गाभा:
काही लोक्स नशीबवान असतात...
माझ्या ओळखीचा एक जोशी आहे(नाव बदलले आहे)
ह्या माणसाने आयुष्यभर काहि केले नाही...
टिवल्या भावल्या..हा व्यवसाय कर तो कर..नोकरी करायची नाही..कारण कुणाची गुलामी नको..
मात्र पत्नी सुरेख मिळाली..न्याशनलाईज ब्यांकेत नोकरी..
निसर्ग नियमा प्रमाणे २ मुली झाल्या
बायकोच्या जिवावर २ वेळची मंम्म नाश्ता चहा चालू होता..
मुली हुशार निघाल्या ..
दोघींना अमेरिकेतील नवरे मिळाले व अमेरिकेत स्थायिक झाल्या..
आता हा ६ महिने ह्या तर ६ महिने त्या मुलीकडे राहतं असतो...
निम्मे आयुष्य बायकोच्या जिवावर ऐष उरलेले मुली व जावयाच्या जीवावर ...
काही लोक्स नशीबवान असतात...
प्रतिक्रिया
31 Oct 2015 - 9:26 am | अत्रुप्त आत्मा
@.न्याशनलाईज ब्यांकेत नोकरी.. >> दिवंगत झालो आहे.
@निसर्ग नियमा प्रमाणे २ मुली झाल्या>> मग बाकिच्यांना कोणत्या नियमानी होतात हो.. अ.कु. ??? काय ह्ये!?
31 Oct 2015 - 10:22 am | प्रभाकर पेठकर
न्याशनलाईज
मी ही त्याच शब्दाला ठेचकाळलो होतो.
इंग्रजी शब्दांचा हव्यास. 'राष्ट्रीयकृत बँक' हा शब्द सुचू नये हा दैवदुर्विलास.
31 Oct 2015 - 1:09 pm | टवाळ कार्टा
ज्या नियमाने वैजूवैनींना जुळे झाले त्याच नियमाने =))
31 Oct 2015 - 5:21 pm | अत्रुप्त आत्मा
हरामी टक्कूमक्कूशोनू
31 Oct 2015 - 5:27 pm | टवाळ कार्टा
हरामी???? शोभत नाही हो....मला =))
ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊ
31 Oct 2015 - 5:45 pm | अत्रुप्त आत्मा
दांडुआत्रुप्त-धुबुक्कटक्कू
31 Oct 2015 - 9:29 am | चित्रगुप्त
असेल ज्यांच्या नशीबात त्यांनी खुशाल ऐश करावी. काही वावगे नाही त्यात. असे भाग्य प्रत्येकाला लाभो.
31 Oct 2015 - 10:05 am | सुबोध खरे
हायला
काय नशिब आहे त्याचं.
माझी इच्छा होती कि बायकोनं भरपूर कमवावं आणि आपण थंड बसून मिपा मिपा खेळावं.
आमच्या बहिणीनं विचारलं कि मग बायको काम करीत असेल तर तू घरकाम करशील का?
मी तिला सहज म्हणालो-मी कशाला काम करू? जी बायको नवर्याला पोसते ती एक मोलकरीण नाही का ठेवू शकणार?
यावर घरात मोठा वाद झाला.
31 Oct 2015 - 10:24 am | प्रभाकर पेठकर
बायको नोकरीवर गेली की तुम्ही आणि मोलकरीण दोघेच घरात हा केव्हढा मोठा धोका आहे. असे प्रस्ताव कधीच मंजूर होत नाहीत.
31 Oct 2015 - 12:04 pm | सर्वसाक्षी
दूरदृष्टी की चाणाक्ष बुद्धी?
31 Oct 2015 - 1:11 pm | टवाळ कार्टा
ठ्ठो
31 Oct 2015 - 1:10 pm | टवाळ कार्टा
माझे पण असेच स्वप्न आहे =))
1 Nov 2015 - 1:48 pm | अभिजीत अवलिया
माझे पण. बहुतेक मिपा वरच्या सर्व विवाहित पुरुषांचे हेच मत असेल.
