तिने काय करायला हवे होते?

खटपट्या's picture
खटपट्या in काथ्याकूट
13 Oct 2015 - 4:57 pm
गाभा: 

नुकताच छी_ _ हा धागा वाचनात आला. सर्वांनी अगदी पोटतीडकीने प्रतिसाद दिले आणि आपापले अनुभव ऐकवले. पण कधी कधी चुकीचे घडतंय हे माहीत असूनही पुरुष बोटचेपी भुमीका घेतात हे पाहण्यात आले आहे. असाच मला आलेला एक अनुभव मी येथे देत आहे.
१९९८ साली मी एका ८/९ माणसे असलेल्या कंपनीत कामाला होतो. मेडीकल प्रेझेंटेशन आणि जाहीराती मधे लागणारे अॅनिमेशन बनवणारी ही कंपनी होती. मोठमोठ्या औषधाच्या कंपन्या आमच्या क्लायंट होत्या. मार्केटींग साठी दोन लोक होते आणि बाकी सहा जण ऑफीसमधे बसून अॅनिमेशनचे काम करत असत. ज्या दोन व्यक्ती मार्केटींगसाठी होत्या त्या क्लायंटकडे जाउन काम समजून घेणे, बनवलेले काम दाखवणे/प्रेझेंट करणे, झालेल्या कामाचे पैसे आणणे/पाठपुरावा करणे ही कामे करत असत. मी अॅनिमेशन क्षेत्रात जायचे असे ठरवून तेथे उमेदवारी करत होतो. ज्या दोन मार्केटींगसाठी व्यक्ती होत्या त्यात एक मुलगी होती.
बर्याच वेळेला क्लायंट्बरोबर ज्या मीटींग असत त्या दुपारी सुरु होउन संध्याकाळी उशीरापर्यंत चालत. त्या मीटींगला मार्केटींगवाली मुलगी जायला टाळाटाळ करत असे. टाळाटाळीचे कारण विचारता तीने सांगीतले की बर्याच वेळेला एकट्यादुकट्या माणसाबरोबर मीटींग असते जी उशीरापर्यंत चालते त्यामुळे तीला असुरक्षीत वाटते. यावर उपाय म्हणून संध्याकाळच्या मीटींगला बॉसने मला तीच्या बरोबर जायला सांगीतले. जेव्हा जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी तीच्याबरोबर जात असे. जेव्हा मला काम असे तेव्हा मी स्पष्ट नाही म्हणून सांगत असे.
एकदा मी काही कारणास्तव रजेवर असताना, तीला नाईलाजास्तव एक संध्याकाळची मीटींग अटेंड करावी लागली. क्लायंट साईडच्या माणसाने ही संधी साधून तीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ती तीथून पळाली आणि खाली येउन मला माझ्या घरी फोन केला आणि झाला प्रकार सांगीतला. मी तीच्या घरी जाउन तीला धीर दीला आणि आपण उद्या हे बॉसच्या कानावर घालू असे सांगून तीथून निघालो. निघतना तिच्या आईने विनाकारण मला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला.(ज्याकडे मी संपूर्ण दुर्लक्ष केले)
दुसर्या दीवशी ऑफीस मधे आम्ही झाला प्रकार बॉसच्या कानावर घातला आणि क्लायंटवर कारवाइ करण्यास सांगीतले. यावर बॉसने जे भाष्य केले ते ऐकून मी सर्द झालो. बॉस तीला म्हणाला की "तू जर बस मधून प्रवास करत असतीस आणि तुझा कोणी विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असता तर त्याविरुद्ध तू कोणाकडे दाद मागीतली असतीस?"
त्या मुलीने क्लायंट आहे म्हणून काहीही न बोलता तीथून पळ काढला, क्लायंट्ला कानफाडात नाही मारली. हे तीने बरोबर केले की वाईट केले मला समजेना. बॉस म्हणू लागला की "मी क्लायंट्ला काहीच बोलू शकत नाही कारण आपला ७०% बिजनेस त्याच्याकडून येतो. जर हा क्लायंट गेला तर तुमच्या पगाराचे वांधे होतील." मी ज्युनीअर असुनसुध्दा म्हणालो की, "सर, ज्या माणसाने अतीप्रसंग करायचा प्रयत्न केला तो कीतीही मोठ्या पदावर असला तरी आपण त्याची एचारकडे तक्रार करू शकतो." त्यावर बॉसने मला यात लक्ष न घालण्याबद्दल बजावले.
माझा आणि त्या मुलीला काय करावे कळेना. नुसते संतापण्याशिवाय आम्ही काही करु शकत नव्हतो. शेवटी ती मुलगी बॉसला म्हणाली, "सर, जर माझ्या ठीकाणी तुमची बायको असती आणि तीच्याबरोबर असे झाले असते तर तुम्ही काय केले असते?" यावर बॉस निरुत्तर झाला पण काहीही न बोलता बाहेर निघून गेला.
संपूर्ण विचारांती एकूण चार जणांनी तो जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही घेतलेला निर्णय बरोबर होता की नाही ते तुम्हीच सांगा.

