तो अनुभव...

नितीनचंद्र's picture
नितीनचंद्र in जनातलं, मनातलं
6 Nov 2015 - 2:04 pm

मी अनेक वर्ष शिफ्ट ड्युटी केली. पहिली शिफ्ट सकाळी ७ ते ३.३० तर दुसरी ३.३० ते रात्री १२.०० पर्यंत. तिसरी शिफ्ट कधी करावी लागली नाही.

लग्न व्हायच्या आधीच्या काळात रात्री १२.०० नंतर गप्पा मारायला, चहा प्यायला इ. कारणासाठी बुधवारच्या सेकंड शिफ्ट नंतर आम्ही बॅचलर्स जमा व्हायचो. मग कुणाच्या रुम मधे पत्ते रंगायचे तर कधी फक्क्ड चहाच्या सोबतीने गप्पा रंगायच्या.

सायकलीवर कामाला जाणारे सगळे खंडोबाचा माळ अकुरडी येथे बुधवारी रात्री १२ च्या पुढे जमा व्हायचे. तिथुन कधी चिंचवड गावात तर कधी चिंचवड स्टेशनवर असलेले टुरिस्ट हॉटेल जे रात्री पण सुरु असायचे तर कधी अन्य ठिकाणी आधारण दोन महिन्यातुन आम्ही जमायचो.

एकदा अश्याच गप्पा होऊन मी एकटाच घरी निघालो. थंडी जबरदस्त होती. रात्रीचे २ तरी वाजले होते. चिंचवड गावातुन एस के एफ कंपनीच्या मागे असलेल्या प्रेमलोक पार्क मधे मी रहायचो.

या रस्त्यावर एक झोपडपट्टी आहे. इथुन जाताना अचानक १०-१२ भटकी कुत्री अंगावर आली. आरडा ओरडा केला पण सारे जग झोपले होते. मग सायकल उचलुन स्वतः भोवती ढाली सारखी फिरवु लागलो. भलता दम लागला होता. अजुन कुणा कुत्र्याने माझा चावा घेतलेला नव्हता. ह्या प्रकारात एक -दीड मिनीट गेले. मी आता देवाचा धावा करत होतो.

इतक्यात सायलेन्सर फाटलेली एक मोटारसायकल समोरुन आली. माझ्यामागे लागलेली ती भटकी कुत्री त्याच्या मागे धावली. संधीचा फायदा घेऊन मी पुन्हा सायकलवर टांग मारली आणि मागे न पहता सायकल घरापर्यंत पळवली. एखादी मॅरेथॉन धावल्याचा दम लागला होता.

सायकल लॉक करायचे कष्ट न घेता मी सायकल फे़उन लॅच की ने घर उघडुन आडवा झालो. कपडे, बुट रात्रभर तसेच ठेऊन मी श्रमाने तसाच झोपलो.

भयानक प्रसंग आठवताना हा प्रसंग जसा च्या तसा आजही ३० वर्षांनी डोळ्यासमोर उभा रहातो.

रेखाटनविरंगुळा

प्रतिक्रिया

भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत मला स्वतः पर्यावरण आणि प्राणिप्रेमी असूनही यत्किंचितही सहानुभूती वाटत नाही. त्यांच्या वाढत्या संख्येला आळा घातलाच पाहिजे मग तो उपाय कितीही कठोर का असेना.

अजया's picture

6 Nov 2015 - 2:21 pm | अजया

हेच विधान जालीय भटक्या कुत्र्यांना देखील लागू पडते.

बॅटमॅन's picture

6 Nov 2015 - 2:25 pm | बॅटमॅन

कंपूबाज, डुआयडी आणि त्यांची निर्लज्जपणे पाठराखण करणारे यांना तर फारच लागू पडते.

अजया's picture

6 Nov 2015 - 2:36 pm | अजया

अगदी सहमत!!

प्यारे१'s picture

6 Nov 2015 - 2:51 pm | प्यारे१

दुसरी अपेक्षाच नाही!

प्यारी २'s picture

6 Nov 2015 - 5:55 pm | प्यारी २

मग पहिलि कुठली?
इथे स्वतः कपुबाज लोक उलट ओरड करतना दिसतात. हो ना प्यारेकाका?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Nov 2015 - 8:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे वहिनी पण आल्या का काय मिपावर प्यारे भाउ =))

बोका-ए-आझम's picture

7 Nov 2015 - 8:48 am | बोका-ए-आझम

हा काय प्रकार आहे प्यारेलाल?

