दिवाळी नंतरचे शेअर मार्केट - खरेदी विक्रीकरिता एक दृष्टीक्षेप

सागर's picture
सागर in काथ्याकूट
20 Nov 2007 - 4:31 pm
गाभा: 

मित्रांनो,

दिवाळी संपली आणि शेअर बाजार आपले रंग दाखवू लागला.
मागे मी अंदाज केल्याप्रमाणे दिवाळीनंतर बाजार कोसळू लागला आहे.
आज बाजार 19307.36 वर बंद झाला.

अर्थात हा वेग माझ्या अपेक्षेपेक्षा कमी नक्कीच आहे. शेअर बाजार १६५०० पर्यंत पडण्याची मला अपेक्षा होती.
आता ती १८००० पर्यंत मला सिमीत करावी लागेलसे दिसतेय. येत्या १-२ आठवड्यात १८००० च्या घरात शेअर बाजार आला तर आश्चर्य वाटू नये..

असो. त्या अनुषंगाने सध्या मी जे शेअर्स घेतले आहेत ते (पाजळलेले ज्ञान?) सर्वांबरोबर वाटून घ्यावेसे वाटल्याने हा लेखप्रपंच
खाली मी काही शेअर्स देत आहेत त्यांच्या कोडसकट आणि आजच्या भावासकट. जेणे करुन खरेदीच्या वेळी तुम्हाला अडचण पडू नये

(टीप :दिलेले कोड हे केवळ icicidirect वापरणार्‍यांसाठी उपयोगी आहेत. इतर ठिकाणी कोड शोधावे लागतील. ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्याबद्दल देव काकांचे ....चुकलो...आपलं नित्यानंदकाकांचे आभार)

पावर क्षेत्रः

रिलायन्स पेट्रोलियम - 208.00 - RELPET
पावर ग्रीड - 160.00 - POWGRI
स्टील :

हिंडाल्को - 193.00 - HINDAL

कम्युनिकेशन्स
रिलायन्स कम्युनिकेशन्स - 711.45 - RELCOM
भारती एअरटेल - 910.50 - BHATE
टाटा टेलिसर्विसेस - 51.30 - HUGTEL (फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित)

इन्फर्मेशन टेक्नोलोजी :
टी.सी.एस. 963.00 - TCS
इन्फोसिस - 1,557.10 - INFTEC
विप्रो - 447.50 - WIPRO

इन्फ्रास्ट्रक्चर व नॅचरल रिसोर्सेस:
रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस (आपला आरेनारेल) 166.40 - RELNAT
जी.एम.आर. इन्फ्रास्ट्रक्चर - 246.00 - GMRINF
नागार्जुन कस्ट्रक्शन - 325.00 - NAGCON

हे शेअर्स हमखास फायदा देणार्‍यांतले आहेत असे माझे मत आहे. जाणकारांनी यावर अधिक काथ्याकूट करावा अशी अपेक्षा...
वेळोवेळी मी ही यात भर टाकेनच....

पडलेला शेअर बाजार फक्त २-३ महीन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही.
एकदा शेअरबाजाराने २०००० चा आकडा गाठला की परत खाली मात्र येणार नाही
त्यामुळे जे सध्या तोट्यात आहेत त्यांनी चिंता न करता घेतलेले शेअर्स होल्ड करुन ठेवावेत.
३-४ महिन्यांनंतर विक्रीसाठी काढले की लाभ हा होईनच. तेव्हा कोणत्याही आवेशात सध्या शेअर्स विकू नयेत असे वाटते...

धन्यवाद
सागर

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

20 Nov 2007 - 4:41 pm | विसोबा खेचर

सदर समभाग आपण कोणत्या किंमतीला खरेदी केलेत हे कळेल का?

सागर's picture

20 Nov 2007 - 5:04 pm | सागर

तात्या,

प्रश्न एकदम रास्त आहे.
सगळी यादी नाही देत बसत

काही उदाहरणे देतो
रिलायन्स पेट्रो - १८० ला घेतला होता ( हा शेअर २९५ पर्यंत गेला होता...)
पावर ग्रीड - १५४ ला घेतला होता
रिलायन्स कम्युनिकेशन - आजच घेतला ७१९ ला
इन्फोसिस - आजच घेतला - १५६० ला
हिंडाल्को - आजच घेतला - १९८ ला

तात्या तुमचा अनुभव आमच्या बरोबर वाटा की...
तुमचे गेसिंग चांगले असते...