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

13 Oct 2015 - 5:13 pm | वेल्लाभट

तरीही
पर्याय १ पोलिसात जायचे.
पर्याय २ बॉसच्या कानाखाली मारून पोलिसात जायचे

बॅटमॅन's picture

13 Oct 2015 - 5:19 pm | बॅटमॅन

जॉब सोडला हे योग्यच केले. दोष बॉसचा आहे हे नक्की. बाकी अशा केसेसमध्ये दाद मागावी, मिळाली तर ठीक नाय मिळाली तर काय करू शकतो. बॉसच्या कानाखाली मारणे हा एक वेडसर वाटला तरी बरा पर्याय आहे.

मराठी_माणूस's picture

13 Oct 2015 - 5:20 pm | मराठी_माणूस

जॉब सोडण्याचे निश्चितच कौतुक आहे.

आता दुसरे उदाहरण बघा. काही दिवसापुर्वी दोन नेपाळी महींलावर एका परदेशी डिप्लोमॅटने आणि त्याच्या पाहुण्यांनी एकदा नव्हे तर अनेकदा अत्याचार केले.
आपल्या एव्हढ्या मोठ्या सरकारने काय केले. काय तर म्हणे त्याला विशीष्ट इम्म्युनीटी आहे.
आमच्या भूमीवर कोणत्याही महीलेवर झालेले अत्याचार कदापीही सहन केले जाणार नाहीत अशी भूमिका का नाही घेतली ? विरोधी पक्षांनी पण कसलाही अवाज केला नाही. कूठल्याही महीला संघटनानी काही केल्याचे वाचलेले नाही.
"डे" बाई लिहतील असे वाट्ले होते , पण त्यांनी ही काहीही लिहले नाही. मिडीआला इंद्राणी मधुन फुरसत नाही.
आता तर सगळे चीडीचुप.

तर्राट जोकर's picture

13 Oct 2015 - 5:28 pm | तर्राट जोकर

बॉसचा ७०% बिजनेस त्या व्यक्तिकडून येतो ना...? तो त्याचा प्रश्न आहे.

मुलीची इभ्रत ही कंपनी प्रॉपर्टी नाही.

मुलीने सरळ पोलिसात जायला हवे होते. कारण तिच्या ह्या प्रकरणाशी कंपनीच्या नुकसानीचा संबंध लावून त्या बॉसने मुलीचा दुप्पट विनयभंग केला आहे हे जास्त महत्त्वाचे होते.

ह्या प्रकारच्या प्रकरणांत नक्की काय करायला हवे याचे समुपदेशन, मार्गदर्शन काही संस्था करतात. त्यांच्याबद्दल माहिती काढून त्याचा आपल्या ओळखीच्या लोकांत प्रचार करणे हे 'अशा घटना पुढे घडल्या तर काय करावे' याबद्दल उपयुक्त ठरेल.

मी त्या बॉसच्या ठिकाणी असतो तर मुलीला सरळ तक्रार करायला सांगून, क्लायंटला, "हा तू केलेला पोलिस मॅटर आहे, मी काही करू शकत नाही, तुझं तू सांभाळ" असं म्हणुन क्लायंटही टिकवला असता. अ‍ॅनिमेशनचा बिजनेस करतो, दलालीचा नाही असंही ठणकवून सांगितलं असतं. मुळात असं काही होऊ शकतं हेच कायम ध्यानात ठेवून असला प्रसंग येऊ नये यासाठी खबरदारी घेतली असती. कुणाचाही भरवसा ठेवू नये.

मुळात असं काही होऊ शकतं हेच कायम ध्यानात ठेवून असला प्रसंग येऊ नये यासाठी खबरदारी घेतली असती. कुणाचाही भरवसा ठेवू नये.
हेच म्हणते! बीनधास्तपणे एकट्या मुलीला क्लायंटकडे पाठवावे का? हा विचार होणे मुळात अपेक्षित आहे. तुमच्या एम्ल्पॉईजची काळजी जर दाखवली नाही तर ते तरी कसे टिकावेत? चांगले रिसोर्सेस गमावून बसल्यास व्यवसायास ते नुकसानदायी आहे. व्यवसायाचा विचार करायचा झाल्यास आधी कामगारांचा करणे आवश्यक! मुलीने नोकरी सोडली ते बरोबर केले असे वाटते. जिथे सुरक्षित वाटत नाही तिथे तब्येतीवर व पर्यायाने कामावर परिणाम करणारी गोष्ट करू नये.

