रोज नवनवे ऐकायला, वाचायला मिळते आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाचा पार बेंबट्या होतो.
काही वर्षांपूर्वी कोलेस्टेरॉल विषयी ऐकले, याचा शरीरावर होणारा परिणाम, रक्तवाहिन्यांवर आतून चिकट स्तर निर्माण होणे, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वगैरे. पाठोपाठ कोलेस्टेरॉल न वाढण्यासाठी काय टाळावे या यादीत अनेक आवडत्या पदार्थांची नावे. तेव्हा शेंगदाणे आणि नारळ/खोबरे हे नकार यादीत होते. आयुर्वेदिक उपचार पद्धती अवलंबणार्या वैद्यांनी छाती ठोकून सांगितले की साजूक तूप उत्तम, त्यात कोलेस्टेरॉल अजिबात नाही उलट ते शरीराला आवश्यक आहे, या उलट अॅलोपथी वाले डॉक्टर म्हणतात की ते कोलेस्टेरॉलसाठी वाईटच.
अचानक असे वाचनात आले की शेंगदाणे आणि नारळ यामुळे कोलेस्टेरॉलचा धोका अजिबात नाही.
आणि अलिकडे वाचनात आले की मुळात कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार यांचा काही संबंध नाही. काही हृदरोग तज्ञांनी असे अनुभव दिले आहेत की त्यांनी जेव्हा आतापर्यंत केलेल्या हृदयशस्त्रक्रियांच्या रुग्णांचा कोलेस्टेरॉल या दृष्टीने अभ्यास केला तर असे आढळुन आले की अर्ध्या रुग्णांचे कोलेस्टेरॉल सर्वसाधारण म्हणजे मर्यादेत होते तर अर्ध्यांचे त्याहूनही कमी होते. काही डॉक्टर्सनी असे प्रतिपादीत केले की जर कोलेल्स्टेरॉल रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर साचते तर ते मूत्रपिंड, यकृत वा पित्ताशयात का साचत नाही?
असेही मत आहे की काही बड्या खाद्य़कंपन्यांनी त्यांची 'पथ्याची आरोग्यपूर्ण खाद्य उत्पादने' खपवण्यासाठी हा बागुलबुवा उभा केला. मधुमेहाविषयी सुद्धा असे वाचनात आले की १९९७ सालापर्यंत साखरेचे १४० हे प्रमाण सामान्य मानले जात होते, अचानक १९९७ साली ते ११५ वर आणले गेले आणि रातोरात काही कोटी लोक मधुमेहग्रस्त ठरले. पुढे २००३ साली ते प्रमाण शंभरवर आले. पुन्हा मधुमेहींच्या संख्येत लक्षणिय वाढ. हे प्रमाण घटव्ण्याची शिफारस करणार्या मंडळाचे सर्व सदस्य डॉक्टर्स हे बड्या औषध कंपन्यांचे सल्लागार होते.
यात तथ्य किती?
प्रतिक्रिया
2 Dec 2015 - 2:00 pm | वेल्लाभट
आणखी एक कॉन्स्पिरसी थिअरी म्हणायचीं कीं कांय हीं?
2 Dec 2015 - 2:16 pm | कविता१९७८
चांगला धागा, मलाही याबद्दल माहीती नाही, या धाग्यामुळे छान माहीती मिळु शकेल
2 Dec 2015 - 2:19 pm | प्रसाद१९७१
चांगला धागा, डॉक्टर लोक प्रकाश टाकतीलच.
2 Dec 2015 - 2:22 pm | जातवेद
+१
2 Dec 2015 - 6:02 pm | मांत्रिक
+२
2 Dec 2015 - 5:39 pm | rahul ghate
ह्या विषयावर कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा
2 Dec 2015 - 5:47 pm | मूकवाचक
कोलेस्टेरॉल विषयी 'वैज्ञानिक माहिती' वाचून हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हाती घेण्याजोगा एक विषय आहे असे वाटते. असो.
2 Dec 2015 - 5:57 pm | संदीप डांगे
आम्ही तर केव्हाचेच बोललो होतो की असल्या वैज्ञानिक अंधश्रद्धा दूर करायला अंनिसने पुढाकार घ्यायला हवा. पण असे बोलले की आम्ही अंनिसच्या महान कार्यावर चिखलफेक करत आहोत असे काहींना वाटले.
2 Dec 2015 - 5:56 pm | राही
मध्यंतरी डॉ. मीना नेरूरकर यांचा एक लेख माध्यमांतून फिरत होता. त्यात खोबरेलाचे आश्चर्यकारक गुण सांगितले होते. रोज एक चमचा खोबरेल प्याल्याने फायदा झाला त्याचेही उल्लेख होते.
2 Dec 2015 - 6:03 pm | पैसा
आता मोदी सरकार हामेरिकन कुंपण्यांचे ऐकून अजून काय काय गोष्टी करतात बघू या!
मी तर या टेस्ट करायलाच जात नाही. उगीच आ बैल मुझे मार काय! खाणे जेवण नेमस्त ठेवायचे. थोडाफार व्यायाम करायचा. बाकी काही का होईना!
2 Dec 2015 - 6:03 pm | संदीप डांगे
मेडिकल सायन्स मधे बाबा वाक्यम् प्रमाणम् असतं. पडदे के पिछे बरंच काय चालू असतं. डॉक्टरलोक त्याबद्दल कधीच खुलासे करत नाहीत. एखादेच रवी बापट असतात.
डायबेटीस ही एक इंडस्ट्री आहे. आजार नाही. मनुष्य आयुष्यभर औषधे घेत राहिला पाहिजे अशी व्यवस्था म्हणजे डायबेटीस उपचार पद्धती. इथे एक गोळी पन्नास पैशालाही मिळते आणि तीच पन्नास रुपयालाही मिळते.
बाकी नेहमीचा मसाला आहे धाग्यात. नवीन माहितीबद्दल धन्यवाद! २०० साठी शुभेच्छा!
3 Dec 2015 - 9:59 am | हेमंत लाटकर
पुरोहितांवर कर्मकांड करून लाखो रूपये कमावतात असा आरोप केला जातो. मग डाॅक्टर अनावश्यक तपासण्या करून भरमसाठ आैषधे घ्यायला लावतात याबद्दल मात्र कोणी बोलत नाही.
अवांतर : जेनेरिक आैषधे खूप स्वस्त असतात पण एकही डाॅक्टर जेनेरिक आैषधाचे प्रिस्पिक्शन लिहून देत नाहीत.
3 Dec 2015 - 10:09 am | मांत्रिक
लट्टुकाका, प्रत्येक औषधाच्या स्ट्रीपवरची कंटेटची नावे वाचायची सवय ठेवली तर आपोआपच आपल्याला तेच औषध असणारे पण दुसर्या कंपनीचे स्वस्तातले उत्पादन घेता येते.
उदा. Omniprazole हे पित्तशामक औषध दोन वेगवेगळ्या कंपन्या ओमेझ-डी आणि ओम्नी-डी या नावाने विकतात. हे एक सोपे परिचित उदाहरण झाले. परंतु सर्दी, खोकला, ताप यांची औषधे व अँटीबायोटी़क यासारख्यात तर अनेक प्रकारची काँबिनेशन असून सामान्य माणसाला हे सर्व गोंधळून टाकणारे व घाबरवणारेच ठरेल. त्याकरिता वैद्यक व्यवसायिकांनीच पुढाकार घ्यायला हवा.
पण माझा एक अनुभव आहे. स्वस्तातील औषध लवकर परिणामकारक ठरत नाही म्हणतात. मला पण असा अनुभव आलाय. पण हा सर्व मनाचा खेळ असेल का की औषध स्वस्त म्हणून परिणाम कमी!
की खरंच स्वस्त औषधात फिलर्स वगैरे वापरत असतील?
4 Dec 2015 - 3:43 pm | एक सामान्य मानव
हा प्रयत्न केला होता. पण दुकान्दार ही औषधे ठेवत नाहीत. जी मिळतात ती साधारण सारख्याच किमतीची असतात. एखाद दुसरा रुपया कमी जास्त. खूप स्वस्त औषधे ठेवत नाहीत कारण कोणीच ती लिहून देत नाही व जनरली लोकांना ती माहित नसतात.
3 Dec 2015 - 11:13 am | सुबोध खरे
भारतात विकली जाणारी ३०% औषधे नकली असतात. counterfeit drugs a study by Assocham, the body that represents chambers of commerce in India, recently put it at a high 30% of all drugs sold in India, or about Rs10,200 crore out of an industry that sells Rs34,000 crore each year.
http://www.newsweek.com/2015/09/25/fake-drug-industry-exploding-and-we-c...
http://www.livemint.com/Companies/DKFwlkzPv02MPyiZxUGqDN/Fake-drug-indus...
डॉक्टरने जेनेरिक औषधाची चिठ्ठी द्यायची आणी केमिस्टने त्याला जो सर्वात जास्त कमिशन देईल त्या कंपनीचे औषध विकायचे हा "१००%" डॉक्टरना अनुभव आलेला आहे. आणी अशा नकली औषधाने रुग्णाचा आजार बरा झाला नाही तर डॉक्टरला अक्कल नाही हे आहेच. वर होणारे साईड इफेक्ट्स बद्दल बोलणे नाहीच. हे सर्व जर रुग्णाने दिलेले औषध वेळेवर घेतले तर
रुग्णसेवा म्हणजे ईश्वरसेवा अशा तर्हेचे उदात्त विचार डोक्यात ठेवून आम्ही लष्कर सोडल्यावर व्यवसाय सुरु केला.
व्हावी म्हणून RANBAXY या कंपनीची जेनेरीक औषधे उदा. ROXITHROMYCIN रुपये ४०/- (१० गोळ्यांसाठी) ROXITHRO ७२ रुपये त्याच कंपनीचे ब्रांडेड ऐवजी विकत घेतले आणी रुग्णांना ना नफा तत्वावर देणे सुरु केले.
त्यावर डॉक्टर स्वतः कडचे औषध देऊन पैसे उकळतात असे बरेच संवाद कानावर आल्यामुळे असे "उदात्त" प्रयत्न सोडून दिले. ROXITHRO ७२ रुपाये देऊन घेण्यास रुग्णांची पसंती होती तर उत्तम. उगाच आम्ही औषधे विकत स्वतः कडे ठेवायची आणी वर शिव्या खायच्या हे धंदे कशाला?
डॉक्टर धंदाच करायला बसले आहेत, आम्हाला कापायला तयार असतात, लुटतात हे सर्व आहेच.
असो.
3 Dec 2015 - 11:16 am | मांत्रिक
डॉक्टरने जेनेरिक औषधाची चिठ्ठी द्यायची आणी केमिस्टने त्याला जो सर्वात जास्त कमिशन देईल त्या कंपनीचे औषध विकायचे हा "१००%" डॉक्टरना अनुभव आलेला आहे. आणी अशा नकली औषधाने रुग्णाचा आजार बरा झाला नाही तर डॉक्टरला अक्कल नाही हे आहेच. वर होणारे साईड इफेक्ट्स बद्दल बोलणे नाहीच. अगदी सहमत! ही बाजू पण लक्षात घ्यायला हवी.
3 Dec 2015 - 11:26 am | वेल्लाभट
+१ डॉक्टर कळकळ पोचली
3 Dec 2015 - 11:33 am | वेल्लाभट
एक विचारू का पण डॉक्टर आता विषय निघालाय तर...
When a case happens where on account of an obvious negligence or an intentional act of a doctor, a patient loses his life or faces other painful medical consequences, we sometimes see patients reacting violently, sometimes thorough a more sophisticated channel like social media. The doctors then go on a strike may be, causing more inconvenience to other patients.
हे असं जेंव्हा होतं; तेंव्हा तुमचं काय म्हणणं असतं? अशा वेळीही डोक्टरांचंच समर्थन करावंसं वाटतं, की डोक्टर पेशातील माल्प्रॅक्टिसेस विरुद्ध एकत्र व्हावंसं वाटतं? अशी उदाहरणं देऊ शकाल का की जिथे डॉक्टर फ्रॅटर्निटीतूनच एखाद्या डॉक्टरला, किंवा एखाद्या गटाला विरोध झालाय, त्यांच्या दूषित उद्देशांमुळे?
3 Dec 2015 - 12:22 pm | सुबोध खरे
या प्रश्नाचे दोन भाग आहेत.
जर डॉक्टरच्या निष्काळजीपणाने रुग्णाला इजा झाली किंवा मृत्यू झाला यात ज्याचा नातेवाईक गेला आहे त्याला साहजिकच लोकांची सहानुभूती असते. एक उदाहरण देतो के ई एम रुग्णालयात एक चेम्बुरहून अत्यवस्थ बालक घेऊन त्याचे आईवडील आले. हे बालक तीन दिवसापासून गम्भीर आजारी होते. शेवटच्या क्षणी त्या पालकांनी के ई एम मध्ये आणले तेंव्हा तेथील मुलांचे आय सी यु मध्ये एकही खाट शिल्लक नव्हती. पालकांना याची कल्पना दिली गेली असताना त्यांचे म्हणणे कि आमचे मुल जास्त गंभीर आहे. तुम्ही कोणत्याही मुलाला वार्ड मध्ये हलवा आणी आम्हाला जागा द्या. तसे करणे शक्य नव्हते या मुलाची वार्ड मध्ये सोय केली होती पण चार पाच तासात ते मुल दगावले. या रुग्णाच्या नातेवाईकांनी तेथील डॉक्टर आणी परिचारिकेला काठ्या आणी सळ्यांनी मारहाण केली. अशा परिस्थितीत के ई एमच्या डीन नि पोलिसांना कळवले असता काहीही हालचाल झाली नाही. कारण "त्यांचे पोटचे मूल दगावले होते " म्हणून सर्व सहानुभूती त्यांच्याकडेच होती. या परिस्थितीत त्या दिवशी वर्तमानपत्रात "डॉक्टरच्या निष्काळजीपणाने बालकाचा मृत्यू" अशी बातमी आली होती . दुसर्या दिवशी सविस्तर खुलासा झाला तेंव्हा आई बाप तीन दिवस थंड बसले होते असे कळले तेंव्हा त्यांना निष्काळजीपणा बद्दल अटक करा असे म्हणायला कोणी पत्रकार तयार होईल का? अशा परिस्थितीत डॉक्टरनी काय करणे अपेक्षित आहे?
