श्री. भावेश भाटिया: एक अवलिया

मी ओंकार's picture
मी ओंकार in काथ्याकूट
19 Oct 2015 - 5:49 pm
गाभा: 

वयाच्या १५ व्या वर्षी अचानक आंधळेपण आले तर तुम्ही काय कराल? आणि सोबतच आई कर्करोगाने आजारी आणि वडिलांची तुटपुंजी कमाई ही संकटे ह्याच काळात उभी ठाकली तर?

एकुन कदाचीत धक्का बसेल पण ही खरी गोष्ट आहे अश्याच एक अवलियाची ज्याला वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी या अस्मानी संकटांचा सामना करावा लागला, आणी त्यातुन खचुन न जाता जोमाने उभा राहुन आज करोडा रुपयांचा व्यवसाय आणी सोबत शेकडो अंध लोकांना रोजगार देउन त्याने आपले जिवन सार्थकी लावले. अशा या अवलियाचे नाव आहे श्री. भावेश भाटिया.

श्री. भाटिया यांचा जन्म झाला महाबळेश्वर हया थंडहवेच्या गावी. किशोरवयीन जीवनापर्यंत आपल्या पुढ्यात काय वाढुन ठेवलय याची कल्पना कदाचीत भावेश ला नसावी. असच सामान्य आयुष्य जगत असताना आपल्याला शाळेतील फळ्यावरच काही दिसत नाही अस हळुह्ळु भावेशला जाणवु लागल आणि काही दिवसातच संपुर्ण द्रुष्टी नाहिशी झाली. अचानक आलेला हा धक्का कमी कि काय, ह्यातच आपल्या आई ला दुर्धर कर्करोगाने ग्रासलय हे भावेश ला समजले. दुखा:चा जणु डोंगरच भाटिया कुटुंबावर कोसळाला.

वडलांच्या तुटपुंज्या कमाई मुळे शिक्षण आणि ईलाज ह्यात खुपच कसरत होत होती तरिही नेटाने अभ्यास करुन भावेशने आपले शिक्षण पुर्ण केले. मधल्या काळात आईचे निधन झाले.

शिक्षण पुर्ण केल्यावर पोटापाण्याच्या कामाची चिंता समोर होती म्हणुन भावेश ने NAB ह्या अंधलोकांच्या संस्थेत प्रवेश घेतला, सदर संस्था ही अंधांसाठी अनेक व्यवसाय पुरक शिक्षणअभ्यासक्रम चालवते. भावेश ह्यांना मेणबत्ती शिकयची खुप इच्छा होती मात्र NAB ने त्या आधी कधिही पुर्णांध लोकांना मेणबत्ती शिकवण्याचे प्रशिक्षण दिले नव्हते त्यामुळे भरभक्कम अंगकाठी असलेल्या भावेश ला मसाज चे प्रशिक्षण घ्यावे लागले. मसाज चे प्रशिक्षण घेत असताना मेणबत्ती शिकवणारया शिक्षकांना मोफत मसाज करुन त्यांच्या त्यांनी कडुन मेणबत्ती बनवायचे तंत्र आत्मसात केले. त्यानंतर काही काळ मुबंईमधे वास्तव्य करुन महाबळेश्वर ला परतुन ५००० रु. भांडवलावर श्री. भाटिया यांनी "सनराईज कॅन्डल्स" ह्या आपल्या मेणबत्ती व्यवसयाची मुहुर्तमेढ रोवली. सुरवातीला एका हातगाड्यावरुन विक्री ची सुरवात करुन रोवलेल्या ह्या व्यवसायाचे आज एका वटवृक्षात रुपांतर झाले आहे.

महाबळेश्वर मध्ये निर्मिती आणि संपुर्ण देश, मध्य पुर्व देशात निर्यात यातुन श्री. भाटियानी आपल्या व्यवसायाला एक प्रचंड मोठ्या उंचीवर नेले आहे आणी यातुन सुमारे ३०० अंध बांधवाना त्यांनी रोजगार दिला आहे.आज ग्रँड हयात, रिलायंस सारख्या अनेक कंपन्या ह्या त्यांच्या ग्राहक आहेत.

