राज ठाकरेंवर पत्रकार परिषद घेण्यासही बंदी ?

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
8 Sep 2008 - 7:29 pm
गाभा: 

राम राम मिपाकर मराठीजनहो!

आत्ताच कानी आलेल्या बातमीनुसार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आता दि ७ ऑक्टोबर पर्यंत दादर कोर्टाने पत्रकार परिषद घेण्यासही बंदी घातली आहे! भाषणबंदी तर त्यांच्यावर या आधीच घालण्यात आलेली आहे!

परंतु आता पत्रकार परिषद घेण्यावरही बंदी?? मिपावर कुणी कायदेतज्ञ असल्यास याचे स्पष्टीकरण देऊ शकेल काय?

नुकतीच जया बच्चन यांनी एका जाहीर कार्यक्रमात मराठी माणसांची, महाराष्ट्राची अन् मराठी भाषेची अत्यंत छद्मीपणे आणि कुत्सितपणे जाहीर टिंगलटवाळी केली, रेवडी उडवली त्याबद्दल जया बच्चन यांच्यावर कोणतीच कायदेशीर कार्यवाही नाही आणि राज ठाकरेंवर मात्र पत्रकार परिषद घेण्यावरही लगेच बंदी??

मला याची पूर्ण कल्पना आहे की न्यायव्यवस्थेचा आदर हा सर्वांनीच केला पाहिजे, परंतु तरीही असा प्रश्न मनात येतो की सरकारने न्यायव्यवस्थेचा सहारा घेऊन राज ठाकरेंची केलेली ही मुस्कटदाबीच नव्हे काय? स्वत:च्या भूमीवर - स्वत:च्या माणसांची, स्वत:च्या मायबोलीची, स्वत:च्या मराठी अस्मितेची बाजू मांडणार्‍या माणसाला कायद्याचा बडगा दाखवून बोलूही द्यायचे नाही हा अस्मिताहीन राज्यसरकारचा निर्णंय अत्यंत अन्यायकारक आहे, संतापजनक आहे आणि निषेधात्मक आहे!

तात्या.

प्रतिक्रिया

सागर's picture

8 Sep 2008 - 7:48 pm | सागर

एकदम सहमत....

काल आजतक वर अबू आजमी ने तोडलेले तारे ऐकायला हवेत....
या माणसावर का बंदी घालू नये?
अबू आझमी म्हणतो,,, मराठीत चांगले चित्रपट नाही बनत... या हरामखोराला यु.पी.मधे राहून मराठी संस्कृतीची गोडी काय कळणार?

येथे मी हा विडिओ अपलोड केला आहे....
http://www.esnips.com/web/SocialVideos/

३जीपी फोर्मेट मधे असल्याने VLC player / quick time मधे दिसेन....

सागर

देवदत्त's picture

8 Sep 2008 - 8:03 pm | देवदत्त

तात्यांशी सहमत.

असल्या राज्य सरकारचा निषेध.

माझी दुसर्‍या लेखातील प्रतिक्रिया पुन्हा इथे टाकतो.

नुकतेच एका वाहिनीवर वाचले की राज ठाकरेंच्या ह्या घोषणेनंतर मुंबईचे पोलिस कमिशनर ह्यांनी सांगितले आहे की 'राज ह्यांच्या भाषणाची टेप पाहून त्याची चाचणी करणार व योग्य ती कारर्वाई करणार.' तसेच चित्रपटगृहांनाही पुरेसे संरक्षण देण्याची घोषणा केली आहे.

हा कोणता न्याय आहे? राज ठाकरे ह्यांनी योग्य तेच सांगितले आहे. जया बच्चन ह्यांच्या वक्तव्याच्या टेपची पाहणी नाही करणार का ते? का?
महाराष्ट्राचेच सरकार हे ऐकून घेत असेल तर काय घ्या?
काँग्रेस सरकार सपा ने पडण्यापासून सावरले म्हणून असल्या गोष्टीत महाराष्ट्र सरकारने त्यांना मदत करणे चुकीचे आहे.

आणि तिकडे आय बी एन च्या संकेतस्थळावर राज ठाकरेंच्या कृतीला हिटलरशाही म्हटले आहे. त्यांचा राज द्वेष चालूच आहे.
ह्या सर्व गोष्टींचाही मी निषेध करतो.

एक's picture

8 Sep 2008 - 10:19 pm | एक

आता मराठीच्या भवितव्यासाठी केवळ एका व्यक्तिवर (राज ठाकरे) अवलंबून चालणार नाही. सर्वांनी मिळून स्वाभिमान दाखवला पाहिजे.
जर या बंदीमुळे जर अजून मराठी माणसं एकत्र झाली तर उलट ही बंदी आपल्या फायद्याची आहे.

कायद्याने एका माणसावर भाषणबंदी आणि पत्रकार परिषदबंदी घातली आहे, इतर लाखो मराठी माणसांवर नाही..
आतातरी जागे व्हा!

इनोबा म्हणे's picture

9 Sep 2008 - 1:13 pm | इनोबा म्हणे

सहमत

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मिंटी's picture

9 Sep 2008 - 1:15 pm | मिंटी

सहमत......

अनिल हटेला's picture

9 Sep 2008 - 1:17 pm | अनिल हटेला


अगदी अगदी सहमत !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मराठी_माणूस's picture

9 Sep 2008 - 1:21 pm | मराठी_माणूस

एखादा चिमटा काढतोय म्हणून ओरडलो तर आवाज काढण्या वर बंदि घालायचि आणि चिमटा काढणार्‍या कडे दुर्लक्ष करायचे , व्वा रे न्याय

मदनबाण's picture

9 Sep 2008 - 4:23 pm | मदनबाण

च्या मारी या लोकांच्या ,,,तो अबु का साबु आझमी सतत बरळत असतो ते चालत ह्यांना..त्यांना राज ठाकरेच दिसतो..
या भय्या लोकांची आरेरावी फारच वाढली आहे..जे नाशिक मधे झाल तेच मुंबईत आणि ठाण्यात मनसेने केले पाहिजे..

(राज समर्थक)
मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

भास्कर केन्डे's picture

10 Sep 2008 - 8:31 pm | भास्कर केन्डे

मराठी माणसाची मुस्कटदाबी करणार्‍या लातूरच्या निजामाचा आम्ही मराठावाड्याच्या क्रांतीकारी जनतेच्या वतीने तीव्र निषेध करतो!

भारत तसेच महाराष्ट्रातल्या मराठी द्वेष्ट्या सरकारांचा धिक्कार असो!!

आपला,
(बाणेदार) भास्कर
"बे़ळगाव संयुक्त महाराष्ट्रात येईल तीच आत्र्यांना व संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणार्‍या वीरांना खरी श्रद्धांजली"