आजकाल नवीन पदार्थ करायचा म्हटलं की आपण लगेच वेगवेगळी पुस्तके,फूडब्लॉग्स, खादयपदार्थांच्या वेबसाईट्स, मासिके शोधायला जातो,चाळत रहातो.
त्यात मनासारखी पाककृती किंवा असंही म्हणा तोंडाला पाणी सुटणारा एखादा फोटो दिसला की, ती पाककृती करायला आपण मानसिकरीत्या तयार होतो आणि मग लवकरच तो पदार्थ आपल्या घरी बनवला जातो.
इथे मी तुम्हाला आंतरजालावर असणार्या अशाच काही फूडब्लॉग्स आणि फूडसाईट्स बद्दल थोडीशी माहिती देणार आहे.
ही वाचणार्यांपैकी काहीजणांना या फूडब्लॉग्स बद्दल पुर्ण माहिती असु शकेल परंतु ज्यांना माहित नाही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी केलेला हा छोट्टास्सा प्रयत्न!!
१) www.maazeswayampaakprayog.blogspot.in
लेखिका - शीतल कामत.
पदार्थांचे प्रकार - व्हेज- नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – मराठी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – चमचमीत अशा विविध पाककृतींनी भरलेला ब्लॉग.
या ब्लॉगमधील पाककृती इंग्रजीमधे वाचण्यासाठी खालील लिंक वापरु शकता.
www.mycookingexperiments.blogspot.in
२) www.delectable-delicious.blogspot.co.uk
लेखिका - सानिका एन्.
पदार्थांचे प्रकार - व्हेज- नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – मराठी आणि इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – भरपुर नाश्त्याचे पदार्थ, गोडाचे पदार्थ, महाराष्ट्रीयन पदार्थ, वेगवेगळ्या वरण,दाल,
फुलके रोटी यांच्या नानाविध पाककृतींनी तसेच काही पाश्चात्य पाककृतींनी सजलेला
ब्लॉग.
मनमोहक छायाचित्रे.
३) www.chakali.blogspot.co.uk
लेखिका – वैदेही भावे.
पदार्थांचे प्रकार - व्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – मराठी आणि इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – पूर्णतः शाकाहारी पाककृती.
उत्तम महाराष्ट्रीयन पाककृती.
४) www.kha-re-kha.blogspot.in
लेखक – प्रतिक ठाकूर.
पदार्थांचे प्रकार – व्हेज - नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – मराठी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – झणझणीत व्हेज - नॉनव्हेज पदार्थांच्या पाककृती.
५) www.takkuuu.blogspot.in
लेखिका – रेश
पदार्थांचे प्रकार – व्हेज
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – मराठी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – महाराष्ट्रीयन पाककृती.
६) www.vadanikavalgheta.com
लेखिका – मिंट्स के.
पदार्थांचे प्रकार – व्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – मराठी आणि इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – सर्व महाराष्ट्रीयन पाककृती (व्हेज).
७) www.marathifoodfunda.blogspot.in
लेखिका – पूर्वा सावंत.
पदार्थांचे प्रकार - व्हेज- नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – मराठी आणि इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – खुप सुंदर अशा महाराष्ट्रीयन पाककृती.
वरील सर्व ब्लॉग्स् मधील पाककृती या मराठीभाषेमधून लिहीण्यात आलेल्या आहेत.
आता काही हिंदी आणि इंग्रजी ब्लॉग्स्ची सफर करुयात.
८) www.manjulaskitchen.com
लेखिका – मंजुळा
पदार्थांचे प्रकार – व्हेज
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – भारतीय शाकाहारी पाककृती आणि व्हिडीओजचे घर.
९) www.nishamdhulika.com
लेखिका – निशा
पदार्थांचे प्रकार – व्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – हिंदी आणि इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – हा खुप जुना असा ब्लॉग आहे.
उत्तर भारतातील पदार्थांच्या पाककृतींसाठी प्रसिद्ध.
१०) www.madhurasrecipe.com
लेखिका – मधुरा बचाल.
पदार्थांचे प्रकार – व्हेज - नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
वेबसाईटची वैशिष्ट्ये – महाराष्ट्रीयन , मुघलाई, पंजाबी , इटालियन पाककृती.