सतिश गावडे's picture

7 Nov 2015 - 9:06 am | सतिश गावडे

त्यांनी इथे सुंदर उत्तर दिले होते. त्या उत्तराला मोक्ष मिळाला. ;)

टवाळ कार्टा's picture

7 Nov 2015 - 10:22 am | टवाळ कार्टा

मोक्ष मिळ्ळण्णारच्च होता....मिपावर अफझलखानाचा उदो उदो चालतो पण काही विशिष्टप्रजातींबद्दल लिहिले की तत्परतेने कैची चालते

बोका ए आझम, उद्या एखादी मलिका ए बिल्ली मिपावर आली तर तुम्हाला हाच प्रश्न विचारेन बरंका. ;)

बोका-ए-आझम's picture

7 Nov 2015 - 12:41 pm | बोका-ए-आझम

आम्ही अजिबात मिशा फेंदारणार नाही.रच्याकने आमच्या मलिका आमच्याच आयडीने लाॅगिन करतात मिपावर! प्रतिसाद मात्र देत नाहीत सुदैवाने! ;)

रातराणी's picture

7 Nov 2015 - 1:07 pm | रातराणी

खी खी :)
मलिका अभ्यास करून उतरणार असतील मैदानात. तुमचा कंपू...आपलं ते हे टेरिटरी मार्क करून ठेवा आताच! :)

टवाळ कार्टा's picture

7 Nov 2015 - 2:08 pm | टवाळ कार्टा

तुम्च्येपण तेच्च चाल्लेय कै ;)

रातराणी's picture

7 Nov 2015 - 2:44 pm | रातराणी

या प्रश्नाचं उत्तर म्हणून घारे डोळे तुमच्यावर रोखलेली, पहात असूनही चेहऱ्यावर तुम्हाला न पाहिल्यासारखे भाव असलेली, मग हलकेच एक पाय उचलून कान खाज्व्नारी मांजरीची कल्पना करावी.
खूदसे बाँता: "सगळचं कसं उलगडून सांगावं लागतं?"

टवाळ कार्टा's picture

7 Nov 2015 - 3:44 pm | टवाळ कार्टा

अश्या टैपच्या मांजरींशी माझे चांग्ले मेतकूट जम्ते...फार सोप्या अपेक्षा अस्तात त्यांच्या...आधा कपां दूध के लिये कुच बी करतें ;)

मुक्त विहारि's picture

6 Nov 2015 - 2:38 pm | मुक्त विहारि

प्राणी सदृष्य पक्षी किंवा पक्षी सदूष्य प्राणी, उर्फ वाल्दूलाचार्य उर्फ बरेच काही...ह्यांच्याशी सहमत....

भाऊंचे भाऊ's picture

6 Nov 2015 - 3:11 pm | भाऊंचे भाऊ

सगळ्यांसाठीच स्वतंत्र पि़ंजरे अथवा बागा तर नाहीत ना बनवता येणार...

हा लेख प्रतिसादासाठी 30 वर्षानेही लक्षात राहिल.

(होराभुषण)जेपी

प्यारे१'s picture

6 Nov 2015 - 2:21 pm | प्यारे१

मुक्तपीठीय लेख.
(कुणाच्या प्रेरणेवरुन लिहिताय?)

बबन ताम्बे's picture

6 Nov 2015 - 3:17 pm | बबन ताम्बे

"घाटात घाम फुटला" या आद्य लेखाचे लेखक पण नितिनचंद्र नामक लेखकच आहेत.
ते हे नसावेत !!

अत्रुप्त आत्मा's picture

6 Nov 2015 - 8:06 pm | अत्रुप्त आत्मा

@"घाटात घाम फुटला" >> http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-028.gif

भाऊंचे भाऊ's picture

6 Nov 2015 - 3:45 pm | भाऊंचे भाऊ

चला एकाने तरी संपुर्ण लिखाण वाचुन प्रतिसाद लिहला आहे म्हणायचा.

