लाडघर (तामसतीर्थ) आणि गुहागर विषयी माहिती हवी आहे....

अ.रा.'s picture
अ.रा. in भटकंती
12 Oct 2015 - 10:30 am

नमस्कार मित्रांनो,
दिवाळीच्या सुट्टीमध्ये कोकणात फिरायला जायचा विचार आहे. 4 दिवसांचा प्लान आहे. तसे लाडघर मनामध्ये निश्चित केलं आहे. कारण लाडघरला याआधी कधी जाणे झाले नाही. तरीही या परिसरात कुणी आधी जाऊन आलंय का? येथे जवळपास बघण्यासारखे काय काय आहे??? किंवा दापोली परिसरात काय काय बघण्यासारखे आहे? खाजगी वाहनाने प्रवास होणार आहे त्यामुळे हाताशी भरपूर वेळ असणार आहे. पुणे-ताम्हीनी घाट मार्गे-दापोली-लाडघर तिथून पुढे गुहागर आणि तसाच किंवा महाबळेश्वरमार्गे परतीचा मार्ग असणार आहे.
समुद्रकिनारी हॉटेल्स वा तत्सम राहण्याची व्यवस्था कशी आहे ? कुठे राहावे?
या विषयीचा एखादा जुना धागा असल्यास कळवावे.

प्रतिक्रिया

दापोली मध्ये चंडिकादेवी मंदिर दाभोळचे अगदी मस्ट आहे बघणं. नाहीतर तुमची दापोली ट्रीप वाया गेली समजा.
बाकी मुरुड बीच हे एक सुंदर स्थळ.

सौंदाळा's picture

12 Oct 2015 - 1:36 pm | सौंदाळा

ईकडे बघा.
मी स्वतः ४-५ वेळेस राहीलो आहे. उत्तम अनुभव. उत्तम लोकेशन, चांगली स्वछता, चविष्ट शाकाहारी, मांसाहारी जेवण, वाजवी किंमत.
केशवराज मंदिर, हर्णै बंदरावर भरणारा मासळीबाजार (सकाळी १०-१२, सायंकाळी ३-५), जवळच असणारे दीपगृह, सुवर्णदुर्ग जरुर बघा. लाडघर ते बुरोंडी समुद्रकिनार्‍यावरुन २-२.५ किमी चालत जायला पण खुप छान वाटतं.

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Oct 2015 - 1:46 pm | राजेंद्र मेहेंदळे

तर बघण्यासारखे खुप काही आहे इथे

१. दापोलि किंवा मुरुड ला मुक्काम करुन हे पहा
मुरुड्चे देवी मंदीर आणि बीच्,पन्हाळेकाजी लेणी,सुवर्णदुर्ग किल्ला,हर्णे बंदरचा मासळीबाजार, आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती , पुढे जायचे असल्यास केळशीसुद्धा बघता येइल.

एक दिवस सकाळीच आसुदचे केशवराज मंदीर बघा. जंगलातुन एक तास चालत जायला लागते.
कर्दे बीचवर मुक्काम करु शकाल किंवा मधे दापोलि कृषी विद्यापीठ बघुन पुढे बीचवर जाउन सागर सावली रिसॉर्ट्ला मुक्काम करु शकाला. तिथुन २० कि.मी. वर श्री परशुराम यांचा पुतळा आहे तो बघा.

एक दिवस दाभोळची चंडकाई देवी दर्शन करुन पुढे गाडी बोटीवर चढवता येते आणि पलीकड्च्या किनार्‍यावरुन गुहागरला जाता येइल. गुहागर चा उफराटा गणपती आणि नंतर व्याडेश्वरचे दर्शन घ्या.

यातच तुमचे चार दिवस सहज पार पडतील.

भाल्या's picture

12 Oct 2015 - 2:20 pm | भाल्या

हॉटेल सागर सावली, लाडघर
समुद्र किनारी आहे … बहुतेक वेळा फुल असते
जेवण , मांसाहारी आणि शाकाहारी छान आहे .

फिरण्यासाठी :

आसूद : श्री केशवराज मंदिर , चुकवू नका ,

इथे जाताना अनेक घरातून नास्ता , जेवण मिळते , मंदिरात जाताना सांगून जावे आणि येताना आस्वाद घ्यावा .
अनेक कोकणी घरगुती उत्पादने इथे मिळतात . आम्ही घेतलेला, हापूस जाम खूपच छान होता .

