Resume Editing
नमस्कार,
कुटुंबासोबत (बायको, २ मुले - ६ वर्ष आणि ११ वर्ष) नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात गोव्याला फिरायला जायचे आहे.
गोव्याला ह्या आधी कधिहि गेलो नसल्यामुळे मदत हवी आहे .पुण्याहुन बसने जाणार आहे
१. २ ते ३ दिवस गोव्यात राहण्याचा विचार आहे. क्रुपया राहाण्याची ठिकाणे सुचवा
२. कुठल्या जागांना भेटी द्याव्या आणि कुठल्या क्रमाने ? (समुद्र किनार तर हवाच :-) )
३. फिरायला गाडी करावी की भाड्याने कार घ्यावि ?
४. मासे खाण्यासाठी आवर्जून भेट द्यावी अश्या जागांची नावे आणि पत्ता
५. लहान मुले सोबत असल्यामुळे अडीअडचणित गरज पडल्यास आपल्यापैकी कुणि गोवा किवा आजुबाजुला असल्यास संपर्क क्रमांक
देश
प्रतिक्रिया
18 Oct 2015 - 9:07 pm | त्रिवेणी
काही पान मागे जा.बरेच धागे आहेत त्या नुसार ठरवता येईल तुम्हाला.
एक सांगते_कलंगूट ला गेलात् तर बीच जवळ होटल वृंदावन आहे. एक नंबर फिश होते तिथे आणि पास्ता पण तितकाच् छान बनवला होता.
बरोबर मूल आहेत तर गाडीच् करा ते जास्त सोयीचे होईल.बाकी गोव्यातली माणस खुपच मस्त आहेत.
18 Oct 2015 - 9:15 pm | त्रिवेणी
जाताना मुलांची नेहमीची औषध असू देत हाताशि हाताशी.
अगदी मूव, क्रोसिन, हँसप्लास्ट हे तर घ्यावेच प्रवासाला जाताना.
फोंडा जाणार असाल तर तिथल्या स्पाइस फार्मला भेट देवु शकता.कार रेंट करा तिकडे पेट्रोल डीजल तुलनेने स्वस्त आहे आणि रस्ता वैगरे विचारायचे असेल तरी तिथले लोक नीट सांगतात.
18 Oct 2015 - 9:23 pm | मुक्त विहारि
१.सरळ गोवा गाठायचे आणि एखादी कायनॅटिक भाड्याने घ्यायची
२. गोव्याचा मॅप विकत घ्यायचा.
आणि
३. मॅप नुसार गोवा भटकायचे.
गोवा हे ठरवुन बघण्याचे ठिकाण नाही.
गोवा अनुभवायचे असते.त्याची एक वेगळीच झिंग आहे.
19 Oct 2015 - 12:46 am | बाबा योगिराज
गोवा हे ठरवुन बघण्याचे ठिकाण नाही.
गोवा अनुभवायचे असते.त्याची एक वेगळीच झिंग आहे.
१००% सहमत
18 Oct 2015 - 9:47 pm | मित्रहो
तसे हॉटेल बरे असतात. लोकेशन चांगले, खोल्या ठीक ठाक, सर्व्हीस थर्ड क्लास. रात्रीचे जेवण बरे असते नाष्टा वगेरे बकवास. नाहीतर होम स्टे पण ट्राय करु शकता. कोणी ओळखीचे नसेल तर महींद्राचे पण होम स्टे आहेत.
19 Oct 2015 - 12:51 am | बाबा योगिराज
माझ्या मते जर शांत ठिकाण आवडत असेल, तर दक्षिण गोव्यात जावे लागेल. पालोलिम वगैरे बाजूस...
जानकार लोक्स् अधिक माहिती देतील.
भटकंती सदरात काही जुने धागे सापड़तील...
19 Oct 2015 - 12:51 am | बाबा योगिराज
माझ्या मते जर शांत ठिकाण आवडत असेल, तर दक्षिण गोव्यात जावे लागेल. पालोलिम वगैरे बाजूस...
जानकार लोक्स् अधिक माहिती देतील.
भटकंती सदरात काही जुने धागे सापड़तील...
