फुसके बार – २१ नोव्हेंबर २०१५
.
१) सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींचा लहरीपणा
चेह-याला लावण्याच्या क्रीममुळे गोरेपणा येत नाही, तेव्हा असे दावे करणा-या कंपन्यांवर कारवाई करावी अशा स्वरूपाच्या याचिकेची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश दत्तू यांनी नकार दिला. एवढेच नव्हे तर अशा दाव्यासाठी ग्राहक न्यायालयाकडे जावे असा सल्ला त्यांनी दिला. माझ्या मते मुख्य न्यायमुर्तींचे हे विधान अतिशय बेजबाबदारपणाचे आहे. ग्राहक न्यायालय फार तर एखाद्याने विकत घेतलेल्या अशा क्रिमची किंमत परत करण्यास सांगू शकते, फार तर फार असे खोटे दावे केल्याबद्दल काही दंडही करू शकते. परंतु लोकांची फसवणूक करण्याच्या गुन्ह्याखाली अशा कंपन्या बंद करणे अशा प्रकारची कारवाई फक्त सर्वोच्च न्यायालयच करू शकते. तेव्हा या प्रकरणात याचिकाकर्त्यांना वाटेला लावून सर्वोच्च न्यायालयाने फार मोठी चूक केलेली आहे.
२) डाळीपाठोपाठ आता तांदूळ महाग होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. डाळीच्या प्रकरणामुळे दिवाळीच्या तोंडावर आरडाओरडा झाला तरी खास दिवाळीत तुरडाळीची कोठे गरज पदते असे मुद्द्याचे प्रश्न न विचारता माध्यमांनी केवळ आपली जागा व वेळ देऊन लोकांना मूर्ख बनवायचे उद्योग केले. दिवाळी संपली तरी डाळ उतरलेली नाहीच. उलट शंभर रूपयाने विकली जाणारी अयात केलेली डाळ खरोखरच शिजत नाही असा अनुभव सांगितला जातोय. आता तांदूळही महागणार असे म्हणतात. याचा अर्थ हळुहळु सा-याच धान्यांच्या किंमती वर नेऊन ठेवल्या जातील व आपल्याला त्याची नाइलाजाने सवय करून घ्यावी लागेल.
३) चित्रपटगृहांमधला उपद्रव:
पुणे-मुंबई-पुणे सिनेमा मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात पाहताना काही मुलांच्या टारगट कमेंट्स ऐकून त्या मुलांना उद्देशून काही म्हटले तर थॅंक्यु आंटी असे म्हणून तो टारगटपणा पुढे चालूच राहिला, तेव्हा आणखी वाद कोठे घालायचा म्हणून एक दांपत्य अखेर सिनेमा सोडून परतले, असा अनुभव वाचण्यात आला. खूप वर्षांपूर्वी मुंबईत रोजा हा सिनेमा पाहताना असाच आचरटपणा करणा-या काही महाविद्यालयीन मुलांच्या गटाला इतरांनी चोप देऊन बाहेर काढले होते. पूर्वी कमी दराच्या चित्रपटगृहातला क्राउड असा असतो, म्हणून तिकिट अधिक दराचे असले तरी लोक मल्टिप्लेक्समध्ये जात असत. आता हा अनुभव सार्वत्रिक झाला आहे. अनेकदा पडद्यावर बाई दिसली की हे लोक चेकाळताना दिसतात. बाकी सिनेमा चालू असताना खाद्यपदार्थांवरून होणारा शेजारच्यांचा त्रास वगैरे गोष्टींवरूनही कोणाला काही बोलण्याची प्राज्ञा नाही. या व अशा उपद्रवांना विरोध दर्शवला, तर बाकीचेही तुम्हाला साथ देतील याची शाश्वती नसते. सिनेमागृहाचे चालकही याबाबतीत काही उपाययोजना करताना दिसत नाहीत. तेव्हा सिनेमा पाहण्यातला आनंद राहिला आहे काय? चित्रपटनिर्मात्यांनी लोकांना हे चित्रपट उपग्रहाद्वारे घरच्याघरी उपलब्ध करून द्यावेत, ज्यायोगे लोकांना खरोखर त्यांचा आनंद घेता येईल. ज्युरॅसिक पार्कसारख्या सिनेमामधील डायनोसॉर टीव्हीच्या पडद्यावर कुत्र्यासारखे दिसतील अशी स्थिती बहुतेक सिनेमांची नसते. तेव्हा बहुतेक सिनेमा घरच्या घरी पाहिले तरी काही बिघडणार नसते. शिवाय चित्रपटगृहापर्यंत येण्याजाण्याचा खर्च व वेळ या गोष्टीही वाचतील. या अवांतर फायद्याबरोबरच जे चित्रपट लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांनाही त्याचा फायदा होईल.