31 Oct 2015 - 11:46 am | आनंदराव
पेठ्कर काकांचा षटकार !
31 Oct 2015 - 11:49 am | सुबोध खरे
काय पेठकर साहेब
सगळ्यांनाच काय "शांताबाई" मिळते काय?
31 Oct 2015 - 12:59 pm | खटपट्या
अरेरे उगाच आठवण करून दीलीत :)
शांताबाई...
31 Oct 2015 - 5:30 pm | प्रभाकर पेठकर
म्हणजे हवी तर असते. (मन में दूसरा लड्डू फुटा).
31 Oct 2015 - 5:43 pm | अत्रुप्त आत्मा
31 Oct 2015 - 12:02 pm | नाखु
च्च सी सी टी व्ही चा शोध लागला असावा !!!
असा कयास आहे नक्की विदा नाही लगेच मागू नये !!
खुलासे दार नाखु
31 Oct 2015 - 12:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
हो ना !
म्हणूनच त्याला सी सी (बघा, बघा, काय चाललंय !) टी व्ही म्हणतात ! ;)
31 Oct 2015 - 12:05 pm | गॅरी ट्रुमन
अशा माणसाला तुम्ही नशीबवान म्हणता? कमाल आहे.
31 Oct 2015 - 12:06 pm | प्यारे१
या धाग्यावर सगळ्या ज्येष्ठांनी आपापले 'मनसुबे' जाहीर करायचे असं ठरलंय काय?
31 Oct 2015 - 12:37 pm | सुबोध खरे
मग तुम्ही पण करा. तरुणांना कोणी मनाई केलीये का?
होऊ द्या खर्च
मिपा आहे घरचं
31 Oct 2015 - 12:24 pm | माम्लेदारचा पन्खा
काही लोक्स नशीबवान असतातच..... त्यात त्यांचे कर्तुत्व असो अथवा नसो.....
मुंबईला जायचं असेल तर काहींना घ्यायला एसी गाडी येते.... तासाभरात मुंबई !!
त्याच प्रवासासाठी दुसरा एखादा ठाण्याहून रेल्वे पकडतो...ती घाटकोपरला बंद पडते.....तिथून बस पकडली की ती कुर्ल्याला पंक्चर होते... तिथून टॅक्सी पकडायची ती सिग्नलला अडकते मग पायपीट करत पुढे.....
पोहोचतो तोही तिथेच मुंबईला पण अडीच तीन तासांनी...घामाच्या धारा पुसत.....
31 Oct 2015 - 1:10 pm | 'पिंक' पॅंथर्न
काही लोक्स फारच नशिबवान असतात ..
त्यांना दोनवेळचं पोटभर जेवण मिळतं.
31 Oct 2015 - 1:13 pm | चित्रगुप्त
जन्मापासून मरणापर्यंत सगळा नशीबाचाच खेळ चाललेला असतो...
31 Oct 2015 - 3:07 pm | बोका-ए-आझम
हो ना! त्यांच्या धाग्यांवर प्रतिसाद येतात! ते पण वीस वीस!(पु.लं.ना आठवून!)
31 Oct 2015 - 3:32 pm | चिनार
काही लोक्स नशीबवान असतात…. त्यांच्या आया ,बहिणी, बायका झी मराठी बघत नाहीत
31 Oct 2015 - 5:04 pm | रुस्तम
+१ . "त्यांच्या आया ,बहिणी, बायका झी मराठी बघत नाहीत"
31 Oct 2015 - 5:08 pm | टवाळ कार्टा
बायका???? कि बायको???? कि नक्की बायकाच म्हणायचे होते???? =))
31 Oct 2015 - 5:17 pm | जातवेद
+१
31 Oct 2015 - 5:16 pm | पैसा
काही लोक्स नशीबवान असतात...
जोशी नाव असणे हे नशीबवान असल्याचे लक्षण आहे का?
हे नशीबवान असल्याचे लक्षण आहे का?
