गाभा:
नमस्कार. मला दोन प्रश्न पडले आहेत.
ब्राह्मण समाजातल्या गोत्रांची संपूर्ण यादी कुठे मिळेल का?
उपगोत्र काय प्रकार आहे व ते कधी अस्तित्वात आले?
माझ्या माहितीप्रमाणे खालील गोत्र ऐकिवात आहेत.
१. अत्री
२. वत्त्स
३. गार्ग्य
४. वशिष्ठ
५. जमदग्नी
६. लोकाक्ष
७. विश्वामित्र
८. भारद्वाज
९. मुद्गल
१०. काश्यप
११. मौनस
१२. लोहिताक्ष
१३. कौशिक
१४. कृष्णात्र
१५. हरितस्य
१६. पराशर
१७. शांडील्य
१८. धनंजय
१९. बाद्रायण
२०. वाद्रायण
२१. कौडीण्य
२२. विष्णुवृद्ध
२३. भार्गव
२४. सौभारायण
२५. गौतम
प्रतिक्रिया
28 Oct 2015 - 9:29 am | अत्रुप्त आत्मा
दाते पंचाँग वाल्यांचे या सर्व विषया वर पुस्तक उपलब्ध आहे...ते घ्या.
28 Oct 2015 - 9:37 am | राही
दाते बृहत्पंचांगामध्ये चारही शाखांच्या ब्राह्मणगोत्रांची आडनावे आणि त्यानुसार गोत्रांची यादी असे. अलीकडे असते की नाही ठाऊक नाही. मजजवळ आहे. वेळ मिळाल्यास टंकेन.
28 Oct 2015 - 9:53 am | अत्रे
धन्यवाद इन ऍडव्हान्स!
28 Oct 2015 - 9:47 am | अत्रे
अजून एक! मराठी विश्वकोशानुसार (https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand5/index.php/23... ) मूळ ८ गोत्रे असून
कोणते उपगोत्र कोणत्या मूळ गोत्रातील आहे ही माहिती रोचक असेल.
28 Oct 2015 - 11:31 am | बॅटमॅन
उपगोत्र नामक प्रकाराबद्दल माहिती द्यावी.
28 Oct 2015 - 11:45 am | मोगा
काश्मीर हमारा है /
हमरे दादाजीने काश्मीर निर्माण केला.
29 Oct 2015 - 8:47 pm | स्रुजा
काश्यप गोत्र वाल्यांनी काश्मिर निर्माण केलं? सही आहे, मी पण सगळ्यांना सांगायला मोकळी की ! ;)
29 Oct 2015 - 4:25 pm | 'पिंक' पॅंथर्न
ब्राम्हण सोडुन इतर जातीत गोत्र वगैरे असतात काय ?
29 Oct 2015 - 5:48 pm | बॅटमॅन
क्षत्रिय आणि वैश्य वर्णांत गोत्रे असतात. आता या वर्णांपैकी प्रत्येक वर्णात अनेक जाती येतात. प्रत्येक जातीत गोत्रांची परंपरा आहे की नाही ते ठाऊक नाही. किमान काही जातींत आहे इतके नक्की.
झालंच तर मुंजीचा विधी हाही फक्त ब्राह्मणांत नसतो तर त्रैवर्णिकांत असतो. पण ब्राह्मणेतर लोक्स क्वचितच हे करताना पाहिले आहेत.
29 Oct 2015 - 9:18 pm | आदूबाळ
हो, मी एका पांचाळ सुतार मुलाच्या मुंजीला गेलो होतो. माझ्या आठवणीप्रमाणे भिक्षावळ वगैरे नव्हती, त्याऐवजी त्याच्या डैडींनी हत्यारं वगैरे दिली होती.
29 Oct 2015 - 10:40 pm | बॅटमॅन
सहीच! आजवर असे प्रत्यक्ष काही बघायचा अण्भव नाही आलेला.
29 Oct 2015 - 11:01 pm | अभ्या..
मी रजपूत समाजातील उपनयन पाह्यलेले आहे. विश्वब्राह्मण (पांचाळ सोनार) समाजातील तर बर्याचदा.
29 Oct 2015 - 11:02 pm | अभ्या..
मराठा समाजातील देवक हे गोत्र निदर्शक समजावे का?
29 Oct 2015 - 11:10 pm | भिंगरी
मराठा समाजातही गोत्र असते.आणि देवक निराळे असते.(म्हणजे आमच्याकडे तरी वधुवरांच्या माहिती पत्रिकेत गोत्र लिहीलेले असते.)
29 Oct 2015 - 11:19 pm | अभ्या..
गोत्र असते हे माहीती आहे भिंगरीताई पण एखाद्या गोत्रातील सर्वांचे देवक सारखे असते का? म्हणजे देवक हा प्रकार गोत्राशी संबधित का?
अवांतर : आजकाल लग्नात चादरीखाली देवक घेऊन जायची प्रथा दिसेना ब्वा. सगळ्याच लग्नांवर उगी ती पंजाबी बॉलीवूडी छाप वाटते. पूर्वी कशी लग्ने ओळ्खू यायची ;)
31 Oct 2015 - 9:27 am | भिंगरी
आमच्याकडे अजून तरी चादरीखाली देवक घेऊन वाजत गाजत जातात.
मात्रा आताच्या पिढीला जास्त चालणे आवडत नसल्याने अगदी जवळचे मंदिर किंवा पार शोधून तेथून आणावे लागते.
29 Oct 2015 - 11:15 pm | सूड
नोप, देवक निराळं नि गोत्र निराळं!! मला आमच्या एक पिढी आधीच्या लोक्सकडून माहिती मिळाल्यानुसार गोत्र म्हणजे आपले पूर्वज ज्या ऋषींच्या आश्रमात शिकले त्या ऋषींचं नाव!!
त्याकाळी एकाच ऋषींच्या आश्रमात शिकणारे एकमेकांचे गुरुबंधु गुरुभगिनी असत. आपल्याकडे चुलत नात्यात लग्न करायची पद्धत नाही, त्यामुळे सगोत्र विवाह निषिद्ध !!
31 Oct 2015 - 1:46 pm | खटपट्या
मराठा समाजातही गोत्र असते. देवक निराळे. कोकणात काही ठीकाणी देवकाला कुळ म्हणतात. जे लग्नात चादरीखालून नेतात. जसे गोत्र एक असेल तर लग्न होत नाही तसेच कुळ एक असेल तरीही लग्न होत नाही.
उदाहरणादाखल काही कुळे(देवक) - कलम, हत्ती, मोर..
29 Oct 2015 - 7:23 pm | राही
कोंकणस्थ ब्राह्मणांची गोत्रावळी. : अत्रि, कपि, काश्यप, कौंडिण्य, कौशिक, गार्ग्य, जामदग्न्य, नित्युंदन, बाभ्रव्य, भारद्वाज, वत्स, वासिष्ठ, विष्णुवृद्ध, शांडिल्य. (एकूण १४, दाते पंचांगानुसार तंतोतंत.)
कर्हाडे ब्राह्मणांची गोत्रावळी : अत्रि, अंगिरस, उपमन्यु, काश्यप, कुत्स, कौंडिण्य, कौशिक, गार्ग्य, गौतम, जामदग्न्य, नैध्रुव, पार्थिव, बादरायण, भार्गव, भारद्वाज, मुद्गल, लोहिताक्ष, वत्स, वसिष्ठ, वैन्य, वैश्वामित्र, शांडिल्य, शालाक्ष. (एकूण २३, दाते पंचांगानुसार तंतोतंत.)
गोवर्धन ब्राह्मणांची गोत्रावळी : श्रीवत्स, अत्रि, अंगिरस, औपन्यव, उपमन्यु, कपि, कात्यायन, कामकायन, काश्यप, कामाक्ष, कृष्णात्रेय, कौंडिण्य, कौशिक, गार्ग्य, गालब, गौतम, चंद्रात्रेय, जामदग्न्य, दुर्वास, पराशर, भारगव, भारद्वाज, मांडव्य, मुक, मुद्गल, मैत्र्य, मौन, रथीतर, लोहित, वत्स, वामरथ्य, वासिष्ठ्य, वालखिल्य, विश्वामित्र, वाधुल, वसिष्ठ, (हे वेगळे दिले आहे. वासिष्ठसुद्धा आहेच.) वैष्य, शालंकायन, शालवत, शांडिल्य, शठ. (एकूण ४१, दाते पंचांगानुसार तंतोतंत.)
हुश्श्. आता उरलेली कुणीतरी टायपा.
30 Oct 2015 - 8:42 am | अत्रे
धन्यवाद. मिळाले तर बघतो मी हे पुस्तक.
त्यात या प्रत्येक गोत्राचे मूळगोत्र (८ पैकी) देखील सांगितलं आहे का?
अजून कोणाला "सगोत्र" ची व्याख्या माहित असेल तर सांगावी. म्हणजे मूळचे ८ गोत्र धरायचे का अश्या यादीतले (४०-५० +)?
29 Oct 2015 - 8:27 pm | चित्रगुप्त
गोत्र ही संकल्पना वा परंपरा आजवर टिकून आहे त्याअर्थी तिचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग होत आला असणार. आगामी काळात तिचे औचित्य कितपत आणि कोणत्या स्वरूपात राहण्याची शक्यता आहे यावर कुणीतरी प्रकाश टाकावा , ही विनंती .
29 Oct 2015 - 8:40 pm | प्रसाद गोडबोले
आमच्या माहीती नुसार आजही भारता मध्ये सगोत्र विवाह कायदेशीर समजला जात नाही म्हणे ...
(ऐकीव माहीती . तपासुन पहायला हवे. )
30 Oct 2015 - 1:08 am | मोदक
चुकीची माहिती, कायदा असल्या गोष्टींमध्ये लक्ष घालत नाही. दोन्ही पार्टी सज्ञान आहेत का? आणि दोघांचीही संमती आहे का? इतकेच बघतो - आणि याबाबत काही विदा असेल तर कृपया द्या, वाचायला आवडेल.
(तुम्हाला समाजमान्य म्हणायचे आहे का?)
30 Oct 2015 - 1:16 am | मोदक
याबाबत म्हणजे "भारता मध्ये सगोत्र विवाह कायदेशीर समजला जात नाही" याबाबत विदा असल्यास द्यावा.
30 Oct 2015 - 8:50 am | अत्रे
कायद्यात मान्यता आहे. संदर्भ:
https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand5/index.php/23...
30 Oct 2015 - 1:56 am | शब्दबम्बाळ
आपल्याकडे कोणत्याही कालबाह्य गोष्टी "परंपरा"या नावाखाली सुरूच राहतात...