भाटिया ह्यांचे जिवन हे सर्वांसाठीच एक प्रेरणा आहे, आंधळेपणा ला कोणताही अडथळा न मानता श्री भाटिया यांनी आपल्या व्यवसायासाठी कोणत्याही संस्था अथवा ट्र्स्ट च्या नोंदणी चा आधार घेतला नाही, तर एका प्रा.लि. कंपनी ची स्थापना केली. जिची संपुर्ण धुरा त्याचीं अंध कामगार बघतात. निर्मिती, विक्री, विपणन अश्या ह्या सर्व गोष्टींची ह्यात समावेशा आहे.

याच बरोबर श्री. भाटिया ह्यांच्या जिवनाचे अनेक पैलु आहेत जस, ते स्व:ता रोज ५०० पुशअप्स, वेट लिफ्टिंग सारखे व्यायम करतात आणी ते १०० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मेडल्स चे मानकरी आहेत त्याच बरोबर २०१६ मधे पॅरा ऑलंपिक मधे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मेहनत घेताएत.

श्री. भावेश भाटिया यांच्या कॅंडल्स तुम्ही इथे बघु आणि खरेदी करु शकता.
http://sunrisecandles.co.in/

आणि त्यांच फेसबुक पेज आहे:
https://www.facebook.com/SunriseCandles?fref=ts

त्यांचा संपुर्ण प्रवास हा तुम्ही इकडे बघु शकता.

प्रतिक्रिया

स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व.

तर्राट जोकर's picture

19 Oct 2015 - 6:43 pm | तर्राट जोकर

प्रेरणादायी भारतीय व्यक्तिमत्व.... लेख आवडला.

तर्राट जोकर's picture

19 Oct 2015 - 6:45 pm | तर्राट जोकर

पुर्ण अंध असलेल्या व्यक्तीने घरा घरात प्रकाशाचे दूत पोचवण्याचे कार्य करणे अविश्वसनीयरित्या काव्यमय आहे.

मी ओंकार's picture

19 Oct 2015 - 7:11 pm | मी ओंकार

महाबळेश्वर येथील त्यांच्या कंपनी मधे तुम्ही त्यांच काम पाहु शकता, याच बरोबर महाबळेश्वर येथे वैक्स म्युझियम देखील भाटिया यांनीच घडवले आहे ते सुध्दा ७ ही दिवस खुले असते. अतिशय नम्र आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व.

बॅटमॅन's picture

23 Oct 2015 - 12:50 pm | बॅटमॅन

लेख तर मस्तच. शिवाय वॅक्स म्युझियमबद्दल वाचूनही छान वाटले. पुढे कधी जाईन तेव्हा हे पाहण्यात येईल, धन्यवाद!

विवेकपटाईत's picture

19 Oct 2015 - 7:40 pm | विवेकपटाईत

प्रेरणादायी व्यक्तित्व, सलाम

उगा काहितरीच's picture

20 Oct 2015 - 12:44 am | उगा काहितरीच

+१

बबन ताम्बे's picture

19 Oct 2015 - 7:51 pm | बबन ताम्बे

संपुर्ण चित्रफीत पाहीली व ऐकली.

सलाम या अवलियाला.

धन्यवाद ओंकार साहेब हा लेख लिहील्याबद्द्ल.

धर्मराजमुटके's picture

19 Oct 2015 - 8:00 pm | धर्मराजमुटके

लेख आवडला ! म्हणून ही खास पोच.
अजून एक. धुमश्चक्रीच्या धाग्यांवर येणारे शतकी प्रतिसाद इथे येणार नाही पण तरीही लिहित रहा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Oct 2015 - 8:13 pm | राजेंद्र मेहेंदळे

मनाला आलेली मरगळ झटकायला भाग पाडणारा लेख !!

चतुरंग's picture

19 Oct 2015 - 8:28 pm | चतुरंग

श्री. भाटिया यांची माहिती करुन दिल्याबद्दल धन्यवाद. चित्रफीत नंतर बघेनच. अधून मधून अशा माणसांची गाठ पडणे आवश्यक असते कारण त्यामुळे आपल्या अडचणी या कितपत खर्‍या आहेत याचा लेखाजोखा घेता येतो.

