कल्पक-रोचक-आकर्षक सिनेमा पोस्टर्स

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
26 Oct 2015 - 11:50 am
गाभा: 

सिनेजगात सिनेमाच्या जाहिरातीसाठी एकं महत्वाचं साधन असतं सिनेमाचं पोस्टर. आजकाल नवीन रीलीज झालेल्या सिनेमाचे प्रमोशन करण्याचे अनेक नवीन प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. काही वर्षांपुर्वीचीच गोष्ट आहे सध्या जस एखाद्या सिनेमाचं प्रमोशन आपल्या बॉलीवुडमध्ये धुमधडाक्यात होतं तस पुर्वी इतक्या आक्रमकतेने प्रमोशन होत नसे. जस आता कलाकार सीरीयल्स, रीअ‍ॅलीटी शोज मध्ये जाऊन, रेडिओ मिरची वगैरे वर जाऊन प्रमोट करतात. अगदी कालपरवा पर्यंत यातलं काहीही केलं जात नसे. जागतिकीकरणाचा रेटा, सिनेमात गुंतवलेला पैसा, तीव्र स्पर्धा, व ग्राहकाला सध्या उपलब्ध असलेले मनोरंजनाचे असंख्य पर्याय इ. मुळे आता अगदी कलाकार व टीम स्वत: गाजावाजा करत आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करतांना दिसतात. मला वाटतं आपल्याकडे आमिर खान ने थ्री इडियट्स च्या वेळेपासुन याची सुरुवात केली एक अंदाजे म्हणतोय त्याअगोदरही असेल तर माहीत नाही. मात्र तेव्हा त्याचं प्रमोशन फ़ार गाजल होत. क्रीएटीव्ह काहीतरी केलेलं त्याने एक एक हिंट द्यायचा काही शहरांतुन फ़िरायचा,इ.

तर सध्याही आणि अगोदरच्या काळात तर सिनेमाच्या जाहिरातीसाठी पोस्टर हे फ़ारंच महत्वाच साधन होतं व आहे. सिनेमाची मध्यवर्ती कल्पना हायलाइट करण्यासाठी, त्यातलं आकर्षण मांडण्यासाठी आदी पोस्टर चा छान उपयोग करण्यात येतो. या आपल्या बॉलिवुड/ हॉलिवुड तसेच सध्या काही मराठी चित्रपटांसाठी सुद्धा व पुर्वीच्या काळात देखील काही अतिशय भन्नाट कल्पक, रोचक, आकर्षक असे पोस्टर्स बनवण्यात आलेले आहेत. यातील अनेक पोस्टर्स बघण्यासारखे असतात. त्यातील कल्पकता सुंदरता दाद देण्यासारखी आहे. सध्या जे नवीन टॅलेंट इंडस्ट्रीत आहे पडद्यामागे त्यांच काम बघण्यासारख असतं. एम.एफ़.हुसेन सारख्या कलाकारांनी आपल्या करीअरच्या सुरुवातीला सिनेपोस्टर्स रंगवलेली आहेत. पुर्वी पोस्टर्स हाताने रंगवत असतं त्यात काही सुंदर पोस्टर निर्माण झालेली आहेत. सध्या ती क्लासिक पोस्टर्स देखील विकली जातात. जुन्या तबकड्यांवर मुळ चित्रपटासाठी बनवलेली पोस्टर्स बघता येतात. मला आवडलेली काही पोस्टर्स देतो.