संपावर गेले नसते तर त्यांच्याकडे कुत्रंहि पाहण्यास तयार नाही. १८-२२ तास ड्युटी करणाऱ्या डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था आपण एकदा पाहून या म्हणजे आपल्याला कळेल. २०१५ मध्ये तीन निवासी डॉक्टरचा क्षय रोगाने मृत्यू झाला आहे. त्याकडे लक्ष द्यायला ना जनतेला वेळ आहे न सरकारला. एक मेला तर दुसरा येतोच आहे.
काहीही झालं कि अत्यावश्यक सेवा याचा बडगा उगारायला न्यायालय आणी सरकार नेहमीच तयार होतं. कारण सवंग लोकप्रियता. तरी बरं हे सरकारी रुग्णालय होते त्यामुळे निदान पैशासाठी केलं असा म्हणता येणार नाही.
खाजगी रुग्णालये संपावर जात नाहीत आणी गेली तरी त्यांना कुणी विचारत नाहीत. ठाण्यात श्री आनंद दिघे यांच्या मृत्यू नंतर रेमंड्स (आत बट्ट्यात/ तोट्यात असूनही ते जन हितार्थ चालवीत होते) चालवीत असलेल्या रुग्णालयात शिवसैनिकांनी जाळपोळ केली. यामुळे त्या प्रशासनाने ते रुग्णालय कायमचे बंद केले आणी ठाण्यातील जनतेची फार मोठी गैरसोय झाली. पण लक्षात कोण घेतो?
राहिली गोष्ट निष्काळजीपणा हा ठरवायचा कोणी? एक तर पोलीस किंवा तज्ञ समिती. त्याअगोदर रुग्ण कायदा हातात घेऊन आपल्या बाजूने निकाल लावायचा प्रयत्न करीत आहेत आणी याला सामान्य माणसे सार्वजनिक न्यासावर कोणतीही शहानिशा न करता ढकल पत्रे पाठवून दुजोरा देत आहेत. यामुळे आज परिस्थिती अशी झाली आहे कि रुग्ण जास्त अत्यवस्थ असेल तर बरीचशी खाजगी रुग्णालये आमच्याकडे साधन सामग्री नाही, बेड रिकामा नाही, डॉक्टर सुटीवर आहे अशी कारणे दाखवून रुग्णांना सरकारी रुग्णालयात पाठवीत आहेत. पैसा मिळाला नाही तरी चालेल पण हि कटकट नको असा सर्वत्र सूर आहे. शेवटी यात सर्वसामान्य माणसांचेच नुकसान आहे. तेंव्हा सार्वजनिक न्यासावर कोणतीही शहानिशा न करता आपण मत देणे किती योग्य हे गंभीर पणे विचारात घ्यायची वेळ आली आहे.
राहिली गोष्ट एखाद्या डॉक्टरने गरज नसताना एखादि शल्यक्रिया केली आणी रुग्ण दगावला तर त्यात असलेला निष्काळजी पणा हा पोलीस तज्ञ समिती किंवा न्यायालयाने सिद्ध केल्याशिवाय जर इतर डॉक्टर त्याला दोषी ठरवणार असतील तर त्यांच्यात आणी निरक्षर जनतेत फरक काय राहील?
आणी असे सिद्ध झाले कि भारतीय वैद्यक संस्था त्यांच्यावर बंदी घालते.
3 Dec 2015 - 2:22 pm | वेल्लाभट
बरोबर आहे तुमचं. अॅग्रीड. अतिशय संतुलित प्रकारे बाजू समजवलीत.
खरं म्हणजे, 'घ्या! म्हणजे तुम्हीही त्यातलेच डोक्टरांवर आरोप करणारे, मारहाण करणारे!' असा विक्षिप्त प्रतिसाद तुमच्याकडून येणार नाही याची खात्री होती. म्हणूनच विचारावसं वाटलं. बरेचदा इथं लोकं विपर्यास करताना दिसतात ना, म्हणून हे स्पष्टिकरण बाकी काही नाही.
थंब्स अप.
5 Dec 2015 - 8:42 am | नेत्रेश
डॉक्टरनी वेल्लाभटांचा "अशा वेळीही डोक्टरांचंच समर्थन करावंसं वाटतं, की डोक्टर पेशातील माल्प्रॅक्टिसेस विरुद्ध एकत्र व्हावंसं वाटतं?" हा प्रश्न मात्र टाळलाच.
मलातरी वाटत नाही की मिपावरचा कुठलाही डॉक्टर या प्रश्नांची उत्तरे देउ धजेल.
5 Dec 2015 - 10:04 am | सुबोध खरे
नेत्रेश आण्णा
डॉक्टरांची संघटना IMA हि वेळोवेळी माल्प्रॅक्टिसेस करणाऱ्या डॉक्टरन बोलावून "समज" देण्याचे किंवा समुपदेशन करण्याचे काम करीत असते. पण हि बहुतांशी माहिती "ऐकीव" असल्याने त्यावर ठोस असा उपाय त्यांना करत येत नाही किंवा ते त्यांच्या अखत्यारीत आणी कायद्यात बसत नाही.
शिवाय एखादा डॉक्टर आपल्या कौशल्यापेक्षा "जास्त" काही करायचा प्रयत्न करीत असेल किंवा सरळ सरळ गैरप्रकार करीत असेल तर "मौखिक" प्रसिद्धीमुळे त्याच्या कडे आपले रुग्ण पाठविणे डॉक्टर स्वतः हून कमी करतात किंवा आपल्या माहितीतील लोकांना त्याविरुद्ध सल्ला देतात आणी डॉक्टर ने दिलेल्या अशा सल्ल्याची चार जणात प्रसिद्धी फार लवकर पसरते.परंतु इथे सुद्धा कोणतीही गोष्ट केवळ ऐकीव असल्याने प्रत्यक्ष कृती करणे अशक्य असते किंवा अशा गोष्टीला "प्रसिद्धी" देणे अशक्य असते.
राहिली गोष्ट-- एखाद्या डॉक्टरला कायद्याप्रमाणे शिक्षा झाली तर ती बातमी पहिल्या पानावर वर्तमानपत्रात येतेच किंवा आपल्यासारखे लोक चविष्टपणे चघळतातच.
6 Dec 2015 - 11:47 am | नेत्रेश
"किंवा आपल्यासारखे लोक चविष्टपणे चघळतातच."
आपली ओळख किंवा काहीही पुरावा नसताना हे अनुमान आपला कौशल्यापेक्षा "जास्त" काही करायचा प्रयत्न वाटतो.
18 Mar 2017 - 5:12 pm | इरसाल कार्टं
+1111111
3 Dec 2015 - 12:37 pm | प्रसाद१९७१
वेल्लाभट - कदाचित काही वेळेस डॉकटर ची चूक होऊ शकते, कधी कधी प्रचंड काम ( १६-१६ तास ) वगैरे कारणांमुळे क्वचित दुर्लक्ष पण होऊ शकते. पण इंटेंशनली / जाणीवपूर्वक डॉक्टर असे काही करेल असे अजिबात वाटत नाही. ( दुर्मीळातील दुर्मीळ केस चे उदाहरण देऊ नका ).
पण अजिबात चुका न होणे हे शक्य आहे का? कोणाकडुन ही. आपण स्वता आपल्या कामात प्रत्येक दिवशी कीती प्रचंड चुका करतो. पण डॉक्टरांकडुन स्टॅटेस्टिकल्ली कीती चुका होतात?
आणि ह्या सर्वात रुग्ण आणि त्याचे नातेवाईक ह्यांची काहीच जबाब्दारी नसते का? डॉक्टर नर्स वगैरेंना प्रश्न विचारणे, औषधे जी लिहीली आहेत तिच दिली जातायत का नाही ते बघणे इत्यादी इत्यादी करायला नको का?
आणि शेवटी काही गोष्टी नशिब/ दैव वगैरे वर आपण सोडत नाही का? मी अमेरीकेत का जन्माला आलो नाही? नारायण मूर्तीचा मुलगा का झालो नाही? एखाद्या हिरो सारखा का दिसत नाही? अश्या गोष्टींनी काही जगावर राग काढतो का?
3 Dec 2015 - 2:26 pm | वेल्लाभट
एक मिनिट; तुमचे काही मुद्दे बरोबर असले तरी मी इथे फक्त शंका म्हणून डॉक्टरांना विचारलंय हो. मला वैयक्तिक काहीच मत द्यायचं नाहीये.
आणि
हे जेंव्हा तुम्ही म्हणता तेंव्हा मला सांगा, पेपरमधे ते किडनी काढली, नॉर्मल होत असताना उगाच सीझर केली, काहीच न करता नुसते टाके घालून अँजिओप्लास्ट्री वगैरेचे पैसे घेतले... या बातम्या येतात त्या उगीचच्च नाही ना येत; असे प्रकारही होतात जगात; आपल्याकडे जास्त. सो; नो साइड इज कंप्लीटली राइट्/राँग असं म्हणेन.
3 Dec 2015 - 2:56 pm | प्रसाद१९७१
कीडनी काढणे, अवयवांचा व्यापार करणे ही गुन्हेगारी आहे, त्या बद्दल काहीच बोलणे नाही. तो डॉक्टर जरी असेल तरी गुन्हेगार आहे.
पण दुसरी दोन उदाहरणे, सीझर आणि खोटी अँजिओप्लॅस्टी : ह्या दोन गोष्टींमुळे तुम्ही डॉक्टरांना जो प्रश्न विचारला होता ( रुग्णाचा मृत्यु किंवा अपंगत्व ) नाही येणार . ही पैश्याची फसवणुक आहे . रुग्णाचे पैसे फक्त जास्त जातात.
म्हणुनच मी काही जबाब्दारी रुग्ण आणि नातेवाईकांवर पण टाकली होती. अपघात वगैरे प्रसंग सोडता, आपल्याला अशी फसवणुक न करणारे हॉस्पिटल आणि डॉक्टरची माहीती असायला हवी. किंवा जेंव्हा गरज पडेल तेंव्हा ती मिळवायला हवी.
3 Dec 2015 - 2:59 pm | वेल्लाभट
राइट आहे.
3 Dec 2015 - 3:06 pm | संदीप डांगे
सीझर
प्रसादजी,
सिझरमधे फक्त पैसे जातात याला तीव्र आक्षेप. सिझरमुळे अनेक आरोग्य समस्यांना स्त्रियांना सामोरे जावे लागते. जीवन-मरणाच्या प्रसंगातच सीझर योग्य असते. पण हल्ली सर्वांच्या सोयीखातर याचे प्रमाण वाढले आहे. याचे दूरगामी परिणाम स्त्रियांना भोगावे लागतात. याबद्दल अधिक माहिती घ्यावी अशी विनंती. अनवधनानेही कुणी सिझर ला साधी शस्त्रक्रिया समजू नये.
3 Dec 2015 - 3:11 pm | प्रसाद१९७१
मान्य संदीप जी.
3 Dec 2015 - 3:20 pm | वेल्लाभट
एक्झॅक्टली.
माझ्या माहितीत एका व्यक्तीने डॉक्टरांचा चावटपणा (कृपया सरसकटीकरण समजू नये) ऐकून असल्याने डिलिव्हरी आधी डॉक्टरांना हे सांगितलं होतं, 'मी सीझरचे पैसे देईन; पण डिलिव्हरी नॉर्मलच करायची आहे'
बाकी डांगे साहेबांचं म्हणणं किती खरं आहे ते वेगळं सांगायला नको.
3 Dec 2015 - 7:22 pm | सुबोध खरे
सिझेरियनचे प्रमाण सरकारी रुग्णालयात साधारण २५ % आहे. तेच खाजगी रुग्णालयात ४० ते ४५ % आहे. याची अनेक कारणे आहेत.( हि आकडेवारी २०१३ ची आहे)
सरकारी रुग्णालयात गरीब स्त्रिया जास्त असतात त्यात एक पेक्षा जास्त मुले असणार्यांचे प्रमाण खूप आहे यात साधारण प्रसूती जास्त सोपी असते. त्यातून या स्त्रिया बर्याच तरुण असतात आणि कळा देण्याची मानसिक तयारीही त्यांची जास्त असते(त्यांच्या जवळ पर्याय नसतोच).बालकांचे वजन जन्मतः सरासरीने कमी असते( आईच्या कुपोषणामुळे) त्यामुळेही साधारण प्रसूती जास्त प्रमाणात होताना आढळते.
या उलट खाजगी दवाखान्यात जास्त वयाच्या (३०+) स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. शिवाय वरच्या आर्थिक स्तरातील स्त्रियांचे प्रमाणही बरेच जास्त आहे. यांची कळा देण्याची मानसिक तयारी आणि क्षमता बरीच कमी असल्याचे आढळते. त्यातून मोठ्या रुग्णालयात हुच्च्भ्रू आणि अद्ययावत स्त्रिया यान्च्यात हे प्रमाण फारच जास्त आहे. मध्यम आणि उच्च वर्गातील स्त्रियांच्या बालकांचे जन्मतः वजन मातेच्या उत्तम पोषणामुळे जास्त असते. शिवाय जर प्रसूती गुंतागुंतीची असेल तर लोक स्त्रीला ( सरकारी अनास्थे मुळे) खाजगी रुग्णालयात नेणे पसंत करतात
वरील कारणांमुळे खाजगी रुग्णालयात सरकारी रुग्णालयांपेक्षा सिझेरीयनचे प्रमाण १०-१२ % जास्त असते.