द-बाहुबली's picture

13 Oct 2015 - 5:32 pm | द-बाहुबली

जी गोष्ट घडल्याचे चारचौघात सिध्द करता येणे शक्य(च) नाही हे या प्रसंगात नागडं वास्तव असेल तर बॉसने घेतलेला निर्णय योग्य आहे. यापुढे त्याच्या स्टाफबाबत अशी घटना घडण्याचे टाळण्याची दक्षता मात्र त्याने कायम घेणे अपेक्षित आहे. बिचारा नक्किच गांगारुन गेला असावा, अन्यथा प्रायवेट जागेतील विनयभंगानंतरच्या ऑप्शनची तुलना पब्लीक प्लेसमधे घडणार्‍या विनयभंगानंतर उपलब्ध्द असणार्‍या ऑप्शनसोबत त्याने नक्किच केली नसती. तसेच त्याने वैयक्तीक पातळीवर सदरील घटनेची वाच्यता योग्य व्यक्तींसमोर अनाधिकृतपणे करणेही अपेक्षित आहे. (योग्य व्यक्ती कोण हे नक्किच त्याला माहित व अधिकृत का अनाधिकृतपणे हे ही त्याला उत्तम कळते).

आता प्रश्न उरला तिने काय करावे याबाबत. तर तिने जागेवरच क्लायंटच्या खणखणीत मुस्काटात ठेउन देणे अपेक्षित होते. (जर असे करणे तिला शक्य होते तर.) एकदा घटना घडून गेली कि जितका वेळ जातो तितकी ती दाबली जाण्याचा धोका वाढत असतो. अन मग कोणी काय केले याला फार अर्थ नंतर उरत नाही. तिने तो क्लायंट आहे म्हणून कच खाल्ली असेल तर चुक आहे.

बाकी खर्‍या जाणकारांच्या प्रतिक्षेत.

काळजी नको. जॉब काय, एक सोडला तर दुसरा मिळतोच, आज ना उद्या!

फुलथ्रॉटल जिनियस's picture

13 Oct 2015 - 6:20 pm | फुलथ्रॉटल जिनियस

काही दिवसांपुर्वीच मध्यप्रदेशातल्या इंदौरजवळ कजलीगड या पर्यटनस्थळाची बातमी वाचून प्रचंड हादरायला झालं होतं, एक चार पाच जणाचं टोळकं,तिथे फिरायला येणार्या व निर्जनस्थळी एकांतात बसायला जाणार्या प्रेमी युगुलांना मारहाण करायचं, धमकावून ,मुलाला बांधून मग मुलींवर गँगरेप केला जायचा, त्याचं शूटींग करुन बदनामीची धमकी दिली जायची.दोन वर्षात या एकाच टोळक्यानं ४५ मुलींवर गँगरेप केले, बदनामीच्या आणि ईभ्रतीच्या भीतीनं एकही मुलगी पुढं आली नाही.तपासाअंती पोलिसांनी काही मुलींशी संपर्क केला व तक्रार द्यायची विनंती केली ,पन एकीनीही तक्रार दिली नाही.
कजलीगडची बातमी इथे वाचता येईल
http://m.aajtak.in/story.jsp?sid=819620
आपल्यापैकी कुणीही पर्यटनस्थळी जाणार असेल तर् त्यांना सावध करावं,,शहरातही एकांतात न जाण्याविषयी सांगावं , गांभिर्य कळावं म्हणून् अशा बातम्या व त्यांच्या लिंक दाखवाव्यात वा द्याव्यात. भविष्यात परिस्थीति गंभीर असेल, नागरीकरण ,ढासळते लिंग गुणोत्तर याचा परिणाम दिसायच्या आत उपाय केले पाहीजेत.