त्यामुळे गोत्र वगैरेचा प्रत्यक्ष जीवनात काही उपयोग असण्याची शक्यता वाटत नाही. पण हा, आपली विवाहसंस्था मात्र जात/पोटजात/गोत्र/देवक असल्या अनेक गोष्टीना अगदी पूरक आहे. कुठे नाही तर तिथे तरी वापर होत असावा!
30 Oct 2015 - 1:59 am | रेवती
पुढील पिढीने भारतीय मुलींशी लग्न केले तर जरा शक्यता. हामेरिकन किंवा आणखी कोणत्या देशवासीय मुलीशी लगीन केले तर काय गोत्र विचारणार? गोत्र, गण, नाडी वगैरे तेंव्हा विसरावे लागेलच.
30 Oct 2015 - 9:58 am | टवाळ कार्टा
यालाच दुटप्पीपणा म्हणातात
30 Oct 2015 - 6:15 pm | रेवती
अर्थातच! ते मान्यच आहे. म्हणायचे असे आहे की, जर भारतीय मुलीशी लग्न झाले/केले तर गोत्र नावाचा प्रकार असण्याची शक्यता आहे. आपण त्यासाठी अडून राहू असे नाही पण गोत्र नावाचा प्रकार अस्तित्वात असणे याअर्थी! दुसर्या देशीय मुलीशी झाले/केले तर हा प्रश्न येत नाही.
30 Oct 2015 - 10:14 pm | टवाळ कार्टा
आँ ...श्या....इत्क्या लौकर थोडीच सहमत व्हायचे अस्ते ;)
30 Oct 2015 - 9:15 am | अत्रे
याबाबत थोडे गुगलल्यावर ही माहिती मिळाली.
संदर्भ:http://www.lokprabha.com/20090605/lagin.htm
29 Oct 2015 - 8:33 pm | चित्रगुप्त
मला स्वतःला आजवर लग्न, मुंज याखेरीज कधीही (उदा. पासपोर्ट, पॅनकार्ड, घराचे रजिस्ट्रेशन वगैरे) आजच्या काळात आवश्यक कामांसाठी गोत्र सांगण्याची गरज पडली नाही म्हणून ही विचारणा.
29 Oct 2015 - 8:49 pm | स्रुजा
आणि पुजेचा संकल्प सोडताना गुरुजी दर वेळी तुमचं गोत्र काय विचारतात.
30 Oct 2015 - 1:55 am | रेवती
असेच म्हणते. दर पूजेच्या वेळी गुर्जी विचारतात व आधी मी चुकून माहेरचे सांगायचे. आता सासरचे लक्षात आहे व माहेरचे विसरलिये. बरे, हे आईवडिलांन्ला विचारायची सोय नाही. "तू तुझे माहेरचे गोत्र विसरलीस?" असा शिनेमाष्टाईलमध्ये प्रश्न येण्याची शक्यता असल्याने गप्प बसते. ;) त्यातून पंचाईत अशी आहे की मामांचे गोत्र लक्षात आहे कारण त्यांच्या घरामागच्या झाडावर भारद्वाज पक्षी बसायचा व त्यामुळे त्यांचे गोत्र ते आहे असे लहानपणी वाटायचे व लक्षात आहे. ;) कधीतरी हळूच काहीच झाले नाही अशा थाटात सहज आईला विचारायला जावे तर ती माझे बारसे जेवलेली असल्याने नाटक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
30 Oct 2015 - 2:59 am | स्रुजा
ह्या ह्या ह्या.. आमच्याकडे तर "इकडची स्वारी" खुशाल स्वतःचंच गोत्र विसरते. मला माहेरचं काश्यप वगैरे च्या आधी पण भारद्वाज लक्षात राहिलं त्यामुळे. प्रत्येक पुजेला गुरुजींनी गोत्र विचारलं की हमखास प्रश्नार्थक मुद्रा.. गुरुजी पण बुचकळ्यात गोत्र माहिती नाही की गोत्र म्हणजे काय माहिती नाही असा प्रश्न त त्यांना पडलेला ;) आताशा मी हळुच "भारद्वाज" वगैरे पण सांगत नाही. गोत्र विचारायची देरी की मीच, भारद्वाज सांगुन मोकळी होते :D
30 Oct 2015 - 4:42 pm | अत्रुप्त आत्मा
@दर पूजेच्या वेळी गुर्जी विचारतात व आधी मी चुकून माहेरचे सांगायचे. आता सासरचे लक्षात आहे व माहेरचे विसरलिये. बरे, हे आईवडिलांन्ला विचारायची सोय नाही. "तू तुझे माहेरचे गोत्र विसरलीस?" असा शिनेमाष्टाईलमध्ये प्रश्न येण्याची शक्यता असल्याने गप्प बसते.>> गोत्र हा अनेक अर्थानी कालबाह्य आणि टाकावू घटक झालेला आहे. म्हणून सरळ त्या जागी आपल्या अण्णावाचाच गोत्र म्हणून उल्लेख करावा. आणि पुढे कुलोत्पन्न असे उच्चारावे. मी हे गोत्र माहित नसलेल्या शिवाय महिला पूजेस बसल्या तर आवश्य करून घेतो. शिवाय आपल्या (धर्म)शास्त्रानुसार-(विवाहित)महिलांना पूजेत स्वतःसाठी सासरचं गोत्र का लावायला सांगितलं जातं? हा माझा प्राचीन प्रश्न असतोच. हे केवळ निरर्थकच नाही तर अन्न्याय्य आहे.. म्हणुन कुणालाच गोत्र नको..ज्याला त्याला आपलं अण्णाव लावण्याची मुभा हवी. हाच नवा नियम..
हा असला संकल्प..
त्यातही नामक ज्या जागी आमच्या मुळच्या वैदिकी(धर्म)व्यवस्थेनी ब्राम्हण असेल तर शर्मा,क्षत्रीय असेल तर वर्मा,वैश्य असेल तर गुप्तः ,(शूद्र असेल तर-काहिच नाही,कारण त्याला पूजा करवून घ्यायचा अधिकारच नाही..)अशी खास टनाटनी चार्तुवर्णी-ओळख सिस्टिम लावलेली आहे...ती ही गोत्राच्या जागी अण्णाव आणि शर्मा/वर्मा/गुप्तः च्या जागी नामक किंवा नाम्न्या लावलं की उधळून लावली जाते..
त्यामुळे लोकहो..या निमित्तानी हा नवा बदल स्विकारा आणि त्याचा वरिल उपरोक्त कारणं सांगून भरपूर प्रसारंही करा.
सावरकरी हिंन्दुत्वाचा बदल हाच पाया..त्यास्तव जाऊ दे अन्यायी टनाटनी धर्म कित्तीही वाया.
30 Oct 2015 - 6:28 pm | रेवती
अहो गुर्जी, मी गोत्र वगैरे गोष्टींना तेवढेही महत्व देत नाही म्हणूनच लक्षात ठेवण्याची आवश्यकता वाटत नाही. लग्न झाल्यावर मुलीचे गोत्र सासरचे का व्हावे? हाही प्रश्नच आहे. अगदी शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिल्यासही तसे गोत्र बदलायला नको. पण तेवढे महत्व त्या गोष्टीस द्यावे असे वाटतच नाही. अनेक गोष्टी अशा असतात की मागील पिढी जरा त्यात अडकलेली असते म्हणून मुले ते तात्पुरते स्विकारतात. जसे, गोत्र बघणे, मंगळागौरीची पूजा सासरच्या (अशा अनेक गोष्टी)पद्धतिने करणे करणे वगैरे. या गोष्टी आता इतक्या क्षुल्लक वाटतात की एकेकदा होऊन गेल्यावर पुन्हा कोणी बघणारही नसते. शिवाय मुलाच्या लग्नात माझ्या ते कितपत लक्षात राहील ही शंकाच आहे. ते माझ्यापाशी येऊनच संपलय.
30 Oct 2015 - 6:46 pm | प्रसाद गोडबोले
मुळातच सगळ्या पुजा आणि कर्मकांडे ( विशेष करुन तुंबडीभरायण पुजा ;) ) हे तुम्ही ज्याला टनाटनी म्हणता त्या धर्माचे सार आहे .
आर्य सनातन वैदिक धर्माचे सार त्याचे ज्ञानकांड अर्थात उपनिषदे , षडदर्शने , भगवद्गीता , ब्रह्मसुत्रे , आचार्यांची भाष्ये हे आहे !!
अर्थात आचार्यांनी ईशोपनिषद भाष्याच्या सुरुवातीलाच "ईशा वास्यम् इत्यादयो मन्त्राः कर्मस्वविनियुक्ताः, तेषामकर्मशेषस्यात्मनो याथात्म्यप्रकाशकत्वात् । "
http://sanskritdocuments.org/doc_upanishhat/Ishaa_bhaashhya_Shankar.html...
अर्थात ईशावास्यादि उपनिषदोक्त वैदिक मंत्रांचा कर्मकांडात उपयोग नाही असे म्हणल्याने तुंबडीभरु पुरोहित वर्गाची गोची झाली अन त्यांन्नी असल्या कर्मकांडांची पुटे सनातन धर्मावर चढवली !!
जर खरी धर्मसुधारणा करायची असेल तर असल्या तुंबडीभरु पुजा अन कर्मकांडे बंद करुन त्या जागी सनातन वैदिक तत्वज्ञानाची साधना सुरु केली पाहिजे !!
असो . तुम्हाला ते जमणे अवघड दिसते =))
30 Oct 2015 - 8:17 pm | अत्रुप्त आत्मा
टनाटनी स्वकपोलकल्पितमतांधतेचा विजय असो!
अस्वीकार्य टना टन कैदिक भोंदू मर्म की.....असो!!!च्च!!! :p
30 Oct 2015 - 8:31 pm | सूड
सारखं टनाटनी टनाटनी ऐकतोय आणि त्यात तुम्ही स्वत:ला धर्मसुधारक म्हणता म्हणून आता इथेच विचारतो.
अगदी पेशव्यांपर्यंत सत्यनारायणाच्या पुजेचे उल्लेख नाहीत. हे मध्येच कुठेतरी कुत्र्याच्या छत्रीसारखं उगवलंय. हेच तुमच्या यजमानांना सांगू शकाल? एक धर्मसुधारक म्हणून एवढं करुन दाखवू शकालच!!
पुढच्या वेळी यजमानांनी विचारलं की सांगायचं, "मी एक धर्मसुधारक भटजी/ पुरोहित आहे, तस्मात ही मध्येच उगवलेली पूजा मला मान्य नाही आणि मी करणार नाही."
बोला, सांगाल? हो की नाही मध्ये उत्तर हवं बाकी फापटपसारा नको.
