मिपा ग्रहवासियांनो २ बाबतीत माहिती द्यावी ही विनंती.
१) डिसेंबर मध्ये २-३ दिवस दापोली (हर्णे बीच) वर सहकुटुंब जायचे आहे. तरी हर्णे बीच वरचे एखादे चांगले होम-स्टे किंवा लॉज असेल तर सांगावे. समुद्रापासून जवळ असावे.
२) पुण्यातील एखादा चांगला आहारतज्ञ्य सुचवा.
व्य.नी केलेत तरी चालेल.
प्रतिक्रिया
27 Nov 2015 - 10:38 am | मुक्त विहारि
हॉटेल किनाराचा अनुभव (जेवण्यासाठी) मला उत्तम आला.
घर जवळ असल्याने, हॉटेलमध्ये राहिलो नाही.
हॉटेल किनार्याची लिंक -------> http://www.hotelkinara.com/contact_us.html
डिस्क्लेमर -----> हॉटेल किनार्या बरोबर माझे कुठलेल्ही व्यावसाइक किंवा वैयक्तिक संबंध नाहीत.
27 Nov 2015 - 11:06 am | कपिलमुनी
हॉटेल किनारा चाम्गला आहे
27 Nov 2015 - 10:43 am | गवि
लोटस (कामत). होमस्टेइतकं स्वस्त नाही पण अगदी समुद्रावर आणि सर्व रिसॉर्ट लेव्हल फॅसिलिटीज. चिरे वापरुन बनवलेली लोकल प्रकारची घरं. अॉल मील्स.
27 Nov 2015 - 2:19 pm | जातवेद
हर्णे पेक्षा कर्दे वर रहा जमत असेल तर.
27 Nov 2015 - 2:28 pm | अमृत
किंवा लाडघरला जा. गेल्या आठवड्यातच जाऊन आलो.
27 Nov 2015 - 2:37 pm | प्रसाद१९७१
कुठे राहिलात ते सांगा आणि असली तर लिंक द्या.
2 Dec 2015 - 9:28 pm | अमृत
http://www.misalpav.com/node/33152 सौंदाळांच्या प्रतिसादात लिंक आहे.
27 Nov 2015 - 2:37 pm | पिलीयन रायडर
सदाहरित धागे आहेत ना हो ह्या प्रश्नांसाठी..
पण असो.. आता धागा काढलाच आहे तर...
न्यु इयरला जायला हर्णे / कर्दे / लाडघर.. काय चांगला ऑप्शन आहे?
३ दिवसांची छोटी ट्रिप काढायची आहे. पण न्यु ईयरलाच काढायची असल्याने जिथे फार धिंगाणा असणार नाही अशा ठिकाणी जायचे आहे.
27 Nov 2015 - 2:47 pm | गवि
दुर्दैवाने कोंकण अॉलरेडी या सर्व गोष्टींनी व्यापलंय.
किंबहुना न्यू ईयर ईव्हला उपरोक्त गर्दी, धिंगाणा नसलेली ठिकाणं मिळणं जवळजवळ अशक्य झालंय.
27 Nov 2015 - 2:50 pm | पिलीयन रायडर
खरं तर आम्ही १/२/३ जानेवारीला जायचा विचार करत होतो. पण तेव्हाही गर्दीच असायची शक्यता आहे तर..
बरं मग जौ दे..
दुसरा एखादा विकेंड पकडु.. मग कुठे जाता येईल?
27 Nov 2015 - 4:07 pm | कपिलमुनी
न्यु इयरला
अलिबाग ते शिरोडा ! लोनावळा ते चिखलदरा
कुठेही जाउ नये ! इकतेच काय बाहेर जेवायला सुद्धा जाउ नये अशी परीस्थीती आहे.
मनस्तापाशिवाय काहीही मिळत नाही.
27 Nov 2015 - 5:33 pm | कंजूस
आमच्या एका नातेवाइकांनी पाली भक्तनिवास बुक केले होते.न्यु इयर शांततेत एकदम.