नवजात बालकांमधील निद्रानाश

येडा खवीस's picture
येडा खवीस in काथ्याकूट
5 Sep 2008 - 10:11 am
गाभा: 

नमस्कार मित्रांनो,

खरोखर एका जरा गंभीर म्हणता येईल अशा विशयावर एक चर्चा आणि मते व सुचना अपेक्षित आहेत. माझा मुलगा दीड महिन्याचा असुन गेले काही दिवस त्याचे झोपेचे शेड्युल पार बिघडले आहे. दिवसा अत्यंत कमी झोप आणि रात्री पुर्णपणे टकटकीत जागा+ रडणे यामुळे आम्ही उभयता त्रस्त आहोत. पोट भरलेले असुनही (फिडींग व्यवस्थित झाल्यावरही) महाशय उगाच( कारण माहित नसल्याने हा शब्द वापरतोय) धाय मोकलुन रडत असतात. डायपर बदलुन, कपड्यात काही नाही ना हे चेक करुन, अनेक तर्य्हेने खेळवुन्-मांडीवर थोपटुन ही त्याला झोप जेमतेम ४ ते साडेचारच्या दरम्यानच लागते.....त्यामुळे आमचे टाईमटेबल पार बिघडले आहे...

तुमच्याकडे या समस्येवर काही खरोखर चांगली उत्तरे असतील तर कृपया आपल्या सुचना देण्याची तसदी घ्यावी ही नम्र विनंती

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

5 Sep 2008 - 11:25 am | महेश हतोळकर

मुलगा दिवसा कसा असतो? म्हणजे खेळतो का? का मलूल असतो? तुम्ही सांगीतले की त्याचे पोट व्यवस्थीत भरलेले असते. त्याला शी नीट होते का? माझ्या (मुलाच्या वेळच्या) आठवणी नुसार साधारणपणे दिवसातुन ४-५ वेळा फार घट्ट नाही फार पातळ नाही अशी शी झाली तर ती नीट झाली. जर मुलगा खेळत असेल आणि शी नीट होत असेल (जेवतो तर तो आहेच) तर काही काळजीचे कारण नाही. पण जर नसेल तर डॉक्टराना दाखवून घ्या.
राहिला तुमच्या टाईमटेबलचा प्रश्न. अभी तो शुरुवात है भाई. आगे आगे देखो होता है क्या!!!

प्रभाकर पेठकर's picture

5 Sep 2008 - 12:52 pm | प्रभाकर पेठकर

जरा कोमटसर पाण्याने आंघोळ घालून दुपट्यात हातपाय घट्ट बांधून झोपवा. हातपाय मोकळे राहिले तर हलवूनहलवून दुपट्या बाहेर काढतात आणि मग रडत बसतात मुलं. तसेच टाळूवर खोबरेल तेल जीरवून घ्यायचे. त्यानेही शांत झोप लागते. पाळण्याची किंवा झोळीची सवय आहे का? नसेल तर पाळणा वापरून पाहा. असो. माझ्या अल्पमतीला सुचलेले हे उपाय आहेत. पण एखाद्या अनुभवी चाईल्ड स्पेशालिस्टला दाखवणे सर्वोत्तम.

चिमणी's picture

5 Sep 2008 - 1:48 pm | चिमणी

त्याचे कपडे कोणत्या प्रकारच्या कापडाचे आहेत?
काही जणांना सिंथेटिक कापडाची ऍलर्जी असते. तुम्ही जर परदेशात असाल तर तिथे बर्‍याचदा मऊ पण पॉलिस्टर / ऍक्रिलिकची दुपटी / पांघरूणे मिळतात. ती जर वापरत असाल तर त्याऐवजी कापडी दुपटे / पांघरूण वापरून बघा. बाकी झबले, टोपडे, स्वेटरपण सुती किंवा लोकरीचे वापरून बघा.
खाल्ल्यानंतर त्याचे गॅस बाहेर पडताहेत ना? नाहितर पोटात दुखून बाळ रडते.
कदाचित त्याचे शारिरीक घड्याळ बदलत असेल. त्यामुळेही हा तात्पुरता बदल असू शकतो.

पद्मश्री चित्रे's picture

5 Sep 2008 - 2:18 pm | पद्मश्री चित्रे

झोप मुळातच कमी असते. तर काही वेळा मुलांच्या खाणे-पिणे,झोपणे यांचे चक्र ऍड्जस्ट व्हायला दोन ते तीन महिने जातात. हे त्यामुळे असेल तर ठीक आहे, आपोआप वेळा निश्चीत होतील. पण काही वेळा हे रडणे पोटात दुखल्याने (गॅसेस, अपचन मूळे)असते.तेव्हा, डॉक्टऱकडे जाणे योग्य.

