येऊन काम चालू आहे, गीतारहस्य आणि टिळकांचे अग्रलेख या दोन्ही विषयावरील रिलीजीयसली काम करणारे एक एक कार्यकर्ता मंडळी मिपाकरातून मिळाली हे खरे आहे अर्थात काम तसे मोठे आहे त्यास अधिक हातांची आवश्यकता आहे. हे टिळकांच्या साहित्या बद्दल झाले.
नुकतेच गोपाळ गणेश आगरकरांविषयीच्या साहित्या बद्दलचे एक पुस्तक मराठी विकिस्रोतावर अपलोड झाले आहे. त्यातील वि.स. खांडेकरांची प्रस्तावना आहे ती सोडून उर्वरीत बहुतेक लेखन आगरकरांचे असावे असा कयास आहे. पहिली गोष्ट ते लेखन गोपाळ गणेश आगरकरांचेच आहे का याची अजून एक खात्री करून हवी आहे. तसेच आगरकरांच्या लेखनाचे प्रुफ रिडींग करण्यास नव्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांचे साहाय्य हवे आहे . नवे एवढ्यासाठी लिहिले की विकिप्रकल्पात अलरेडी काम करत असलेल्या मंडळींवर आधीच बर्यापैकी काम असते त्यांना एका कामातून काढून दुसर्या कामात लावण्यात पॉईंट नाही.
ज्यांनी टिळकांच्या साहित्याच्या टंकनासाठी केलेले आवाहन होते थोडी त्याचीच पुनरोक्ती उर्वरीत भागात करत आहे. दुर्दैवाने आंतरजालावरील बहुतांश चर्चा मूळ संदर्भांचे दाखले नमुद न करता आगरकर अथवा लोकमान्य टिळक त्यांच्या अग्रलेखातून प्रत्यक्षात काय म्हणाले याचे वाचन आणि दाखले न देताच तेच ते दळण सातत्याने दळले जाताना दिसते.- एकुण सामाजिक परिस्थितीत आगरकरांना आजच्या पेक्षा कितीतरी कठीण काळात आपली मांडणी करावी लागली असणार.-
एवढे करून प्रत्यक्षात मूळ व्यक्ती मूळ स्वरुपात काय म्हणाली म्हणू इच्छित होती याचा बोध होत नाही. प्रत्यक्षात संबंधीत ग्रंथ युनिकोडातून शोधण्यास आणि संदर्भ सुलभ झाल्यास सर्वांनाच उपयूक्त ठरू शकेल. काम चालू करताना मोठे वाटेल पण प्रत्येकाने परिच्छेद दोन परिच्चेद जरी मराठी विकिस्रोत प्रकल्पात प्रुफ रिडींग तसेच गरज भासेल तसे टंकन करून दिले तर काम पार पाडणे अशक्यही नसावे. सामाजिक-राजकीयदृष्ट्या विवाद्य विषयांपलिकडे सुद्धा आगरकर- लोकमान्यांनी बरेच काही संदर्भ मुल्य असलेले लेखन केले आहे. पण प्रुफ रिडींग आणि गरजेनुसार युनिकोडात टंकण्याची मेहनत केल्याशिवाय संदर्भ सुलभ होऊन अधिकाधीक लोकांच्या वाचनातही येणार नाही.
विकिस्रोतात इतरही लेखकांचे प्रताधिकारमुक्त साहित्य टंकनासाठी आणि अनुवाद करून देण्यासाठी उपलब्ध आहे.
(*तळटिप: मराठी विकिस्रोत प्रकल्पाबद्दल अधिक माहिती या ऑनलाईन सादरीकरणात सुद्धा उपलब्ध आहे.) )
माझ्या लेख धाग्यांच्या वाढलेल्या संख्येबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व
माझे लोकमान्य टिळक विषयक यापुर्वीचे मिपा धागालेख
१) लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य
२) लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या; श्री. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या गौरवपर अग्रलेखाचा इंग्रजीते मराठी अनुवाद
३) लोकमान्य टिळक आणि अनुवाद
४) लोकमान्य टिळकांचे अग्रलेख विकीमध्ये टंकण्यात साहाय्य हवे
*मराठी विकिस्रोत प्रकल्पात
**टिळकांचे केसरीतील लेख भाग ४ संकीर्ण लेख संग्रह (सामाजिक धार्मिक वाङमय विषयक)
**श्रीमद्भवद्गीतारहस्य
* आगरकरांचे साहित्याचा दुवा प्रुफ रिडींग मध्ये साहाय्य हवे आहे.
प्रतिक्रिया
7 Apr 2016 - 2:37 pm | माहितगार
ग्रंथोत्तेजक सभा, मराठी विकिपीडिया सदस्य अभिनव गारुले तसेच विकिमिडीया फाऊंडेशनच्या सिआयएस ए२के प्रकल्पाच्या साहाय्याने आगरकरांच्या एका पुस्तकाचे ओसीआरच्या माध्यमातून युनिकोडीकरण पुर्ण झाले. मराठी विकिंच्या बाबतीततरी ओसीआरचे असे पहीलेच यश आहे. (या नविन डेव्हेलपमेंटमुळे धागावर काढत आहे) अर्थात वर लेखात नोंदवल्या प्रमाणे ऑनलाईन प्रुफ रिडींग साहाय्याची मोठी गरज आहे आणि मी मिपाकरांकडून साहाय्याची अपेक्षा ठेवतो.