उगा काहितरीच's picture

6 Nov 2015 - 2:26 pm | उगा काहितरीच

आ विडंबनकार घे प्रेरणा ! (आ बैल मुझे मार)

रातराणी's picture

7 Nov 2015 - 1:28 am | रातराणी

कच्चा माल उत्तम आहे. ;)

कुत्र्यांचा असा अनुभव मलाही अलेला आहे. कॉलेजात असतानाची गोष्ट. रात्री भूक लागली म्हणून नाईट कँटीनमध्ये जायला निघालो. कँटीनच्या वाटेवर नेहमीप्रमाणे फुल अंधार. तिथेच एक काळं कुत्रं बसलं होतं ते कै दिसलं नै. मग ते भुंकायला लागलं माझ्यावर, त्याल हाड केलं तर ते तेवढ्यापुरतं मागं झालं पण मागून लगेच रीइन्फोर्समेंट आलीच की त्याची. क्षणार्धात ५-६ कुत्र्यांनी मला वेढाच घातला आणि टिपेच्या आवाजात सर्वजण माझ्यावर भुंकू लागली. मला काय करावे सुधरेचना, तिथे एक खांब होता त्यावर चढलो तरी कै होईना. सुदैवाने तोपर्यंत सिक्युरिटीवाले लोक्स तिथे आले आणि कुत्र्यांना हाकलले म्हणून बरे, नैतर कै खरं नव्हतं माझं तेव्हा.

हेच लहानपणी मात्र भीती वाटली नव्हती. तेव्हा ६वी-७वीत असेन. क्रिकेट खेळून घरी जात असताना वाटेत अचानक खूप कुत्री जमलेली दिसली. जराही न घाबरता एक दगड त्यांच्यामध्ये भिरकावला. कुत्र्यांची पांगापांग झाली आणि काही झालेच नाही अशा थाटात मी निवांत घरी आलो.

जातवेद's picture

6 Nov 2015 - 2:43 pm | जातवेद

हो. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात किमान एकदातरी कुत्र्यांचा अनुभव येतोच.

जातवेद's picture

6 Nov 2015 - 2:40 pm | जातवेद

'तो अनुभव...' असे शिर्षक वाचून वाटले, आला आणखिन एक चावट्ट धागा!

मिपावर एक असा विभाग पाहिजे अशी मागणी कधीपासून होतेय, पण लक्ष्यात कोण घेतो....

वेगळा विभाग कशाला जव्हेरभाऊ आहेत ना आपले!

प्यारे१'s picture

6 Nov 2015 - 3:07 pm | प्यारे१

मर्यादा येतात.
उगाच फुलाला फूल टकरवायचं कशाला? फुलांनाही भावना असतात. तुम्ही म्हणता म्हणून कुठल्याही फुलाला हे करुन देईल काय?

म्हणजे आंब्याची अनसेन्सॉर्ड कविता आहे म्हणायची.
रच्याकने, फुलांवरून आठवले; नविन विभागाचे नाव 'तीन फुल्या' असेलसे वाटते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Nov 2015 - 8:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सिक्सर!!

सागरकदम's picture

11 Nov 2015 - 1:11 am | सागरकदम

का?
ह्या फुलाला काटा नाही ?

शब्दबम्बाळ's picture

7 Nov 2015 - 10:24 pm | शब्दबम्बाळ

अगदी हेच्च वाटले होते! :D

प्यारी २'s picture

6 Nov 2015 - 5:56 pm | प्यारी २

अनुभव आवड्ला.

दिवाकर कुलकर्णी's picture

6 Nov 2015 - 8:42 pm | दिवाकर कुलकर्णी

अनुभव लई झकास,
औरोकि गलीमें शेरभी कुत्ता

योगी९००'s picture

6 Nov 2015 - 10:34 pm | योगी९००

दगड मारणे हा बेस्ट उपाय. जवळपास दगड नसतील तर कमरेचा बेल्ट काढून हातात घ्यावा, कुत्रा लांबूनच भुंकतो.

बेल्टही नसेल तर हरीनाम घ्यावे...!!

योगी९००'s picture

6 Nov 2015 - 10:34 pm | योगी९००

दगड मारणे हा बेस्ट उपाय. जवळपास दगड नसतील तर कमरेचा बेल्ट काढून हातात घ्यावा, कुत्रा लांबूनच भुंकतो.

बेल्टही नसेल तर हरीनाम घ्यावे...!!

अस्वस्थामा's picture

6 Nov 2015 - 11:04 pm | अस्वस्थामा

हरीनामास कुत्रे घाबरतात ही नवीनच माहिती..
इच्छुकांनी प्रयोग करुन पहावा आणि (धड राहिलात तर) आपला अनुभव सांगायला विसरु नये. बादवे, जर चेष्टा करत असाल तर आमच्या तुडतुडी तै तुम्हाला कध्धी कध्धी माफ करणार नाहीत हे ही लक्षात ठेवा हो.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Nov 2015 - 11:15 pm | बिपिन कार्यकर्ते

योगी००९, आसाराम बापू आणि अनिरूद्ध बापू हे तुमचेच डु आयडी काय हो? ;)

योगी९००'s picture

7 Nov 2015 - 9:51 pm | योगी९००

योगी००९, आसाराम बापू आणि अनिरूद्ध बापू हे तुमचेच डु आयडी काय हो? ;)
हा हा हा!! आमचे तेवढे भाग्य नाही हो आसाराम बापू लेवल पर्यंत पोहोचायचं..