सागर

विसोबा खेचर's picture

21 Nov 2007 - 10:15 am | विसोबा खेचर

खरं सांगायचं तर तुझ्या ए ग्रुपकडे मी कधी फारसं लक्ष देत नाही. आम्ही आपले बी ग्रुपवाले! आणि आम्ही नेहमी बी ग्रुपमधल्याच शेअर्सबद्दल लिहितो..

आपला,
(स्मॉल कॅप, मिडकॅप बी ग्रुपवाला) तात्या.

तात्या,
तुमचे मत बर्‍याच प्रमाणात योग्य देखील आहे.

बी ग्रुपचे शेअर्स जेवढा फायदा देतात तेवढा फायदा ए ग्रुपच्या शेअर्स मधे मिळत नाही.

पण एक सांगू का? ए ग्रुपचे शेअर्स दीर्घ मुदतीसाठी जो भक्कम फायदा देतात तेवढा बी ग्रुपवाले देत नाहीत.
वेगात कमाईसाठी बी ग्रुपचे शेअर्स चांगलेच असतात. पण लगेच फुकावे पण लागतात.

दीर्घ मुदतीच्या शेअर्स मधे तुम्हाला वर्षाअखेर डिव्हीडंट मिळतो तो वेगळाच.
असो...
पण मी तुमच्या मताशी सहमत आहे

माझ्यामते, सर्वांनीच ए आणि बी दोन्ही प्रकारच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. म्हणजे नफा - तोटा बॅलन्स करता येतो... कसे?

(त्रिकालदर्शी तात्यांचा भक्त) सागर

माझी दुनिया's picture

21 Nov 2007 - 1:54 pm | माझी दुनिया

सागर,

बी ग्रुप चे चांगले फायदा करून देणारे शेअर सुचवा. मला ही उगाचाच सांभाळून ठेवून बसण्यापेक्षा लवकरात लवकरात फायदा पदरात पाडून शेअर फुकायला आवडतात.

श्रेया,

बी ग्रुपचे शेअर्स तात्या जास्त चांगले सांगू शकतील.
कारण त्यात नफा कसा कमवायचा हे त्यांना जास्त चांगले माहीत आहे.

मला तितकी माहीती नाही. तरी माझ्यामते.... शुगर , मिडिया , टाटा टी, टी.व्ही.एस. , बजाज ऑटो असे शेअर्स या कॅटेगरीत येतात
(तात्यांकडून यावर भाष्याची अपेक्षा करणारा ) सागर

विसोबा खेचर's picture

21 Nov 2007 - 2:09 pm | विसोबा खेचर

पण एक सांगू का? ए ग्रुपचे शेअर्स दीर्घ मुदतीसाठी जो भक्कम फायदा देतात तेवढा बी ग्रुपवाले देत नाहीत.

सागरसाहेब, माफ करा परंतु बी ग्रुपचे समभागदेखील दीर्घमुदतीसाठी गुंतवल्यास अगदी भरपूर फायदा देतात असा माझा अनुभव आहे. असो..

वेगात कमाईसाठी बी ग्रुपचे शेअर्स चांगलेच असतात. पण लगेच फुकावे पण लागतात.

असंच काही नाही हो, तुम्ही बी ग्रुपचे समभागदेखील लगेच न फुकता दीर्घमुदतीकरता ठेवू शकता.

माझ्यामते, सर्वांनीच ए आणि बी दोन्ही प्रकारच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. म्हणजे नफा - तोटा बॅलन्स करता येतो... कसे?

हम्मा!खरं आहे. आणि तसं पाहता या बाजारात कुठलाच एक नियम असा ठाम नाही. जो तो आपापल्या अंदाजानुसार, आपापल्या पद्धतीनुसार गुंतवणूक करत असतो. तुमची पद्धत मला किंवा माझी पद्धत तुम्हाला सूट होईलच असे नाही..

असो,

(त्रिकालदर्शी तात्यांचा भक्त) सागर

अहो माझी एवढी भक्ति करू नका हो! भक्त मंडळींमुळे माझी स्थिती थोडीशी एंबरेसिंगच होते. त्यापेक्षा (भक्तांपेक्षा) मला आंतरजालावरील शत्रूच अधिक परवडतात! :)

आंतरजालावर उत्तमोत्तम लेखन करायला ही शत्रु मंडळी माझ्याकरता टॉनिकसारखं काम करतात! :) तेव्हा सागरसाहेब, तुम्हीही माझे भक्त न राहता, माझी शत्रुमंडळी पोष्ट्यागजानन, ऐहिक राव यांच्या रांगेत जाऊन बसा! :))

असो,

तात्या.

सागरसाहेब, तुम्हीही माझे भक्त न राहता, माझी शत्रुमंडळी पोष्ट्यागजानन, ऐहिक राव यांच्या रांगेत जाऊन बसा!