godfather

गॉडफ़ादर या गाजलेल्या सिनेमाचं हे पोस्टर बघा. यात अक्षर कशी भारदस्त फ़ॉन्ट मध्ये दाखवलेली आहेत, इम्पॅक्ट येण्यासाठी नावाव्यतिरीक्त इतर अक्षर घेण टाळलेल आहे, पुर्ण पोस्टर मध्ये फ़क्त कोटावरच गुलाबाचं फ़ुल तेवढ लाल रंगात आहे याचा अर्थ सिनेमा बघितला असेल तर लक्षात येईल. यात हा डॉन एक कुटुंबवत्सल माणुसही आहे असं या चित्रपटात दाखवलेलं आहे ते त्याच प्रतिक आहे..शेजारी अक्षरा वरती पपेट स्ट्रींग्ज कठपुतली नियंत्रीत करता ज्याने ते दाखवलेल आहे .त्यातनं डॉन ची ताकद दर्शवलेली आहे. सिनेमात हा एक समांतर सरकार सत्ताकेंद्र चालवत असतो त्याच प्रतिक म्हणुन ते घेतलयं. डॉन चे एक्स्प्रेशन्स लपवलेले आहेत नुसती गडद छाया भयसुचकतेने दाखवलेली आहे. बॅकग्राउंड पुर्ण काळी. एकंदरीत जबरदस्त पोस्टर आहे जे सिनेमाच्या कथावस्तुचं एक अर्कचित्र च आहे जणु. एक हिटलर ची काही पार्टी प्रचाराची जुनी पोस्टर्स आहेत त्यात बघा नुसतं मोठ्या अक्षरात फ़क्त हिटलर अस लिहीलेल असत बास बाकी काही नाही तस इथे फ़क्त गॉडफ़ादर बाकी काही नाही. आणि खाली त्याच्या फेमस डायलॉगची पंचलाइन.

schindle,s list

शिंडलर्स लिस्ट हा सत्यकथेवर आधारीत स्टीव्हन स्पीलबर्ग चा गाजलेला सिनेमा. ज्यु लोकांना वाचवणारा संवेदनशील दयाळु शिंडलर. चित्रपट मुद्दाम आजच्या काळातही ब्लॅक ऎन्ड व्हाइट मध्ये बनवलेला. यात संपुर्ण चित्रपटात एकच सीन येतो ज्यात कलर दाखवलेला एकदाच. याचं पोस्टर बघा एक शिंडलर चा वाचवणारा हात एक लहान मुलीचा हात जिला हिटलरच्या सैनिकांपासुन वाचवण्यात आलय कलात्मकरीत्या दाखवलय. व मागे बघा एक अंधुक अस्पष्ट अशी नावांची यादी दिसते काही तीनेक हजार ज्यु ना त्याने वाचवलं होतं, तर ती अशी लीस्ट अस्पष्टतेने मागे दाखवलेली. स्टोरीची थीम कलात्मकरीत्या दाखवलीय.

1

कहानी या विद्या बालन च्या सिनेमाच पोस्टर बघा. चित्रपटात जशी तिला दुर्गेसारखी दाखवलेली आहे. क्लायमॅक्स च्या सीन चा संदर्भ घेऊन, तसे पोस्टर मध्ये ते मागुन दुर्गादेवीचे हात तिचे हात मिक्स करुन असा एकुण जणु दुर्गे सारखा इफ़ेक्ट घेतलायं.. स्त्री शक्ती च प्रतिक अस कल्पकतेने दाखवलय.

2

आजोबा या बिबट्यांच्या शहरात येण त्यांना मारल जाणं इ. वर आधारीत मराठी चित्रपटाच पोस्टर कलात्मक होत. शहराकडे वरुन आशेने बघणारा बिबट्या त्याचा शहराशी असणारा संबंध, नावात ओ च्या जागी पंजा चा मार्क इतर अक्षर पण काळ्या रंगात सैरभैर झालेली त्या बिबट्याची सैरभैर अवस्था दर्शवणारी. छान पोस्टर आहे.

3

तुकाराम च पोस्टर ही जबरदस्त होत त्याच अवघ जीवनविश्व व्यापणारा लार्जर दॅन लाइफ़ विठ्ठ्ल अधोरेखीत करण्यासाठी मुद्दाम मोठ्या पुर्ण पोस्टर कव्हर करेल अशा साइज मध्ये, तुकाराम पाठमोरा स्वत: भक्तीत विरुन जाणारा म्हणुन, भुजा उंचावलेला विठठल सन्मुख तुकाराम, प्रकाश विठ्ठलावर , दुर पंढरपुरातल मंदीर अस्पष्ट दिसेल अस, व खाली विशाल वारकरी समुदाय.रंग भगवा इफ़ेक्ट चा. सर्व माहोल उभा करेल अस पोस्टर.

टंकाळा आलाय म्हणुन आता नुसती पोस्टर्स बघा कीती रोचक आहेत ही सर्व आणि तुमची काही आवडती असेल तर शेअर करा.