30 Oct 2015 - 9:42 pm | प्यारे१
+१
असेच म्हणतो.
या गोष्टी स्वत:ला मान्य नाहीत तर सोडत का नाही? विरोधाभास उठून दिसतो अशानं.
असं टनाटन वगैरे म्हणून तुमच्या स्वत:बद्दल तुम्ही ambiguity संशयाचं धुकं स्वत: निर्माण करताय बुवा.
30 Oct 2015 - 9:57 pm | अत्रुप्त आत्मा
@या गोष्टी स्वत:ला मान्य नाहीत तर सोडत का नाही? >> इथे माजा प्रश्न प्रामुख्यानि येत नाही..तसही या गोष्टी मी "मला मान्य नाहीत" म्हणून सोडत नसून,चुकीच्या /आत्मघातक आहेत..म्हणून सोडतो..आणि दुसयरामनाही सोडायला लावतो.अर्थात "त्यांना पटत असतील आणि सोडायची इच्छा असेल" ..तरच!
30 Oct 2015 - 10:08 pm | प्यारे१
बाकी कसं काय?
30 Oct 2015 - 9:50 pm | अत्रुप्त आत्मा
ते काम धर्म उच्छेदकांच आहे. मी उच्छेदक नाही. धन्यवाद
30 Oct 2015 - 10:00 pm | अत्रुप्त आत्मा
@, "मी एक धर्मसुधारक भटजी/ पुरोहित आहे, तस्मात ही मध्येच उगवलेली पूजा मला मान्य नाही आणि मी करणार नाही.">> हां आरोप माझ्यावर गैरलागू होतो..कारण मी करवून घेतो तो सत्यनारायण त्या पारम्पारिक स्वरूपाचा नाहीच.
30 Oct 2015 - 10:03 pm | सूड
मी हो का नाही, येवढंच विचारलं होतं!! तुम्ही पारंपारिक करता की आण्खी कसा, पण करता ना? हे नव्याने घुसडलेलं आहे त्यामुळे करु नका हे सांगणं याला धर्मसुधारणा म्हणता येईल.
30 Oct 2015 - 11:05 pm | अत्रुप्त आत्मा
@मी हो का नाही, येवढंच विचारलं होतं!! >>> पण त्याचं उत्तर मी कशाला देऊ??? तु जे हो का नाही? असं विचारतो,ते मी करतच नाही. तर त्याचं उत्तर देण माझ्यावर कसं काय बंधनकारक होउल??? तू तुझं तू कायच्याकाय वाट्टेल ते समज करून घेशील माझ्याबाबतीत ..त्याला मी काय करु???
@पुढच्या वेळी यजमानांनी विचारलं की सांगायचं, "मी एक धर्मसुधारक भटजी/ पुरोहित आहे, तस्मात ही मध्येच उगवलेली पूजा मला मान्य नाही आणि मी करणार नाही." >> तेच तर सांगितलं ना आधी ही मध्येच उगवलेली पूजा - मी करत नाही. आमची पूजा ही - ही पूजा नाहीच! आणि हे एका पूजेबद्द्ल नाही..सगळ्याच कर्मकांडांबद्दल आहे. जे मी करतच नाही,ते तू म्हणतो म्हणून मी पुन्हा एकदा नाही करत, असं कशाला सांगायच??? हे तर आधीच होऊन-गेलेलं आहे..असो!
@तुम्ही पारंपारिक करता की आण्खी कसा, पण करता ना? हे नव्याने घुसडलेलं आहे त्यामुळे करु नका हे सांगणं याला धर्मसुधारणा म्हणता येईल. >>> ते तुझं तु तुला ज्याला जे म्हणायच ते म्हण.तुला कोणी आडवलेलं नाही. धर्मसुधारणा म्हणजे-घातक स्वरुपाचा धर्म काढून टाकणं आणि वाइट स्वरुपाचा जो आहे तो बदलवणं हे मुल्य मी मानतो..जे सावरकर ,शाहू महाराजां सारख्यांनी आचरलेलं मूल्य आहे.. धर्मसुधारणा म्हणजे काय? ही कोण्या एकाने मानलेली बेबंदशाही नव्हे..आणि असेल तर मारली फाट्यावर तीला. ज्यांना धर्माचं संपूर्ण उच्छेदन-हवं असतं..ते लोक धर्म मानतही नाहीत्/पाळतही नाहीत..आणि आपल्या मताचा प्रसारंही करतात. पण नितिमूल्याच्या आचरणासांठी धर्माची गरज असलेला एक वर्ग समाजात असतो/आहे/आणि असणार.. त्याला वार्यावर सोडणं हे अधमपणाचं लक्षण आहे.. म्हणूनच सावरकर एका बाजुला विज्ञाननिष्ठ निबंध लिहित असले,तरी दुसर्या बाजुला सगळ्यांना मंदिर प्रवेशाचं आंदोलन करतात,धर्मात-सुधारणा करून समता आणायला प्रयत्न करतात. तेंव्हा त्यांना कुणी असा बिनडोक प्रश्न विचारला नाही.. की "एका बाजुनी देवाची खिल्ली आणि टवाळी उडवणारे तुम्ही,त्याच देवाच्या मंदिरात सगळ्यांना प्रवेशाचं आंदोलन कशाला छेडता म्हणून!" . शाहू महाराजांनी तर वैदिक धर्मातल्या याच टनाटनशाहीविरोधात क्षत्रीयातले-दुसरे शंकराचार्य नेमले..धर्मपुरोहित निर्माण केले..तेंव्हा त्यांनाही कुणी वरीलसारखे बिनडोक प्रश्न विचारले..नाही.. विषमता आणि टनाटनीपणा विरुद्धची लढाई अनेक अंगांनी लढायची असते.आणि त्यात विषयनुरुप औचित्य आणि तारतम्य बाळगायचे असते कधी धर्माच्या आत ,कधी बाहेरून...
===================================================
>>> कशाची कशाबरोबर तुलना करावी,याची अक्कल गमावून बसल्याच हे लक्षण आहे.. नाहितर सत्यनारायण आणि सती जाणं या दोन गोष्टी एका पारड्यात तुलनेला कोणताही शाहाणा माणुस घेणार नाही.. यावर भाष्य करावं अशी या विधानाची लायकीच नाही.. त्यामुळे - असोच्च असो!
आणि दुसरं म्हणजे ते फक्त-धर्मसुधारक होते.. मी धर्मसुधारकपुरोहीत आहे... हा फरक तुला कळला तर असले प्रश्न पडणारच नाहीत..अर्थात..कळला---तरच!
31 Oct 2015 - 12:55 am | सूड
हे वाचलं असतंत तर येवढा मोठा निबंध लिहायची गरज पडली नसती हो.
आता तुम्ही माझी अक्कल काढलीत म्हणून मी तुमची काढणं योग्य नाही. पण पारंपारिक असो की आधुनिक सत्यनारायण हा सत्यनारायण आहे. ते आधुनिक वाटावं म्हणून फार तर कथा आजच्या काळाला साजेशी होऊ येऊ शकेल. येवढंच म्हणतोय, की सत्यनारायण ही सत्यपीरापासून उगम पावलेली कथा असून तुमच्यासारखा धर्मसुधारकपुरोहित, आधुनिक असो की पारंपारिक ती करुच कशी शकतो? तुमच्याच भाषेत विचारायचं तर हे धर्म उच्छेदक नाही का? की यासाठी पण धर्मसुधारणेची काही व्याख्या तुमच्या हातात तयार आहे?
31 Oct 2015 - 1:14 am | अत्रुप्त आत्मा
@. पण पारंपारिक असो की आधुनिक सत्यनारायण हा सत्यनारायण आहे. >> हे परत तुझ तू तैयार-करून घेतल.,पारम्पारिक आणि आधुनिक अशी फारकत होऊनही ,हां सत्यनारायण आणि तो सत्यनारायण हा एकच राहतो होय रे ???
@ते आधुनिक वाटावं म्हणून फार तर कथा आजच्या काळाला साजेशी होऊ येऊ शकेल. येवढंच म्हणतोय, की सत्यनारायण ही सत्यपीरापासून उगम पावलेली कथा असून तुमच्यासारखा धर्मसुधारकपुरोहित, आधुनिक असो की पारंपारिक ती करुच कशी शकतो?>> तेच तेच किती वेळा सांगायच तुला? आधुनिक असल्यावर करायला हरकत काय-राहु शकते? सांग बर?
चोरी बंद जाली आणि त्या जागी काष्टानी पैसे कमविन्याच् आधुनिक मूल्य आल.. तर तेच चालु ठेवतात ना?
संपादित: सदस्यांनी वैयक्तिक टिकात्मक प्रतिसाद न देता तारतम्य पाळावे.
30 Oct 2015 - 10:06 pm | सूड
पूर्वीच्या धर्मसुधारकांनी जेव्हा सतीची/केशवपनाची प्रथा बंद केली तेव्हा असं नाही म्हणाले, "या हं बायांनो, आता मी सुधारीत पद्धतीने कसं सती जायचं ते शिकवतो."
30 Oct 2015 - 10:15 pm | टवाळ कार्टा
तो स्काईपवरचा सत्यनारायण अस्तो =))
30 Oct 2015 - 10:16 pm | टवाळ कार्टा
असहमत...गुर्जी...आप्ला फुल्ल सपोर्ट
31 Oct 2015 - 1:28 am | प्रसाद गोडबोले
हा हा . सत्यनारायण कुठल्या वेदात , कोणत्या उपनिशदात , कोणत्या गीतेकि, कोनत्या आरण्यकात येतो तेवढे सांगा तावरुन ठरवु की मी माझे बवलेले मत आहे की सत्य ?
_____________________
आता वैदिक धर्मा विषयी : श्रीमदाद्यशंकराचार्य म्हणतात तसे द्विविधो हि वेदोक्तो धर्मः - प्रवृत्तिलक्षणः निवृत्तिलक्षणश्च ।
आर्यसनातन वैदिक धर्म हा द्विविध अर्थात दोन प्रकारचा आहे , एक प्रवृत्ती पर आणि एक निवृत्ती पर . त्यातील निवूत्तीपर भाग हा केवळ उच्च अधिकारी ज्ञानी योग्यांकरिता आहे मात्र सारेच तसे नसल्याने सर्वसामान्यांकरिता कर्माचा प्रवृत्तीपर मार्ग आहे माऊलींच्या शब्दात सांगायचे झाले तर
तसे देख पा विहंगममते | अधिष्ठुनी ज्ञानाते | सांख्य सद्य मोक्षाते | आकळती ||
येर योगिये कर्माधारे | विहितेंचि निजाचरे | पुर्णता अवसरे | पावते होती ||
सर्वसामान्य लोकांना मोक्षाचा मार्ग गवसावा म्हणुन कर्माचा मार्ग आहे , कर्मकांडे केवळ निमित्त मात्र आहेत , कर्माशी संबंधीत धर्मातील सर्वच गोष्टी यज्ञ , मुर्तीपुजा , वर्णभेद निमित्तमात्र ( आणि योग्य अवस्था प्राप्त झाली की त्याज्यही ) आहेत ... कर्मांच्या आधारे ज्ञानाच्या पातळीला उन्नत होवुन मोकळे होणे हाच आर्य सनातन वैदिक धर्माने आखुन दिलेला सोपा मार्ग आहे :)
पुढील भागात पाहु आर्यसनातन वैदिक तत्वज्ञाचे अतीव सार की ज्या योगे वर कथिलेला सनातन मार्ग अजुन प्रकाशित होईल - " ईशावास्योपनिषद " !!