उमा's picture

5 Sep 2008 - 6:59 pm | उमा

ही लिंक बघा.
http://en.wikipedia.org/wiki/Baby_colic

तसेच बाळाच्या प्रत्येक खाण्यानंतर ( feeding) आईने त्याला काही वेळ खान्द्यावर उभे टाकावे जेणेकरुन गॅसेस पास होतील.

रामदास's picture

5 Sep 2008 - 7:14 pm | रामदास

हा सगळ्याच नव्या आई-बाबांचा असतो.
बाळाचे झोपेचे तास आपल्याप्रमाणे सुरु होण्यासाठी दोनेक महिन्याचा कालावधी जातो.
सुती कापडे वापरा. जुन्या साड्या या कामासाठी फार छान.
बाळाची भूक कशी आहे?
बाळ हात पाय हलवून खेळते का?
दूध पिताना रडते का?
पोट मऊ आहे का?
रडून निळसर पडत नाही ना?
अशी निरीक्षणे करा.
आवश्यकता वाटल्यास डॉ.ना जरूर दा़खवा.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

रेवती's picture

5 Sep 2008 - 7:23 pm | रेवती

आता साडेसहा वर्षांचा आहे पण त्याने अगदी असाच नाही पण ह्याप्रकारचा त्रास पाच वर्षांचा होइपर्यंत दिला होता. डॉक्टर, वैद्य (बूवाबाजी सोडून) सर्व प्रकार झाले. वैद्यकीय उपचार फारसे नाहीत असे डॉक्टरांनी सांगितले, मग घरगुती उपचार जसे काळेमीठ कणभर रात्रीचे जेवण (म्हणजे वयानुसार बदलेल जेवणाचा प्रकार) झाल्यावर, कधी बडीशेपेचा अर्क इ. असंख्य उपचार केले पण उपयोग झाला नाही. पण मुलाचे सर्व जेवणे (सूप, पातळ पेज, गुरगुट्या भात इ.)तसेच दुधाच्या वेळा, शी, शू असे स्केड्यूल व्यवस्थीत होते त्यामुळे अमेरीकेतल्या डॉक्टरांनी काळजीचे कारण नाही असे सांगितले. भारतवारीत तेथिल वैद्यांना विचारले असता त्यांनी तब्येत (मुलाची)व्यवस्थित असून आई वडील आहात ना मग हे सर्व सोसायलाच हवे असे सांगितले. असाच अनुभव माझ्या मामेबहीणीला आला. तीने अमेरीकेतील तसेच भारतातील तिच्या डॉक्टरांना विचारले असता वरील्प्रमाणेच उत्तर मिळाले. तुमचा मुलगा अजून खूपच तान्हा आहे व मुलांचे वेळापत्रक सतत बदलत असते. वरील प्रतीसादांमध्ये मी नावाच्या सदस्यांनी म्हटल्याप्रमाणे ही तर सुरूवात आहे. कृपया नात्यातील किंवा आजूबाजूच्या कोणत्याही बाळाशी तुलना करू नका. जर डॉक्टरांनी सर्व ठीक असल्याचा निर्वाळा दिला असेल तर काळजी करू नका.

रेवती

माझ्या साडेचार वर्षाच्या मुलानेही झोपेसाठी फार खळखळ केली.
कारण काहीही असले तरी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे जरूरी आहे असेच मी म्हणेन.
रात्री झोपताना चांगलं तेलाने मालिश करून गरम पाणी भरपूर घेऊन अंघोळ घालून हातपाय गुंडाळून दुपट्यात झोपवून पहा. कदाचित उपयोग होईल.
पण तान्ह्या मुलांचे झोपेचे वेळापत्रक ती किमान वर्षाची होईपर्यंत बदलत असते असा माझा अनुभव आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जन्मल्यापासून किती दिवस झोपेचे शेड्यूल नीट होते? अचानक बिघडले असे वाटते का? तसे असेल तर तज्ञ बालवैद्यकाला दाखवून घेणे श्रेयस्कर.

