साज़

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
28 Nov 2015 - 4:02 pm

सर्वात अगोदर एक म्हणजे मी संगीताचा कुठल्याही प्रकारचा जाणकार नाही. दुसरं सर्व लेख आठवणींवर आधारीत त्यामुळे डळमळीत. थोडी कुठे कुठे गल्ली चुकण्याचीही शक्यता आहेच..

तर आपल्या हीन्दी सिनेमांची गाणी म्हणजे अनेक प्रतिभाशाली संगीतकारांनी योगदान दिलेला आनंद खजिना आहे. कधीही जा दार उघडा दोन चार गाणी घ्या और गम भुला दो सारे संसारके. हा आपला सर्वांचाच अनुभव. तर या विवीध गाण्यांत विवीध संगीतकारांनी अत्यंत कलात्मकतेने व कुशलतेने अनेक वाद्यांचा वापर केलेला आहे. या धाग्याचा विषय हा वाद्यांचा जिथे अप्रतिम वापर झालेला आहे त्या गाण्यांविषयी बोलणं हा.

काही पुर्ण वाद्यहीन गाणीं असतात वा अतिशय कमी वाद्ये वापरलेली गाणी, अनप्लग्ड अशी यात गायकाच्या आवाजावरच भर असतो उदा. जगजीतचं गालिब अल्बम मधलं हे घ्या,
रोशन जमाल-ए-यार से है अंजुमन तमाम....... ( प्रियेच्या सौंदर्याच्या तेजाने सर्व जग प्रकाशमान झालयं ) यात जवळ जवळ वाद्य नाहीचं. अतीशय हळुवार हे गाणं जगजीत गातो त्याच्या आवाजाच्या नॅचरल डेप्थ वर सहज हे तो तोलुन धरतो. अशीच एक आलापी आहे मिनीटा दोन मिनीटाची लताजींची चित्रपटाच नाव आठवत नाही पण ह्रदयनाथजींच संगीत व यारा सिली सिली गाणं आहे तोच बहुधा त्यातही असचं फ़क्त आवाजावर भर सुंदर आलापी एकदम चित्रपटात जे संगीत आहे त्याचा अर्क असल्यासारखी म्हणजे ते जणु व्हॉइस ट्रेलर, म्युझिकल ट्रेलर. एक टोरेक्स कफ़ सिरपच्या अ‍ॅड च म्युझिक बघा शेवटी की सुरुवातीला कुठेतरी अगदी छोटा असाच इन्स्ट्रुमेंटल पीस येतो तो म्हणजे जणु ट्रेड्मार्क च जगजीत च्या एक टीपीकल म्युझिकचा. तर अशी विनावाद्य गाण्याचा एक आनंद आहेच. आणि वाद्य वापरुन निर्माण केलेला दुसरा एक जो ऐकण्याची पण मजा आहे.

एक फ़ार शांत सॉफ़्ट गाणं आहे रजिया सुल्ताना मधलं लताजींच हे गाणंही वाद्याचा वापरच केला नसता तरी सुंदर होतं.
ऐ दिल-ए-नादान...............ऐ दिल-ए-नादान....... आरजु क्या है........ जुस्तजु क्या है आता इथे खय्याम अगदी अचुक जागा हेरुन केवळ एकच वाद्य सुरुवातीला वापरतो ते म्हणजे संतुर अत्यंत सुंदर वापर केलाय एक सुरुवातीला स्लोली एक एक प्रश्नानंतर इतका चपखल वापर की या इतक्या शांत गाण्यात इतर कुठलही वाद्य वापरल असतं तर गोंगाट झाला असता व मुळ स्वर दुखावला असता. पण संतुर उलट मस्त सुरांना साथ देत देत हळुवारपणे गाण्याचा भाव अधिक उन्नत करत जातो. मुड सेट करत जातो.
हम भटकते है क्यु भटकते है.............. पुढे गाण्यात खय्याम ने एक अतीव सुंदर ये जमी चुप है................ आसमॉ चुप है...........नंतर एक नितांतसुंदर निस्तब्धता.................एक ब्युटीफ़ुल पॉज घेतलाय काही क्षणांसाठी तो फ़ारच सुंदर जमवलाय. अस क्वचितच कुठल्या गाण्यात आढळत. म्हणजे मुड ला अचुक वाद्य व शब्दां च्या अर्थप्रत्ययासाठी अचुक पॉज क्या बात है.

एक गाणं आपण ऐकलच असेल हौले हौले से हवा लगती है शाहरुख अनुष्काच यात अ‍ॅकॉर्डीयन वा बॅन्डोनियम पैकी एक चा सुरेख वापर केलाय बघा. हौले हौले दोन शब्दांच्या हातात हात घेऊन दोन दोन मात्रांत तुटक तुटक मध्ये मध्ये याचा पुर्ण गाण्याभर गतिमान वापर केलेला आहे. फ़िक्र को गोली मार यार ........ हौले हौले...... मग अ‍ॅकॉर्डीयन ......हौले हौले..... पुन्हा अ‍ॅकॉर्डीयन. मस्त जमलाय. यातच एक क्युट सीन आहे. तो अनुष्का त्याच्या गालाला रंग लावते तो....... मस्तय गाणं,. हे वाद्य हार्मोनियमपेक्षा गतीच्या बाबतीत उजवं आहे, का माहीत नाही मात्र स्पीड घेणं ते हातात धरण्याच्या सोयीने जास्त स्पीड येतो का ? माहीत नाही. पण हार्मोनियमपेक्षा थोडीशी वेगळी मजा येते.