31 Oct 2015 - 1:46 am | अत्रुप्त आत्मा
@
>> हे बघा ताज उदा हरण अर्धजरती न्यायाच्ं..
बरोब्बर मनुस्मृति गाळलि.
शिवाय निमित्तमात्र साधन म्हणून हे वर्ण आणि कर्मकांड आहेतच ना? त्याची असण्याची लांबी /व्याप्ति काय सांगितालिये हो आचार्यांनी!!!?
किती वर्षानुवर्ष युगानु युगे हे वर्णाश्रम धर्माच लबाड़ लिगाड हिंदू प्रजेच्या गळ्यात त्यांना आवडणाय्रा जातीच्या माध्यमाला शिताफिनि वापरून अड़कवून ठेवलय. मोक्षाची लालूच दाखवून चालु जन्मात तो कधीच साध्य न होऊ देण्याची फंडामेंटल मार्केटिंग ची ही चलाखि..
शिवाय एकहि शंकराचार्य कधीही ब्राम्हणेतर होत नाही..ही तर विषमतेची परमोच्च परमावधि..
किती महत्तम चमत्कार घडवून आणले बर या टनाटनी जुल्मी व्यवस्थेनि!
31 Oct 2015 - 1:58 am | प्यारे१
खरं काय नि खोटं काय ते सांगायचं काम कुणाचं? आजही स्वत:च्या सोयीचा भाग सांगतात ते हेच धर्मपंडीत ना? ज्यात तुम्ही देखील येताय. वर्णाश्रम खरा काय आहे त्यातले दोष काढून सांगता आलं असतं की? सांगितलं नाही दोष कुणाचा?
हक्क हवेत जबाबदार्या नको असणाऱ्या यादीत तुमचं नाव जोडलं जातंय. त्यात आश्चर्य नाहीच्च म्हणा.
31 Oct 2015 - 9:12 am | अत्रुप्त आत्मा
@खरं काय नि खोटं काय ते सांगायचं काम कुणाचं?>>> मग मी काय करतोय???????? का तुम्हाला आवडणारं खरं सांगायचं? असं म्हणताय?
@आजही स्वत:च्या सोयीचा भाग सांगतात ते हेच धर्मपंडीत ना? ज्यात तुम्ही देखील येताय.>> बेलगाम आकलनशून्य आरोप.मी जे बोलतो त्यात माझी झालीच्,तर गैरसोय होते. असो!
@वर्णाश्रम खरा काय आहे त्यातले दोष काढून सांगता आलं असतं की? सांगितलं नाही दोष कुणाचा?>>> इथे यापूर्वीही सांगितलय..अत्ता सांगायचं प्रयोजन नव्हतं पण तरी ऐक हवं तर. चारिही वर्णांना आखुन दिलेली एक व्यवस्था आहे..प्रत्येक वर्णानी धर्मशास्त्रानी सांगितलेलं कर्म करत जीवन जगायचं..मग ते ऐहिक दृष्या खरं/खोटं,बरं/वाइट कसंही असो. प्रत्येक वर्णात रोटी/बेटीबंदी. सगळ्या वर्गातल्या स्त्रीयांना कोणतेही हक्क नाहीत्,फक्त धर्मानी सांगितलेली कर्तव्य न बोलता पाळायची..एका वर्णातला माणूस धर्मशास्त्रानी घालून दिलेल्या लायकिनी कित्तीही बदलला,किंवा बाद झाला..तरीही त्याला दुसर्या वर्णात टाकायची सोय नाही..मुळात वर्णाचे गुण जन्मजात वगैरे काहिहि नसताना.. ते आहेत्च आहेत असं माजोरडेपणानी गृहीत धरून जो ज्या वर्णात जन्मला त्याला मरेपर्यंत त्याच जन्मात डांबुन ठेवायची कडेकोट व्यवस्था म्हणजे हा वर्णाश्रमधर्म आहे. म्हणजे एखादा ब्राम्हण किंवा क्षत्रीय वर्णाच्या बाहेर वागला..तरिही तो आतच राहतो..आणि उलट दुसरा धर्मशास्त्रानी सांगितलेल्या ब्राम्हण/क्षत्रीयत्वासारखा वागला.. तरीही तो बाहेर राहतो..केवळ अमक्या वर्णात जन्मला म्हणून हेच शिक.. येतं का नाही?आवडतं का नाही?लायकी आहे का नाही? याचा संमंधच नाही. ही हुकुमशाही. आजही आपण पोराबाळांचा कल पाहुन त्यांना शिक्षण देतो..डॉक्टरच्या मुलाला डॉक्टरपोटी जन्मला म्हणून डॉक्टर करायला जाण्याचा हा असला वर्णाश्रमी टनाटनी गाढवपणा करत नाही..असे अनेक दोष आहेत..प्राचीन काळापासून याविरोधी हे सगळे आरोप केले गेलेले आहेत..पण पोथीत लिहिलेला हा वर्णाश्रम धर्म एकाही शंकराचार्यानी आणि त्याचे अनुयायी म्हणवणार्यांनी बदलला नाही..तो माणुसकीहीन/आत्मघातक/राष्ट्र्घातक आहे..असं मान्य केलं नाही..स्विकारण तर दूरच..(यापेक्षा अधिक सखोल वाचायच असेल..तर नरहर कुरुंदकरांचं "मनुस्मृती-काही विचार" हे पुस्तक वाचून काढा.. सगळी जळमट दूर होतील..अर्थात इच्छा असेल..तरच! )
@हक्क हवेत जबाबदार्या नको असणाऱ्या यादीत तुमचं नाव जोडलं जातंय. त्यात आश्चर्य नाहीच्च म्हणा.>> असोच्च असो! आपण जाणिवपूर्वक असे आरोप करत फिरावं,याचं तर बिल्कुल आश्चर्य नाही.. मी ब्राम्हणत्वाचे बिनकामाच्या दानदक्षिणा/मान्/नम्स्कार घेत फिरणं इत्यादी तथाकधीत हक्क उपभोगत नाही..(पूजेची कामं करतानाचे शरीर आणि मनाच्या/मेंदुच्या श्रमाचे नाय्य मानवी हक्काचे पैसे घेतो.)बाकिचे हक्क भोगणं कधीच विसर्जीत केलेल आहे. त्यामुळे टनाटनी धर्म सांगत फिरण्याची जबाबदारीच माझ्यासाठी गैरलागू होते..
31 Oct 2015 - 10:14 am | प्रसाद गोडबोले
बरं तुम्ही सांगा मनुस्मृतीचा कालखंड कोणता ? ती वेदांचा उपनिषदांचा भाग आहे म्हणुन तुम्ही तिला आर्यसनातन वैदिक धर्मात घालता आणि सनातन धर्मावर वात्टेल ती टीका करता ?
हेच हेच ते अभ्यास नसताना पुर्वग्रहांनी टीका केली की असेच होते . आचार्यांचे मनीषापंचक नावाचे अप्रतिम स्त्रोत्र वाचले नाही काय ? ही घ्या लिन्क :: जेव्हा काशीत आचार्य गंगेवर स्नान करुन येत होते तेव्हा वाटेत एक चांडाळ आडवा आला , आचाय म्हणाले अप सर अप सर , तेव्हा चांडाळाने विचारले की नक्की कोणाला अपसर म्हण्त आहात , देहाला की आत्म्याला ? कारण देहाचे बोलत असाल तर तो दोघांचाही पंचभौतिक आहे आणि आत्म्याचे बोलत असाल तर तो दोघांचाही एकच आहे , तेव्हा आचार्यांनी तिथे स्पष्ट म्हणले आहे की ज्याचे ज्ञान इतके सुदृढ झाले आहे तो ब्राह्मण असो वा चांडाळ , माझ्या साठी गुरुच आहे !! ! प्रतिसादमालेत पुढे ह्या विषयीही लिहिनच .
शिवाय श्रीमद आचार्यांन्नी केवळ बौध्द धर्ममताचे खंदन केले आहे असे नाही तर त्यांनी कर्मकांद प्रधान मीमांसकांचेही खंडन केले आहे ! त्यांच्या मंडनमिश्र ह्यांच्याशी झालेला वाद पहा .
(संपादित)
आता आर्यसनातन वैदिक धर्माबद्दल :
ईशावास्योपनिषद हे आर्य सनातन वैदिक धर्मातील एक अत्यंत छोटेखानी पुस्तक फक्त १८ श्लोक पण तरीही सर्व उपनिषदातील सर्वात महत्वाचे . त्यातही पहिले दोन श्लोक समजले की झाले . पहिला श्लोक म्हणजे धर्माचे तत्वज्ञान आणि दुसरा श्लोक म्हणजे ते तत्वज्ञान आचरणात कसे आणायचे ह्या विषयीचे मार्गदर्शन :
ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्। तेन त्यक्तेन भुञ्जीथा:मा गृध: कस्यस्विद्धनम्।।
=> या जगातील यःकिंचित अशा प्रत्येक गोष्टीत ईश्वराचे वास्तव्य आहे म्हणुनच ह्या भौतिक जगाचा त्यागपुर्वक भोग घ्या कशातही गुंतुन पडु नका कारण ह्या आसक्तीने आजवर धन संपत्ती पैसा कोणाचा झालाय ?( अर्थात कोणाचाच नाही )
आता हे आचरणात आणायचे तर कसे , तर हे पहा :
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः. एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ।।
अशा प्रकारे अनासक्तीने १०० वर्षे जगण्याची इछ्छा मनात धरुन कर्मे करत रहा , ह्या शिवाय मोक्षाचा दुसरा कोणताच उपाय नाही , पण काळजी करु नका कारण अशा प्रकारे कर्मे केल्याने तुम्हाला कर्मफल लागणार नाही !
