आपण क्षणा क्षणाला बदलत असतो. आपल्या गरजा बदलत असतात. आपण त्या वाढवत असतो. खाली यावं लागल याचा विचार हि न करता वरचढ़ होत असतो. वेळेसोबत आपली सहनशीलता कमी होते. वाढत असते ते परावलंबन आणि सीमा ओलांडून उपभोग घेण्याची सवय. सुरु असते उधळपट्टी, नासाड़ी. दहा जणांच्या गरजा भागवल असे एकटाच गिळु पाहतो. गिळतो. आणि मग निसर्ग ही थकतो, आपले लाड पुरवुन-पुरवून. त्याचा कल ढासळतो. तो बिथरतो. आपण ही बिथरतो पण आपण तुटतो. अगदी पार आतून बाहेरून तुटतो. आपल्या हाती काहीच नसते. त्याच्या बिथरण्यात सगळं चराचर नष्ट करण्याचे सामर्थ्य असते. त्याच्या अशा बिथरण्याची सुरुवात म्हणजे अखिल मानव जातीचा 'काउंट डाउन' सुरु होतो. म्हणजेच निसर्ग कामाला लागतो भामटया, अप्पलपोट्या आणि अविचारी 'संस्कृती' ला संपवन्याच्या.
प्रतिक्रिया
28 Oct 2015 - 5:41 pm | आनंद कांबीकर
....