यापेक्षा अधिक असणारे प्रमाण हे सिझेरियन साठी प्रत्यक्ष वेळ कमी लागतो रात्री बेरात्री यावे लागत नाही आणि पैसे जास्त मिळतात हि वस्तु स्थिती आहे. प्रसुतीच्या दरम्यान आईचा रक्तदाब, गर्भाशयाची स्थिती यावर पूर्ण नियंत्रण ठेवता येते त्यामुळे सिझेरियन हे गुंतागुंतीच्या प्रसूती मध्ये आई आणि मुलासाठी जास्त सुरक्षित असते. खाजगी रुग्णालयात सुरुवातीला डॉक्टरला अपयश घेणे कठीण जाते त्यामुळे सिझेरीयन कडे कल वाढतो. यातून एक चक्र निर्माण होते. गुंतागुंतीची प्रसूती नको म्हणून सिझेरियन आणि जास्त सिझेरियन केल्यामुळे अशा प्रसूती बद्दल अनुभव कमी म्हणून परत सुरक्षिततेचा उपाय म्हणून सिझेरियन हि वृत्ती वाढते. मी अशी काही रुग्णालये पाहिली आहेत जेथे सिझेरियन आणि साधारण प्रसूतीसाठी तोच दर आहे. पण तेथेही सिझेरियनचे प्रमाण वरील कारणांमुळे जास्त आढळले. हि परिस्थिती काही वेळेस इतकी टोकास जाते कि ७५ ते ८०% प्रसूती सिझेरियनने होऊ लागतात. बर्याच शहरात असे एखादे रुग्णालय असे आढळते ज्याची "कीर्ती " येथे गेलात तर सिझेरियनच होईल अशी आहे.
उदा. माझ्या माहितीतील एका रुग्णालयातील एक महिला स्त्री रोग तज्ञ. त्यांचे डॉक्टर यजमान वारल्यानंतर एक गुंतागुंतीची केस आली आणि त्यात काही गुंतागुंत झाली या सर्व बाबी त्यांनी एकट्याने हाताळल्या. परंतु आता दोन मुलीना रात्री एकटे सोडायचे नाही आणि उगाच धोका नको म्हणून जराशी सुद्धा वेगळी केस असेल तर सिझेरीयनच करतात.साधारण प्रसूती आणी सिझेरियन चा दर एकच आणी रास्त आहे.
वि. सू.-- मी स्त्री रोग तज्ञ नाही, माझे रुग्णालय नाही. हे केवळ वस्तुस्थितीचे विश्लेषण आहे यात कोणतेही समर्थन नाही.
3 Dec 2015 - 8:12 pm | मार्मिक गोडसे
हे मुख्य कारण आहे.
मुहुर्तावर बाळाच्या जन्माचा अट्टाहास हे ही एक कारण आहे
3 Dec 2015 - 8:18 pm | सुबोध खरे
अरे हो
हे कारण तर विसरलोच. हिरानंदानी रुग्णालयात एका उच्चभ्रू रुग्णाच्या स्वामीजींनी सांगितले होते कि अमुक दिवशी पहाटे पाच ते साडे सहा हि बालकाच्या जन्मासाठी उत्तम वेळ आहे. तेंव्हा त्यांनी त्या वेळेत सिझेरियन ची मागणी केली होती. तेंव्हा त्यावर चारवीत चर्वण होऊन त्यांना तातडीच्या शाल्य्क्रीयेसाठीचे दर द्यावे लागतील हे सांगितले होते. ते द्यायची अर्थातच त्यांची तयारी होती पण जन्म "त्या वेळेतच" झाला पाहिजे ( हा अनुभव मी एकदा लिहिलेला आहे ).
3 Dec 2015 - 10:27 am | सुबोध खरे
कोलेस्टीरोलचे प्रमाण रक्तात २५० पेक्षा कमी असावे असे वैद्यकीय महाविद्यालयात शिकवले जात असे आता हे २०० पेक्षा कमी असेल तर अजूनच चांगले असे शिकवले जाते. डॉक्टर जगमान्य पाठ्यपुस्तकात येणाऱ्या नवीन संशोधनाप्रमाणे आपला सल्ला देत असतात. जसे जसे नवीन संशोधन पुढे येते तसे जुन्या गोष्टी मागे पडत जातात. सामान्य माणसाने काय करायचे हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य डॉक्टरने काय करायचे या सारखाच आहे.
यात औषध कंपन्या आपल्या फायद्या साठी गैरसमज पसरवण्याचे काम नियमितपणे करीत असतात. वैद्यकीय संशोधनामध्ये त्यांनी कोणाकडून मदत घेतली आहे हे जाहीर करणे आवश्यक असते आणी तसे ते केलेही जाते परंतु होणारे प्रत्येक संशोधन १००% काळाच्या कसोटीवर टिकेल याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. मुळात आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उजव्या हाताच्या अंगठ्याच्या ठशा शी जुळत नाही मग दोन माणसे एकाच औषधाला तसाच प्रतिसाद देतील हेही शक्य नाही म्हणून वैद्यक हे संगणकासारखे काटेकोर नाही. बहुतांश लोकांची अशी अपेक्षा असते कि मी डॉक्टरला लक्षणे सांगितली आता त्याने मला स्वस्तात संपूर्ण सल्ला द्यायला हवा आणी तो मला १००% लागू पडायला हवा तेही कोणताही साईड इफेक्ट न होता आणी तोही किमान वेळात. आता हे बहुसंख्य लोकांच्या बाबतीत होत नाही मग डॉक्टर चोर आहेत,पैसे काढतात ई ई आरोप खाजगीत आणी उघडपणे होतात.
यात भर म्हणून बड्या औषध कंपन्या नामांकित डॉक्टर ना भरगच्च आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढून आपल्याला फायदेशीर असे सल्ले देण्यास उद्युक्त करतात हि उघड गोष्ट आहे. म्हणून आमच्यासारखे सामान्य डॉक्टर केवळ पाठ्य पुस्तकात दिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. आता या पुस्तकात येणाऱ्या गोष्टी बहुतांश काळाच्या कसोटीवर टिकलेल्या असतात पण त्या ४-५ वर्षे जुन्या असतात. आजची जालीय पिढी एवढे "जुने" ज्ञान टाकून देण्यास इतकी उत्सुक आहे कि बर्याच वेळेस जगाच्या कोणत्यातरी कोपर्यात आलेल्या कुठल्याशा आरोग्यविषयक नियतकालिकात आलेले अद्ययावत संशोधन आपल्या डॉक्टरना दाखवून त्याच्याबद्दल शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करतात. जे त्या डॉक्टर ने मुळात वाचलेले नाही कि त्यावर त्याने विचार केलेला नाही तो डॉक्टर लगेच कालबाह्य झालेला असतो.
राहिली गोष्ट -- खाद्य आणी औषध कंपन्या करत असणार्या जाहिराती -- ९९ % जाहिरातीमध्ये फुगवलेले आणी चढवलेले दावे असतात. मग त्यात डोक्याला लावायचे नारळाचे तेल असो कि मुलांना द्यायचे दुधात घालण्याचे पौष्टिक पदार्थ असोत कि फेअर आणी लव्हली असो.
त्यातून आधुनिक वैद्यक शास्त्र , आयुर्वेद आणी होमियो पथी हे तीन वेगवेगळ्या दिशा दाखवतात. यात सामान्य माणसाने काय करायचे?
जसे वेगवेगळ्या विमा कंपन्या किंवा गुंतवणूक करणाऱ्या पेढ्या किंवा जालीय विक्रय करणाऱ्या कंपन्या आपल्याला वेगवेगळी आमिषे दाखवून गळाला लावतात तेंव्हा आपण जे करतो तेच करायचे.
सारासार बुद्धी वापरायची.
या प्रश्नाला साधे सोपे उत्तर नाही.
3 Dec 2015 - 10:50 am | पैसा
प्रतिसाद आवडला.
3 Dec 2015 - 10:53 am | संदीप डांगे
प्रतिसाद आवडला.
दुर्दवाने सारासार विवेकाची उपलब्धता दुर्मिळ आहे.
3 Dec 2015 - 10:58 am | प्रसाद१९७१
डॉक्टर साहेब - प्रतिसाद नेहमी प्रमाणेच उत्तम.
पण कोलेस्ट्रॉल ह्या विषयावर तुम्ही एक लेख लिहाना सोप्या भाषेत. जालावर नको ती माहीती असते आणि त्या मागचा इंटेंम/ उद्देश पण काहीही असु शकतो.
जर तुम्ही समजणार्या भाषेत कोलेस्ट्रॉल वर काही लिहीलेत तर फार बरे होइल. कारण त्यात सुद्धा चांगले कोलेस्ट्रॉल , वाईट कोलेस्ट्रॉल वगैरे मारा झाल्यामुळे मी पार गोंधळुन गेलो आहे.
तसेच मधु-मेहा बद्दल पण लिहा. त्यात पण नव-नविन प्रकार वाचायला / ऐकायला मिळत आहेत.
सामान्य माणसाला जितकी गरज आहे तितकेच लिहा. पण लिहा.
3 Dec 2015 - 10:59 am | मांत्रिक
सहमत! डॉक्टरसाहेबांनी लेख लिहावा अशी नम्र विनंती!
3 Dec 2015 - 12:28 pm | सुबोध खरे
मधुमेहाबद्दल ते आयुर्हीत एवढ्या कळकळीने लिहित होते त्यांना तुम्ही पळता भुई थोडी केलीत!!!!
3 Dec 2015 - 12:41 pm | प्रसाद१९७१
मी डॉक्टर लोकांनी लिहावे अशी अपेक्षा केली आहे. माझ्यामते डॉकटर फक्त मॉडर्न मेडीसीन चाच असतो ( जे चुक असेल पण माझे मत आहे )
कोणीही काहीही लिहायला माझी अजिबात हरकत नाही.
पण ह्या बाबतीत खर्या डॉक्टर कडुन समजेत असे काहीतरी वाचायचे आहे, आणि समजुन घ्यायचे आहे.
3 Dec 2015 - 3:35 pm | आनन्दा
बाकी सगळे ठीक आहे. फक्त एक मत इथे मांडू इच्छितो. तुम्ही जे म्हणता तसे बहुतांश महत्वाचे विषय आयुर्वेदिक डॉ. ना पण शिकवले जातात. त्यामुळे बर्यच वेळेस हे डॉ. मिश्र पॅथी असतात. ते औषध कदाचित आयुर्वेदिक देत असतील. पण त्यांचे निदान सर्वसामान्यपणे मॉडर्न मेडिसिनला धरूनच असते.
असो, मला या वादात उतरायचे नाही. फक्त एक पिंक टाकली.
3 Dec 2015 - 1:19 pm | सर्वसाक्षी
जरी जुने असले तरी सामान्य माणसापेक्षा समृद्ध असते आणि आपल्याला आपल्या वर्तुळात ताज्या घडामोडी, नवे उपचार, नवे तंत्रज्ञान हे समजत असते. काही देशात डॉक्टर, अभियंते, स्थापत्यकार यांना काही कालावधीतुन एकदा आपल्या क्षेत्रातील सुधारणा, नवे शोध, नवे तंत्र याचा अभ्यास करणे बंधनकारक आहे असे ऐकुन आहे. जाहिराती पाहुन आहार वा औषधे घेणे इष्ट नाहीच. आपल्या डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक.
जालावर वाचून डॉक्टरला ज्ञान देणे हे अतिरेकी पण जर सामान्य माणसाने रुढ समजा व्यतिरिक्त किंबहुना रुढ वैद्यकाला छेद देणारे असे काही वाचले की तो आपल्या सारख्या डॉक्टरलाच विचारणार. जे आम्ही वाचतो, ऐकतो ते आपणही वाचत, ऐकत असालच आणि अर्थातच वैद्यकिय व्यावसायिक या नात्याने तत्संबंधी अधिक वाचन / संकलन करणार हे निश्चित. अशा गोष्टींवर आपण आणि आपले सहव्यावसायिक यांच्यात चर्चाही होत असतील. यासाठी वरील शंकाबाबत आपले मत मह्त्वाचे
3 Dec 2015 - 10:47 am | वेल्लाभट
डोक्टर म्हणाले ते बरोबर आहे. कसं आहे की जगातली कुठलीही गोष्ट घ्या. त्यासंबंधी दोन परस्पर विरुद्ध मतं तुम्हाला नक्कीच वाचायला मिळतील. कुणी म्हणतं चहा विष आहे; कुणी रिसर्च करतं की चहा आरोग्याला उत्तम, कुणी म्हणतो दारू वाईट तर कुणी म्हणतो नियमित दारू आरोग्याला चांगली. कार्डियो करावा न करावा, भात खावा, न खावा. काहीही घ्या; उलटसुलट सिद्धांत मिळणार. तेंव्हा तुमचं तुम्ही; डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे तुमचा विवेक वापरून ठरवा.
3 Dec 2015 - 11:00 am | गवि
आयुर्वेदिक मत सध्या बाजूला ठेवू.
बाकीची माहिती नक्कीच प्रश्न पाडणारी आहे. पण "असं वाचनात आलं" किंवा "असंही मत आहे की" असे उल्लेख आहेत. ते नेमकं कोणी कुठे मांडलंय आणि त्याला आधुनिक वैद्यकशास्त्राच्या किती तज्ञांनी मान्यता दिलीय यावर बरंचसं अवलंबून आहे. नाहीतर बुचकळ्यात पडण्याचं कारण वाटत नाही.