चित्रगुप्त's picture

13 Oct 2015 - 11:42 pm | चित्रगुप्त

कजलीगड विषयी वाचून अतिशय वाईट वाटले. ही जागा माझी अत्यंत प्रिय. मी इंदौरला गेलो की दर वेळी तिथे जातो. खरे तर आता मी जिथे मी आयुष्याची पहिली सर्वोत्कृष्ट सव्वीस वर्षे व्यतीत केली त्या इंदुरात पुन्हा कायमचे रहायला जायचा विचार करतो आहे. पुन्हा एकदा तरूणपणी जायचो, त्या जागांवर जाऊन चित्रे रंगवायची स्वप्ने मी बघतो आहे. परंतु इंदुरात रहाणारा माझा मोठा भाऊ म्हणतो की आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही, गुन्हेगारीचे प्रमाण फार वाढलेले आहे. कजलीगड विषयी वाचून आता माझ्या या बेताचा पुनर्विचार करणे गरजेचे झालेले आहे.
माहिती दिल्याबद्दल आभार.

खटपट्या's picture

13 Oct 2015 - 7:16 pm | खटपट्या

सर्व प्रतिसादकांचे आभार.

पद्मावति's picture

13 Oct 2015 - 7:42 pm | पद्मावति

भयानक प्रकार.
तुम्ही अतिशय योग्य गोष्ट केली ती नोकरी सोडून. तुम्ही तुमच्या परीने या घटनेचा प्रतिकार केला. त्या मुलीचं क्लायन्ट ला न मारता घाबरून पळून जाणे ही तिची नैसर्गिक reaction होती त्यात तिचीही चुक नाही. पण तो क्लायंट आहे म्हणून ती मुलगी जर काही बोलली नाही तर चुक आहे. घाबरून गप्प बसणे हे फार चुक नसलं तरी गप्प बसण्याचं reasoning चुक आहे.

खटपट्या's picture

13 Oct 2015 - 8:07 pm | खटपट्या

झाला प्रकार बॉसला सांगीतल्यावर आपल्याला न्याय मिळेल अशी तीची (भाबडी) समजूत होती. सकाळी बॉसबरोबर बोलेपर्यंत माझीदेखील अशीच समजूत होती. बॉसची मुक्ताफळे ऐकल्यावर मला क्लायंटपेक्षा बॉसचा राग आला.

मीही काही अंशी यास जबाबदार होतो असे मला आता वाटू लागले आहे. जबाबदारी घ्यावी तर पूर्ण असे काहीसे तीच्या आईचे म्हणणे होते.

पद्मावति's picture

13 Oct 2015 - 8:56 pm | पद्मावति

तुम्ही तुमच्या वतीने अगदी मोअर दॅन एनफ केलं. तुम्ही नोकरी सुद्धा सोडली आता याच्या पुढे तुम्ही काय करणं अपेक्षित आहे?
पण हो, त्या बॉसचा खरंच राग येतोय . इतक्या अनएथिकल क्लायंटच्या बिझनेस चा मोह नकोच. उलट त्यानेच कंपनी च्या वतीने या केस ची चवकशी/ कारवाई करायला हवी.

नीलमोहर's picture

17 Oct 2015 - 4:36 pm | नीलमोहर

" तुम्ही तुमच्या वतीने अगदी मोअर दॅन एनफ केलं. तुम्ही नोकरी सुद्धा सोडली...
इतक्या अनएथिकल क्लायंटच्या बिझनेस चा मोह नकोच. उलट त्यानेच कंपनीच्या वतीने या केसची चौकशी/कारवाई करायला हवी."

- या पद्मावती यांच्या प्रतिसादाशी सहमत,
नैतिक जबाबदारीच्या जाणिवेतून नौकरी सोडण्याचा आपला निर्णय अर्थातच कठिण परंतु योग्य होता.

जबाबदारी घ्यावी तर पूर्ण (...)

असं होत नाही. तुम्ही काय बॉडीगार्ड होतात का त्यांचे?

आणि अशा गोष्टी नेहमी काहीतरी घडून गेल्यावरच बोलल्या जातात. काही व्हायच्या आधीच असं बोलून दाखवायचं की त्यांनी!! मग तर कुणी जबाबदारी घ्यायला पुढेच आलं नसतं.

चांगुलपणा दाखवायची त्यामुळेच भिती वाटते. आपण आपली जबाबदारी समजून काही करायला जावं, तर सगळं जगही आपल्यालाच समजावून सांगायला येतात की हो, अमुक एक खरोखरच तुमची जबाबदारी आहे. सगळ्या जगाने पण काहीतरी समजून घ्यावं की आपापली काय जबाबदारी आहे ती...काय सगळी जबाबदारी आमचीच झाली का?

एक सामाजिक जबाबदारी सोडली (समाजाचा एक भाग म्हणून येणारी, या अर्थी) , तर तुमची काहीही जबाबदारी मला तरी दिसत नाही. तिची फेडही आपण केलेली दिसतीये नोकरी सोडून. इतकं काटेकोरपणे वागणारे लोक फारच कमी दिसतात.

