कोल्हापूर स्थित "अजब " प्रकाशक ,यानी गेल्या कांहि वर्षापासून
५० रु.यात कोणतेही पुस्तक असा फंडा काढला आहे,अर्थात त्यांच्या
प्रकाशना खालील कोणतेही पुस्तक.साधारणपणे निदान ही ४००/५००
टायटल असावित .गावोगावी प्रदर्शनं भरवुन ते पुस्तक विक्री करित असतात.
बहुतेक पुस्तके, ही रॉयल्टी संपलेली असतात.निदान ५०/६० वर्षा पूर्वी प्रथम
प्रकाशित झालेली असतात .राम गणेश गडकरी, श्रीपाद क्रुष्ण कोल्हटकर,
साने गुरूजी,नाथ माधव, ह.ना.आपटे,वि.दा.सावरकर,इ.जूने नामवंत लेखक
त्यात आहेत .अलिकडील कांही लेखकहि उदा. गिरीजा कीर,श्रीकांत मुंदारगी,यात आहेत.
१००पानांपासून३००/३५० पानांची चांगल्या छपाईची ही पुस्तकं असतात.मी अनेक
वेळेला या प्रदर्शनात गेलो आहे,अनेक पुस्तके घेतलेलीहि आहेत. तशी पुस्तके घेण्याची ,
संग्रहीत करण्याची माझी आवड ,तसं गेल्या जन्मापासूनच आहे ,म्हटलं तर चालेल.
विनोदाचा भाग जाउ दे.
पुस्तकाचे कोणतेहि प्रदर्शन कधी माझ्याकडून चूकविले जात नाही. साहित्य संमेलनात
कधी गेलोच तर फक्त पुस्ताकासाठी .
सांगण्याचा मुद्दा हा की इथंहि पुस्तंकांच्या किंमती१०/२० टक्कायाहुन अधिक कमी नसतात.
कां असाव्यात? मात्र अजब वाल्याचं कामच अजब आहे, कोइबि चीज उठाओ ५० रु.साधारणपणे
पुस्तकाचा व्यवसाय ३० ते४० टक्के कमिशन वर चालतो.म्हणून मी या विषयावर धागा काढू इच्छितो की?
१)ह्याना हे कसे परवडते?३०० पानाची कोरी वही ५०रु. ला मिळत नाही.
२)इतिहास जमा पुस्तके लोकं विकत घेतात कां?
३) कां घेतात?
४)वाचतात कां?
५)छापिल किंमत अव्वाच्या सव्वा असते,हे गौड बंगाल काय आहे?
६)अलिकडील दर्जेदार /नवीन पुस्तके अजून थोड्या जास्त उदा.१०० रु.किंमतींत प्रकाशक कां आणता नाही?
७)वाचन संस्क्रुती याने व्रुंधिगत होता असेल तर महाराष्ट्र सरकारने असे उपक्रम कां राबवू नयेत?
अजब पुस्तके
गाभा:
प्रतिक्रिया
19 Oct 2015 - 9:09 pm | आनंद कांबीकर
काही नाही यांना फ़क्त पैसा महत्वाचा असातो. माझा एका टेक्नीकल प्रकाशनच्या प्रकाशकशि संबंध आला. भामटेगिरि चालु आहे. पार्ट टाइम जॉब करणाऱ्या मुलांना बसवतात,४-५ हजार पगार देऊन आणि डिप्लोमा,डिग्री काहीबाहिपुस्तक छापत असतात.
19 Oct 2015 - 10:08 pm | आदूबाळ
माझ्या माहितीप्रमाणे पुस्तकाच्या किमतीचे खालील भाग पडतातः
पुस्तक दुकानदार (रीटेलर): ३०% ते ४०%
लेखकाचे मानधन: १०% ते २०%
छपाई, कागद वगैरे: २०% ते ३०%
या अर्थातच ग्रोस कॉस्ट आहेत. म्हणजे १०% ते ४०% नफा "मिळू शकतो". सामान्य प्रकाशकांसाठी या १०% - ४०% ला पुष्कळ वाटा फुटलेल्या असतात. उदा० संपादक, मुद्रितशोधक, आर्टवर्क करणारे, जाहिराती, वगैरे.