3 Dec 2015 - 11:09 am | वेल्लाभट
बहुतांश मतांनुसार कोलेस्टरॉल जास्त असेल तर धोक्याचं असतं, असं मानून काही माहिती असलेल्या गोष्टी सांगतो.
कोलेस्टरॉल हा एक मेणासारखा घटक असून तो शरीराच्या अनेक प्रक्रियांकरता गरजेचा असतो.
सामान्यपणे कोलेस्टरॉल जे म्हटलं जातं त्याला 'लायपोप्रोटीन' असं नाव आहे.
याचे दोन प्रकार असतात. एलडीएल म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन व एचडीएल म्हणजे अर्थात हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन
एलडीएल हे वाईट. पण एचडीएल हे सर्वार्थाने चांगलंच असं नव्हे. तरीही एचडीएल वाईट नाही.
सॅच्युरेटेड फॅट्स वाईट; त्या एलडीएल चं प्रमाण वाढवतात
अनसॅच्युरेटेड फॅट्स कमी वाईट; त्या एलडीएल वाढवत नाहीत
ढोबळपणे पदार्थ जितका कठीण तितका त्यातला फॅट कंटेंट सॅच्युरेटेड.
त्यामुळे तेलातील फॅट्स या बहुतांशी अनसॅच्युरेटेड असतात. अपवाद, पाम तेल, नारळाचं तेल,
ऑलिव्ह ऑईल, फिश ऑईल चांगलं का, तर ते ओव्हरऑल कोलेस्टरॉल लेव्हल्स कमी करताना एचडीएल लेव्हल्स कमी होऊ न देण्यास मदत करतं.
बर्याच गोष्टी आहेत. पण मी तज्ञ नव्हे. तेंव्हा, बाऊ करू नका टेस्ट बिस्ट करून. खाण्याबद्दल थोडं वाचा, थोडं डॉक्टरांना विचारा, आणि खा. व्यायाम कराच कुठलातरी. बाकी काय नाय टेन्शन घ्यायचं. फार विचार केला की काहीच कळेनासं होतं.
3 Dec 2015 - 11:20 am | गवि
अॅनॅलिसिस पॅरॅलिसिस..
3 Dec 2015 - 1:30 pm | सर्वसाक्षी
पण उगाच अनावश्यक औषधोपचार घेण्यापेक्षा रुग्णाने मुळात चांगल्या आणि विश्वासार्ह डॉकटरकडुन खातर्जमा करुन घेणे उत्तम.
कुठल्याही दिर्घकालीन उपचाराला कमी वा अधिक पण अन्य परिणाम हे असतातच. समजा जर कोलेस्टेरॉल आणि ह्रूदयविकार यांचा संबंध नसेल तर ते कमी करायचे उपचार का घ्यावे? जर मधुमेहाचे प्रमाण १४० असेल तर ११० च्या व्यक्तिने उपचार का घ्यावेत?
3 Dec 2015 - 1:37 pm | संदीप डांगे
चांगल्या आणि विश्वासार्ह डॉकटरकडुन
हाच तरी नेहमीचाच कळीचा मुद्दा आहे. नेमके हे ठरवायचे कसे यावरच मागे किती चर्चा झाल्या आहेत.
3 Dec 2015 - 5:52 pm | मोदक
चांगल्या आणि विश्वासार्ह डॉकटरकडुन
डांगेसाहेब.. ही तक्रार तुमच्याकडून अनेकवेळा ऐकली आहे म्हणून सहज एक सुचवतो आहे.
आपण अनोळखी वैमानिक, रेल्वे मोटरमन आणि कॅब ड्रायव्हरवर विश्वास ठेवतोच ना? तसेच एक डॉक्टर निवडायचा आणि विश्वास ठेवायचा. आपल्याला निवडायचा 'चॉईस' असला की आपण जास्ती चिकित्सा करतो आणि गोंधळतो.
वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड, त्याच्या परफॉर्मन्सविषयीचे शेरे आपल्याला माहिती होण्याची सुतराम शक्यता नसते, ठरलेले रूळाचे मार्ग, 'डेड मॅन्स हँडल' वगैरे सुरक्षितता असली तरीही रेल्वे मोटरमन चुका करतात, आणि सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तरी एखाद्या छोट्याश्या कारणाने विमाने कोसळतात आणि रेल्वे अपघात होतातच.
मग आपणच निवडलेल्या डॉक्टरांवर शंका घेवून काय फायदा? तुमचा मुद्दा एकदम रास्त आहे, "डॉक्टरच्या लबाडपणामुळे मला पैसा आणि शरिराचे नुकसान होणार आहे" मग ते टाळण्याचा उपाय काय? मी स्वतः डॉक्टर होत नाही तोपर्यंत माझा दुसर्या डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांवर विश्वास बसणार नाही आणि जरी इथून पुढे डॉक्टर झालो तरी सगळ्याच क्षेत्रांमध्ये स्पेशलायझेशन शक्य नाही.
तुम्हाला किंवा मला, कुठेतरी विश्वास ठेवावा लागणारच आहे!
3 Dec 2015 - 6:30 pm | वेल्लाभट
अरे ए :ड :ड :ड
काहीप्पण???? निवडायचा म्हणजे त्याच्याबद्दल लोकांचे प्रत्यक्ष अनुभव, त्याचं नाव या आधारेच निवडयाचा इतपत तरी म्हणा.पूर्वी फॅमिली डॉक्टर असायचे. ते किती महत्वाचे होते हे सगळेच जण मानतील. त्यामुळे निवडायचा प्रश्न नसायचा. आता आज या मॉल मधे उद्या त्या... या रेट ने लोकं या वेळी अमक्याचं औषध घेऊ, या वेळी तमक्याकडे जाऊ असं करतात. इट्स राँग. जीपी, तुमचे फॅमिली डॉक्टर यांना तुमची सगळी माहिती असायची. त्यामुळे ते वेगळं असायचं प्रकरण. आता म्हणजे तसं काहीच नातं नसतं. वेळ आलीच स्पेशालिस्ट कडे पाठवायची तर फॅडॉ सांगतील त्याकडे जायचं...
असो. पण तुम्ही जोकच केलात राव.
3 Dec 2015 - 6:40 pm | मोदक
निवडायचा म्हणजे त्याच्याबद्दल लोकांचे प्रत्यक्ष अनुभव, त्याचं नाव या आधारेच निवडयाचा इतपत तरी म्हणा
अहो.. ती तर बेसीक गोष्ट झाली. समजा आपण रस्त्यावर चाललो आहे आणि चपलेचा अंगठा तुटला म्हणून चांभार शोधता शोधता "अर्रे?? या बोळात पण दवाखाना आहे.. आता पुढच्या आजाराला याच्याकडे येवूया." असे आपण कधी ठरवतो का?
उपचारांसाठी डॉक्टर ठरवताना ज्या बेसीक गोष्टी आपण चेक करतो त्यासुद्धा विषद करणे अपेक्षित होते का?
सगळेच स्पष्ट लिहायचे म्हणजे मिसळीच्या तर्रीमध्ये लिंबू पिळण्या ऐवजी लिंबू सरबत घातल्यासारखे मिळमिळीत होणार..
3 Dec 2015 - 6:55 pm | वेल्लाभट
हाह !
3 Dec 2015 - 7:47 pm | संदीप डांगे
मुळात अशा 'बेसिक गोष्टी सामान्यांना चेक करण्याची वेळच येऊ नये' हा माझा मुद्दा आहे जो मी नेहमी मांडत आलोय. बेसिक गोष्टी म्हणजे तरी काय? कुणी गरोदर महिलेला हार्ट स्पेशालिस्टकडे तर घेऊन जाणार नाही. पण हार्टस्पेशालिस्टचीच गरज असेल तर ह्या शहरात उपलब्ध असलेल्या १० पैकी कोण विश्वासार्ह असा प्रश्न विचारून निर्णय घ्यायला जर आपण सुचवत असाल तर ह्या दहा पैकी 'कोणीतरी विश्वासार्ह नाही' हे सत्यच कबूल करतोय, असे आहे की नाही? माझे मत आहे की हे दहा चे दहाही उत्तम आणि विश्वासार्ह असलेच पाहिजेत. त्यासाठी सरकार, समाज, व्यवस्था ह्यांना कितीही कठोर वागायला लागले तरी चालेल. विश्वास आणि दर्जा या दोन गोष्टींच्या बेसिसवर डॉक्टरांमधून निवड करा हा सल्लाच गंभीर आहे.
तुम्ही वर जे वैमानिक, कॅब ड्रायवर, इत्यादी उदाहरणे दिली ती या बाबतीत आपल्याला मुद्दा व त्याचे गांभिर्य समजले नाही याची निदर्शक आहेत. हा मुद्दा कुणाच्या स्किललेवल बद्दल नसून इंटेन्शन्स बद्दल आहे. कुणाची इंटेन्शन्स कशी मोजली जातात? रादर, वैमानिक, कॅब ड्रायवर यांची इंटेन्शन्स मोजण्याची गरज पॅसेंजरला का? दहा-बारा वर्षांआधी मेट्रोसिटीतल्या स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दलचा लेख वाचला होता. त्यात 'पब्लिक ट्रांस्पोर्ट' स्त्रियांसाठी भारतातून सगळ्यात जास्त सुरक्षित हा मुंबैत आहे असे लिहिलेले होते. या शहरात रात्री कितीही वाजता एखादी स्त्री एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी बिनघोर जाऊ शकते, टॅक्सी-ट्रेन-बस काहीही वापरून. रिक्षात बसतांना तीच्या मनात रिक्षावाल्याबद्दल कुठलाच किंतु-परंतु येत नाही. हे वातावरण २००० साली मुंबईत होते. त्यावेळेस कुठल्याही स्त्रीला इतक्या रात्री कोणता रिक्षावाला सेफ असेल असा विचार करण्याची वेळ येत नव्हती. ही भावना तर रस्त्यावरच्या कमी शिकलेल्या, साध्या गरिब रिक्षावाल्यांनी निर्माण केलेली. नोबेल प्रोफेशन मानल्या जाणार्या वैद्यकिय व्यवसायाकडून अशी अपेक्षा करू जाता आपण 'त्यातल्या त्यात विश्वासू आणि चांगला निवडा' असा सल्ला देता तेव्हा खूप काही चुकते आहे असे आपणास वाटत नाही?
जर प्रत्येक डॉक्टर विश्वासू आणि चांगलाच असेल तर मला ओढून ताणून, उसनं अवसान आणुन त्याच्यावर विश्वास 'ठेवण्याची' गरजच नाही. तो आपोआप इन-बिल्ट असेल.
तुम्ही माझा याविषयावरचा लेख वाचलेला आहे. त्यातले सगळे डॉक्टर हे पुर्ण चौकशी करून निवडलेले होते. तरीही फसवणूक झालीच तेव्हा काही प्रतिक्रियांचा सूर असा होता की तुम्हीच मूर्ख असाल. असो. त्या धाग्याची चर्चा त्या धाग्यावर. पण मुद्दा आणि प्रश्न अजूनही तोच आहे. मी मूर्ख जरी असलो तरी फसवण्याचा अधिकार कुणाला कसा मिळू शकतो?
3 Dec 2015 - 8:10 pm | मोदक
माझे मत आहे की हे दहा चे दहाही उत्तम आणि विश्वासार्ह असलेच पाहिजेत.
हे मत आजच्या युगात फारच भाबडे आहे असे माझे मत आहे.
त्यासाठी सरकार, समाज, व्यवस्था ह्यांना कितीही कठोर वागायला लागले तरी चालेल. विश्वास आणि दर्जा या दोन गोष्टींच्या बेसिसवर डॉक्टरांमधून निवड करा हा सल्लाच गंभीर आहे.
सहमत. पण हा सल्ला "नाईलाजास्तव स्वीकारलेला पर्याय आहे" हेही तुमच्या लक्षात आले असेलच!
वैमानिक, कॅब ड्रायवर यांची इंटेन्शन्स मोजण्याची गरज पॅसेंजरला का?
गरज आहे कारण दुसर्या कुणाच्या तरी चुकीच्या इंटेंशनमुळे (जे पॅसेंजरच्या नियंत्रणाखाली नाहीये) तो पॅसेंजर स्वतः अपघातग्रस्त होणार आहे.
त्यावेळेस कुठल्याही स्त्रीला इतक्या रात्री कोणता रिक्षावाला सेफ असेल असा विचार करण्याची वेळ येत नव्हती. ही भावना तर रस्त्यावरच्या कमी शिकलेल्या, साध्या गरिब रिक्षावाल्यांनी निर्माण केलेली
२००० सालापर्यंत रिक्शावाल्यांनी गुन्हे केलेच नाहीत का? एकही अपघात झाला नाहीच का? किंवा १००% रिक्शावाले "उत्तम आणि विश्वासार्ह" होतेच का?
नोबेल प्रोफेशन मानल्या जाणार्या वैद्यकिय व्यवसायाकडून अशी अपेक्षा करू जाता आपण 'त्यातल्या त्यात विश्वासू आणि चांगला निवडा' असा सल्ला देता तेव्हा खूप काही चुकते आहे असे आपणास वाटत नाही?
चुकत नाहीये असे मी म्हणतच नाहीये. फक्त मी माझ्यापुरता आजच्या काळाला अनुसरून काढलेला निष्कर्ष येथे लिहिला.
मी मूर्ख जरी असलो तरी फसवण्याचा अधिकार कुणाला कसा मिळू शकतो?
प्रॅक्टीकली विचार केलात तर तुम्ही शहाणे असाल तरीही आजच्या युगात फसवले जाताच (याचा रोख डॉक्टरांकडे नाहीये तर तुमच्या कामवालीपासून कंपनीपर्यंत सगळीकडे आहे!) मग तुम्ही रामराज्याची अपेक्षा का करत आहात?