४) नितीशकुमार यांच्या विजयापेक्षाही मोदींच्या भाजपचा पराभव झाला यात आनंद झालेल्यांना आज परमानंद झाला असेल. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर दिल्लीत सत्तेवर अालेले केजरीवाल म्हणतात की लालूचा वनवास संपला. लालूचे दोन पुत्र मंत्रीमंडळात आलेले पाहिले. धाकट्या दिवट्याला थेत उपमुख्यमंत्री केले गेले. थोरल्या दिवट्याला शपथ नीट वाचता न आल्याने राज्यपालांनी त्याला पुन्हा शपथ वाचायला लावली. न्यायालयाच्या निर्णयामुळे स्वत:ची खुर्ची सोडायची वेळ आली, तेव्हा आपल्या पत्नीला मुख्यमंत्री करणा-या दरिंद्या लालूचीही आठवण आली असेल. महाराष्ट्रात बहुमताला थोड्या जागा कमी पडल्या तेव्हा बहुमत प्रस्तावाच्यावेळी भ्रष्टगुंडवादीची मदत घेतल्याबद्दल आपल्याकडच्या भाजपद्वेष्ट्यांनी भाजपवर किती कोरडे ओढले होते ते आठवत असेल. त्यांना आज नितिशकुमारांच्या राज्याभिषेकाच्यावेळी हे दोन दिवटे मंत्रीमंडळात गेल्याबद्दल बराच आनंद झाला असेल. केवळ भ्रष्ट बापामुळे उपमुख्यमंत्री झालेला दिवटा या युगातही नववी नापास आहे. निवडणुकीचा अर्ज भरताना त्याने चूक केल्यामुळे तो त्याच्या थोरल्या भावाचा थोरला भाऊ झाला होता. यापेक्षा अधिक न शिकण्यास त्याच्या बापाची गरीबी कारणीभूत नाही. याशिवाय त्याला राजकारणाचा कोणताही अनुभव नाही. आता शाळेच्या शिकण्याचा व आयुष्यात यशस्वी होण्याचा काय संबंध किंवा आपले वसंतदादा केवळ चौथी पास होते असा प्रतिवाद कृपया करू नये.
या निमित्ताने अर्णवने २०१३मधली एक आठवण सांगितली. त्यावर्षी लालूच्या या दोन दिवट्यांनी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा नितीशकुमार पूर्णपणे लालूच्या विरोधात होते. तेव्हा नितीशकुमार म्हणाले होते की लालूच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात S1 व S2 (एक मेहुणा साधु यादव व दुसरा कोण ते आठवत नाही) नंगा नाच घालत होते, आता लालूच्या वतीने T1 व T2 (तेजस्वी व तेजप्रताप) ते काम करतील. तेव्हा आता हाच T2 आता नितीशच्या वळचणीला बांधला जात असल्याचे पाहून नितीशसह सारेच धन्य झाले असतील.
तेव्हा नितीशकुमारांची वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा आड आली नसती तर आजही नितीशकुमारांसह सुशील मोदी उपमुख्यमंत्री झालेले दिसले असते. आजच्या चित्रापेक्षा हे चित्र अधिक चांगले दिसले नसते का? अर्थात या जरतरचा तसा उपयोग नाही.
५) रत्नागिरीचे नाव असे कसे प्रचलित झाले, रत्नगिरी का नाही?
६) चित्रपटसमीक्षक अशोक राणे झी २४तासवर सांगत आहेत की देवदास या सिनेमाच्यावेळी संजय लीला भन्साळी यांना कोणी सांगितले की पारो आणि चंद्रमुखी यांना एकत्र नाचवणे चुकीचे आहे. तर भन्साळीचे त्यावर म्हणणे काय तर माझ्याकडे ऐश्वर्या व माधुरी आहेत. मी त्यांना एकत्र नाचवले नाही तर माझा धंदा कसा होणार? त्यामुळे मूळ गोष्टीत काय होते याच्याशी मला देणेघेणे नाही. ते असेही म्हणतात, की साडी नेसण्याची पद्धतही पूर्णपणे चुकीची आहे. शिवाय हे गाणे मंगळागौरीच्यावेळी पिंगाचे नाचासह जे गाणे म्हटले जाते, या धर्तीवरही नाही. केवळ पिंगा हा शब्द त्या गाण्यात वापरलेला आहे. देवदास हा सिनेमा जरी काल्पनिक कथेवर आधारित असला तरी त्या सिनेमाला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे. तेव्हा एक ‘खानदानी’ स्त्री ही एका ‘वादग्रस्त’ स्त्रीच्या बरोबरीने नाचते हे कल्पनेच्या पलीकडचे आहे. तेव्हा सिनेमॅटिक लिबर्टी ही फार निसरडी गोष्ट आहे असे ते म्हणाले.