कर्दे :
मासळी बाजार , सकाळी आणि संध्याकाळी बंदरां वरती भरतो .

कर्दे लाईट हाउस , सभोवतालचा समुद्र वरतून बघायचा असेल तर .

परशुराम भूमी , लाडघर .

कड्यावरचा गणपती , आंजर्ले
गणपती मंदिरासमोर जी लहान दुकाने आहेत , तिथे सोलकढी छान मिळाली होती .

आम्ही डिसेंबर १५ ला गेलो

खेड मार्गे दापोली , मुबई गोवा , रस्ता चांगला आहे.

ताम्हिणी, महाड, दापोली, रस्ता खराब आहे.

सन्जय गन्धे's picture

12 Oct 2015 - 5:23 pm | सन्जय गन्धे

दापोली कृषि विद्यापीठ मधील कॅंटीन चे जेवण पण चांगले आहे. आणि खूपच माफक रेट्स आहेत. आपण दुपारच्या वेळी जर दापोली मध्ये पोचणार असाल तर इतर हॉटेल्स बघण्यापेक्षा हा एक चांगला पर्याय ठरेल.

अ.रा.'s picture

14 Oct 2015 - 10:20 am | अ.रा.

हर्णे आणि आंजर्लेला आधी जाणे झाले आहे. आसूद : श्री केशवराज मंदिरसुद्धा बघितले आहे. अतिशय सुंदर मंदिर. अजून ताम्हिणी घाट वा वरंध घाटात आवर्जून बघण्यासारखे (शिवथरघळ सोडून) काही आहे का? खादाडीची ठिकाणे?

कोकणप्रेमी's picture

14 Oct 2015 - 2:45 pm | कोकणप्रेमी

महाडजवळ हायवेेवरच गंधारपाले बौध्द लेणी आहेत. तासाभरात बघुन होतात. जाताना किंवा येताना आपण सहज बघु शकता.

गंधारपाले बौध्द लेणी आहेत.

इथे अजिबात जाऊ नका, सगळ्या लेण्यात गुडूप अंधार असतो. आणि वटवाघळाने कलेल्या घाणीचा सहन न होणारा दर्प येत असतो.

अ.रा.'s picture

28 Oct 2015 - 3:51 pm | अ.रा.

लाडघर (तामसतीर्थ) तर नक्की केलंय. तरी अजून काही कर्देसारखा सुंदर किनारा आहे का आसपास रत्नागिरीमध्ये? किंवा अजून खाली सिंधुदुर्गपर्यंत ? कि जिथे आवर्जून भेट द्यायला हवी ? तसे तारकर्लीला आणि सिंधुदुर्ग किल्ला जाणे झाले आहे.

सौंदाळा's picture

29 Oct 2015 - 2:00 pm | सौंदाळा

रेडी बीच (रेडी गणपतीच्या मागच्या बाजुचा नाही) यशवंतगडाच्या शेजारचा.
अप्रतिम बीच. नितळ पाणी.
लाटा वगैरे असणारा, मोठा किनारा असणारा बीच बघायचा असेल तर शिरोडा बीच. (निव्वळ बीचची तुलना केली तर शिरोडा बीच कलंगुटला मागे टाकेल.
येथे नुसते २-३ तास जाऊन परत आल्यामुळे राहण्याच्या सोयींबद्दल माहिती नाही.

Hrushikesh Marathe's picture

29 Oct 2015 - 11:40 pm | Hrushikesh Marathe

Dapoli : Dabhol Side - Chandika Mandi, Dabhol Jetti,Tamas Tirth, Parashuram Monument
Harnai Side : Murud Beach, Karde Beach, Keshavraj Temple, Harnai Port(Evening Sunset), Kadyavarcha Ganpati temple Anjarla
You can go to Guhagar from Dabhol Jetti via Pheriboat along with your Car...
Guhagar : Velneshwar Beach (Safe Plus Less crowdy and clean), Guhagar Beach, Wadeahwar Temple, Hedvi Ganesh Temple

Hrushikesh Marathe's picture

29 Oct 2015 - 11:43 pm | Hrushikesh Marathe

Pure Veg Lunch plus Stay @ Dapoli contact :98 50 518081 Jayram Phatak

Or else near Karde Beach Sagar Savali ( Mr.More) Both is suitable for family