अजबचं मॉडेल असं आहे, की या ग्रोस मार्जिनखालच्या खर्चांना फाटा देऊन पुस्तक सरळ बाजारात आणायचं. आता त्यासाठी काय लागेल? पहिलं म्हणजे कोणीतरी आगोदरच लिहिलेलं पुस्तक, जे वाचकाला विकत घ्यावंसं वाटेल, पण लेखकाला रॉयल्टी द्यावी लागणार नाही. मग कॉपीराईट संपलेलं पुस्तक हे सगळ्यात बेस्ट!
या पुस्तकांचे कागद आणि छपाईही चांगली नसते. त्यावर शाईपेन टेकवलंत तर शाई फुटेल. म्हणजे छपाई/कागदखर्चात बचत.
आणि ही पुस्तकं नेहेमीच्या रीटेलरकडे न देता खास प्रदर्शनात मांडली तर कमिशनला फाटा देता येतो. (प्रदर्शन भरवण्याचा खर्च रीटेलरच्या कमिशनपेक्षा कमी आहे हे यात अध्याहृत आहे.)
पायरेटेड पुस्तकं विकणारे आणि अजबचं हे बिझिनेस मॉडेल सारखंच आहे. फक्त अजब कोणाची रॉयल्टी बुडवत नाही (नसावं) आणि टाईपसेटिंग वगैरेचे कष्ट घेतं.
पेपरबॅक किंवा पल्प फिक्शन या प्रकारांशी थेट तुलना होऊ शकत नाही. तो मान आगोदरच "चार आणे माला" वगैरेंकडे आहे.
-----
ही पुस्तकं मी आवर्जून विकत आणि वाचतो. काही लहानपणी वाचलेली असतात, काही कुठल्यातरी ग्रंथालयांमध्ये पानं सुटलेल्या अवस्थेत मिळालेली असतात. काही अशक्य भारी रत्नं हाती लागली आहेत. उदा० गो ना दातारांचा आद्य मराठी डिटेक्टिव्ह "चतुर माधवराव", किंवा 'ओय लक्की लक्की ओय' वगैरे चित्रपटांमध्ये शोभावी अशी नाथमाधवांची "सोनेरी टोळी".
20 Oct 2015 - 1:05 am | palambar
ही पुस्तके बघितली आहेत चांगला उपक्रम आहे
20 Oct 2015 - 11:12 am | हतोळकरांचा प्रसाद
मागे एकदा त्यांच्या प्रदर्शनात पुस्तके खरेदी करत असताना आयोजकांशी गप्पा झाल्या, त्यात कळले कि या पुस्तकांच्या संपूर्ण छपाईचा खर्च ५० रुपयांच्या आतच बसतो. बाकी पुस्तके इतिहासजमा वगैरे होत नाहीत हे माझे वैकाय्क्तिक मत आहे.अजब वाल्यांच्या या प्रदर्शनातूनच मी सावरकरांची सहा सोनेरी पाने, काळे पाणी, माझी जन्मठेप, १८५७ चे स्वातंत्र्यसमर वगैरे पुस्तके खरेदी केली आहेत.
बाकी लोक अशी पुस्तकं का वाचतात याला काही उत्तर नाही. लोक CID का बघतात (दरवेळेला त्याचा शेवट तेवढाच फालतू असतो तरीही) एवढंच ते अगम्य आहे. पण ५० रु. ला मिळतात म्हणून कुठलेही पुस्तके घेण्याचा काही कारण नसावा. बरेच लोक चला वाचून तर बघू म्हणून घेत असावेत.