११) www.divinetaste.com
लेखिका – अनुश्रुती
पदार्थांचे प्रकार – व्हेज
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – सात्विक पाककृती.
१२) www.4thsensecooking.com
लेखिका – नित्त्या.
पदार्थांचे प्रकार – व्हेज
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – अप्रतिम केक्स डेकोरेशन आणि फूड फोटोग्राफी.
१३) www.vahrevah.com
लेखक – संजय थुम्मा.
पदार्थांचे प्रकार – व्हेज - नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – उत्तर आणि दक्षिण भारतीय तसेच काही आंतरराष्ट्रीय पाककृती, व्हिडीओज्.
१४) www.archanaskitchen.com
लेखिका – अर्चना दोशी.
पदार्थांचे प्रकार – व्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – स्पेशल डाएट रेसिपीज्.
हेल्दी रेसिपीज्.
युरोप आणि अमेरीकेतील पाककृती भारतात बनविण्यासाठी उपयोगी.
नेहमी नवनवीन पाककृतींनी भरलेला ब्लॉग.
१५) www.showmethecurry.com
लेखिका - हेतल आणि अनुजा
पदार्थांचे प्रकार – व्हेज - नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – दक्षिण भारतीय – उत्तर भारतीय पाककृती, राजस्थानी-बंगाली-गुजराथी पाककृती,
इंडो-चायनीज तसेच थाई पाककृतींचे व्हिडीओजही उपलब्ध.
१६) www.fooddreamers.blogspot.in
लेखिका – मृणालिनी साळवी.
पदार्थांचे प्रकार – व्हेज - नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – देशी आणि पाश्चात्य पदार्थांच्या नाविन्यपूर्ण पाककृती.
१७) www.anjalisfoodkaleidoscope.blogspot.in
लेखिका – अंजली सिंग.
पदार्थांचे प्रकार – व्हेज - नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – चवदार व्हेज – नॉनव्हेज पाककृती.
१८) www.sizzleanddrizzle.com
लेखिका – ॠत्विका चरेगावकर.
पदार्थांचे प्रकार – व्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – भरपूर प्रकारचे केक्स, डेझर्ट्स, कुकीजच्या पाककृती.
१९) www.vegrecipesofindia.com
लेखिका – दस्सना - अमित.
पदार्थांचे प्रकार – व्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – साध्या-सोप्या मस्त मस्त व्हेज पाककृतींनी भरलेला ब्लॉग.
२०) www.maayeka.com
लेखिका – अंजना चतुर्वेदी
पदार्थांचे प्रकार – व्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – व्हेज पारंपारिक पाककृती.
सात्त्विक पाककृती.
२२) www.allrecipes.com
पदार्थांचे प्रकार – व्हेज - नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
या फूडसाईटची वैशिष्ट्ये – जगभरातील नाविन्यपूर्ण पाककृती.
भारतीय पाककृतींसाठी www.allrecipes.co.in इथे भेट देऊ शकता.
२३) www.sailusfood.com
लेखिका – सैलजा
पदार्थांचे प्रकार – व्हेज - नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – जुना ब्लॉग (२००५ पासुन)
कोणत्याही आंध्र पदार्थ – पाककृती साठी नक्की या ब्लॉग ला भेट दया.
२४) www.rakskitchen.net
लेखिका – राजेश्वरी
पदार्थांचे प्रकार – व्हेज
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – सुंदर दाक्षिणात्य पाककृती.
काही माहितीपूर्ण व्हिडोओजसुद्धा आहेत.
२५) www.khaughar.blogspot.in
लेखिका – प्राची
पदार्थांचे प्रकार – व्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – (व्हेज) भारतीय पाककृती.
२६) www.bakasoor.blogspot.in
लेखिका – शाल्मली
पदार्थांचे प्रकार – व्हेज - नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – मस्त-मस्त महाराष्ट्रीयन पाककृती.
२७) www.aayisrecipes.com
लेखिका – शिल्पा
पदार्थांचे प्रकार – व्हेज - नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये - अस्सल आणि चवदार कोंकणी पाककृती.
२८) www.bongcookbook.com
लेखिका – संदीपा
पदार्थांचे प्रकार – व्हेज - नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – चविष्ट बंगाली पाककृती.
