तेंव्हाच नारळ का फुटला ? अथवा नारळ हवा तेंव्हाच का नाही फुटला ?
हो ... कालच एक नारळ सोलला ... प्रयत्नाने आपटला .. एक मजबूत दगड बघून .. पण नाही फुटला .. खरच.. ताकद होती . दगडही मजबूत .. नारळाला ही पाणी लावलेले .. पण नाही .
प्रयत्न केले .
..
:मग चौथांद्या हापटल्यावर फुटला ...
चौथांद्याच का फुटला ? पहिल्यांदा वा दुसर्यांदा का नाही ? आणि सर्व अनुकूल असूनही ??
बर म्हटले आपण आधुनिक .. बल ( फोर्स) वैगैरे माहित असलेले ..
मग बनवलीच एक मशीन .. किती टणक सरफेस ( हो मुद्दाम इंलीश हा ! कारण आंम्ही आधुनिक ) पाहिजे .. किती फोर्स लावला पाहिजे .. नारळाचा डायमीटर व जाडी काय पाहिजे .. सगळे व्यवस्थित
हापाटला पहिला नारळ .. पण नाही फुटला ..
हा पण दुसर्यांदा फुटला बर का .. पहिल्यांदा का नाही ???
मी चंद्रावर आधी कुत्रे पाठवले त्याआधी कदाचित डुक्कर .. ते नाही जगले .. माणूस जागला ..
आमचे मंगळ यान मात्र मंगळावर पहिल्यांदाच पोचल .. काही मानवांचे प्रयत्न करून दुसर्या अथवा तिसर्या प्रयत्नांत पोहोचले .
आजही नारळ कधी पहिल्यांदा फुटतो कधी दुसर्यांदा कधी चौथांद्या ..
मानव जीवाच्या दृष्टीने सर्व अनुकूल असूनही...
प्रयत्न करा.. “ मी साथ देईन” ..आणि त्यानंतर कळेल तुम्हाला तुमचे अस्तित्व...
मी कोण ???
एका क्षुद्र प्राणी हे सर्व कसे निर्माण झ्हाले ह्याची उत्तरे शोधतो आहे . एका स्टेम सेल मधून अवयव निर्माण करता येतीलही किंवा अजून काही
.. आणि प्रत्येक कदाचित सापडलेल्या उत्तरात स्वताची जीत समजतो आहे ..
पण हे सर्व का निर्माणच का झ्हाले ?????
नारळ त्याचवेळी का फुटतो अथवा त्याचवेळी का फुटला नाही या प्रश्नाचाच हा प्रश्न ...
आणि मग नारळ मला हवा तेंव्हाच का नाही फुटला ?? .
मला ??? अरे तू कोण ??? असे त्या सृष्टीने मला का विचारु नये ?
प्रतिक्रिया
14 Dec 2015 - 2:36 am | कंजूस
प्रथम सुज्ञ विचार आणि नंतर सुज्ञ तत्त्वज्ञान.
हे एखादे ललित नसेल तर मात्र वैज्ञानिक उत्तर काढण्यात आपण चुकतो कारण अध्याह्रुत गोष्टीच चुकीच्या अथवा संपुर्ण आणि सर्व विचारत घेतलेल्या नसतात.परिणामांची मिमांसा करण्याची घाई मात्र फार असते.
14 Dec 2015 - 6:47 am | जव्हेरगंज
नारळ हे बिग बँग चे रुपक आहे काय? असूही शकते!
आवडले!!
14 Dec 2015 - 11:26 pm | सुज्ञ
हो हे अनेक फसलेल्या प्रयोगांविषयी असू शकेल. कधीकधी सर्व अनुकूल असूनही फसतात ना प्रयोग .. मग त्यानंतर एक प्रश्न उरतोच .. की आत्ताच का प्रयोग सफल झ्हाला ? देव दगडात आहे आणि त्याला नमस्कार केल्याने आपल्या जीवाला खूप कष्ट पडतात हात वैगैरे दुखतात ( नमस्काराच्या पोस मध्ये हात आणल्याने ) असे वाटनार्यांनी याचे उत्तर द्यावे .. की सर्व अनुकूल असूनही प्रयोग का फसतात ??
जाता जाता ..
हिंदूच काय कुठल्याही धर्मातील अनिष्ट ( समाजविघातक ज्याने समाजाला त्रास होत उदा सतीप्रथा ) रुधीन्विरूढ बोलता बोलता अथवा विचार करता करता ह्या रूढी “देव” याच संकल्पने मुळे तयार झ्हाल्या असे हे सो कॉल्ड नव नास्तिक मानु लागतात व आपण देव मानत नाही म्हणजे आपण खूपच वैचारिक पुढारले आहोत असे दाखवून लेख लिहितात तेंव्हा त्यांच्या वैचारिक गोंधळाची किव करावीशी वाटते..
14 Dec 2015 - 11:32 pm | सुज्ञ
श्री डॉक्टर खरे यांचा असाच निरुत्तरित प्रश्नांचा ( किंवा असे का व्हावे ) अशा आशयाचा लेख पूर्वी वाचनात आला होता ..