असो, या विषयावर आपण अनेकदा चर्चा केली आहे. तुमच्या अपेक्षा आजच्या काळाला अनुसरून नाहीयेत हे माझे मत; आणि सर्वच डॉक्टरांनी सज्जन असावे हे तुमचे मत, दोन्ही मते आहे तेथेच आहेत. :-|
3 Dec 2015 - 8:53 pm | संदीप डांगे
मग तुम्ही रामराज्याची अपेक्षा का करत आहात?
आपल्या सर्व चर्चेचा सारांश हाच प्रश्न आहे. हाच प्रश्न जेव्हा रुग्ण डॉक्टरांना विचारतात तेव्हा समस्या निर्माण होते.
जेव्हाही ह्या समस्येबद्दल चर्चा झाली आहे, कुठल्याही डॉक्टरांनी पुढे येऊन, हो, हे गैरप्रकार चालतात आणि त्यासाठी आपण अमुक एक उपाय करूयात असे ठाम पणे म्हटलेले नाही. प्रत्यक्षात झाले काय, तर 'रुग्णांचीच कशी चूक होते' हे नेहमी डॉक्टरांकडून मांडल्या गेले आहे. त्यांच्यावर येणार्या रोखाला सामोरे न जाता भलतीकडेच वळवण्याचे राजकारण खेळणे व्यवसायाच्या दॄष्टीने आवश्यक असेल पण बकरे की मां कबतक खैर मनायेगी?
3 Dec 2015 - 9:02 pm | मोदक
जेव्हाही ह्या समस्येबद्दल चर्चा झाली आहे, कुठल्याही डॉक्टरांनी पुढे येऊन, हो, हे गैरप्रकार चालतात आणि त्यासाठी आपण अमुक एक उपाय करूयात असे ठाम पणे म्हटलेले नाही.
मी डॉक्टर नाही. परंतु एका डॉक्टरने किंवा डॉक्टर समुहाने कोणत्या अधिकारावर पुढे यावे आणि उपाय करावेत?
या समस्यांसाठी सरकारी नियंत्रणेखाली न्यायव्यवस्था आहे, डॉक्टरांवर नियंत्रण ठेवणारीही संस्था आहे. सर्व समस्यांवरील उपाय सर्वस्वी त्या व्यवस्थेवर अवलंबून आहेत. त्यांच्याकडून अपेक्षित असणारे कामाची अपेक्षा आपण आपल्या गल्लीतल्या डॉक्टरकडून करू शकत नाही.
(मला सारखे सारखे देजावू फिलींग येत आहे - बहुदा आपल्यात हे सगळे बोलून झाले आहे.)
3 Dec 2015 - 9:35 pm | संदीप डांगे
हो हे सगळे बोलुन झाले आहे. म्हणून खाली नवा प्रस्ताव मांडत आहे.
मला निष्फळ तू-तू-मैं-मैं चर्चेत खरंच रस नाही. निदान ह्या बाबतीत तरी नाही.
3 Dec 2015 - 8:13 pm | सुबोध खरे
मी मूर्ख जरी असलो तरी फसवण्याचा अधिकार कुणाला कसा मिळू शकतो?
डांगे साहेब,
आपण जरा बेफिकीर राहून पहा, रिक्षावाल्यापासून ते विमा एजंट पर्यंत लोक तुम्हाला थुका लावतील कि नाही ते ? तुम्ही कर भरता त्याचे मोल तुम्हाला मिळाले पाहिजे कि नाही? सरकारी यंत्रणा तुमची कामे करतात का?
आपल्याला आला तो अनुभव वाईटच आहे.त्याबद्दल आम्ही फक्त सहानुभूती व्यक्त करू शकतो.
पण दुनिया हि अशीच आहे? कुणाला "अधिकार आहे कि नाही" ती वेगळी गोष्ट आहे. सगळीच माणसे प्रामाणिक आणी विश्वासार्ह असावीत हे स्वप्नरंजन आहे. आयुष्यात तुम्हाला तुमच्या "मित्रा"पैकी कुणीच कधीच फसवले नसेल तर तुम्ही फारच नशीबवान असाल. गेला बाजार ऑरीफ्लेम किंवा टप्परवेअर किंवा एमवे वाला तुमचा एकही मित्र( सौंची मैत्रीण) नसेल तर आपल्याला साष्टांग नमस्कारच करेन.
3 Dec 2015 - 8:34 pm | संदीप डांगे
आपण जरा बेफिकीर राहून पहा, रिक्षावाल्यापासून ते विमा एजंट पर्यंत लोक तुम्हाला थुका लावतील कि नाही ते ?
हो लावतात ना! त्यामुळेच त्यांना सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर अशा शिव्या पडतात. डॉक्टरांना ते सरसकटीकरण मान्य नाही.
तुम्ही कर भरता त्याचे मोल तुम्हाला मिळाले पाहिजे कि नाही? सरकारी यंत्रणा तुमची कामे करतात का?
मिळत नाही. करत नाहीत. त्यामुळेच त्यांना सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर अशा शिव्या पडतात. डॉक्टरांना ते सरसकटीकरण मान्य नाही.
आपल्याला आला तो अनुभव वाईटच आहे.त्याबद्दल आम्ही फक्त सहानुभूती व्यक्त करू शकतो.
मनापासून धन्यवाद!
पण दुनिया हि अशीच आहे? कुणाला "अधिकार आहे कि नाही" ती वेगळी गोष्ट आहे. सगळीच माणसे प्रामाणिक आणी विश्वासार्ह असावीत हे स्वप्नरंजन आहे.
हो हे मान्य आहेच. पण रुग्णांनी डॉक्टरांबद्दल साशंक राहू नये, त्यांच्यावर 'विश्वास टाकावा' अशा अपेक्षा केल्या जातात त्याही स्वप्नरंजन आहेत असे मला वाटते. रुग्णांना डॉक्टरकडे जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सगळ्या अपेक्षांचे ओझे रुग्णांनीच वाहावे आणि त्याने वैद्यकिय व्यवसायाबद्दल विरोधी सूर लावूच नये असे एकंदर वातावरण दिसते.
आयुष्यात तुम्हाला तुमच्या "मित्रा"पैकी कुणीच कधीच फसवले नसेल तर तुम्ही फारच नशीबवान असाल. गेला बाजार ऑरीफ्लेम किंवा टप्परवेअर किंवा एमवे वाला तुमचा एकही मित्र( सौंची मैत्रीण) नसेल तर आपल्याला साष्टांग नमस्कारच करेन.
नशिबाने त्याबाबतीत मी नशिबवान आहे. हे तिन्ही व्यवसाय असणारे मित्रमैत्रिणी आहेत. पण ऑरिफ्लेम, टपरवेअर, अॅमवे शी आपण डॉक्टरच्या प्रोफेशनची तुलना करत आहात, ते वाईट वाटले.
3 Dec 2015 - 8:44 pm | मोदक
आपण जरा बेफिकीर राहून पहा, रिक्षावाल्यापासून ते विमा एजंट पर्यंत लोक तुम्हाला थुका लावतील कि नाही ते ?
हो लावतात ना! त्यामुळेच त्यांना सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर अशा शिव्या पडतात. डॉक्टरांना ते सरसकटीकरण मान्य नाही.
तुम्ही वर दिलेल्या रिक्शावाल्यांसबंधी प्रतिसादामध्ये आणि यामध्ये काहीतरी घोळ झाला आहे का?
तुम्ही कर भरता त्याचे मोल तुम्हाला मिळाले पाहिजे कि नाही? सरकारी यंत्रणा तुमची कामे करतात का?
मिळत नाही. करत नाहीत. त्यामुळेच त्यांना सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर अशा शिव्या पडतात. डॉक्टरांना ते सरसकटीकरण मान्य नाही.
सरकारी यंत्रणा सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर आहे का?
रुग्णांनी डॉक्टरांबद्दल साशंक राहू नये, त्यांच्यावर 'विश्वास टाकावा' अशा अपेक्षा केल्या जातात त्याही स्वप्नरंजन आहेत असे मला वाटते.
आपण मोबदला देवून सेवा घेतो त्या यंत्रणेवर १००% आंधळा विश्वास ठेवणे हे आजच्या जगात स्वप्नरंजनच ठरेल.
रुग्णांना डॉक्टरकडे जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सगळ्या अपेक्षांचे ओझे रुग्णांनीच वाहावे आणि त्याने वैद्यकिय व्यवसायाबद्दल विरोधी सूर लावूच नये असे एकंदर वातावरण दिसते.
नक्की कोणते वातावरण? सध्याच्या असहिष्णु वातावरणाबाबत बोलत आहात का?
3 Dec 2015 - 9:33 pm | संदीप डांगे
तुम्ही वर दिलेल्या रिक्शावाल्यांसबंधी प्रतिसादामध्ये आणि यामध्ये काहीतरी घोळ झाला आहे का?
नाही. घोळ नाही. ते स्त्रियांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल मुंबईत असलेल्या वातावरणाबद्दल आहे. आणि हे साधारणपणे सर्वच रिक्षेने जाणार्यांना भोगाव्या लागणार्या रिक्षेवाल्यांच्या मुजोरी, चोरी, मस्तवालपणाबद्दल आहे. दोन गोष्टींची गल्लत करू नये. सार्वजनिक रिक्षाचे काही कायदे-नियम आहेत. ते बहुसंख्य रिक्षावाले पाळत नाहीत हा सर्वसामान्य जनतेचा अनुभव आहे. त्यावरून जनता त्यांना चोर, बदमाश, हरामखोर म्हणते. हे सरसकटीकरण आहे. आता तुम्ही मला विदा-सर्वेक्षण वैगेरे मागणार नाही अशी अपेक्षा करतो. मुंबैत वा कुठेही आपण कुठल्याही रिक्षास्टँडवर प्रत्यक्ष जनतेकडून ही मते जाणून घेऊ शकता.
सरकारी यंत्रणा सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर आहे का?
प्रश्न सरसकट असण्याचा नसून लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेल्या भावनेचा आहे. ती भावना निर्माण का झाली त्याची कारणे आपणास शहरात फिरलात की लक्षात येतात.
आपण मोबदला देवून सेवा घेतो त्या यंत्रणेवर १००% आंधळा विश्वास ठेवणे हे आजच्या जगात स्वप्नरंजनच ठरेल.
आपण मोबदला देतोय तेव्हा डॉक्टरने योग्य ती सेवा देणे बंधनकारक आहे, आवश्यक आहे ही अपेक्षा जर स्वप्नरंजन असेल तर रुग्ण दगावल्यावर तोडफोड होऊ नये ही अपेक्षाही स्वप्नरंजनच आहे. डॉक्टर खरेंनी म्हटल्याप्रमाणे जर जसा समाज तसा डॉक्टर असेल तर डॉक्टरलाही तो समाज कसा आहे हे समजून घ्यावे लागेल. त्याबद्दल तक्रार करून चालणार नाही.
नक्की कोणते वातावरण? सध्याच्या असहिष्णु वातावरणाबाबत बोलत आहात का?
नाही. त्याबद्दल नाही. आता खालीच डॉक्टरसाहेबांनी एक प्रतिसाद दिला ज्यामधे त्यांनी समाज त्यांना कसा वागवतो ह्याबद्दल लिहिले. ते हे अनुभव नेहमीच लिहतात. कारण जेव्हा डॉक्टरांच्या चुकीच्या वागण्यावर बोलले जाते तेव्हा ते हे अनुभव लिहतात म्हणजे "तुम्ही आम्हाला काय बोलता, तुम्हीच बघा कसे आहात आधी?" असा अॅप्रोच एकंदर दिसतो. हे ते वातावरण. हे समस्येला भटकवण्याचे प्रयत्न आहेत. ब्लेम-गेम आहे. डॉक्टरांबद्दल एकेकाळी देव अशी प्रतिमा होती, ती राक्षस अशी होत जात आहे यात डॉक्टरांचा काहीच दोष नसून समाजाचाच आहे असे ठरवण्याचे जेव्हा प्रयत्न होतात तेव्हा वातावरण कलुषित होते.
मी इथे वारंवार लिहितो. मला एकच अपेक्षा आहे की काहीतरी सकारात्मक, विधायक मार्ग काढता येइल काय? हे असेच असणार आहे म्हणून सोडून द्यायचे काय? मागे बॅटमॅनने तशी संकल्पना मांडली होती की जशी हॉटेल्ससाठी झोमॅटो वेब्साईट आहे तशी हॉस्पीटल्स डॉक्टरसाठी करता येईल काय. मी स्वतः, ह्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न करायला तयार आहे. ह्यात मला डॉक्टरलोकांची मदत लागेल. ह्यासाठी ते समोर येतील काय हाच प्रश्न आता उरतो.
3 Dec 2015 - 9:39 pm | मोदक
मी इथे वारंवार लिहितो. मला एकच अपेक्षा आहे की काहीतरी सकारात्मक, विधायक मार्ग काढता येइल काय?
ठीक आहे. माझ्याकडून काही मदत लागली तर जरूर सांगा.
..आणि यासर्व प्रतिसादांमध्ये तू-तू-मी-मी चा टोन तुमच्याकडून आढळला नाही म्हणून इतका प्रतिसादप्रपंच केला.
4 Dec 2015 - 12:23 pm | मार्मिक गोडसे
त्यासाठी शुभेच्छा.
त्यापूर्वी माझ्या ह्या लेखावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रीया वाचा.
पुन्हा शुभेच्छा.
4 Dec 2015 - 12:40 pm | संदीप डांगे
तुम्हाला मुद्दा कळला नसल्याने तुम्हालाच शुभेच्छा द्याव्यात असे म्हणतो.
आपला धागा हा पैशाच्या भ्रष्टाचारावर होता. आणि हा धागा नागरिकांचे आरोग्य स्वतःच्या स्वार्थासाठी धोक्यात घालून पैसे उकळण्याबद्दल आहे. हे कदाचित आपल्या लक्षात आले नसेल.