एक गुलजार च्या माचिसं च फ़ेमस गाणं, दाढीवाला आणि मित्र सुंदर लोकेशनवर बसलेले..... प्रेयसीच्या आठवणी काढताहेत.... जुम्मे के जुम्मे वो सुरमे लगाती थी... कच्ची मुंढेर के तले... यात या गाण्याच्या सुरुवातीलाच एक छान पीस आहे सरोद वा मॅन्डोलीनचा निर्णय होत नाहीये पण मस्तच पीस आहे. मी एकदा तो मोबाइलवर लावलेला रींग टोन म्हणुन. तो ऐकला की हे गाणं घुमु लागत डोक्यात.. तर हा सुरुवातीचा सरोद चा वापर फ़ार सुरेख जमलाय. हे लिहायच कस गंमतच आहे पण असा टंग्न्नडन टंगन्डन ....अस काहीसं मग गाणं सुरु होतं चप्पा चप्पा चरखा चले........ चप्पा चप्पा चरखा चले......

एक दमदार गाणं आहे धुनकी की धुडकी बहुधा धुडकीच तर धुडकी धुडकी लागे या गाण्याची सुरुवातच गिटार च्या दमदार तुकड्याने होते. गायिकेचा आवाज मर्दाना आणि जोशपुर्ण आहे. इश्क दी मस्ती विच दिल जागे ना सोए ...............धुडकी धुडकी धुडकी लागे.. इश्क मे दिलडा होए फ़कीरी मांगे सबकी खैर ...... गाण्यात साधारण दोन तीन मिनींटांनतर येतो गिटार चा एक जबरदस्त पीस.........मुळ गाण्याचा जोश अजुन तीव्रतम करत करत तो गिटार चा पीस गाण्याला पुढे जोशाच्या वरच्या पायरीवर नेऊन ठेवतो. ऐकतांना मजा येते खरच. कोरस चा वापरही जोशाला पुरक असा केलाय. अजुन लगेच आठवणारी गिटार म्हणजे सेन्योरीटा सुनो सुनो कहते है हम क्या , या रीतीक, व फ़रहान अख्तर च च्या गाण्यातील गिटार चा वापरही छान आहे. गाणं जबरी आहे चाहत के दो पल भी मिल पाये. दुनिया मे ये भी कम है क्या....सेन्योरीटा सुनो सुनो सेन्योरीटा कहते है हम क्या . गिटार चा शिवहरी ने डर मध्ये वापरलेला तुकडा जादु तेरी नजर .......खुशबु तेरा....

एक गाणं जुन आहे नाचे मन मोरा मगन धिक ना धिकी धिकी .......नाचे मन मोरा मगन धिक ना धिकी गायक बहुधा मन्ना डे असावा माहीत नाही. पण गाण जे आहे त्यात तबला येतो मस्त दमदार तबला आणि सितार दोन्ही आलटुन पालटुन पुढे गाण्यात .. घिर आये बदरा............ घिर आये ...रुत है भीगी भीगी नाचे मन मोरा मगन धिक ना... धिक ना ...धिक ना धिकीधिकी. तबल्याच्या वापरासाठी मस्तच गाणं,

अजुन एक आपला शोमन घई याची संगीताची जाण आणि भारतीय वाद्यांचा वापर छानच करवुन घेतलाय याने. आठवा तो अनिल कपुर राम लखन मध्ये धिना धिन ता ..... धिना धिन ता.... लाइनीत असंख्य ढोलबडवे दिसतात मग ते भव्य ढोल वाजतो धिना धिन ता . धिना धिन ता.. ए जी ओ जी लो जी सुनोजी मै हु मनमौजी ..... त्यातल नुसत ते धिना धिन ता ऐकल तरी पैसे वसुल होता
त मोठ्या पडद्यावर मस्त वाटत भव्य छान ढोल बडवलेल. धिना धिन ता.

घई ची च आपली जॅकी ची हिरो मधली बासरी ची ब्युटीफ़ुल ट्युन ........
घई ची च आपली ऋषी ची कर्ज मधली गिटार ची ब्युटीफ़ुल ट्युन.........
घई ची आठवावी बासरी घई ची आठवावी गिटार घई चा आठवावा ढोल... मस्त वापर करतो. एक खलनायक मध्ये कोरस च्या आवाजात बॅकग्राउंडला री रा री री......... री रा रा रु..........काय मस्त वाटायच ऐकायला भव्य इफ़ेक्ट नाही ?

तर एक आपलं साध सुधं गरबागुरबी वाद्य काय त माउथ ऑर्गन आणि कोणाची आठवण आली येस्स है अपना दिल तो आवारा ना जाने कीस पे आयेगा.........
गाने को इव्हन गुलफ़ाम देवानंद को भारी पडता है माऊथ ऑर्गन बाजा म्हणायचो आम्ही याला माझ्याकडे होता एक ल्हानपणी.
हसीनो ने पुकारा गले से ......
है अपना दिल तो आवारा ना जाने किस पे आयेगा........ मी नेहमी बोल संपण्याची वाट बघतो आपण सगळेच हो
कान कसा आसुसलेला असतो तो माउथ ऑर्गन चा पीस ऐकण्यासाठी कोण होता हो ग्रेट संगीतकार दर्दींनी जरा प्रकाश टाकावा यावर.
तारारारातारारा ताराराराता रा रा रा... लिहीण नाही जमत बाबा हे. सुनलो वोही ठीक है.