अनुराग कश्यप च्या देव डी ची ही दोन्ही पोस्टर बघा टॅग लाइन भारी आहे कम फॉल इन लव्ह च्या एवजी लस्ट

3

4

राउडी राठोड च हे पोस्टर बघा जुन्या स्टाइल हेन्ड पेन्टेड शैली त न आणलेलं असच एक गँग्ज ऑफ वासेपुर ने ही आणलेल पोस्टर आहे जुन्या स्टाइल मध्ये चितारलेलं,

6

जिस्म -२ च पोस्टर

6

पिपली लाइव्ह चे पोस्टर

8
बॉलीवुड ने कॉपी मारलेली हॉलीवुड ची पोस्टर्स च एक उदाहरण इथे अजुन खुप उदाहरण दिलेली आहेत बघण्यासारखी
http://www.storypick.com/25-copied-bollywood-movie-posters-deserve-slow-...

8

अमिताभ च्या जंजीर चे ओल्ड टाइम पोस्टर बघा अमिताभ अ‍ॅन्ड प्राण लिहीलय हिरो से बडा व्हीलन का साइज क्या बात है.

44

सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स चे पोस्टर आणि आणि त्यामागच्या अर्थाचा उलगडा करणारी लि़क

http://www.verbicidemagazine.com/2013/11/10/silence-of-the-lambs-skull-f...

बॉलीवुड ने चोरी केलेले पोस्टर्स एक उदाहरण आणि अशा चोरी केलेल्या पोस्टर्स ची माहीती देणारी लिंक
http://timesofindia.indiatimes.com/quickstir/entertainment/

/images?q=tbn:ANd9GcRxGQmDZMaOsttrOZLiq_NGQmLikVBS1D6KicFAc6mkhst9EJD1Eni_MA" width="500" height="500" alt="j" />8-Bollywood-Movie-Posters-COPIED-From-Hollywood/quickstirshow/43230990.cms

http://www.storypick.com/25-copied-bollywood-movie-posters-deserve-slow-...

1

देव डी च आणखीन एक भन्नाट पोस्टर

k

0

गॉन विथ द विंड चे ऑल टाइम ग्रेट रोमॅटीक पोस्टर

47

टीथ च बॅन झालेलं पोस्टर

0

फोर क्रिसमसेस च आणि आपल्या अंगुर ची विनोदी पोस्टर्स

j

x

लास्ट बट नॉट द लीस्ट माझे सर्वात आवडते फ्लॉवर्स ऑफ वॉर चे असामान्य विलक्षण सुंदर पोस्टर.

0

या विलक्षण पोस्टरच्या अर्थाचा उलगडा करुन देणारे सुंदर टीपण

Moreover, the highlights of this poster lie in the
conceptual process, especially the symbolic suggestive process.
For one thing, from the choices of colors, all the important
visual elements are presented in the color of blood-red which
symbolizes death and killing and thus conveys the impression
of an extremely bloody and brutal story to viewers. The
connotation of blood red accords with the emotional tone of
the movie background, a famous historical event ---Nanking
Massacre. For another, from the choices of visual elements,
the blood spots splashed on the dead branch are designed just
like blooming red plum blossoms and thus endowed with
multiple symbolic meanings: firstly, the English title “The
Flowers of War” employs a figure of speech called metonymy.
The vehicle is “flowers” and the tenor is women. The poster
designers choose to illustrate the word “flowers” with the
imageries of red plum blossoms which may share the same
connotation and essence worldwide. Especially in Chinese
culture, the imageries of plum blooms are the symbols of
many virtues such as fortitude, bravery, determination, and
indifference to fame and wealth. Just as a well-known Chinese
poem writes “there are a few plum trees in the corner of
garden; they bloom alone in the struggle against severe cold”.
Therefore, the choice of the imageries of red plum blossoms is
well-grounded, and they just hint the lofty morals and
sentiments of the leading characters; secondly, as an old
Chinese saying goes, east or west, the plum blossoms in
Jinling is best. Here “Jinling” is the former name of Nanking.
Hence, the imageries of red plum blossoms related to “Jinling”
in the Chinese title are suggesting the place of the story;
thirdly, the blooming season of plum trees coincides with the
story time (Nanking Massacre took place on the 13th of
December in 1937 and last for about 6 weeks), and the bitter
cold in severe winter could be regarded as an indication of the
violent and ruthless social environment of that day..
The last but not the least, it seems farfetched outwardly to
design a bloody butterfly in symbolic suggestive process;
however, it actually places an irreplaceable role in delivering
the subject of this poster and also in stressing the theme of selfredemption
in the movie. The metamorphosis from an ugly and
awkward larva into a chrysalis and then into a beautiful and
graceful butterfly symbolizes the transformation of the leading
characters’ human nature, or instance, from a greedy drunkard
to a courageous and beneficent hero, from a gang of vulgar and
selfish prostitutes to a group of honorable women volunteering
to give up their lives to save the girl students, and from a
lackey willing to sell the country for his own selfish ends to a
valiant risking his own life to help the girl students to run for
their lives. All those are true portraitures of the Chinese
people’s self-redemption from the suffering and sorrow at the
time of national disaster. In addition, these is a household
Chinese legend of a tragic love story named Butterfly Lovers,
so the image of butterfly could also be taken as the emblem of
the love between the hero and heroin which is beautiful but
short-lived and ends abruptly with death.

