आळस कसा टिकवावा?

येडा खवीस's picture
येडा खवीस in काथ्याकूट
3 Sep 2008 - 12:28 pm
गाभा: 

मित्रांनो मी आजपासुनच मिसळपाव चा सदस्य झालोय...

सर्वसाधारणपणे "आळस हा माणसाचा शत्रु आहे" "आलस्यही मनुष्याणां शरिरस्य महारिपु..." इत्यादी इत्यादी फालतु सुभाषिते बरेचदा कानावर पडत असतात, पण आळस हा शरीरात लोणच्याप्रमाणे मुरुन रहावा....जाऊच नये यासाठी नेमकी काय उपाययोजना असावी असं तुम्हाला वाटतय??

एखाद्या मउशार गादीवर, डोक्याखाली दोन उशा घेऊन, पुस्तक चाळत चाळत, कसलाही विचार न करता...झोप आणि जाग यांच्यामधील सुवर्णमध्यात रहाण्याचे सुख कायम कसे मिळत राहील?
डायनिंग टेबल वर बसताच्क्षणी, एका सुंदर प्लेटमध्ये आवडीचे सगळे पदार्थ नीट रचुन ( ते पदार्थ कसे आले याची अजिबात चिंता न करता) त्याचा फडशा पाडण्याचे सुख कसे मिळेल?

अलार्म, घड्याळे, धावपळ करणारी माणसे, काम कर काम कर म्हणुन सतत डोके फिरवणारी माणसे-नातेवाईक यांच्यावर कायमची बंदी कशी आणता येईल?

मते शेअर करा....

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

3 Sep 2008 - 12:36 pm | जैनाचं कार्ट (not verified)

L) भाऊ ... आळस केला तर येथे काही लिहाता देखील येईल का ?

काय भाउ ... उगाच खेचाताय कश्याला आमची :D

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

पांथस्थ's picture

3 Sep 2008 - 12:42 pm | पांथस्थ

आळस कसा टिकवावा?

आळस टिकवायचा म्हणजे परत प्रयत्न आले....प्रयत्न आले म्हणजे आळस जाणार....हे तर विक्रम आणि वेताळ सारखे झाले...

आता काय करावे बुवा?? :?

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Sep 2008 - 6:08 pm | बिपिन कार्यकर्ते

अहो, मी आळस ह्या विषयात तज्ज्ञ आहे... मी पण लिहायला जाम आळस येतोय... बघतो, जमलं तर...

संदीप चित्रे's picture

3 Sep 2008 - 9:00 pm | संदीप चित्रे

३) रॉकिंग चेअरवर निवांत बसून डुलकी काढायची
२) रॉकिंग चेअर पायाने हलवण्याऐवजी मनात विचार आला की चेअर आपोआप रॉक व्हावी
१) मनात विचार कोण आणत बसतंय ! दुसर्‍या कुणीतरी आपल्यासाठी विचार करावा आणि आपली चेअर रॉक व्हावी :)

अनिता's picture

4 Sep 2008 - 9:17 am | अनिता

.

पावसाची परी's picture

4 Sep 2008 - 2:40 pm | पावसाची परी

आल्स

सर्किट's picture

4 Sep 2008 - 2:48 pm | सर्किट (not verified)

अरे हा धागा नजरे आड कसा झाला बॉ ! (आमचा आळसच ह्याला कारणीभूत असेल.)

मंडळी, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा. आम्हालाही ह्याच प्रश्नाचे उत्तर हवे आहे.

कुणीतरी नीट उत्तर द्या प्लीज, नाहीतर आमचा आळस निघून जाईल, आणि पुन्हा तुम्हालाच प्रॉब्लेम येईल.

आळस नसला तर हृदयविकार होतात असे आमचे मलेशियन बंधू म्हणतात.

त्यामुळे आळस टिकवणे आवश्यक आहे.

-- सर्किट

धमाल मुलगा's picture

4 Sep 2008 - 3:00 pm | धमाल मुलगा

(|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|:
(|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|:

प्लिज, मी उद्या सांगू का?
आज मला खुप आळस आलाय!!!

लिखाळ's picture

4 Sep 2008 - 3:30 pm | लिखाळ

काहीच न करण्याचे कष्ट घ्यायची तयारी असेल तरच आळसाच्या मागे जावे ! ते मोठे कठिण आहे याचा अनुभव आहे.
जात्याच आळशी असण्यासारखे सुख नाही. पुढचा जन्म असा मिळावा म्हणून प्रार्थना करावी :) अजून काय !
--लिखाळ.