मिपा दिवाळी अंक २०१५ प्रकाशित झाला...

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in काथ्याकूट
10 Nov 2015 - 12:35 am
गाभा: 

मिपाकरहो,

आपण सर्व ज्याची मोठ्या उत्सुकतेने वाट पहात होतो तो...
"मिपा दिवाळी अंक २०१५"

प्रसिद्ध झाला आहे... तो वरच्या दुव्यावर आणि उजव्या बाजूच्या कॉलममध्ये "मिसळपाववर स्वागत"च्या खाली असलेल्या दुव्याने उघडू शकाल.

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा !

.

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

10 Nov 2015 - 12:40 am | प्रभाकर पेठकर

दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ कुठे आहे? नुसत्या लिंक ऐवजी अनाहिता रुची विशेषांका प्रमाणेच एखादे आकर्षक मुखपृष्ठ असते तर अधिक आनंद झाला असता.

आता वाचतो दिवाळी अंक.

अभ्या..ने काढलेल्या चित्रातले फटाके फुटले सगळे आणि आला मिसळपाव दिवाळी अंक २०१५
धडाडधुडुम सूँसूँसूँसूँसूँ!!!!!

खटपट्या's picture

10 Nov 2015 - 11:10 am | खटपट्या

मलातर दीसतेय मुखप्रुष्ठ. वासुदेव आणि एक तामाशातली बाईल नाचतेय..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Nov 2015 - 10:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुखपृष्ठ छान आहे. मोठ्या आकारातली प्रतिमा दिसण्याचीही सोय करून द्या.

लेखन सावकाश वाचेनच.

स्वाती दिनेश's picture

10 Nov 2015 - 12:41 am | स्वाती दिनेश

मघाशीच पाहिले, अंक सुरेख दिसतो आहे. आत्ता चाळते आहे, एकेक लेख सावकाशीने वाचते..
स्वाती

कवितानागेश's picture

10 Nov 2015 - 12:41 am | कवितानागेश

मस्त असणारच! :)

चतुरंग's picture

10 Nov 2015 - 12:54 am | चतुरंग

अंक बघतोच आणि सावकाशीने एकेक लेख वाचेन.

पेठकरकाकांच्या सूचनेशी सहमत. उजव्या स्तंभात 'रुचि विशेषांका' प्रमाणेच दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ दिले तर चटकन लक्ष जाईल! :)

एक एकटा एकटाच's picture

10 Nov 2015 - 1:31 am | एक एकटा एकटाच

लयभारी

लाल टोपी's picture

10 Nov 2015 - 1:51 am | लाल टोपी

अंक वर वर पाहिला. सर्वांग सुंदर झाला आहे. यासाठी मेहनत घेणा-या सर्वांचे मनापासून अभिनंदन.

सूड's picture

10 Nov 2015 - 1:56 am | सूड

भारी!!

विकास's picture

10 Nov 2015 - 1:57 am | विकास

मिपा दिवाळी अंक संपादकमंडळींचे तसेच तमाम लेखक-लेखिका-कवी-कवयत्रिंचे अभिनंदन! अंक मस्त दिसत आहे. लवकरच वाचून काढेन!

एक नंबर! दिवाळी अंक संपादक मंडळाचे आभार!

सुरेख !! या अंकासाठी योगदान दिलेल्यांचे आभार आणि अभिनंदन ...

नाना स्कॉच's picture

10 Nov 2015 - 6:41 am | नाना स्कॉच

आभार संपादक मंडळ! ;)

मितान's picture

10 Nov 2015 - 7:20 am | मितान

छानंच झालाय दिवाळी अंक !
यासाठी कष्ट घेणारांचे सर्वांचे अभिनंदन !!!
बाकी अंक वाचून झाल्यावर :)

या सुरेख अंकाची वाचक करुन माझे वय लहान केल्याबद्दल शतशः आभारी आहे ;)

मुक्त विहारि's picture

10 Nov 2015 - 8:26 am | मुक्त विहारि

दिवाळीचे स्पेशल लेख शोधून काढायला त्रास होतो.

आमच्या सारख्या लहान मुलांना, असा "हाईड अँड सीक" खेळ निदान दिवाळीत तरी नको.

(हट्टी बालक) मुवि

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Nov 2015 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्लिक करा :)

मुक्त विहारि's picture

10 Nov 2015 - 10:55 pm | मुक्त विहारि

आता अंक दिसायला लागला...
आणि

दिवाळीला खरी-खरी सुरुवात झाली....

विशाखा पाटील's picture

10 Nov 2015 - 8:54 am | विशाखा पाटील

अंक छान झालेला दिसतोय. सर्वांचे आभार!