एखादा डॉक्टर एखाद्या शस्त्रक्रियेसाठी दोन लाखाच्या ठिकाणी चार लाख घेत असेल तर आपली काय ना नाही. पण दोन लाख मिळतील म्हणून गरज नसतांना कुणाची शस्त्रक्रिया करून त्याच्यामागे आयुष्याभराचे दुखणे लावत असेल तर ते कसे पटेल?
तुमच्या संकल्पनेतला गोंधळ आधी समजून घ्या. अन्यथा मी चोरा-दरोडेखोरांचे समर्थन करत आहे असे आपल्याला वाटेल.
कॉपी-पेस्टींगच्या झालेल्या अनावश्यक श्रमाबद्दल श्रमपरिहार म्हणून एक गाणं ऐका.
4 Dec 2015 - 12:51 pm | सुबोध खरे
हा धागा पण कोलेस्टीरॉलवर आहे असे वाटते. वैद्यकीय गैरप्रकारांवर नसावा.
ओढून ताणून ते कोणत्याही धाग्यावर आणण्याचे काय प्रयोजन?
4 Dec 2015 - 1:07 pm | संदीप डांगे
डॉक्टरसाहेब,
धाग्याचा विषय: कोलेस्टरॉलच्या नावाखाली होणार्या हृदयरोगाशी संबंधीत अनावश्यक शस्त्रक्रिया. हा वैद्यकिय गैरप्रकाराचाच भाग आहे असे वाटते. तुमचे काय मत आहे?
4 Dec 2015 - 2:27 pm | मार्मिक गोडसे
तुमच्यामध्ये झालेल्या मतपरिवर्तनाला आणी तुम्ही करत असलेल्या प्रामाणीक प्रयत्नांना मी शुभेच्छा दिल्या होत्या.
लक्षात आले होते. स्वार्थ हा मुद्दा दोन्हीकडेही समान आहे. भ्रष्ट आचार भले तो आर्थीक असो वा शारिरीक असो मी त्यात भेदभाव करत नाही. आर्थीक भ्रष्टाचारामुळेही एखाद्याचा जीव जावू शकतो. ठाण्यात एका बांधकाम व्यवसायीकाने ह्या कारणाने आत्महत्या केली होती. उदाहरणे बरीच देता येतील. त्यामुळे तुमचा युक्तीवाद चुकीचा वाटतो.
हे तो का करतो? त्या डॉ.च्या बाबतीत अशी घटना घडली असेल व तो त्याचा सूड आपल्यावर काढत असेल असेही असू शकेल. बिनडोक तर्क वाटतो ना?
गोंधळ तुमचा होतोय माझा अजीबात नाही..माझा कोणत्याही प्रकारच्या भ्रष्ट आचाराला विरोधच आहे व माझ्या पातळीवर मी त्याला नेहमीच विरोध करतो.
कॉपी-पेस्टींगला मला कोणतेही श्रम पडत नाही. कृपया माझ्या ज्ञानात भर पडेल अशा विडीओ देत जा. अशा फालतू विडीओमध्ये मला रस नाही. तुमच्यासारख्याकडून अशा विडीओची अजीबात अपेक्षा नव्हती.
जेव्हा सगळा समाज स्वत:च्या स्वार्थासाठी अप्रामाणिकपणा करत असेल तर त्या समाजाला काही पेशांकडून नैतिकतेची अपेक्षा ठेवायचा नैतिक अधिकार आहे का? ह्यात तुम्ही डॉक्टर पेशालाही पकडले होते. आज अचानक युटर्न.
4 Dec 2015 - 3:05 pm | संदीप डांगे
तुम्हाला मला शब्दात पकडण्याचा आनंद मिळवायचा आहे यात जास्त रस दिसतोय. ठिक आहे.
भ्रष्ट आचार भले तो आर्थीक असो वा शारिरीक असो मी त्यात भेदभाव करत नाही. आर्थीक भ्रष्टाचारामुळेही एखाद्याचा जीव जावू शकतो. ठाण्यात एका बांधकाम व्यवसायीकाने ह्या कारणाने आत्महत्या केली होती. माझा कोणत्याही प्रकारच्या भ्रष्ट आचाराला विरोधच आहे व माझ्या पातळीवर मी त्याला नेहमीच विरोध करतो.
अनैतिकता आणि अप्रामाणिकपणा याबद्दलची तुमची मोजपट्टी माझ्या हातात का सोपवताय? आर्थिक भ्रष्टाचाराने कंटाळून त्या बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केली असे तुम्हाला कसे वाटले? उदाहरण देतांना जरा माहितीही काढली अस्ती तर. जेव्हा तो ह्या व्यवसायात आहे तेव्हा त्याला ह्याबद्दल पूर्ण माहिती आहे. त्याने वेळोवेळी संबंधितांना योग्य ते पैसे चारले आहेत. तरीही ते त्याची अडवणूक करत होते. जे त्याला सहन न होऊन त्याने आत्महत्या केली. ही आत्महत्या आत्यंतिक मानसिक दबावातून झाली आहे. आत्महत्या करण्याचा निर्णय हा त्याचा स्वतःचा होता. ह्यात त्याची परिस्थिती कारणीभूत असली तरी जीवंत राहण्याचा त्याच्याकडे पर्याय होताच. तो त्याने स्वतः नाकारला. ह्या प्रकरणाचा रुग्णाला अजिबात गरज नसलेली शस्त्रक्रिया करायला लावून आयुष्याचे दुखणे देणार्या, त्याची जबाबदारी टाळणार्या डॉक्टरशी आपण कसा संबंध जोडू शकता?
या प्रश्नांची उत्तरे द्या, मग पुढे काय ते सांगतो.
4 Dec 2015 - 3:46 pm | मार्मिक गोडसे
अहो तुम्ही तुमच्या सोयीनुसार भूमिका बदलता हेच मला तुम्हाला सांगायचे होते. मला त्यात आनंद होत नाही उलट वाईटच वाटते. माझा कुठल्याही प्रकारच्या भ्रष्ट आचाराला विरोध आहे. तुमचा आहे का?
शेवटी हा कडेलोट कशामूळे झाला. जीव गेलाच ना? हे उदाहरण मी आर्थीक भ्रष्टाचारही एखाद्याचा जीव घेऊ शकतो हे सांगण्याकरता दिले होते. त्यामुळे मी डॉक्टरांच्या अयोग्य प्रॅक्टीसचे समर्थन करतो असा अर्थ काढू नका.
ती सवय तुम्हाला आहे. तुम्ही तुमची मोजपट्टी वापरायाला मो़कळे आहात.
3 Dec 2015 - 8:50 pm | सुबोध खरे
डांगे साहेब
आपण आजही डॉक्टर हा नोबल प्रोफेशन मानता. तो जमाना गेला कारण आता रुग्णही तसेच झाले आहेत. डॉ. श्रीखंडे सारख्या ऋषी तुल्य व्यक्तिमत्वाने डॉक्टरांच्या त्यागाची समाजाला किंमत नाही असे उद्गार काढले आहेत. डॉ रवी बापट यांनी हि अशीच खंत व्यक्त केली आहे. ज्या समाजातून डॉक्टर निर्माण होतात तोच किडलेला आहे. जर बीज किडके असेल तर वृक्ष किडकाच निघणार. हि वस्तुस्थिती मान्य करा.
मी लष्करातून निवृत्त झालो तेंव्हा ज्या सोसायटीत मी लहानाचा मोठा झालो त्यांनी माझ्याकडे दवाखाना घेण्यासाठी काही रक्कम "रोख" मागितली. म्हणजे माझे पांढरे पैसे काळे करून द्यावे लागले. त्याच दवाखान्यासाठी मी ४० महिन्यांचा पूर्ण पगार( GROSS) किंवा ६० महिन्यांचा घरात येणारा पगार( नेट) एवढे पैसे भरले तेंव्हा सोसायटीने मला एक छदाम सवलत दिली नाही परंतु दवाखाना सुरु झाल्यावर मात्र ९० % लोकांनी सोसायटीतील लोकांना सवलत किती हे विचारले?
२०१२ साली १०० रुपये उद्या देतो २०० रुपये आणून देतो म्हणून विश्वास ठेवला तर दोन फुलस्केप पाने भरतील एवढया रुग्णांनी पैसे बुडवले (जर कधी माझ्या दवाखान्यात आलात तर तुम्हाला पाहायला मिळेल) आणी ती रक्कम थोडी थोडकी नव्हे तर २०,०००/- च्या वर जाते. आज कोणी मला सांगितले कि पैसे उद्या आणून देतो तर मी स्पष्ट नाही म्हणतो. यावर आमच्यावर विश्वास नाही का? पासून माणुसकी नाही हे ऐकावे लागते. आई ची बिले बायकोच्या आणी बापाची बिले स्वतःच्या नावावर मागणारे महाभाग शेकड्यांनी आहेत. बिले वाढवून मागणारे सुद्धा. या समाजातूनच डॉक्टर आले आणी येणार मग समाजाने स्वतःच आत्म परीक्षण करायला नको का? डॉक्टर हा आपलाच घटक आहे तो आपण जितके चांगले तितकेच डॉक्टर चांगले असतील.
डॉक्टरनेच त्याग केला पाहिजे, डॉक्टरनेच ग्रामीण सेवा केली पाहिजे,डॉक्टरनेच देश सोडून जायचे नाही. बाकी समाजाने शेण खाल्ले तरी चालेल.
PEOPLE GET THE DOCTORS THEY DESERVE.
3 Dec 2015 - 9:32 pm | संदीप डांगे
आपण मांडलेले अनुभव शंभर टक्के मान्य आहेत. पण आपल्याला असे वाईट अनुभव आले म्हणून आपण चुकीच्या मार्गाने गेलेला पैसा कमवायचा प्रयत्न कराल काय? मी सदसदविवेकबुद्धी, प्रामाणिकता याबद्दल बोलत नाही. तुमचे गेलेले पैसे काढायला किंवा अतिरिक्त कमवायला काहीतरी (कुणाला आरोग्याच्या दॄष्टीने त्रासदायक वा कशीही नसलेली) क्लृप्ती लढवालच. पण माझे एवढे लाख गेले तर आता कुणा डॉक्टरशी संगनमत करून येणार्या रुग्णांना गरज नसलेल्या शस्त्रक्रिया करायला लावून, आपल्या अंगावर येणार नाही अशी काळजी घेऊन गल्ला भराल काय? किंवा कुणीही असे करणे योग्य असेल काय?
डॉक्टरकी हा एक व्यवसाय आहे, त्यांना त्यांचे उचित मानधन, सोयीसुविधा, हक्क अधिकार मिळालेच पाहिजेत हे मी आधीही एका धाग्यावर कळकळीने मांडले होते. पण समाज त्यांना फसवतो म्हणून त्यांनी समाजाला अशा पद्धतीने फसवणे पटत नाही.
तुम्ही एक प्रकारे डॉक्टरांच्या त्या सर्व कृत्यांचे समर्थन करत आहात असे वाटते. वैद्यकिय व्यवसायाच्या बाबतीत 'टीट फॉर टॅट' विचारपद्धती चूकीची आहे.
7 Dec 2015 - 5:32 pm | बोका-ए-आझम
व्यवसायाशी संबंधित नाहीच आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती ही प्रत्येक व्यवसायात असते. मी पत्रकारितेत असताना एक प्रसंग घडला होता. माझ्या एका वरिष्ठ सहका-याने एक प्रकरण शोधून काढलं होतं आणि त्यात दोन पोलिस अधिकारी involved होते. त्याला फोन आला होता की तुम्ही पोलिसांविरूद्ध का स्टोरी करताय? त्यावर त्याचं उत्तर हे होतं की मी गुन्हेगारांविरुद्ध स्टोरी करतोय आणि त्यातले काही जण पोलिस आहेत. मला वाटतं या सगळ्या वादविवादात हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे.
3 Dec 2015 - 1:47 pm | गवि
अत्यंत बरोबर.
फक्त इतकंच म्हणणं आहे की खात्री करुन घेण्यासाठीसुद्धा मुळात नवा दावा करणारा सोर्स कोणता आहे हे पाहूनही किमान क्रेडिबिलिटी ओळखता येऊ शकते.
उदा. मॉडर्न मेडिसिनच्या काही स्टँडर्ड जर्नल्समधे किंवा अनेक वेगवेगळ्या डॉक्टर्सच्या पाठिंब्याने कुठे अभ्यासनिबंध प्रसिद्ध झाला असेल तर शहानिशा करुन घेण्याइतपत योग्यता समजली जाईल.
कुठल्यातरी आठवडी पुरवणीत चूर्णबीर्ण किंवा रक्तशुद्धीवाली सिरप्स बनवणार्या कंपनीने "स्पॉन्सर" केलेल्या चौकटीत अशी टेक्सासछाप संशोधनं उल्लेखिलेली असतील तर त्यांचा विचारही न करणं उत्तम.
4 Dec 2015 - 6:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
बाकी चर्चा वाचत आहे. पण टेक्सासच्या अस्मितेला आव्हान देण्याबद्दल गविंचा निषेध.
-- टेक्साससुंदरी
4 Dec 2015 - 7:03 am | गवि
असंच काही नाही. तुम्ही सांगलीतली वर्ल्डफेमस टेक्सास ओली भेळ खाल्ली आहेत का? चांगली असते.
3 Dec 2015 - 12:44 pm | सुबोध खरे
स्वस्तातील औषध लवकर परिणामकारक ठरत नाही म्हणतात
असेच काही नाही. एकच औषध वेगवेगळ्या कंपन्यांचे यात खूप तफावत असू शकते दर्जा एकच असूनही.
