चायनीज टॉर्चर

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
31 Aug 2008 - 3:04 pm
गाभा: 

चायनीज टॉर्चर मध्ये कैद्याला एका खुर्चीवर बसवतात. हातपाय बांधतात. कोणत्याही हालचालीची शक्यता अशी खबरदारी घेतात. एका बालदी मध्ये पाणी भरुन डोक्यावर टांगली जाते. डोक्यावर एकावेळी एकच थेंब पडेल एवढ भोक पाडतात. डोक्याचं पूर्ण मुंडण करतात. पुढचा थेंब केव्हा पडेल ह्याची कैद्याला खात्री नसते. १२ ते २४ तासात कैदी शरण येतो.
असेच काही तरी आजकालच्या शिक्षक जमातीचे होत असावे. शिस्त मोडणार्‍या मुलांची संख्या वाढते अशी कायमची तक्रार शिक्षक मंडळी करतात. बरं शिक्षा करावी तर कुठला पालक नेमका चॅनेल वाल्याना घेउन उभा राहील ह्याचा नेम नाही. लहान सहान शिक्षेला मुले भिक घालत नाहीत. वर्गात गोंधळ कायम. चांगल्या मुलांचे पालक तक्रार करतात ते पण सहन करायचे. नालासोपारा येथील (कॉपी करताना पकडलेल्या )मुलाच्या आत्महत्येनंतर शिक्षक मंडळी तर खुपच बावरली आहेत. शेवटी त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. एवढ्या संख्येला संभाळताना प्रत्येक वाक्य मोजून मापून वापरुन शिस्त संभाळायची ही तारेवरची सर्कस करायची तरी कशी? हा प्रश्न मला शिक्षक मंडळी विचारतात.कार्य़रक्रमानंतरच्या घेरावात ही चर्चा जोर धरायला लागलेली आहे.
मी प्रतिप्रश्न करतो. तुमच्या मते हे कशामुळे?
सहसा खापर मिडीयावर फोडले जाते. मुलांच्या स्वभावातील फरकाला सिरियल्स कारणीभूत आहेत असा मुद्दा पुढे येतो.
पालक हतबल आहेत तर आम्ही काय करणार? बरे आमचे हात वरील कारणाने बांधलेले.
मुलांची दुरुत्तरे सहन करता येत नाहीत बोलायला गेले तर वेगळीच भिती. एका शिक्षीकेने विचारले,
" सर, तुम्ही शिनचान सिरियल बघीतली आहे का?
हा काय प्रकार आहे मला माहित नव्हते.
एक अत्यंत आगावु कार्ट्याचे ग्लोरिफिकेशन आहे शिनचान सिरियल असे कळले.
मुले त्याचे अनुकरण करुन पालक आणि शिक्षकांच्या तोंडाला फेस आणतात.
फक्त शिनचान ला जबाबदार धरावे तर देशभर चाललेला हिंसाचार, लोकसभेतला गोंधळ , थोरामोठ्यांची बेजबाबदार कृती, हे सुद्धा भर घालणारे घटक आहेतच.थोर मंडळीच जर शिनचान सारखी वागत असतील तर त्या एकट्या शिंच्याला जबाबदार तरी कसं धरायचं?
दरम्यान शिक्षकांचा चायनीज टॉर्चर चालू आहेच.
तुम्ही बरेच जण पालक आहात . तुम्हाला काय वाटतं?

प्रतिक्रिया

माझे भाचेमंडळ सुट्टीला आले कि फक्त टीव्ही वर शिन छी बघायची शिक्षा मिळते.

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Aug 2008 - 7:48 pm | बिपिन कार्यकर्ते

मास्तर, काय ती 'शिनचान' ची भयानक आठवण काढली हो... आमच्या कडेही धुमाकूळ होता. मग, शाळेतून आणि घरून डबल दट्ट्या लावला. बाकीचे कार्यक्रम बघायला परवानगी देण्याच्या बोलीवर हे बंद पाडले. कसलं सप्तगुणी कार्टं आहे हो ते...

बिपिन.

विनायक प्रभू's picture

31 Aug 2008 - 7:57 pm | विनायक प्रभू

एकंदरीत शिन चान हा काहीतरी मोठा राडा आहे. कुलदिपकालाच विचारतो.
त्याच्याकडे पुर्ण अनॅलिसिसिस नक्किच मिळेल.
विनायक प्रभु

मास्तर लोकांची गोची समजू शकते .. पण सगळेच मास्तर त्यामुळे साळसूद होत नाहीत. मास्तरांचा दुटप्पीपणाही कारणीभुत असतो. मी टवाळखोर होतो ... मला फार खालची वागणूक मिळे .. पण मी दुटप्पी मास्तरांनाच हेरत असे,(मग ते मला) ... पण जे शिक्षक खरेच चांगले होते त्यांचा आजही आदर आहे आणि आजही गावकडे जाउन त्यांना भेटतो.

अवांतर : शिनचँग ला मिसळपावर वरिल डँबिशचा उपमा देता येइल. त्याचा इतका अफलातुन किडेकरू मी इमॅजिन पण केला नव्हता. बाकी या चर्चेत उतरण्याची माझी पात्रता नाही ... पण केवळ शिनचँग साठी.

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात