एक माणूस बनेल काढून डोम्बिविलीत पोहचला
बघता बघता रस्त्यावरी दुकान टाकून वसला.
छंद जीवाला एकच लागे
खुर्ची वरीला हक्क हा गाजे
शिव्याशाप तो भाषणामधूनी
आकांड तांडव ते दैनंदिनी
किन्तु
हातचा राखून गणित चुकले
नजर चकवून बहुमत हुकले
तरी उसने आवसान काउंटरवरुनी
परी हळूच पाही मान वळवूनी
इकडे तिकडे बघून झाले
निकाल सगळे येऊन गेले
भान आले, बाहेर आला....
लोकांनी विचारल्यावरी म्हणाला …
आमची दोस्तीदुष्मनी सबकुछ मिलीजुली असते ……
सेटलमेंट होत असेल तर पायवाटही खुली असते …
एक माणूस बनेल काढून वांद्र्याबाहेर पडला
हरवलेले सत्तेचे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .
प्रतिक्रिया
4 Nov 2015 - 4:09 pm | एस
पेर्ना द्या की. मिशीचं बनेल चांगलं जमलं आहे! आवडेश...!
4 Nov 2015 - 4:12 pm | पगला गजोधर
पेर्ना :कल्याण डोम्बिवलीकर जनता
4 Nov 2015 - 5:21 pm | शिव कन्या
बरं.
5 Nov 2015 - 9:16 am | पगला गजोधर
अहो खरंच,
या वगनाट्याची प्रेर्ना, कल्याण डोंबिवली जनता आहे…
कळावे,
दादू वांद्रेकर, सदु नाशिककर, बंटीशेट झुग्गीकर, नानाजीपंत सावजी (नागपूरकर) आणि त्यांचे तमाम चाहते …
4 Nov 2015 - 4:23 pm | कंजूस
मतदार टक्काच कमी झाला तर थोरवी सांगून काय उपयोग?
4 Nov 2015 - 4:26 pm | दमामि
झकास!!!
4 Nov 2015 - 4:27 pm | टवाळ कार्टा
=))
4 Nov 2015 - 4:47 pm | सूड
ते बनेल काय अस्तं?
4 Nov 2015 - 4:56 pm | प्यारे१
अगर रूपा की 'बनेल' पहनोगे तो रूपा क्या पहनेगी
4 Nov 2015 - 5:44 pm | सूड
ओह्ह ओके, भापो.
बाकी असले फालतू प्रश्न कधी पडले नाहीत. त्यामुळे उत्तर देऊ शकत नाही. धन्यवाद!! __/\__
4 Nov 2015 - 5:52 pm | प्यारे१
खिक्क्क्क!
4 Nov 2015 - 5:26 pm | बबन ताम्बे
दुसरा माणूस काय काढून गेला असेल? कल्याण, डोंबीवली बागांचे शहर आता बनणार का ? :-)
4 Nov 2015 - 5:32 pm | जव्हेरगंज
4 Nov 2015 - 5:30 pm | शिव कन्या
बनेलवरच थांबूनही चांगले विडंबन पाडता येते हे समकालीन विडंबकांच्या निदर्शनास आणून दिलेत, मिशी आभारी आहे.:)(कुणाच्या निदर्शनास काही आणून देण्याचा आपला हेतू नसेलही. तरी आभाराचा स्वीकार असावा.)
4 Nov 2015 - 5:47 pm | नाखु
बनेल बनेल एक दिवशी नक्की बनेल !!!