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 9:15 am | टवाळ कार्टा

भारी :)

सुमीत भातखंडे's picture

10 Nov 2015 - 9:45 am | सुमीत भातखंडे

आता वाचतो सावकाशीने.
सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

वरील सर्व प्रतिसादाला +१११११११११

उगा काहितरीच's picture

10 Nov 2015 - 10:44 am | उगा काहितरीच

धन्यवाद आणि शुभेच्छा !

ऋषिकेश's picture

10 Nov 2015 - 11:38 am | ऋषिकेश

भरगच्च अंक आहे! छान! मुपृ आवडले.
(हमखास चांगली सुरूवात व्हावी म्हणून) तुर्तास बॅट्याने घेतलेली मुलाखत आधी वाचली. बाकी सावकाशीने वाचुन त्या त्या लेखनाखाली प्रतिक्रीया देईनच.

अभिनंदन आणि आभार!

धर्मराजमुटके's picture

10 Nov 2015 - 12:33 pm | धर्मराजमुटके

अंक चांगलाच असणार पण पीडीएफ आवृत्ती येईपर्यंत वाचणार नाही. गेल्या वर्षापासून ही तुकड्या तुकड्यात अंक प्रसिद्ध करण्याची सुरुवात झालीय ती मला आवडत नाही. नेहमीचेच धागे वाचत असल्याचा फील येतो.
दिवाळी अंक एकसंध वाचता आला पाहिजे तरच मज्जा !

चांदणे संदीप's picture

10 Nov 2015 - 1:03 pm | चांदणे संदीप

नेहमीचेच धागे वाचत असल्याचा फील येतो.

:(

प्रचेतस's picture

10 Nov 2015 - 2:32 pm | प्रचेतस

मिपाचा दिवाळी अंक तुकड्या तुकड्यात कधीच प्रकाशित होत नाही. तो नेहमीच एकसंध असतो.
उजव्या समासातील फोटोवर टिचकी मारा किंवा ही युआरएल बघा.
http://www.misalpav.com/node/33519

सागरकदम's picture

10 Nov 2015 - 3:01 pm | सागरकदम

प्रत्यक दिवाळी लेखाखाली अनुक्रमणिका असावी
दर वेळी स्वगृह उघडा ,दिवाळी अंक उघडा लेख शोधा कारावे लागते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Nov 2015 - 3:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तांत्रिक विभागाकडे सुचना सरकवली.

-दिलीप बिरुटे

सागरकदम's picture

10 Nov 2015 - 10:01 pm | सागरकदम

dhanywad

सागरकदम's picture

12 Nov 2015 - 6:43 pm | सागरकदम

एस
Thu, 12/11/2015 - 17:31
दिवाळी अंकाच्या अनुक्रमणिकेच्या धाग्याला कृपया वाचनखूण साठवण्याची सोय करून द्यावी. तसेच दिवाळी अंकातल्या धाग्यांनाही.

तरी हे तुकडेच ! किंवा इंटरनेटची मर्यादा असलेला अंक झाला.
मी गेल्या काही वर्षांच्या दिवाळी अंकांच्या पीडीएफ जपून ठेवल्या आहेत. त्या कधीही वाचता येतात. इंटरनेट नसले तरी. शिवाय जेव्हा गावी जातो लॅपटॉपमधे कॉपी करुन गावाकडील भावंडांना (जिथे इंटरनेट नाही) वाचायला देऊ शकलो आहे. इंटरनेट नसतांना त्यांना मिपा, रेषेवरची अक्षरे इ. इ. जालीय अंक माहित आहेत.
जेव्हा त्यांना अशा प्रकारचे साहित्य उपलब्ध होते तेव्हा त्यांना होणारा आनंद इथे शब्दात सांगता येत नाही.
असो.
संपादक मंडळाची इच्छा ! फुकटात अपेक्षा तरी किती करायच्या ?

प्रचेतस's picture

10 Nov 2015 - 4:22 pm | प्रचेतस

पीडीएफ पण नक्की होईल.

बोका-ए-आझम's picture

13 Nov 2015 - 10:27 am | बोका-ए-आझम

मी आता घरातल्या जालनिष्णात नसणाऱ्या पण वाचनाची आवड असणाऱ्या सगळ्यांना मिपाचा अंक देईन. धन्यवाद धर्मराज!

भारीय राव, लेखकु आणि संपादकु मंडळाचे वाचकु मंडळातर्फे जाहीर आभार

बालके बाबुदादा

अंकाची अनुक्रमणिका पाहिली. अंक काही प्रमाणात वाचला. सर्वच बाबतीत दर्जा अगदी नामवंत दिवाळी अंकांच्या (निदान) तोडीस तोड दिसतो आहे. या मिपाघरच्या कार्यात सहाय्यकारी ठरलेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन व या दिवाळी मेजवानीसाठी आभार.