  1. फीडिंग हे पूर्णपणे अंगावरच आहे असे गृहित धरतो. मुलाच्या आईने काही महिने वातूळ पदार्थ कमी खावेत - डाळीचे पीठ, सामोसे, बटाट्याचे पदार्थ इ. (मूल बाहेरचे अन्न घेऊ लागेपर्यंत अजिबात वर्ज्य केले तर उत्तम.)
  2. प्रत्येक फीडिंगनंतर मुलाला खांद्यापाशी उभे धरुन पाठीवरुन हलकेच हात फिरवावा ढेकर येऊन जाणे चांगले.
  3. अपचन असेल तर शी वरुन समजतेच. त्याप्रमाणे औषधे द्यावीत.
  4. पोटात गुबारा धरला तर बेंबीपाशी कोमट एरंडेल तेलाचे चार थेंब जिरवावेत गॅसेस निघून गेले की बरे वाटते.
  5. हल्ली काही डॉक्टर्स मुलांना पाणी अजिबात देऊ नका असे सांगतात. उकळून थंड केलेले पाणी चमचा वाटीने पाजावे, पाणी गरजेचे असते.
  6. मुलाला गुटी देत असाल तर गुटीचे पदार्थ आणि सहाण वगैरे स्वच्छ कोरडी करुन मगच ठेवावी, ओलसर राहिल्यास बुरा येऊ शकतो त्यातून इन्फेक्शन होते.
  7. मुलाला गुटी देत नसाल पण गुटी देण्यावर आपला विश्वास असेल तर अनुभवी वडीलधार्‍यांकडून सल्ला घेऊन गुटी देणे सुरु करा त्यानेही तब्बेतीत फरक पडतो. (माझ्या मुलाला आम्ही दीड वर्षापर्यंत नियमितपणे गुटी देत होतो).
  8. वरती टाळू भरण्याबद्दल सांगितले आहेच. त्याचप्रमाणे अंगालाही मालिश करुन मगच आंघोळ घालावी.
  9. काही दिवस झोपण्याच्या खोलीत अगदी मंद आवाजात शांत सुमधुर संगीत लावून बघा मुलांना आवडते.
  10. आत्ता तर सुरुवात आहे! तुमच्या शेड्यूलची काळजी करु नका. जेव्हा मिळेल तेव्हा आई-वडील दोघांपैकी एकाने विश्रांती पूर्ण करुन घ्यायची ह्याकडे लक्ष द्या.
    माझ्या दोन वर्षाच्या मुलाबरोबर कित्येक महिने मी रात्री अडीच वाजता चेंडू खेळून सकाळी ८ वाजताची मीटिंग अटेंड केली आहे. आपण आईबाप आहोत त्यामुळे हे सगळे सहन करावेच लागते. धीर सोडू नका.
    शुभेच्छा!

    चतुरंग

नारायणी's picture

5 Sep 2008 - 8:47 pm | नारायणी

वर दिलेले सगळेचं सल्ले उपयोगी आहेत. आणखी काही माझे अनुभवाचे बोल.

१. झोपायच्या वेळी घरात संपुर्ण अंधार करुन बघा. आम्हाला तरी याचा फायदा झाला.
२.जर बाळाला पोटाचा काही त्रास नसेल,तर रात्री एकवेळ झोपायच्या आधी फॉर्म्युला द्या. आईच्या दुधापेक्षा फॉर्म्युला जड असतो त्यामुले काहीवेळा मुल झोपी जातं.
३.Aquarium सारखी काही soothing toys वापरुन बघा. ते बघता बघता बाळ झोपी जातं.

माझ्या मुलिला आम्ही दिवसा जागं ठेवण्याचा खुप प्रयत्न करायचो.विशेषतः संध्याकाळि...खुप खेळवायचो. ९ वाजले की तिचं पोट नीट भरेल असं खाउपिउ घालुन पूर्ण अंधार करुन गाणी म्हणत रॉकिंग चेअर वर झोपवायचो. तिच्याकडुन नशीबाने आम्हाला कधीचं असा त्रास झाला नाही.

"झोपेचे वेळापत्रक बदलत असते" हेही अगदी बरोबर आहे.

येडा खवीस's picture

5 Sep 2008 - 9:32 pm | येडा खवीस

सगळ्या प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे मनःपुर्वक आभार

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

सखाराम_गटणे™'s picture

5 Sep 2008 - 11:52 pm | सखाराम_गटणे™

सदर माहीती सर्वासाठी उपयुक्त आहे.

वेलदोडा's picture

5 Sep 2008 - 11:59 pm | वेलदोडा

कोलीक (collic) चा त्रास असेल तर बाळ असेच रडत राहते. तो बा़ळ जसजसे मोठे होते तस्तसे कमी होतो. आणि रडणे पण कमी होत जाते. www.babycenter.com वर कोलीक बद्द्ल चांगली माहिती मिळेल. डॉक्टर कडे (पेडियाट्रिशन) दाखवल्यास कोलीक आहे की नाही कळेल आणि त्यावरचे उपाय ही ते सांगतील.
रात्री बाळ न रडता नुसतेच जागे रहात असेल तर ....रात्रीच्या वेळी ते कशाने तरी खूप stimulate होऊ न देणे हे पहा..जसे प्रखर लाईट, टीवी चा किंवा इतर कुठला मोठा आवाज , घरातील गडबड, आजूबाजूला असणार्‍या हलणार्‍या वस्तू.

विसोबा खेचर's picture

6 Sep 2008 - 6:42 am | विसोबा खेचर

आपण लहान मुलांच्या एखाद्या चांगल्या डॉक्टरांना दाखवावे असे मला वाटते!

तात्या.