इथे परत एकदा तेच अधोरेखित होत आहे की करे कर्मकांडे केवळ निमित्त मात्र आहे , आपण कोणत्याही वर्णाचे असा काहीही फरक पडत नाही , आर्यसनातन वैदिक धर्माच्या मते अनासक्तीने कर्म करणारा प्रत्येक् जण मुक्तच असतो !!
31 Oct 2015 - 10:21 am | प्रसाद गोडबोले
स्वसंपादन : मनीषापंचकाची लिन्क ( इंग्लिश भाषांतरा सहित )
http://sanskritdocuments.org/doc_z_misc_shankara/manishhaa5.html?lang=sa
31 Oct 2015 - 11:30 am | अत्रुप्त आत्मा
अनासक्ति नी करायची "कर्म" म्हणजे शुद्ध नैतिक आचारणाची कर्म सांगितालियेत् अस तुला म्हणायचय का?
31 Oct 2015 - 3:04 pm | राही
अ. आ. त्यांच्या व्यवसायात कालानुरूप बदल करू पाहाताहेत तर चांगलंच आहे की. प्रत्येकाने आपलं अंगण स्वच्छ केलं तरी खूप ना? शिवाय ते स्वतः वेदविद् असल्याचा दावाही करीत नाहीयेत. याज्ञिकीपुरतं ज्ञान त्यांचं आहे आणि त्यांच्या व्यवसायाला ते पुरेसं आहे. केवळ पूजामंत्र संस्कृतात आहेत म्हणून पूजा सांगणार्याने अख्खा अमरकोश किंवा अष्टाध्यायी किंवा वेदोपनिषदे पढलेली असणे आवश्यक नाही.
सामाजिक विषमता ही एका पिढीत नाहीशी होणारी गोष्ट नाही. पण कुठेतरी सुरुवात व्हायला हवी ना? ती त्यांनी स्वतःपुरती केलेली दिसते. त्यांची वृत्ती आहे ती त्यांनी अवश्य पाळावी. ते स्वतः जाऊन कुणाला सांगत नाहीयेत ना की बाबा अमुक अमुक पूजा तू कर म्हणून? उलट आज यजमान मागे लागतात तरतर्हेच्या पूजा आणि व्रतांसाठी. त्यामुळे गुरुजी दुर्मीळ झालेत. तरीसुद्धा अशा व्रतांद्वारे थोडेतरी प्रबोधन करण्याची संधी ते साधत असतील तर ठीकच आहे ना?
आणि वर्णजातिव्यवस्थेविरुद्ध ते पोटतिडीकीने बोलतात तेही मला दांभिक वाटत नाही.
तसेही कर्मकांडांमध्ये कितीतरी बदल आपल्यानकळत घडून आले आहेत. वेदकाळात जी व्रते होती असतील ती आज नाहीत. काही नवी व्रते निर्माण झाली आहेत, जुनी मागे पडली आहेत. दर अमावास्येला तर्पण आता कोणी करत नाही. पार्थिवगणपतिपूजनात गणपतीची सुपारी कोणी मांडत नाहीत. एव्हढेच नव्हे तर गणपतिपूजेत दूध, दही, मध, साखर, तूप यांनी देवाला स्नान घडवताना या प्रत्येक स्नानानंतर शुद्धोदकस्नानं समर्पयामि, आचमनीयम समर्पयामि वगैरे न म्हणता एकदम सर्व स्नाने संपल्यावर म्हणतात. अशी काटछाट आवश्यक बनली आहे कारण ठराविक काळात अनेक पूजा 'आटपायच्या' असतात.
तेव्हा हे अटळ आहे. अ.आ. गुरुजींनी नाही केले तर दुसरे कोणी करतील. पण बदल होतच राहाणार.
गुरुजी, तुम आगे बढो. कभी ना कभी बाकी सब भी साथ आएंगे ही.
31 Oct 2015 - 3:50 pm | नाव आडनाव
गुरुजी, तुम आगे बढो. कभी ना कभी बाकी सब भी साथ आएंगे ही.
लै वेळा +
31 Oct 2015 - 5:17 pm | अत्रुप्त आत्मा
धन्यवाद राही.. कदाचित हे सगळ या आरोपकांनाही कळत असतं. पण पण मग हे मान्य केलं तर मूळ धर्म चान चान आहे,बाकिच्यांनी तो घाण केला ही सोइस्कर बोंब त्यांना ठोकता येत नाही..हा स्वमतांधदांभिकपणा निरनिराळ्या धर्मातल्या अनेकांनी यापूर्विही करून पाहिला आहे..आणि तोंडावर आपटले आहेत. नुसतं चातुवर्ण्य हे धर्मातल्या प्रत्येक अंगात मंत्रानी,आशयानी कृतीनी समाविष्ट झालेलं आहे...हे सत्यही त्यांना मान्य करवत नाही..केलच तर परत मूळ चातुर्वण्य त्याच्या फेवरेट एके काळी चान चान होतं.. ही बोंब मारायला मोकळे होतात. कुरुंदकरांच्या मनुवरच्या पुस्तकात या सगळ्या टवाळांची बिंग फोडलेली आहेत...म्हणूनच त्याचा प्रतिवाद लिहा म्हणलं..की लावायच्या जागी पाय लाऊन हे भ्याड टनाटनी पळून जातात.
1 Nov 2015 - 1:27 am | प्रसाद गोडबोले
हा हा . भाषा पहा ह्यांची ! असो !
सर्वप्रथम मनुस्मृती हा आर्य सनातन वैदिक धर्माचा भागच नाही वैदिक काळात फक्त आणि फक्त वेद ष्ड्दर्शने आणि उपनिषदे हेच आर्यसनातन धर्माचे मुख्य ग्रंथ होते .
मनुस्मृतीच्या नावाने आर्यसनातन वैदिक धर्माला टनाटन म्हणुन उल्लेखणे ही सरळ सरळ स्वमतांध दांभिकता आहे आणि ती जास्तीत जास्त लोकांच्यापुढे आली पाहिजे !
आणि आता फक्त राही ह्यांच्या साठी प्रश्ण : आपण सत्यनारायण पुजेची पोथी वाचली आहे का आणि आपण आर्यसनातन वैदिक धर्मातील किमान भगवदगीता ईशावास्योपनिषद वाचले आहे का ? आपण जरुर वाचा ...
सत्य नारायण ही सरळ सरळ प्रक्षिप्त कथा आहे आणि अनेक समाज सुधारक म्हणतात तसे बामणांच्या ढ पोरांसाठी चालवलेली रोजगार हमी योजना आहे ह्यात तिळमात्र शंका नाही ! आर्यसनातन वैदिक म्हणुन मी आपणाला सांगतो कि त्या कथेत एक टक्काही वैदिक तत्वज्ञानाचा अंश नाही .
मग आता आपण सांगा सत्यनारायण चालु ठेवुन सनातन धर्माला टनाटन म्हणणे ही कोणती वृत्ती ? मुळातच सत्यनारायण आणि मनुस्मृती वैदिक नाही तरीही त्याच्यावरुन हे सनातन वैदिक धर्माला नावे ठेवुन पुरोगामित्वाची शाल पांघरतात आता ह्याला काय म्हणावे ??
___________________________________
आता आर्यसनातन वैदिक धर्माविषयी :
आर्यसनातन वैदिक धर्माशी संबंधित मुख्य ग्रंथांची यादी :
१)सार्या वेदांच्या शेवटी शेवटी येणारी तत्वज्ञान प्रधान १८ मुख्य उपनिषदे : त्यातील ईशावास्योपनिषद महत्वाचे २)भगवदगीता : महाभारतातील अप्रतिम प्रकरण सार्या आर्यसनातन वैदिक धर्माचे सार ! ( चौथ्या अध्यायानंतरचा काहीचा भाग कदाचित प्रक्षिप्त )
३) बादरायणाची ब्रह्मसुत्रे : अत्यंत संक्षिप्त आणि गहन तत्वज्ञान . मार्गदर्शनाशिवाय समजणे जवळपास अशक्य !
आणि ह्या सर्वांवरील आचार्यांची सविस्तर भाष्ये !
अर्थात हे सारे समजणे फार अवघड असले तरी आपल्या संतांनी डोंगरा येवढे उपकार करुन सारे मराठीत करुन ठेवले आहेच : विशेष करुन ज्ञानेश्वरी , दासबोध , तुकोबांचे काही ज्ञानपर अभंग महत्वाचे . अमृतानुभव चांगदेवपाशष्टी आणि आत्माराम सार्याचे सार !
ज्यांना मराठी कळत नसेल त्यांच्या साठी स्वामी विवेकानंदांची अद्वैत तत्वज्ञावरील इंग्रजीतील प्रवचने आहेतच !
मनुस्मृती आणि सत्यनारायण वगैरे इर्रीलेव्हंट उदाहरणे देवुन कोणी जर तुमचा आर्य सनातन वैदिक धर्माविषयी बुध्दीभेद करीत असेल तर त्याला जरुर सांगा की हे आर्यसनातन वैदिक धर्माचा भागच नाहीत !
1 Nov 2015 - 1:40 am | प्रसाद गोडबोले
आणि हो नुकत्याच झालेल्या एक चर्चेत खाली मुद्दा उपस्थित झाला :
त्याला मी दिलेले प्रामाणिक उत्तर सर्वांच्या रेफरन करिता येथे क्वोट करुन ठेवत आहे :
ठीक आहे , त्याची मते त्याच्यापाशी ! फक्त आर्य सनातन वैदिक धर्माचा टनाटन म्हणुन उल्लेख जोवर होत राहील तोवर ही स्वमतांध दांभिकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी अन लोकांनी उगाच आर्य सनातन धर्माविषयी गैरसमज करुन घेवु नयेत इतकीच माझी इच्छा आहे :)
काही अगातिकनारायण खुशाल चालु राहु दे आम्हाला त्याच्याशी काही घेणे देने नाही . अगदी रोह उठुन मनुस्मृतीला लाखोल्या वहा... रोज एक प्रत विकत घेवुन जाळा , आम्हाला शष्प काहीही वाटणार नाही , मात्र जे आर्य सनातन वैदिक धर्मात मुलातच नाही त्याच्यावरुन सनातन धर्मावर राळ उडवणे हा प्रकार थांबायला हवे इतकेच मनापासुन वाटते बस्स :)
धन्यवाद !!