काही ग्रेट पोस्टर्स च्या लिंक्स

http://www.creativebloq.com/movies/iconic-movie-posters-712378
http://www.smashingmagazine.com/2008/10/50-beautiful-movie-posters/
http://www.complex.com/pop-culture/2013/05/most-iconic-movie-posters-of-...

काही वादग्रस्त झालेली काही बॅन झालेली पोस्टर्स ची लिंक
http://perezhilton.com/galleries/banned-movie-posters/?id=453507#.Vi175W...

मित्रांनो तुम्ही तुमची आवडती पोस्टर्स तर शेअर करा व शक्यतो एक्सप्लनेटरी नोट टाका.

प्रतिक्रिया

द-बाहुबली's picture

26 Oct 2015 - 3:28 pm | द-बाहुबली

म्हणजे अनेकदा अक्षरशः मी वेड्यासारख्या या पोस्टरकडे सलग १०-२० मिनीटे मंत्रमुग्ध होउन बघत बसायचो, इतके आवडते आहे.

तुषार काळभोर's picture

26 Oct 2015 - 3:40 pm | तुषार काळभोर

म्हणजे अगदी १०-२० मिनिटे मंत्रमुग्ध वगैरे होऊन नाही पाहिलं. पण तरी लहानपणी या पोष्टरचं लई आकर्षण होतं.

कपिलमुनी's picture

26 Oct 2015 - 3:31 pm | कपिलमुनी

http://photos.filmibeat.com/photo-feature/bollywood-posters-inspired-fro...

या दुव्यावर हॉलिवुडमधून कॉपी झालेली १५ पोस्टर्स आहेत.

चित्रगुप्त's picture

26 Oct 2015 - 3:49 pm | चित्रगुप्त

मस्तच आहे धागा. परंतु काही पोस्टरं दिसत नाहियेत.

चित्रगुप्त जी

साल्वादोर दाली च्या एका कलाकृती पर्यंत त्याचा प्रवास आहे. खालील लिंक्स काळजीपुर्वक बघा तुमच्या लक्षात येइलच सर्व.

https://rebeccambender.wordpress.com/2014/05/06/body-skulls-salvador-dali/
http://www.verbicidemagazine.com/2013/11/10/silence-of-the-lambs-skull-f...
http://www.huffingtonpost.com/2013/12/03/dali-in-voluptas-mors_n_4373479...

शेवटच लाल फुलपाखराच पोस्टर भयानक आवडल आहे :)

नाखु's picture

26 Oct 2015 - 3:57 pm | नाखु

एक डॉन (मूळ अमिताभचा)

आणि दुसरे शोलेचे अगदी जुने पोष्टर.

पूण्यात २०-२५ वर्षांपूर्वी नवीन सिनेमाची पोष्टर्स (बहुतेक पेंटीग केलेली)लागण्याची ठरावीक मोक्याची ठिकाणे होती त्यात मंडईत टिळक पुतळ्यासमोर एक,स्वारगेट्ला पेट्रोलपंपाचे समोर्,अलकाचे चौकात ला ल ब रस्त्याचे सुरुवातीस्,आणि सिनेमाग्रुहात (नटराज्,मंगला,लक्ष्मीनारायण,अपोलो,नीलायम्ची पोष्टरस भव्य आणि आकर्षक असत).

मुबईला मेट्रोमध्ये १९४२ या सिनेमातील गाडीच आणून ठेवली होती थेटरात नायकाची गाडी म्हणून.