असा धंद्याचा दृष्टीकोन असणा-या व्यक्तीची सिनेमॅटिक लिबर्टी म्हणावी कशी? ही धंदेवाईक लिबर्टी नव्हे का? मग त्याला विरोध का करू नये?
निरगुडकरांनी आणखी एक गंमत केली. त्यांनी पिंगाचा नाच हा देवदासमधल्या डोला रे डोला रे या गाण्याच्या पार्श्वभुमीवर दाखवला आणि जवळजवळ सा-याच स्टेप्स जुळताना दिसत होत्या.
या चर्चेत फुलवा खामकर व नितीन देसाई हे दोघे चित्रपटसृष्टीतील कलाकार होते. कदाचित त्यांच्या करिअरचा प्रश्न असल्याने त्यांनी अपेक्षेप्रमाणेच भन्साळीविरूद्ध न बोलता नाच म्हणून ते गाणे छान आहे, त्याच्याकडून अशी मोठी चूक होणे शक्य नाही, वगैरे टेप लावली होती.
या सर्व गदारोळात अजूनही कोणी भन्साळीना याबद्दल काही विचारण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत का? हे मुद्दाम ठरवून होते आहे का?
प्रतिक्रिया
21 Nov 2015 - 12:32 am | सुज्ञ
फुसका बार छान आहे
21 Nov 2015 - 9:57 am | संदीप डांगे
आवरा....
21 Nov 2015 - 10:19 am | भंकस बाबा
प्राप्त असलेल्या माहितीनुसार लालूनी डॉक्टरेट मिळवली (?) आहे. शिक्षण घेऊन लालू काय दिवे लावतात हे दुनियेने पाहिलेच आहे. त्यापेक्षा त्यांचा प्रामाणीकपणा बघा. उगाचच पोराना खोटी डिग्री वैगेरे देऊन स्मृति ईरानी सारखी पक्षाची गोचि करुन नाही ठेवली.
22 Nov 2015 - 10:15 pm | राजेश कुलकर्णी
अहो, हा प्रतिवाद मी इतरत्रही पाहिला आहे. असे दिवटे फार तर फार दहावी पासचे सर्टिफिकेट घेऊ सकले असते. पुढची डिग्री घेउुन त्यांचीच शोभा झाली असती. लालू मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या मुलीला एमबीबीएस परीक्षेत पहिली आणून पराक्रम केलाच होता. ते प्रकरणही तेव्हा गाजले होते. अापल्याकडे निलंगेकरांना त्यापायी पद सोडावे लागले. तेव्हा लालूचे कौतुक करायला नको. शिवाय कोणी खोटे सर्टिफिकेट दिले असेल व लालूचा दिवटा कारण नसतानाही नववीही पास करू शकला नसेल तर दोन्ही योग्य नाही असे का म्हणु नये? त्यात डावेउजवे का करावे?
21 Nov 2015 - 10:34 am | विजुभाऊ
५) रत्नागिरीचे नाव असे कसे प्रचलित झाले, रत्नगिरी का नाही?
गिरी याचा अर्थ डोंगर ..तेथे कोणताच डोंगर नाहिय्ये.
ते नाव रत्नांची नगरी या अर्थाने रत्नागिरी आहे.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे रत्नगिरी असे नाव करायचे झाल्यास पुण्याला "पुण्यवाडी" असेच म्हणावे लागेल
.........
अवांतर = हडपसर चे नाव "हाडे पसर" असे काय असू शकेल हा विचार करतोय.
धनकवडी चे नाव धर कवडी असे करावे लागेल
21 Nov 2015 - 3:12 pm | मी-सौरभ
अहो
मिपावर खरडफळयाची सोय आहे हे नम्रपने आपल्याला कळवू इच्छितो.
बाकी चालू द्या
21 Nov 2015 - 3:27 pm | संदीप डांगे
+१
21 Nov 2015 - 4:47 pm | अजया
:)
21 Nov 2015 - 5:05 pm | जेपी
मस्त लेख..
या लेखा बद्दल आपल्याकडुन तुमाला 2016 सालची 363 पानी डायरी सप्रेम भेट..
21 Nov 2015 - 5:30 pm | परिकथेतील राजकुमार
मिसळपाव डॉट कॉम वरती आलोय का राजेशकुलकर्णी डॉट कॉम वरती तेच कळेना एकदम.
असो...
ह्या सुंदर लेखनाबद्दल आमच्याकडून छोटीशी भेट :-