२९) www.passionateaboutbaking.com
लेखिका – दीबा राजपाल.
पदार्थांचे प्रकार – व्हेज - नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – बेकिंगचे पदार्थ.
ज्यांना बेकिंगची आवड असेल किंवा बेसिक शिकायचे असल्यास या ब्लॉगला जरुर
भेट दयावी.
३०) www.monsoonspice.com
लेखिका – सिया.
पदार्थांचे प्रकार – व्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – इथे बेसिकपासून अवघड पाककृती आहेत . आणि सगळं काही सहजतेने शिकता
येण्यासारखं आहे.
३१) www.veginspirations.com
लेखिका – उषा .
पदार्थांचे प्रकार – व्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – आरोग्याला पोषक अशा काही व्हेज पाककृती.
३२) www.sharmispassions.com
लेखिका – शर्मिली .
पदार्थांचे प्रकार – व्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – पारंपारिक दाक्षिणात्य पाककृती.
३३) www.yummly.com
लेखक – डेव्ह फेलर
पदार्थांचे प्रकार – व्हेज - नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
या फूडसाईटची वैशिष्ट्ये – पाश्चात्य पदार्थांच्या पाककृती.
३४) www.laurainthekitchen.com
लेखिका – लॉरा विटाली .
पदार्थांचे प्रकार – व्हेज - नॉनव्हेज.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – केक्स , बेकिंग आणि इतर प्रकार .
३५) www.foodandflavorsbyshilpi.com
लेखिका – शिल्पी अमित .
पदार्थांचे प्रकार – व्हेज –एग रेसिपीज्.
ब्लॉगमधील वापरलेली भाषा – इंग्रजी.
ब्लॉगची वैशिष्ट्ये – भारतीय पाककृती आणि व्हिडोओजसुद्धा.
आंतरजालावर आणखी संजीव कपूर, तरला दलाल यांसारखे अनेक ब्लॉग्ज आणि वेबसाईट्स मिळतील पण
वरील यादीमधील प्रत्येक ब्लॉग आणि वेबसाईटला एकदा तरी जरुर भेट द्या.
आणि हो! आपल्या मिसळपावला भेट द्यायला विसरु नका हं.
www.misalpav.com/recipes.html
लेखक/ लेखिका – मिपाकर
पदार्थांचे प्रकार – व्हेज – नॉनव्हेज - एग रेसिपीज्.
या पाककृती विभागामधे वापरलेली भाषा – मराठी.
विभागाची वैशिष्ट्ये – काही चटपटीत- चमचमीत तर काही पौष्टीक /सोप्या /अवघड देशी-विदेशी पाककृती.
यातील पाककृतीखालील प्रतिसाद नक्की वाचा. काही प्रतिसादातील
टिप्समुळे तुम्ही तो पदार्थ बनवत असताना त्यामधे नवीन ट्विस्ट निर्माण होऊ
शकतात.
या ब्लॉगसफरीमधे एखादा फूडब्लॉग आवडला तर जरुर त्याला फॉलो किंवा सबस्क्राईब करा जेणेकरुन जेव्हा नवीन पाककृती पोस्ट केल्या जातील तेव्हा तुमच्यापर्यंत त्या लगेच पोहोचतील.
चला तर मग नवनविन पदार्थ बनवा, स्वतः खा, दुसर्यांना चाखायला द्या.
http://www.misalpav.com/user/25071
हॅपी कुकींग !!!
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 11:43 am | पैसा
एक नंबर काम केलंस! मस्त कलेक्शन झालंय!
16 Oct 2015 - 11:49 am | अजया
मस्त रंगीबेरंगी संकलन!उपयोगी पडेल कायम.
16 Oct 2015 - 1:51 pm | स्नेहल महेश
असच म्हणते
16 Oct 2015 - 4:44 pm | प्रीत-मोहर
यातली सानिका एन. म्हणजे आपली मिपाकरीण आणि अनाहिता सानिका, आणि खा-रे-खा वाला मिपाबल्लव गणपा. टक्कू सुद्धा मिपाकरीण-अनाहिता आहे. पुर्वा पण मिपाकरीण आहे आय गेस आणि फूडड्रिमर म्हणजे आपली मृणालिनी!!!
