९ नव्हेंबर भारतात 'कायदा' विषयक सेवा आणि सजगता दिवस म्हणून साजरा केला जातो त्या निमीत्त प्रश्नोत्तरांसाठी म्हणून धागा काढत आहे. (प्रश्नांची भलतीच सरमिसळ आहे त्या बद्दल सुरवातीसच माफी मागून) चर्चेस सुरवात म्हणून मी काही प्रश्न टाकतो आहे पण या धाग्यात तुम्ही सुद्धा इतर प्रश्न (उत्तर माहित असलेले अथवा नसलेले) विचारू शकता.
१) मागील वर्षाभरात मराठी संस्थळांवर कायदे विषयक लेखन आणि चर्चांचे दुवे आणि त्यातील कोणते लेखन अथवा चर्चा तुम्हाला उल्लेखनीय वाटली आणि का ?
२) मराठी संस्थळांवर मराठी कायदे तज्ञांचा सहभाग पुरेसा आहे पुरेसा नसेल तर सहभाग वाढवण्यासाठी काही मार्ग/उपाय शोधता येतील का ?
३) 'कायदा' विषयक सजगता या विषयावर 'मिले सूर मेरा तुम्हारा' सारखे लोकप्रीय होऊ शकेल असे गीत लेखन आणि सादरीकरणाचे आवाहन भारताच्या नवनियुक्त सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांनी केले आहे. या सरन्यायाधीश महोदयांचे नाव काय आहे ?
४) मागील वर्षाभरात इतर माध्यमांमध्ये कोणत्या कायदे विषयक केसेस, लेखन विशेषत्वाने चर्चेत आले दुवे आणि त्यातील कोणते लेखन अथवा चर्चा तुम्हाला उल्लेखनीय वाटली आणि का ?
५) घराबाहेर ठेवलेली कचर्याची पेटी इतरांनी चाचपली तर तुम्हाला चालते का ? हा विषय कायद्याच्या भूमिकेतून बघायचा आहे. (पाचव्या मुद्यातील चर्चा मी इतर संस्थळावर अलिकडे घेतली होती तो विषय खाली पुर्नप्रकाशीत करत आहे)
कायदा आणि व्यक्ती, कुटूंब / समाज यांची कायदे विषयक जाणीव या विषयावरील लिगल थेअरी अभ्यासताना एका आमेरीकन न्यायाधिशाने मांडलेला एक रोचक मुद्दा वाचनात आला.
समजा तुम्ही तुमची कचरा भरलेली कचरा पेटी कचरा घेऊन जाणार्या सर्वीसेससाठी घराबाहेर (बेसिकली तुमच्या मालकीच्या प्रॉपर्टीबाहेर ठेवली) कचरा घेऊन जाणार्यांना अद्याप अवधी आहे आणि मधल्या वेळात १) रस्त्याने येणार्या जाणार्याने ती चाचपली तर तुम्हाला चालते का ? २) पोलीसांनी किंवा शासकीय अधिकार्यांनी / गुप्तहेरांनी अधिकृत वॉरंट ने घेता अशी बाहेर ठेवलेली कचरापेटी चाचपणे तुम्हाला चालते का ?
तुमच्या त्या घराबाहेर ठेवलेल्या कचरापेटीची गोपनीयता बाळगली जावी असे तुम्हाला वाटते का ? या संबंधाने तुमच्या कॉर्पोरेशनचा, राज्याचा आणि देशाचा सध्याचा कायदा काय असेल असा तुमचा अंदाजा आहे ? कचरा घेऊन जाणार्याव्यक्तींशिवाय इतर कुणी तुमची कचरापेटी हेतुपुरस्सर उचकत असेल तर तुमची प्रतिक्रीया काय असेल ? अशा प्रसंगी जर तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेशनचे राज्याचे देशाचे कायदे विषयक बारकावे माहित नसतील किंवा एवढ्या बारीक विषयावर कायदा विशीष्ट नियम तयार नसेल हेतुपुरस्सर असा कचरा उचकणारी व्यक्ती आणि तुम्हाला कायद्या वर बोट ठेवत बोलायचे आहे, जवळ वकील नाही हातात कायद्याचे नेमके पुस्तक नाही, तुम्ही तुमच्या भूमिका कायदेशिर दृष्ट्या योग्य आहे हे परस्परांसमोर कसे मांडाल ?