एक प्यार का नगमा है , मौजो की रवानी है............आठवला व्हायोलीन चा पीस ? पुन्हा ऐका फ़ार मस्त जमलाय
जींदगी और कुछ भी नही ..........एक प्यार का नगमा है ,......मौजो की रवानी है.......
व्हायोलीन सहसा एक तर सॅड उदासी असलेल्या भाव जो आहे त्या गाण्यांना जास्त सुट करतो. किंवा मग सेन्शुअल सॉफ़्ट श्रुंगारीक गाण्यांना ....म्हणजे मला व्हायोलीन म्हटल की साधारण दोनच भाव असलेला वापर आढळतो. गाण्यापुरत बोलतोय फ़क्त म्हणजे गाण्यात असा वापर याचा सहसा करतात. बाकी वाद्य ग्रेट च आहे व त्याचा इतर ठिकाणचा वापर या लेखाचा विषय नाही. तर अजुन एक गाणं आहे ज्यात वेगळा भाव आहे पण व्हायोलीन वापरलेलं प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फ़िर क्यु डरता है दिल......... कहता है दिल रस्ता मुश्कील
अनेक व्हायोलीन आणि गतिमानतेने वापर गाण्याचा मुड एनहान्स करतो. (ती एक ओळ आहे ना थाउजंड व्हायोलीन्स फ़िट टु माय पाम )
कहता है दिल रस्ता मुश्कील मालुम नही है कहॉ मंझील............. हा व्हायोलीन चा रीतसर पेक्षा वेगळा वापर वाटला. बाकी कानसेनांना अधिक गाणी माहीत असतील तीच जाणुन घ्यायचीये कृपया दाखवावीत वेगळा वेगळा वापर व्हायोलिन चा मजा य़ेइल.

एक गाणं आहे सध्याचच रॉय चित्रपटातलं तु है के नही तु है के नही.......... यातली व्हीसलींग ट्युन ......ही कुठलं वाद्य वापरुन बनवलेली आहे माहीत नाही नुसत्या आवाजाने काढलेली व्हीसल शिटी वाटत नाही. कुठलतरी वाद्य वापरलेलं पण जबरदस्त सुंदर सॉफ़्ट व्हीसलींग ट्युन आहे. दिर्घ पल्ला असल्याने फ़ार प्रभावी होते. अशा अनेक चित्रपटात वापरलेल्या आहेत सध्याची ही आठवली इतकचं. ट्युन पुढे अर्जुन रामपालचा मक्ख कोरडा चेहरा, तो भावही सुसह्य होऊन जातो. आठवणीच्या भरवशावर अजुन एक राज कपुरच एक गाण आहे. तो पायाखाली आलेला कीडा हळुच उचलुन बाजुला ठेवतो....... ते गाणं किसीकी मुस्कुराहटोपे हो निसार, किसीका दर्द मिल सके तो ले उधार .....जीना इसीका नामहै ....... इथेही एक व्हीसलींग ट्युन आहे ना ?

पियानो हा आपला जुन्या एकेकाळच्या मध्ययुगीन चित्रपटांच्या गाण्यातलं आवडतं वाद्य. तो हॉल ते व्हीआयपी गेस्ट यु नो बिग पार्टी सीन, एक नायिका एक व्हिलन प्राण बगैरे व्हीस्की चा ग्लास किंवा सिगार ओढणारा , आणि हिरो रीव्हर्स शहीदोवाली शैलीत हिरोइनला रडवण्याच्या आटोकाट प्रयत्नात.... पियानोवर बसलेला कॅमेराकडे नाहीतर मान खाली करुन ....मस्त गाणी जमलेली एकाहुन एक पियानो चा वापर असलेली
पटकन आठवायच तर दिल के झरोके मे तुझको बिठाकर ....... ले जाउंगा.... मत हो मेरी जॉ उदास. मत हो मेरी जॉ उदास अस काहीतरी. अजुन नक्की नाही आठवत पण गीत गाता हु मै गुनगुनाता हु मै मैने हसनेका वादा किया था कभी इसलीए अब सदा मुस्कुराता हु मै.................. ये मोहब्बत के पल कितने अनमोल है ......कितने फ़ुलो से नाजुक मेरे बोल है
यातही पियानो चा वापर झालाय. अशी तोंडावर असतात हो गाणी पण आठवु म्हटल तर आठवतच नाही हा एक प्रॉब्लेमच असतो.

एक भजन आहे सुंदर लिरीक्स असलेलं सुरज की गर्मी से जलते हुए तनको मिल जाए तरुवर की छाया .......ऐसा ही सुख मैने ......पुढे यात मध्ये सितार चा आणि बासरी चा फ़ार सुंदर वापर येतो सितार चा तुकडा तर इतका देखणा व इतका सुटेबल आहे की क्या कहने. लहरो से लडती हुइ नाव को जैसे लहरो से लडती हुइ नाव को जैसे मिल ना रहा हो किनारा.... या ओळींची तीव्रता आर्तता ती सितार छान मॅच करते.
एक एक कडव्याच्या मध्ये सितार व बासरी आलटुन पालटुन जबरदस्त इफ़ेक्ट...... एक रीमझीम गिरे सावन सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम मे लगी कैसी ये अगन........
नंतर सितार चा तुकडा येतो.....हा पण सुंदर पीस.......... महफ़िल मे जैसे दिल बंध रहा है कीसी अजनबीसे. याच्या सुरुवातीला पण मला वाटत सितारनेच सुरुवात होते. पण अमिताभ पेटी वाजवतांना दाखवलाय गाण्यात नीट आठवत नाही पण सितार आहे या गाण्यात. बासरी धार्मिक गाण्यात मुबलक वापरली जाते. आणि सुट पण होते. एस. जानकी या साऊथ च्या गायिकेची एक अप्रतिम मीरा भजन्स ची कॅसेट आहे गोडवा काय म्हणावा जानकीचा साऊथची लता हे सार्थ संबोधन त्यांना वापरल जात. त्यांच्या सर्व भजनात जवळजवळ बासरीचा सुरेख वापर आहे. फ़ारच सुंदर. एक अती गोड राजस्थानी शब्द असलेलं भजन आहे म्हारा ओळगिया घर आया जी.... तन की ताप मिटी सुख पाया...... धन की धुन सुनी मोर मगन भया यातलं संगीत पण फ़ार सुंदर बासरी चा वापर. ब्युटीफ़ुल.फ़्ल्युट. आणि थोडीशी सितार.अप्रतिम.