आपलं हार्दिक अभिनंदन.

आणि आभार- आपण समाजाला (आम्हाला सगळ्यांनाच) योग्य दिशेला नेण्यासाठी एक अत्यंत नि:स्वार्थ कृती केलेली आहेत.

समजून घेतल्याबद्दल धन्यवाद अकौंटंट...

मास्टरमाईन्ड's picture

13 Oct 2015 - 7:46 pm | मास्टरमाईन्ड

कदाचित तिथे तिला मुस्कटात मारणे वगैरे सुचलं नसेल. पळून येणं उत्तम केलं. किमान पुढचा अनावस्था प्रसंग तरी टळला. राहिली गोष्ट बॉसची, त्याबद्दल न बोलणंच उत्तम.
कदाचित या कंपनीतून नोकरी सोडून स्पर्धक कंपनीला इथल्या क्लाएंट ची माहिती पुरवून (अर्थात स्वतः सुरक्षित राहण्याची योग्य ती "काळजी" घेऊन) बॉसवरचा राग काढला जाऊ शकतो. अर्थात यामुळं तिची झालेली कुचंबणा, मानसिक छळ, अपमान, त्रास कमी होणार नाही किंवा नाहिसा होणार नाही पण ज्याला ज्या पद्धतीनं मारल्यावर दुखतं तसंच वागलं पाहिजे असं माझं मत आहे.
राहिली गोष्ट खणखणीत मुस्काटात देण्याची, तर जागा, वेळ आणि मुस्काटात दिल्यानंतर लगेचच काय काय होऊ शकेल याचा विचार नक्कीच आवश्यक आहे. कारण कदाचित विनयभंग करणार्‍याची ही पहिलीच वेळ नसू शकते.
दुसरा एक विचार थोडासा आगावूपणाचा, ही घटना घडून गेल्यानंतर सदर क्लायंट व्यक्तीची "आपल्या" माणसांकडून लक्ष ठेवून एकांतात "धुलाई" करणे. यासाठी मित्रपरिवार घट्ट असणे आवश्यक.

विवेकपटाईत's picture

13 Oct 2015 - 7:51 pm | विवेकपटाईत

असे प्रसंग सिध्द करणे मुश्कील असतात. शिवाय पुढे मुलीला दुसरी नौकरी मिळणे हि अशक्य झाले असते. (पुरोगामी मुखोटा लावला असला तरी स्त्रियांच्या बाबतीत शिक्षित समाज ही मागासलेलाच आहे). सर्व परिस्थितीचा विचार करून मुली निर्णय घेतात.

तिने एकटीने मीटिंगला जाणे टाळायला हवे होते.
झालेल्या प्रसंगाची पोलिसांत तक्रार करायला हवी होती

चतुरंग's picture

13 Oct 2015 - 8:13 pm | चतुरंग

कदाचित तुमच्या जुन्या बॉसने हा ऑर्डर मिळवण्यासाठी केलेला अतिनीच प्रकार देखील असू शकतो!! :(
क्लायंटसाईडचा माणूस निर्ढावलेला असणार जास्ती काही होण्याच्या आतच मुलगी तिथून पळाली हे उत्तम. पोलीस कंप्लेंट होऊनही काही झाले असते की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो.
अमेरिकेत वर्कप्लेस सेक्सुअल हॅरॅसमेंटचे कायदे भलते कडक आहेत आणि त्याबद्दल प्रत्येक कंपनीत एचारनेच एक पोस्टर लावलेले असते. अतिशय कडक कारवाईला सामोरे जावे लागते असे काही प्रकार झाले तर.

प्रश्नलंका's picture

13 Oct 2015 - 8:19 pm | प्रश्नलंका

तुम्ही घेतलेला निर्णय पटला निदान तुमच्या कडून तशी बॉसला शिक्षा म्हणा हवं तर ८/९ माणसे असलेल्या कंपनीत ४ जणं सोडून गेल्यावर काय बिझिनेस करणार आता तो . पण नोकरी सोडल्यावर तरी त्या मुलीने पोलीसात जायला हवं होतं.

तुमचा निर्णय पटलाच.चतुरंग म्हणतात तशी शक्यताही नाकारता येत नाही.मुलीला मुद्दामच क्लायंटला भेटायला पाठवणे.लोक बिझनेससाठी कोणत्याही स्तरावर उतरु शकतात:(

बाॅस म्हटलं कि का कुणास ठाऊक फार राग येतो मला.

