कान्जुरमार्ग पश्चिम मुम्बई येथे एन सी एच कोलोनी च्या आवारात एका छोट्या टेकडीवर अय्यप्पा सबरीमाला मंदीर आहे. जाण्यासाठी एल बी एस रोडवर हुमा टोकीज ला उतरून तेथून एन सी एच कोलोनीतून आत जाउन अर्ध्या किलोमीटर्नन्तर शंभर एकशेवीस पायऱ्या चढून गेल्यानंतर हे मंदिर आहे. मंदिर बऱ्यापैकी घनदाट झाडीत वसले आहे. मी भल्या सकाळी साडेसहाला या मंदिरात गेलो शांतता होती. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. पायऱ्या चढताना पण आजूबाजूला चांगला निसर्ग आहे. सकाळच्या वेळी एल बी एस रस्त्यावर वाहने कमी असल्यामुळे वर वाहनांचा आवाज जास्त ऐकू येत नव्हता .
असे म्हणतात की केरळच्या बाहेरील हे एकच शबरीमाला मंदिर आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पर्वत रांगेत हे मदिर आहे. पायऱ्या चढताना झुडूपात प्लास्टिक चा कचरा मात्र जागोजागी दिसतो
भारतीय नौसेनेची जागा असलेमुळे अतिक्रमणापासून वाचले आहे. मंदिराच्या पायऱ्या
चढताना मला पाच वर्षापूर्वी मी भेट दिलेल्या कर्नाटकातील कोलार येथील अंतर गंगे मंदिराची आठवण झाली. परिसर सुन्दरच. एकदा जरूर भेट द्या. काही माहिती हवी असल्यास नि:संकोच विचारा
प्रकाशचित्रे खाली देत आहे. मोबाईल वरून घेतलेली
टीप - मुंबई, ठाणे , कल्याण , भिवंडी परिसरातील लोकांना फारशी माहित नसलेली आणि निसर्गसौंदर्याने नटलेली मंदिरे आपणाला माहित असल्यास या धाग्यावर उल्लेख करावा
प्रतिक्रिया
11 Dec 2015 - 3:59 pm | संजय पाटिल
वर्णना वरून व फोटु वरून छानच वाटतोय परीसर...
बाकि ती सौदिन्डीन पाटी काय म्हणते ते कळले तर बरे वाटेल.
11 Dec 2015 - 4:14 pm | वेल्लाभट
हायला ! इत्त्त्क्या जवळ असून माहित नसलेलं?? कम ऑन!
जायंस हवें
11 Dec 2015 - 4:18 pm | सूड
ते कडकट्ट कडकट्ट काय लिहीलंय ते पण जरा समजवून सांगा.
11 Dec 2015 - 4:31 pm | मार्मिक गोडसे
मिनि सबरीमाला असे मल्याळममध्ये लिहीले आहे.
11 Dec 2015 - 4:41 pm | अत्रुप्त आत्मा
शांत परिसर..निसर्ग सान्निध्य.......ब्बास..और क्या चाहिये? भगवंत भेटणारच येथे.
11 Dec 2015 - 5:22 pm | शान्तिप्रिय
@मार्मिक , बरोबर ... ते मिनि सबरीमाला असे मल्ल्याळम मध्ये लिहिले आत्ताच गुगल मध्ये पाहिले.
धन्यवाद.
11 Dec 2015 - 5:26 pm | अजया
मला फोटो दिसत नाहीत.रोचक माहिती आहे.मुंबई कट्टा करायला छान जागा वाटते.
11 Dec 2015 - 5:40 pm | मी-सौरभ
तिथेही महिलांना प्रवेश निषिद्ध आहे का?
11 Dec 2015 - 5:49 pm | शान्तिप्रिय
मी चौकशी केली नाही. मी खुप लवकर गेलो होतो. त्यावेळी फक्त काही कुष्ण्वस्त्रातिल व्रतस्थ मल्ल्याळी बन्धु मी तेथे दर्शनाला आलेले पाहिले. पण प्रवेश असणारच महिलाना बहुतेक.
11 Dec 2015 - 6:03 pm | मी-सौरभ
मला असे वाटते की ईथे पण मुळ देवस्थानासारखे नियम असावेत.
12 Dec 2015 - 9:42 pm | उपयोजक
मलाही फोटो दिसत नाहीत क्रोम मध्ये
13 Dec 2015 - 5:38 am | कंजूस
फोटोंची लिंक टाका.नाही दिसत.
13 Dec 2015 - 4:11 pm | कंजूस
आज रविवार लगेच सकाळी मिनी सबरीमला,डॅाकयार्ड कॅालनी/नेवल सिविल हौउझिंग कॅालनी मधल्या टेकडीवरच्या मंदिरात जाऊन आलो.छान आहे जागा आणि फार उंचावर नाही.रेल्वे स्टेचे तीन जिने एवढ्यावर आणि सोप्या पायय्रा.

१) नकाशा-
२) कॅालनीच्या आत शेवटी प्रवेशद्वार


Naval Cvilian Housing colonyच्या गेटवर वॅाचमन आहेत,न विचारता सरळ आत घुसायचं.
३) संध्याकाळी वाटेवर पणत्या लावल्यावर खूप छान दिसत असेल.अशा मंदिरांत बहुधा कृष्ण त्रयोदशी,चतुर्दशी आणि अमावस्यालाच खूप दिवे लावतात.परवाच होती अमावस्या.
४) केरळी मंदिरात केवड्याचं तोरण स्वागताला असतंच.फक्त इथे मूळ शबरीमलाला असणाय्रा 'त्या' अठरा पायय्रा नाहीत.संक्रातीला तिकडे मकरज्योतिसाठी गर्दी असते.

५) मुख्य देऊळ,लुंगीची अट नाही.

६) वाटेवरची अबोली



७) छोटी दीपमाळ
८) झाडी
14 Dec 2015 - 9:31 am | शान्तिप्रिय
मस्त प्रकाशचित्रे.
मी फोटो गुगल ड्राइव वर अप्लोड करुन ते डकवले आहेत. क्रोममधुन
का काही जणाना दिसत नाहित कोण जाणे.
14 Dec 2015 - 5:24 pm | राजेंद्र मेहेंदळे
गूगल ड्राइव्ह वरुन पण फोटो दिसत नाहियेत. फ्लिकरवर टाका किंवा पिकासावर