मदत हवी आहे - Mediclaim निवडण्या संदर्भात

धुमकेतू's picture
धुमकेतू in काथ्याकूट
20 Nov 2015 - 9:40 pm
गाभा: 

मला एक मेडिक्लेम पोलिसी घ्यायची आहे . बरेच पर्याय असल्यामुळे नक्की कोणती कंपनी ची घ्यावी ते कळत नाही . कृपया जाणकार लोकांनी सल्ला द्यावा . कोणाची सर्विस चांगली आहे , क्याशलेस वगैरे पर्याय , तुमचा अनुभव …

खालील लोकांना कवर करणारा मेडिक्लेम हवा आहे
स्वतः (३६) , पत्नी (२९) ,मुलगा (६) , मुलगा (३) , आई (५४) , वडील (६१)

धन्यवाद !!!

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

20 Nov 2015 - 10:19 pm | तुषार काळभोर

तुमच्या नोकरीच्या ठिकाणी विमा असेल तर गरज नाही. नाहीतर एक फॅमिली विमा हवाच.प्रत्येकी एक लाख रुपयांचा मेडिक्लेम घेतलात तर आई वडील सोडून चौघांचा वार्षीक हप्ता आठ हजाराच्या आसपास आहे.पन्नास वयापुढच्यांसाठी हप्ता फार लावतात.सध्या वार्षिक पंधरा हजार रुपये टॅक्स वजावटीसाठी ग्राह्य आहेत.विमा हवा परंतू अचाट रकमेचा,घेऊ नये असे माझे मत आहे.हॅास्पिटलमध्ये सर्व बिले अगोदर भरून नंतर क्लेम केली तर सर्विस टॅक्स लागत नाही परंतू "कॅशलेस" पद्धतीत तो बारा चौदा टक्के लागतो असं ऐकून आहे.

भंकस बाबा's picture

21 Nov 2015 - 12:32 pm | भंकस बाबा

सर्विस टैक्स बद्दल माहीत नाही पण रिएम्ब्रेसमेंट मधे पूर्ण पैसे अपवादाने मिळतात. मुलांचा आणि तुमचा विमा वेगळा ठेवा. तुमच्या वयानुसार विम्याचा हफ्ता वाढतो. तुमचे वय ग्राह्य धरले जाणार असते.
मला Icici Lombard कंपनीचा विमा सुचवावसा वाटतो कारण माझा अनुभव चांगला आहे. शिवाय नंतर यात आपण रायडर घेऊन अनेक दुसऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकतो. जसे टर्म इन्शुरन्स, इत्यादि

"पण रिएम्ब्रेसमेंट मधे पूर्ण पैसे अपवादाने मिळतात"
आपण खरोखरच खर्च केला ते मागताना तांत्रिक कारणासाठी तरी गफलत होऊ नये याची काळजी घ्यावी लागते.मी पत्नीच्या आजारपणानंतर प्रिमिअम ओफिसमध्ये माहिती घेऊन सर्व पेपरस स्वत:च ( एजंटकडून नाही )त्यांच्या फ्रंचायजी /आउटसोर्सिंग ओफिसात नेऊन दिले.तिथे एक डॅाक्टरच असतो.त्याने लगेच मला पेपर्स पाहून सांगितले सर्व पैसे मिळतील फक्त वेळ लागेल कारण एका सेंट्रल ओफिसातून हे काम होते.हॅास्पिटलवाले काही अतिरेकी /आगावू /ज्यादा टेस्ट्स करवतात त्याचे पैसे नाही मिळत.