सध्या स्त्रीयांच्या सदर्भाने चर्चा चालुच आहेत तर आगरकरांना त्यांची बाजू मांडणे त्यांच्या काळात तर बरेच कठीण गेले असेल, कशी मांडली त्यांनी त्यांची बाजू ? आपले सर्वांचे आगरकरीय लेखन वाचण्यासाठी विकिस्रोतावर स्वागत आहे.
आपल्या सर्वांच्या सहकार्यासाठी आभार.
7 Apr 2016 - 3:38 pm | आदूबाळ
मराठी ओसीआरबद्दल ऐकण्यास उत्सुक आहे.
ओसीआरमध्ये हँडरायटिंग रेकग्निशनही होतं का?
7 Apr 2016 - 3:47 pm | सुनील
हॅ हॅ हॅ
माझे हस्ताक्षर ओळखणारे ओसीआर शोधणार्याला माझ्यातर्फे नोबेल पारितोषिक!!
7 Apr 2016 - 3:52 pm | आदूबाळ
:)
विदिन रीझनेबल लिमिट्स असं लिहायचं राहिलं.
7 Apr 2016 - 4:38 pm | माहितगार
अभिनव गारुलेंना शक्य झाल्यास, अधिक माहिती लिहिण्यास सांगतो.
7 Apr 2016 - 4:18 pm | कंजूस
मराठी ओसीआरबद्दल ऐकण्यास उत्सुक आहे.-
गेला महिना हेच शोधतो आहे आणि CDAC मध्ये खटपट चालू आहे त्याच्या लिंक्स सापडल्या परंतू " download software" चे स्पीड ब्रेकर आले.
7 Apr 2016 - 4:22 pm | कंजूस
इंग्रजीचे प्रिंट्सचे ओसीआर अफलातून फास्ट अचूक चालतात पण हँडरायटिंग रेकग्निशनात फार गडबड होते. बगळ्यांचे का वळे होतात तर मराठीत हंस होतील का?
7 Apr 2016 - 4:24 pm | पिलीयन रायडर
लेख पुर्ण वाचला नाही. पण एकच प्रश्न
"महाराष्टीयन" असा शब्द आगरकरांनी वापरला आहे? मला तरी वाटत नाही.
आपण सर्व "मराठी" आहोत.. महाराष्ट्रियन नाही..
7 Apr 2016 - 4:35 pm | माहितगार
वर या पानाचा संदर्भ नोंदवला आहे. वापरलेला शब्द महाराष्ट्रीयांस आहे, महाराष्ट्रियन नव्हे. लेखातील संदर्भावरुन लेखन आगरकरांचेच असल्याचे ९९ टक्के वाटते आहे पण अर्थात प्रुफरिडींग पूर्ण झाल्यावर उरलेल्या एक टक्क्याची खात्री देता येईल अशी शक्यता वाटते. फिंगर्स क्रॉस करुन प्रुफरिडींग साठी स्वयंसेवी साहाय्याची वाट पाहतो आहे.
7 Apr 2016 - 4:51 pm | पिलीयन रायडर
हो पण तेव्हा महाष्ट्रीय असा शब्द होता? मराठी हा इतका सोपा आणि चपखल शब्द असताना महाष्ट्रीय का म्हणाले असतील? मुळात आपण गुजरातचे गुजराथी, बंगाल चे बंगाली असे म्हणतो. मला वाटतं फक्त भारतातले ते भारतीय असं होत असावं. कानाला फार चुकीचा वाटतो महाष्ट्रीय हा शब्द.
7 Apr 2016 - 5:08 pm | माहितगार
केतकर ज्ञानकोश आगरकरांच्या बर्या पैकी नंतरचा तरीही विसाव्या शतकाच्या पुर्वार्धातला, त्यात 'महाराष्ट्रीय' असा उपयोग बर्यापैकी दिसतो आहे.
7 Apr 2016 - 5:31 pm | माहितगार
मुख्यत्वे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिलेल्या मराठी विश्वकोशातही 'महाराष्ट्रीय' हा शब्द प्रयोग पुरेसा दिसतो आहे. पण इतर मराठी संस्थळांवर कमी दिसतो आहे हेही खरे.
बाकी मंडळींचे काय म्हणणे आहे या विषयावर.
7 Apr 2016 - 4:45 pm | माहितगार
'महाराष्ट्रीय' हा शब्द आगरकरांच्या आधी कुणी वापरला आहे का आगरकरच प्रथम वापरत आहेत हे शोधणे उद्बोधक असावे.
7 Apr 2016 - 4:59 pm | अनंत छंदी
सी डॅकचे सॉफ्टवेअर नीट चालत नाही हा अनुभव आहे.
7 Apr 2016 - 5:09 pm | माहितगार
गारुलेंनी वापरलेले बहुधा सिडॅकचे नाही सविस्तर तेच मार्गदर्शन करु शकतील इमेलने विनंती पाठवतो त्यांना.