काही तर ओळखु येत नाहीत एक मराठी गाण लताजींच फ़ेमस ऐरणीच्या देवा तुझी ... ठीणगी ठीणगी असच ना.... त्यात एक ट्क्कक ट्क्क्क्क काहीतरी छान आवाज येतो गाण्याला फ़ार सुंदर मॅच केलेला ते वाद्य कुठल ? माहीत नाही का नुसत काहीतरी ट्रीक करुन आवाज उत्पन्न केलाय माहीत नाही पण ऐकायला मस्त वाटत तुझी माया राहु दे..........टीटीक टीटीक
काय आहे ते ? अजुन एक वाद्य ओळखायला कन्फ़्युज होत मला तरी अशोका सिनेमातलं एक श्रुंगारीक गाणं आहे रात का नशा अभी आख से गया नही फ़्ल्युट सारखा पण फ़्लुट नाही असा काहीतरी वेगळाच आवाज भासतो जो गाण्यात सातत्याने येतो. किंवा सध्या इतकी इलेक्ट्रॉनिक प्रगती झालेली आहे वाद्यात ते एकात एक मिक्स पण करतात फ़्लुट मध्ये क्लॅरीनेट मिक्स केलेली आहे का ? मिस्टेरीयस मस्त गुढ आवाज येतो बघायलाही छानच आहे गाणं.

एक गाणं गुलाल च आरंभ है प्रचंड या गाण्याचा आरंभ खरोखरच प्रचंड आवाजाने होतो सुरुवातीला किणकीणाटा सारखा आवाज मग मस्त टीपीकल मराठा दरबार तुतारी निनादते.मग उग्र शब्द धडधड करत आदळु लागतात एक दणदणीत वॉर सॉंग आकार घेऊ लागतं यात तुतारी निनादत असते अधुन मधुन आणि शेवटी. मराठा दरबार तुतारी चा हा सर्वोत्तम उपयोग केलेला आहे.
या गाण्यात पार्श्वभुमीत सतत निनादणारा ठेका पण जबरदस्त आहे. सतत चालणारा एक सुंदर दुसराच टाइपचा ठेका तबल्याचा चलते चलते यु ही कोई मिल गया था ......या गाण्यातही फ़ार सुंदर गाण्याच्या सुरुवातीपासुन ते अखेरपर्यंत फ़ार च सुंदर वापरलेला आहे. ये चराग बुझ रहे है ये चराग बुझ रहे है मेरे साथ चलते चलते........ यु ही कोइ मिल गया था सरे राह चलते चलते......... अतीव सुंदर ठेका आणि गाण्याच्या शेवटी केलेला युनिक रेल्वेच्या शीटी चा दुरवरुन येणारा आवाज रेल्वेच्या आवाजाचा असला सुंदर उपयोग करुन घेण म्हणजे क्रीएटीव्हीटीची कमालच म्हणावी. कोणी विचारही करु शकत नाही अशा मुडच्या गाण्याला ती शेवटची दुरवरुन येणारा आवाज वेगळाच इफ़ेक्ट देतो. चलते चलते फ़ार सुंदर.

बॅगपाइप चा वापर झालेलं एक छान गाण ऐकलय नव्या सिनेमाच च आहे बहुतेक बॅंग बॅग कींवा एक था टायगर दोन पैकी एक नक्कीच यातील एका गाण्यात क्वचितच आपल्याकडे होणारा बॅगपाइपचा वापर सुंदर वापर केलेला आहे. तसा सिनेमात नाही मात्र एका जाहीरातीत पण दारुच्या छानच वापर आहे बॅगपाइपचा. हे गाणं कुठल कृपया सांगावे. आणि एक सध्याच्या शानदार चित्रपटाच्या एका गाण्यात एक छान वापर झालेला तो अनेक वाद्ये वापरुन बॅन्ड मध्ये असता तशी शा शानदार असे शब्द येता ते एक गाण हे. हो.