भावल्या शब्द काळजास भिडला.
न्याशनलाईज शब्द काळजास भिडला. पत्नी सुरेख मिळाली हे त्याचे नशीब, की लेखकाची जळजळ?
हे नशीबवान असल्याचे लक्षण आहे का?
मंम्म याचा उच्चार कसा करायचा? नाश्ता चहा चालू होता. हे नशीबवान असल्याचे लक्षण आहे का?
यात जोशाचे नशीब काय?
यात जोशाचे नशीब काय?
हे नशीबवान असल्याचे लक्षण आहे का?
वरीलप्रमाणे. हे जोशाचे नशीब की लेखकाची जळजळ?
असो. परा असता तर एक डायरी नक्की मिळाली असती. एवढं कुठलं आमचं नशीब?
31 Oct 2015 - 5:28 pm | गॅरी ट्रुमन
हा हा हा. आता यापुढे फार काही लिहायची गरजच राहिलेली नाही :)
तरीही थोड्या सिरिअस नोटवर-- काहीही न करता इतरांच्या जीवावर आयुष्यभर जगणे याला नशीबवान असणे कसे म्हणता येईल हे मला अजूनही समजलेले नाही. मी तर म्हणेन असा मनुष्य फुटक्या नशीबाचाच असला पाहिजे.
31 Oct 2015 - 5:43 pm | अत्रुप्त आत्मा
@ पत्नी सुरेख मिळाली हे त्याचे नशीब, की लेखकाची जळजळ? >>
संपूर्ण प्रतिसाद ही अ.कुं.ची अंत्ययात्रा आहे..
31 Oct 2015 - 5:55 pm | असंका
साष्टांग _/\_ !!!!!
(फक्त शेवटच्या वाक्याचा संदर्भ कळला नाही..)
31 Oct 2015 - 6:09 pm | पैसा
पराचा संदर्भ तुम्हाला माहीत नसणार. परिकथेतील राजकुमार ऊर्फ परा हा डायरीसदृश लिखाण आले की नव्या वर्षाची डायरी धागाकर्त्याला भेट द्यायचा. सध्या परा येत नाही ना, म्हणून म्हटले, "तेवढं कुठलं आमचं नशीब?"
31 Oct 2015 - 6:13 pm | असंका
:-))
डायरीसदृश लेखन!!! कहर आहे!!
(बाकी परा म्हणजे परीकथेतील राजकुमार तेवढं वळक्लेलं.)
31 Oct 2015 - 5:23 pm | चांदणे संदीप
"अकु" नशीबवान!!
31 Oct 2015 - 5:58 pm | जव्हेरगंज
लै भारी!
31 Oct 2015 - 6:10 pm | नाना स्कॉच
काय फालतूपणा आहे हा? आमच्या बार मधे कोणी नवटाक झोकून ही असले बोलत नसेल! नाहीच!!
(शिस्तप्रिय बारमालक) नाना
31 Oct 2015 - 6:13 pm | प्यारे१
थारे बार का नाम झम झम बार हे के ?
31 Oct 2015 - 6:35 pm | नाना स्कॉच
म्हंजी? मला फ़क्त लस्सी (वोडका मिसळून) पिण्याइतकीच पंजाबी येते, ;)
बाकी आमच्या अंदाजाप्रमाणे आपण आमच्या बार चे नाव विचारीत असल्यास ते
"नाना साहेब ह्यांचे मेनकाभुवन मदिरालय" असे सुटसुटीत हाय :)
31 Oct 2015 - 6:37 pm | टवाळ कार्टा
तिथे मेनका मदिरा ग्लासात ओतते का?
31 Oct 2015 - 6:49 pm | नाना स्कॉच
आपला अपेक्षाभंग केल्या बद्दल माफ़ी पर असले नाही होत आपल्या बार वर , नॉर्मल बार हाय
31 Oct 2015 - 11:59 pm | टवाळ कार्टा
मेनकेने मदिरा ग्लासात ओतावी हि अपेक्षा मी कधी केली हो? उग्गीच कैच्याकै
31 Oct 2015 - 7:07 pm | सायकलस्वार
नाही, भुवन ओततो.