काळा पहाड's picture

13 Oct 2015 - 11:18 pm | काळा पहाड

काळे कपडे घालून एक बुरखा घालून मध्यरात्री क्लायंटच्या घरी जावून पाईपने वर चढून झोपलेल्या क्लायंटची मान १८० अंशात काडकन मोडून..
शक्य नाही?

तर्राट जोकर's picture

13 Oct 2015 - 11:30 pm | तर्राट जोकर

क्लायंटची मान १८० अंशात काडकन मोडून. >> एवढंच शक्य आहे, बाकीचं काहीच नाही.

अता 'बाकीचं' काहीच नाही तर 'हे' कसे..?

पाटीलअमित's picture

14 Oct 2015 - 12:30 am | पाटीलअमित

चाणक्य नीतीने काम करायला पाहिजे होते
cleint ला नंतर परत जाऊन भेत्यला पाहिजे होते ,त्याकाळी spy कॅमेरा नवते पण छोटा रेकॉर्डर घेऊन कामाचे रेकॉर्ड करायला पाहिजे होते
बोस नेच हा डाव मांडला का हे पण माहित काढायला पाहिजे

आणि प्रसंगी हाताशी धाऊन येणारे चार मित्र बाहेर दडून ठेवायला पाहिजे

http://kahihikasehi.blogspot.in/

पिरतम's picture

15 Oct 2015 - 12:58 am | पिरतम

अगदि बरोबर आहे सोडायला नको cleint ला

दिवाकर कुलकर्णी's picture

14 Oct 2015 - 12:42 am | दिवाकर कुलकर्णी

त्या मुली बाबत तीची कणव येते,
ही हक़ीक़त कधीची आहे माहित नाही,
पूर्वी हे घडण शक्य होतं
सध्याच्या काळात एवेरनेस वाढलाय,
मुलीनि प्रतिकार केल्यास,(नव्हे तो त्यानी करावाच)
मुलिस सर्वाकडून ,सपोर्ट ,मिळू शकतो,

अशा माणसांचे पब्लिक शेमिंग केले पाहिजे. फेसबुक वगैरे वापरून.

सौन्दर्य's picture

14 Oct 2015 - 8:55 am | सौन्दर्य

ह्या असल्या गोष्टी सिद्ध करणे फार कठीण असते. अगदी त्या मुलीने क्लायंटच्या कानफटीत मारली, तेथून पळून येऊन पोलिसात तक्रार नोंदवली तरी हे सिद्ध कसे करणार ? काम सोडल्याने त्या बॉसला टेम्पररी सेटबॅंक झाला तरी आजच्या जमान्यात दुसरे कर्मचारी मिळणे फारसे कठीण होणार नाही. माझ्या मते नोकरी सोडल्यावर त्या मुलीने त्या क्लायंटच्या कंपनीत जाऊन त्याचा जो बॉस असेल त्याच्या कानावर ही सगळी हकीकत घालावी आणि तसे करताना, त्या नालायक क्लायंटला ते कळेल असे बघावे. त्यापुढे जाऊन, जर तो क्लायंट विवाहित असेल तर त्याच्या बायकोला, मुलांना आणि अविवाहित असेल तर त्याच्या आईवडिलांना सर्व प्रकार कळवावा. माणूस जर सर्वात जास्त कशाला भीत असेल, जपत असेल तर तो आपल्या अब्रूला. तेथेच मारावे जेथे सर्वात जास्त दुखेल.

परत एकदा सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद. काळा पहाड म्हणतात त्या प्रमाणे मान मुरगाळणे शक्य नव्हते.
त्यावेळेला फेसबूकसारखी माध्यमे नव्हती. बॉसच्या असहकारामुळे आम्हाला जास्त धक्का बसला होता. सर्व म्हणता आहात त्याप्रमाणे पोलीसात जायला पाहीजे होते हे खरे.....आता ती वेळ गेली..

हेमंत लाटकर's picture

14 Oct 2015 - 9:39 am | हेमंत लाटकर

त्या मुलीने हे करायला हवे होते.

1. क्लायंटकडे एकटीने जाण्यास बाॅसला स्पष्टपणे नकार द्यायला पाहिजे होता.
2. बाॅसकडे तक्रार करण्यापेक्षा पोलिसाकडे तक्रार करायला पाहिजे होती. (बाॅस कंपनीचाच फायदा बघणार)

अंवातर: पुराव्या अभावी पोलीसांनी काहीच केले नसते. त्यापेक्षा मुलीने वडिलांना किंवा भावाला सांगून क्लायंटला चांगली समज द्यायला हवी होती. नौकरी सोडली हे मात्र बरोबर केले.