प्रश्न ५ मधील चर्चा वेगवेगळे दृष्टीकोण समजून यावेत म्हणून सहज गंमत म्हणून चर्चा आहे
***---***---***
व्यावसायिक सल्ला नव्हे
जर तुम्हाला वैद्यकीय, कायदा, आर्थिक किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर असा सल्ला आपण कृपया, परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. मी कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक सल्ला देत नाही.
कायदे अथवा विधीतत्व मिमांसा विषयक धागा लेख, अथवा प्रतिसाद लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. राज्यघटनेतील आणि विवीध कायद्यातील तरतुदी कायदे मंडळांच्या, न्यायपालिकांच्या निर्णयांनी सातत्याने उत्क्रांत (इव्हॉल्व) होत जातात आणि त्यांचा आवाकाही बराच मोठा आणि माझ्या सारख्या हौशी लिहिणाऱ्या सदस्यांना तेवढी माहिती असेल किंवा तशी लिहिण्याची आम्हाला सवड होईलच असे नाही, त्या शिवाय येथील लेखनात विवीध कारणास्तवर त्रुटीही राहून जाऊ शकतात. म्हणून माझ्या धागालेख धागालेखास आलेले प्रतिसाद अथवा माझे इतर धागा लेखांना प्रतिसादातील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी मी घेत नाही आणि माझ्या धाग्यांवरी प्रतिसाद लेखकांवर मिपा धोरणे आणि अनिवार्य कायदेचिषयक ज्याच्या त्याच्या जबाबदार्यांपलिकडे उर्वरीत तशी कोणतीही जबाबदारी ठेवत नाही.
*उर्वरीत उत्तरदायकत्वास नकार दुव्याकडे
*चर्चेत विविध प्रश्नोत्तरांमध्ये सहभागासाठी धन्यवाद.
प्रतिक्रिया
9 Nov 2015 - 2:41 pm | नितीनचंद्र
लोकहो,
हा धागा वाचुन मला लेबर लॉ विषयक कायदेशीर सल्ला द्यावा असे वाटते.
मिपाकर आपण संपर्क करु शकता.
9 Nov 2015 - 4:46 pm | माहितगार
विचार स्तुत्य आहे पण मराठी आंजावर ऐश्या शब्दात उत्तरआधुनिक पिढीतील मंडळी एच आर मध्ये सर्वीसला नसतील तर लेबर ला आपल्यासाठी नाही असे समजतात. प्रॅक्टीकली कंपनी बदलताना आधीच्या कंपनीचा आणि आधीच्या बॉसेसचा रेफरन्स महत्वाचा ठरतो त्यामुळे मंडळी हापीसात कायद्यावर बोट ठेवण्यास हल्लीची पांढरपेशीमंडळी सहसा बिचकतात असं काही होत का ?
10 Nov 2015 - 11:17 pm | नितीनचंद्र
एच आर मधे काम केल्याचा अनुभवावरुन सांगतो " प्रॅक्टीकली कंपनी बदलताना आधीच्या कंपनीचा आणि आधीच्या बॉसेसचा रेफरन्स महत्वाचा ठरतो" दर वेळेला महत्वाचा असतोच असे नाही.
तुमचे क्षेत्र कोणते. त्यात सध्या मनुष्यबळाची कमतरता असेल तर असल्या प्रश्नांना काहीच किंमत नसते.
10 Nov 2015 - 11:21 pm | सागरकदम
ते उगाच घाबरवतात
मी ९ वर्षात १२ कंपनी बदलल्यात