तात्या,

हे काय आपल्याला जमायचं नाय बुवा... म्या शत्रूंपेक्षा मित्र जोडण्यात जास्त विश्वास ठेवतो.
मला तुमचा मित्रच राहू द्या... आणि तुमच्यावर टीका करणारे खूप आहेत असे तुम्हीच म्हणता ना? मग त्यांत अजून एक भर कशाला?
भक्ती करणारा पण कोणीतरी असू द्या की राव.... भक्ताला भक्ती मिळत असेल तुमचे काय जाते? ... कोण जाणे कधीतरी तुम्हाला या मित्राची गरज भासेल :) तेव्हा मी शत्रू पक्षात नसलेलो तुमच्याच फायद्याचे ठरेल...

बाकी ते ए ग्रुप बी ग्रुप जास्त काय कळत नाय बुवा आपल्याला. तेव्हा तुमचा अधिकार एकदम मान्य...

तुमची पद्धत मला किंवा माझी पद्धत तुम्हाला सूट होईलच असे नाही..

हे एकदम बेस्ट बोललात. सगळे एकाच दिशेने विचार करु लागले तर कसे व्हायचे हो?

(तात्यांचे सदैव भले चिंतणारा) सागर

धोंडोपंत's picture

20 Nov 2007 - 9:19 pm | धोंडोपंत

आमचे (आगाऊ) मत

आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर, रिअल इस्टेट या तीन क्षेत्राबद्दल आशावादी आहोत.

त्यामुळे जीएमाआर इन्फ्रा, आय बी रिअल इस्टेट, युनिटेक, नागार्जूना कंस्ट्रक्शन, रिलायन्स एनर्जी, रिलायन्स कम्युनिकेशन्स मध्ये गळ टाकला आहे.

फायनान्स मध्ये इंडिया बुल्स आणि मोतीलाल सध्याच्या भावात घ्यावेत असे आम्हाला स्वप्नातदेखिल वाटत नाही. आज आयसीआयसीआय बँक दुपारी मार्केट पडल्यावर सव्वातीन वाजता ११६० ला मिळाला, तो मात्र उचलला.

इन्फी बद्दल आम्ही फारसे आशावादी नाही. जरी ती आमची आवडती कंपनी असली तरी एक्चेंज रेट फ्लक्च्युएशनच्या वादळामुळे त्यातून नजीकच्या काळात काही फायदा आम्हाला दिसत नाही. रुपया अजून मजबूत झाला तर इन्फी अजून स्वतात मिळेल असे आम्हाला वाटते. त्यातून नाईक पुन्हा काही बरळला तर घी में शक्कर.

काहीही कारण नसतांना केवळ किडा म्हणून आम्ही आज टाटा मोटर्स घेतला.

आपला,
(उपद्व्यापी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें
इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों

जुना अभिजित's picture

21 Nov 2007 - 9:28 am | जुना अभिजित

काहीही कारण नसतांना केवळ किडा म्हणून आम्ही आज टाटा मोटर्स घेतला

किडा म्हणतात तो हाच. :-)

काल युको बँक उचलला होता. १० % फायदा :-). पण विजया ५% पडला. :-(

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

धोंडोपंत गुरुजी,

आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर, रिअल इस्टेट या तीन क्षेत्राबद्दल आशावादी आहोत.

एकदम मनातले बोललात तुम्ही. येत्या ५-१० वर्षात हे तीन क्षेत्र शेअरबाजाराचे सगळे रेकॉर्ड्स निकालात काढतील.

इन्फी मी काल घेण्याची जरा घाईच केली असे आजच्या बाजाराच्या पडत्या परिस्थितीवरुन वाटत आहे. सकाळी मार्केट १८७५० पर्यंत खाली आले होते आत्ता 18924.39 वर स्थिरावले आहे. पण दुपारी परत पडेल असे वाटत आहे.

धोंडोपंतांचे बरोबर आहे. इन्फी अजून खाली येईल. तेव्हा हा आठवडा वाट पहावी असे वाटत आहे.
आपल्या लबाड बोकोबांनी देखील मला विरोपाद्वारे हाच सल्ला दिला होता. नशीब मी इन्फीचे जास्त शेअर्स घेतले नव्हते... त्यामुळे जास्त तोट्यात नाही गेलो...असो....
- सागर

मनिष's picture

22 Nov 2007 - 1:24 pm | मनिष

किमती चांगल्याच पडल्यात. चांगल्या कंपन्यांचे शेअर्स उचलायला हरकत नाही.