मेनका आत ग्लास विसळते.
31 Oct 2015 - 7:14 pm | नाना स्कॉच
तुमचे वर्णन आमच्या होमडिलीवरी वाल्या सोबत मॅच होते बहुतेक!
31 Oct 2015 - 7:15 pm | नाना स्कॉच
चेष्टा आहे हो कृपया हलके घेणे
31 Oct 2015 - 7:23 pm | सायकलस्वार
आम्ही नेहमी हलकीच घेतो.
हेवी झेपत नाय आजकाल.
(ड्रिंक्सबद्दल बोलतोय हो!)
31 Oct 2015 - 7:25 pm | सतिश गावडे
ही वर्गिकरणाची नविन पद्धत दिसते. जरा खुलासेवार लिहाल का याबद्दल?
1 Nov 2015 - 12:00 am | टवाळ कार्टा
असेच म्हंतो
31 Oct 2015 - 6:41 pm | सुबोध खरे
नाना शेट्टींचा डान्स बार आहे.
आता परत डान्स बारवरील बंदी उठवल्यामुळे नानासाहेब खुशीत आहेत.
31 Oct 2015 - 6:47 pm | नाना स्कॉच
मराठी माणसाला शेट्टी म्हणले बद्दल निषेध! दूसरी गोष्ट म्हणजे आमचा डांस बार आहे हे पहायला आपण कधी आलते देवा? बिज़नस किलिंग रुमर पसरवु नयेत हो! आमचा फ्यामिली रेस्टॉ एंड बार हाय!
2 Nov 2015 - 12:39 pm | बॅटमॅन
डान्स बार असं सपष्ट लिवा ओ. डांस बार म्हणजे लोकं एकीकडे चखणा खात वारुणीचा एक घोट घेताघेताच त्या मंद प्रकाशात डास मारताहेत असे चित्र डोळ्यासमोर येते (जे काही बारबद्दल खरेही आहे).
(पेयरसिकांना कोल्ड्रिंक व चखण्याची कंपनी दिलेला) बॅटमॅन.
2 Nov 2015 - 12:55 pm | चित्रगुप्त
डांस बारात डास मारतात, तर डान्स बारात काय करतात म्हणे ?
2 Nov 2015 - 1:00 pm | अभ्या..
बाला ठुमके मारतात. कस्टंबर पैशाची शायनिंग मारतात. चढली की वेटर मापात मारतात. मालक रेटमध्ये मारतात. पैसे संपले की बाऊंसर मारतात. बाहेर पडून गोंधळ केला की पोलीस मारतात.
2 Nov 2015 - 1:05 pm | चित्रगुप्त
तो ये मारधाडका मामला है
31 Oct 2015 - 6:55 pm | प्यारे१
ते पंजाबी नाही हरयाणवी आहे नाना.
बाकी झमझम बार माहित नाही म्हणजे रौशनी माहिती नसेलच. मग जौ दे. जा नाना जा जि ले अपनी आयडी.
31 Oct 2015 - 7:01 pm | नाना स्कॉच
प्यारे१ साहेब
तालुक्याच्या ठिकाणचा बार! गुडविल वर धंदा ! अजुन काय सांगावे
31 Oct 2015 - 7:22 pm | सतिश गावडे
ही बहूधा हरयाणवी बोली आहे. एफारायची चंद्रमुखी चौटाला आठवा. :)
31 Oct 2015 - 9:12 pm | बोका-ए-आझम
हरयाणवी आहे. पंजाबी म्हणजे - त्वाड्डे बारदा नाम झमझम सी? असं होईल.
