कास पठार आणि वजराई धबधबा...

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in भटकंती
18 Oct 2015 - 11:44 pm

वेळेच्या अभावी सगळेच सविस्तर लिहिणे शक्य झाले नाही त्यामुळे थोडक्यात वर्णन केले आहे.
मागच्या महिन्यात कासला जाउन आलो. तिथे काढलेले काही फोटो इथे प्रकाशित करत आहे...

घन ओथंबून झरती, नदीस सागर-भरती
डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती...
ajinkyatara1

आपल्या अंगावरची ढगांची दुलई बाजूला सारून सातारा हळूहळू जागा होत होता
dhuke

कास पठारावर काढलेले काही फोटो
kaas

kaas2

kaas3

kaas4

यावेळी पहिल्यांदाच मी शनिवारी कासला गेलो होतो(म्हणजे कास पठार प्रसिध्द झाल्यानंतर) आणि आयुष्यात पहिल्यांदा इथे गाड्यांमुळे traffic जॅम झालेलं पाहिलं... अक्षरशः शेकडो गाड्या होत्या. इतकी गर्दी काही झेपली नाही त्यामुळे आम्ही तिथून निघून वजराई धबधबा बघायला जायचं ठरवलं.

धबधबा लांबूनच पहायचा असल्यामुळे अर्ध्या तासात परत येऊ असा अंदाज होता त्यामुळे खादाडी परत येऊनच करू असे ठरवले आणि निघालो... धबधबा जवळ आल्यावर तिथल्याच एका काकांना धबधब्याला पाणी किती आहे विचारलं, त्यांनी "लई पाणी आहे, पण हितून बघू नका ताम्बिला जावा तिथून चांगला ह्यु दिसल" सांगितलं. आम्हाला पण ते पटल कारण दोन दिवस सलग पाउस होत होता. त्यामुळे तांबीच्या दिशेने निघालो. तिथे पोहोचल्यावर मंदिराजवळ गाडी लावली आणि चालत निघालो कारण पुढे गाडी घेऊन जाण्यासारखा रस्ता नव्हता.

थोडेसेच अंतर चालल्यावर धबधबा दिसला...
fall

"मस्त दिसतोय रे" मी वैभवला म्हणालो. "हो यार, पण तीन टप्पे इथूनही दिसत नाहीयेत. पण भारीच दिसतोय!"
"हम्म, जवळ गेल्यावर दिसतील ना!", मी.
वैभवच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले...आजवर आमचे अनेक प्लान असेच, एक ठरवून दुसरेच करणे या प्रकारात मोडत असल्याकारणाने त्याला परिस्थितीचा लगेच अंदाज आला!
"हे बघ, अंतर बरच आहे... आपण पाणी पण नाही आणल आणि काही खाल्लपण नाही. आत्ता नको जायला" वैभवचा बचाव.
"हो रे, पण वाटेत काही घर लागतीलच त्यामुळे पाणी मिळेल आणि जेवणाच म्हणशील तर महात्मा गांधींनी जेवणाशिवाय..." "हा, माहिती आहे बाबा उपोषण! चला, जाऊया... साला दरवेळेसच आहे आपल हे!" माझ वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याच उत्तर आल, केवळ गांधीजींचे पाठबळ होते म्हणून!

मग काय, निघालो धबधब्याच्या दिशेने. खाली काही घरे दिसत होती तिथ जाउन रस्ता विचारूया ठरवलं. बरच अंतर चालल्यावर तिथपर्यंत पोहोचलो तेव्हा समजल, उंचीवरून जवळ दिसणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात आजिबात जवळ नसतात!
तिथे एक काकू भेटल्या त्यांना रस्ता विचारला आणि पुढ निघणार तेवढ्यात त्यांनी,"पोरांनो, तिकड कुनीबी नसल आता. काठ्या घेऊन जावा. बर असतंय जवळ ठेवलेलं" असा प्रेमळ सल्ला दिला...
हे ऐकून आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर निरनिराळे भाव होते. 'तिकडे कोणीच नसेल तर काठी कोणासाठी? आणि मग जे कोणी असेल त्याच्यासाठी काठी उपयोगी पडेल का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले.
पण काकूंचा सल्ला अमलात आणून आम्ही दोन जाडजूड काठ्या घेऊन पुढे निघालो. काकूंच्या एका वाक्यामुळे आता आम्ही काहीतरी भलतेच डेरिंगबाज, अचाट करत आहोत असे आम्हाला वाटू लागले होते आणि तसे वाटल्यामुळे थोडी भीतीही वाटू लागली होती!