15 Dec 2015 - 12:02 am | उगा काहितरीच
मस्त ! अवघड तत्त्वज्ञान अगदी सोप्या प्रकारे !
15 Dec 2015 - 4:34 am | कवितानागेश
एकन्दरित आशय आवडला.
त्यावरून मिलिंद बोकिलांची 'यंत्र' ही कथा आठवली.
15 Dec 2015 - 5:50 am | राजेश घासकडवी
समजा तुम्ही एक टनाचं वजन त्या नारळावर पाच फुटावरून टाकलं असतंत तर तो फुटला असता का? अर्थातच. हे दर वेळी होईल. एक टनाऐवजी पाचशे किलोचं वजन टाकलं तर? तरीही दर वेळेला होईल. आता तुम्ही जर दहा ग्रॅमचं वजन पाच फुटावरून टाकलं तर तो नारळ फुटेल का? अर्थातच नाही. आणि हेही दर वेळेला होताना दिसेल. वीस ग्रॅम? पुन्हा तेच. दर वेळेला तो नारळ फुटणार नाही म्हणजे नाहीच.
जसजसं आपण दहा ग्रॅम, वीस ग्रॅम वाढवत वाढवत नेऊ, तसतसं कुठेतरी एक वजन येईल जिथे एक टक्का वेळेला फुटेल, नव्याण्णव टक्के वेळेला फुटणार नाही. तसंच, जसजसं आपण पाचशे, दोनशे, शंभर, पन्नास, वीस किलोला येऊ तसतसं कुठेतरी एक वजन आपल्याला सापडेल जिथे नव्याण्णव टक्के वेळेला नारळ फुटेल पण एक टक्का वेळेला फुटणार नाही. या दोन वजनांच्या मध्ये आपल्याला फुटण्या किंवा न फुटण्याचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्यूशन काढता येईल.
आपण जेव्हा शक्ती लावून नारळ फोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण लावलेला जोर या दोनच्या मध्ये कुठेतरी असतो. तो जोर जर खूप जास्त असेल तर दर वेळी नारळ फुटेलच फुटेल. तो जर कमी असेल तर कुठल्याच वेळी फुटणार नाही.
जर आपण लावलेला जोर या दोनमधल्या अनिश्चित ठिकाणी कुठेतरी असेल तर तिसऱ्या वेळेला का फुटला, किंवा चौथ्या वेळेलाच का फुटला हे प्रश्न का विचारावेत? हे थोडंसं दोनदा नाणं उडवल्यावर दुसऱ्यांदाच का छापा आला, पहिल्यांदा का आला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यासारखं आहे.
15 Dec 2015 - 2:17 pm | विजुभाऊ
नारल पहिल्याम्दा आपटला त्या वेळेस त्याच्या कवचाला काही लहान तडे गेले.
दुसर्या वेळेस आपटला त्या वेळेस ते तडे जर्रा मोठे झाले. तिसर्या वेळे त्याहून थोडे मोठे.
चौथ्या वेळेस ते तडे नारळाला भेग पाडण्या इतपत मोठे झाले इतकेच.
पहिल्यांदा जर जोर लावला असता तर एकदम्च मोठी भेग पडली असती.
हे म्हणजे न्यूटन हा त्याच्या बाबांपेक्षा होता. कारण त्याचे बाबा जर न्यूटनपेक्षा हुशार असते तर त्यानीच नसता का गुरुत्वाकर्षण बलाचा सिद्धान्त मांडला.
15 Dec 2015 - 6:01 pm | शब्दानुज
इंजिनियरिंगमदधे यासाठी Reliability factor असतो. म्हणजे तुमच्याकडे समजा १०० नारळ असले तर त्यापैकी किती नारळ तुमच्या 'अनुकूल' परिस्थितीत न फूटतील हे पहाणे. जर आपण हा फॅक्टर ९९% घेतला तर याचा अर्थ केवळ एकच नारळ तुमच्या अनुकूल स्थितीत फूटेल. ही पदधत ट्र्ायल अॅंड एरर टाईप असते. म्हणजे १०० नारळ घ्या ते जवळपास आकारमानात सारखेच असतील याची खात्र्ी करा. वेगवेगळी ताकद लावत रहा आणि यावरुन तो फॅक्टर शोधा.
गंमत म्हणजे अनुकूल अशी परिस्थीतीच असु शकत नाही. जी एकासाठी अनुकूल ती दुसरयासाठी प्रतीकूल असणारच ना.
यासाठी आपल्याला त्या नारळाचे कणरचना लक्ष्ात घ्यावी लागणार. दोन कणांमद्धे जर फट निसर्गतः जास्त असेल आणी हाच कमकुवत भाग फोडला तर लवकर फुटेल.
यासाठी सर्वात मजबूत संरचना असलेला नारळ किती ताकदीला फूटतो हे पहावे लागेल. समजा आपण या ताकदीपेक्ष्ा जास्त ताकद लावली तरच सगळे नारळ पहिल्याच फटक्यात फूटतील. हेच वरच्या अभिप्र्ायमद्धेही सांगितले आहे.
इंजिनियरिंगची एक शाखा Machine design याचे मुख्य तत्व जवळपास असेच आहे.