याद्गार नाखु

मुख्य दोन प्रकार असायचे. एक पोस्टर जे आकाराने मोठे अन भिंतीवर लावत. शक्यतो हाताने रंगवत आधी. आता फ्लेक्स करतात. दुसरे शोकार्ड. हे दोन आकारात असत. ज्याला नॉर्मली पोस्टर साईज म्हणतात त्या आकारात आणि जरा लहान. हे खूप आधीपासून छापाई ऑफसेट तंत्राने करत. हे थिएटरमध्ये शोकेस मध्ये लावलेले दिसतात. अन्यथा लहान गावात भिंतीवर पण. वर दिलेले पोस्टर अशा प्रकारचे आहेत.
हाताने रंगवलेल्या पोस्टरची फार मोठी परंपरा असलेल्या गावाचा मला अभिमान आहे. यल्ला दासी नावाच्या दोघा आर्टिस्ट नी रंगवलेली कलात्मक पोस्टर्स ती पण प्रचंड मोठ्या साईजची मी लहानपणी पाहिलेली आहेत. मुंबईहून खास बोलावणे येई नवीन लाँचच्या वेळी ह्या आर्टिस्टना. चित्रकलेतले वेगवेगळे प्रयोग, काम्प्ओझीशनस पहायला मिळत. उंच पोस्टर्रमध्ये सांभाळलेले परस्पेक्टिव्ह लक्षात येई.
पोस्टरमध्ये पण छापाईचे बदलत गेलेले तंत्र अभ्यासाला मिळते. मिलनचे तीन कलरमधले लिथो प्रेस चे पोस्टर ते सध्याचे सिंग इज ब्लिंग चे स्पॉट युव्ही अन फॉइलिंग वापरुन केलेले पोस्टर हा प्रवास रोचक आहे. ह्या विषयावरच केलेले एक अप्रतिम पुस्तक माझ्याकडे आहे. त्यात जवळपास ३०० सिलेक्टेड पोस्टर्स ओरिजिनल कॉपीवरुन केलेली प्रिंट आहेत.

अभ्या..'s picture

26 Oct 2015 - 5:36 pm | अभ्या..

हो. या शोकार्डमध्ये प्रिंटिंगच्या सगळ्या अत्याधुनिक पध्दती वापरलेल्या आहेत. टायटल तर गोल्ड एम्बॉस करुन टाकलेले आहेत. इथे त्याचा रिचनेस समजणार नाही. अ‍ॅक्चुअली पोस्टर समोर पाहताना कळते ते. आयडीया अन डिझाइन जरी नोर्मल असले तरी प्रिंटिंग सुपर्ब आहे.

टवाळ कार्टा's picture

26 Oct 2015 - 7:15 pm | टवाळ कार्टा

कॅप्टन अमेरिका =))

मारवा's picture

26 Oct 2015 - 5:23 pm | मारवा

अभ्या भौ

या पुस्तकाचं नाव लेखक अधिक माहीती अजुन द्यावी
तुम्ही उत्सुकता ताणलेली आहे.

धन्यवाद

पद्मावति's picture

26 Oct 2015 - 7:04 pm | पद्मावति

अगदी वेगळ्या विषयावर खूप सुंदर लेख.
गॉन विथ द विंड - टाइमलेस ब्यूटी.... माय फेवरेट.

मारवा सर. एक रिक्वेस्ट आहे. सगळे पोस्टर रेझोलुशन २५० विद्थचे ठेवले तर धागा पटकन ओपेन होइल आणि सर्वानाच आनंद घेता येईल. साहित्यसंपादकांना तशी विनंती करा प्लीज.

जव्हेरगंज's picture

26 Oct 2015 - 7:23 pm | जव्हेरगंज

मस्त धागा!

संपादक मंडळाला एक नम्र विनंती आहे.

१- सगळे पोस्टर कृपया २५० या एकाच समान विड्थ्स चे करुन द्यावेत प्रतिसादातल्या सहीत.
२- तुकाराम चे अस्पष्ट झालेले पोस्टर व सायलेन्स ऑफ द लॅम्ब च्या वरील देव डी चे अस्पष्ट झालेले पोस्टर तरी तत्काळ
डिलीट करावीत त्याने फारच रसभंग होतोय

तसदी देण्यासाठी दिलगीर आहे मात्र आपल्याकडे संपादनाची सुविधा नसल्याने नाइलाजाने तसदी देत आहे.
धन्यवाद !