जुना अभिजित's picture

22 Nov 2007 - 1:26 pm | जुना अभिजित

पण सेविंग अकाउंट रिकामं होत आलंय.. ;-)

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

अभिजितराव,

चांगले शेअर्स विकत घेण्यासाठी लोक कर्ज काढतात.
पण मी वैयक्तिक रित्या कर्ज काढून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या विरोधात आहे

असो..
आज घेण्याजोगे शेअर्स
हिंडाल्को
रिलायन्स पेट्रो
येस बँक (६ महिन्यात ३ पट परतावा मिळण्याची अपेक्षा आहे)
वरुण इंडस्ट्रीज - १०५ नी ओपन झालाय. (आय पी ओ मधे ६० नी मिळत होता. मी नशीब बरेच शेअर्स घेतले आहेत तेव्हा प्रॉफीट नक्की)

सागर

किमयागार's picture

29 Nov 2007 - 7:24 am | किमयागार (not verified)

वरुण इंडस्ट्रीजचा आयपीओ व्हॅल्यू बायींग साठी आला तेव्हा योग्य होता. पण आमच्यामते त्यामध्ये फारसे ग्रोथ पोटेंशिअल नाही.
-कि'गार

किमयागार,

वरुण आय.पी.ओ. मधे ६० रु. ने मिळत होता. आणि घरगुती वापरांची स्टीलची भांडी व स्टीलच्या इतर वस्तू ते तयार करतात.
जगभरात त्यांची ऑफिसेस आहेत. आणि आय.पी.ओ.मुळे जो पैसा मिळाला आहे त्यांना त्यातून त्यांची उत्पादन क्षमता बरीच वाढणार आहे. तेव्हा सध्या खाली असला तरी येत्या २ वर्षात तो किमान ७००-९०० च्या आसपास जाईल असा अंदाज आहे. असो.
शेवटी प्रत्येकाचे गेसिंग वेगवेगळे असते. असो. हे आमचे मत झाले व ते आम्ही मांडतो... आय.पी.ओ.मधे ज्यांना शेअर्स मिळाले ते भाग्यवान
आजच्या भावात विकले तरी नफा चांगलाच मिळणार आहे. असो...
प्राईस बँड १० रुपये असणारे शेअर्स सहसा वेगाने वाढतात असा अनुभव आहे. १ वा २ रुपये किंमत असणारे शेअर्स त्याच पटीत वाढतात.
असो. जोपर्यंत नफा आम्ही कमवत आहोत तोपर्यंत तरी चिंता नाही :)
- सागर

आज बाजार बराच खाली आहे.

मला असे वाटत आहे की बाजार आता यापेक्षा खाली येणार नाही.
तेव्हा मित्रांनो,

तुम्हाला खरेदी करायची असेल तर उद्या सकाळीच उरकून घ्या
उद्या बाजार ६०० ते ९०० अंक वर जाईन असे मला माझे अंतर्मन सांगत आहे.
खरे खोटे उद्याच कळेल. मी तरी आज घेतलेले शेअर्स सांगतो

रिलायन्स पेट्रो - १९६ ला घेतला
पावर ग्रीड - १४९ ला घेतला

तसा या दोन शेअर्सवर माझा बराच जीव (आणि पैसा पण) आहे :)
बाजारात बरीच अफवा पसरली आहे की या दोन कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणे रिस्क आहे म्हणून पण मला विश्वास आहे....
आणि तो येत्या ५-६ महिन्यांत दिसेलच...

असो... येथे लेखनाचे प्रयोजन इतकेच की उद्या सकाळचे रेट्स परत मिळणार नाहीत... तेव्हा हात धुवून घ्या ...

(कमी भावात हवे असलेले शेअर्स मिळाल्याने खुश झालेला ) सागर

किमयागार's picture

29 Nov 2007 - 7:22 am | किमयागार (not verified)

महोदय,
टी.सी.एस. 963.00 - TCS
इन्फोसिस - 1,557.10 - INFTEC
विप्रो - 447.50 - WIPRO
हे समभाग उचलायला कोणत्या भरवश्यावर सांगता आहात? त्यामागचे तुमचे विश्लेषण पण पुरवत जा. ट्रेड डेफिसीट मुळे जेरिला आलेला अमेरिकेचा डॉलर अजून खाली चालला आहे. तेव्हा अस्वलाची पावले असलेल्या ह्यातल्या एकालाही सध्यातरी आम्ही हात देखिल लावणार नाही.
-कि'गार

किमयागार महोदय,

सध्याचे मार्केट आणि डॉलरचा दर पाहता तुम्हाला वाटत असलेली चिंता मलाही आहे.
पण हे संकट लवकरच नाहीसे होईल असा मला विश्वास आहे.
येत्या ४-६ महिन्यात परत एकदा आय.टी. ला सुगीचे दिवस येतील अशी मनापासून खात्री आहे.