1 Nov 2015 - 2:37 am | अत्रुप्त आत्मा
@मनुस्मृती आणि सत्यनारायण वगैरे इर्रीलेव्हंट उदाहरणे देवुन कोणी जर तुमचा आर्य सनातन वैदिक धर्माविषयी बुध्दीभेद करीत असेल तर त्याला जरुर सांगा की हे आर्यसनातन वैदिक धर्माचा भागच नाहीत ! >> हे तू कित्तीही छाती पिटून बोललास तरी त्याचा काहिही उपयोग नाही. मनुस्मृती हा वैदिक्धर्मसूत्रातून जन्मपावलेला ग्रंथ आहे...याविषयावर डॉ.आ,ह.साळुंखे..यांनीच वैदिकधर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी नावाचे पुस्तक लिहिले आहे..ज्यात हे सर्व पुराव्यांसह मुद्देसूद आलेलं आहे..(अजुन एक पुस्तक त्यांचच आहे- मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती ,त्यातही या टनाटन फ्राय डिशच अंतरंग उघड केलेल आहे) करणार का त्याचा प्रतिवाद??? कर बरं.. तूच काय मी आमच्या ज्या ज्या वैदिकपंडींताना प्रतिवाद करा म्हणून सांगितलं..त्यातल्या एकानेही हा प्रतिवाद केलेला नाही..आणि त्या पुस्तकाला खोटंही ठरवू शकलेले नाहीत..उलट काहि जणांनी रागानी तर काहि जणांनी गिल्ट मुळे साळुंखे हे वैदिकधर्माच्या अभ्यासाबाबत सखोल आहेत.. असं गुपचूप मान्य केलेलं आहे.. आणि वैदिक धर्म..., धर्म/अर्थ/काम्/मोक्ष्याच्या समाजनियमनासाठी कसा वापरावा..? या चिंतेतूनच ही मनुस्मृती तयार झालेली आहे.. हे नियम समाजजीवनात वैदिक धर्माचा भाग म्हणून आचार धर्म म्हणूनच होते..त्याला मानवधर्मशास्त्र इत्यादी नावेही होती.. ते पुढे भृगुने आणि नंतर मनु या नावाने संग्रहीत करण्यात आले..
पुन्हा चॅलेंज देतो..तू जे जे तुझ्या मनानी आणि स्वमतांध दांभिकतेनी म्हणतो,ते एकातरी शंकराचार्याण्ना मान्य आहे का? जा त्यांच्याकडे...आणि लिइहुन आण...मनुस्मृती वैदिक धर्माचा भाग नाही म्हणून...जा...आहे का तयारी..तुझं तू एकट्यानी वाट्टेल ते ठरवून्,त्याला तुमच्याच वैदिक धार्मिकांच्या जगात त्याला केराइतकिही किंमत नाही..म्हणूनच ते अस्विकार्य आणि दखलपात्र रहात नाही..हे लक्षात ठेव
आपला आपण तयार करायचा कोष,आणि वर म्हणायच हाच खरा सनातनी परिपोष... अरे व्वा रे व्वा!
1 Nov 2015 - 8:41 am | प्रचेतस
तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत नाही काय?
बाकी जसा मनुस्मृती हा वेदप्रणीत तत्वज्ञानाचा भाग नाही त्याचप्रमाणे भगवद्गीतासुद्धा वेदप्रणीत तत्वज्ञानाचा भाग नाही नाहीतर सुरुवातीपासून श्रीभगवानउवाच आलंच नसतं.
1 Nov 2015 - 6:10 pm | सतिश गावडे
किती काळजी करता तुम्ही मित्रांची.
1 Nov 2015 - 6:13 pm | अभ्या..
ह्याह्याह्या. मित्रांची नव्हे ओ. संस्थळाची. ;)
2 Nov 2015 - 11:35 pm | सतिश गावडे
त्याशिवाय का जेमतेम एका महिन्याचे मिपावय असलेला आयडीसुद्धा यांच्याबद्दल कौतुकाने लिहितो:
2 Nov 2015 - 2:48 pm | सूड
माताय, येवढी चर्चा झाली पण शेवटपर्यंत सत्यपीराच्या कथेवरुन निर्माण झालेली सत्यनारायणाची कथा तथाकथित धर्मसुधारकांना कशी मान्य होते याचं उत्तर मिळालं नाही. ह्याला म्हणतात व्हेन यु कान्ट कन्व्हिन्स देन कन्फ्यूज!
असो.
2 Nov 2015 - 7:40 pm | अत्रुप्त आत्मा
@धर्मसुधारकांना कशी मान्य होते याचं उत्तर मिळालं नाही. >> अमान्य आहे अस मान्य करूनच -पुढे गेलेलो आहे.. पण हे गैरसोइच उत्तर मान्य करायच जेंव्हा जाणीव पूर्वक नाकरल जात,तेंव्हा ..त्याला म्हणतात ................असो!
2 Nov 2015 - 10:13 pm | सूड
येवढंच हवं होतं.एवढे दोन शब्द लिहीले असतेत तरी पुरलं असतं.
2 Nov 2015 - 11:26 pm | अत्रुप्त आत्मा
आधीच्या सर्व अनुषंगिक प्रतिसादांचा आशय याच अर्थाचा होता.. तो तुला अत्ता तसे प्रत्यक्ष शब्द वापरल्यावर कळला...
3 Nov 2015 - 2:59 am | प्यारे१
तिरकस प्रतिसाददाते बुवा.
3 Nov 2015 - 8:40 am | अत्रुप्त आत्मा
निरर्थक प्यारे वन्नी मावा! ;)
Llllllluuuuu :p
3 Nov 2015 - 8:54 am | प्रचेतस
ते अण्णाव म्हणजे काय हो सांगा ना एकदा.
3 Nov 2015 - 11:58 am | प्यारे१
आगलावे अगोबा!
3 Nov 2015 - 12:18 pm | अत्रुप्त आत्मा
@ते अण्णाव म्हणजे काय हो सांगा ना एकदा.>>> असोच्च असो!
3 Nov 2015 - 2:58 pm | जातवेद
हे किती बारिक होऊ शकतय म्हणे?
3 Nov 2015 - 3:00 pm | प्यारे१
ते तुमच्या कपेकिटि वर अवलंबून आहे.
3 Nov 2015 - 3:16 pm | टवाळ कार्टा
याचे टेस्टिंग आधी झालेले आहे...बिंगांण्णा जोशी दुवा देतील =))
30 Oct 2015 - 8:33 pm | प्रचेतस
'अण्णाव' हा शब्द अगदी काळजाला भिडला.
29 Oct 2015 - 9:11 pm | चित्रगुप्त
ऊठसूठ प्रत्येक गोष्टीला "वैज्ञानिक" निकष लावण्याची गरज नाही हे खरे, तरी गोत्र म्हणजे मुळात काय आहे ? अमूक ऋषी वगैरे सांगितले जाते ते ऐकून वाटते, च्यामारी पूर्वी सगळे ऋषिच ऋषि होते की काय , सर्वसामान्य लोक नव्हतेच्च ? कुणी कुणी तर डायरेक्ट सूर्य वा चंद्राचेच वंशज म्हणवले जातात . ये क्या माजरा है, किसे कुछ पता है ?
29 Oct 2015 - 11:21 pm | दिवाकर कुलकर्णी
जन्मानं जशी जात चिकटते
तसं गोत्रहि चिकटतं
रक्ताचे गट ,डी एन् ए
इ.लैबोरेटरीतून जसे तपासून मिळू शकतात
तसे गोत्र तपासून मिळते काय
दत्तक गेल्यास गोत्र बदलते,
गोत्र बित्र सब बकवास आहे
वंश व्रुध्दि होतं असताना अनेक वेळेला
संकर झालेला असू शकतो,नव्हे
निसर्गहि गुणसुत्रे बदलतो,
वाण बदलत राहतो,
मिपा सारख्या सकस ,ज्ञानी संस्थळावर याची चर्चा होऊ
शकते याचे मला नवल वाटते
30 Oct 2015 - 1:00 am | अभ्या..
येणारे येणारे. ह्याच रूटने गोत्रे वगैरे करत करत चर्चा शुध्द्लेखनापर्यंत येऊन ठेपणारे.
30 Oct 2015 - 12:08 pm | Sanjay Uwach
तसे पाहीले तर धार्मिक विधी शिवाय मला गोत्र सांगण्याची पाळी, माझ्यावर कधी आलीच नाही. मात्र माझे गोत्र मी कधीच विसरू शकत नाही. य़ाचे प्रामुख्याने महत्वाचे कारण कि, ज्या ज्या वेळी अमच्या गोत्राचा विषय निघतो,त्या त्या वेळी, मला ते डोळ्या समोर केविलवाणे चित्र उभे राहते . ती काकुळतीला येउन रडत,हातात नुकतेच जन्मलेले बाळ घेऊन माझ्या दादाजींना विनवण्या करणारी ती स्वर्गातील मेनका आणि तिला तितक्याच निष्ठुर पणे नाहीss नाहीss म्हणून सांगणारे माझे दादाजी . महापराक्रमी "विश्वामित्र ", रवि वर्म्याचे ते प्रसिद्ध चित्र डोळ्यासमोर तसेच्या तसे उभाराहते. बाकीचे लोक मोठ्या कौतुकाने सांगतात "काश्मीर हमारे दादाजिने बसाया " आणि मी मात्र " अहो आजोबा ,काय हे" ? !!!
30 Oct 2015 - 3:57 pm | कुसुमिता१
आवडल हे!
31 Oct 2015 - 2:47 am | चित्रगुप्त
सांप्रतकाळी हिंदुस्थानातील एतद्देशीत नेटिवांस आपण कुणा थोर पूर्वजापासोन निपजलो, असे सिद्ध करण्याचा सोस फार. कुणी आपली ज्ञाति सूर्यापासोन निर्माण जाली म्हणतो तो कोणी चंद्रापासोन. आम्ही अमक्या ऋषीपासोन उद्भवलो, असे म्हणणारांची वानवा म्हणून नाही. बरे, तिकडे गोरे टोपीकरदेखील या बाबतीत एतद्देशियांच्या मागे तसूभर देखील नाहीत. कुणी आपले मूळ कुण्या मतब्बर ड्यूकापर्यंत नेतो, कोणी एकाद्या अर्लापर्यंत वा ब्यारनापर्यंत तर कुणी आपण अमक्या लार्डाचे वंशज असे छातीठोकपणे सांगतो. सरतेशेवटी एक डार्विन साहेबच काय ते आपले 'मर्कटगोत्र' असल्याचे मान्य करितात. तथापि पुढे त्यांजला देखिल यात कमीपणा वाटू लागला म्हणून की काय, अखिल मानवजात हीच मर्कटगोत्री असल्याचे त्यांणि नाना बुके लिहून लोकांचे चित्तात ठसविणे चालविले. यास त्यांणि 'उत्क्रांति' असे नाव दिल्हे.
31 Oct 2015 - 3:01 pm | अनुप ढेरे
चित्रगुप्तजी, तुमचा विविध चित्र असलेला लेखा आला नाही बरेच दिवसांत. सत्यनारायण थीम घेउन लिहा एखादा लेख!