साज़ की बात निकले और पंचम दा का जिक्र ना हो बहोत नाइन्साफ़ी है. पंचम दा ने सर्वात जास्त सर्वात विवीध सर्वात चमत्कारीक वाद्यांचा आवाजांचा वापर केलेला आहे. पण मला आता थांबतो मला तुमच्याकडुन हवी आहेत गाणी ज्यात विवीध वाद्ये सुंदर वापरलेली आहेत. एक गाणं फ़क्त आठवतय पिया तु अब तो आजा हे गाण प्रत्यक्ष सुरु होण्यापुर्वी जवळजवळ दोन मिनीट अनेक चित्र विचीत्र आवाज एकदम मुळ गाण्याच्या मुडपेक्षा एकदम वेगळे आवाज व मग मुळ गाणं पिया तु अब तो आजा ..........शोला सा ..... हा माणुस म्हणजे वल्लीच होता. पंचम चे फ़ॅन फ़ार अ‍ॅग्रेसीव्ह आणि पंचमसारखे थोडे चक्रम स्वीटली चक्रम असतात. चलता है अपनी अपनी पसंद अपने अपने शौक काही तक्रार नाही हं आपली. त्यांची खेचायची तर मग एस डी बर्मन च उगीचच उदाहरण दामटायचं ते कहता ता यही पंछी के बिछुड गयी सजनी आपला उगा एक बंगाली ला दुसरा बंगाली काय संबध नाही पण मग मजा येते.

रहेमानी बीट्स वर काय बोलणार आपला तेवढा आवाका नाही. आपण फ़क्त कोणाकडुन ऐकुन समजुन घेतो की सांग बाबा कशी मजा आहे रहेमान ची जबरदस्त तो पण सध्या गाणी अशी पटकन आठवत नाहीयेत पण येस ताल ताल मधली गाणी मै रमता जोगी इश्क का प्याला पी आया एक पल मे सदिया जी आया. ताल ची सर्व च गाणी आश्चर्यजनक आहेत. त्यात ऐश्वर्या जेव्हा अनिल कपुरला भेटते तो त्याचा वाद्य प्रॅक्टीस चालु असते तो एक सीन आहे काय जबरदस्त संगीत आहे ते गंमत म्हणजे ते टीकात्मक दाखवलेलं आहे पण मला तोच भाग आवडला. कानसेनांनी रहेमानी बीट्स वर अधिक प्रकाश टाकावा मी आवरतो.

रहेमान आणि पंचम आणि अजुन एक ओपी नय्यर तिन्ही कानसेनांवर सोपवतो ते अधिक उत्तम रीतीने सांगु शकतील की त्यांनी विवीध वाद्यांचा आवाजांचा आपल्या गाण्यात कसा सुंदर वापर केलेला आहे. वरील तिघांचे आपल्या मिपावर एकेकाचे निष्ठावान प्रेमी सापडतील. म्हणुन हे जाउच द्या.

एक प्रकार थोडा असा असतो हिन्दी गाणी इन्सट्रुमेंट वर वाजवलेली हा ही एक सुंदर जमतो कधी कधी फ़ार. एक पुर्वी फ़ेमस पियानीस्ट होता इंग्लीश नाव आठवत नाही त्याची एक कॅसेट होती हिट हिन्दी गाण्यांचे पियानोवर वादन फ़ार सुंदर वाजवायचा फ़ेमस होता फ़ार एकेकाळी. बार वगैरेमध्ये ही इन्स्ट्रुमेंटल वर्षानुवर्षे ऑन डिमांड वाजवीली जात असतात. त्यात ते अभी ना जाऒ छोडके ऑल टाइम क्लासिक गाण असतच असत. माझ्याकडे काही इन्स्ट्रुमेंटल गाणी आहेत पण ती कोणाची त्याच नाव माहीत नाही त्यात तेरा जाना दिल के अरमानो का मिट जाना गाण्याच इन्स्ट्रुमेंटल रुपांतरण अतीव सुंदर जमलेलं आहे. ती कॉम्प्युटर मध्ये कोणी तरी दिलेली त्यावर अलबमच नाव नाही. सध्याचा आठवणारा एक ग्रेट म्हणजे ग्रेटेस्ट म्हणावा असा बापसे बेटा खरोखर सवाई असा म्हणजे राहुल शिवकुमार शर्मा आहाहा हा एक अफ़लातुन संतुर वादक बापाच्या चार पावलं पुढेच आणि कोणाबरोबर अल्बम तर डायरेक्ट केनी जी आपला ब्रेथलेस सॅक्सोफ़ोन वाला अल्बमच नाव नमस्ते गाणं घेतलय ये कहॉ आ गये हम युही साथ चलते चलते वाद्ये दोन प्रमुख वाद्ये संतुर आणि सॅक्सोफ़ोन परीणाम स्वर्गानुभुती. इथे धरतीवर स्वर्गाचा प्रत्यक्ष अनुभव माझ्या आयुष्यात इतक सुंदर एखाद्या गाण्याच इन्स्ट्रुमेंटल रुपांतरण मी तरी ऐकलेल नाही. आहाहा स्वर्गीय संगीत. राहुल शर्माचा एक अल्बम आहे फ़िल्मी नाही मात्र व्हाइट नावाचा हा सगळा अलबम च जादुई संगीताचा आहे. एक अजुन आहे काश्मीर नावाचां अलबम यातली इतर नाही मात्र एक आहे चार चिनारी बझार नावाचा तुकडा आहाहा काय सुंदर किती सुंदर हजार वेळा ऐकल तरी गोडवा तीळमात्र कमी होत नाही. तुम्ही एकदा चार चिनारी बझार ऐकुन बघा. अजुन एक गाण देखा एक ख्वाब तो ये सिलसीले हुए दुर तक निगाहो मे गुल खिले हुए अप्रतिम इन्स्ट्रुमेंटल रुपांतरण अद्वितीय !
अदनान सामीही एक जीनीयस वादक आहे अनेक वाद्ये तो लीलया वाजवतो त्याच्या गाण्यात ही वाद्यांचा अप्रतिम वापर असतो. पण असो आता आवरतो.
कानसेनांनी जाणकारांनी शेअरींग करुन गाण्यांत केलेल्या विवीध वाद्य वापराची आणखी सौदंर्यस्थळे उलगडून दाखवावीत ही नम्र विनंती. अजुन जागा जाणुन घेणे हाच या धाग्याचा एकमात्र उद्देश बाकी पसंद अपनी अपनी.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

1 Dec 2015 - 10:47 am | पैसा

खरंच अनमोल आहे!

