जगप्रसिद्ध दहशतवादी डेव्हिड हेडली हा अमेरिकेत कैदेत आहे. हा अतिरेकी २६/११ च्या भारतीय हल्ल्याचा आयोजक समजला जातो. हल्ल्याच्या आधी तो दोन तीन वेळा त्या त्या हॉटेलात येऊन टेह्ळणी करुन गेला होता. त्या माहितीचा उपयोग करुन पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपला हल्ल्याचा बेत आखला.
अमेरिकन सरकार ह्या माणसाचे हस्तांतरण करु इच्छित नाही. भारतीय न्यायालयाने ह्याला माफीचा साक्षीदार बनवले आहे. त्याने असे म्हटल्याचे सांगितले जाते की इशरत जहान ही तरुणी आमच्या आत्मघातकी पथकाची (अर्थात सुसाईड स्क्वॉडमधली) एक बाई होती. ती काही साथीदारांच्यासह मोदींना मारण्याकरता गुजराथला गेली होती पण तिच्या दुर्दैवाने आणि देशाच्या सुदैवाने पोलिसांनी ह्यांना रोखले आणि गोळीबारात ते ठार झाले.
नंतर अनेक तथाकथित सेक्युलर लोक ह्या "निर्घृण" हल्ल्यावर खवळले होते. ह्या संतापातून इशरत आमची बहीण आहे पासून इशरत मला मुलीसारखी आहे असे अनेक राग आळवले गेले. मुंब्र्यातील सर्वधर्मसहभावसम्राट जितू आव्हाड ह्यात आघाडीवर होते. बाकी राष्ट्रवादीचे लोक त्यात होते. नंतर नितिश कुमारही ह्या इशरतप्रेम्यांच्या जथ्यात सामिल झाले. इशरतच्या नावे अनेक सामाजिक संस्था उघडण्यात आल्या आहेत.
आता ही नवी माहिती आल्यावर हे लोक पश्चात्ताप व्यक्त करतील का हा मोदींचाच नवा कट आहे असे म्हणतील ते बघू या.
हे इस्लामी दहशतवादाचे विष किती खोलवर भिनले आहे ते पाहून भीती वाटल्यावाचून रहावत नाही.
प्रतिक्रिया
13 Dec 2015 - 7:51 am | भंकस बाबा
विश्वास कोणावर ठेवावा?
ज्याला अतिरेकि म्हणुन पकडले आहे त्याच्यावर वा जितुभाईवर जे मुस्लिमाचे कैवारी म्हणुन वावरतात?
जनता दल वैगेरेचे बोलू नका हो, कोणतेही जनता दल बाय डिफ़ॉल्ट मुस्लिमाचे कैवारीच असते.
स्पष्टीकरण अशी असतील.
१) हेडली हा एक अतिरेकी आहे.त्याची साक्ष ग्राह्य मानली जाऊ नये.
२) हे एक मुस्लिमाविरुद्ध कारस्थान आहे.
३) हेडली अमेरिकेचा अंडर कवर एजेंट होता त्यामुळे तो अमेरिकेच्या मुस्लिमविरोधी योजनेचा एक प्यादा
आहे.
४) उगाचच शरद पवार, आव्हाड ,नितेश कुमार, ओवेसी, आज़म खान ,अबु आझमी यांच्या देशभक्तिवर संशय घेऊ नये.
५) आणि शेवटचा , हे कॉपी पेस्ट आहे. यात आरएसएसचा हाथ आहे.
( हाथ असेच वाचावे, मग कसं कास्मोपलिटिन् असल्याप्रमाणे वाटते.)
13 Dec 2015 - 6:17 pm | विकास
ही बातमी (अथवा सरकारला मिळालेली) माहिती तशी जुनीच आहे. नव्याने परत आली आहे.
Intelligence Bureau's letter to CBI: 'David Headley told FBI Ishrat Jahan was a suicide bomber' Updated: July 05, 2013 12:59 IST
14 Dec 2015 - 5:48 am | हुप्प्या
हेडली हा एक अतिरेकी आहे हे खरे. पण त्याला माफीचा साक्षीदार केले आहे त्यामुळे ज्या माहितीमुळे तो गोत्यात येणार नाही अशी माहिती तो देईल. तसे वचन दिल्यावरच त्याला माफीचा साक्षीदार केले गेले असेल. नाहीतर जास्त गंभीर गुन्ह्याच्या खटल्याकरता त्याला हस्तांतरित करायचा तगादा भारत सरकारने लावला असता. त्यामुळे तो जे सांगतो ते खोटेच असे म्हणणे ठीक नाही. तशात हा हेडली सी आय ए चा एजंट होता पण नंतर फितूर होऊन शत्रूला मिळाला त्यामुळे त्याच्यावर अमेरिकन सरकारचा दबाव असेल की काहीतरी माहिती दे. आणि इशरत जहान हा काही मोठी महत्त्वाची असामी नाही आणि आता ती मेलेली आहे त्यामुळे ती माहिती देणे तितकेसे धोकादायक नाही असा हा हिशेब असावा.
ही माहिती जुनी असली तरी थेट दिव्य मराठीपासून अन्य माध्यमातून ही बातमी अचानक झळकली हे आश्चर्य आहे.
14 Dec 2015 - 9:34 am | योगी९००
वसंत पुरकेंनी पण तिला खुप सपोर्ट केले होते. काही लाखांची मदत पण तिच्या घरच्यांना केली होती..
15 Dec 2015 - 10:29 am | योगी९००
वसंत पुरकेंनी नाही तर डावखरेंनी मदत केली होती.....!!
श्रीरंग जोशी धन्यवाद ..!! त्यांनी सांगितले नसते तर माझी चूक झाली हे कळलंच नसते.
14 Dec 2015 - 6:03 pm | विकास
भाउ तोरसेकरांचा लेख (नेहमीप्रमाणे) रोचक आहे...
बाटलीतले भूत बाहेर येणार काय?
14 Dec 2015 - 6:10 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
नुकतेच ओबामांकडून मोदींचे झालेले कौतुक्,नंतर जपानच्या पंतप्रधानांनी केलेली तारीफ व आता हे प्रकरण... ह्या तिन्ही घटना योगायोगानेच घडल्या आहेत असे समजून चालूया.
15 Dec 2015 - 10:54 am | अनुप ढेरे
ब्रिंदा कारत यांनी या अँब्युलन्सच उद्घाटन केलं होतं
15 Dec 2015 - 12:50 pm | कैलासवासी सोन्याबापु
वृंदा करात होय!! असो असो त्या बाई अन एकंदरित त्यांच्यापक्षाच्या बेसिक मधेच लोच्या आहे! विघ्नसंतोषी गँग आहे ती एक महत्वाची