माझ्या चुलत मामाच्या फॅक्टरीमध्ये एक संपूर्णपणे अंध व्यक्ती कामाला होती. बँकेत पैसे भरण्यापासून ते ५-५ लाखाची कॅश नेणे आणणे इतकेच नव्हे तर पुण्याहून मुंबईला जाऊन संपूर्ण, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल गोष्टींचे परचेस तुद्धा तो मनुष्य करुन येत असे एका पैशाचीही चूक न होऊ देता किंवा कोणतीही गफलत न होऊ देता!
मामा सांगायचा की त्याला स्पर्शाने नोट कितीची आहे हे समजत असे. पाचशेचा गठ्ठा मोजताना मधेच शंभराची नोट सरकवून दिली तर तो मोजताना तिथे थांबे आणि नोट बाजूला काढून ठेवत असे! :)

प्रेरणादायी लेख. महाबळेश्वर इतक्या जवळ असूनही या बद्दल (किंवा असा इतिहास आहे हे) ठाऊक नव्हतं.
यावेळी भारतेभेटीत नक्की जाईन.

चाणक्य's picture

19 Oct 2015 - 8:41 pm | चाणक्य

अतिशय स्फूर्तिदायक.

जेपी's picture

19 Oct 2015 - 8:46 pm | जेपी

लेख आवडला.

बाबा योगिराज's picture

19 Oct 2015 - 8:49 pm | बाबा योगिराज

जबरदस्त व्यक्तिमत्व. जबरदस्त लेख.
एका चांगल्या व्यक्तिचि ओळख करुन दिलित.

पुढील लिखानासाठी शुभेच्छा.

श्रीरंग_जोशी's picture

20 Oct 2015 - 2:51 am | श्रीरंग_जोशी

प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
आजवर कधी महाबळेश्वरला गेलो नाही. जेव्हा जाइन तेव्हा भावेश यांच्या वॅक्स म्युझियमला आवर्जून भेट देईन.

नाखु's picture

20 Oct 2015 - 11:08 am | नाखु

सहमत अश्या मुझीयमला भेट देणे नक्कीच आनंददायी असेल.

लेखाबद्दल धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

20 Oct 2015 - 7:56 am | मुक्त विहारि

धन्यवाद....

सौन्दर्य's picture

20 Oct 2015 - 8:09 am | सौन्दर्य

इतक्या चांगल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

अभिजीत अवलिया's picture

20 Oct 2015 - 9:10 am | अभिजीत अवलिया

एका चांगल्या व्यक्तीची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद.

म्हसोबा's picture

20 Oct 2015 - 9:31 am | म्हसोबा

खरंच एका अवलियाची ओळख करुन दिली आहे. प्रेरणादायी प्रवास आहे हा.

मांत्रिक's picture

20 Oct 2015 - 10:27 am | मांत्रिक

+१११११११११

अशा लोकांसमोर साष्टांग घालणं इतकंच मी करू शकतो...
याहून अधिक काही बोलण्याची वगैरे माझी पात्रताच नाही असं मानतो.

जिद्दीचं मूर्तिमंत उदाहरण आहे हे !

द-बाहुबली's picture

20 Oct 2015 - 2:52 pm | द-बाहुबली

नाव आडनाव's picture

20 Oct 2015 - 3:51 pm | नाव आडनाव

लेख आवडला.

नीलमोहर's picture

20 Oct 2015 - 4:14 pm | नीलमोहर

प्रेरणादायी, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व.
त्यांच्या जिद्दीला आणि दुर्दम्य इच्छाशक्तीला सादर प्रणाम.

लेखासाठी धन्यवाद.

पिशी अबोली's picture

20 Oct 2015 - 4:25 pm | पिशी अबोली

प्रेरणादायी आहे. कॉलेजला असताना बरेच अंध मित्र-मैत्रिणी होते. त्यांच्या ग्रुपसोबत वेळ घालवणे, त्यांच्यासोबत अभ्यास करणे हा निव्वळ आनंद होता. अजूनही काही लोकांसोबत संपर्क आहे आणि ते प्रचंड धडपड करून खूप यशस्वी झालेले आहेत. अशा लोकांना पाहिलं की स्वतःच्या आळशीपणाची प्रचंड लाज वाटते.

या लेखाद्वारे या आदरणीय व्यक्तिमत्वाची ओळख करुन दिल्याबद्दल अनेक आभार.त्यांच्या फॅक्टरीला नक्की भेट देणार आणि म्युझियमलाही.

मी ओंकार's picture

20 Oct 2015 - 4:33 pm | मी ओंकार

कॉलेज ला असताना श्री. भाटिया यांनी सायकल वर नेपाळ पर्यंतचा प्रवासही आपल्या डोळस मित्रासोबत केला आहे.
पिशी अबोली होना, त्यांना भेटुन कधीकधी आपल्या आळशीपणाची खरच लाज वाटते!