म्हया बिलंदर's picture

21 Nov 2015 - 3:53 pm | म्हया बिलंदर

"माणसागणिक ३ प्रकारचा विमा असावाच" हे फार पुर्वि आमच्या एका ट्रेनर ने सांगीतलं होतं.
१- जिवनविमा (टर्म)
२- आरोग्यविमा
३- अपघात विमा

आरोग्यविमा(Health insurance) व मेडिक्लेम मधला फारसा फरक मला समजत नाही(भरपुर वाचुन देखील नाही समजलं त्यामुळे नवे दुवे सुचवु नयेत हि कळकळीची विनंती).
गेल्या काही दिवसात थोडी शोधाशोध केली तर प्रत्येक संस्थेंने त्यांचा विमा कसा फायद्याचा ते सांगीतलं.
हे पहा, कोणीही पैसे वाटायला बसलेलं नाही काहीतरी कात्री लावण्याचा या सर्व विमा संस्थांचा प्रयत्न सतत चालु असतो ईतके समजले(मी सध्या या विषयाशी संलग्न संस्थेतच काम करीत आहे).
त्यातल्या त्यात मि महाराष्ट्र बँकेचा विमा सध्या तरी येथे सुचवेल.

अवांतरः- गरज पडल्यास सरकारी योजनांतुन मदत होउ शकते, माहीती हवी असल्यास कळवीणे.

तुषार काळभोर's picture

21 Nov 2015 - 4:51 pm | तुषार काळभोर

बहुतेक सगळ्या राष्ट्रीयकृत बँका असा विमा देतात.
पण त्यांच्या विषयी काही शंका आहेत. यामध्ये बँका विमा कंपनी म्हणून नाही, तर मध्यस्थ (थोडं फार एजंटसारखं) काम करतात. विमा कंपनी सध्या युनायटेड इंडिया इन्श्योरन्स कं आहे. पण त्यांच्याकडे (बँकेकडे) दाव्यांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ नाही. त्यामुळे पाठपुरावा करणं कठीण होईल. समजा उद्या विमा कंपनी व बँकेतला करार संपला वा बँकेने त्यांचा हा साईड बिजनेस बंद केला, तर पुढे काय?
विमा कंपनी कडून विमा घेतल्यावर तो सलग चालू ठेवण्याचे काही फायदे असतात. ( उदा.: विमा काढताना असलेला वार्षिक हप्ता वाढत नाही.) जर एका विमा कंपनीकडून २५ व्या वर्षी विमा घेतला तर ३५व्या वर्षी तेवढाच हप्ता भरावा लागतो. पण ३५ व्या वर्षी जर बँकेने विमाव्यवसाय/योजना बंद केल्याने जर विमा कंपनी कडून विमा घ्यावा लागला, तर हप्ता ३५ वयानुसार पडेल. (शिवाय ४ वर्षांनी प्री-एग्जिस्टींग डीसिजवर उपचाराची सुविधा मिळते, ती जर बँकेने टाय-अप असलेली विमा कंपनी बदलली तर तो फायदा मिळेल का?)

म्हया बिलंदर's picture

21 Nov 2015 - 5:20 pm | म्हया बिलंदर

पै. साहेब, धुमकेतू साहेबांची गरज

खालील लोकांना कवर करणारा मेडिक्लेम हवा आहे
स्वतः (३६) , पत्नी (२९) ,मुलगा (६) , मुलगा (३) , आई (५४) , वडील (६१)

अशी होती. (माझ्या मते)प्रत्येकासाठी वेगळा विमा नको होता त्यांना. तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे की हा या बँकेचा विमा नाही, पण सध्या तरी तो त्यांचा म्हणुनंच बाजारात आहे. पाठपुरावा करणं हे सगळीकडेच कठीण आणी सोयीचं होतं जर का आपल्याला माहीत असेल की तो कसा आणी कोठे करावा. "*" असतोच सर्व कं. च्या विमा अटींमधे, त्यामूळे विम्याचा हफ्ता केंव्हा वाढेल, किती वाढेल, ई., हे सहसा अंधारातंच असतं.
शिवाय मी महा. बँकेचा विमा फक्त सुचवलाय, निर्णय तेच घेतील.
यामधे ३ वर्षांनंतर प्री-एग्जिस्टींग डीसिजवर उपचाराची सुविधा मिळतेय, Bajaj Allianz चा घेतलां तर एका वर्षानंतर प्री-एग्जिस्टींग कव्हर आहे, पण प्रत्येकासाठी घ्यावा लागेल मग तो धुमकेतू साहेबांच्या सध्याच्या गरजेनुसार नाही वाटला मला म्हणुन नाही सुचवला.