गाभा:
नमस्कार,
काल जालावर फिरता-फिरता बाबासाहेबांची एक मुलाखत सापडली. १९५५ साली बी.बी.सी ने घेतलेली.
ही त्याची ट्रांन्सस्क्रिप्ट
हा तुनळी वरील ध्वनीफितीचा दुवा
तर हा कथ्याकुट टाकण्याचं प्रयोजन म्हणजे मला स्वतःला बाबासाहेबांचे गांधींविषयी विचार ऐकून जरासा धक्का बसला.
१. बाबासाहेबांचे हे विचार आणि त्यामागची त्यांची भूमिका ह्यावर आणखी कुठल्या पुस्तकात अथवा लेखात प्रकाश टाकण्यात आला होता/आहे का?
२. बाबासाहेबांची गांधींबद्दल एव्हढी टोकाची मतं होण्यचं कारण काय? (गांधीजींचे स्वराज्यामधील योगदान, त्यांना दिलेली महात्मा ही उपाधी वगैरे)
मिपावरच्या तज्ञ मंडळींकडून यावर अधिक प्रकाश टाकला जावा आणि एक चांगली चर्चा घडावी ही अपेक्षा.
धन्यवाद
प्रतिक्रिया
22 Sep 2015 - 6:21 pm | गामा पैलवान
सुमीत भातखंडे,
मो.क.गांधींनी चालवलेल्या चळवळींची फलनिष्पत्ती अत्यल्प होती. त्यांनी तीन प्रमुख चळवळी केल्या.
१. असहकार चळवळ (१९१९ पासून) : ही पार शिगेला पोहोचली असतांना चौरीचौरा इथे पोलीस मेल्याचे (इ.स. १९२२) कारण देऊन चळवळ अकस्मात थांबवली. हे साफ चुकीचं आहे. चळवळ अश्या प्रकारे चालवली जात नसते. अजून एक विचित्र गोष्ट म्हंजे खिलाफत प्रश्नाची गुंफण. तुर्की खालीफाची गादी खालसा करू नये म्हणून भारतीयांनी का म्हणून चळवळ करावी? भारताला काय देणंघेणं? अश्या देशबाह्य कारणांमुळे चळवळीचं गांभीर्य घटलं.
२. सविनय कायदेभंग (१९३० पासून) : चळवळीला लोकांचा प्रतिसाद मिळाला (इ.स. १९३०-३१), नाही असं नाही. मात्र ब्रिटीश सरकारकडून फारसं काही पदरात पडलं नाही. फक्त गोलमेज परिषदेचं निमंत्रण मिळालं. दांडीयात्रा आणि मिठाचा सत्याग्रह वगैरे करून देखील हातात काहीच पडलं नाही. गोलमेज परिषदेचं निमंत्रण मिळणारं होतंच.
२.१. मग इ.स. १९४० साली वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू केली. विनोबा भावे पहिले सत्याग्रही होते. ती लवकरच गुंडाळण्यात आली. ही प्रमुख चळवळ नाही. फलनिष्पत्ती विचारायलाच नको.
४. चलेजाव चळवळ (१९४२ पासून) : नंतर इ.स. १९४२ ची चलेजाव चळवळ. ८ ऑगस्टला चळवळीची सुरुवात केली आणि
दुसर्याच दिवशी सगळे प्रमुख नेते तुरुंगात होते. चळवळ चालवली ती दुसर्या फळीतल्या भूमिगत नेत्यांनी. इथे नियोजनाचा
स्पष्ट अभाव दिसतो. चळवळ चालवणारे बरेचसे भूमिगत नेते रा. स्व. संघाचे होते
तर सांगायचा मुद्दा काये की गांधींनी चालवलेल्या चळवळींचा फार उदोउदो केला जात आहे. आता आपण खरीखुरी चळवळ कशी चालवली जाते ते पाहूया.
१९०४ साली बंगालची फाळणी झाली. त्यानंतर लाल-बाल-पाल (लाल लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल) यांनी अख्खा भारत चांगलाच पेटवला. 'वंदे मातरम' ही देशव्यापी स्वातंत्र्यघोषणा झाली. टिळकांच्या स्वदेशी चळवळीने इंग्रजी मालाचा खप प्रचंड घटला. टिळकांच्या चतु:सूत्रीने (स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, शिक्षण) लोकांच्या जगण्याचे संदर्भ बदलले. टिळक १९०८ साली मंडालेच्या तुरुंगात ६ वर्षांकरिता गेले तरी चळवळ थंडावली नाही. उलट ती शिगेला पोहोचली. ती इतकी की शेवटी बंगालची फाळणी रद्द करावी लागली (इ.स. १९११). बंगाल तर असाकाही उभाआडवा पेटला होता की ब्रिटीशांना भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवावी लागली. याला म्हणतात चळवळ चालवणे.
तस्मात आंबेडकरांनी गांधीबद्दल म्हंटलंय की - He was a chapter, not an epoch. यामागची पार्श्वभूमी वरीलप्रमाणे आहे.
आ.न.,
-गा.पै.
22 Sep 2015 - 8:46 pm | अनुप ढेरे
याचा काही संदर्भ आहे का?
22 Sep 2015 - 11:44 pm | स्वधर्म
फार म्हणजे फारच कामाचा अाहे तो.
23 Sep 2015 - 12:31 pm | गामा पैलवान
अनुप ढेरे,
जयप्रकाश नारायण आणि अरुणा असफआली हे दिल्लीत लाल हंसराज यांच्या घरी लपले होते. पुण्यात भाऊसाहेब देशमुखांच्या घरी साने गुरुजी आणि अच्युतराव पटवर्धन भूमिगत राहिले होते. प्रतिसरकार चालवण्यासाठी सुप्रसिद्ध झालेले नाना पाटील हे सातवळेकरांच्या घरी होते.
प्रस्तुत मुद्द्याविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. ती उकरून बाहेर काढायला हवीये.
आ.न.,
-गा.पै.
22 Sep 2015 - 9:50 pm | होबासराव
सहमत.
23 Sep 2015 - 9:08 am | खटपट्या
तूनळीवरील ध्वनीफीतीचा दुवा गंडलाय बहूतेक...
23 Sep 2015 - 10:59 am | 'पिंक' पॅंथर्न
हो बरोबर ...युट्युब ला क्लिक केले असता असा मेसेज येतोत..

Page not found
The requested page "/node/www.youtube.com/watch?v=ZJs-BJoSzbo" could not be found.
23 Sep 2015 - 12:34 pm | गामा पैलवान
'पिंक' पॅंथर्न,
मिपाचे वरील दुव्याची मांडणी गंडली आहे. थेट दुवा असा आहे : https://www.youtube.com/watch?v=ZJs-BJoSzbo
आ.न.,
-गा.पै.
25 Sep 2015 - 2:33 pm | 'पिंक' पॅंथर्न
धन्यवाद ...गामा पैलवान