असो. येणारा काळच काय ते सांगेल. त्यावेळी हीच अस्वलाची पावले लक्ष्मीची पावले होतील बघाच तुम्ही...
सागर

अवलिया's picture

13 Dec 2007 - 7:17 pm | अवलिया

येत्या ४-६ महिन्यात परत एकदा आय.टी. ला सुगीचे दिवस येतील अशी मनापासून खात्री आहे.

असो. येणारा काळच काय ते सांगेल. त्यावेळी हीच अस्वलाची पावले लक्ष्मीची पावले होतील बघाच तुम्ही...

अमेरीकेची वाट लागली आहे

रेट कट च्या प्राणवायुवर तग धरुन आहे

जास्त अपेक्षा ठेवु नका गोत्यात याल

नाना

नाना,

मोलाच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद. मी स्वतः वैयक्तिकरित्या बराच सहमत आहे तुमच्या मताशी.
लेकीन दिल है के मानता नही...
माझ्यामते जानेवारीच्या मध्यावर आय.टी. चे शेअर्स बराच नफा देतील आणि परत कोसळतील.
इन्फोसिस - सध्या १६५१ आहे
टेक महिन्द्रा - ११२० आहे (परवा ११७० च्या पुढे होता)
टी.सी.एस - १०३६ आहे ( सध्या हा शेअर माझ्या मते फारसा वाढणार नाही)
झेन्सर - १८६ ला आहे (या शेअरमधे मला बराच फायदा दिसतोय मे २००७ मधे हा ३७९ होता)

असो... पण मार्केट च्या तेजीत आय . टी. चे शेअर्स खूप वेगात फायदा देतात हे ही तितकेच खरे आहे.
मी स्वतः आय.टी. वाला असल्यामुळे तुमची शंका खरी ठरुन सॉफ्टवेअर कंपन्या गोत्यात आल्या तर माझ्या पोटावर पाय येईल हो.
तेव्हा असे न होण्याची मी कायम प्रार्थना करत असतो....
(आय.टी. वाला )सागर

अवलिया's picture

14 Jan 2008 - 5:00 pm | अवलिया

माझ्यामते जानेवारीच्या मध्यावर आय.टी. चे शेअर्स बराच नफा देतील आणि परत कोसळतील.
इन्फोसिस - सध्या १६५१ आहे

आज इन्फोसिस काय आहे हे पाहिलत? झोपली कंपनी (शेअर बाजाराच्या दृष्टीने)

पण मार्केट च्या तेजीत आय . टी. चे शेअर्स खूप वेगात फायदा देतात हे ही तितकेच खरे आहे.

रुपयाच्या मंदित व दोलरच्या तेजीत हे नफा देतात व दिला होता
भविष्यात हे कठिण आहे
रुपया खुप मजबुत होत जाणार
अंथरुण पाहुन पाय पसरावे संस्कृती (भारतीय संस्कृती ) कधीच गोत्यात येणार नाही
पण औकात नसताना कर्ज काढून सण साजरे करणारी (अमेरीकी वृत्ती - हो वृत्ती कारण त्यांना संस्कृती नाही) गोत्यात येणारच
असो

सॉफ्टवेअर कंपन्या गोत्यात आल्या तर माझ्या पोटावर पाय येईल हो.

का हो ... भारतीय लोकांना आपल्या ज्ञानाचा फायदा करुन देवुन उदर निर्वाह करायचा नाहि असा काहि पण केला आहे काय तुम्ही....?

नाना

धोंडोपंत's picture

15 Dec 2007 - 3:26 pm | धोंडोपंत

अमेरीकेची वाट लागली आहे

रेट कट च्या प्राणवायुवर तग धरुन आहे

जास्त अपेक्षा ठेवु नका गोत्यात याल

नाना,

जाऊ द्या हो. नवीन आहेत. शिकतील हळू हळू.

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

पंत,

हे बाकी तुमचे खरे आहे. नवीनच असल्यामुळे जरा जास्तच उत्साहाच्या भरात मी बोलून जातो
पण मनात मात्र मी काही ठेवत नाही. बोललो तिथं विषय संपतो माझ्यासाठी...
चुकून कोणाचे मन दुखावले गेल्यास मी जाहीर माफी मागतो.