तर्राट जोकर's picture

14 Oct 2015 - 1:06 pm | तर्राट जोकर

इथे बरेच प्रतिसाद 'पोलिसांकडे जाऊन उपयोग नाही, कारण पुरावे नव्हते' अशा भावनेचे आहेत. पुरावे नव्हते तर तक्रार करूच नये का? कित्येक प्रकरणात पोलिस एकही पुरावा नसतांना गुन्हे शोधून काढतात. या प्रकरणात पोलिसांनी योग्य मार्गाने चौकशी करून दोघांचे पुर्वइतिहास, घटनेच्या दिवशीचा घटनाक्रम, दोघांची वेगवेगळी घेतलेली जबानी, इतर उपस्थित (प्रत्यक्षदर्शीच असे नव्हे, ऑफीसमधे इतरही असतीलच, किमान पिऊन तरी) लोकांची जबानी. पोलिसांची कार्यपद्धती असतेच ना.. तिच्यावर इतका अविश्वास दाखवून कसे चालेल?

पोलिसांना त्या क्लायंटशी सेटलमेंट करता येऊ नये म्हणून हाताशी एखादी एनजीओ असणेही आवश्यक आहे.

कुठेच जाऊन काहीच फायदा नाही ही फारच नकारात्मक मनःस्थिती आहे. 'मुलीची बदनामी झाली असती' असे म्हणणार्‍यांचे प्रतिसाद व्यक्तिशः मला आवडले नाहीत (पटले नाहीत असे म्हटले नाही). असो.

घटना घडण्याआधी काळजी घेणे आवश्यक आहेच पण घटना घडेलच असा विचार करून काहीतरी उपाययोजनाही हाताशी असावी की नाही? या धाग्यातून भविष्यात कोणा स्त्रीला अशा प्रसंगास दुर्दैवाने सामोरे जावे लागले तर काय करावे याचे मार्गदर्शन जाणकारांकडून झाले तर उत्तम होइल व या चर्चेचे काहीतरी विधायक सार्थक होइल, अन्यथा तात्कालिक रागातून, अभिनिवेशातून फक्त प्रक्षोभक विधाने करून वैतागाचा निचरा होण्यापरिस काही घडणार नाही.

घटना घडण्याआधी काळजी घेणे आवश्यक आहेच पण घटना घडेलच असा विचार करून काहीतरी उपाययोजनाही हाताशी असावी की नाही? या धाग्यातून भविष्यात कोणा स्त्रीला अशा प्रसंगास दुर्दैवाने सामोरे जावे लागले तर काय करावे याचे मार्गदर्शन जाणकारांकडून झाले तर उत्तम होइल व या चर्चेचे काहीतरी विधायक सार्थक होइल, अन्यथा तात्कालिक रागातून, अभिनिवेशातून फक्त प्रक्षोभक विधाने करून वैतागाचा निचरा होण्यापरिस काही घडणार नाही.

+१

पोलिसांना त्या क्लायंटशी सेटलमेंट करता येऊ नये म्हणून हाताशी एखादी एनजीओ असणेही आवश्यक आहे.

दृष्यम आठवला. परफेक्ट

दिवाकर कुलकर्णी's picture

14 Oct 2015 - 2:39 pm | दिवाकर कुलकर्णी

थोड़े विषय सोडून होईल का माहित नाही ,पण दोन डॉक्टरांच्च्या दोन कथा इथं सांगाव्यासारख्या वाटतात,
पत्नीला बरं नव्हतं म्हणून परिसरातल्या एका एम्. बी. बी.एस्. डॉक्टरला दाखवायला गेलो,साधा ताप तर होता,
पण त्या महाशयानी तपासणीच्या निमित्तानं तिला आत नेलं आणि दरवाज्याला चक्क कड़ी लावली,
कड़ी का लावली म्हटल्यावर कड़ी काढली,बाहेर आल्यावर मिसेसनं मला हे सागीतलं ,त्या महाशयांच्या अशा सुरस
कथा दरम्यान आमच्या कानावर आल्या,पुन्हा त्याच्या दवाखान्याची प्यारी चढलो नाही.
बरोबर याच्या उलटा अनुभव ,एक एम्.डी.((गायनीक) पुरुष डॉक्टर ,स्त्री पेशंटला तपासताना ,
एखादी ,सिस्टर,नसल्यास आया तरी बरोबर घेत ,त्याच्या शिवाय पेशंटच्या स्पर्श सुद्धा करीत नसत,
डॉक्टरचा व्यवसाय पवित्र व्यवसाय आहे,तिथंसंशय घेणं बरोबर नाही,परंतु
असे अनुभव येतात खरं .
,

पैसा's picture

14 Oct 2015 - 5:49 pm | पैसा

अवघड आहे. क्लाएंट मरोच. त्या बॉसला तरी दोन कानाखाली द्यायला हव्या आणि त्याच्या घरी सांगायला हवे हा असा बोलतो ते. ही कथा जुनी असणार. तुम्ही तिच्याबरोबर नोकरी सोडली याबद्दल हार्दिक अभिनंदन! एवढी नैतिकता कोणी दाखवत नाहीत. मात्र चतुरंग म्हणाले तशी शक्यता असेल तर मुलींनी नोकरी करणे कठीण आहे. त्यांनी मुस्लिम देशंप्रमाणे बुरखे घालून घरात बसावे का?