पैसा's picture

1 Dec 2015 - 11:26 am | पैसा

ऑर्केस्ट्रा आवडला. पण लता आणि आशा यांनी कान बिघडवून ठेवलेत! त्यांचे मास्टरपीस दुसर्‍याच्या आवाजात ऐकले की ते खरे तर नव्या गायकांवर अन्याय करणारे होतात!

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Dec 2015 - 9:21 am | ज्ञानोबाचे पैजार

अरे का जबरा लेख आणि त्यावरच्या जबरा प्रतिक्रिया.
वाखु साठवली आहे.
और आनेदो

पैजारबुवा,

नीलमोहर's picture

1 Dec 2015 - 10:40 am | नीलमोहर

ऐ दिल-ए-नादान,
आरज़ू क्या है, जुस्तजू क्या है..

- शांततेचं गाणं आहे हे, रात्री ऐकायचं... वेगळ्या मेडिटेशनची गरजच नाही.
एका वेगळ्याच जगात नेऊन सोडतं ते आपल्याला.

व्हायोलीन आवडतं वाद्य आहेच. सूर चित्रपटातील गाण्यांत व्हायोलीनचा भरपूर वापर केलेला आहे.
लकी अली, महालक्ष्मी हे गायक आणि साथीला अनेक व्हायोलींसचे सूर, अजून काय हवं..

'जाने क्या ढूंढता है ये मेरा दिल तुझको क्या चाहिए जिंदगी' हे लकी अलीच्या आवाजातील लोकप्रिय
झालेलं गीत आहे शिवाय अजूनही एक अतिशय सुंदर गाणं आहे,
कभी शाम ढले तो मेरे दिल में आ जाना,
कभी चाँद खिले तो मेरे दिल में आ जाना..

गीतकार: निदा फाजली
संगीतकार: एम एम क्रीम
गायक: महालक्ष्मी अय्यर
पाखी पाखी परदेसी म्हणणारी तीच ती महालक्ष्मी अय्यर.

पैसा's picture

1 Dec 2015 - 10:53 am | पैसा

१)
कोणतेही वाद्य नसताना निव्वळ लताच्या आवाजाची जादू मदनमोहनच्या संगीतात https://www.youtube.com/watch?v=a6pglwRg4gU

हे जहांआरामधलं जब जब तुम्हे भुलाया" च्या सुरुवातीचा शेर ऐका. "मै तेरी नजर का सुरूर हूं"
२)
https://www.youtube.com/watch?v=bdLY6NtPjCQ

पुन्हा मदनमोहन आणि लता यांचं दस्तकमधलं "माई री मैं का से कहूं"

३)
बासरीच्या काही अप्रतिम तुकड्यांसाठी
स्त्री मधलं सी रामचंद्र आणि लता यांचं "ओ निर्दयी प्रीतम"
https://www.youtube.com/watch?v=FGl1WgKiX0E

प्रदीप's picture

1 Dec 2015 - 11:15 am | प्रदीप

तिन्ही गाणी!

मारवा's picture

1 Dec 2015 - 5:52 pm | मारवा

जब जब तुम्हे भुलाया साठी
हजारो धन्यवाद
हे गाणं माहीतच नव्हतं सिनेमा १९६४ चा अस कळलं म्हणजे जवळजवळ ५० वर्षे जुनं गाणं !
अप्रतिम !

बोका-ए-आझम's picture

2 Dec 2015 - 11:35 am | बोका-ए-आझम

वो चूप रहे तो मेरे दिल के दाग जलते है - हे लताच्या all time greats पैकी एक. याचं पहिलं कडवं निव्वळ अशक्य आहे -

कहो बुझे के जले
हम अपनी राह चले या
तुम्हारी राह चले
कहो बुझे के जले!
बुझे तो ऐसे के जैसे किसी गरीब का दिल
किसी गरीब का दिल
जले तो ऐसे के जैसे चिराग जलते है!

या ओळींमध्ये गरीबका दिल वरच्या दोन्हीही जागा अफलातून आहेत. मदनमोहन आणि लता हे narcotic combination आहे!

पैसा's picture

2 Dec 2015 - 12:26 pm | पैसा

नेमके परवा गावाहून येताना मदनमोहनच्या गाण्यांची mp३ ३ तास ऐकत आलेय. त्यामुळे सगळी गाणी मनात ताजी आहेत!

