१९८२ मुंबई गिरणी संप आणि गिरणी कामगाराचे पर्याय

स्वप्निल रेडकर's picture
स्वप्निल रेडकर in काथ्याकूट
17 Dec 2015 - 10:31 am
गाभा: 

मुबईतील मराठी टक्का घसरण्यासाठी कारणीभूत ठरलेला आणि अडीच लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या १० लाख कुटुंबियांना देशोधडीला लावणारा हा संप मानला जातो. डॉ. दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखालील या संपाने जसे कामगारांच्या अभूतपूर्व एकीचे दर्शन घडवले तसेच सरकार,नोकरशाही,उद्योगपतीच्या अमानवी वृत्तीचे देखिल.तसेच गिरणी कामगाराची अधिकृत संघटना मानल्या गेलेल्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाची भूमिका देखील संपाच्या बाबत संशयास्पद मानली जाते. १८५४ मध्ये सुरु झालेल्या ताडदेव च्या कावसजी नानाभाई दावर यांच्या बॉम्बे स्पिंनिंग अंड वेंविंग मिल पासून सुरु झालेला आणि मुंबईला तीच सिटी ऑफ गोल्ड किताब मिळून दिलेला कापड उद्योग कालौघात कधी नामशेष झाला हे जनसामान्यांना कळलच नाही .
मुंबई गिरणी संपाविषयी वाचताना मला एक गोष्ट निदर्शनास आली कि जेव्हा संप अयशस्वी होतोय याची चिन्ह दिसताना गिरणी कामगारांनी textile industry व्यतिरिक्त इतर पर्याय शोधायचा प्रयत्न का केला नाही?किंवा केला असेल तर की आणि तो का यशस्वी झाला नाही?
म्हणजे आपण म्हण तो कि मराठी जनसंख्येच मोठ स्थलांतर या संपामुळे घडून आल. मध्य मुंबईतून उपनगरमध्ये सरकवा लागल .पन त्याच वेळी मराठी मानसा व्यातिरिक्त पूर्ण भारतातून मात्र लोकसंख्या मुंबई मध्ये येत होती आणि स्थिरस्थावर होत होति. त्यांनी अस की केल कि ते मुंबईत तगून राहिले आणि प्रगती पण केली.इथे मराठी अमराठी हा मुद्दा इथे नाहीय पण कपडा उद्योग व्यतिरिक्त दुसरा सक्षम पर्याय शोधण्यात मध्ये मराठी कामगार कमी पडले का?किवा जे लोक एवढ्या दुरून येउन इथे यशस्वी झाले त्यांनी कुठल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलं?
अडीच लाख गिरणी कामगारांपैकी निदान निम्म्या कामगारांना तरी रोजगार मिळवून देण्यासाठी काही प्रयत्न केले गेले का(इतर उद्योगांमध्ये). कारण जर माझ्या तर्काप्रमाणे मला माझ्या क्षेत्रात रोजगार संधी नसतील तर मी नक्कीच पर्याय शोधेन किवा त्यासाठी लागणारे कौशल्य मिळवायचा प्रयत्न करेन. संप हा योग्य मागण्यासाठीच केला गेलेला होता अस माझ मत आहे जे चुकीच देखील असू शकेल.(माहितगार त्या विषयातील जास्त माहिती देऊ शकतील) त्या संपाची अखेर दुर्दैवी झाली हे शेवटी वास्तव आहे. पण राहून राहून हाच विचार सारखा त्रास देत राहतो जेव्हा गिरणगावातील बंद गेट्स आणि राहिलेले गिरण्याचे अवशेष मी बघतो. का दुसरा पर्याय शोधायचा प्रयत्न आपल्या लाखो कामगार बांधवांनी केला नाही?
मला कल्पना आहे कि लेख एकदम छोटा झालाय .पन जेवढ आणि जस सुचाल ते जमेल त्या शब्दात मांडायचा प्रयत्न केलय. मिपाकार समजून घेतील हि आशा

प्रतिक्रिया

सतिश पाटील's picture

17 Dec 2015 - 2:39 pm | सतिश पाटील

मला वाटते

गिरणी कामगारांना प्रशिक्षण दिले कि ते यंत्र चालवण्यात पारंगत होत होते, एकदा शिकले कि डोक्याला जास्त ताप होत न्हवता, आणि बऱ्यापैकी पगारदेखील मिळत होता,
बहुतेक गिरणीकामगार हे आपल्या ओळखीतल्या लोकांना आपल्या गिरणीत वशिल्याने लावत होते, आणि वशिल्याने गिरणीत नोकऱ्या सहज मिळत होत्या,
त्यामुळे कोकण आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून येणार लोक, मुंबईत नोकरी म्हणजे गिरणीत नोकरी असेच ठरवून येत असत. या चाकोरीबाहेर कधी विचारच झाला न्हवता. इथे मानसिकता महत्वाची.