उदा. FDC (ELEKTRAL वाले) यांचे एटोर्व्हास्टाटीन ZIVAST २५ रुपयाला १० गोळ्या मिळतात
तेच RANBAXY चे स्टोअर व्हास १८० रुपयाला १० गोळ्या मिळतात.
राहिली गोष्ट नकली गोळ्यांची -- सर्वच नकली गोळ्यात औषध नसतेच असे नाही. उदा. टिनीडाझोल हे औषध पोटातील आम्लामुळे विघटन पावते त्यामुळे ते इंटेरीक कोटेड म्हणजे आम्लात न विरघळणाऱ्या आवरणाच्या गोळीतून देणे आवश्यक आहे. यासाठी ५०० मिली ग्राम गोळी प्रथम तयार करावी लागते आणी त्या प्रत्येक गोळीवर हे इंटेरीक कोटेडचे आवरण चढवावे लागते. या उत्पादन पद्धती साठी बराच खर्च येतो तेंव्हा नुसता रंग चढवून दिली तर तुम्हाला काय कळेल. तिच्यातील टिनीडाझोल मोजले तर ५०० मिग्राम आढळेल पण गोळी घेतली तर नुसती जळजळ होईल आणी हगवण मात्र थांम्ब्णार नाही. मग आपले विद्वान शेजारी असतातच सांगायला, "आधुनिक औषधांचे साईड इफेक्टच फार असतात."
आम्ही सुरुवातीला होल सेलर कडून जेनेरीक औषधे घेतली तेंव्हा मी त्याला हि शंका विचारली कि तू हि औषधे मला विकतो आहेस ती नकली नाहीत ना ? त्यावर तो म्हणाला साहेब मी तुम्हाला फार तर एकदा फसवू शकेन पण मला धंदा करायचा आहे. एकदा फसव्ल्यावर तुम्ही माझ्याकडून माल परत घ्याल का? त्यामुळे डॉक्टर स्वतः खात्रीशीर माणसाकडूनच औषधे विकत घेतात. पण ती औषधे लोक विकत करीत नाहीत असा आमचा अनुभव आहे . लोकांचा केमिस्ट वर जास्त विश्वास आहे त्याला कोण काय करणार?
3 Dec 2015 - 1:40 pm | उगा काहितरीच
सुबोध खरे यांचे प्रतिसाद नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट !
धन्यवाद डॉक्टरसाहेब !
3 Dec 2015 - 3:23 pm | बॅटमॅन
डॉक्टर खर्यांचे प्रतिसाद खूप आवडले.
3 Dec 2015 - 5:34 pm | मूकवाचक
+१
3 Dec 2015 - 4:48 pm | बाप्पू
चांगला धागा. खरे सरांचे प्रतिसाद देखील छान
आयुर्हीत यांचा उल्लेख आल्यामुळे एक गोष्ट आठवली.
आयुर्हीत मोड ऑन
अबक बद्दल अधिक माहिती हवी असेल तर मला व्यनि करा .
आयुर्हीत मोड ऑफ
=) =)
3 Dec 2015 - 5:24 pm | हेमंत लाटकर
डाॅ. सुबोध, तुमच्यासारखे उदात्त विचाराच्या डाॅक्टरांची संख्या खूप कमी आहे.
डाॅक्टरच्या बेजबाबदार व बेपर्वाहीची एक घटना. आमच्या एका नातेवाईकाला डोळ्यासाठी स्टेम सेल थेरेपी करण्यासाठी कारने मुंबईच्या सायन हाॅस्पिटलमध्ये त्याला बघून तारीख घेण्यासाठी नेले. सर्व पेशंट मुख्य डाॅक्टरची (या डाॅक्टरचे मुंबईत स्वत:चे स्टेम सेल हाॅस्पिटल आहे) सकाळी 10 पासून वाट पहात होते, डाॅक्टर संध्याकाळी 5 वाजता आले. पेशंटचे रिपोर्टस तपासताना मुख्य डाॅक्टरांचे काजू, फुटाणे, शेंगदाणे खाणे चालू होते. आमच्या नातेवाईकाला पुढील महिन्याची तारीख दिली. त्याप्रमाणे सर्व तयारी करून नातेवाईक सायनला गेले. तेथे गेल्यावर डाॅक्टर गावाला गेलेत पुढच्या महिन्यात या असे सांगितले. 5-10 हजार रूपये वाया गेले. पुढच्या महिन्यात नातेवाईकाला सायन मध्ये अॅडमिट केले. दोन दिवस आैषध व तिसर्या दिवशी बोन मॅरोमधून स्टेम सेल घेणे चालू झाले. प्रोसिजर चालू असताना जेन्टस डाॅक्टर व वार्डबाॅचे लेडी डाॅक्टरसमोर फालतू जोक चालू होते. पेशंटला जनरल अॅनेस्थेशिया दिल्यामुळे सगळे कळत होते. त्यानंतर बोन मॅरो मधून काढलेल्या स्टेम सेलवर प्रक्रिया करून ते परत शरीरात टाकण्यासाठी 4 तास लागले. यावरून पेशंटने सरकारी दवाखान्यात न येता खाजगी दवाखान्यात जावे अशी डाॅक्टरची इच्छाआहे असे वाटले.
3 Dec 2015 - 5:30 pm | वेल्लाभट
तुम्हाला लोकल म्हणायचं असावं.
3 Dec 2015 - 10:30 pm | अभिजीत अवलिया
धन्यवाद डॉक्टर. तुमचे म्हणणे पटले.
3 Dec 2015 - 10:30 pm | हेमंत लाटकर
संदिप डांगे तुम्ही शाळेत व काॅलेजमध्ये वादविवाद स्पर्धेत बरीच पारितोषके मिळविली असतील.
3 Dec 2015 - 10:48 pm | कंजूस
कोलेस्टेरॉल एक उपयुक्त धातू आहे का?
4 Dec 2015 - 11:52 am | पिवळा डांबिस
लघु घनता कोलेस्टेरॉल आणि हृदरोग यांच्यामधील सरळ गुणोत्तर आता प्रस्थापित झालं आहे*.
लघु घनता कोलेस्टेरोल कमी (~३०% कमी) करण्यासाठी स्टॅटिन वर्गातली औषधे उपलब्ध आहेत. त्यात फायझरचे अटोर्व्हास्टॅटिन (ब्रान्ड नेम लिपिटॉर) नुकतेच पेटंट पिरियड संपवून जेनेरिक झालेले आहे.
त्याहीपुढे जाऊन जर लघु घनता कोलेस्टेरॉल अजून कमी (~५०-६०% कमी) करायचं असेल तर त्यावर इव्होल्युक्युमॅब नांवाचे नवीन इंजेक्टेबल ड्रग बाजारात आले आहे.*
गरजूंनी इंटरनेटवर अजून माहिती काढावी.
*पिवळा डांबिस ह्या भुताने झपाटलेल्या झाडाचा ह्या संशोधनात्मक अभ्यासात प्रत्यक्ष सहभाग आहे. अजून जास्त काही लिहिणे अप्रस्तुत होईल.
6 Dec 2015 - 12:41 pm | नेत्रेश
डॉक्टर्सची तुलना बेइमान रीक्शावाले, मॅकॅनिकस, विमा एजंट यांच्याबरोबर करतात ते काही पटले नाही. (काही जण तर चक्क पेशंटला लुबाडण्याच्या वृत्तीचे समर्थनही करताना दीसतात.)
जशी आपण कोर्टातील न्यायाधीश, पोलीस, लष्कर, रीझर्व बँकेतील उच्चाधीकारी, IAS ऑफीसर्स, सचीव
यांच्याकडुन उच्च नैतीकतेची अपेक्षा ठेवतो, तीच अपेक्षा समाज डॉक्टर्स कडुनही ठेवतो.
खुप साधी गोष्ट आहे. ज्याच्याकडे आपण स्वतःला विश्वासाने सोपवतो त्याच्याकडुन होणारी फसवणुक ही साधी लबाडी कींवा बेईमानी नसुन विश्वासघात असतो, तोही थोड्याफार पैशांसाठी केलेला. काही डॉक्टर्सच्या रुग्णांच्या
फसवणुकीच्या प्रकारामुळे लोकांचा सर्वच डॉक्टर्स वरील विश्वास कमी होणे ही फार सिरीयस गोष्ट आहे, जीचा संपुर्ण समाजावर खुप दुरगामी परीणाम होईल.
7 Dec 2015 - 11:30 am | प्रसाद१९७१
उगाचच भयंकरीकरण करू नका. माझा डॉक्टरांवरील विश्वास अजिबात कमी झाला नाहीये. आणि माझ्या माहितीतल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींचा सुद्धा.
क्वचित एखाद्या डॉक्टरचे वागणे/ बोलणे पटत नाही ( जनरली उद्धटपणा आणि वेळ कमी देणे आणि वेळ न पाळणे ). पण त्यांच्या बद्दल विश्वास कमी झाला नाही.
रुग्णानी पण काळजी घ्यावी ती मी घेतो.
उगाच रस्त्यावर पाटी दिसली म्हणुन दिसेल त्या डॉक्टर कडे जात पण नाही. कोणाच्या तरी अनुभवावरुन च कोणत्या डॉक्टर कडे जायचे ते ठरवतो.
जमले तर डॉक्टर कुठल्या विद्यापिठातुन पास झाला आहे हे शोधतो आणि कॉलेज चे नाव कळले तर बेस्टच.
तरुण डॉक्टरांना टाळतो. ४५-५० वयाच्या पुढचा असेल तर उत्तमच.
7 Dec 2015 - 12:11 pm | संदीप डांगे
हे सगळं बघूनही अनुभव वाईट आले तर काय म्हणाल..?
डॉक्टरांच्या व्यवसायातल्या गैरप्रकारांचे खापर सातत्याने रुग्णांवरच फोडणे हेही जास्त सिरियस आहे.
7 Dec 2015 - 1:19 pm | प्रसाद१९७१
आपले दुर्दैव!!! सर्व गोष्टी आपण कंट्रोल करु शकतो असे वाटु देऊ नये. आपल्या आयुष्यात अश्या अनेक गोष्टी असतात ज्याचा कार्यकारण भाव समजत नाही. बर्याच वेळेस आपला काही दोष पण नसतो ( असे आपल्याला वाटते ).
ह्या सर्वावर "स्वीकार" हे एकच उत्तर आहे.
7 Dec 2015 - 1:11 pm | गवि
मला तर उलट तरुण डॉक्टर्स लेटेस्ट वैद्यकीय ज्ञानाशी जास्त परिचित / संपर्कात असलेले, जास्त शक्यतांचा विचार करणारे, उत्साही, (कदाचित क्लायंटेल एस्टॅब्लिश करायच्या ध्येयाने) जास्त सखोल लक्ष देणारे वाटतात.
तुलनेत वयस्कर डॉक्टर जुन्या विचारांचे, शिष्ट - तर्हेवाईक असणं म्हणजेच प्रसिद्ध असणं अशा गटातले, पेशंटला जराशीही वैद्यकीय ज्ञानाची माहिती न देणारे, रुढीप्रिय असतात.
सरसकटीकरण नव्हे पण खरंच अनेक जुने डॉक्टर नॉलेज अपडेटच्या बाबतीत जरा साचलेपण आलेले असतात असे अनुभव आले आहेत.
पुन्हा एकदा.. हे सर्वांबाबत खरं नसेलही.
7 Dec 2015 - 1:29 pm | प्रसाद१९७१
गवि- ४५-५० म्हणजे तरुण च समजले जातात हो. त्यातल्या त्यात डॉक्टर लोक तर जास्त च तरुण रहातात. :-)
पायलट ला नाही का काही हजार तासाचे उडणे गरजेचे असते. तसे डॉक्टर नी काही हजार पेशंट बघितलेले असतील तर बरे.
7 Dec 2015 - 2:08 pm | गवि
तेही खरंच. शिकून सेटल होईस्तो डोईवर केसांची एलओसी बरीच उत्तरेकडे सरकलेली दिसते अनेकांची. ;-)
7 Dec 2015 - 2:35 pm | मार्मिक गोडसे
स्वार्थ हा असा एकमेव दुर्गुण आहे जो आपल्याला दुसर्याकडे असलेला चालत नाही. नैतिकतेच्या गप्पा मारनारे इतर नोकरी, व्यवसायातील अनैतिकता खपवून घेतात. फक्त वैद्यकीय पेशाकडूनच नैतिकतेच्या अपेक्षा ठेवतात. आर्थिक कारणांमुळे सरकारी नोकर्,लोकप्रतिनीधी व इतर व्यावसायीकांमध्ये अनैतिकता वाढली. ह्याला समाजाने विरोध न केल्याने ही आर्थिक अनैतिकता वैद्यकीय पेशातही आली. त्यामुळे फक्त वैद्यकीय पेशालातील अनैतिकतेला टार्गेट करण्याऐवजी सिस्टीममधील इतर अनैतीक कृत्य करनार्यांनाही विरोध करायला हवा.
7 Dec 2015 - 2:55 pm | संदीप डांगे
तुम्ही किती विरोध करता हो वैद्यकिय अनैतिकतेला? तुम्ही तर इथे मान्यही करायला तयार नाही की अनैतिकता आहे. विरोध तर दूरच राहिला.
आणि हो, तुमच्या प्रतिसादावर उत्तर देतो, जरा थांबा. अर्ध लिहिलंय अर्ध बाकी आहे. सवड मिळाली की टाकतो. डोण्ट वरी. कीप बॅकिंग डॉक्टर्स हु डिसॅबल्ड पेशंट्स बट फ्युमिंग ऑन टीचर्स फॉर फ्यु रुपीज.
7 Dec 2015 - 3:27 pm | मार्मिक गोडसे
हे वाचले नाही का तुम्ही?
फ्यु रुपीजचा प्रश्न नाही नैतिकतेचा आहे.