आणि नव्यानेच गुंतवणुकीस सुरुवात केल्यामुळे अजून ठेचा लागायच्या आहेत.
दुसरे असे की मी वाणिज्य शाखेचा पदवीधर असल्याने मला मार्केटचा अंदाज येतो अशी माझी अटकळ आहे...
वस्तुस्थिती अशी आहे की शेअर मार्केट रंग बदलण्यात सरड्यावर पण मात करेल हे ही तितकेच खरे आहे.... :)

असो... माझे (अ)ज्ञान पाजळले नाही तर ठेचा त्या काय लागायच्या आणि त्यातून आम्ही काय शिकायचो
तसे मला देवकाका, तात्या, आणि पंतांसारख्या ज्येष्ठांचा वरदहस्त लाभला तर कमी ठेचा खाऊन जास्त कमाई कशी करायची हे शिकेन
मला माहीत आहे येथे अजून बरेच ज्येष्ठ आहेत.... पण माझा तसा संपर्क या तिघांशी आल्यामुळे आपले जास्त वाटताच एवढेच...
हळू हळू इतरांशी परिचय होईलच ....
(उत्साहाच्या उधाणाला ओहोटी आणायचा प्रयत्न करणारा) सागर

जयन्त's picture

1 Dec 2007 - 10:40 am | जयन्त

मी या क्षेत्रात नवीन आहे.
मला मार्गदरशन करेल का कोनी?

जयंतराव,

तुम्हाला नक्की काय मदत हवी आहे ते स्पष्ट केले तर छान होईल.
आपल्याकडे बरेच तज्ञ आहेत. ते नक्की मदत करु शकतील

धन्यवाद
सागर

संजय अभ्यंकर's picture

9 Dec 2007 - 12:34 pm | संजय अभ्यंकर

शेअर्स बद्दल BASIC माहिती साठी Peter Lynch ची One Up on the Wall Street, Beating the street या सारखी पुस्तके अतीशय उपयोगी आहेत.
तसेच पुढील वेबसाईट्स ही खुप माहिती देतात www.moneycontrol.com, www.hdfcsec.com
शेअर्सची भीती वाटत असेल तर म्युचुअल फन्डात पैसे टाकवेत. त्यासाठी www.valueresearchonline.com साऱखया वेबसाइट्स आहेत.

व्यंकट's picture

11 Dec 2007 - 4:34 am | व्यंकट

येथे बरेच लोक शॉर्ट टर्म वाले दिसत आहेत. मी आजवर कधीही शॉर्ट टर्म पैसा गुंतवलेला नाही, त्यात फार सावध रहावं लागआहे.

त्यामुळे माझ्याकडे, शॉर्ट टर्म वाल्यांकरता काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे त्यांनी स्वानुभवातून द्यावीत.

१. शॉर्ट टर्म गुंतवणूक करतांना साधारण प्रती शेअर लॉट किती पैसे गुंतवता? (उदा. मी कायमच ३५०० ते ७००० गुंतवतो, जेणे करून जर शेअर खूप पडला तर मी पुन्हा खरेदी करून माझे नुकसान कमी करू शकतो.)
२. कोणत्या ग्रूप वर तुमचा फोकस असतो? (उदा. मी कायमच ए ग्रूप चे स्टॉक्स घेतो.)
३. कमवलेला पैसा लवकर उधळला जातो का?
४. नंतर वर्षाखेरीस कर भरतांना दमझाक होते का? ( कारण अशा व्यवहारांत, १२ महिन्यात कमवलेला पैसा संपवून झालेला असतो आणि आता त्या पैशावर कर भरण्याची वेळ आलेली असते? )
५. कर भरतांना खूप ट्रांझ्याक्शन्स असल्याने, करभरणे किचकट होते का?

व्यंकटराव,

तुमचे मुद्दे तर खूप विचारात घेण्याजोगे आहेत.
माझी काही मते देत आहे:

१. शॉर्ट टर्म गुंतवणूक करतांना साधारण प्रती शेअर लॉट किती पैसे गुंतवता? (उदा. मी कायमच ३५०० ते ७००० गुंतवतो, जेणे करून जर शेअर खूप पडला तर मी पुन्हा खरेदी करून माझे नुकसान कमी करू शकतो.)

- पैशापेक्षा शेअरच्या संख्येवर माझा भर असतो. उदा: ए ग्रुपचे शेअर्स घेताना मी १०० च्या पटीत घेतो, म्हणजे फायदा जेव्हा होतो तेव्हा तो त्या पटीत आणि चांगला मिळतो. तरी शेअर्स घ्यायचे असतील तर कमीत कमी ३०-४० घ्यावेत, म्हणजे तोटा होणार असेल तर आधी लक्षात घेता येते व लगेच ते शेअर्स विकून मूळ मुद्दल तरी परत मिळवता येते

२. कोणत्या ग्रूप वर तुमचा फोकस असतो? (उदा. मी कायमच ए ग्रूप चे स्टॉक्स घेतो.)
तसे ए ग्रुपवाले हमखास फायदा देणार्‍यातले असतात खरे. पण बी व सी ग्रुपचे पण फायदा देतात.
शक्यतो प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे हे माहीत करुन शेअरची खरेदी केली तर चांगले असते. उदा: ज्या शेअरची फेस व्हॅल्यू १ ,२ वा ३ रुपये असते तो शेअर सहसा एकदम मोठ्या पटीत वाढत नाही. तसेच ज्या शेअरची फेस व्हॅल्यू ५ रु. वा १० रु. असते ते शेअर्स त्याच पटीत वाढल्यामुळे जास्तीचा फायदा देतात. असा माझा अनुभव आहे. प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यूची व कंपनीची सगळी माहीती http://www.religareonline.com/ या साईटवर छान मिळते. येथे Get Quotes On या पर्यामधून तुम्हाला शेअरची आजची उच्च व नीच किंमत , गेल्या वर्षातील उच्च व नीच किंमत छानपणे कळते... तेव्हा निर्णय घेणे सोपे पडते.. सर्वांनीच या साईटचा वापर करावा म्हणजे आपली गुंतवणूक कशी फायदा देईन याचा ढोबळ अंदाज तरी येईन

३. कमवलेला पैसा लवकर उधळला जातो का?

याबाबत मी सध्या तरी काही सांगू शकणार नाही. कारण याच वर्षापासून मार्केटमधे मी उडी घेतली आहे. याबाबत आपले देवकाका (अत्यानंदकाका), तात्या (विसोबा खेचर) , धोंडोपंत व इतर वरीष्ठ जास्त चांगले सांगू शकतील.
मला विचाराल तर कमावलेला पैसा थोडाफार तरी स्वत:च्या चैनीवर उधळला तर तो सत्कारणी लागला असे म्हणता येईल.

४. नंतर वर्षाखेरीस कर भरतांना दमझाक होते का? ( कारण अशा व्यवहारांत, १२ महिन्यात कमवलेला पैसा संपवून झालेला असतो आणि आता त्या पैशावर कर भरण्याची वेळ आलेली असते? )
- हे काय गौडबंगाल आहे बुवा? मी काही ही कमाई टॅक्स मधे जाहीर करणार नाही. जेव्हा तोटा होतो तेव्हा येते का इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपला लॉस द्यायला? ही सर्वस्वी माझ्या डोके वापरण्याबद्द्लची कमाई आहे. त्यामुळे मी ह्यातून मिळालेले पैसे तरी सरकारला देणार नाही.

५. कर भरतांना खूप ट्रांझ्याक्शन्स असल्याने, करभरणे किचकट होते का?
कोण जाणे? तुमचा नक्की प्रॉफीट तुम्हाला त्यातून मोजून घ्यावा लागेल मगच टॅक्सचा विचार करा. तात्या किंवा देवकाका एकदम मस्त आणि सणसणीत उत्तर लिहितील याबाबत.

तूर्तास इतके पुरे...
(बाजाराच्या तेजीमुळे नफा कमावण्यास सज्ज असलेला ...) सागर

व्यंकट's picture

12 Dec 2007 - 12:54 am | व्यंकट

व्हेरी मच

अवलिया's picture

13 Dec 2007 - 7:12 pm | अवलिया

- हे काय गौडबंगाल आहे बुवा? मी काही ही कमाई टॅक्स मधे जाहीर करणार नाही. जेव्हा तोटा होतो तेव्हा येते का इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपला लॉस द्यायला? ही सर्वस्वी माझ्या डोके वापरण्याबद्द्लची कमाई आहे. त्यामुळे मी ह्यातून मिळालेले पैसे तरी सरकारला देणार नाही.

सिक्युरीटी ट्रान्झक्शन टेक्स भरता ना‍?
प्यान कार्ड अकौट उघडताना दिलेले आहे ना ?
मग कसे लपवणार?

तोटा तुम्ही पुढे खेचु शकता. आय टी कायदा नीट समजुन घ्या
डोके वापराः)

सरकारला १० टक्केच रक्कम द्यावी लागते

(कर भरणारा) नाना

नाना,

हे जर एवढे सहज सोपे असेल तर माझी पण टॅक्स भरायला हरकत नाही.
पण सरकार सगळ्या मार्गांनी आपली कमाई लुटायला बघत असते यात मात्र काही संशय नाही.
आय.टी. कायदा समजून घ्या असे तुम्ही म्हणालात ते मनावर घेतो जरा. पण तुम्ही तुमच्याकडील टिप्स दिल्यात तर माझ्यासारख्या (मी जरी सॉफ्टवेअरमधे काम करत असलो तरी) टॅक्स न कळणार्‍या सगळ्यांनाच फायदा होईल.

धन्यवाद
सागर

ऋषिकेश's picture

14 Dec 2007 - 8:56 pm | ऋषिकेश

पण तुम्ही तुमच्याकडील टिप्स दिल्यात तर माझ्यासारख्या (मी जरी सॉफ्टवेअरमधे काम करत असलो तरी) टॅक्स न कळणार्‍या सगळ्यांनाच फायदा होईल.
खरय! +१... आयटी कायदा आणि टॅक्सबद्दल कृपया 'टिपावे' [म्हणजे टिप्स द्याव्यात :) ]

-ऋषिकेश

राजे's picture

14 Dec 2007 - 9:02 pm | राजे (not verified)

सहमत.

आयटी कायदा आणि टॅक्सबद्दल जो माहीतीगार आहे त्यांने लेखन करावे ही विनंती.... नारळ पाठवू का आता ? अहो साहेब लिहा हो लवकर... ह्या कायदा आणि टॅक्स नी जीणे बेहाल केले आहे आमचे.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

धोंडोपंत's picture

15 Dec 2007 - 3:14 pm | धोंडोपंत

तोटा तुम्ही पुढे खेचु शकता. आय टी कायदा नीट समजुन घ्या
डोके वापराः)

नानासाहेब,

तुम्ही "त" म्हणजे काय ते सांगितलतं. त्यांना 'त' वरून तपेलं की ताकभात ते कळलेले नाही.

या गोष्टी उघडपणे सविस्तर बोलायच्या नाहीत.

त्यामुळे पुढील मार्गदर्शन जर त्यांना हवे असेल आणि लॉस कसा बुक करावा वगैरे या विषयावर तुम्ही काही सांगणार असाल तर, जाहीरपणे न बोलता व्य नि मधून ते मार्गदशन करा हेच आमचे सांगणे.

सर्व गोष्टी उघडपणे बोलायच्या नसतात.

आपला,
(गुप्त) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

अवलिया's picture

15 Dec 2007 - 5:16 pm | अवलिया

सर्व गोष्टी उघडपणे बोलायच्या नसतात.

थोडी माहिती द्यायला काय हरकत ?

(ओपन सोर्स चा चाह्ता) नाना

विसोबा खेचर's picture

14 Dec 2007 - 12:06 am | विसोबा खेचर

व्यंकटराव,

१. शॉर्ट टर्म गुंतवणूक करतांना साधारण प्रती शेअर लॉट किती पैसे गुंतवता? (उदा. मी कायमच ३५०० ते ७००० गुंतवतो, जेणे करून जर शेअर खूप पडला तर मी पुन्हा खरेदी करून माझे नुकसान कमी करू शकतो.)

माझ्या मते हे प्रत्येकावर अवलंबून आहे. फक्त एखाददोन कंपनीतच पैसे न गुंतवता आपली गुंतवणूक थोड्याफार प्रमाणात सर्वच क्षेत्रातल्या (किंवा बर्‍याचश्या) क्षेत्रातल्या समभागात असावी असे मात्र वाटते!

२. कोणत्या ग्रूप वर तुमचा फोकस असतो? (उदा. मी कायमच ए ग्रूप चे स्टॉक्स घेतो.)

माझा सर्वच ग्रुपवर फोकस असतो. समभाग खरेदीयोग्य निकषांत बसल्याशी कारण, मग ग्रुप कोणताही असो...

३. कमवलेला पैसा लवकर उधळला जातो का?

माझ्या मते हे व्यक्तिसापेक्ष असून प्रत्येकाच्या खर्च करण्याच्या सवयींवर अवलंबून आहे.

४. नंतर वर्षाखेरीस कर भरतांना दमझाक होते का?

नाही होत/होऊ नये!

कर भरतांना खूप ट्रांझ्याक्शन्स असल्याने, करभरणे किचकट होते का?

नाही.

आपलाच,
तात्या.

व्यंकट's picture

14 Dec 2007 - 8:13 pm | व्यंकट

धन्यवाद तात्या

स्वाती राजेश's picture

12 Dec 2007 - 2:34 am | स्वाती राजेश

http://www.religareonline.com
साईट खूप छान आहे