आणि जेव्हा गिरणी बंद झाली, तेव्हा एकतर तो आघात आणि दुसर म्हणजे इतर ठिकाणी मिळणारी , ( पिउन , कारकून ) नोकरी यात तेवढा पैसा मिळत न्हवता, गिरणी हेच एक मोठे उद्योग जगत मुंबईत होते.
बरेचसे कामगार हे शिक्षणाच्या बाबतीत प्राथमिक स्तरावर किंवा जेमतेम असल्यामुळे त्यांना कोर्पोरेट क्षेत्रात प्रवेश करता येत न्हवता,

आणि महत्वाची गोष्ट म्हणजे व्यवसाय करण्याची आपली मानसिकता नसल्यामुळे, आपल्यासोबत वायीट झाले , हि मुंबई आपल्याला पोसू शकत नाही त्यामुळे बऱ्याच जणांनी गावचा रस्ता धरला,
आणि जे मुंबईत राहिले त्यातले काही जण गुन्हेगारी जगतात शिरले.

स्वप्निल रेडकर's picture

17 Dec 2015 - 2:54 pm | स्वप्निल रेडकर

सहमत !पण तरीही राहून राहून हाच प्रश्न पडतो कि एवढ्या manpower चा खूप विधायक उपयोग करून घेऊन कितीतरी चांगल भवितव्य घडवता त्याचं आणि पर्यायाने महाराष्ट्रच . आणि शिक्षनाच अभाव हा त्यांच्या मार्गातला मोठा अडथळा ठरलं असेल यात शंका नाही जस तुम्ही उल्लेख केलाय .प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

आदूबाळ's picture

17 Dec 2015 - 3:26 pm | आदूबाळ

एवढ्या manpower चा खूप विधायक उपयोग करून घेऊन कितीतरी चांगल भवितव्य घडवता त्याचं आणि पर्यायाने महाराष्ट्रच

कोण करणार हे सगळं?? सरकार?

असं नसतं दादा - प्रत्येकाने आपापल्या उन्नतीसाठी (किमान सर्व्हायवलसाठी) प्रयत्न करणं अपेक्षित असतं.

सतिश पाटील's picture

17 Dec 2015 - 3:31 pm | सतिश पाटील

हागदी बरोबर.
सहमत.

स्वप्निल रेडकर's picture

17 Dec 2015 - 3:54 pm | स्वप्निल रेडकर

बरोबर आहे तुमच .पन तेच पुन्हा आहे कि असा प्रयत्न त्यामधल्या मोठ्या कामगार वर्गाने केला नाही. महाराष्ट्रच भवितव्य वगेरे खूप दूरची गोष्ट झाली असती पण व्यक्तिगत विकास करण्यासठी वेगळी वाट चोखाळली गेली नाही .

यावर फारपुर्वी मिपावर एक लेख वाचला होता..
आता संदर्भ आठवत नाहित पण अनुभवाचे बोल बरेच होते..

मराठी कथालेखक's picture

17 Dec 2015 - 4:36 pm | मराठी कथालेखक

१९८२ च्या गिरणीकामगार संपाबद्दल आणि दत्ता सामंत यांच्या कार्याबद्दल विस्तृत माहिती देणारे पुस्तक आहे का ?

मन्या सज्जना's picture

18 Dec 2015 - 5:12 pm | मन्या सज्जना

लस्ट फॅार लालबाग- विश्वास पाटील

मराठी कथालेखक's picture

18 Dec 2015 - 7:37 pm | मराठी कथालेखक

अरे वा..विश्वास पाटील..? म्हणजे मांडणी रंजक असेल. वाचायलाच हव. मेहता की राजहंस ?

रंजक मांडणीसाठी "चंद्रमुखी" हा त्यांचा मॅग्नम ओपस वाचायला विसरू नका...

जेपी's picture

18 Dec 2015 - 9:11 pm | जेपी

अगदी अगदी...
चंद्रमुखीच्या भितीपोटी 'लस्ट फॉर लालबाग' पाहयच पण धाडस केल नाही

किसन शिंदे's picture

18 Dec 2015 - 11:46 pm | किसन शिंदे

या कादंबरीवरच महेश मांजरेकरांनी हा चित्रपट बनवला होता. यातलं दाहक वास्तव अगदी अंगावर येणारं आहे.

फारएन्ड's picture

19 Dec 2015 - 7:11 am | फारएन्ड

याच नावाचे ("लालबाग परळ") एक पुस्तकही आहे आणि वाचनीय आहे. त्याचे लेखक आठवत नाहीत.

जव्हेरगंज's picture

18 Dec 2015 - 8:56 pm | जव्हेरगंज