अवांतरः ह्या लेखात काही बदल करायचे असल्यास काय करायला लागेल. माझा पहिलाच लेख आहे हा त्यामुळे हा ईंटरफेस जुळवुन घ्यायला वेळ लागतोय.

श्रीरंग_जोशी's picture

21 Oct 2015 - 12:43 am | श्रीरंग_जोशी

लेखात (आशय न बदलणारे) बदल करायचे असल्यास कृपया साहित्य संपादकांना संपर्क करावा.

पद्मावति's picture

21 Oct 2015 - 1:13 am | पद्मावति

अत्यंत स्फूर्तिदायक व्यक्तिमत्वाची सुंदर ओळख. धन्यवाद.

यशोधरा's picture

21 Oct 2015 - 5:19 am | यशोधरा

अतिशय प्रेरणादायी!

चित्रगुप्त's picture

21 Oct 2015 - 6:35 am | चित्रगुप्त

कमाल आहे या माणसाची. अतिशय प्रेरणादायी लेख.
आम्हा दिल्लीत राहणाऱ्या मराठी लोकांना सुरुवातीला पंजाबी लोक अजिबात आवडत नाहीत, परंतु नंतर हळूहळू कळत जाते की असे काही नसते. त्यांच्यात अतिशय थोर लोक आहेत.

मी ओंकार's picture

21 Oct 2015 - 3:50 pm | मी ओंकार

श्री. भाटिया हे गुजराथी आहेत, माझा पण आडनावामुळे गोंधळ झाला होता.

चतुरंग's picture

21 Oct 2015 - 7:08 am | चतुरंग

काय कणखर आहे हा माणूस!! केवळ पोलादी जिद्द!!
लाचारी, सहानुभूती, दया यांची जराही शिकार न होता असली स्वप्ने पूर्ण करणे येरागबाळ्याचे काम नोहे!
येथे कर माझे जुळती!! _/\_

(साष्टांग्)रंगा

बोका-ए-आझम's picture

21 Oct 2015 - 8:07 am | बोका-ए-आझम

अशा माणसाला अंध कोण म्हणेल? ज्याने इतरांना दिसत नसलेली संधी शोधून काढली आणि एवढा मोठा उद्योग उभा केला, तो माणसापुढे _/\_.

मंजूताई's picture

21 Oct 2015 - 11:47 am | मंजूताई

व्यक्तिमत्व ! छान ओळख करुन दिलीत...

अशा या लोकांमुळे आपले खुजेप ण अधिकच अधोरेखित होते. आपण फारच निरर्थक आयुष्य जगतोय असे वाटायला लागते
पण काही चांगले करण्याची प्रेरणा पण मिळते.
या गोष्टी खुप महत्वाच्या आहेत असे वाटते.

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Oct 2015 - 12:23 pm | माम्लेदारचा पन्खा

प्रचंड ऊर्जादायी व्यक्तिमत्व.....आमच्या सौ नॅबमधेच काम करीत असल्याने त्यांच्याबरोबर जवळपास अख्खा दिवस घालवला आम्ही.... आवर्जून भेट द्यावी असे म्युझियम आहे त्यांचे !

काही कारणवश माझा हा लेख लिहायचे मात्र राहून गेले होते....जुन्या आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद मी ओंकार !

कपिलमुनी's picture

21 Oct 2015 - 2:52 pm | कपिलमुनी

महाबळेश्वरला बर्‍याचवेळा जाउन ही माहिती नव्हती.
पुढील भेटीमध्ये फॅक्टरीला भेट देउन खरेदी करण्यात येइल

मी-सौरभ's picture

22 Oct 2015 - 10:52 pm | मी-सौरभ

असेच म्हणतो

जगप्रवासी's picture

21 Oct 2015 - 3:29 pm | जगप्रवासी

प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

वेळेअभावी किंवा काही कारणास्तव महाबळेश्वर बाहेरील लोकांची गैरसोय होउ नये म्हणुन सनराईज कॅन्डल्स ह्या श्री. भाटिया यांनी आंतरजालावरही विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत.

http://sunrisecandles.co.in/

पैसा's picture

21 Oct 2015 - 10:05 pm | पैसा

अतिशय स्फूर्तीदायक ओळख!

दमामि's picture

23 Oct 2015 - 9:34 am | दमामि

+111

अशाच लोकांकडे जास्त जिद्द आसते. नाहितर आपण पाउस ओफ्फिस ला जातांना पडला तरि
लगेच रडायला लागतो.