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 1:48 pm | टवाळ कार्टा

प्रचंड सहमत

संजय पाटिल's picture

10 Nov 2015 - 1:30 pm | संजय पाटिल

पण जरा मागच्या अंकांचे दुवे दिलेत तर चार चांद लागतील.

महासंग्राम's picture

10 Nov 2015 - 3:37 pm | महासंग्राम

+१११११ अगदी हेच म्हणतो मी…।

महासंग्राम's picture

10 Nov 2015 - 3:39 pm | महासंग्राम

प्ले इट अगेन : वेल्लाभट
ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे होस्टेज रेस्क्यू : मोदक
सुपरस्पाय : बोका ए आझम
सक्सेसफुल फेल्युअर: अपोलो-१३चा थरार : लाल टोपी
पॉन सॅक्रिफाईस : चतुरंग

हे अत्यंत वाचनीय म्हणजे, अगदीच बेस्ट झाले आहेत …. इतर वाचून फराळ करू.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

संदीप डांगे's picture

10 Nov 2015 - 5:03 pm | संदीप डांगे

दिवाळी अंक मस्तच... सावकाश वाचतो. श्रेयनामावली नाही दिसली कुठे..?

मित्रहो's picture

10 Nov 2015 - 5:22 pm | मित्रहो

एकदम मस्त. अंकासाठी मेहनत घेनाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार. सुरेख दिवाळी अंक.

प्रभाकर पेठकर's picture

10 Nov 2015 - 8:29 pm | प्रभाकर पेठकर

दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ आणि अंकातील आतील सजावट फार भारी आहे. सध्या दिवाळीच्या व्यावसायिक धावपळीत असल्यामुळे वाचता आलेला नाही पण कार्यमुक्त होताच पहिले काम दिवाळी अंक वाचन हेच असेल.

शीतल जोशी's picture

10 Nov 2015 - 9:52 pm | शीतल जोशी

अंक उत्तम झाला आहे

amol gawali's picture

10 Nov 2015 - 9:59 pm | amol gawali

अभिनंदन

amol gawali's picture

10 Nov 2015 - 10:03 pm | amol gawali

maharashtra times मधे
आपल्या दिवाळी अंकाचा उल्लेख आहे

शुभ दिपावली

दिवाळी अंक हळूहळू वाचतो आहे. एक नंबर आहे, वैविध्य आणि दर्जा दोन्हींत मस्त एक्दम!

ह्या लेखाला वाचनखूण साठवली आहे. म्हणजे इथून दिवाळी अंकाच्या अनुक्रमणिकेत आणि तिथून अंकातील लेखांपर्यंत पोहोचता येईल.

पाषाणभेद's picture

13 Nov 2015 - 9:44 am | पाषाणभेद

सर्व मान्यवर लेखक मंडळींचे व संपादक मंडळाचे अभिनंदन. एक मानाचा तूरा आहे हा अंक.

बोका-ए-आझम's picture

13 Nov 2015 - 10:43 am | बोका-ए-आझम

हा कुठल्याही आॅफलाईन दिवाळी अंकापेक्षाही सुंदर झाला आहे. मुलाखती, संपादकीय, दृकश्राव्य राशिभविष्य आणि सर्वात भारी म्हणजे कथा. सर्व कथा आवडल्या. डाॅ.ख-यांची सत्यकथा ' मुक्ता ', वेल्लाभट यांची ' प्ले इट अगेन ' आणि आतिवास यांची ' उशिरा ' या फार सुंदर आहेत.
धन्यवाद संपादक्स आणि लेखक्स!

श्रीरंग_जोशी's picture

13 Nov 2015 - 11:37 pm | श्रीरंग_जोशी

मिपाच्या या वर्षीच्या दिवाळी अंकांचे स्वागत आहे.

पूर्वीच्या अंकांचे दुवे:
*(२०११ ला स्वतंत्र अंक नव्हता. दिवाळीसाठी काही खास धागे काढले होते.)

पैसा's picture

13 Nov 2015 - 11:43 pm | पैसा

२०१२ ची पूर्ण पीडीएफ नको असेल तर
http://www.misalpav.com/node/23127 ते
http://www.misalpav.com/node/23170

हे दिवाळी अंक धाग्यांचे नोड नंबर्स आहेत.

याशिवाय
http://www.misalpav.com/taxonomy/term/239
http://www.misalpav.com/ruchi

हे अनाहिता महिला दिन विशेषांक आणि रुची अंकाचे दुवे.

श्रीरंग_जोशी's picture

13 Nov 2015 - 11:47 pm | श्रीरंग_जोशी

नोड क्रमांक दिल्याबद्दल धन्यवाद.

तुम्हां दोघांनाही पुन्हा एकदा धन्यवाद!