बोका-ए-आझम's picture

7 Nov 2015 - 8:51 am | बोका-ए-आझम

हे आद्य डिस्को भक्तीगीत चालतं का?

नाखु's picture

7 Nov 2015 - 9:34 am | नाखु

कदाचीत असं असावं

हरी ओम हरी
येऊ नको घरी !!
तुला देतो खारी
तुझी गल्ली बरी !!
वाटे भिती जरी
जातो आता घरी !!

अखिल मिपा भटके पाळीव जालीय लोचट श्वान पाठलाग निर्मुलन निर्दालन आणि लसीकरण मोहिमेतील पत्रकाचा एक संक्षीप्त भाग

सतिश गावडे's picture

7 Nov 2015 - 10:19 am | सतिश गावडे

काकाश्री रॉक्स, मिपाकर शॉक्स !!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Nov 2015 - 9:54 am | कैलासवासी सोन्याबापु

घरी जेव्हा कॉलेज मधे होतो तेव्हा रोज रनिंगचा परिपाठ होता आमचा एकदा उमेदवारी करून आमचा सरदारजी मित्र सुद्धा सोबत येतो म्हणाला तो साडेपाच फुट उंच अन एकदम थुलथुलीत जाडू होता, आमचा रनिंग चा रस्ता गावातील एका प्रसिद्ध वकिलांच्या बंगल्यासमोरुन जात असे अन सरदारजी यायला लागला तेव्हा पासुन ते गुबगुबित पगड़ीधारी प्रकरण सोबत धावताना पाहुन रोज अन्हिके आटपायला बाहेर येणारे ते कुत्रे बावचळून आमच्या मागे लागायला लागले तसे पोरे बोंबलायला लागली , त्याला म्हणेल "यार वीरे ये ता प्रॉब्लम हो गयास्सी" तर सरदार मिश्किल म्हणाला उद्या मीच सोलुशन काढतो प्रॉब्लम ला दूसरे दिवशी पहाटेच्या धुक्यात आम्ही आपले सावध धावतोय अन आमच्या थोडा पुढे सरदार धावतोय ते आले थोराघरले श्वान वसवस करीत पुढे तसे सरदारजी अजुन स्पीड मधे पुढे अन अचानक सरदार वळला अन त्याच द्रुतगती ने त्या खवळलल्या कुत्र्यावरच धावून गेला ते कुत्रे एकदम बिचारे गर्भगळीत का काय म्हणतात तसेच झाले अन भयानक जोरात केकाटत आपल्या घरात शिरले ते कायमचेच! परत कधी कोणाच्या वाटेला गेले नाही बेटे

संदीप डांगे's picture

7 Nov 2015 - 12:51 pm | संदीप डांगे

सरदारजींचा असाच एक किस्सा आता मेळघाट डायरी मध्ये वाचला.
अस्वल अचानक हल्ला करतात. मागून येऊन सूमडीत. त्यांच्या हल्ल्यातून जिवंत वाचणे परमेश्वरालाच शक्य आहे. मेळघाटात तेव्हा कोणीतरी मोठे फॉरेस्ट अधिकारी होते. धिप्पाड, साडेसहा फूट उंच. बंगल्याच्या आवारात एकदा सकाळी ह्यांच्याकडे चहा-न्याहारी चालू असतांना सोबत काही पाहूणेही होते. तेव्हा मागून एका अस्वलाने आरोळी ठोकली आणि चालून आला. सिंगसाहेबही चिडले, केस मोकळे सोडून त्या अस्वलाच्या दहापट आवाजात आरोळी ठोकून त्याच्यावरच धावून गेले. हे काय प्रकरण उपटले अचानक असे वाटून अस्वलसाहेब मागल्या मागे पळाले....

हा हा हा!!!( अगदी डोळ्यासमोर उभा केलात प्रसंग!)

शिव कन्या's picture

7 Nov 2015 - 2:05 pm | शिव कन्या

कुठल्याही प्रकारची कुत्री वाईटच.