मारवा's picture

26 Oct 2015 - 7:49 pm | मारवा

1

बॅन्ड बाजा बाराती

2

रंगरेज चे सुरेख पोस्टर

3

शाहिद चे पोस्टर

5

शिप ऑफ थिसीअस च लाजवाब पोस्टर

5

ship

श्री अंकीत राणा यांनी या वरील पोस्टर वर केलेले सुंदर निव्वळ अप्रतिम भाष्य इथे पहा

The poster is a representation of the paradox of ship of theseus.

Theseus sets off in a ship, carrying huge amount of wood. As he sails, individual pieces are replaced with fresh ones that are made on board. After many months, he returns and not a single piece of wood remains unplaced.

1.Did Theseus return on same ship?

2.Suppose someone collected all the pieces and rebuilt a ship,now which of the two is Theseus's ship?

The hand represents us. The pyramid represents knowledge. The ant and dead leaf represents the nutrition.The dead leaf is transforming through the ant and the green tree.The hand is shaped like a plant with fingers and the veins forming the roots.And the hand is growing into the universe.The theseus ship's paradox can be seen between the dead leaf,ant and the green tree.

But in simpler terms, the picture represents that we are born a small baby, we grow into this world and we die. Is the person who died, the same person who was born ?

Every moment we are different, transformed and transforming, but are we still us or are we a different person?

And if different then different in what sense ?

The ship of theseus paradox can only be put in context by answering questions.
I just hope I have asked the right questions.

This brilliant poster is an amazing work asking all the beautiful,powerful questions,
all at once.

द-बाहुबली's picture

26 Oct 2015 - 8:53 pm | द-बाहुबली

हे एक पोस्टर आवडते. बिपाशाचे जिस्म मधील. एकदम मस्त. कराटेच्या फ्रंट स्टान्स प्रमाणे पोज असली तरी एकदम हॉलीवुडच्या धरतीवर पोस्टर बनवले आहे. परफेक्ट.

JIsm

अन हे सुध्दा फार रोचक वाटायचे. पाळलेल्या कुत्र्याला गोंजारावे तशी पोज देउन मैने प्यार किया असे टायटल वाचताना जाम उत्सुकता जागी होत असे की नक्कि चित्रपट कसा असेल...

MPK

अन हे सुध्दा फार रोचक वाटायचे. पाळलेल्या कुत्र्याला गोंजारावे तशी पोज देउन मैने प्यार किया असे टायटल वाचताना जाम उत्सुकता जागी होत असे की नक्कि चित्रपट कसा असेल...

इतकी भयंकर खरी आणी विनोदी कॉमेंट मैने प्यार कीया च्या पोस्टरवर
हसुन हसुन वेडा झालो

अहो तुम्हाला बडजात्याचे फॅन गाठुन मारतील बर का बडजात्या फॉर्म्युला फार जोरात धडाक्यात चालतो आपल्याकडे. आता फोटोतले हिरो आजोबा झालेत भाग्यश्री तर कधीच विरक्ती येऊन हिमालयात निघुन गेलीय.
म्हातारा आता अजुनही प्रेमा तच आहे आता ही त्याच्याहुन अर्ध्या वयाची कुठेच न चाललेली अशक्य बोरींग आपल्या अन्याची मुलगी आता आजोबांची हिरोइन आहे याला जरठ बाला प्रेम कथा म्हणायच का ?
पण ते एक गाणं त्यात सरप्राइजींगली सुंदर दिसतेय ती आणि ते पाठीवर पिसाने चितारायची प्राचीन रोमॅंटीक स्टाइल आहाहा आणि तो घोडागाडी दरीत कोसळण्याचा सीन झुंबर काय आदळतयं वा वा बघणार मी हा सिनमा नक्की
म्हातारा सहन करुन बघणार म्हणजे बघणार च
किमान एकदा टांगा पलटी व बॅक कॅनव्हास चा सीन होइपर्यंत तरी बघणारच

दिवाकर कुलकर्णी's picture

27 Oct 2015 - 1:26 am | दिवाकर कुलकर्णी

हा तर दिवाळी अंकातला लेख वाटतो,दिवाळी अंक प्रसिद्ध बिसिद्ध झाला काय