31 Oct 2015 - 10:09 am | प्रकाश घाटपांडे
गोत्र प्रपंच हा केवळ विवाह करताना आपण सगोत्र तर करत नाही ना? या प्रश्नाशी निगडीत आहे. सगोत्र विवाह केला तर संततीत वैगुण्य येउ शकते या गोष्टीच्या भयामुळे हे कटाक्षाने पाहिले जाते. पण आता इतक्या पिढ्या झाल्या आहेत कि त्या सगोत्र प्रकारात काही अर्थ राहिला नाही. सरळ लग्नापूर्वी वैद्यकीय तपासणी करुन घ्या हे उत्तम. मॅरेज कौन्सिलर ची मदत घ्या. त्यामुळे तुमची मानसिक कुंडली जमेल का? याचे उत्तर शोधायला मदत होईल.
शेवटी लग्न हा एक प्रकारचा जुगार आहे हे लक्षात ठेवा.
1 Nov 2015 - 1:48 am | सुबोध खरे
@अत्रुप्त गुरुजि
गुरुजी
माझ्याकडे सुद्धा असे रुग्ण येतात ज्यांना मुतखडा आहे. कुठले तरी झाडपाल्याचे औषध घेऊन येतात आणि सांगतात आम्हाला सोनोग्राफी करून बघायचे आहे कि खडा गेला आहे का? मी त्यांना सांगतो असे झाडपाल्याने चार दिवसात मुतखडे जात नाहीत. तुम्हाला मला पैसे द्यायचे असतील तर माझी ना नाही पण त्याचा उपयोग होणार नाही हे आधीच सांगतो. तरी बरेचसे लोक हट्टी पणाने आम्हाला सोनोग्राफी करायची आहे सांगतात. मग मी सोनोग्राफी करतो आणि निश्शंकपणे पैसे हि घेतो.
गमतीची गोष्ट म्हणजे हेच लोक उलटे बाहेर इतरांना सांगताना आढळले कि ते डॉक्टर फार चांगले आहेत.पैसेकाढू नाहीत. उलट सोनोग्राफी करू नका असेच सांगत होते. फुकटची प्रसिद्धी पण मिळते आणि चार अजून ग्राहकही येतात.
जोवर तुम्ही लोकांना फसवत नाही आणि स्वच्छपणे सांगता तोवर त्यात गैर काही नाही.
तुम्ही दिवसभर लोकांना फसवू शकता पण दिवसाअखेरीस स्वतःला फसवू शकत नाही.
3 Nov 2015 - 2:23 pm | रंगासेठ
अगदी सहमत!
3 Nov 2015 - 3:03 pm | जातवेद
ते जोशी विहीर वाले असा दावा करतात.
5 Nov 2015 - 12:23 pm | अर्धवटराव
तत्कालीन परिस्थीतीत सोनोग्राफी कितीही अनावश्यक वाटली तरी सोनोग्राफी एक वैद्यकीय उपचार म्हणुन नेहमी वैधच राहाते. आणि एक डॉक्टर म्हणुन अनुभवाने तुम्हाला कितीही खात्री असेल कि सध्या सोनोग्राफीचा काहिही उपयोग नाहि तरी त्यात १% का होईना, काहि अपावादात्मक बरे-वाईट रिझल्ट्स दिसण्याचे चान्सेस असतातच.
पण आपला व्यवसाय शुद्ध थापाबाजीचा आहे असं मनाला वाटत असताना ग्राहकाने आग्रह केला म्हणुन आपण ति सेवा द्यावी हि शुद्ध फसवणुक आहे... स्वतःची आणि ग्राहकांची सुद्धा. मग त्यात स्वतःला सुधारकी म्हणणं, सुधारकी अभ्यासाचे दाखले देणं वगैरे गिल्टी कॉन्शसचा प्रकार असतो बाकी काहि नाहि. अंधार विकणार्याने सावलीचा उपयोग प्रकाशाची जाहिरात करायला वापरु नये.
1 Nov 2015 - 8:57 am | अजया
अगदी सहमत.राही यांचा प्रतिसादही आवडला.
1 Nov 2015 - 1:43 pm | याॅर्कर
.
.
.
.
.
.
.
(उजव्या,डाव्या आणि मधल्या विचारांचा याॅर्कर)
1 Nov 2015 - 11:13 pm | दिवाकर कुलकर्णी
अ.गुरुजी ---
सुंदर चिंतन
तुम्ही दिवसभर लोकांना फसवू शकता पण दिवसाअखेरीस स्वतःला फसवू शकत नाही,
2 Nov 2015 - 10:22 am | राही
प्र्गो, सत्यनारायणपोथी, भगवद्गीता अथवा इशावास्योपनिषद यापैकी काहीही मी वाचलेले नाही असे तुम्ही खुशाल गृहीत धरू शकता. पण मुद्दा तो नाही. धर्मतत्त्वे आणि धर्मकांडे यात जो फरक आहे तो सर्वसामान्य जनता जाणत नाही. धर्मकर्मकांडे हाच खरा आचरणीय धर्म असेच ती मानत असते. 'प्रक्षिप्त' या संज्ञेस पात्र असण्यासाठी एखादे कर्मकांड किती जुने असावयास हवे आणि ते कोण ठरवणार? सत्यनारायणकथा उघडच गेल्या एकदोन शतकांतली आहे. पण हिंदु धर्मातली बहुतेक सगळी व्रतेवैकल्ये, उत्सव, उपासना, पंथ (उदा. वारकरी, दत्त संप्रदाय, हनुमान चालिसा, करवाँ चौथ, सोळा सोमवार, संतोषी माता, मार्गशीर्ष गुरुवार,संकष्टी-एकादशी वगैरे) हे तसेच नाहीत का? एकदोन शतकांऐवजी दहापंधरा शतके धरूया हवे तर. गुरुजींची जरूरी या अशा कर्मकांडांसाठीच असते. उपनिषदांचा अर्थ सांगण्यासाठी नाही. आणि 'सनातन' किंवा 'सनातनी' या शब्दाचा सध्याचा वापर कर्मठपणा अथवा कर्मठ लोक या अर्थानेच जास्त करून होतो. बहुतेक सर्व संत-सुधारकांचा विचार हा कर्मकांडे कमी व्हावीत असाच असतो. पण हे जादूची कांडी फिरवल्यासारखे एकदम होणार नाही हेही त्यांना ठाऊक असते. त्यांच्या परीने ते एक पायवाट मळून देतात. सर्वच जण त्यावरून चालतीलच असे नाही, किंबहुना फारच थोडे जण त्यावरून चालतात आणि ती पायवाट वहिवाटीत न राहून बुजून जाते. पुन्हा कोणीतरी संत जन्मास येतो आणि ती वाट रुळवून देतो. असे हे अंकलिपी गिरवणे आजतागायत चालू आहे.
श्रुतीस्मृती, उपनिषदे, हे ज्ञान ९९ % जनता जाणत नाही. या साठी काय करावे? खरा धर्म कसा प्रचलित करावा? गुरुजींची जरूरीच राहाणार नाही अशासाठी कर्मकांडांना बाहेर कसे फेकून द्यावे?
हे खरे प्रश्न आहेत.
2 Nov 2015 - 7:19 pm | दिवाकर कुलकर्णी
चर्चा भरकटते
गोत्र प्रकारावर वर्तमानात फुली मारली पाहिजे
प्रत्येक चर्चा धर्म अधर्म कि निधर्म इकडं नेल्याशिवाय ,
मिपाकराना मजा येत नाही एकूण
2 Nov 2015 - 8:12 pm | चित्रगुप्त
मोडी भाषा आता अस्तंगत झाली, परंतु जुना इतिहास, कागदपत्रे समजून घेण्याइतपत तरी टिकून राहिली पाहिजे, तसेच गोत्रांविषयी व्यवस्थित माहिती उपलब्ध असली पाहिजे.
3 Nov 2015 - 6:09 pm | बॅटमॅन
शंभरी भरणार्या आणि शतक मारणार्या अशा दोन्ही धाग्यांचे गोत्र कुठले असते म्हणे?
3 Nov 2015 - 7:09 pm | अत्रे
पण एवढे होऊनही काही मूळ प्रश्न अजून अनुत्तरित आहेत :)
4 Nov 2015 - 4:52 pm | नितीनचंद्र
वेदोक्त संस्कार आनि आजचे लग्नाचे विधी यात खुप अंतर पडले आहे. याला कारण रुढी आहे. अनेक विधी अनेक प्रांतातुन तिथल्या पध्दती म्हणुन येतात. जर अश्या विधी किंवा प्रथांचे समाजाला वावडे नाही तर सत्यनारायणाची काय अडचण आहे ?
खरतर पेशवाई पर्यंत सत्यनारायण नव्हता हे मान्य केले तरी काही तरी धार्मिक विधी घरात व्हावा. कमी तयारी करावा लागणारा, यज्ञ नसलेला विधी म्हणुन सत्यनारायण प्रथेत जोडला गेला इतकेच.
आजही अगदी ब्राह्मणांनी तरी किमान सत्यनारायण केलाच पाहिजे असे बंधन नाही. मग ज्यांची श्रध्दा आहे अश्यांना असे जाहीर रित्या का झोडता ? आपण फार पुरोगामी आहोत हे दाखविण्यासाठीच ना ? हा सुध्दा दाभिंक पणाच आहे.
4 Nov 2015 - 5:11 pm | सूड
ओ तात्या!! मुस्लिम सत्यपीरावरुन आलेली कथा हिंदू-हिंदू करणार्यांना कशी चालते एवढा सोपा प्रश्न होता. लोकसत्ताची लिंक वाचली असतीत तर बरं झालं असतं.
4 Nov 2015 - 5:38 pm | नितीनचंद्र
आजही कोल्हापुरच्या अंबाबाईला जाऊन पहा तुम्हाला एक तरी बुरखावाली स्त्री सापडेल. सत्य पीरच काय पीर परस्तीच जिथे मुस्लीम धर्माला मान्य नाही तिथे सत्य पीर हे सत्यनारायणाचे स्वरुप आहे हे समजायला वेळ लागत नाही.
उत्तर प्रदेशात एक बिंदुमाधव मशीद आहे. मशीदी मशीदीतला फरक ओळखण्यासाठी काहीतरी नाव पाहिजे म्हणुन हे नाव आले आहे. किंवा ती मशीद बिदुमाधवाचे मंदीर पाडुन बांधले असेल.