19 Oct 2015 - 9:18 am | भटकंती अनलिमिटेड
"कॅन्शिओज हाऊस" नावाचा एक होमस्टे आहे एका म्हापशाजवळच्या एका गावात. प्रत्येक वेळी मी तिथेच जातो. तीन-चार दिवस निवांत राहतो. अगदी समुद्र पाहिजे असेल तर लगेच गाडीने पंधरा वीस मिनिटांवर बीच आहेत. पण बॅकवॉटरजवळच्या गावात या पोर्तुगीज गढीत सुशेगाद पडून राहण्यात जी मजा आहे ती कशातच नाही.
"कॅन्शिओज हाऊस" हे तीनशे वर्षांपूर्वीची गढी असून मालक रॉबर्टॊ अमराल आणि पत्नी रॅक्वेल तिथेच आपल्या तीन मुले, त्यांची आज्जी या कुटुंबासह राहतात. जुन्या घरात प्रत्येक पिढीने आपल्या सोयीनुसार बदल केले असले तरी जुन्या पोर्तुगीज वाड्याचा चार्म, गढीची तटबंदी, दाट झाडी, जुने फर्निचर एकदम शाबूत आहे. हे दांपत्य गप्पा मारण्यात अतिशय निष्णात. फार सुंदर माहिती मिळते. रॅक्वेलच्या हातचे जेवण म्हणजे सोने पे सुहागा. सोबतच रॉबर्टॊ आपल्याला स्थानिक चांगल्या हॉटेल्सची माहिती देऊ शकतो, आपल्याला जुन्या पारंपारिक बेकरीची सैर घडवून आणतो. आपल्या कॉटेजपासून संपूर्ण वाड्यात अगदी किचनपर्यंत आपणांस मुक्त वावर मिळतो. तुम्हांला रॅक्वेलसोबर थांबून गोवन स्वयंपाकही शिकता/करता येतो. तिच्या हातचे चिकन विंदालू आणि चीजकेक चुकवू नका.
माझं नाव रेफर केलं तरी चालेल. पंकज आला होता, फोटोग्राफीची मोठ्ठी बॅग घेऊन एवढंच सांगा.
त्यांचं फेसबुक पेज: https://www.facebook.com/छनचिओसःओउसे
काही फोटो:
फोटो-१
फोटो-२
फोटो-३
फोटो-४
19 Oct 2015 - 9:20 am | भटकंती अनलिमिटेड
पेज
19 Oct 2015 - 11:11 am | गॅरी ट्रुमन
मला स्वतःला गोवा अगदी प्रचंड आवडते. आतापर्यंत तीनवेळा मी गोव्याला गेलेलो आहे. एक सल्ला म्हणजे शांत ठिकाणी रिलॅक्स व्हायला जायचे असेल तर दक्षिण गोवा चांगले आणि नाईट लाईफ किंवा हॅपनिंग जागा हवी असेल तर उत्तर गोवा चांगले.
दक्षिण गोव्यात बघायचे म्हणजे केवळ समुद्रकिनारे. दक्षिण गोव्यातील वारका, कोलवा आणि बाणावली (बेनॉलीम) या तीन ठिकाणचा अनुभव मला आहे. सगळ्या समुद्रकिनार्यांवर बीच शॅक असतात. उत्तर गोव्यात कळंगुटचा समुद्रकिनारा खूपच हॅपनिंग आहे. सगळे वॉटर स्पोर्ट्स तिथे आहेत.पण मी स्वतः शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळतो (मुंबईत काय कमी गर्दी आहे की सुट्टीवर असतानाही गर्दीच्याच ठिकाणी जावे). उत्तर गोव्यात कॅथेड्रल, पणजी शहर, एक दुजे के लिएचे शुटिंग झालेले दोना पावला, पणजीजवळचा मिरामार बीच ही ठिकाणे आहेत.
आतापर्यंत राहिलेल्या ठिकाणांपैकी वारका पाम बीच रिझॉर्ट मला भलताच आवडला. वारका बीचवरील वाळू प्रचंड मऊ आहे.खूपच छान वाटते तिथे.
मासे कुठे चांगले मिळतात हे माहित नाही. माझ्यासारख्या अभक्ष्यभक्षण न करणार्यांसाठी गोवा हे ठिकाण हे खाण्यासाठी चांगले नाहीच :) केकचा एक गोवन प्रकार--- बिबिंका जरूर टेस्ट करून बघा. नक्कीच आवडेल.