खटपट्या's picture

14 Oct 2015 - 8:05 pm | खटपट्या

सर्व प्रतिसादकांचे पुन्हा एकदा आभार...

प्रसाद गोडबोले's picture

15 Oct 2015 - 1:59 am | प्रसाद गोडबोले

मिपावर कोणी " द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटु " हा चित्रपट पाहिला नाहीये का ?

एस's picture

16 Oct 2015 - 12:39 am | एस

'द मिलेनियम सीरीज' ची तिन्ही पुस्तकं वाचलेली आहेत. चित्रपटापेक्षा त्या कादंबर्‍या भारी आहेत. दुर्दैवाने त्या लेखकाचा दहाही पुस्तके लिहून व्हायच्या आतच अकाली मृत्यू झाल्याने आता ती सीरीज पूर्ण होणे शक्य नाही.

द-बाहुबली's picture

17 Oct 2015 - 12:15 pm | द-बाहुबली

पाहिला नसेल असे व्हील का...! रद्द्ड सस्पेंन्स होता पण बिडीएसएमवाल्यांना मेजवानी होती. पण मिपा इज मोर लाइक अनाहीता टाइप नॉट गर्ल विद ड्रॅगन टॅटु टाइप... असो, हां तर त्या चित्रपटाचे काय ?

नीलमोहर's picture

17 Oct 2015 - 5:57 pm | नीलमोहर

'लिस्बेथ सॅलॅन्डर' गर्ल विद द ड्रॅगन टॅटु टाइप, आपल्या आसपास असलेल्या झेपतील का हाही विचार करा.
अर्थात लिस्बेथ 'टाईप' स्त्रियांचीच जास्त गरज आहे हल्लीच्या जगात खरं.

आणि अनाहिता हा टाईपच करून टाकला का आता, तेवढंच राहिलं होतं,
तुम्हीच ठरवणार का सगळं, मिपा काय टाईप आहे, अनाहिता काय टाईप आहेत.
गंमत आहे सगळी.

जगप्रवासी's picture

17 Oct 2015 - 1:57 pm | जगप्रवासी

तुमचे हार्दिक अभिनंदन तिच्या बाजूने उभे राहून जॉब सोडला म्हणून. दुसर म्हणजे त्या बॉस च्या कानाखाली तिने जाळ काढला पाहिजे होता, तुज्या बिजिनेस साठी मी काय स्वतःला विकायला ठेवू?

अवांतर : दोन किस्से आहेत, पहिला किस्सा आमच्या कंपनी मध्ये एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने कंपनी मधील एका मुलीचा विनयभंग करायचा प्रयत्न केला होता, त्या मुलीने आमच्याकडे म्हणजे एच आर कडे त्याची तक्रार केल्यावर दोन दिवसात त्याला कंपनीतून बडतर्फ केल होत. कारण आधी ही त्याच्याबद्दल अशा गोष्टी आमच्या कानावर आल्या होत्या की तो कसा बघत असतो, काहीही कमेंट करतो, घाणेरड बोलतो पण आमच्या पर्यंत फक्त अशा बातम्या यायच्या कोणी कम्प्लेंट करत नसल्यामुळे आम्हाला काही करता येईना.

दुसरा किस्सा आमच्या कंपनीमधील माझा मित्र एका मुली कडे खूप घाणेरड्या नजरेने बघायचा, त्या मुलीने माझ्याकडे तक्रार केल्यावर मी त्याला नीट समज दिली आणि या गोष्टीचे दूरगामी किती परिणाम होतील ते ही सांगितले. म्हणजे रेफ़रन्स चेक, रीलीविंग लेटर सर्वच ठिकाणी प्रोब्लेम येइल हे सांगितले आणि आधीच त्या उच्च पदस्थ अधिकार्याची गोष्ट ही सांगितली. तेव्हा पासून त्याने तिला कधी त्रास दिला नाही.

ह्युमन रिसोर्स वाला
जगप्रवासी