हिंदु धर्म फार पुरातन आहे. एक मेव असा धर्म आहे ज्यात सहा दर्शने आहेत ज्यातुन परमेश्वराच्या अस्तित्वाचे आणि उपासना पध्दतीचे दर्शन होते. १५०० वर्षांपुर्वी जन्माला आलेला आणि ज्यु लोकांचे संस्कार कॉपी मारणार धर्म हिंदुना काय शिकवणार ?
लोकसत्ता आणि म. टा यांची हयात गेली असले बुध्दी भ्रम करणारे लेख लिहुन.
तुमच्या विषयी राग नाही पण धार्मिकांना धोपटु नका इतकीच विनंती.
4 Nov 2015 - 5:51 pm | बॅटमॅन
बाकीचं माहिती नाही पण ते सत्यपीर वगैरे प्रकार त्याच धर्माच्या लोकांच्या अनुकरणातून आलेत. जर असं नसतं, तर सत्यनारायण पूजेचे जुने कुठेच उल्लेख का सापडत नाहीत म्हणे? की इथे "प्रत्येक गोष्टीला पुरावा नसतो" असे वाक्य फेकून काहीही खपवू पाहणार? तसेच असेल तर मी न्यूटनचा बाप आणि आईन्स्टाईनचा आज्जा तसेच ओबामाचा बॉस आहे. पुरावा विचारायचं काम नाही.
4 Nov 2015 - 5:57 pm | प्यारे१
बॅटमॅन बहु-उद्योगावर विश्वास ठेवणारा आहे. ;)
4 Nov 2015 - 7:06 pm | टवाळ कार्टा
=))
5 Nov 2015 - 12:05 pm | कैलासवासी सोन्याबापु
=)) =))
सात्विक संतापी बॅटमॅन!!
भाऊ बॅटमॅन साहेब
नितिनभाऊंचा क्लेम हा बरेच "ते आमचेच आहेत मुळचे" वळणाचा वाटला न तुमचा प्रतिसाद षटकार इतके नोंदवून चार शब्द संपवतो माझे
(धर्माबाबतीत नॉनरेजिमेंटेड) बाप्या
4 Nov 2015 - 6:03 pm | सूड
4 Nov 2015 - 6:06 pm | बॅटमॅन
आयला म्हणजे "सौ टके की बात" म्हंजे मिसेस टका यांचे विचार की काय?
4 Nov 2015 - 7:07 pm | टवाळ कार्टा
ओफ्चोउर्चे
4 Nov 2015 - 8:45 pm | सूड
ते ओफ्चोउर्से असं आहे.
6 Nov 2015 - 1:45 pm | टवाळ कार्टा
ब्रोब्र
4 Nov 2015 - 7:16 pm | अत्रुप्त आत्मा
आगागागागागा!!!
4 Nov 2015 - 9:36 pm | बाबा पाटील
शुद्ध मराठीत भाषांतर कोणी करेल काय ?
5 Nov 2015 - 2:34 pm | नितीनचंद्र
माझे म्हणणे इतकेच आहे की सत्यनारायणाचा उल्लेख जुन्या ग्रंथात नसेल कदाचित. जशी रामजन्माची तारिख आज सापडली आणि बहुदा विवाद न होता राम जन्माला आले होते की नव्हते या विषयावर पडदा पडला तसा उद्या सत्यनारायणाचा उल्लेख मिळाल्यावर हा वाद ही संपेल कदाचित.
पण सत्य पिरावरुन सत्यनारायण आले असे लिहताना महमंद पैगबर साहेबांनी कधी सत्य पीराची पुजा घातल्याचे उल्लेख असतील तर कळवावे.
एका अल्ला शिवाय कोणाचीही इबादत करु नये असे कडक फर्मान असताना सत्यपीर त्याची पुजाविधी ? कोणत्या बुध्दी प्रमाण मानणार्यांना पटेल ?
हा बुध्दीभ्रम कोणी मानला नाही आणि मानणार नाही. दर श्रावणात तितक्याच निष्ठेने सत्यनारायण पुजा होतात.
काही दुर्गुण मानवाच्या अंगात आहेत तेच हिंदु समाजात सुध्दा आहेत.
परदेशात चर्चनी आपली हुकमत स्थापन करुन कायमची ठेवण्यासाठी मुळच्या बायबलमधे काही बदल केल्याचे माहित असेलच. त्यावर सिनेमे निघाले. ज्या देशात ख्रिश्चन हा राष्ट्रधर्म समजला जातो त्या देशात त्यावर बंदी ही होती. ( जुना करार आणि नविन करार सांगणारे पाद्री आमच्याही घरी एकदा आले होते ) यामुळे मुळ ख्रिश्चन लोकांनी प्रार्थना करण्याचे सोडले नाही. येशुचा जन्मोत्सव कधी थांबला नाही.
शिया आणि सुनी पंथ का निर्माण झाले आणि ते एकमेकांना का पाण्यात पहातात यामागे मानवी वृत्ती आहेत ज्या श्रेष्ठत्व सिध्द करण्याच्या मागे असतात.
हाच प्रकार हिंदु धर्मात आहे. काही वेळा ग्रंथसंपदा कुणा आक्रमकाने जाळली असेल. श्रध्दा असलेला हिंदु कितीही महाग पुजा सामग्री झाली तरी सत्यनारायण खरा की खोटा असा वाद करत नाही. त्यांना काय वाटेल याची काळजी करा. अल्पसंख्यांकानाच फक्त भावना असतात असे नाही. आम्हालाही आहेत आणि त्या दुखावतात सुध्दा. लोकसत्ता किंवा मटा यांनी ही वाद निष्कारण वाद होईल असे का लिहायचे ? हिंदु संताप व्यक्त करत नाहीत म्हणुन ?
5 Nov 2015 - 2:38 pm | बाळ सप्रे
मग वर काय चाललय असं वाटतंय ??
5 Nov 2015 - 2:45 pm | बॅटमॅन
पीर पुजणे हा प्रकार शिया पंथात जास्त कॉमन आहे. भारतात तो प्रचलित आहे आणि सुन्नीसुद्धा तिथे जातात. इस्लाम संस्थापक महंमद यांनी पीरपूजा केली नाही म्हणून ती अन इस्लामिक वगैरे सांगायला ठीक आहे. शियापंथीयांना सांगून बघा काय म्हणतात ते- विशेषतः इराणातले. तेव्हा हे सर्व गैर इस्लामिक वगैरे म्हणणे म्हणजे सुन्नी विचारधारेला अनुसरून आहे. सुन्नी सोडून किमान एक विचारधारा आहे इस्लाममध्ये ज्यात हे अलाउड आहे.
बाकी सत्यनारायण पूजेचे, त्या कथेचे जुने पुरावे नाहीत त्यामुळे हे फॅड अगदीच अलीकडे बोकाळलेय इतकेच म्हणणे आहे. सध्या हिंदू धर्मात प्रचलित असलेल्या या गोष्टीचे इंट्रोडक्शन इस्लामच्या एका पंथाच्या अनुकरणातून झालेले आहे ही फॅक्ट आहे.
जे खरे आहे ते सांगण्यात लाज कसली? असे आहे असे सांगितल्याने तुम्ही पूजा करू नका असे कुठे ठरते म्हणे? मज्जाच आहे. एखाद्या प्रथेचे मूळ इस्लाममध्ये आहे असे सांगितल्याने त्रास का व्हावा? एखादी गोष्ट क्लिक व्हायला काहीही लागत नाही. त्यातून हिंदू धर्माचे स्वरूपही असे सर्वसमावेशक आहे की कशाही अॅडिशन्स होतात. तेव्हा ते सगळं चालायचंच.
अन पर्सनली विचाराल तर त्या पूजेचे मूळ कुठे आहे यापेक्षाही काम्यभक्तीरूपी अशा विनवण्या करणे मला मूर्खपणाचे वाटते. कैक व्रतांच्या त्या कथा वाचल्या तर अतिशय हास्यास्पद असतात. अशाच कथांनी आपल्या धर्माला कमीपणा आणलेला आहे. भले मग अलम दुनियेतले हिंदू ते आचरीत असोत.
बर तेही असो. या पूजेचे विश्वासार्ह जुने पुरावे तुम्हांला जर कुठे सापडले तर अवश्य सादर करा. मी तुमची बिनशर्त माफी मागून माझी सर्व विधाने वापस घेईन.
ब
6 Nov 2015 - 1:52 pm | टवाळ कार्टा
असे अस्ताना ते दूर्गुण तसेच ठेवायचे* का आपण काढून टाकायचे?
*हे दूर्गुण "त्यांच्यात" पण आहेत, "त्यांना" सांगायची हिंम्मत आहे का....हे उत्तर नकोय कारण स्वतःच्या धर्मातले दूर्गुण घालवायला दुस्र्या कुठल्या धर्मात ते आधी घालवले पाहिजे हा शुध्ध यझ विचार आहे...मला माझ्या धर्म दुस्र्या कोणत्याही धर्मापेक्षा चांग्ला हवा असेल तर आपल्यातले दूर्गुण आपणच घालवले पाहिजेत ("ते" त्यांच्या धर्मातले दूर्गुण घालवू देत अथवा नाही घालवोत....आपल्याला शष्प फरक नै पडला पैजे)
6 Nov 2015 - 10:27 am | नितीनचंद्र
या पूजेचे विश्वासार्ह जुने पुरावे नक्की मिळतील किंवा नाही पण सत्य पीर या पुजेविषयक आपल्याकडे खात्रीलायक काही माहिती असल्यास मला कळवा. पुर्वग्रह दुषीत नसलेल्या कोणत्याही अभ्यासकाचे संशोध्न मी वाचीन.
माफी मागण्याची काही आवश्यकता नाही. प्रत्येकाच्या अभ्यासाचा विषय असतो.
6 Nov 2015 - 10:32 am | बॅटमॅन
अवश्य कळवतो. असे वाचनात तरी नक्कीच आलेले होते.
6 Nov 2015 - 10:21 pm | बाजीगर
बुलशीट, मी उपाशी मरायला लागलो तर हे सो काॅल्ड गोत्र मला भाकरी मिळळतेय का हे बघणार नाही, मी धनाढ्य यजमान झालो तर माझ्याकडून काय फायदा काढता येतो हे भडजी बघणार. मी **वर मारतो.
8 Nov 2015 - 5:24 am | हेमन्त वाघे
The temple Poojari came very close to me & asked: "Got Rum!!?"
I replied: "Yes, OLD MONK.."
The Poojari became angry & I was thrown out of the temple..
Later I realised, he was asking about my "GOTRAM".
24 Feb 2018 - 9:40 pm | कुशल द. जयकर
गोत्र, कूळ, कुळाचार माहीत करण्यास काही संकेतस्थळ आहे कींवा ईतर काही मदत मीळण्यासार्खे