हि वाट दूर जाते…
rasta

थोडेफार अंतर चालल्यावर धबधब्याचा आवाज ऐकू येऊ लागला आणि बर्यापैकी जवळून तो दिसू लागला..
fall1

इथून पुढची वाट घनदाट जंगलातून होती आणि ओलसरदेखील होती. जपून चालावे लागत होते आणि अनेक जळू आमच्या स्वागतासाठी 'उभ्याच' होत्या! त्यामुळे कॅमेरा बंद करून सावकाश चालू लागलो. आणि काही वेळातच हे दृश्य दिसले...

vajrai

अवर्णनीय! एवढेच म्हणू शकतो. एका अनोखळी ठिकाणी फक्त तुम्हीच आहात, सभोवताली गर्द झाडी आहे, थंड हवा आहे आणि समोर एका लयीत कोसळणारा शुभ्र धबधबा आणि त्याचा आवाज! कशाचे आणि किती वर्णन करणार? हे तर फक्त अनुभवताच येऊ शकत. आमची मेहनत सार्थकी लागली होती. थोडावेळ थांबून, अजून काही फोटो काढून आम्ही तिथुन परतीच्या वाटेवर निघालो. पण ते दृश्य मात्र डोळ्यांसमोर तसेच होत...
vajarai2

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

19 Oct 2015 - 12:36 am | बाबा योगिराज

फ़ोटू मस्त आलेत.

कंजूस's picture

19 Oct 2015 - 6:11 am | कंजूस

हा धबधबा आवडला.फोटो छान.

एस's picture

19 Oct 2015 - 7:00 am | एस

छान छायाचित्रे!

भिंगरी's picture

19 Oct 2015 - 10:59 am | भिंगरी

सगळेच फोटो मस्त.

पियुशा's picture

19 Oct 2015 - 11:13 am | पियुशा

खुप मस्त !

दत्ता जोशी's picture

19 Oct 2015 - 1:17 pm | दत्ता जोशी

सुंदर फोटो.

मांत्रिक's picture

19 Oct 2015 - 1:22 pm | मांत्रिक

मस्तच रे भावा!

जगप्रवासी's picture

19 Oct 2015 - 1:27 pm | जगप्रवासी

मस्त फोटो

बॅटमॅन's picture

19 Oct 2015 - 1:59 pm | बॅटमॅन

फटू मस्ताड एकदम.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Oct 2015 - 3:11 pm | राजेंद्र मेहेंदळे

बढिया!! एका दिवसात करता येइल का पुण्याहुन?

शब्दबम्बाळ's picture

26 Oct 2015 - 12:19 am | शब्दबम्बाळ

जरा उशीरच झाला आभार प्रदर्शनाला! :)

यशोधरा's picture

26 Oct 2015 - 10:15 am | यशोधरा

Vaa! Mast!

त्रिवेणी's picture

26 Oct 2015 - 10:37 am | त्रिवेणी

एकदम सुपर्ब फोटो.
पुढच्या वर्षी कुणी सोबत मिळाल्यास नक्की जाईन.

त्रिवेणी's picture

26 Oct 2015 - 10:37 am | त्रिवेणी

एकदम सुपर्ब फोटो.
पुढच्या वर्षी कुणी सोबत मिळाल्यास नक्की जाईन.

त्रिवेणी's picture

26 Oct 2015 - 10:37 am | त्रिवेणी

एकदम सुपर्ब फोटो.
पुढच्या वर्षी कुणी सोबत मिळाल्यास नक्की जाईन.