इतक्या मस्त फूड-ब्लॉग्ज कलेक्षन आणि त्यातही ५ ते ६ नाव मिपाकर्स!!! प्राउड ऑफ यु. :)
16 Oct 2015 - 7:34 pm | सानिकास्वप्निल
सुरेख केले आहेस संकलन के.पी, प्राऊड ऑफ यु.
या विषयावर लिहिण्याची इच्छा व्यक्त केलीस आणि अगदी कमी वेळात तू उत्तम कलेक्शन तयार करुन दिलेस, अनेक धन्यवाद :)
16 Oct 2015 - 8:05 pm | मधुरा देशपांडे
छान माहिती एकत्र झाली आहे एकाच धाग्यात. मिपाबद्दल लिहिलेलेही छानच. :)
17 Oct 2015 - 1:22 am | स्रुजा
छान च कलेक्शन ! सुरेख माहिती गोळा झाली.
17 Oct 2015 - 10:10 am | नूतन सावंत
वा के.पी..सुरेख संकलन.खूप नवे ब्लॅग्स कळले.यातल्या मिपाकर आणि मिपाकारणी अनाहीतांचा अभिमान वाटतो.
17 Oct 2015 - 10:10 am | नूतन सावंत
वा के.पी..सुरेख संकलन.खूप नवे ब्लॅग्स कळले.यातल्या मिपाकर आणि मिपाकारणी अनाहीतांचा अभिमान वाटतो.
17 Oct 2015 - 10:10 am | नूतन सावंत
वा के.पी..सुरेख संकलन.खूप नवे ब्लॅग्स कळले.यातल्या मिपाकर आणि मिपाकारणी अनाहीतांचा अभिमान वाटतो.
17 Oct 2015 - 6:40 pm | चैत्रबन
फार उपयोगी संकलन आहे. थैंक्यू :)
18 Oct 2015 - 9:44 pm | एस
छान संकलन!
19 Oct 2015 - 1:03 am | वेल्लाभट
जबराट कलेक्शन्न्न ! वाह वाह वाह !
19 Oct 2015 - 1:04 am | वेल्लाभट
यादीतल्या मिपाकरांबद्दल अभिमान वाटतो
19 Oct 2015 - 12:09 pm | मांत्रिक
मस्त आणि उपय्क्त कलेक्शन!
20 Oct 2015 - 3:35 pm | स्नेहल महेश
सुरेख माहिती गोळा झाली
20 Oct 2015 - 11:35 pm | राघवेंद्र
खुप छान !!!
21 Oct 2015 - 11:16 am | पूर्वाविवेक
खूप खूप धन्यवाद के.पी., माझ्या ब्लॉगला तुझ्या लिस्टमध्ये स्थान दिल्याबद्दल.
तुझी लिस्ट खूपच छान झालीय. काही सुंदर सुंदर ब्लॉग मला माहित नव्हते, ते आज तुझ्यामुळे कळले.
22 Oct 2015 - 2:23 pm | Mrunalini
बरेच नविन ब्लॉगसुद्धा कळाले. मस्त संकलन झाले आहे.
माझ्या ब्लॉगचा समावेश केल्याबद्दल धन्यवाद! :)
22 Oct 2015 - 4:16 pm | अनन्न्या
अनेक नविन ब्लॉगची माहिती मिळालीय!
26 Oct 2015 - 2:01 pm | पिलीयन रायडर
खत्री कलेक्षन!! बरेच ब्लॉग माहिती नव्हते.
27 Oct 2015 - 10:15 pm | अदि
माझे पण दोन पैसे.. Yolanda Gampp- How to cake it and Rajashree food. you tube वर छान व्हिडीयोज आहेत.
28 Oct 2015 - 12:44 am | इडली डोसा
आत्ता पर्यंत veg recipes of India, vah re vah, manjula's kitchen आणि मिपा पाकृ या ठिकाणांचाच जास्त वापर केला आहे, ही नवीन महिती उपयुक्त आहे. संकलनासाठी धन्यवाद!
29 Oct 2015 - 5:03 pm | कविता१९७८
छान माहिती गोळा झाली.
4 Nov 2015 - 6:49 am | Maharani
मस्त कलेक्शन....बरेच ब्लॉग कळाले..