'सात' वार, 'आठ' वडा?

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
14 Dec 2015 - 2:16 pm
गाभा: 

एकूण वार 'सात' आहेत.
हिंदी मध्ये आठवड्याला सप्ताह म्हणजे सप्त (सात) वारांचा समूह म्हणतात पण मराठीत त्याला 'आठ'वडा का म्हणतात?
मला पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर कुणाला माहित असेल तर सांगावे.
माझा प्रश्नच चुकीचा असेल किंवा गृहितकं चुकत असतील तर तसे ही सांगावे.
धन्यवाद!!

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

14 Dec 2015 - 3:27 pm | प्रसाद१९७१

मराठी लोकांना हिंदी लोकांपेक्षा एक जास्त अंक मोजता येतो हे दाखवून द्यायचे असेल.

किंवा मराठी लोकांना ७ पर्यंतचे अंक पण नीट मोजता येत नसतील, एक , दोन, तिन, चार, पाच, सात आणि आठ असे झाले असेल.

नाखु's picture

14 Dec 2015 - 3:29 pm | नाखु

बाबा "सप्ताह " पाहिलाय सगळीकडे सौजन्य सप्ताह, वगैरे आठवडा हे बाजाराशी संबधीत असावे.. आठवडी बाजार

चांदणे संदीप's picture

14 Dec 2015 - 3:37 pm | चांदणे संदीप

माझा प्रश्नच चुकीचा असेल किंवा गृहितकं चुकत असतील तर तसे ही सांगावे.

आजीबात चुकत नाहीये एवढच मी सांगू शकतो ;-)

Sandy

रैवारी दोन वडे खायची प्ध्दत असते हो.
टोटल सात वार आठ वडा. बरोबर हाय हिशोब.

बहुधा ते आठवा दिवस या अर्थाने प्रचलित झाले असावे..
अजूनही आमच्याकडे रविवार रविवार आठ, सोमवार नऊ असे मोजायची पद्धत आहे.

याच पानावर सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ३
या ठिकाणी पुन्हा हाच प्रश्न विचारावा- उत्तर मिळू शकते !!

वेल्लाभट's picture

14 Dec 2015 - 4:22 pm | वेल्लाभट

दर आठव्या दिवशी नवीन सुरू होतो तो आठ-वडा

जव्हेरगंज's picture

14 Dec 2015 - 5:22 pm | जव्हेरगंज

WBN

हायला जव्हेरभऊ जिफ्फ चालतेत काय मिपावर?
म्हैतच नव्हते राव.

अभ्या..'s picture

14 Dec 2015 - 5:59 pm | अभ्या..

mipa
.
.
आता मज्जा

सुनील's picture

14 Dec 2015 - 6:27 pm | सुनील

त्याचा संबंध "आठ"शी नसून "हाट"शी आहॆ.

आठवडा या शब्दातून आठ हा शब्द बाहेर काढला तर उरलेल्या वडयाचा सप्ताहाशी काही संबंध लागतोय काय?

जेपी's picture

14 Dec 2015 - 6:56 pm | जेपी

सोम- बटाटावडा..
मंगळ- मेदुवडा..
बुध- दहिवडा..
गुरु- शाबुवडा..
शुक्र-कोंबडी वडा..
शनि- ?? वडा..
रवि- ?? वडा..
सोम- बटाटा वडा.........
.
.
....

मांत्रिक's picture

14 Dec 2015 - 8:55 pm | मांत्रिक

शनीवारला उडिदवडा जेप्या... शनीमहाराजांचा आवडता प्रसाद तो...
रवीवारला पाहिजे तर गहु व गूळ या रवीमहाराजांच्या आवडीच्या वस्तुंचा नवीन वडा शोधून काढा...

नीलमोहर's picture

14 Dec 2015 - 9:46 pm | नीलमोहर

शनि- ह्याला वडा..
रवि- त्याला वडा..

;)

सूड's picture

14 Dec 2015 - 6:57 pm | सूड

शनि- कट वडा..
रवि- भाजणी वडा..

नाव आडनाव's picture

14 Dec 2015 - 8:45 pm | नाव आडनाव

जबरदस्त प्रश्न.
तुमचे प्रश्न वाचून मला एक प्रश्न पडला - सातंच वार असतांना लुगडं "नऊ"वार का असतंय. सहावार-नऊवार लॉजिक चूक आहे. सात वार असतांना लुगडं कसंकाय नऊवार? कुछ तो गडबड है दया ...

साती's picture

14 Dec 2015 - 11:55 pm | साती

अहो ते सोडा, काही मॉडर्न म्हणवणार्‍या बायका सात वार असतानादेखिल पाच वार/ सहा वार साड्या नेसतात. (कपड्याची बचत करायला.)
वात्रट मेल्या!
:)

मास्टरमाईन्ड's picture

15 Dec 2015 - 12:19 am | मास्टरमाईन्ड

पटलं आपल्याला. ;)

जयन्त बा शिम्पि's picture

15 Dec 2015 - 12:48 am | जयन्त बा शिम्पि

वात्रटा , ' ते सोडा ' म्हणजे नेमके काय सोडा ? लुगडे की बोलणे ?
नाही , मनात शंका म्हणुन विचारले हो ! !

उगा काहितरीच's picture

15 Dec 2015 - 12:52 am | उगा काहितरीच

जाउद्याना भौ कायले मिपाकरायच्या डोक्याले त्रास दिउन रायले ?