31 Oct 2015 - 6:13 pm | सतिश गावडे
तुमची जळजळ होत आहे का असे "नशीब" तुम्हाला लाभले नाही म्हणून? :)
31 Oct 2015 - 7:16 pm | कंजूस
जुने लेख उकरत नाही परंतू त्यातील एक "विस्तवाजवळ लोणी गेले की----"
31 Oct 2015 - 10:00 pm | टवाळ कार्टा
लिंक द्या की
1 Nov 2015 - 8:31 am | कंजूस
घरगृहस्थी /सुबोध खरे यांचेच वाक्य आहे.
*******
"नोकरीवाली नवय्राला पोसते तर मोलकरीणही ठेवेल"
--गडी ठेवेल.
31 Oct 2015 - 7:25 pm | आदूबाळ
जेपी आणि नाखुकाकांच्या अनुपस्थितीत:
पन्नाशीनिमित्त अकुंचा सत्कार एक डायरी, न्याशनलाइज ब्यांकेचे पासबुक आणि "आपण यांना पाहिलेत का" या लोकप्रिय मालिकेत प्राईम स्पॉट देऊन करण्यात येत आहे.
1 Nov 2015 - 12:18 pm | अभ्या..
अक्कुकाकांनी एका धाग्यात सोताचा फुलसाईज फोटो टाकलेला. मला पाहिल्याचे आठवते.
31 Oct 2015 - 9:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
विडंबणाचा पेर्णास्ट्रोट!!
31 Oct 2015 - 10:46 pm | श्रीगुरुजी
नानासाहेब आणि माईसाहेब या दांपत्यातील नक्की कोण नशीबवान आणि कोण कमनशिबी?
31 Oct 2015 - 11:38 pm | बोका-ए-आझम
बारचं एक गिफ्ट व्हाउचर राहिलं की.
1 Nov 2015 - 12:13 pm | बिन्नी
Frustrating!
1 Nov 2015 - 4:09 pm | अविनाशकुलकर्णी
धन्यवाद मीत्रानो..एक नवि कोरी करकरीत स्टोरि घेऊन येत आहे...
1 Nov 2015 - 4:53 pm | चांदणे संदीप
टाळ्या!
1 Nov 2015 - 4:56 pm | खटपट्या
परत?? ठीकाय येउद्या...
1 Nov 2015 - 5:14 pm | वडाप
.एक नवि कोरी करकरीत स्टोरि घेऊन येत आहे..
........
मर्सिडीज आणा जळवा आमाला.
नशीबवान लेकाचे.
1 Nov 2015 - 6:36 pm | याॅर्कर
काही अंशी पटतय.
स्वकर्तृत्वाने नशिबवान होणे हे ठीक आहे.
पण काही लोक जन्मतः नशीबवान असतात हे मी पाहतोय.
2 Nov 2015 - 2:48 am | रातराणी
सगळे प्रतिसाद भारी :) अकु नशीबवान आहेत!
2 Nov 2015 - 3:55 am | फारएन्ड
कंसात तसे लिहीले नसते तर बिचार्याची चेष्टा झाली असती सगळीकडे. you had totally narrowed it down when you said Joshi :)
2 Nov 2015 - 4:13 am | चतुरंग
एकदम फारेन्ड प्रतिसाद! ;)
(निनावी)रंगा
2 Nov 2015 - 7:30 am | उपाशी बोका
खरं आहे तुम्ही म्हणताय ते. माझ्या अगदी जवळच्या नात्यातच आहे असे उदाहरण. लग्न होईपर्यंत आई-वडिलांच्या जीवावर मजा केली आणि आता बायकोच्या जिवावर. फक्त फरक इतकाच की वयाची ४०+ वर्षे झाली तरी त्यांना अजून मूलबाळ नाही, बाकी सगळे सारखेच.
9 Nov 2015 - 12:32 pm | हेमंत लाटकर
लेकाचा नशिबवानच! सुंदर, नौकरी वाली बायको. हुशार मुली, अमेरिकेत वास्तव्य असणारे जावई. दर सहा महिन्याला अमेरिकन वारी.
अवांतर:आजकाल इंजिनियर,डाॅक्टर असूनही सुंदर मुलींचे स्थळ येण्याचे वांदे.