मारवा's picture

2 Dec 2015 - 1:12 pm | मारवा

तुमचा लताजींचा स्टॉक कीती जीबी चा असावा याचा अंदाज बाधत होतो.
तुमचं
लता सुमन कल्याणपुर
लता आशा
लता नुरजहॉ
तुलनात्मक विवेचन ऐकायला आवडेलं खुप.
जमलचं तर
लता अनुराधा पौंडवाल वुइथ गुलशनकुमार मसाला मारके पण आवडेल.
किंवा लता आशा ला ओपी नय्यर तडका दिला तरी मजा येईल.
पहले जमाने मे ओपी नय्यर ने व नंतर च्या जमान्यात गुलशन कुमार ने
अनुक्रमे आशा व अनुराधा पुढे करुन एक
काही प्रयत्न केला होता असे उडता उडता ऐकलेय.
गंमतीचा भाग सोडुन द्या लताजींच्या आवाजात नटखट गाणी नखरेल अंदाज थोडा कमी पडतो असे म्हणणार्‍यांच्या तोंडावर
पैसा जी कुठली गाणी फेकतील याची उत्सुकता आहे.
म्हणजे (झेलायला मीच उत्सुक आहे )

पैसा's picture

2 Dec 2015 - 7:22 pm | पैसा

नखरेल गाणी देते ना! दुपारी बर्‍याच लिंका देते अजून.

या तुलनांबद्दल प्रदीपदा जास्त छान लिहितील. मात्र खरे सांगायचे तर हापूस आंबा आणि पायरी यात तुलना करता येणार नाही तसे असते. लता आणि आशा यात तर तुलना होऊच शकत नाही. दोघीही ग्रेट सारख्याच. मजा म्हणजे लोक त्यांच्या शत्रुत्वाच्या गोष्टी बोलत आणि त्या दोघी रोज संध्याकाळी चहा बरोबर घेत सगळ्यांच्या चेष्टा करत असे दादा कोंडके यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे.

नूरजहांची गायकी स्टायलाईज्ड होती. त्यातून ती पाकिस्तानात गेली त्यामुळे फार बोलता येणार नाही. मात्र शंकर जयकिशन आणि लता आशा च्या कॉम्बिनेशनपुढे ती इथे निष्प्रभ झाली असती असे वाटते.

सुमन कल्याणपूर यांचा आवाज गोड होता. मात्र लताच्या इतकी रेंज नव्हती.

अनुराधा पौडवालही ठीक. पण तिचे गाणे केवळ लताला टक्कर देण्यासाठी या उद्देशाने घडवलेले वाटते. असा उद्देश असेल तर सुरात थोडा कमीपणा येणारच. कोणतीही गोष्ट दुसर्‍याला मागे टाकण्याच्या इर्षेने करणे आणि स्वतःच्या समाधानासाठी करणे यात बराच फरक होतो.

ही सगळी माझी वैयक्तिक मते. कोणत्याही २ गायकांची अशी थेट तुलना करणे मला खरे तर पटत नाही. त्यांचा त्यांचा स्वतंत्रपणे आस्वाद घ्यावा.

पैसा's picture

1 Dec 2015 - 11:29 am | पैसा

ताजमहल (१९६३) सिनेमातली बहुतेक सगळीच गाणी त्यातल्या व्हायोलीन, सतार वगैरे वाद्यांच्या उपयोगासाठी आवडतात. रोशनची सगळी फारच गोड वाटायची. त्यांचे संगीत संयोजन कोण करायचे?

बोका-ए-आझम's picture

2 Dec 2015 - 11:39 am | बोका-ए-आझम

ते आद्य अरेंजर. ही संकल्पनाच त्यांनी आणली. पण असल्या गोष्टींचे लिखित पुरावे नसल्यामुळे नक्की सांगू शकत नाही. जाणकारांनी चूक असेल तर दुरुस्त करा प्लीज!

प्रदीप's picture

2 Dec 2015 - 1:04 pm | प्रदीप

महंमद शफी हे नौशादांकडे काम करायचे, आणी ते रोशनकडेही करत असतील असे वाटत नाही. रोशनकडे कोण होते ह्याची माहिती काढतोय. कुणीतरी जाणकाराने सोनिकांचे नाव सांगितलेय. (सोनिक मदन मोहनचे एक अ‍ॅरेंजर होते).

बोका-ए-आझम's picture

2 Dec 2015 - 6:11 pm | बोका-ए-आझम

सोनिक - ओमी मधले? त्यांचं 'दिल ने फिर याद किया ' मधलं ' लो आया प्यार का मौसम ' हे मस्त गाणं आहे.

पैसा's picture

2 Dec 2015 - 6:15 pm | पैसा

विकिपेडियाच्या त्यांच्या पेजवर रोशन यांचे अ‍ॅरेंजर म्हणून उल्लेख आहे. दिल ने फिर याद किया बरोबर महुवा मधले "दोनो ने किया था प्यार मगर" त्यांचंच ना?

प्रदीप's picture

2 Dec 2015 - 7:21 pm | प्रदीप

मास्टर सोनिक हे तेच ते, सोनिक- ओमी ह्या जोडीतील सोनिक.

हे अंध होते, व त्यामुळे त्यांना मदत करावयास ओमी, जो त्यांचा पुतण्या/ भाचा होता, तोही गावावरून आला व त्यांच्याबरोबर काम करू लागला. मास्टर सोनिक मदन मोहनच्या दोन अ‍ॅरेंजर्सपैकी एक. त्यांनी एक आठवण सांगितलीय, ती इथे जाता जाता नमूद करतो. राजा मेहंदी अली खाँ ह्यांनी एकदा एक गीत लिहून ओ. पी. नय्यरांना दिले, जे नय्यरांना आवडले नाही, त्यांनी ते स्वतःसाठी घ्यायचे नाकारले. दुसर्‍याच दिवशी त्यांनी त्या गीताविषयी मदन मोहनला विचारले. मदन मोहनने ते गीत तात्काळ स्वीकारले, व काही दिवसांतच ते रेकॉर्डही झाले. 'आपकी नझरोंने समझा' हे ते अजरामर गीत!

