स्टार वार्स!

DEADPOOL's picture
DEADPOOL in काथ्याकूट
19 Dec 2015 - 10:55 pm
गाभा: 

गेल्या महिन्यात चित्रपट कोणता पहावा याविषयी माझ्या मित्रमंडळीमध्ये महायुद्ध झाले!
पक्ष होते बाजीराव मस्तानी व दिलवाले!
या वादाचे निवारण शेवटी तहात होऊन आधी बाजीराव मस्तानी व नंतर दिलवाले बघायचा असे ठरले.
मी मात्र तटस्थ राष्ट्रांप्रमाणे या युद्धात सहभागी झालो नाही!
कारण या दोन चित्रपटांपेक्षा माझ्याकडे वेगळा ऑप्शन होता!
२०० मिलियन डॉलर्सचा स्टार वार्स सेवेन!
१९७७ साली आलेल्या स्टार वार्स एपिसोड चार ने जगात हलकल्लोळ माजवला!
११ मिलियन डॉलर बजेट, आणि कमाई किती?
७०० मिलियन डॉलर!
यानंतर आलेल्या दोन्ही एपिसोडने असाच हलकल्लोळ माजवला.
८३ साली याचा शेवटचा भाग आला.
मात्र चाहते अत्यंत आतुरतेने पुढच्या भागांची वाट बघत होते.
९९ साली पुन्हा स्टार वार्स आला!
आणि यावेळीसुद्धा रेकोर्डब्रेक कामगिरी केली!
चित्रपटांच्या जगात सर्वात गाजलेली मालिका म्हणून या चित्रपटांचा उल्लेख होतो.
यातील पात्रांची अदाकारी जगाला वेड लावणारी ठरली.
मंडळी एकदातरी HAN SOLO LUKE SKYWALKER LEIA ORGANA आणि DARTH VADER बघा!
आणि नाताळाच्या सुटीत STAR WARS THE FORCE AWAKENS बघा!
May the force with you!!!!!!

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

19 Dec 2015 - 11:18 pm | प्रचेतस

स्पेक्टर बघायचा राहिलाच. हा नक्कीच बघणार.
एम्पायर स्ट्राइक्स ब्याक आणि रिवेंज ऑफ़ द सिथ हे दोन सर्वोत्कृष्ट चित्रपट वाटले मालिकेतील.

DEADPOOL's picture

20 Dec 2015 - 7:05 am | DEADPOOL

मला तर सगळेच आवडले ;)

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Dec 2015 - 9:09 am | अनिरुद्ध.वैद्य

वाचलात. स्पेक्ट्रे आत्यंतिक बोर होता. बाकी एम्पायर स्ट्राईक्स ब्याक & रिव्हेंज माझेही आवडते! मला रिव्हेंजमध्ये पाल्पटाइनचे अनाकीनला डार्क साईडला ओढण्याचे प्रयत्न जबरी होते.

त्यातली योडा आणि पाल्प्टाईनची फाईट लै जबरी. सिनेमात नतालिया पोर्टमन आत्यंतिक सुंदर दिसते.

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Dec 2015 - 8:43 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

वगिश's picture

20 Dec 2015 - 6:08 am | वगिश

मे द फोर्स विथ अस .

अरे 'बी' वापरा की मध्ये! :-)

भंकस बाबा's picture

20 Dec 2015 - 9:40 am | भंकस बाबा

दगडी चेहरयाचा हीरो. शॉन कॉनरी पुष्कळ उजवा होता.

एक एकटा एकटाच's picture

20 Dec 2015 - 10:22 am | एक एकटा एकटाच

अ गुड डायनासॉर

एक चांगला ऑप्शन आहे..

जास्त डोक्याला शॉट नाय.......

लहान मुलांना घेउन जायच असे पिच्चर पहायला

मग परत येताना अश्या अनिमेटेड पिच्चर पेक्षा ही भन्नाट आईडिया त्यांच्या डोक्यात तयार होतात.
मग त्या ऐकायला मज्जा येते.

यशोधरा's picture

20 Dec 2015 - 10:26 am | यशोधरा

May the Force be with you!! :)

DEADPOOL's picture

20 Dec 2015 - 6:59 pm | DEADPOOL

आता बरोबर!!!