7 Dec 2015 - 3:38 pm | संदीप डांगे
प्रश्न आर्थिक अनैतिकतेचा नसून व्यावसायिक अनैतिकतेचा आहे याकडे आपले बहुधा लक्षच नाही. डॉक्टरांना पैसाच कमवायचा असेल तर त्यासाठी पेशंटचे जीव धोक्यात घालणे किंवा नको त्या शस्त्रक्रिया, महागड्या टेस्टस सांगणे गरजेचे आहे काय?
पैसाच कमवायची हौस असेल तर इतर अनेक व्यवसाय आहेत, डॉक्टरांना दैवयोगे बुद्धीमत्ताही चांगली मिळालेली असते.
तुम्ही सुरवातीपासून दोन वेगळ्या मुद्द्यांमधे तुलना करुन घोळ घालताय. आर्थिक अनैतिकता आणि व्यावसायिक अनैतिकता ह्यात फरक आहे.
7 Dec 2015 - 4:52 pm | भंकस बाबा
मी मालाडला राहतो. माझ्या आसपास बरेचशे डॉक्टर आहेत. त्यात एक नावाजलेले बालरोगतज्ञ आहेत. सकाळ संध्याकाळ त्याच्याकडे गर्दी असते. तिथुनच जवळ दूसरे बालरोगतज्ञ आहेत. त्यांच्याकडे मात्र मोजकेच रुग्ण असतात. मला गर्दीचा तिटकारा आहे त्यामुळे मी माझ्या मुलाला कमी गर्दी असलेल्या ठिकाणी घेऊन जातो. एकदा ते डॉक्टर नसल्यामुळे गर्दीवाल्या डॉक्टरकडे जाण्याचा योग आला. आजार होता साधी सर्दी व् वायरल ताप. डॉक्टरांनी सरळ एंटीबायोटिक्स लिहून दिली. माझे पहिले डॉक्टर मात्र साधी ओषधे लिहून देत. मी नंतर माझ्या पहिल्या डॉक्टरांना यासम्बंधि विचारले. त्यांनी सांगितले की आजकाल सर्वाना इंस्टेंट पाहिजे असते . वायरल ताप असेल तर कड़क पथ्य व् साधी ओषधे घेऊन तीन चार दिवसात आराम मिळतो. पण कोणाची तितके थाम्बायची तयारी नसते.
बाय द वे तुमचे अनुभव वाचले. पण मला आलेले अनुभव चांगले आहेत. आणि हो जर मला जास्त पैसे देऊन चांगली सेवा मिळत असेल तर मला ते फसवल्यासारखे वाटत नाही.
आजकाल डॉक्टर रिस्क घ्यायला बघत नाहीत. त्यामुळे तुम्हाला भरमसाठ टेस्ट ते करायला लावतात. उत्तम उपाय म्हणजे अशे डॉक्टर टाळणे. पण नंतर गुण नाही आला की तुम्ही बोम्बलणार.
डोक्याला मार लागला की सीटी स्कैन करने आजकाल सर्रास् झाले आहे. माझ्या व् तुमच्या लहानपनि अशी स्थिति नव्हती. अहो ऐडमिट पण करत न्हवते. माझे विचाराल तर आता मी नक्कीच सीटी करून घेइन व् नॉर्मल असेल तर घरी येऊन बिनधास्त झोपेन.
7 Dec 2015 - 5:00 pm | प्रसाद१९७१
रिस्क डॉक्टर पेक्षा रुग्णाला असते. त्यामुळे टेस्ट करायची की नाही ते रुग्णानी ठरवायचे.
7 Dec 2015 - 5:08 pm | संदीप डांगे
हे पण रुग्णानेच ठरवायचं तर डॉक्टरने काय करायचं? डॉक्टर आणि न्हाव्यात काहीतरी फरक करा राव....!
7 Dec 2015 - 6:55 pm | प्रसाद१९७१
तुम्हाला फरक वाटत नसला तर तुम्ही आजारी पडलात तर न्हाव्या कडे जा. तसेही हल्ली लोक न्हाव्याला केस कापायचे २०० रुपये देतात, पण डॉक्टर ला द्यायची वेळ आली तर २०० रुपये जास्त वाटतात.
हलके घ्या पण विचार करा.
ब्र्यायडल मेक-अप साठी कमीतकमी पॅकेज १० हजार रुपयांचे आहे. नॉर्मली लोक २०-३० हजार खर्च करतात. फक्त ३-४ तासाचे काम असते. लग्नाच्या फोटो चे पॅकेज ५० हजार कमीत कमी., इतके रेट जनरल सर्जन ला पण मिळत नाही.
-----------
निदानात चुक झाली तर डॉक्टरचा दोष, आणि निदान चूकू नये म्हणुन टेस्ट करायला सांगितल्या तरी डॉकटर चा च दोष.
7 Dec 2015 - 8:15 pm | संदीप डांगे
चर्चेचा विषय बदलताय कशाला?
डॉक्टरने आपल्या कौशल्याचे किती पैसे घ्यावे ह्याबद्दल आधीच एका धाग्यात पुरेपुर चर्चा झालीये. त्यात माझे मत तुम्हाला आठवत नसेल तर सांगतो. डॉक्टरने आपल्या कौशल्याचे योग्य ते पैसे घ्यावे. त्यात अजिबात कसूर करू नये. त्याबद्दल मी डॉक्टरांच्या बाजूनेच बोललोय. कुणाही व्यावसायिकाच्या बाजूनेच बोलेन. ज्याला परवडतं त्याने उपचार घ्यावे, नसता मरावे. सो सिम्पल! पण पैसे घेऊन रुग्णाला फसवणे पसंत नाहीये.
निदानात चुक झाली तर डॉक्टरचा दोष, आणि निदान चूकू नये म्हणुन टेस्ट करायला सांगितल्या तरी डॉकटर चा च दोष
तुम्हीच वर बोललात की टेस्ट करावी की नको हे रुग्णाने ठरवावे. म्हणून मी म्हटलं की न्हाव्यात आणि डॉक्टरमधे फरक ठेवा.
मी न्हाव्याला जाऊन तर विचारत नाही ना की बाबारे केस कापु की नको, कापायचे असल्यास किती आणि कसे कापू तूच ठरव. तुला जसं जमेल तसं दे कापून. आजारी पडल्यावर माझ्याकडे चॉइस असतो काय?
मुद्द्यांची सरमिसळ करू नका बंधो...!
7 Dec 2015 - 8:51 pm | भंकस बाबा
मी तर माझ्या नेहमीच्या हजामाकडे जातो व् डोके त्याच्यासमोर ठेवतो, कारण त्याला माहीत असते मला कोणता कट पाहिजे. डॉक्टरला मात्र मला सांगावे लागते. डांगेजि तुमचा जो जनरल डॉक्टर असतो त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याला या व्यवसाआतले चक्केपंजे माहीत असतात. जर तुमचे संबध चांगले असतील तर तो तुम्हाला फशी पाड़नार नाही.
7 Dec 2015 - 9:00 pm | संदीप डांगे
ओके फाईन. जर संबंध चांगले नसतील तर तो फशी पाडण्याची मुभा आहे. राईट...!
असू दे. ज्याचे त्याचे मत ज्याचे त्याचे जवळ. पण मला संबंध चर्चेमध्ये जो सूर जाणवला तो असा की आजारी पडणे हे रुग्णाची चूक आहे. डॉक्टरने फसवणे ही चूक नाही. जसे काही लोक म्हणतात, मुलीने रात्री घराबाहेर पडणे चूक आहे, तसेच.
7 Dec 2015 - 9:14 pm | भंकस बाबा
डांगे , जर तुम्ही तुमचा हेकेखोरपणा सोडला तर पुष्कळ पुढे जाल हो? तुमच्या अनुभवामुळे तुम्ही दुसर्याला शहाणे नाही तर येडे करत आहात. विश्वास नावाची वस्तु अजूनही शिल्लक आहे.
7 Dec 2015 - 9:25 pm | संदीप डांगे
भंकसबाबा, लोक इथे एकाच वेळेस विश्वास ठेवा आणि ठेवू नका चे दोन्ही सल्ले देऊन येडे करत आहेत त्याचं काय करायचं...?
7 Dec 2015 - 3:36 pm | मार्मिक गोडसे
आणी हो
हे माझ्या वरील एका प्रतिसादात लिहिले होते ते वाचले नाही का?
7 Dec 2015 - 3:40 pm | संदीप डांगे
मग वाद कशासाठी घालताय?
7 Dec 2015 - 3:49 pm | मार्मिक गोडसे
कारण ही व्यावसायिक अनैतिकता आर्थिकतेतुनच आली आहे.
7 Dec 2015 - 4:03 pm | संदीप डांगे
उदाहरण देऊ शकाल?
7 Dec 2015 - 4:17 pm | मार्मिक गोडसे
कट प्रॅक्टीसमागे काय हेतू असेल?
7 Dec 2015 - 9:00 pm | ट्रेड मार्क
फक्त डॉक्टर कसे वागतात हा मुद्दा परत परत सांगितला जातोय. परंतु कोलेस्टेरोल जर प्रमाणाबाहेर वाढलंच नाही तर?
सध्या अन्नप्रक्रिया उद्योग फार जोरात चालू आहे. प्रत्येक गोष्ट त्याच्या बेसिक स्वरुपात न ठेवता उगाच जास्तीच्या प्रक्रिया करून त्याची पोषण दृष्ट्या वाट लावतात. उदा. पूर्वी घाणीतून काढलेलं खाद्यतेल मिळायचं. ते कसं चिपचिपित आहे आणि ते वापरणं कसं धोकादायक आहे हे आपल्याला बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जाहिरातींचा मारा करून पटवून दिलं. त्यांचं जास्त प्रक्रिया केलेलं तेल जे तळलेल्या पदार्थांवर अगदी कमी प्रमाणात राहतं त्यामुळे आरोग्यास चांगलं आहे असं आपल्याला पटवण्यात आलं. असं प्रक्रिया केलेलं तेल खरं तर जास्त घातक असतं.
त्यामुळे फक्त डॉक्टरच नाही तर मानक ठरवणारे, अन्न प्रक्रिया करणारे, जाहिरात करणारे या सगळ्याचं छुपे संबंध आणि फायदे असतात. मुलांच्या दुधात टाकायच्या पावडरींमध्ये साखर खूप जास्त प्रमाणात असते. खरी पोषण मुल्य नसतातच. एवढ्या लहान वयापासून ते त्यांचं भावी गिऱ्हाईक बनवायच्या मागे असतात.
अमेरिकन FDA च्या मुख्य panel वरील ७५% सदस्य हे फूड प्रोसेसिंग कंपन्यांशी जवळचे संबंध असलेले आहेत. एखादा पदार्थ तुम्हाला FDA कडून पास करून घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या सोयीच्या प्रयोगशाळेत त्याच्या टेस्ट करून ते FDA ला सदर करायचे. त्यावर FDA फक्त ते बघून तुम्हाला परवाना देते. प्रयोगशाळेत बनवलेले खाद्यपदार्थ, बाहेरून टाकलेले पोषक द्रव्य हे आपल्या आरोग्यास घातकच आहेत.
10 Dec 2015 - 12:53 am | ट्रेड मार्क
Cholesterol Is Finally Officially Removed From 'Naughty' List
The US government has finally accepted that cholesterol is not a 'nutrient of concern', doing a U-turn on their warnings
पूर्ण बातमी इथे.
17 Mar 2017 - 7:30 am | पिलीयन रायडर
लेटेस्ट काय ठरलंय?
कोलेस्ट्रॉल वाईट आहे की नाही?
असल्यास.. ते कमी करण्यास काय करावे? आणि चांगले कॉलेस्ट्रॉल वाढवावे कसे?
18 Mar 2017 - 6:38 pm | Ranapratap
स्वतः 100 घेतल्याशिवाय शेतकऱ्याचा 7/12 न देणारा तलाठी जेव्हा डॉक्टर च्या बनवाबनवी बद्दल बोलतो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते...
आणि चार लिटर दुधाचे पाणी, साबुदाणा, यूरिया, साखर टाकून 8 लिटर करणारा शेतकरी जेव्हा डॉक्टर च्या कमाई बद्दल बोलतो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते...
जाहिरात करताना खोटे दावे करून सामान्य ग्राहकांना फसवणारा बिल्डर जेव्हा डॉक्टर च्या खोटेपणावर आक्षेप घेतो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते....
डोळ्यादेखत खोट्याचे खरे करणारा वकील जेव्हा डॉ च्या चुकीच्या प्रॅक्टिस बद्दल बोलतो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते...
सावज मिळाले की दोन्ही बाजूनी पैसे खाऊन मिटवामिटवी करणारा पोलीस डॉक्टर च्या रेफरल वरती आगपाखड करतो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते...
5000 हजार रुपये घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षेचे पेपर आधीच पुरवणारे प्राध्यापक जेव्हा डॉक्टरांनी रक्त लघवीच्या तपासण्या करायला सांगितल्यावर हे अनैतिक आहे असे म्हणतात तेव्हा मला फार आश्चर्य वाटते...
मी डॉक्टर ने खोटेपणा करावा याच्या बाजूने अजिबात बोलत नाहीए पण आपले ठेवायचे झाकून अन लोकांचे पाहायचे वाकून ही वृत्ती नको हे म्हणणं आहे..
जगातला भ्रष्टाचार होत नसलेला एक तरी व्यवसाय मला सांगा... उडदामाजी काळे गोरे प्रत्येक ठिकाणी असतातच; त्यांना खड्या सारखे बाजूला सारून चांगल्याचे कौतुक करावे... संसार आहे, जुने लोक म्हणतात संसार ही लबाडी च आहे... godfather च्या पहिल्या पानावरचे वाक्य लक्षात असू द्यावे..
Behind every fortune, there is crime!!!