19 Oct 2015 - 11:42 am | भटकंती अनलिमिटेड
दक्षिण गोव्यात असोळणा म्हणून गाव आहे. तिथे मासे (समुद्र आणि खाडी दोन्हीचे), खेकडे फार उत्तम आणि महत्त्वाचे म्हणजे बजेट फ्रेंडली दरात मिळतील. उत्तम कॉंटिनेंटल किंवा इंग्लिश प्रकार खाण्यात मार्टिन्स कॉर्नर.
कुठल्याही गावातल्या लहानशा हॉटेलात नाश्त्याला भाजी-पाव (पावभाजी नव्हे) जरुर खा. रेषाद मसाल्यातला बांगडा चुकवू नका.
19 Oct 2015 - 11:54 am | एस
या धाग्याला वाचनखूण लावून ठेवतो. उत्तम माहिती मिळत आहे.
19 Oct 2015 - 1:04 pm | देश
सर्व प्रतीसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार! आधिचे धागेसुद्धा चाळतोय..काहि शंका असल्यास विचारीनच
देश
19 Oct 2015 - 2:14 pm | कानडाऊ योगेशु
मध्यंतरी मी ही गोव्याला जाऊन आलो. शिरस्त्याप्रमाणे जाण्यापूर्वी मी ही मिपाकरांना सल्ले विचारले होते.
तुम्हालाही ह्या धाग्याची कदाचित मदत होऊ शकेल.
गेल्यानंतर पहील्या दिवशी संध्याकाळी मी होण्डा अॅक्टीवाने जमेल तितके फिरुन घेतले व साधारण ट्राफिकचा अंदाज एकुण गोव्याचे स्वरुप लक्षात आले व मग दुसर्या दिवशी कारने फिरलो.
गोव्या पर्यटनासाठी आगाऊ शुभेच्छा!
19 Oct 2015 - 2:16 pm | सूड
गोवा कुठे गेला आता?
19 Oct 2015 - 2:39 pm | मालोजीराव
रिट्झ , पणजी (प्रसिध्द आहे बरंच )
आनंद सीफूड, अंजुना (एकदम उत्कृष्ठ चव आणि एकदम लो ऑन पॉकेट )
Mango ट्री, वागातोर (स्टिक्स,इंग्लिश ब्रेकफास्ट झक्कास )
कमळाबाई , म्हापसा (गोवन सगळ काही )
बाकी ब्रीटोस,इन्फन्त्रिया,फ़िशर्मन्स,जेमीस,टस्कनी वगैरे प्रसिध्द ठिकाणांना अजून भेट नाही दिली.
19 Oct 2015 - 3:20 pm | द-बाहुबली
कुंटुंबासोबत जाताय म्हटल्यावर नाइलाज आहे. बाकी सिजन योग्य पकडला आहे स्वस्त दर अन रास्त हवामान. फॅमीलीला घेउन न जाता येण्याजोगी ठीकाणे हवी असतील तर मदत करेन म्हणतो. सुरुवात म्हणून मुवींनी सांगितल्याप्रमाणे एक मॅप विकत घ्या. त्यात जिथे जिथे बीच ना ५ स्टार नामांकन असेल तिथे बिंधास्त फॅमीली न घेता जा. फॅमीली घेउन गेलात तर मात्र कमालीचे एंबेरेस व्हॉल हे नक्कि....
19 Oct 2015 - 4:05 pm | मीउमेश
मी सुद्धा जातोय
मी ६ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर गोव्यात आहे.
राहण्यासाठी रेसोर्ट पेक्षा अपार्टमेट बघा,स्वस्त आणी फेमेली साठी ठीक.
राहण्याची सोय लवकर बुक करून टाका कारण सीजन असतो.
तिकडे ५०० दिवसांनी टू व्हीलर भाड्यानी मिळते, ( थोडी घासाघीस करावी लागेल )
फमिली सोबत राहण्या करिता बागा बीच जवळ उत्तम अपार्टमेट आहेत ( AC रूम्स १७०० पर डे )
19 Oct 2015 - 8:26 pm | सतिश पाटील
मी पण जातोय पहिल्यांदाच ...२३,२४,२५,२६ जानेवारी ..
आपला मुक्काम स्टार बीच रेसोर्ट ..कोळवा...
स्टार बीच रेसोर्ट ..कोळवा...