संदीप डांगे's picture

1 Dec 2015 - 1:59 pm | संदीप डांगे

"दिलके झरोकेंमे तुझको बिठाकर" क्लासिक ऑर्केस्ट्रेशन आहे.

पद्मावति's picture

1 Dec 2015 - 3:12 pm | पद्मावति

नमकीन मधे आंकी चली, बांकी चली या गाण्यात उखळात मसाला कुटतानाचा हलका नाद. संगीत आर. डी बर्मन.
केवळ बॅकग्राउंड ला अगदी हलका पक्ष्यांचा आवाज, कधी पावसाचा, कधी सारंगीचा आवाज वापरुन वनराज भाटीयांनी जुनून मधे सावन की आयी बहार रे हे अप्रतिम गाणं दिलं.
दोन्हीही गाण्यांमधे आशा भोसल्यांचा खणखणीत आवाज.

पैसा's picture

1 Dec 2015 - 8:05 pm | पैसा

दोन्ही मस्त आहेत ही!

संदीप डांगे's picture

1 Dec 2015 - 8:01 pm | संदीप डांगे
मराठी_माणूस's picture

1 Dec 2015 - 8:52 pm | मराठी_माणूस

हार्मोनिका ची आत्ता आठ्वत आहेत ती गाणी
१)https://www.youtube.com/watch?v=Y4e-eLQfShI (लाजवाब इंट्रो पीस)
२)https://www.youtube.com/watch?v=rl9GolYHatk (शेवटी, शेवटी ४.०२ नंतर)
३)https://www.youtube.com/watch?v=WPbYUVFR6KI (M1, १.०३ च्या पुढे)
४)https://www.youtube.com/watch?v=KOItNjiHbK8 (M1, १.५४ ते २.०६)

चर्चेत सहभागी झालेल्या व आनंदवर्धक प्रतिसाद देण्यासाठी सर्व प्रतिसादकांचे मनापासुन धन्यवाद !
लिंकां साठी विशेष धन्यवाद !

थांबा जरा. आज बुधवार आहे. १०० तरी करु. मग द्या धन्यवाद. ;)

पैसा's picture

2 Dec 2015 - 7:06 pm | पैसा

झूठ बोले कौवा कांटे https://youtu.be/KfTC5cJpmwA
ये गलियां ये चौबारा https://youtu.be/hUde7UxFkAc
नैनों मे सपना https://youtu.be/1XXVw9skvXs
हम तुम एक कमरे में बंद हो https://youtu.be/tBJj-3sgcd0
मेरे नसीब में तू है के नहीं https://youtu.be/5SVj1dq3F-0

सिरुसेरि's picture

6 Dec 2015 - 7:59 pm | सिरुसेरि

खुप चांगली गाणी ऐकायला आणी बघायला मिळाली . माझ्याकडुन काही भर .
तामिळ फिल्म "रिदम" मधील रहमान,शंकर महादेवन जोडीचे गीत .शंकर महादेवनने या गाण्यात धमाल डान्स केला आहे . https://www.youtube.com/watch?v=FQNyo5URsOc
अलिकडच्या काळात गाजलेले "सिवम" फिल्ममधील हे गीत प्रसिद्ध गायक उन्नीक्रिष्नन यांच्या आठ वर्षाच्या मुलीने ताकदीने गायले आहे . https://www.youtube.com/watch?v=xdhY-uRL0Gw

रिदम मधील गाणे हिंदीत पण आहे ना. चित्रपट लकीर. गाणे "नचले, आजा नचले." बीटस, कोरस अन बोल टोटल पंजाबीकरण केलेल्या ह्या गाण्यात बॉलीवूडमधील सर्वश्रेष्ठ डान्सर सुनील शेट्टी आणि सर्वश्रेष्ठ अ‍ॅक्टर जॉन अब्राहम आहेत.

अर्धवटराव's picture

7 Dec 2015 - 2:47 pm | अर्धवटराव

इतर धाग्यांच्या भाऊगर्दीत हा इतका छान लेख आणि चर्चा वाचलीच नाहि.
सुपर्ब लेख.

अभिजितमोहोळकर's picture

7 Dec 2015 - 3:53 pm | अभिजितमोहोळकर

कमीत कमी वाद्य वापरून अप्रतिम, मधाळ आणि काळजाला भिडणार्या रचना देण्यात अण्णा चितळकर उस्ताद होते. मोजकीच वाद्य, गोड ठेका आणि सोबत लताचा अविस्मरणीय आवाज.....शेकड्यानी रचना आहेत. आत्ता मात्र मी काही मोजक्या आणि वाद्यवृंदाच्या नजरसुद्ध्हा आवडलेल्या काही रचना देण्याचा प्रयत्न करतो.

तुम क्या जानो तुम्हारी याद में - लता - सी.रामचंद्र - शिनशिनाकी बुबलाबू - सिग्नेचर चितळकर रचना. मेंडोलिन, व्हायोलिन व ओबो ह्यांच्या सोबत लताचा उदास आवाज उफ्फ.....

बलमा बडा नादान अजून एक चितळकर रचना. व्हायोलिन्सचा अत्यंत लोभसवाणा वापर अण्णा करत. ह्या गाण्यातली व्हायोलिन्स म्हणजे अतिशय नाजूक कलाकुसर.

गिटार, बासरी आणि तलतचा मखमली आवाज घेऊन केलेली ही रचनाही अण्णांचीच

तूर्तास एव्हढेच...